Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘खाम’ केली विषगंगा

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हातमिळवणीने खाम नदीची अक्षरशः विषगंगा झाली आहे. घातक प्रदूषित पाणी जायकवाडी प्रकल्पात पोहचत असल्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सध्या नाथसागरात जैविक परिसंस्था संपल्यामुळे पाण्यातील घातक घटकांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईचा केवळ 'फार्स' करीत असून कंपन्यांच्या दूषित पाण्याचे पाट बिनबोभाट वाहत आहेत.

औरंगाबाद शहरातून वाहणारी खाम नदी नकाशातच दिसते. मावसाळा (ता. खुल्ताबाद) येथे उगम पावलेली खाम जायकवाडी प्रकल्पात विलीन होते. या ६४ किलोमीटरच्या प्रवासात शहरातील सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतीचे घातक दूषित पाणी प्रकल्पात घेऊन जाते. वाळूज औद्योगिक वसाहतीत लहानमोठ्या दीडशे केमिकल कंपन्या असून अनेक कंपन्या प्रक्रियेशिवाय दूषित पाणी नदीपात्रात सोडतात. 'जटवाडा ते होलिक्रॉस शाळेपर्यंतच्या नदीत मैलायुक्त सांडपाणी आहे. तर रांजणगाव शेणपुंजी, सावखेडा व वाळूज परिसरात कंपन्यांच्या दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. केमिकल कंपन्यांनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडण्याचा नियम आहे; मात्र प्रक्रिया खर्च वाचवण्यासाठी कंपन्या मोकाट पाणी सोडतात. त्यामुळे शेती आणि प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. वाळूज परिसरात दूषित पाण्याचा दुर्गंध असूनही पाण्यावर प्रक्रिया होते, असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. तर प्रक्रियेशिवाय कंपन्या दूषित पाण्याची विल्हेवाट लावत असल्याचे पाहणीत आढळले. पर्यावरण संवर्धनासाठी कंपन्यांना नोटीस न बजावता कारवाई करू असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले होते; मात्र जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा कंपन्यांवर वरदहस्त असल्यामुळे खाम नदी नामशेष झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

धोकादायक घटक

जायकवाडी प्रकल्पातील पाणी पिण्यायोग्य असले तरी गुणवत्ताहीन आहे. पाण्याची गुणवत्ता रंग, वास, गढूळता, क्लोराइड्स, नायट्रेट, घनता, आम्ल, विरघळलेले क्षार, लोह आणि फ्लोराइड्स या निकषांद्वारे तपासतात. मागील काही वर्षात घातक घटकांचे प्रमाण वाढले आहे. बॅक्टेरिअल तपासणीत पाणी पिण्यायोग्य असले तरी गुणवत्ता घटल्याचे आढळल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

वाळूज पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मिळाल्यानंतर दोषी कंपन्यांवर कारवाई करू; मात्र, औद्योगिक कंपन्या प्रक्रिया करूनच पाणी सोडतात.

- आनंद काटोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

वाळूज औद्योगिक वसाहतीतील मोजक्याच कंपन्या पाण्यावर प्रक्रिया करतात. जायकवाडीत पोहचलेले खाम नदीचे दूषित पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरले जाते ही चिंताजनक बाब आहे.

- प्रा. विजय दिवाण, पर्यावरण अभ्यासक

शहरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत

$
0
0

औरंगाबादः शहरात सोमवारी (२ मार्च) विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे. अवकाळी पावसामुळे शनिवारी ग्रामीण भागातील वीजपुरवठा रात्री ९.५० ते १०.४५ बंद होता. नक्षत्रवाडी येथे मध्यरात्री १.१० ते सकाळी ६.२० पर्यंत वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे ५६ एमएलडी वरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे क्रांतिचौक, क्रांतिचौक जुना, ज्युबली पार्क, दिल्ली गेट, शहागंज, जिन्सी, सिडको एन-७ या भागांसह अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सोमवारीही शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

४ कोटींचा भूखंड हडपण्याचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेड्यात शाळेसाठी आरक्षित केलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्याचा घाट घातला असून, तसा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत नगरसेवकांनी ठेवला आहे. वॉर्ड क्रमांक ८४ मधील (विजयनगरजवळ) १ लाख ३० हजार चौरस फुटाच्या या भूखंडाची सध्या बाजारभावाप्रमाणे ४ कोटींची किंमत आहे.

