Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘स्वाइन फ्लू’चा धोका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च महिना अर्धा संपत आला तरी 'स्वाइन फ्लू'चे प्रमाण कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे आजारावर नियंत्रणासाठी एप्रिल महिना उजाडण्याची शक्यता आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये रोजच तीन ते चार संशयित रुग्ण येत असून, एखादा तरी पॉझिटिव्ह रिपोर्ट येत आहे. सध्या स्वाइन फ्लू वॉर्डातील १४ पैकी ७ रुग्ण पॉझिटिव्ह असून ६ गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटरवरील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

पावसाळ्यातील दमट हवामानात दिसून येणारा 'स्वाइन फ्लू' यंदा जानेवारीमध्ये दिसून आला. फेब्रुवारीत रुग्णांची संख्या वाढत जाऊन सहा ते सात पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. उष्ण हवामानामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आजार नियंत्रणात येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असताना गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही. त्यातच मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजार वाढत असल्याचे स्पष्ट झाले. काही जिल्ह्यांत दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे.

११ महिन्यांचे बालक व्हेंटिलेटरवर

काही दिवसांपासून स्वाइन फ्लू वॉर्डात एक ११ महिन्यांचे बाळ व्हेंटिलेटरवर असून, स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे समजते. याशिवाय व्हेंटिलेटवरील पाच रुग्णही कमी अधिक प्रमाणात गंभीर असल्याचे समजते. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यापासून उपचार घेणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाला मंगळवारी प्रकृती सुधारल्यामुळे सुटी देण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

स्वाइन फ्लू वॉर्डासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याबाबत जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी माहिती मागवली. घाटी प्रशासनाकडून त्यांना लोशन, मास्क, व्हेंटिलेटर ट्यूब आदी साहित्याची गरज असल्याचे कळविण्यात आले आहे.

पाऊस किंवा पावसाळी दमट हवामान 'स्वाइन फ्लू'साठी पोषक आहे. पाऊस पडून गेल्यानंतरही आठ ते दहा दिवस त्याचा परिणाम राहू शकतो. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत तरी 'स्वाइन फ्लू'चे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाटत नाही.

- डॉ. मंगला बोरकर, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी

आतापर्यंत वॉर्डात दाखल झालेले रुग्ण ९२

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०

'स्वाइन फ्लू'ने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण १०

घाटीत रोज येणारे संशयित रुग्ण ३ ते ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत आपचे एकला चलो रे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवल्यामुळे आम आदमी पक्ष आता स्थानिक निवडणुकांमध्येही आपला जोर लावणार आहे. नवी मुंबईसह औरंगाबाद तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांसोबत युती करायची की निवडणुकांना स्वतंत्र सामोरे जायचे, याबाबत येत्या आठवड्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या वतिने काम सुरू करण्यात आले आहे, मात्र या निवडणुकीमध्ये पक्ष स्वतंत्र लढणार की समविचारी पक्षासोबत युती करणार या संदर्भात पक्षाची १४ किंवा १५ मार्च रोजी पुणे येथे बैठक घेण्यात येणार आहे. याच बैठकीमध्ये नवी मुंबई तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे. ज्या ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या ठिकणी पक्षाचे किती बळ आहे याचाही विचार करण्यात येणार आहे.

सुशिक्षितांसोबत करणार चर्चा

आम आदमी पार्टी औरंगाबादसह राज्यातील ‌इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विविध पर्यायावर विचार करणार आहे. शहरातील प्रमुख नागरिक, प्राध्यापक, निवृत्त अधिकारी आदी नागरिकांसोबत आम आदमी पार्टी निवडणुकांबाबत चर्चा करून किंवा त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याबाबतच्या पर्यायावरही विचार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त व्हेंट‌िलेटरसह स्वाईन फ्लूचा मुकाबला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष उघडण्यात आला आहे. परंतु, या कक्षातील व्हेंट‌िलेटर नादुरुस्त आहे. या यंत्रासाठी तंत्रज्ञही नसल्यामुळे हा कक्ष फक्त शोभेचा बनला आहे.

