Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

होळीची धूम

0
0

औरंगाबाद टाइम्स टीम

होळी आणि तरूण यांचं अनोखं नातं आहे. मजा, मस्ती, धिंगाणा, एकमेकांना रंग लावणं आणि स्वतःलाही लावून घेत जल्लोष करणं हे सारं त्यात आलंच. हाच सारा जल्लोष सरस्वती भुवनच्या विद्यार्थ्यांनी आज होळीच्या निमित्ताने महाविद्यालयात केला. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीही होळीच्या रंगात मनसोक्त रंगल्या होत्या. सरस्वती भुवन कॉलेजप्रमाणेच शहरातील इतरही काही कॉलेजेसमध्ये होळीची धूम होती.

होळी दिवशी आज विद्यार्थी विद्यार्थिनी कॉलेजात आले तेच मुळी आपल्यासोबत विविध प्रकारचे रंग घेऊन. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आज रंगवायचेच याच इराद्याने प्रत्येकजण आला होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात जमताच होळीचा जल्लोष सुरू झाला. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण झाली आणि होळी होळी... च्या आवाज परिसरात घुमला. जो तो एकमेकाला रंगविण्यासाठी जणू स्पर्धाच करत होता. विद्यार्थिनीही यात मागे नव्हत्या. आपल्या मैत्रिणीला रंगविण्यासाठी प्रत्येकजण उत्साहाने पुढाकार घेत होती. पहिला रंग अंगावर पडेपर्यंत नको नको म्हणणारे तरूण-तरुणी एकदा रंग अंगावर पडला की दुसऱ्याला रंगवायला पुढे सरसावत होते.

हॉस्टेलमध्येही धमाल

सकाळी उठल्यापासूनच हॉस्टेलमध्येही रंगोत्सवाची धमाल सुरू होती. उठल्यावर डोळे चोळत बाहेर आलेल्या मित्राला रंगविण्यासाठी अन्य रुममधील मित्रांचे टोळके तयारच होते. प्रत्येकाला रंगविले जात होते. या रंगोत्सवाच्या आनंदात कोणीही बिनरंगाचा राहिला नाही. विद्यार्थ्यांचा जल्लोष बघण्यासाखा होता.

रंग फक्त कोरडेच

स.भु.च्या विद्यार्थ्यांनी खेळलेली ही होळी मात्र होती फक्त कोरड्या रंगांचीच. कोरडा रंग लवकर निघतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे या मित्रांनी कोरडे आणि नैसर्गिक रंगच एकमेकांना लावले. मुलींनीही मैत्रिणींना रंगविण्यासाठी कोरड्या रंगांचाच वापर केला.

दुसऱ्याला इजा नको

कोरड्या रंगांची होळी खेळत या मित्रांनी इतरांना इजा होणार नाही याची काळजी घेतली. उत्साहाच्या भरात एखाद्याला लागून त्याच्या आनंदावर विरजण पडणार नाही, याची पूर्ण काळजी सर्वांनी घेतली. त्वचेला त्रास होईल, असे कोणतेही रंग लावले गेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या उत्तराचा अभ्यास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला उत्तर दिले अाहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांना ८ दिवस लागणार आहेत. कंपनीने दिलेल्या उत्तरात काही तथ्य आढळले नाही, तर कारवाई करता येईल, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

पैठणपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड या कंपनीशी करार केला. या कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून नेमले आहे. कंपनीने अद्याप जलावाहिनी टाकण्याचे काम सुरू केले नाही. त्याशिवाय शहरातील पाणीपुरवठाही वारंवार विस्कळित झालेला असल्यामुळे नागरिक आणि नगरसेवकांनी कंपनीच्या कारभाराच्या विरोधात रान उठविले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासनाने कंपनीला समांतर जलवाहिनीचा करार रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजाविली होती. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी कंपनीला ५ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार कंपनीने पालिकेकडे उत्तर सादर केले आहे.यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सखाराम पानझडे म्हणाले, 'कंपनीने नोटिसीचे उत्तर दिले आहे. उत्तरात त्यांनी नेमके काय म्हटले, याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही उत्तराची प्रत करारानुसार नियुक्त केलेले स्वतंत्र अभियंता आणि सल्लागार यांना पाठविणार आहोत. याशिवाय पालिकेचे अधिकारीही त्या उत्तराचा अभ्यास करतील. यासंदर्भात सल्लागारांचे मतही मागवावे लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उत्तरात काही तथ्य आढळले नाही, तर कंपनीवर कारवाई करण्याचा विचार केला जाईल. कंपनीने नोटिसीला दिलेल्या उत्तराचा सर्व स्तरांवर अभ्यास करण्यासाठी ८ दिवस लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणासह पित्यावर कॉलेजमध्ये हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका कॉलेज तरुणासह त्याच्या पित्यावर १० ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केला. शनिवारी दुपारी शासकीय महाविद्यालयच्या परिसरात ही घटना घडली. जखमी तरुणाने स्नेहसंमेलनात पारितोषिक पटकावले होते. त्यामुळे हा हल्ला केल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास बेगमपुरा पोलिस करत आहेत. सुरेश अमरनाथ पांडे आणि त्यांचा मुलगा अविनाश सुरेश पांडे (दोघे रा. सारा वृंदावन, वडगाव कोल्हाटी, वाळूज. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. सुभेदारी विश्रामगृहाशेजारील शासकीय महाविद्यालयात अविनाश पांडे हा बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात आहे. त्याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

बुधवारी दुपारी अविनाश रसायनशास्त्राच्या प्रात्याक्षिकांसाठी महाविद्यालयात गेला असता, अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुचाकीचे टायरला टोकेदार वस्तूने १० ते १५ टोचे मारले होते. शनिवारी त्याचे दोन पेपर होते. त्यामुळे सावधगिरी म्हणून अविनाशने वडिलांना बोलावून घेतले. दुपारी दोन वाजता पेपर संपल्यानंतर अविनाश व त्याचे वडील सुरेश हे पार्किंगमध्ये आले असता १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. दोघांनाही घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला, यात राठोड नामक विद्यार्थ्याचा हात आहे का, याबाबत बेगमपुरा पोलिसांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

स्नेहसंमेलनात बक्षिसे मिळविल्याचा राग

महाविद्यालयात २९ जानेवारीला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. विविध स्पर्धांत सहभागी झालेल्या अविनाशला ४ बक्षिसे मिळाली. ही बाब राठोड नावाच्या एका विद्यार्थ्याला सहन झाली नाही. त्याने अविनाशला 'चीटर' म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. यावरून अविनाश आणि राठोड यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी अविनाशने राठोडविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी राठोडने २ मार्च रोजी, अविनाशने चाकुने हल्ला केला, अशी तक्रार दिली होती. त्यावरून अविनाशला अटकही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडचे डाक सेवक करणार बेमुदत संप

0
0

म. टा. प्रतिनिधी,नांदेड

ग्रामीण डाक सेवकाच्या विविध मागण्याकडे केंद्रसरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवकांनी १० मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ४१६ शाखांना कुलूप लागणार असल्याची माहिती ग्रामीण डाक सेवक संघटनेचे नांदेड जिल्हा सचिव आईनाथ सोनकांबळे यांनी दिली.

केंद्र सरकारने ग्रामीण डाक सेवकावर सातत्याने अन्याय केला आहे. २०१४ मध्ये संप झाला तेव्हा डाक सेवक समिती स्थापन करण्यात येईल असे लेखी आश्वासन ऑल इंडिया ग्रामीण संघटनेला दिले होते. परंतु, सत्तेवर असलेले सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अधिकारी प्रमुख असलेली वेतन समिती नेमने म्हणजे संपूर्ण ग्रामीण डाक सेवकावर अन्याय आहे. यापूर्वी अशा अधिकाऱ्यांनी ग्रामीण डाक सेवकाच्या वेतनात सुधारणा करताना न्याय दिला नाही. म्हणून केंद्र शासनाने त्वरित निर्णय घेवून माजी न्यायाधिश असलेली समिती स्थापन करावी अशी प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकार वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यास तयार नाही.