वॉर्ड क्रमांक ८४ मध्ये भाजपचे पंकज भारसाखळे नगरसेवक आहेत, परंतु प्रस्तावावर त्यांचे नाव नाही. नगरसेवक विजेंद्र जाधव या प्रस्तावाचे सूचक, तर कृष्णा बनकर अनुमोदक आहेत. परस्पर आलेल्या या प्रस्तावाला भारसाखळे यांचे ‌छुपे समर्थन आहे काय, अशीही चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. विजयनगरलगत गट क्रमांक ५१ मधील आरक्षण क्रमांक २४४ हा भूखंड शाळेसाठी राखीव आहे. महानगरपालिकेने ही जागा मांगीलाल फुलपगर यांच्याकडून संपादित केली होती. सध्या या जागेवर अतिक्रमण आहे. प्रस्तावात या अतिक्रमणांचा आणि महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करून, ही जागा शैक्षणिक संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचे सूचविले आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ पानवडोद बुद्रुक, गौतम ऋषी शिक्षण संस्था औरंगाबाद आणि सत्यसाई शिक्षण प्रसारक मंडळ या तीन संस्थांचे अर्ज या जागेसाठी आले आहेत. सत्य साई वगळता अन्य दोन संस्था वॉर्डाबाहेरच्या आहेत, असे कारण नमूद करून सत्य साई संस्थेलाच तो भूखंड भाड्याने देण्यात यावा, असे प्रस्तावात म्हटले आहे. प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी काही बड्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दर्शवल्याचे बोलले जात आहे.

सब गोलमाल

सर्वसाधारण सभेत दोन नगरसेवकांकडून देण्यात आलेला प्रस्ताव हा मोघम स्वरुपाचा आहे. भूखंडाचा आकार किंवा किती क्षेत्रफळ संबंधित संस्थेला द्यावे, याचा उल्लेख प्रस्तावात नाही. शिवाय, किती भाडे आकारणी आणि किती वर्षापर्यंत लीज डीड करण्यात येणार आहे, याचाही उल्लेख नाही.

मातीमोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभरात अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले गहू आणि हरभरा पीक पावसात झोडपले असून पाण्यामुळे गव्हाचा रंग उडण्याची भीती आहे. आंब्याचा मोहोर गळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

परतीचा पाऊस उशीरा पडल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी विलंबाने झाली. ही पिके ऐन काढणीत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. कन्नड, सोयगाव, खुलताबाद, पैठण आणि औरंगाबाद तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू या मुख्य पिकांना पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे गव्हाचा रंग फिकट पडण्याची शक्यता आहे. रंग उडालेल्या गव्हाला साधारपणपणे २० टक्के कमी भाव मिळेल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातही ३० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना पावसाने झोडपले. पिकांची सोंगणी करण्याची वेळ असताना पिके मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसात फळबागांचेही नुकसान झाले आहे. यंदा लक्षणीय फुटलेला आंब्याचा मोहोर गळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नांदेड : वादळी वारे व पावसामुळे घरावर विजेची तार पडल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा भाजून मृत्यू झाला. यात पती-पत्नीसह दोन चिमुकले जागीच ठार झाले. मुजाहीद चौकातील फातेमा हायस्कूलजवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. शेख समद शेख हुसेन (वय २६), असमा बेगम शेख (वय २२), जोहा शेख (वय ३), शेख बिलाल (वय २) असे मरण पावलेल्या चौघांची नावे आहेत. मराठवाड्यात येत्या दोन दिवसांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम तसेच हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विभागातील पावसाचा अहवाल सोमवारी मिळाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचा अंदाज येईल. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. गहू आणि ज्वारीच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे.

