Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘वन्यजीव विभागात गैरव्यवहार’

$
0
0
वन्यजीव विभागाच्या कन्नड व नागद परिक्षेत्रात एक कोटी ८९ लाख रुपयांची विकासकामे झाली; मात्र कामात भ्रष्टाचार झाला असून, माहितीच्या अधिकारात चुकीची माहिती देऊन घोटाळ्यावर पडदा टाकला जात आहे, असा आरोप बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष देविदास राठोड यांनी केला आहे.

‘समांतर’साठी शिवसेनेची धडपड

$
0
0
शहराचा पाणीप्रश्न आणि समांतर जलवाहिनी या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घ्या, अशी मागणी करणारे स्मरणपत्र भारतीय जनता पक्षाने सोमवारी महापौर कला ओझा यांना दिले. त्याचदरम्यान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सुभेदारी विश्रामगृहात समांतर जलवाहिनीचे काम लवकर सुरू करण्याबाबत बैठक झाली.

महिलांना घरी येऊन धमक्या

$
0
0
अवैध दारूविक्रेत्यांविरोधात हिमायतनगर​ तालुक्यातील पवना येथील महिलांनी एल्गार पुकारल्यानंतर गुन्हे दाखल झालेल्यांकडून महिलांना धमकावण्यात येत आहे. महिलांच्या घरी येऊन दारूविक्रेते धमकावत असल्याची तक्रार गावातील महिलांनी केली आहे.

पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी घट

$
0
0
जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांतून पाणी सोडल्यामुळे मराठवाड्यातील काही भागांना दिलासा मिळाला असला, तरी आता पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे.

कर्मचाऱ्याची आत्महत्या

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या केंद्रीय संगणक व तंत्रज्ञान संस्थेतील (निलीट) कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने गोगाबाबा टेकडी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

काँग्रेस-राष्ट्रवादीची एक्स्पायरी डेट संपली

$
0
0
‘राज्यात पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजासाठी सत्तेचा उपयोग केला नाही. मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांसाठी केला. सत्ता जाण्याची चाहूल लागताच मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला.

निकिता पाटील जिल्ह्याची युवावक्ता

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठवाड्याचा युवा वक्ता आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या निकिता पाटीलने प्रथम क्रमांक मिळविला.

अनियमित कामांची चौकशी होणार

$
0
0
वन्यजीव विभागाच्या कन्नड व नागद परिक्षेत्रातील एक कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांची तपासणी करण्यात येणार आहे. ही कामे झाली असून चौकशीची मागणी केल्यानुसार तपासणी करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी सांगितले.

माध्यमांमध्ये हुजऱ्यांची फौज

$
0
0
शेतकऱ्यांच्या दुःखात हात घालण्याचे धाडस खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखविलेले नाही आणि शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अजिबात आस्था नसलेली माणसे मोठमोठ्या दैनिकांमध्ये मोठमोठ्या पदांवर जाऊन बसली आहेत.

रंगमंदिरांची लक्तरे वेशीवर

$
0
0
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कलेच्या प्रांतातही रसिकांचे हाल सुरू आहेत. संत एकनाथ रंगमंदिर आणि तुकाराम नाट्यगृहातील तुटलेल्या खुर्च्या, स्वच्छतागृहांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय यामुळे पालिकेच्या कारभाराचे धिंडवडे शहराच्या वेशीवर टांगले आहेत.

पतीला पेटवले

$
0
0
पत्नीला भेटण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या पतीला मेहुणा व भावजयीने रॉकेल टाकवून पेटवून दिले. समतानगरमध्ये सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाला भेटता न आल्याने आत्महत्या

$
0
0
पत्नीने अबोला धरल्यामुळे, आजारी मुलाला भेटता आले नाही. त्यामुळे निराश झालेल्या एका मजुराने आत्महत्या केली. ही घटना मुकुंदवाडी येथील लायन्स क्लब कॉलनीत सोमवारी सायंकाळी घडली. या मजुराची पत्नी कौटुंबिक वादातून सात महिन्यांपूर्वी जालना येथे माहेरी गेली आहे.

नातेवाईकांकडून ५ किलो गुटखा जप्त

$
0
0
घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक वॉर्डातच तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात. काही जण तेथेच विड्या, सिगारेट फुंकतात. या प्रकाराला चाप लावण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने दोन दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाईकांकडील तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

आरोपींची पोलिसांकडून बडदास्त

$
0
0
खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून शाही बडदास्त सुरू आहे. मंगळवारी (६ जानेवारी) सत्र न्यायालयाच्या आवारात हाप्रकार उघड झाला. बायजीपुरा भागातील अज्जू बिल्डर उर्फ शेख अझर शेख अख्तर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा २२ एप्रिल २०१३ रोजी खून झाला.

पाल‌िका अधिकाऱ्यांना पिटाळले

$
0
0
मालमत्ता कर, विलंब शुल्क वसूल करायला आलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी पिटाळून लावले. जाधववाडी बाजार समितीत मंगळवारी (६ जानेवारी) हा प्रकार घडला.

‘भारतमाता’ नावाचा मैत्रीचा धागा

$
0
0
मैत्रीचा निर्मळ धागा असेल तर वर्षामागून वर्षे सरत गेले की तोही अधिकाधिक घट्ट होत जातो. यात सामाजिक उपक्रमांची असलेली आवड आणि यातून झालेली मैत्री तर चिरंतन टिकते. ती मैत्री राजकारणासारख्या क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्यासाठी बळ देते.

गावठाण वर्षानुवर्षे उपेक्षेचे धनी

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होऊन २० वर्षे उलटून गेली तरी भावसिंगपुरा गाव प्राथमिक सुविधांपासून वंचितच आहे. नव्या वसाहती वेगाने वाढल्यानंतर जुन्या व नव्या वसाहतीमधील सुविधांची दरी आणखी वाढली आहे.

लग्नाच्या मांडवात पुस्तकांचा आहेर

$
0
0
महागडी लग्नपत्रिका छापून समाजात चर्चा घडवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. वधु-वराचे नाव, विवाहस्थळ आणि वेळ एवढाच तसा पत्रिकेचा उपयोग असतो. अगदी पाचशे रुपयांची लग्नपत्रिकाही नंतर अडगळीत पडते.

करणीच्या संशयावरून खून

$
0
0
करणी केल्याच्या संशयावरून एका वृद्ध इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून, ही घटना बुधवारी रेवगाव शिवारात घडली.

जालन्यात नव्या शहराची उभारणी

$
0
0
प्रदुषणासह अन्य उपस्थितीत झालेल्या जटील प्रश्नांमुळे जालन्यातील नागेवाडी - दरेगाव येथील नियोजित प्रकल्प रद्द करुन त्याऐवजी निधोना, आंबेडकरवाडी येथे एक हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन शहर निर्माण करण्यासाठी सिडकोने प्रयत्न सुरू केले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images