Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

समांतर करारभंगाचा अधिकाऱ्यांनी केला बाऊ

$
0
0
समांतरवाल्यांकडून पाणीपट्टी वसुलीचे काम काढून घ्या, असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. सर्वसाधारण सभेतही असाच ठराव झाला, परंतु आदेशाची आणि ठरावाची अंमलबजावणी करता येणार नाही असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२४ हजार कोटींपैकी मराठवाड्याला भोपळा

$
0
0
सिंचन क्षमता विकास, पाणलोट क्षेत्र, स्थानिक स्तर योजना आणि भूजल विकास या चार क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींमध्ये मराठवाड्याचा वाटा शून्य असल्याचा गौप्यस्फोट सिंचनतज्ज्ञ आणि सेवानिवृत्त मुख्य अभियंता या. रा. जाधव यांनी रविवारी महसूल प्रबोधिनीमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत केला. या तरतुदींमुळे मराठवाड्याचा अनुशेष कसा दूर होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

मंत्र्यांसमोर पोलखोल

$
0
0
समाजकल्याण विभागाने वसतिगृहे तर बांधली आहेत, पण सुविधांची वानवा आहे. याचा स्फोट थेट मंत्र्यांसमोरच झाला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी किलेअर्क व कोकणवाडीतील वसतिगृहांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यानी मंत्र्यांना सुविधा कधी मिळणार, असा थेट सवाल केला.

विजेशिवाय थकबाकी!

$
0
0
ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरात प्रकाश पडावा यासाठी केंद्र सरकारने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आखली आहे. या योजनेमुळे घरात प्रकाश पडण्याऐवजी वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील दारिद्र्य रेषेखालील १९ कुटुंबांच्या जीवनात अंधार झाला आहे. वीज जोडणी न देताच महावितरणने यांच्यावर थकबाकी चढवण्यास सुरुवात केली आहे.

एकसंघ रिपाइंच राजकारणात टिकेल!

$
0
0
‘गट-तट मोडून आणि नेतृत्वाचा हव्यास सोडून एकसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केल्याशिवाय आंबेडकरी राजकारणाला पर्याय नाही,‘ असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.

फार्मसी कॉलेजांची लवकरच तपासणी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ फार्मसी कॉलेजांची झाडाझडती घेणार आहे. पात्र शिक्षकांची कमतरता, सोयी सुविधांचा ठणठणाट यांबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांत कॉलेजांची तपासणी पूर्ण केली जाणार आहे.

ज्यु. खातेदारांची संख्या सव्वा लाख

$
0
0
लहान मुलांना आर्थिक साक्षर बनविण्याचा कल शहरात वाढला आहे. चिमुकल्यांच्या खाऊच्या गल्ल्याची जागा आता ज्युनिअर अकाउंंटने घेतली आहे. एकट्या औरंगाबादमध्ये ज्युनिअर अकाउंंटची संख्या तब्बल सव्वा लाखावर गेली आहे. विशेष म्हणजे ही खाती ५ ते १८ वयोगटातील मुलांची आहेत. शहरात महाराष्ट्र बॅँकेने सर्वांत जास्त म्हणजे ६३ हजार ज्युनिअर अकाउंट उघडून बाजी मारली आहे.

‘नक्षलवादी’ ताब्यात

$
0
0
आकाशवाणी चौकात नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली... बराच वेळ चकमक झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. यावेळी नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. घाबरू नका.

...मला वेड लागले वेगाचे!

$
0
0
वेगाचा थरार अनुभवण्याची मजा काही औरच. इंजिनीअरिंग करताना शिकलेले ज्ञान व्यहारात आणले, की थांबलेली स्वप्न पुन्हा धावू लागतात. एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी हेच केले. अन् अवघ्या महिन्यात साकारली रेसिंगची ‘गो कार्ट’ कार.

२४ कोटी खर्चूनही लागली गळती

$
0
0
तब्बल २४ कोटी रुपये खर्चूनही घाटी परिसरात उभारलेली मेडिसिन बिल्ड‌िंग अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाकडून घाटीला सोपविण्यात आली, मात्र सुरूवातीपासूनच इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. आतातर डझनभर ठिकाणच्या फरशा उखडल्या आहेत.

प्रेयसीला फिरवण्यासाठी चोरी

$
0
0
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. जिन्सी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत.

वैश्विकतेची भाषा इंग्रजीच

$
0
0
माहिती तंत्रज्ञानामुळे जग हे एक वैश्विक खेडे बनले आहे. या खेड्याची भाषा ही इंग्रजी आहे, असा सूर ‘इंग्रजी ग्रामर’ विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सोमवारी (१९ जानेवारी) तज्ज्ञांनी व्यक्त केला.

आरटीओतील दलालांना हाकला

$
0
0
राज्य परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आरटीओ कार्यालयातील दलालांना आधी बाहेर काढा म्हणत, सोमवारी (१९ जानेवारी) आरटीओ कार्यालयात ग्राहक प्रतिनिधींनी काम बंद आंदोलन केले.

उद‍्घाटनाची लगीनघाई

$
0
0
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या उद्घाटनाची लगीनघाई महापालिकेने सुरू केली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ३० जानेवारी रोजी हे उद ्घाटन करण्याची योजना तयार केली जात आहे.

बदल्यांवरून कुलगुरू कचाट्यात

$
0
0
कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकांच्या तडकाफडकी बदल्या करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. सोमवारी (१९ जानेवारी) तीन प्राध्यापक संघटनांनी रात्री आठपर्यंत कुलगुरूंच्या दालनाबाहेर गोंधळ घातला.

२ हजार बालकांची उपासमार

$
0
0
शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून नियमित अनुदान मिळाले नसल्यामुळे अनाथ, निराधार बालकांचा सांभाळ करणारी बालगृहे अडचणीत सापडली आहेत. पैसे नाहीत, उधारी बंद अशा परिस्थितीत मुलांना कसे खाऊ घालायचे, असा प्रश्न या संस्था चालकांसमोर उभा राहिला आहे.

साडेपाच कोटींचा गंडा

$
0
0
शहरातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पर्सी जिल्ला यांना मुंबईच्या जोडप्याने साडेपाच कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी आलेल्या जोडप्याने मुंबई येथे बांधकाम व्यवसायामध्ये भागिदारीचे; तसेच अलिशान फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली.

कराराचा अनुवाद रखडला

$
0
0
तिजोरीत खडखडाचे कारण सांगून स्वतःची अकार्यक्षमता झाकू पाहणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाकडे ४ हजार ८०० रुपये देखील नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रांच्या योजनांची चिरफाड

$
0
0
केंद्र सरकारच्या निधीतून राबविल्या जाणाऱ्या योजनांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन पथक बुधवारपासून ६ दिवसांसाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा योजना, नॅशनल सोशल सहाय्य योजना यांसह १८ योजनांच्या कामांची तपासणी या पथकाकडून केली जाणार आहे.

पाणीपट्टी वसुली ‘समांतर’कडे नाही

$
0
0
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून पाणीपट्टी वसुलीचे काम काढून घेण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ‘समांतर’च्या कंपनीकडून सुरू असलेल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीबद्दल विशेष सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images