- जनार्दन जाधव, सहसंचालक, कृषी विभाग

गजानननगर कुंटणखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्चभ्रू वसाहतीत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला कुंटणखाना बुधवारी दुपारी गुन्हे शाखा पोलिसांनी उद‍्ध्वस्त केला. ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या या कुंटणखान्यावर पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर छापा मारला. गारखेडा परिसरातील गजानननगरमधील वाहेगुरू अपार्टमेंटमधे हा गोरखधंदा सुरू होता.

गजानननगरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाली होती. येथे रवी आणि प्रीती (नाव बदलले आहे) हे मुलींना पैशाचे आमिष दाखवत फ्लॅटमधे बोलवायचे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधे ग्राहकांना बोलावून घेत ब्युटी पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचेही खबऱ्याने सांगितले होते. एका ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती देखील देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास निरीक्षक आघाव, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, जमादार शेख कैसर, पोलिस नाईक विलास काळे, नवनाथ परदेशी, शिपाई शेख नवाब, रेखा चांदे आणि सविता लोखंडे यांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी रोख चार हजार रुपये, १५ रुपये किंमतीचे दोन मोबाइल, असा १९ हजार १00 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच दांपत्यासह दोन महिलांना ताब्यात घेत त्यांना मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोलवाडीजवळील अपघातात ३ कंपनी अधिकारी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोलवाडी फाट्याजवळ मंगळवारी रात्री (३ मार्च) झालेल्या ट्रक व कारच्या अपघातात वाळूज एमआयडीसीतील मराठवाडा ऑटो कॉम्पो कंपनीतील तीन अधिकारी ठार झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमोद शिवाजीराव देठे (वय ४२, मूळ रा. इटकूर, सध्या रा. गजानन कॉलनी गारखेडा), सुनील आनंदप्रसाद दीक्षित (वय ५६, रा. ज्योतीनगर) व हितेश रघुनाथ सुसलादे (वय ३२, रा. भोईवाडा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे तिघे रात्री पावणेअकरा वाजता देठे यांच्या कारमधून येत होते. यावेळी गोलवाडी फाट्याजवळ कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात देठे जागीच ठार झाले. नागरिकांनी १०८ क्रमांकाच्या अॅम्बुलन्सद्वारे घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना ‌सुसलादे व दीक्षित यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बुधवारी सकाळी पोस्टमार्टेमनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. देठे हे कंपनीत डेव्हलपमेंट हेड, दीक्षित पर्चेसिंग हेड व सुसलादे सहायक व्यवस्थापक होते. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय पथकांमुळे कायद्याचा वचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड येथील बहुचर्चित स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा चौकशी अहवाल विभागीय दक्षता पथकाने सादर केला होता. या पथकाने केलेल्या कारवायांमुळे पीसीपीएनडीटी कायद्याचा अधिक वचक निर्माण होण्यास मदत झाली आहे. पथकाने शंभरहून अधिक डिकॉय केस केल्या. यात १४हून अधिक डॉक्टरांवर गुन्हे दाखल आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्याने २२ सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. यात काही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनावरही कारवाई झाली आहे, मात्र आता सरकार ही पथके बरखास्त करण्याच्या विचारात आहे.

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा हा १९९४मध्ये अस्तित्त्वात आला. प्रत्येक जिल्हा शल्य चिकित्सक व तालुका वैद्यकिय अधीक्षक यांच्याकडे कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी एकही डिकॉय केस (स्टिंग ऑपरेशन, डिकॉय सापळे) केलेली नाही. त्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नियुक्ती करण्यात आले होते. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाल्यामुळे २०१२मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे तत्कालीन आयुक्त व संचालक विकास खारगे, सचिव जयंत बांठिया यांनी विभागीय दक्षता पथके स्थापन केली.

