Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘गुंड आणून तुझे हातपाय तोडतो’

$
0
0
‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून, हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते मी पाहतो,’ अशा शब्दांत पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय केनेकर यांना धमकावले.

अन् ते रमले सोनेरी दिवसांत

$
0
0
कोणी आपल्या त्या वर्गात जाऊन बाकावर बसत होते, कोणी शांत बसा ना... असे सांगत सरांची नक्कल करण्यात दंग. तर काही वसतिगृहातील आपली रूम शोधत होते. काही जणांनी ग्रंथालयाकडे पाय वळवित, त्या कॉलेज जीवनातील आपल्या जुन्या सोनेरी दिवसांच्या आठवणीतील गप्पाचा फड रंगवीला.

मुंडे यांचे समाजकार्य पुढे नेऊ: कराड

$
0
0
सर्वांनी मिळून गोपीनाथ मुंडे यांचे समाजकार्य व विचार पुढे नेऊ, असे आवाहन माजी महापौर डॉ. भागवत कराड यांनी केले. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्त शनिवारी ( ३ जानेवारी) आयोजित कार्यक्रमात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मरणोत्तर ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

भूजल पातळी वाढीसाठी ‘धडे’

$
0
0
राज्यातील ८२ टक्के प्रदेश हा डेक्कन बेसॉल्टीक खडकापासून बनलेला असल्याने पाण्याचे भूस्तरात मुरण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. याबाबत अज्ञान असल्याने महाराष्ट्रात पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न दूर करायचा असेल तर शिवार, गावपातळीवरील नकाशे तयार करून योग्य त्या ठिकाणी पाणी साठविण्याच्या योजना राबविल्या जाणे आवश्यक आहे आणि या योजनांची ‘धडे’ सर्वसामान्यांना दिली गेली पाहिजेत.

काँग्रेसमध्ये ‘घर वापसी’ नाही

$
0
0
एकदा काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर पुन्हा पक्षात येण्यासाठी ‘घर वापसी’ची कोणतीही योजना नाही. काँग्रेस पक्षाचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सध्या जोरात चालू आहे. त्यानंतरच नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित केली जाईल. अशी माहिती नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

$
0
0
आपल्याकडील कलाकार विशिष्ट उंची गाठल्यावर स्वतःचा आवाज विसरून वेगळीच भाषा बोलू लागतात. येथील कलाकारांनी स्वतःची ओळख न लपवता तसेच त्याचे भांडवल न करता तटस्थपणे अन्यायाविरूद्ध आवाज उठवला तर तो अधिक गडद होईल आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट व्हायला मदत होईल, असे मत अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागराज मंजुळे यांनी केले.

‘आयआयएम’साठी कॉलेज बंद

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्था औरंगाबादला डावलून नागपूरला उभारण्याचा शासनाचा निर्णय अन्याय करणारा आहे, असा आरोप करीत विविध विद्यार्थी संघटनांनी शनिवारी शैक्षणिक बंदची हाक दिली होती. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विविध कॉलेजांमध्ये जात बंद पाळण्याचे आवाहन केले, तर काही ठिकाणी शासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपला डावलून महापालिकेत बैठक

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय केनेकर आणि आयुक्त प्रकाश महाजन यांच्यात झालेल्या वादावादीच्या नंतर शनिवारी महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून आयुक्तांबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात रखडलेल्या विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली. रस्त्यांची कामे लवकर मार्गी लावा, असे आदेश महापौर कला ओझा यांनी आयुक्तांना दिले.

आयुक्तांची तक्रार मंत्र्यांकडे

$
0
0
महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांची तक्रार आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कोर्टात पोचली आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी शुक्रवारी पालिकेत घडलेल्या घटनेची माहिती दानवे यांना दिली.

ऐक्याची जाणीव ठेवा!