स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांसाठी चार खाटांचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात औषधी व सलाईन उपलब्ध आहे. परंतु, अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक असलेले व्हेंट‌िलेटर वापरता येण्याची शक्यता नाही. सेंसर खराब झाल्याने व्हेंट‌िलेटर नादुरूस्त आहे. हे यंत्र चालविण्यासाठी रुग्णालयात कुशल तंत्रज्ञही नाही.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वाईन फ्लू झाल्यास उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ प्राथमोपचार करावेत, असे निर्देश राज्य सरकारचे दिले आहेत. त्यानुसार वेगळ्या कक्षाची व्यवस्था करण्यात आली. येथे स्वाईन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गोळ्या, औषधी, सलाईन आदी साहित्य मुबलक आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण रामटेके यांनी दिली. स्वाईन फ्लूवर मात करण्यासाठी घेण्याच्या काळजीबद्दल धन्वंतरी मेडिकल असोशिएनच्या सहकार्याने डॉक्टरांसाठी जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. व्हेंट‌िलेटर नादुरुस्त असल्याची अडचण असल्याचे त्यांनी मान्य केले.

स्वाईन फ्लूच्या साथीवर मात करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. व्हेंट‌िलेटर मशीन बंद आहे. ते दुरुस्त करण्याबद्दल वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे.

डॉ. भूषण रामटेके, वैद्यकीय अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद शहर तारमुक्त करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर तारमुक्त करण्यासाठी ही योजना एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या (आयपीडीएस) माध्यमातून राबवण्याची सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत औरंगाबाद शहर तारमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी आमदार चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार चव्हाण यांनी तारांमुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची माहिती दिली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर वीजेचे खांब हे अडथळे ठरत आहेत. विद्युत खांब, गल्लीबोळांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही नागरिकांना जीव गमवावा लागला. पावसाळ्यात विद्युत तारांवर कोसळणाऱ्या झाडांमुळे तसेच शॉर्टसर्किटमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सतत घडत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करुन शहरात भूमिगत वायरिंग करणे गरजेचे आहे. यासंदर्भात २४० कोटींचा प्रस्तावही औरंगाबाद महावितरण कार्यालयामार्फत राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिली. चर्चेनंतर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात महावितरणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही योजना आयपीडीएस योजनेतून राबवण्याची सूचना केली.

वेरुळ येथे सौर ऊर्जा प्रकल्प

वेरुळ येथे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी यावेळी केली. राज्यात ज्या ठिकाणी नापिक जमीन उपलब्ध झाली त्या ठिकाणी शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा विभागाने सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. वेरुळ परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी नापिक जमीन उपलब्ध होऊ शकते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्प येऊ घातला आहे. या प्रकल्पामुळे वीजेची मागणी जास्त प्रमाणात होणार आहे. वेरुळ येथे दहा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास औरंगाबाद शहर, शेंद्रा, वाळूज येथील उद्योगधंद्यासाठी सदरील उत्पादित झालेल्या ऊर्जाचा उपयोग होईल, असे आमदार चव्हाण यांनी ऊर्जा मंत्र्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक शीतपेयांच्या विल्हेवाटीचा मुद्दा गाजणार

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

एक्सपायर्ड शीतपेयाची विल्हेवाट तीसगाव ग्राम पंचायत हद्दीत होत असल्याच्या वृत्ताची ग्रामपंचायतीने गांभिर्याने दखल घेतली आहे. उद्या (१२ मार्च रोजी) होणार्या ग्रामसभेत याबाबत सविस्तर चर्चा करून कारवाईचे धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

सिडको वाळूज महानगर परिसरातील तीसगाव शिवारात एका शेतामध्ये एक्सपायर्ड झालेल्या शीतपेयाच्या बाटल्या रिकाम्या करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यात एक्सपायर्ड शीतपेय एका टाकीत टाकून ते शेतात सोडण्यात येते. या प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी हे जमिनीस हानीकारक आहे. त्यामुळे जमीनीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. नियमानुसार शीतपेयातील पाणी हे एसटीईपी प्लॅनमध्ये शुद्धीकरणासाठी सोडणे बंधनकारक असतानाही नियम धाब्यावर बसवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या बाबतचे वृत्त म.टा.ने प्रसिद्ध केल्यानंतर तीसगाव ग्रामपंचायतीने याबाबत कडक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. परिसरात अशाप्रकारे व्यवसाय सुरू होत असेल तर त्याला तीसगाव ग्रामपंचायत सहकार्य करणार नसल्याची भूमिका मांडली आहे.