गेल्या ३ वर्षांत या पथकाने शंभरावर डिकॉय केस केल्या. १४ प्रकरणात पैसे घेऊन गर्भलिंग निदान करताना डॉक्टर सापळ्यात अडकले. औरंगाबाद विभागात १२ केस केल्या आहेत. त्यात औरंगाबाद शहरात चार, देवगाव रंगारी येथे एक तर नाशिक व अहमदनगर येथेही प्रत्येकी एक केस करण्यात आली. सोनोग्राफीचा गैरवापर, रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळल्याने २२हून अधिक केंद्रावर सील ठोकले.

'डिकॉय'ची पद्धत

एक डिकॉय करण्यासाठी साधारणतः १५ दिवस ते एका महिन्याचा कालवधी लागतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. तक्रार प्राप्त झाल्यास किंवा खात्रीलायक माहिती प्राप्त मिळाल्यानंतरच सापळा रचला जातो. त्यासाठी गर्भवती महिलेची मदत घ्यावी लागते, अशी माहिती त्यांनी दिली. सापळा यशस्वी झाल्यावरच संबंधित गर्भवती महिलेस आरोग्य विभागातर्फे १० हजार रुपये, तर खबऱ्याला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला जातो.

चौकशी व रिपोर्टिंग

विभागीय दक्षता पथकाने बीड येथील डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे, धुळे येथील डॉ. मिलिंद कोल्हे यांच्यासह एकूण ९ प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. यापैकी एक डॉक्टर दोषी नसल्याचा अहवालही पथकाने सादर केल्याची माहिती पथकाचे सदस्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमधील १५० भूखंड; सिडको करणार विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोने वाऴूज महानगर प्रकल्पातील नगर- ४ मधील १४० व एमजीएमजवळील १६ प्लॉट निविदा प्रकियेने विक्रीसाठी काढले आहेत. हे प्लॉट व्यापारी व निवासी वापरासाठी असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी (४ मार्च) पत्रकारांशी बोलताना दिली.

वाळूज महानगर प्रकल्पात नगर- एक व दोननंतर गोलवाडी परिसरातील औरंगाबाद-पैठण रोडवर नगर-४ विकसित केले जात आहे. याठिकाणी दीड एफएसआय असलेलेली १४० निवासी तथा वाणिज्य भूखंड ६० वर्षे भाडेपट्ट्यावर निविदा पद्धतीने विक्रीला काढले आहेत. या प्लॉटचे क्षेत्रफळ कमीत कमी ३०३ चौरस मीटर व जास्तीत जास्त २१२४ चौरस मीटर आहे. त्यासाठी बेस रेट १७ हजार १९१ ते २१ हजार ०९८ रुपये प्रति चौरस मीटर असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला प्रशासक एच. व्ही. आरगुंडे, वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, सहयोगी नियोजनकार एन. व्ही. गोलखंडे, सहायक पणन अधिकारी आर. पी कुरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र शहापुरकर आदी उपस्थित होते.

'नगर- ४' मध्ये सुविधा

नगर- ४ मध्ये रस्ते, पाणी यासह हॉस्पिटल, शाळा, खेळाचे मैदान यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. बारा मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते असतील. सुमारे दीड हेक्टरवर हे ग्रोथ सेंटर असून येथून पैठण रोडला जोडणारा रस्ता तयार केला जाईल, अशी माहिती प्रशासक आरगुंडे यांनी दिली. निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होईल. या प्रक्रियेत प्लॉट मिळाल्यानंतर निविदाधारकांने संपूर्ण रक्कम भरल्यानंतर ३० दिवसाच्या आत नोंदणीकृत करारनामा केला जाईल त्यास कायदेशीररित्या हक्क प्राप्त करण्यासाठी लिज डीड करणे बंधनकारक आहे. यापूर्वी बांधकाम केल्याशिवाय लिजडीड केली जात नसे, त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचण येत होती, असेही त्यांनी सांगितले.

