Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तिजोरीवर सव्वा कोटीचा भार

0
0
तिजोरीत खडखडाट असला तरी महापालिकेने बड्या अधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाची कामे सोपविली असून, त्यामुळे नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. दुय्यम दर्जाची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारापोटी गेल्या ३ वर्षांत तब्बल १ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत.

११ व्या दिवशीही टाकी रिकामीच

0
0
‘रविवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल,’ हा समांतरच्या अधिकाऱ्यांनी केलेला दावा फोल ठरला. त्यामुळे शहरवासीयांमागे लागलेले पाणीबाणीचे ग्रहण अकरा दिवस उलटूनही सुटण्यास तयार नाही.

९ वर्षांतील ‘कूल-डे’

0
0
रविवारी औरंगाबादकरांनी डिसेंबर महिन्यामधील गेल्या नऊ वर्षांतील सर्वात थंड दिवस अनुभवला. ७.८ वर घसरलेल्या तापमानाने शहरवासीयांना हुडहुडी भरली. हा या मोसमातील शहरातील हा सर्वांत थंड दिवस ठरला.

सावकारांची खाती तपासा

0
0
मराठवाडा दुष्काळ निवारण लोकसमितीने खासगी सावकारांच्या व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी पीक विमा या प्रक्रियेचे योग्य प्रबोधन होण्याची गरज आहे, अशी सूचना लोकसमितीने राज्य सरकार, विभागीय व जिल्हा प्रशासनाला केली आहे.

दानवेंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

0
0
समन्वयाचा अभाव, अपूर्ण माहिती आणि सर्वसामान्य लोकांची कामे टाळण्याची मानसिकता याचे पदोपदी दिसणारे दृश्य बघून केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची सोमवारी (२९ डिसेंबर) चांगलीच खरडपट्टी काढली.

पुन्हा गाड्यांचे जळितकांड

0
0
बजाजनगरात पुन्हा दोन गाड्या जाळल्याची घटना सोमवारी (२९ डिसेंबर) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन अपघातांत २ ठार; २ जखमी

0
0
तीन वेगवेगळ्या अपघातांत वाळूज परिसरात दोन दुचाकीस्वार ठार झाले. यातील दोन घटना सोमवारी (२९ डिसेंबर) घडल्या. तर एक घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

पर्यटकांना औरंगाबाद लेणी दूरच

0
0
बिबी का मकबरा आणि पानचक्कीला दरमहा किमान एक लाख पर्यटक भेट देतात; मात्र शहरात असूनही औरंगाबाद लेणी केवळ सहा हजार पर्यटक पाहतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव व रिक्षाचालकांकडून वारेमाप भाडेवसुली पर्यटकांना या प्राचीन पर्यटनस्थळापासून वंचित ठेवत आहे.

राजपथावर होणार आवाज बुलंद !

0
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपतींसमोर होणाऱ्या ध्वज संचालनासाठी ११३ कॅडेटचा समावेश असलेला एनसीसीचा संघ सोमवारी (२९ डिसेंबर) रवाना झाला. देशभरातील कॅडेटमधून ’बेस्ट ऑफ कॅडेट’मध्ये निवडण्यासाठी १ जानेवारी २०१५पासून दिल्लीत स्पर्धा घेतली जाणार आहे.

८० हजार ‘वन डे’ परवाने

0
0
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारी बनावट दारू पकडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके स्थापन केली आहेत. दरम्यान थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ८० हजार नागरिकांना एक दिवसाचा मद्यपान परवाना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

स्वागत करा, पण जरा जपूनच

0
0
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या थर्टी फर्स्टनिमित्त कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपी वाहनचालकांवर सोमवारपासून (२९ डिसेंबर) कारवाईची सुरू करण्यात आली असून मद्यपींवर करडी नजर ठेवली जात आहे.

फारोळ्यातला पंप बिघडला

0
0
शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील एक पंप सोमवारी (२९ डिसेंबर) बिघडला, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

दोन दिवस थंडीची लाट

0
0
वातावरणातील बदल आणि बंगालच्या उपसागावर नैऋत्य दिशेला निर्माण झालेले तीव्र दाबाचे क्षेत्र कायम असल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मराठवाड्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

४५ हॉटेल, धाबेचालकांना नोटीस

0
0
अन्न हाताळणाऱ्या कामगारांना स्वच्छ कपडे, हेड कॅप्स नसणे यासह अनेक त्रुटी आढळल्यामुळे ४५ हॉटेल व धाबेचालकांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नोटीस पाठविली आहे. तातडीने सुधारणा न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या

0
0
एकतर्फी प्रेमातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार जयभवानीनगरात सोमवारी (२९ डिसेंबर) पहाटे घडला. अजय शेषराव म्हस्के (वय २३) असे या तरूणाचे नाव आहे.

‘समांतर’च्या अधिकाऱ्यांचे राजीनामे

0
0
समांतरवर कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची धास्ती घेऊन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला कंपनीतीलच एका बड्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

गजाननचा झाला राजानन

0
0
एमकेसीएलच्या परीक्षेमध्ये तीन भावांचा क्रमांक सोबत यावा म्हणून ऑनलाइन फॉर्ममध्ये नाव बदलून भामटेगिरी केल्याचा प्रकार उघड झाला. भावाला उत्तीर्ण करण्याचा हा खटाटोप तिन्ही भावांच्या अंगलट आला.

ठाकरेंनी केला ‘समांतर’चा पंचनामा

0
0
मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२९ डिसेंबर) ‘समांतर’ जलवाहिनेचे काम करणाऱ्या कंपनीच्या कामासह व महापालिकेच्या कामकाजाचा अक्षरशः पंचनामा केला. समांतरचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून पाणीपुरवठ्याबद्दल केल्या जात असलेल्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झालेत.

३०० एमएलडीची योजना फक्त १०० मध्ये गुंडाळली

0
0
जायकवाडीपासून शहरात ३०० एमएलडी पाणी आणण्याचा करार महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबत केलेला असला तरी कंपनी प्रत्यक्षात फक्त शंभर एमएलडीचीच योजना करणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या ५६ आणि १०० एमएलडी क्षमतेच्या जुन्या योजना नवीन योजनेला पूरक म्हणून वापरल्या जातील, असे स्पष्ट करीत महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी ‘समांतर’च्या कामकाजाचा पर्दाफाश केला.

स्वच्छता अभियानासाठी पालिकेची साहित्य खरेदी

0
0
१३ लाख लोकसंख्येच्या शहरात स्वच्छतेची जबाबदारी असेलल्या महापालिकेकडे स्वच्छता अभियानासाठी खराटे, फावडे, टोपले, मास्क आणि ग्लोजही उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती महापौर कला ओझा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट झाली. त्यामुळे महापौरांनी तातडीने हे साहित्य खरेदी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images