हा विषय ग्रामपंचायतीने गांभिर्यांने घेण्याचा निणर्य घेतला आहे. तीसगाव परिसरातील नैसर्गिकतेला बाधा पोहचू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सिडकोच्या कचारा डेपोला विरोध केला आहे. त्यामुळे निसर्गाला बाधा पोहचविणार्या अशा प्रकारच्या उद्योगांना ग्रामपंचायत थारा देणार नाही. उद्याच्या ग्रामसभेत हा विषय मांडण्यात येणार असून त्यावर ग्रामस्थांच्या समक्ष तोडगा काढण्यात येणार आहे. तसेच संबंधितांकडे याबाबतचा अधिकृत परवाना तसेच ग्रामपंचायतीचा नाहरकत परवाना आहे की नाही याची तपासणी करण्यात येईल.

- अंजन साळवे, सरपंच, तीसगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेने रोखले पेमेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्रशासनाने स्मशानजोगींचे पेमेंट रोखल्यामुळे मोफत अंत्यसंस्कार योजना पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. 'स्मशानजोगींचे पेमेंट करण्याची ताकद पालिकेत नसेल तर मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी जाहीर करावे, असे आव्हानच या योजनेचे प्रणेते उपमहापौर संजय जोशी यांनी दिले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन वर्षांपूर्वी उपमहापौर संजय जोशी यांच्या पुढाकाराने महापालिकेने मोफत अंत्यसंस्कार योजना जाहीर केली. पालिकेच्या क्षेत्रात ३४ स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीत काम करणाऱ्या स्मशानजोगींना महापालिकेतर्फे दर आठवड्याला किती अंत्यसंस्कार झाले, त्या हिशेबाने पेमेंट केले जाते. स्मशानजोगी लाकडे विकणाऱ्यांकडून लाकडे खरेदी करतात. पालिकेकडून पेमेंट मिळाल्यावर लाकडाच्या व्यापाऱ्यांचे पैसे स्मशानजोगी देतात. याशिवाय स्मशानभूमीतील अन्य सुविधा देखील त्यांना कराव्या लागतात. पालिकेच्या प्रशासनाने नऊ आठवड्यांपासून स्मशानजोगींचे पेमेंटच केलेले नाही. त्यामुळे १४ लाख रुपये पालिकेच्या प्रशासनाकडे थकले आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील पालिकेच्या लेखा विभागाने स्मशानजोगींचे पेमेंट काढले नाही.

'रस्त्यांसह अन्य अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला स्मशानजोगींचे पेमेंट करता येत नसेल, तर आयुक्तांनी ही योजना बंद करण्यात येत असल्याची घोषणा करावी,' असे आव्हान उपमहापौर संजय जोशी यांनी दिले आहे. 'स्मशानजोगींचा काहीही दोष नसताना केवळ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे मोफत अंत्यसंस्कार योजनेला ग्रहण लागू लागले आहे. ही बाब भूषणावह नाही,' असे जोशी यांनी स्पष्ट केले.

स्मशानजोगी अधिकाऱ्यांशी 'अर्थपूर्ण' व्यवहार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे पेमेंट रोखण्यात येत आहे. मोफत अंत्यसंस्कार योजना समाजिक भावनेतून सुरू करण्यात आली आहे. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- संजय जोशी, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरांतील शाळांची तपासणीत पोलखोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाने शाळांच्या तपासणीला बुधवारी (११ मार्च) सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी शिक्षण विभागाच्या विविध पथकांनी ८२ शाळांनी भेटी देत पाहणी केली. यापैकी तब्बल ९० शाळांमध्ये शुल्कवाढ आहे, तर बहुतांशी शाळांमध्ये नेमण्यात आलेला पालक-शिक्षक संघच नियमाला धरून नसल्याचे समोर आले आहे. यासह भौतिक सुविधांच्या नावानेही बोबांबोंब आहे.

