Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिंदू कोणाचाही द्वेष करत नाही!

$
0
0
हिंदू समाज कोणाचाही द्वेष करत नाही. सर्वांचे कल्याण व्हावे हा हिंदुत्वाचा उद्देश असून हिंदुत्वच देशाला एकतेच्या धाग्यात जोडेल, असा हिंदुत्वाचा गजर आज पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 'देवगिरी महासंगम' या संघ स्वयंसेवकांच्या महाशिबिरात केला.

कट्टरता रोखण्यासाठी घरवापसी

$
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘घरवापसी’चे समर्थनच केले. समाज जेव्हा कट्टरतेकडे जातो, तेव्हा आपले ‘बाहेर’ गेलेले लोक परत आणण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत भागवत यांनी या ‘पद्धती’ला पाठिंबा दिला.

वैयक्तिक विहिरींची मान्यता होणार रद्द

$
0
0
रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) वैयक्तिक विहिरींचे लाभार्थी निवडताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना निवडण्यात आल्याचा आरोप झाला आहे. आरोप झालेल्या विहिरींची मान्यता रद्द करण्याचा विचार पंचायत समिती करीत आहे.

गोंधळ घालणाऱ्यांची ताब्यात घेऊन सुटका

$
0
0
छावणी परिषदेच्या सात वॉर्डासाठी रविवारी झालेल्या मतदानावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस व लष्करी जवानांनी सोम्य लाठीमार केला. दरम्यान, मतदान केंद्रबाहेर गोंधळ घालणाऱ्या १४ महिला-पुरूषांना पोलिसांनी ताब्यात घेतले; त्यांची समज देऊन सुटका करण्यात आली.

आम्ही मनाचे राजे

$
0
0
विद्यापीठांमधील विभागांचा कारभार म्हणजे एखाद्या संस्थानांसारखा झाल्याचे अनेकदा खाजगीत बोलले जाते. प्राध्यापकांमधील कुरबुरी, वादविवाद अनेकदा चव्हाट्यावर आले. अनेकदा विभागातील प्रकरणे पोलिस ठाण्यांपर्यंत गेली.

हजारो वर्षांच्या भेदपरंपरा मुळापासून उखडून टाका

$
0
0
‘विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या भारतातील हिंदू समाजासाठी स्मशानभूमी, मंदिरे व पाणवठे एकच नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र, देश सक्षम करण्यासाठी व गतवैभव प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षांच्या भेदपरंपरा मुळापासून उखडून टाका,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

छावणीत आज मतमोजणी

$
0
0
छावणी परिषदेच्या निवडणुकीत रविवारी (११ जानेवारी) ७८ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी छोट-मोठे अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

सौरपंपाने मिळेल शेतीला वरदान

$
0
0
वीज टंचाई दूर करण्यासाठी शेतीत पाच लाख सौरपंप बसवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. या योजनेमुळे सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर होणार असून शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध असेल.

उदगीरचे साहित्य संमेलन रद्द

$
0
0
मराठवाडा साहित्य परिषदेचे उदगीर येथील नियोजित ३६ वे मराठवाडा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संमेलन घेणे शक्य नसल्याचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी कळवले आहे.

ठरलेल्या मार्गानेच हायवे

$
0
0
सोलापूर-धुळे हायवे (२११) ठरलेल्या मार्गानेच जाणार असून वाल्मीजवळ उड्डाणपूल होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. त्यामुळे या मार्गासाठी जिल्ह्यात निर्माण झालेला १० किलोमीटरचा अडथळा दूर झाला आहे.

मोदींवर शालीतून शरसंधान

$
0
0
‘राजाकडून भेट मिळालेल्या राज्याचे अप्रुप वाटण्याऐवजी दडवून ठेवलेल्या कवडीकडे लक्ष देणारा भिकारी आणि वर्षानुवर्षे लक्षात ठेवलेल्या राजा ज्युलिअस सीझरलाही लोक विसरून जातील,’ असे म्हणत मोहन भागवतांनी मोदींवर शरसंधान साधले.

धनंजय मुंडेंच्या अटकेची शक्यता

$
0
0
परळीतील संत जगमित्र सूत गिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी मागे घेतला.

‘समांतर’च्या झोळीत दरमहा ५ कोटी!

$
0
0
समांतर जलवाहिनीसाठी महापालिकेने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीबरोबर अजब करार केल्याची माहिती हाती आली आहे. कंपनीबरोबर करार करताना महापालिकाच कंपनीकडे गहाण ठेवली की काय, अशी शंका येऊ लागली आहे.

संघटनांतील फाटाफुटीमुळं ‘शाळा बंद’ संभ्रमात

$
0
0
शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, संच मान्यतेची प्रक्रिया जुन्याच पद्धतीने करावी आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (१३ जानेवारी) शाळा बंद ठेवायच्या की नाही, यावरून संघटनांमध्येच फाटाफूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक संघटनांनी आंदोलनाशी संबध नसल्याचे स्पष्ट केले तर, काही संघटनांनी ‘बंद’मध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट केले.

छावणीच्या निवडणुकीत अपक्षांनी मारली बाजी

$
0
0
छावणी परिषदेच्या निवडणुकीत ७पैकी ३ वॉर्डांत अपक्षांनी बाजी मारली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उपाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी युती करण्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेणार आहेत.

पूर्वप्राथमिक शिक्षणावर लवकरच अंकुश

$
0
0
राज्यातील नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी हे पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. नव्या सरकारने याबाबत एप्रिलपर्यंत धोरण ठरविण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी शिक्षण विभागाच्या दोन बैठका झाल्या आहेत. वयाची ३ वर्षे पूर्ण केल्यानंतरच प्रवेश, शुल्क नियंत्रण यांवर सरकार भर देणार आहे.

चिनी मांजाचा पक्ष्यांना फास

$
0
0
मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून पक्ष्यांच्या जीवावर बेतली आहे. धारदार मांजा वापरल्यामुळे आकाशात उंचावर उडणारे पक्षी जायबंदी होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. मांजामुळे पक्ष्यांसोबतच दुचाकीस्वारांनाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी पतंग उडवताना साधा दोरा वापरावा, असे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.

भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक

$
0
0
भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा अशा घरमालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. कलम १४४नुसार पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (१२ जानेवारी) हे आदेश काढले.

२६८ कोटींच्या कर वसुलीसाठी काय केले?

$
0
0
शहरातील २६८ कोटींच्या थकित मालमत्ता कर वसुलीप्रकरणी महापालिकेने काय पावले उचलली, याची विचारणा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (१२ जानेवारी) झालेल्या सुनावणीत केली. त्याचप्रमाणे ही वसुली कशी करणार, किती मालमत्तांना कर लावलेला नाही, शहरातील रस्त्यांची सध्या काय स्थिती आहे, अशी विचारणा करत महापालिकेला सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

वृद्धांच्या काळजीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळनिर्मिती

$
0
0
ज्येष्ठ व वद्धांची शारीरिक, मानसिक व भावनिक काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळनिर्मिती महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणेनंतर मराठवाड्यात पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात होणार आहे. मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ व आस्था फाउंडेशनच्या सहकार्याने ‘सर्टिफिकेट कोर्स इन जेरिअॅट्रिक केअर’ हा १५ आठवड्यांचा अभ्यासक्रम येत्या काही दिवसांत सुरू होत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images