$
0
0
शिवरायांच्या काळातही जातीय रचना होती; पण मराठी राज्यासाठी सर्वजण एकत्र आले. सध्या जातीय संघटना वाढल्या आहेत. या सर्वांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची जाण ठेवावी असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

तलावाशेजारी असूनही पाणीबाणी

$
0
0
सिडकोचा उत्तरेकडील शेवटचा भाग असलेल्या एन १३ वानखेडेनगर वॉर्डाला विविध समस्यांनी वेढले आहे. वॉर्डावगत हर्सूल तलाव आहे. तेथून १३ वॉर्डांना पाणी पुरविले जाते, मात्र वानखेडेनगरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्यात टँकरचा आलेख चढता

$
0
0
अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी टँकरची संख्या वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाच तालुक्यांतील ५५ गावांची तहान टँकरने भागवण्यात येत आहे. या गावांतील १ लाख ४१ हजार ४४४ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

इतिहास देईल महाराष्ट्राला आत्मभान

$
0
0
‘अटक ते कटक असा मराठी साम्राज्याचा विस्तार होता. हिंदुस्थानात कर्तृत्वात मराठ्यांशी बरोबरी करील असा एकही प्रांत नव्हता. मोगल व इंग्रजांना नामोहरम करणाऱ्या महाराष्ट्राने देशावर राज्य केले. दुर्दैवाने उज्ज्वल इतिहासाचा आपल्याला विसर पडला आहे.

दीडशे कॉलेजांना बोर्डाची नोटीस

$
0
0
पात्रता नसताना विद्यार्थ्याला अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश देणारे विभागातील दीडशे ज्युनिअर कॉलेज पुन्हा बोर्डाच्या रडारवर आले आहेत. ‘दंड भरा, अन्यथा शाळांची मान्यता काढून घेऊ, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रद्द करू,’ असा सज्जड दम मंडळाने शाळांना भरला आहे.

अपयशच उत्तम शिक्षक असतो

$
0
0
अपयश हा उत्तम शिक्षक असतो. अपयशाने खूप काही शिकता येत, अपयश हा गुरु असतो, अशा भावना नामवंत कलावंत, नवोदित सनदी अधिकारी आणि जगावेगळ्या शास्त्रज्ञांनी लातूरातील विद्यार्थ्यांसमोर अनुभव कथनातून व्यक्त केल्या.

मुलींच्या शरीरात रक्ताची कमतरता

$
0
0
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या २२ टक्के किशोर वयाच्या मुलींच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. ६१ टक्क्याहून अधिक मुलींच्या घरात वैयक्तिक शौचालय नाहीत, तर ८२ टक्क्यांवर मुलींची दात किडलेली आहेत.

आयुक्तालयासाठी लातूरकर एकवटले

$
0
0
यापुर्वीच्या आघाडी सरकार पाठोपाठ आता भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारनेही लातूरचे हक्काचे असणारे आयुक्तालय नांदेडला हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राजकीय गजलांनी रंगला मुशायरा

$
0
0
राजकारणापासून ते गरीबीपर्यंतच्या विविध विषयांवर सादर केलेल्या गजलांनी खुलताबादेतील मुशायरा रंगतदार झाला. या मुशाऱ्यातील गजलांचा श्रोत्यांनीही आनंद लुटला. देशपातळीवरील राजकारण ते सर्वसामान्य जीवनातील खुमासदार विनोद सादर झाल्यानंतर उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

निराधार बालकांची मुंबापुरीत धमाल

$
0
0
परिस्थितीमुळे अनाथालयात राहावे लागत असलेल्या ३५ चिमुकल्यांचे मुंबापुरीला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मेट्रो ट्रेनची सफर, जुहू चौपटी, नेहरु सायन्स सेंटर आदी ठिकाणी भेट देत या मुलांनी धमालमस्ती केली.

कार्यालय केवळ नावालाच

$
0
0
जायकवाडी धरणातील पाण्याचा फायदा पैठण तालुक्यातील शेतीला व्हावा, यासाठी सिंचन विभागाने राबविलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या लोहगाव शाखा कार्यालयाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images