Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

क्षयरोग केंद्र भग्नावस्थेतच

$
0
0
जिल्हा क्षयरोग केंद्राच्या निझामकालीन इमारतीची दुरवस्था झाली असून, नवीन इमारतीसाठी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा निधी कधी प्राप्त होणार आणि नवीन इमारतीसाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घाटी क्वार्टर्समधील समस्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच सोडविल्या

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील शासकीय निवासस्थानातील ड्रेनेज समस्यांबाबतच्या अनेक तक्रारी बांधकाम विभागाला वारंवार करुनही त्या तब्बल चार वर्षांपासून सोडविल्याच नाहीत. त्यामुळे शेवटी कर्मचाऱ्यांनीच या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे ३० ते ४० कर्मचाऱ्यांनी पदरमोड करून निवासस्थानांचे प्रश्न स्वतःच सोडविले.

मराठवाड्यात फक्त २६ टक्के पाणीसाठा

$
0
0
गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली असली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाईमात्र कायम आहे. अवकाळी पाऊस व थंडीच्या वातावरणात सध्या मराठवाड्यामध्ये टँकरची मागणी झपाट्याने वाढत असून महिन्याभरामध्ये विभागातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांची घट झाली आहे.

बाबासाहेबांनी आपली खरी घरवापसी केली - डॉ. कवाडे

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली खरी घरवापसी केली. भगवान बुद्धांच्या घरात आणले. आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून सोडवले, असे मत पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

५० हजार महिलांचे गोदास्नान

$
0
0
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गोदावरी नदीत पवित्र स्नान करून नाथ समाधी मंदिरात वाण देण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी पैठणमध्ये गर्दी केली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ५० हजार महिलांनी नाथ समाधी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले.

‘मेडिसिन’च्या तीन लिफ्ट बंदच

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मेडिसिन विभागातील चारपैकी तीन लिफ्ट किमान दोन आठवड्यांपासून बंद आहेत. यातील डॉक्टरांसाठीच्या दोन लिफ्ट तर किमान तीन ते चार महिन्यांपासून बंदच असल्याचे समोर आले आहे.

जागा ६० फूट; रस्ता फक्त २३ फूट

$
0
0
शहर विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे ६० फूट जागा उपलब्ध असूनही नाथ हायस्कूल चौक ते इंडिया बँक हा रस्ता केवळ २३ फूट रुंदीचा तयार केला जात आहे. विशेष म्हणजे याबद्दल प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही. उर्वरित जागेवर अतिक्रमण होण्याची भीती आहे.

औरंगाबाद होणार स्मार्टसीटी !

$
0
0
झपाट्याने विकास होत असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे रुपांतर आता स्मार्टसीटीमध्ये होणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ध्वनीक्षेपक बसवण्यात येणार असल्याने येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरावर कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी अवजार बँक

$
0
0
‘लोकपर्याय संस्थेने दीड हजार भूमीहिनांना कसण्यासाठी जमीन मिळवून दिली. यातील अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना रोटरी क्लबद्वारे माफक भाडेतत्त्वावर कृषी अवजार उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैजापूर तालुक्यातील पाराळा जुनोने येथे येत्या रविवारी लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.

मॅरेथॉनमध्ये डॉक्टर धावरणार

$
0
0
डॉ. हेडगेवार रुग्णालय व ओंकार बालवाडी या प्रकल्पांसाठी औरंगाबाद शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सात तज्ज्ञ १८ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीत धावणार आहेत.

प्रेमी युगुलाला मारझोड

$
0
0
प्रेमी युगुलाला चाळे करताना पाहून संस्कृती रक्षणाच्या नावा खाली बेदम मारझोड करून व्हिडिओ काढण्याचा लाजीरणावा प्रकार लातूर जिल्ह्यातील अंकोली गावात घडला. प्रेमी युगुलाला मारहाण करणारे तरूण हे गनिमी कावा या संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0
लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी संक्रांतीच्या दिवशीच कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. औसा तालुक्यातील बोरफळ व चाकूर तालुक्यातील सुगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गनिमी कावा संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

$
0
0
एका अल्पवयीन प्रेमीयुगलास बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकणाऱ्या गनिमी कावा संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मारहाणीमध्ये सहभागी असलेले या तिघांचे साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बेरोजगार इंजिनीअरना येणार ‘अच्छे दिन’

$
0
0
राज्यातील बेरोजगार इंजिनीअरना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शासनाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. या बेरोजगार इंजिनीअरना ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची योजना असून मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून लवकरच याची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

महिलेसह दोन मुलांचा मृतदेह विहिरीत

$
0
0
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोळेवाडी येथील महिलेचा दोन मुलांसह मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. ही महिला गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होती. ही घटना पाटोदा तालुक्यातील डोळेवाडी येथे शुक्रवारी घडली.

एसटीची भाडेकपात तूर्त नाही

$
0
0
आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनांच्या किंमती उतरल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊन वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेलचे दर कमी झाल्याने सरकार एसटीच्या भाडयात देखील कपात करेल अशी सर्वसामांन्याची अपेक्षा होती.

भाजीपाला झाला स्वस्त

$
0
0
औरंगाबाद तालुका व जिल्ह्यातील भाजीपाल्याचे झालेले विक्रमी उत्पादन, गेल्या दोन आठवड्यापासून कवडीमोल भावाने होत असलेली विक्री यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात भाजीपाला स्वस्त झाला आहे.

‘जलयुक्त शिवार’ करणार गाव समृद्ध

$
0
0
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी औरंगाबाद तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. डोंगरावर माथा ते पायथा उपाययोजना हाती घेऊन पाणी पातळी वाढवण्यासाठी वन विभागाने प्रस्ताव सादर केला आहे.

नियम पाळणाऱ्यांना पोलिसांचा ‘धक्का’

$
0
0
उस्मानपुरा ते क्रांती चौक या मार्गावर शुक्रवारी दुपारी वाहतूक पोलिस हेल्मेट घातलेले दुचाकीधारक व सीटबेल्ट लावलेल्या कारचालकांना अडवत होते. त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांना काही समजेना.

दोन ठाण्यांच्या विभाजनाला होकार

$
0
0
शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याने क्रांती चौक व मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या विभाजनाला राज्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images