Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सोशल नेटवर्किंग साइट काळजीपूर्वक वापरा’

$
0
0
सायबर विश्व हे खूप मोठे मायाजाल असून अपप्रवृत्तीच्या लोकांकडून त्याचा गैरवापरही केला जातो. त्यामुळे महिलांनी इंटरनेटचा वापर करताना अतिशय सतर्क असायला हवे, कुठलाही खासगी माहिती यावर उघड करु नका, असा सल्ला पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी बुधवारी दिला.

बेगमपु-यातील बांधकामांचा मार्ग आता मोकळा

$
0
0
बेगमपुरा येथील नागरिकांना बांधकाम करण्यासाठी यापुढे पुरातत्व विभागाच्या ना हरकतीची गरज राहणार नाही असे महत्त्वपूर्ण आदेश पुरातत्व विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी काढले आहेत.

पालिकेच्या आरोग्य अधिकारी उपचारासाठी खासगी रुग्णालयात

$
0
0
पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा भोंडवे यांना बुधवारी उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

रमजान ईदची लगबग सुरू

$
0
0
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची लगबग सुरु झाली आहे.

बोहरा समाजाची ईद साजरी

$
0
0
बोहरा समाजामध्ये बुधवारी रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला. यावेळी बोहरा समाजाची ईदची नमाज सिटीचौक येथील बोहरा मशिद आणि पानदरिबा येथील मशिदीत अदा करण्यात आली.

‘पिचड, राजीनामा द्या’

$
0
0
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याला राज्याच आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या विधानाचा मराठवाड्यातन निषेध करण्यात येत असून, पिचड राज्याचे मंत्री आहेत की नगर जिल्ह्याचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मानवी साखळी करून पाकिस्तानचा निषेध

$
0
0
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे निरालाबाजार परिसरात मानवी साखळी करण्यात आली.

इंजिनीअरिंगसाठी अखेर ‘कॅरिऑन’

$
0
0
अभ्यासक्रम बदलल्यामुळे इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठत जोरदार आंदोलन केले.

दुष्काळातील पाण्याचा हिशेब मांडला

$
0
0
गेल्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यासाठी उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पैसे भरा, अशी मागणी जलसंपदा खात्याच्या नाशिक सर्कलने केली आहे.

पाणी सोडण्याचा ‘उद्योग’ नको

$
0
0
समन्यायी पाणी वाटपाचा नियम झुगारत आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी मराठवाड्यावर मुक्ताफळे उधळली आहेत. ‘ओव्हलफ्लो’ पाण्यावर मराठवाड्याने समाधान मानावे.

वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगाबाद सुपरस्पेशालिस्ट

$
0
0
वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्यात प्रमुख तीन शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या औरंगाबादेत आता सुपरस्पेशालिटी (अतिविशेषोपचार) शिक्षण उपलब्ध झाले आहे.

ग्रामीण गुन्हे शाखेचा सर्वोत्कृष्ट तपासासाठी गौरव

$
0
0
ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला शासनाने सर्वोत्कृष्ट तपासाचे पारितोषिक दिले आहे. पैठण येथील नागेबाबा सहकारी सोसायटीच्या दरोड्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल हे पारीतोषीक देण्यात आले आहे.

वाळूची बेकायदा वाहतूक करणारे गजाआड

$
0
0
बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकचालकांना वाळूज पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी

$
0
0
महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीतर्फे बुधवारी मंडल दिन साजरा करण्यात आला. मंडल दिनानिमित्ताने आयोजित परिसंवादात संपूर्ण आयोग लागू करण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.

देवाच्या ऐवजांवर चोरांचा डल्ला

$
0
0
भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांवर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली असून गेल्या दीड महिन्यात ग्रामीण भागातील तब्बल चार मंदिरांत चोरीचे प्रकार घडले आहे.

​कामगार कायद्याकडे राज्यात दुर्लक्ष

$
0
0
महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर असले तरी, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीत पिछाडीवर आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती उघड झाली आहे.

बांधकाम प्रकरणाची चौकशी काढावी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात निवृत्त कार्यकारी अभियंता सी. व्ही. सोनवणे यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून कामाचे वाटप झाल्या प्रकरणाची चौकशी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. टी. पाटील यांच्याकडे दिलेली चौकशी काढून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांनी केली आहे.

वाळूजगाव ते इसारवाडी रस्ता झाला अपघाती

$
0
0
अहमदनगर-औरंगाबाद राज्य महामार्गावर वाळूज गाव ते इसारवाडी फाटा यादरम्यान गेल्या काही वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निर्दशनास आले आहे.

‘एलबीटी’च्या विशेष मोहीमेवर संशय

$
0
0
स्थानिक संस्थाकर विभागातर्फे राबवण्यात आलेली विशेष वसुली मोहीम ऑडिट रिपोर्टनुसार संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मोहिमेमुळे पालिकेचे उत्पन्न खरोखरच किती वाढले, याची माहिती या विभागाने उपलब्धच करून दिली नाही. त्यामुळे ही मोहीम कागदावरच होती का?

समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
महानगरपालिकेने विश्रांतीनगर व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महानगरपालिकेकडे या भागात स्वच्छता ठेवावी व आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images