डाक विभागाने लवकरच खाजगीकरण करण्याचा डावदेखील आखला आहे. त्यामुळे या मागण्या मान्य करून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ४१६ शाखा १० मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील टपाल सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…चर्चा चाकूरकरांच्या ‘स्टायलिश’पणाचीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'माझ्या कपड्यांवरील टीकेचा इतिहास जुनाच असून १९६७पासून अशी टीका होत आहे,' असे मत आपल्या स्टायलिश अदाकारीमुळे देशाच्या गृहमंत्रिपदावर पाणी सोडायला लागलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्यासाठी आमदार बसवराज पाटील यांनी ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला होता. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, डॉ. सुनील गायकवाड, रजनी पाटील, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. जर्नादन वाघमारे, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप देशमुख, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमक्षेत्र संघचालक डॉ. अशोकराव कुकडे आदी उपस्थित होते.

शिवराज पाटील म्हणाले, 'हा सोहळा माझ्यासाठी नाही, तर ज्यांनी मला राजकारणात सहकार्य केले, ज्या जनतेने माझ्यावर पन्नास वर्षे प्रेम केले, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आहे.' या वेळी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक आठवणींना उजाळा देऊन पंडित नेहरू यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर असल्याचे आवर्जून सांगितले. स्टायलिशपणाबद्दल ते म्हणाले, 'माझ्या कपड्यावर १९६७पासून टीका होत आहे. मी त्यावेळी कॉलेजमधून शिक्षण घेऊन आलो होते. सूट-बूट-टाय लावत होतो. त्यावर हा कोण 'अमेरिकन टायवाला', अशी टीका केली जात होती.' दिवंगत समाजवादी नेते डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी टीका सुरू केली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, 'चाकूरकरांचा कार्यक्रम आहे म्हणून जाकीट व नीटनेटके कपडे घालून कार्यक्रमाला आले आहे.' पतंगराव कदम यांनीही पुण्यातील कॉलेजची आठवण सांगितली. कॉलेजात असताना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यावेळी ते सुटाबुटात आल्याचे कदम यांनी सांगितले. कदम १९९२मध्ये शिक्षणमंत्री असताना 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी भर व्यासपीठावर कपडे फाडले होते. त्यावेळी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी त्यांना शर्ट काढून दिला होता. याची आठवण कदमांनीच सांगून लातूरशी 'घनिष्ठ संबंध' कसा आहे, हे स्पष्ट केले. हाच धागा पकडून खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात कपडे फाडण्याच्या आठवणी नसून आमच्याकडे चांगल्या आठवणी असल्याचा दोनदा उल्लेख केला.

पंतप्रधानही कपडे बदलतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील म्हणाले, 'सध्याचे पंतप्रधान दिवसातून चार वेळा कपडे बदलतात. स्वत:च्या नावाचा सूट करून घेतात. हे राजकीय परिवर्तनही सारे पाहत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळे अपघात : २ जणांचा मृत्यू

0
0

जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळया अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत भरधाव टेम्पोंने रिक्षास पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत नातेवाईकांचा अंत्यविधी करून, परतीच्या मार्गावर असलेल्या युवकास वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला.

