Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोर्टात खेचण्याचा पालिकेला इशारा

$
0
0
खराब झालेल्या रस्त्यावरून रान उठलेले असताना महापालिकेत रस्त्याचे काम करणारा सर्वात मोठा ठेकेदार असलेला मस्टक कन्स्ट्रक्शन कंपनीने पालिकेलाच नोटीस दिली आहे.

अबब...! २२ लाखांची सायकल

$
0
0
औरंगाबादेत ७ हजार ते २२ लाख रुपयापर्यंतच्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत. यात ७ ते ४० हजारांपर्यंतच्या ३६ सायकली तर ४० ते ७५ हजारांपर्यंतच्या ८ सायकली विकल्या गेल्या ओहत.

हसरा, लाजरा श्रावण आला

$
0
0
निसर्ग सौंदर्याचा वेध घेणाऱ्या श्रावण महिन्याचे बुधवारी पावसाच्या सरींनी स्वागत केले. ढगांची दाटी, पावसांच्या सरी आणि हिरवा शालू पांघरलेली धरती ही श्रावणाची वैशिष्ट्ये.

...तिचं नाव ‘दुर्गाशक्ती’ ठेवलं!

$
0
0
दुर्गाशक्ती अशोक कदम... नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी जन्मलेली एक चिमुकली परी आता या नावानं ओळखली जाणार आहे... विशेष म्हणजे, तिचं हे नामकरण तिच्या कुटुंबीयांपैकी कुणी केलेलं नाही, तर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी तिला ही ओळख दिली आहे...

बिडकीनबाबत लवकरच बैठक

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी बिडकीनसह पाच गावांतील भूसंपादनासंदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

गणेशोत्सवात चार दिवस ‘वाजवा’

$
0
0
शासनाने या वर्षी गणेशोत्सवासाठी तीनऐवजी चार दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. हे चार दिवस कोणते असावेत, याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी घेतील.

‘स्वाइन फ्लू’ने गर्भवती महिलेचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूने कन्नड येथील एका गर्भवती महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेला सहा तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

जारवालांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान

$
0
0
जिल्हा परिषदेच्या गोलटगाव गटातील काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या सदस्या शारदा जारवाल-राजपूत यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. शेवगा येथील भाजपच्या पराभूत उमेदवार सुनीता चव्हाण यांनी ही याचिका केली आहे.

मनपा आयुक्त, प्रभारींना अवमान याचिकेत नोटीस

$
0
0
दुषित पाणीपुरवठा प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेल्या अवमान याचिकेत न्या. संभाजी शिंदे यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

बेकायदा बांधकामे झालर क्षेत्रात बंद

$
0
0
झालर क्षेत्रातील २८ गावांत सुरू असलेली सुमारे एक हजार बांधकामे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संबंधित बांधकामे करणाऱ्यांना प्रशासनाकडून लवकरच पत्रही देण्यात येणार आहे.

शिलेदारांचा सोयगावशी ऋणानुबंध कायम

$
0
0
ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचे गुरुवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. संगीत रंगभूमीवर विविध अजरामर भूमिका केलेल्या जयमालाताईंचा विवाह सोयगाव (जि. औरंगाबाद) येथील नाट्यगृहात झाला होता. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड-सोयगावशी त्यांचा शेवटपर्यंत ऋणानुबंध कायम होता अशी आठवण ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी सांगितली.

जिल्ह्यात पुन्हा टँकरचा फेरा

$
0
0
अपेक्षित पावसाच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्याच्या नशिबातील टँकरचा फेरा संपलेला नाही. पावसाने गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात ३५ टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.

बीड जिल्ह्यातील दुबार नावे वगळली

$
0
0
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मतदार यादीचे अद्यावतीकरण सध्या सुरू आहे. बीड लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांमधील ९६ हजार दुबार नावे वगळण्यात आली आहेत.

गाळ उपसा मोहिमेत उस्मानाबाद आघाडीवर

$
0
0
आपत्ती हीच इष्टापती समजून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या पडलेल्या तलावातून गाळ काढण्याची मोहीम स्वखर्चाने राबविली. त्यास लोक सहभागाचे स्वरूप आले आणि तब्बल १ कोटी २३ लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला. गाळ नेताना शेतकऱ्यांकडून कोणतीही रॉयल्टी जिल्हा प्रशासनाने वसूल केली नाही.

मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

$
0
0
पाटोदा तालुक्यात एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू वीज वितरण कंपनीच्या खांबाचा शॉक बसल्याने झाला होता . या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्याविरोधात पाटोदा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खड्डे बुजवण्यासाठी अनोखे आंदोलन

$
0
0
श्रावण महिन्यातील दर शनिवारी श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भक्तांना रस्त्यावरील खड्ड्यातून अंधारात चालावे लागते. खुलताबाद नगरपालिकेने पथदिव्यांची व्यवस्था करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा भद्रा मारुतीच्या भक्तांसाठी अनोखे आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे मुकेश मालोदे, अजय चौधरी, शिवदास सोनवणे, अक्षय खरोटे, शेखर केनेकर आदींनी मुख्याधिकारी वैशाली डोंगरजाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नारंगी तलावात पाणी सोडण्याचे आदेश

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून वैजापूरच्या नारंगी तलावात ६.९१ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी अधीक्षक अभियंता ए. पी. कोहिरकर यांनी नाशिक जलसंपदा विभागास दिले. त्यामुळे पालखेड डाव्याकालव्यातून नारंगी तलावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य बॅडमिंटन स्पर्धा १४ ऑगस्टपासून

$
0
0
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या श्री सरस्वती भुवन क्रीडा अकादमी आणि औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत पहिल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उसन्या पैशांच्या वादातून युवकाला मारहाण

$
0
0
उसने दिलेले पैसे परत मागितल्यावर युवकाला तीन आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी जाधववाडी भागात घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘नशिबाला दोष देणे चुकीचे’

$
0
0
‘मनात चांगले विचार असतील, तर आपण शून्यातून विश्वाची निर्मिती करू शकतो. नशिबाला दोष देवून जीवन जगतात ते कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत,’ असे प्रतिपादन आचार्य देवनंदी महाराज यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>