Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिवाळ्यातील मेवा; तंदुरूस्तीचा ठेवा

0
0
पेरू, बोरे, डाळिंब, अंजीर, मक्याचे कणीस या रानमेव्याची लज्जतच न्यारी. सध्या शहरात तब्येत तंदुरूस्त करणाऱ्या या मेव्याची आवक वाढली आहे.

दीड लाखासाठी अपहरण

0
0
नोकरी लावतो म्हणून घेतलेले दीड लाख वसूल करण्यासाठी, पद्मपुऱ्यातून एका व्यक्तीचे चौघांनी अपहरण केले. शनिवारी (३ जानेवारी) मध्यरात्री हा थरार घडला. क्रांती चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली.

तंत्रशास्त्र विद्यापीठाला मिळेल का बळ?

0
0
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व इंजिनीअरिंग कॉलेज तंत्रशास्त्र विद्यापीठाला जोडण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच दिले आहेत. मंत्रिमंडळाने या विद्यापीठाला गेल्या जानेवारीत मंजुरी दिली.

भाजीत घातक रंग व रसायन

0
0
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) औरंगाबाद विभागात ३१ डिसेंबर रोजी छापे टाकून २४ हॉटेलमधून २४ पदार्थांचे नमुने घेतले आहेत. यापैकी एक नमुना अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.

अंतूर किल्ल्याचा ‘मेकओव्हर’

0
0
निसर्गसौंदर्य लाभलेल्या परिसरातील अंतूर किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच परिपूर्ण किल्ला पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या पर्यटनस्थळाचा विकास वन विभाग करीत आहे.

तरच मोफत पाणीपुरवठा

0
0
कंपनीने १ सप्टेंबरपासून शहराची पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली आहे, पण जलवाहिनी टाकण्याचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. हे काम केव्हापासून सुरू होणार आहे?

विकासाला १५ वर्षांचा ब्रेक

0
0
आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी स्थापन होऊन पंधरा वर्ष उलटली. मात्र अजूनही या भागात विकासकामे झालेली नाहीत. या भागातील रहिवाशांना पाणी, रस्ते, वीज या मूलभूत समस्यांनीच ग्रासले आहे. इतर समस्यांची तर बातच सोडा.

कोथिंबीर रस्त्यावर फेकली

0
0
जुडीला फक्त २५ पैशांचा भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी (४ जानेवारी) चक्क दोन टेम्पो कोथिंबीरच्या जुड्या रस्त्यावर फेकल्या. सध्या जाधवाडी बाजारपेठेत मागणीपेक्षा आवक जास्त झाल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत.

अल्पवयीन कारचालकाचा थरार

0
0
अल्पवयीन कारचालकाने रविवारी (४ डिसेंबर) राजाबाजारमध्ये थरार उडविला. त्याच्या कारने दिलेल्या धडकेत तीन वाहन चालक जखमी झाले. संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

धनंजय मुंडेंवर दगड फेकले

0
0
भगवान बाबांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी तेथून परत जाण्याचा निर्णय घेतला. या दगडफेकीत धनंजय मुंडे यांची गाडीचे नुसकान झाले.

दगडफेकीविरोधात परळी बंदची हाक

0
0
भगवान बाबांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या ताफ्यावर दगडफेक

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांच्या भगवानगडावरील नियोजित भेटीवेळी गाडीवर सोमवारी दगडफेक झाल्याने येथे तणाव वातावरण होते. या घटनेच्या चौकशीची मागणी मुंडे यांनी केली आहे.

जागरूक प्रवाशामुळे चिमुकली सुखरूप परतली

0
0
घराबाहेर खेळाण्यास आईने नकार दिला म्हणून रागावलेली एक १३ वर्षांची मुलगी कोलकात्त्याला आजीकडे जाण्यास निघाली खरी, पण पोचली दिल्लीला. आपल्या लाडकीचे काही बरे-वाईट तर झाले नाही ना, या विचाराने पालक चिंतातूर झाले असतानाच त्या चिमुकलीला सुखरूपपणे घरी पोहचविण्याचे काम पोलिसांनी केले. या कामात एका जागरूक प्रवाशाने मोलाची मदत केली.

पालिका निवडणुकीची वॉर्ड रचना ऑनलाइन

0
0
महापालिका निवडणुकीची वॉर्ड रचना ऑनलाइन होणार आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने पालिकेकडून तपशील मागवला असून, येत्या आठ ते दहा दिवसात वॉर्ड रचना जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

चिनी कलाकारांवर शास्त्रीय नृत्याची जादू

0
0
शहरातील महागामी नृत्यसंस्थेच्या संचालिका पार्वती दत्ता आणि शिष्यांना नामांकित बीजिंग डान्स अॅकॅडमीने (चीन) ऑक्टोबर महिन्यात नृत्य सादरीकरणासाठी निमंत्रित केले आहे. बिजींग शहरातील कलाकारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महागामी संस्थेत भारतीय शास्त्रीय नृत्य पाहिले. प्राचीन वारसा जपणाऱ्या ‘महागामी’ने चीनच्या कलाकारांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

मका खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांची पिळवणूक

0
0
तालुक्यात अद्याप शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे कमी भावात मका विकावा लागत आहे. व्यापाऱ्यांकडून सरासरी प्रति क्विंटल १००० रुपये भाव मिळत आहे. शासकीय केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना १३५० रुपयांचा हमी भाव मिळू शकतो.

सिंचन विभागाविरोधात कोर्टात जाणार

0
0
‘जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे मी गेल्या एक वर्षापासून माहिती मागत आहे. सिंचन विभागांतर्गत मंजूर कामांची यादी, प्रशासकीय मान्यता याचा तपशील देण्यास टाळाटाळ होत असल्याने कोर्टात दाद मागणार आहे,’ असा इशारा जिल्हा परिषद सदस्य नंदा विष्णू ठोंबरे यांनी दिला आहे.

टेंडर झालेलीच कामे होणार

0
0
‘टेंडर झालेली व सध्या सुरू असलेलीच कामे केली जातील,’ असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला सोमवारी (५ जानेवारी) दिले.

अमेरिकेचा अभ्यासगट औरंगाबादेत

0
0
‘सांस्कृतिक, शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत औरंगाबादचा चेहरामोहरा पाहायला आलोय. यातून भारतीय संस्कृती व इतिहासाचं दर्शन होईल’ असे भावोद्गार अमेरिकहून आलेल्या अभ्यासगटाने व्यक्त केले. रोटरी इंटरनॅशनलच्या सांस्कृतिक-शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत चौघेजण औरंगाबादेत आले आहेत.

मनोरुग्णांची भरती बंदच

0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृती विभागाअंतर्गत मनोरुग्णांची भरती अजूनही बंदच आहे. विशेष म्हणजे विभागाच्या एकमेव डॉक्टरने राजीनाम्याची एक महिन्याची नोटीस दिली आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा मागेही घेतली, मात्र त्यानंतरही मनोरुग्णांची भरती सुरू झालेली नाही. त्यामुळे विभागाच्या निष्काळजीपणाला प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images