शहरातील म्हाडा कॉलनीत राहणारे बाळासाहेब आत्माराम घोरपडे (वय ४५) रोजी रिक्षातून खांदगाव येथे जात असतांना पाठीमागून भरधाव टेम्पोंने त्याच्या रिक्षास जबरदस्त धडक दिली. याघटनेत गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी बदनापूर तालुक्यातील खांदगाव रोडवर घडला. दुसऱ्या घटनेत नातेवाईकांचा अंत्यविधी करून, परतीच्या मार्गावर असलेल्या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तोताराम शामराव बावणे (वय ४०) रा. चांडोळ ता. जि. बुलडाणा असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी माहोरा-धाड मार्गावरील येवता पाटीजवळ घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेने केलेली शुल्कवाढ रद्द करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकांना विश्वासात न घेता वूडरीज हायस्कूल प्रशासनाने भरमसाठ शुल्कवाढ केली आहे. ही शुल्कवाढ रद्द करा आणि शाळेवर कारवाई करा, यासाठी पालकांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच साकडे घातले. निवेदन देऊन चार दिवस उलटले, तरी शिक्षण विभागाने कोणतेच पाऊल उचलेले नाही. त्याबद्दल पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवित शहरातील अनेक शाळांनी अतिरिक्त शुल्क वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. अनेक शाळा तर रितसर पावतीही देत नाहीत. शाळांच्या या मनमानी कारभाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता पालकच समोर येत आहेत. पैठण रोडवरील वूडरीज हायस्कूलच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात दंड थोपटत थेट शिक्षण विभागात धाव घेतली आहे.

शाळेने यंदा केलेली शुल्कवाढ भरमसाठ असून ती तत्काळ रद्द करावी. पालकांकडून आजपर्यंत वसूल केलेले शैक्षणिक शुल्क, बस व भोजनाचे शुल्क हे नियमानुसार आकारले आहे का? याची चौकशी करावी, प्रवेशशुल्क ४५,००० व रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून आकारण्यात येणारे पाच हजार रुपये आकारले जातात याची तपासणी करा. विद्यार्थ्यांना कँटींनची करण्यात येणारी सक्ती रद्द करा अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत.

तब्बल १९ मागण्या

शुल्कवाढ, अतिरिक्त शुल्क आकारणी, गैरहजर राहिल्यास दंड आकारणी, शाळेतूनच पुस्तके घेण्याची केलेली जाणारी सक्ती अशा तब्बल १९ मागण्यांचे निवेदन ‌पालकांनी शिक्ष्ाण विभागाकडे सादर केले आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत शाळेच्या मनमानीला आळा घाला, अशी विनंती विविध कागदपत्रांच्या आधारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंप चालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमिशनबद्दल पुनर्विचार करावा यासह इतर मागण्यांसाठी देशातील ५३,००० पेट्रोल पंप डिलर्स १० मार्च रोजी 'खरेदी बंद' आंदोलन करणार आहेत. याशिवाय १६ मार्चपासून एक शिफ्टमध्ये पंप ठेवण्याचे घोषित करण्यात आले आहे.

कन्सोरटीएम ऑफ इंडियन पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनतर्फे (सीआयपीडी) केंद्र सरकारला ६ मार्चपर्यंत विविध मागण्यांवर विचार करण्याची मुदत देण्यात आली होती. एमडीजी नियम रद्द करावा, पंपावरील सुलभ शौचालय व्यवस्थेबद्दल कंपनीकडून होणारी कारवाई रद्द करावी, सध्याची महगागाई लक्षात घेऊन डिलर्सचे कमिशन वाढवावे, पेट्रोल-डिझेल दरवाढीची दिनांक निश्चित करावी, पेट्रोल पंपाची संख्या वाढत असल्याने जुन्या पेट्रोल पंपचालकांना व्यवसाय बंद करण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड माफियांना पोलिसांचे अभय

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लॉटच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. परिणामी त्या तरुणाला तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. या तरुणाला शुक्रवारी (६ मार्च) धूलिवंदनादिवशी दुचाकीची धडक देऊन जखमी करण्यात आले. पीडित तरुणाने पोलिस आयुक्तांची भेट घेत दाद मागितल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

प्लॉटच्या वादातून हनुमाननगर येथील उत्तम कांबळे यांचे २२ मार्च रोजी अपहरण करण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धनु पहेलवान, किशन अंभोरे, खुशालचंद कटारिया, रवी व कुंदे नावाच्या व्यक्तीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अॅट्रासिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी २५ मार्च रोजी कांबळे यांना त्रिमूर्ती चौकात अडवून तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिमूर्ती चौकातील घटनेचे चित्रीकरण एका कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

