Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घरकुल मालकीचे दस्तऐवज द्या

$
0
0
गारखेडा परिसरातील सूतगिरणी कामगारांना घरकुलाच्या मालकी हक्काचे सरकारी दस्तऐवज देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (१६ जानेवारी) विभागीय क्रीडा संकुलासमोर रिपब्लिकन सेनेतर्फे निदर्शने करण्यात आली.

मोक्याच्या जागी नो ‘बीओटी’

$
0
0
राज्यात एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागेवर बीओटीच्या माध्यमातून मल्टिकॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय रद्द केल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी (१६ जानेवारी) दिली.

बांधकाम परवाने ऑनलाइन करा

$
0
0
बांधकाम व्यवसायासाठी लागणारे परवाने ऑनलाइन करा, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केल्याची माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर रेड्डी यांनी दिली. ते शुक्रवारी (१६ जानेवारी) राज्य क्रेडाई कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमिष दाखवत लुबाडणारी टोळी गजाआड

$
0
0
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीला गुन्हेशाखेच्या पथकाने शुक्रवारी (१६ जानेवारी) बाबा पेट्रोलपंपाजवळ अटक केली. टोळीत दोन महिलांचा समावेश आहे.

३ वर्षांपासून पगार थकले

$
0
0
तब्बल तीन वर्षांपासून पगार थकल्यामुळे राज्यातील अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक व परिचर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

औरंगाबाद राज्यात ‘टॉप थ्री’मध्ये

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वाधिक उपचार-शस्त्रक्रियांमध्ये औरंगाबाद जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या तीनमध्ये आहे. या योजनेअंतर्गत सव्वा वर्षांत तब्बल २०,९२१ रुग्णांवर विभिन्न प्रकारचे अत्याधुनिक उपचार करण्यात आले.

...उंच पर्वतात रमते मी!

$
0
0
व्हॉलिबॉलपटू मनिषा वाघमारेला एका ऑपरेशननंतर हा खेळ सोडावा लागला. मग तिने साहसी खेळांकडे लक्ष वळविले. सुमारे १० वर्षांपूर्वी तिने गिर्यारोहक होण्याचे ठरविले.

वाहतूक कोंडीमुळे वैताग

$
0
0
सिडकोतील श्रीकृष्णनगर वॉर्ड तसा समस्यांपासून मुक्ती मिळवण्याच्या मार्गावर आहे, परंतु या वॉर्डात रस्त्यांची रखडलेली कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहेत.

ड्रायव्हिंग स्कूल तपासणीचे आदेश

$
0
0
राज्यात अनेक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सुविधा कागदोपत्रीच दाखविण्यात आल्या आहेत. काही स्कूल केवळ कागदावरच सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘मटा’ला दिली.

नियमबाह्य प्रवेश देण्यात ‘मशिप्र’ मंडळ अव्वल

$
0
0
शिक्षण विभागाची मान्यता न घेता विविध विद्याशाखांचे वर्ग भरवून परीक्षांचे अर्जही त्याच शाखांमधून सादर करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजांमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आघाडीवर आहे. नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या ८पैकी ७ संस्था ‘मशिप्र’ मंडळाच्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) अधिकाऱ्यांनी दिली.

आमदारांना हवी ‘समांतर’ची करार प्रत

$
0
0
आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेऊन समांतर जलवाहिनीच्या कराराची प्रत मागितली. त्यांनी आयुक्तांबरोबर शहरातील विविध विकास कामांबद्दल चर्चा केली.

नगरसेवकाला बंगल्यातून हाकलले!

$
0
0
नारेगाव वॉर्डात होत असलेल्या अतिक्रमणांची तक्रार घेऊन आयुक्तांच्या बंगल्यावर गेलो असताना तेथील अधिकाऱ्यांनी आपल्याला बाहेर काढले, असा आरोप नगरसेवक मनीष दहिहंडे यांनी केला. या प्रकारामुळे संतापलेल्या दहिहंडे यांनी सायंकाळी थेट पालिकेचे कार्यालय गाठले. सभापती व सभागृहनेत्यांकडे त्यांनी या प्रकाराची तक्रार केली.

