Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उस्मानाबादेत वीज पडून एक ठार

$
0
0
सटवाईवाडी (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) येथे झाडाखाली बसलेल्या शोभा बाळू पवार या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. दरम्यान, रोहिणी नक्षत्राच्या दमदार पावसामुळे सात जूनपर्यंत अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली आहे.

पैठण तालुक्याचा निकाल ७९.१३ टक्के

$
0
0
दहावीच्या निकालात पैठण तालुक्यातील ७९.१३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. २८.९८ टक्के रिपीटर विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा पास झाले आहेत. याहीवर्षी तालुक्यात मुलींनी बाजी मारली आहे. ७६.९५ टक्के मुलांच्या तुलनेत ८२.१८ टक्के मुली दहावीच्या परीक्षेत पास झाल्या आहेत.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी कॅफेत गर्दी

$
0
0
शालेय जीवनातील महत्त्वाचा व शेवटचा टप्पा दहावी मानला जातो. दहावीची परीक्षा दिल्यानंतर गेले दोन महिने सुटीचा आनंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता शुक्रवारी सकाळपासूनच कमालीची शिगेला पोचली होती.

वैजापूर तालुक्याचा निकाल ८४ टक्के

$
0
0
वैजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ८४.२४ टक्के लागला आहे. यावर्षी निकालात मुलींनी बाजी मारली असून ८२.१९ टक्के मुलांच्या तुलनेत ८६.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

संस्थेच्या बँक खात्यातून परस्पर काढले पैसे!

$
0
0
सिंकदर अली वजद मेमोरिअल ट्रस्टचा जनरल सेक्रेटरी असल्याचे सांगून संस्थेच्या बँक खात्यावरून एका व्यक्तीने लाखो रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नावडतं गणित

$
0
0
गणित विषय तसा विद्यार्थ्यांच्या नावडीचाच असतो. यंदा राज्यभरातील गणिता विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर नजर मारली तर यंदा गणित विद्यार्थ्यांचा नावडीचाच विषय ठरल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद स्थानकावर महिला कुली

$
0
0
पुरूषांच्या व्यवसायात महिलांचे आगमण आता नवे काही राहीले नाही. कुली म्हणुन डोक्यावर ओझे वाहणाऱ्या कुलीच्या व्यवसायात एक महिला कुलीने आता प्रवेश केला आहे. औरंगाबाद रेल्वे स्‍थानकावर कुलीचा बिल्ला घेऊन मंदाबाई कल्याण सिंग हिने काम सुरू केले आहे.

सफाई कामगार मुलगी अव्वल

$
0
0
महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारी रुपाली भूईकर हिला शिक्षणाची आस स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे ‌तिने रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करत-करत रात्रशाळेच्या माध्यमातून दहावीची परीक्षा दिली. आणि या शाळेतून पहिली आ‌ली आहे.

लाभार्थीवरील खोटे गुन्हे मागे घ्या

$
0
0
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या काही लाभार्थ्यींवर दखल झालेले खोटे त्वरित मागे घेण्यात यावेत, तसेच महामंडळाच्या अध्यक्षांनी वाटप केलेल्या पाच कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी दलित अत्याचार विरोधी महासंघाने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

पाण्याच्या टँकरवर पालिकेची ३ कोटींची उधळण

$
0
0
पाणी टंचाईच्या नावाखाली नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांची उधळण केली आहे. पुढील दोन महिन्यांसाठी (जून-जुलै) पावणे दोन कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देत तशी तरतूद करण्याचे आदेश पालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिले.

लातूर विभागाचा ७३ टक्के निकाल

$
0
0
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाचा दहावीचा निकाल ७३.७५ टक्के लागला आहे. राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत हा सर्वात कमी निकाल आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत हा निकाल चार टक्क्यांनी वाढलेला असल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्त्रबुद्धे यांनी दिली.

औरंगाबादकरांना पुन्हा 'मटा'ची ट्रिपल धमाल ऑफर

$
0
0
अल्पावधीत औरंगाबादकरांच्या मनात घर केलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचकांसाठी पुन्हा एकदा ट्रिपल धमाल ऑफर जाहीर केली आहे. गेल्या वर्षी 'मटा'च्या ट्रिपल धमाका ऑफरला भरभरून प्रतिसाद दिलेल्या औरंगाबादकरांना ही ट्रिपल धमाल भेट विशेष पर्वणी ठरणार आहे.

शहरात १०० क्विंटलहून अधिक पेढ्याची विक्री

$
0
0
शैक्षणिक प्रवासाची पहिली पायरी म्हणजे दहावी. औरंगाबादेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. गुणवंतांचे भरभरून कौतुक करण्यात पालकांनीही कुठे कंजुषी केली नाही.

तुळजाभवानीच्या मूर्तीचे लवकरच लेझर परीक्षण

$
0
0
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या पाषाण मूर्तीचे लवकरच थ्रीडी लेझर स्कॅनरद्वारे परीक्षण करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

इंधन वाहतुकदारांचा संप सुरुच

$
0
0
मनमाडच्या इंधन डेपोतील वाहतूक ठेकेदारांचा संप दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यासह तेरा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावर झाला असून, या संदर्भात कंपनी व ठेकेदार यांच्यात शनिवारी औरंगाबाद येथे झालेली बैठक निर्णयाविना पार पडली.

विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा

$
0
0
महापालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी विरोधीपक्ष नेतेपादाचा राजीनामा काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्याकडे दिला आहे. नवीन विरोधीपक्ष नेता निवडीसाठी अॅड. अक्रम यांनी सोमवारी गांधीभवनात नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे.

विजेचे कोसळणे आधीच कळणार!

$
0
0
दरवर्षी मराठवाडा, विदर्भात वीज कोसळून अनेकांचे प्राण जातात. सरकारने वीज अटकाव यंत्रणा फारशी उपयुक्त ठरली नाही. या पार्श्वभूमीवर वीज कोसळण्याची माहिती किमान दोन तास आधी देणारी यंत्रणा पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेने तयार केली आहे.

खाडे खून: तपास सायबर क्राइमकडे

$
0
0
दूध विक्रेता अंकुश खाडे खूनप्रकरणाचा तपास करण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश न मिळाल्याने या प्रकरणाचा तपास सायबर क्राइमकडे सोपविण्यात आला आहे. बाळापूर येथील दूध विक्रेता अंकुश खाडे (वय २७) या तरुणाचा मृतदेह बीड बायपाय भागातील गुरू लॉन्सच्या पाठीमागे सात मे रोजी सांयकाळी आढळला होता.

वीज पडल्याने चौघांचा मृत्यू

$
0
0
बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत चार जण गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यासोबतच चार शेळयांचा मृत्यू झाला.

पालिकेच्या जलकुंभावर CCTV वॉच

$
0
0
महापालिकेच्या तीन जलकुंभांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे जलकुंभावर येऊन गोंधळ घालणाऱ्यांना चाप बसल्याचे मानले जात आहे. सीसीटीव्ही बसवल्या पासून जलकुंभावर गोंधळ , गडबड बंद झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images