पोलिसांकडून संशयित आरोपींना अभय मिळत असल्यामुळे कांबळे यांनी शनिवारी (७ मार्च) पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांची भेट घेतली. त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

अज्ञात तरुणांची धडक

उत्तम कांबळे यांना या भूखंड माफियांकडून सतत धमक्या येत होत्या. ते शुक्रवारी दुपारी त्रिमूर्ती चौकात उभे असताना रंगाने माखलेल्या तीन तरुणांनी भरधाव दुचाकी अंगावर घातली. या घटनेत हातापायाला मार लागून कांबळे जखमी झाले आहेत. हा अपघात जाणीवपूर्वक घडविल्याचा कांबळेंचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात खडाजंगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व स्वाभिमानी मुप्टा प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रविवारी (८ मार्च) वाद उफाळून आला. भेट नाकारल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव घालत आमचे म्हणणे ऐकूण घ्या, असा आग्रह धरत अरेरावी केली. यामुळे संतापलेल्या कुलगुरूंनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

विद्यापीठातील पर्यटनशास्त्र विभागात शिक्षणशास्त्र विभागातर्फे बीएड् अभ्यासक्रमावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सकाळी ११.३० वाजता विभागाकडे जात होते. त्यावेळी स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत, आम्ही दिलेल्या निवेदनावर काय केले? आमची भेट नाकारता, कानेरे समितीतील प्राध्यापकांना पाठिशी का घालता, असा सवाल केला. यानंतर वाद वाढत गेल्याने कुलगुरूही संतापले, कुलगुरू व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये 'तू तू मै मै' वाढत गेली. संघ्ाटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावीची भ्ााष्ाा वापरल्याचे उपस्थितांनी सांगितले. वाद वाढत असल्याचे लक्षात अाल्यानंतर प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. कुलगुरू कार्यक्रमस्थळी निघून गेल्यानंतर वाद निवळला. विद्यापीठातील सूत्रांनी‌ दिलेल्या माहितीनुसार संबंधित कार्यकर्त्यांवर प्रशासनातर्फे सोमवारी पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. याबाबत कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याशी वांरवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केली, मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. संघटनेचे किशाेर वाघ यांनी सां‌गितले की, आम्ही आमच्या मागण्यांसाठी त्यांच्याकडे गेलो होतो. मागील अनेक दिवसापासून आम्हाला भेट नाकारली जाते, हे याेग्य नाही हे सांगत होता.

माध्यम प्रतिनिधीवर कुलगुरू भडकले

कुलगुरू व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात वाद सुरू असताना, स्थानिक न्यूज चॅनलचा प्रतिनिधी चित्रीकरण करीत होता. ते पाहिल्यानंतर कुलगुरू संतापले. तुम्ही कोणाला विचारून छायाचित्रण करत आहात, परवानगी घेतली आहे का? असा सवाल त्यांनी केला.

संघटनांचा राबता कायम

विद्यापीठात संघटनांचा कायम राबता असतो. गेल्या दोन महिन्यांपासून संघटनांमधील वाद अनेकदा उफाळून आले आहेत. संघटनांच्या हस्तक्षेपाबाबत कुलगुरूंनीही नाराजी व्यक्त केली होती. यामुळेच संघटनांच्या प्रतिनिधींची भेट कुलगुरूंनी अनेकदा नाकारली. त्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाला शाळांचा ठेंगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) २५ टक्के आरक्षणाला ठेंगा दाखवल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत ५२४ शाळांपैकी फक्त २०६ शाळांनीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे, तर वारंवार संकेतस्थळ हँग होत असल्यामुळे नोंदणी केलेल्या शाळांत प्रवेश घेण्यात अडचणींचा डोंगर आहे.

दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश यंदापासून ऑनलाइन होत आहेत. प्रारंभी २३ फेब्रुवारीपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. यानंतर वेळापत्रक २७ फेब्रुवारी, ३ मार्च नंतर ६ मार्च असे पुढे गेले. प्रक्रिया ६ मार्चला सुरू झाली. या योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ५२४ शाळांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, या शाळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५२४ पैकी केवळ २०६ शाळांनीच नोंदणी केली आहे. उर्वरित शाळांनी या योजनेला ठेंगा दाखविला आहे. नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. यासह अनेक शाळांनी योजनेची प्रक्रिया होण्यापूर्वीच शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. या शाळांनाही शिक्षण विभागाचे अभय मिळते आहे.

दरम्यान, ज्या शाळांनी नोंदणी केली आहे तिथेही प्रवेश घेण्यातही अडचणी आहेत. २० मार्चपर्यंत पालकांना अर्ज भरायचे आहेत, पण संकेतस्थळ हँग होत असल्याने पालकांना तासन तास ताटकळत उभे रहावे लागते. शहरात १४ ठिकाणी पालकांसाठी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत, परंतु अनेक केंद्रावर सुविधाच उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

प्रवेश प्रक्रियेचे सॉफ्टवेअर आम्ही तयार करून दिलेले आहे. संकेतस्थळ हँगबाबतही स्थानिक पातळीवर निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत होईल.

- दिनकर टेमकर, सहसंचालक, शिक्षण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देह भन्नाट सैरावैरा; गेले वाहून तनमन!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नऊवार साडी, नाकात देखणी नथ, भाळी चंद्रकोर आणि बुलेटला मारलेली कीक. आधुनिकता आणि संस्काराचे मूल्य जपत प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असलेली महिला शक्ती, रविवारी महाराष्ट्र टाइम्सच्या वुमेन बाइक रॅलीमध्ये तळपली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 'मटा'च्या कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीत ४३५ महिलांनी सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला.

युवती, गृहिणी, नोकरदार, आजीबाई, सूनबाई, कुणाची तरी आई आणि ताई. साऱ्यांनाच या रॅलीत सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. पारंपरिक वेषभूषा, डोक्यावर बांधलेला कुर्रेबाज भगवा फेटा आणि भन्नाट वेगात आत्मविश्वासाने बाइक चालविणारी महिला शक्ती पाहून, पाहणाऱ्यांनाही अभिमानाचे भरते आले. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या पत्नी विजयालक्ष्मी दांगट, उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, रॅलीचे सहयोगी प्रायोजक निशा ग्रुपच्या संचालिका प्रेरणा निहलानी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. तत्पूर्वी 'मटा'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी रॅली आयोजनाचा उद्देश व उपक्रमाविषयी माहिती देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या वेगाच्या थराराचा समारोप प्रोझोन मॉलच्या लॉनवर झाला. यावेळी महापौर कला ओझा, महापालिका आयुक्त प्रकाश महाजन, प्रोझोन मॉलचे अध्यक्ष अनिल इरावणे यांची उपस्थिती होती. 'मटा'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी आभार मानले. आर. जे. अभय याने उद्घाटन व समारोप कार्यक्रमासह रॅलीचे सूत्रसंचालन केले.

हळूहळू शहर सुधारते आहे. महिलांच्या हातात सत्ता आहे. रस्ते दुरुस्त होत आहेत. आज तुम्ही ते अनुभवले असेल. - कला ओझा, महापौर

रॅलीचे निमित्त साधून महिला जो पेहराव करून, फेटे बांधून आल्या ते खरोखरच छान दिसत होते.

- वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी

'मटा'ने बाइक रॅलीचे आयोजन केल्याबद्दल आभार. या महिलांनी अनुभवलेल्या बाइक रॅलीच्या थराराला कशाचीच तोड नाही.