महापालिका निवडणूक १० एप्रिलला?

$
0
0
महापालिकेची निवडणूक येत्या १० एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग आला असून, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या काही दिवसांत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या प्रशासनाने निवडणुकीसाठी अन्य पूरक तयारी सुरू केली आहे. दरम्यान, नव्याने स्थापन केलेल्या सातारा-देवळाई नगर पालिकेची पहिली निवडणूक महापालिका निवडणुकीबरोबर होण्याची चिन्हे आहेत.

कानसेनांसाठी दोन नवी FM केंद्र

$
0
0
औरंगाबाद शहरातील श्रोत्यांसाठी लवकरच आणखी दोन नवे ‘एफएम’ केंद्र सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने देशातील २९४ शहरात ८४० नवीन ‘एफएम’ केंद्र सुरू करण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या औरंगाबाद शहरात केंद्र मिळवण्यासाठी नामांकित एफएम कंपन्या प्रयत्नशील आहेत. शहरात कोणत्या कंपनीचे ‘एफएम’ येणार यावर पुढील महिन्यात शिक्कामोर्तब होईल.

भूखंड गहाण टाकून विकले फ्लॅट

$
0
0
बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तारण ठेवलेल्या भूखंडावरील फ्लॅटची परस्पर विक्री करणाऱ्या बिल्डरसह फ्लॅट खरेदी करणाऱ्या चौघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बिल्डरने गेल्या काही महिन्यांपासून कर्जाची नियमित परतफेड केली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बंधनातून मुक्तीसाठी लिहिते व्हा!

$
0
0
महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण जरी वाढत असले, तरी शिक्षित असो किंवा अशिक्षित महिलेला आजही समाजात दुय्यमस्थान दिले जाते. हे कटूसत्य नाकारता येणार नाही. घर, कुटूंब आणि समाजाकडून महिलांवर अनेक बंधने किंवा मर्यादा घातल्या जातात. अशाप्रकारच्या सामाजिक बंधनातून मुक्त होण्यासाठी महिलांनी व्यक्त होणे गरजेचे असून यासाठी लिहिते व्हावे, असे आवाहन सहाव्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. छाया महाजन यांनी केले.

महामंडळांच्या कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी

$
0
0
‘राज्यातील विविध महामंडळांच्या कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे. येत्या २ महिन्यांत ही चौकशी पूर्ण होईल व दोषींवर फौजदारी कारवाई करू,’ अशी घोषणा समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी (१८ जानेवारी) औरंगाबादमध्ये केली.

समांतर करारभंगाचा अधिकाऱ्यांनी केला बाऊ

$
0
0
समांतरवाल्यांकडून पाणीपट्टी वसुलीचे काम काढून घ्या, असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. सर्वसाधारण सभेतही असाच ठराव झाला, परंतु आदेशाची आणि ठरावाची अंमलबजावणी करता येणार नाही असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२४ हजार कोटींपैकी मराठवाड्याला भोपळा

$
0
0
सिंचन क्षमता विकास, पाणलोट क्षेत्र, स्थानिक स्तर योजना आणि भूजल विकास या चार क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींमध्ये मराठवाड्याचा वाटा शून्य असल्याचा गौप्यस्फोट सिंचनतज्ज्ञ आणि सेवानिवृत्त मुख्य अभियंता या. रा. जाधव यांनी रविवारी महसूल प्रबोधिनीमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत केला. या तरतुदींमुळे मराठवाड्याचा अनुशेष कसा दूर होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

मंत्र्यांसमोर पोलखोल

$
0
0
समाजकल्याण विभागाने वसतिगृहे तर बांधली आहेत, पण सुविधांची वानवा आहे. याचा स्फोट थेट मंत्र्यांसमोरच झाला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी किलेअर्क व कोकणवाडीतील वसतिगृहांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यानी मंत्र्यांना सुविधा कधी मिळणार, असा थेट सवाल केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images