एमजीएमजवळ १६ प्लॉट

एमजीएम परिसरात सिडकोची सुमारे सात हजार चौरस मीटर जागा असून त्याठिकाणी १६ प्लॉटची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. शहराच्या मध्यभागात असलेल्या या या प्लॉटचे क्षेत्रफळ ३८७ आणि ६६६ चौरस मीटर असून बेस रेट ४७ हजार ८०० ते ६४ हजार रुपये प्रति चौरस मीटर आहे. यासह जालना रोडवरील इंडियन एअरलाईन्स येथील २ हजार ८६ चौरस मीटरचा भूखंड हॉस्पिटल वापरासाठी निविदा पद्धतीने विक्रीला काढण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांबेकर, आगाखान यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विषारी रसायने खाम नदीमध्ये सोडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खांबेकर, आगाखान व साथीदारांना कोर्टाने पुन्हा ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना कोर्टापुढे हजर केले होते.

गेल्या शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी खाम नदीत विषारी रसायने सोडताना ५ जणांना अटक केली होती. यामध्ये मनसेचा शहराध्यक्ष सुमित खांबेकर, नगरसेवक आगाखान, मनविसेचा जिल्हा उपाध्यक्ष तुषार पाखरे, चंदन नागेंद्रसिंह व असलम शेखचा समावेश होता. सोमवारी टँकरचालक सोनू चव्हाणला अटक करण्यात आली होती. या आरोपींना बुधवारपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यामुळे पीएसआय अजयकुमार पांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रुती शर्मा यांच्या कोर्टात आरोपींना हजर केले. यावेळी पोलिसांनी पकडलेल्या टँकरचे मूळ मालक कोण, २००९पासून किती टन रसायने सोडण्यात आली. वापी, ठाणे येथील कंपन्या या केमिकलचा वापर कशासाठी करतात, येथील आरोपी मुख्य आरोपींच्या संपर्कात कसे आले; तसेच वापी येथील मूळ कंत्राटदार कोण आदींचा तपास करायचा असल्याने पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्याचा विचार करून कोर्टाने शनिवारपर्यंत आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे.

कंत्राटदारांचा शोध

या प्रकरणात वापी, ठाणे व मध्य प्रदेश येथील ठेकेदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, मात्र त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागू शकलेला नाही. टँकरच्या क्रमांकावरून पोलिसांनी ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला आहे. या माहितीवरून टँकर मालकांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला पुन्हा हुडहुडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर आणि परिसरामध्ये सलग २ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या ४ दिवसांपासून शहराच्या कमाल व किमान तापमानामध्ये घट झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली आहे.
बुधवारी शहराचे किमान तापमान १४, तर किमान तापमान २८.४ अंश सेल्सियस असे नोंदविण्यात आले. गेल्या महिन्याभरपासून थंडीची लाट ओसरली, तापमानाचा पाराही ३२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचा अनुभव येत होता, मात्र २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे गायब झालेली थंडीची पसरली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानंतर सायंकाळी थंड वारे वाहण्यास सुरुवात होते, रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे. दोन दिवसांपासून दुपारी ऊन असले तरी सायंकाळी थंड वारे वाहत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात तापमानात किंचित वाढ होणार आहे.

दोन दिवस पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ८ व ९ मार्च रोजी शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. ७ मार्च रोजी शहरामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यामध्येही शहराचे किमान तापमान सरासरी १३ अंश, तर कमाल तापमान २५ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८ दिवसांत ‘समांतर’, गुंठेवारी १५ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाला आठ दिवसात सुरूवात होणार असून मुख्यमंत्री गुंठेवारीबद्दलचा निर्णय पंधरा दिवसात जाहीर करतील, असा 'इलेक्शन प्लॅन' पालकमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. 'आम्ही निवडणूक पाहून निर्णय घेत नाही,' असे सांगायलाही पालकमंत्री विसरले नाहीत.