- विजयालक्ष्मी दांगट

आपल्या येथील रस्ते सायकल चालवण्याच्याच लायकीचे आहेत. तुम्ही बाइक चालवून 'सहनशक्ती'च दाखवून दिली. त्याबद्दल अभिनंदन

- प्रकाश महाजन, पालिका आयुक्त

'मटा'ने वेगळेपण जपले आहे.या उपक्रमात निशा ग्रुपही सामील झाला. याबद्दल

अभिमान वाटतो.

- प्रेरणा निहलानी, संचालिका, निशा ग्रुप

महिला दिनासह 'मटा'च्या सर्वच उपक्रमात प्रोझोन नेहमीच सहभागी असतो. भविष्यातही असेल.

- अनिल इरावणे, अध्यक्ष प्रोझोन

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या प्राचार्याला बदडले

0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमधील प्राचार्यानेच महाविद्यालयातील विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच विद्यार्थ्यांनी मिळून त्या प्राचार्याला चांगलेच बदडून काढले. या प्राचार्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घनसावंगीतील मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांनी बी. ए. तृतीय वर्षात एका विद्यार्थिनीची छेड काढून तिचा विनयभंग केला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यानंतर सोमवारी देखील या प्राचार्याने पुन्हा त्या विद्यार्थिनीची छेड काढली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. या प्रकाराची माहिती कॉलेज परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांचे कार्यालय गाठले. छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्यांशी वाद झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी केबिनची तोडफोड केली. त्यासोबतच प्राचार्याला चांगलेच बदडून काढले. या घटनेनंतर घनसावंगी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच घनसावंगीचे पोलिस उपनिरीक्षक के. जी. पवार यांनी घटनास्थळी जाउन परिस्थिती आटोक्यात आणली. या वेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. पाटील यांच्या गाडीचीही तोडफोड केली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून संबंधित प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी केबिन आणि गाडीची तोडफोड करून प्राचार्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर आरोपी प्राचार्य फरार झाला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- के. जी. पवार, पोलिस पनिरीक्षक, घनसावंगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता खरीप अनुदानाच्या ४८ कोटी रुपयांची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात होरपळत असलेल्या जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना २८८.४१ कोटी रुपयांच्या खरीप अनुदानापैकी २३९ कोटी रुपयांचे प्रशासनाकडून वाटप पूर्ण करण्यात आले. शेतकऱ्यांना आता ४८.४८ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्यात शासनाने दोन टप्प्यांत खरीप अनुदानाची रक्कम दिली आहे. परंतु, बँक खात्यांच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान उशिराने प्राप्त झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५३ बाधित गावांमधील ५ लाख ८० हजार ९१६ शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यामध्ये १९९.९४ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ११९.९९ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. ‌पहिल्या टप्प्यातील रक्कम २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

मात्र हा मुहुर्त प्रशासनाला साधता आला नाही. दुसऱ्या टप्प्याचा निधीही प्रशासनाकडे प्राप्त झाला तरीही पहिल्या टप्प्याच्या निधीचे वाटप झाले नव्हते. आता जिल्ह्याला मिळालेले संपूर्ण अनुदान वाटप झाले असून आता उर्वरीत ४८ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.

तालुकानिहाय ‌वाटप

तालुका शेतकरी अनुदान वाटप

औरंगाबाद ४४,४८५ २४ कोटी ६१ लाख ८३,०००

पैठण ७४,८२९ ३८ कोटी ११ लाख १४,०००

फुलंब्री ४२,७३८ १८ कोटी ३५ लाख ९९,०००

वैजापूर ८१,७७४ ४३ कोटी ९४ लाख ६३,०००

गंगापूर ६९,१०७ ३४ कोटी २५ लाख ८४,०००

खुलताबाद २२,७८६ १० कोटी ८८ लाख ७५,०००

सिल्लोड ५९,११३ २७ कोटी १७ लाख ४६,०००

कन्नड ६४,२८४ २९ कोटी ८४ लाख ७०,०००

सोयगाव २६,७२१ १३ कोटी २३ लाख २६,०००

एकूण ४८५८३७ २३९ कोटी ८८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images