पालकमंत्री कदम महापालिकेच्या कार्यक्रमासाठी बुधवारी (४ मार्च) शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 'समांतर जलवाहिनी संदर्भात दोन दिवसांपूर्वी 'मातोश्री' वर बैठक झाली. या बैठकीसाठी एसपीएमएल कंपनीचे मालक सुभाषचंद्र गोयल उपस्थित होते. बैठक झाल्यापासून आठ दिवसात समांतर जलवाहिनीचे काम सुरू करू, असा शब्द त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी काम सुरू करण्याची तयारीही गोयल यांनी दाखवली आहे. त्यामुळे आठ दिवसात जलवाहिनीचे काम सुरू होईल, असा विश्वास वाटतो,' अशी माहिती कदम यांनी दिली.

काम करीत नसल्यामुळे कारवाई केली असती, तर कंपनी कोर्टात गेली असती आणि काम दोन- तीन वर्षे रखडले असते. त्यामुळे कंपनीला पुन्हा एकदा संधी देण्याचे ठरविण्यात आले, असे कदम यांनी सांगितले. शिवसेनेने 'समांतर'सोबत जुळवून घेतले असताना भाजप या मुद्यावर आक्रमक झाली आहे, असे पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मात्र कदम यांनी,' निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक होण्याचे धंदे आम्ही केलेले नाहीत. कुणी ते करीत असेल तर आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही,' असे सांगितले.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी येत्या पंधरा दिवसात गुंठेवारीचा प्रश्न सुटेल, असे कदम यांनी यावेळी सांगितले. गुंठेवारी अंतर्गत घरे नियमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून ते निर्णय जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी दिली. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी अंतर्गत २०१०पर्यंत बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वी शासनाकडे पाठवला आहे. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य महापौर कला ओझा, सभापती विजय वाघचौरे आदी उपस्थित होते.

कंपनी मालकालाही जेलमध्ये टाकू

खाम नदीत विषारी रसायने टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करू, या पुनरुच्चार कदम यांनी केला. याबद्दलची सर्व कागदपत्रे घेऊन पोलिस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आहे. हे प्रकरण फार गंभीर असून कंपनी मालकासह सर्वांना जेल मध्ये टाकू, असा इशारा त्यांनी दिला. या संदर्भात 'मटा' ने आपल्याशी बोलून सर्वप्रथम बातमी केली, असा उल्लेखही त्यांनी केला.

खासदार खैरेंशी मतभेद नाहीत

खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी माझे जिवाभावाचे संबंध आहेत. त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत, असा खुलासा कदम यांनी केला. त्यांचा अवमान माझ्याकडून होणार नाही, मी तो करणार नाही. खैरे आणि माझ्यातील मतभेदाबद्दल काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत, त्या वास्तवाला धरून नाहीत, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक : मनसेचे तळ्यात-मळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या हालचालींना सुरुवात झालेली नाही. निवडणूक लढवायची की नाही, अशीही चर्चा सध्या मनसेमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आजही कायम आहे. दरम्यान, नऊ मार्च पक्षाच्या वर्धापनदिनानंतर महापालिका निवडणुकीचा 'अॅक्शन प्लान' ठरविण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. औरंगाबाद‌ जिल्ह्यातील उमेदवारांना तर डिपॉझिटही वाचविता आले नाही. पक्षाच्या पराभवानंतर मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती.‌ जिल्हाध्यक्षांसह एकमेव नगरसेवक राज वानखेडे; तसेच अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.

खाम नदीमध्ये रसायन सोडल्याच्या प्रकरणावरून मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी पक्षाने केली. ‌महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना मनसेतून कार्यकर्त्यांचे 'आउट गोइंग' मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. एकंदरित मनसेमध्ये सध्या अस्थैर्याचे वातावरण आहे. पुढील महिन्यात होणारी निवडणूक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, मात्र पक्ष निवडणूक लढवणार का नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सोमवारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे शहरात येणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

एक मार्च रोजी औरंगाबाद येथे होणारा दौरा अचानक रद्द झाला. नऊ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनानंतर पक्ष प्रमुख राज ठाकरे व वरिष्ठ नेते औरंगाबादचा दौरा करणार आहे. यावेळी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या 'अॅक्शन प्लान'बाबत चर्चा करण्यात येणार आहे.

- बाळा नांदगावकर, माजी आमदार व वरिष्ठ नेते, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद-फर्दापूर रस्त्याला ठेंगा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा सर्वाधिक राबता असलेल्या औरंगाबाद-फर्दापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी २० टक्के वाटा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या कामातून अपेक्षित महसूलही येणे कठीण असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता कधी रूंद होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हा रस्ता आहे. या रस्त्यावर अजिंठा आणि पुढे जळगावकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. औरंगाबाद-फर्दापूर हा ९९ किलोमीटरचा रस्ता चौपदरी करावा, असा प्रस्ताव ८ वर्षांपूर्वी सादर करण्यात आला. त्यावेळी रस्त्याला ९० कोटी रुपये लागणार होते, पण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने बीओटीचा प्रस्ताव पुढे आला होता.

सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यासाठी ७४६ कोटी ५७ लाख रुपयांना तांत्रिक मान्यता दिली गेली. राज्य सरकार १६ टक्के, केंद्र सरकार २० टक्के वाटा देणार होते. कंत्राटदाराकडून उर्वरित रक्कम दिली जाणार होती. गेल्यावर्षी केंद्र सरकार बदलले. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. २० टक्के रक्कम देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नकार दिल्याचे मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

पैठण रस्त्याचे काय?

औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या रुंदीकरणाचा तिढाही सुटलेला नाही. आठ वर्षांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ८४ कोटींचे इस्टिमेट काढण्यात आले होते. आज हा आकडा २९७ कोटींवर जाऊन पोचला आहे. या रस्त्यासाठीही फर्दापूर रस्त्यासारखी अडचण येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकार पैठण रस्त्यासाठी काय निर्णय घेणार, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांसाठी वाहतूक खोळंबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंत्र्याच्या ताफा जात असताना वाहतूक थांबवू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यानी सोमवारी दिले होते, मात्र पालकमंत्री रामदास कदम यांच्या ताफ्याने बुधवारी हे आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकले. पालकमंत्र्यांच्या मार्गात असलेल्या सर्वच सिग्नलवर वाहतूक थांबविण्यात आली होती. सिल्लेखाना चौकात चक्क लाल दिवा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या गाडीला वाट करून देण्यात आली.

मंत्र्याचा ताफ्याला वाहतुकीची अडचण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त नेमण्यात येतो. मंत्र्यांचा ताफा येण्यापूर्वी संबंधित मार्गावरील सर्व चौकांचा ताबा वाहतूक पोलिस घेतात. मंत्री महोदयांचा ताफा सायरन वाजवत निघाल्यावर वायरलेस यंत्रणेद्वारे त्याचे प्रत्येक क्षणाचे लोकेशन पोलिसांना कळविण्यात येते. ताफा चौकात येण्यापूर्वी चौकातील अन्य रस्ते बंद करून वाहतूक थांबविली जाते. मंत्र्यांच्या या राजेशाही थाटाचा सर्वसामान्य वाहनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागतो. गेल्या सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबविण्यात आली होती. या प्रकारामुळे वाहनधारकांना खोळंबून बसावे लागत होते. या पार्श्वभूमीवर, मंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली होते.

पालकमंत्री रामदास कदम यांच्या ताफ्याने मात्र बुधवारी हे आदेश धुडकावून लावले. दुपारी चार वाजता चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यांचा कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिरात होता. विमानतळ ते रंगमंदिर या मार्गावरील वाहतूक पोलिसांना 'अलर्ट' करण्यात आले होते. चौकाचौकांत पोलिस तैनात करण्यात आले होते. वायरलेसवर मंत्र्याचा ताफा कुठपर्यंत आला याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्याआधारे प्रत्येक चौकात वाहतूक थांबवून ठेवण्यात येत होती.

लेखी आदेशच नाहीत

मंत्र्यांसाठी वाहतूक थांबवू नये, अशा स्वरुपाचे कोणतेही लेखी आदेश पोलिसांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून देण्यात आला, असे बंदोबस्तावरील पोलिसांनी सांगितले.

Latest Images