शिक्षण विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवित शहरातील शाळांनी शुल्कवाढ, रितसर पावती न देणे, कँटींनची सक्ती करणे अशी मनमानी केली आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकत शाळांची बनवेगिरी उजेडात आणली. यानंतर शिक्षण विभागाने तब्बल १४८ विविध पथके तयार करत शाळांची तपासणी सुरू केली. बुधवार व गुरुवारी असे दोन दिवस ही तपासणी करण्यात येणार आहे. पथकांमध्ये उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. बुधवारी विविध पथकांनी तब्बल ८२ शाळांना भेट देत पाहणी केली, शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केली. तर उर्वरित शाळांची तपासणी गुरुवारी करण्यात येणार आहे. भेट दिलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सर्वाधिक संख्या आहे. यातील अनेक शाळांमध्ये शुल्कवाढ ही नियमाला केराची टोपली दाखवित करण्यात आली तर अनेक शाळांमध्ये 'पालक-शिक्षक संघ' नियमाला धरून नाही. यासह अनेक शाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. अनेक शाळांनी मान्यता, संच मान्यताची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही. अशा शाळांच्या कागदपत्राची छाननी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.

शाळांच्या तपासणीत अनियमितता मोठ्या प्रमाणात आढळली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून पूर्ण तपासणी झाल्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल व तसा अहवालही शासनाकडे पाठविण्यात येईल.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ल्यातील संशयित पोलिसांना सापडेना

$
0
0

औरंगाबाद : एका ४५ वर्षीय व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य संशयितला पकडण्यास छावणी पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. खुलताबाद येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण प्रकरणाच्या वादातून २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादीवर हल्ला झाला होता.

सलीमउद्दीन चिस्ती (वय ४५, रा. बाजारगल्ली, खुलताबाद) असे फिर्यादीचे नाव आहे. ते २५ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता दुचाकीवरून जात असतानाच मिटमिटा येथील उज्वला ढाब्याजवळ एका कारने दुचाकीला धडक दिली, त्यांना हॉकीस्टिकने बेदम मारहाण करत जखमी केले, अशी तक्रार ६ मार्च रोजी छावणी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी कैसर जहिरोद्दिन, शरफोद्दिन रमजानी, शब्बीर अमिरोद्दिन, निसार आफीसद्दिन, नाजेर आफीसद्दिन (सर्व रा. खुलताबाद) या पाचजंणाना शनिवारी (७ मार्च) अटक केली. परंतू मुख्य संशयित आरोपी मुस्तफा फारुखी (रा. कटकटगेट) पोलिसांना अद्याप सापडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या तावडीतून पळालेला पिंपळे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यातून निसटलेला कुख्यात गुन्हेगार ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे याला मंगळवारी (१० मार्च) पहाटे अहमदनगर पोलिसांनी श्रीरामपूर भागात पकडले आहे. त्याला न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. औरंगाबादहून पसार झाल्यानंतर पिंपळेने शिर्डीत गोळीबार केला होता.

श्रीरामपूरात दरोडा टाकल्याप्रकरणी पिंपळेसह त्याच्या अन्य साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पिंपळे व त्याच्या साथीदारांना हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कामकाजासाठी त्याला २४ डिसेंबर २०१३ रोजी राहाता येथे नेले होते. ही जबाबादारी औरंगाबाद पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, पोलिस शिपाई विश्वास निकम आणि सुनील प्रधान यांच्यावर होती. या पोलिसांनी पिंपळेला व्हीआयपी वागणूक देत बसऐवजी खासगी वाहनाचा वापर केला. कोर्टातील पेशीनंतर शहरात आल्यानंतर खासगी वाहनाने त्याला चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत नेण्यात आले होते. तेथे कुटूंबियांना भेटतो असे सांगून पिंपळे पसार झाला होता.

पोलिस बडतर्फ

पिंपळे पळून गेल्यानंतर तत्कालीन उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी चौकशी करून तिन्ही पोलिसांना निलंबित केले होते. सध्या या तिन्ही कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू पंजाब हॉटेलात पंधरा हजारांची चोरी

$
0
0

औरंगाबादः रेल्वे स्टेशन रोडवरील न्यू पंजाब हॉटेलमधून एका ग्राहकाचा मोबाइलसह एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू जगताप (वय २८) हे कामानिमित्त शहरात आले असता न्यू पंजाब हॉटेलमधील रुम नंबर २३मध्ये थांबले होते. रुमचा दरवाज उघडा ठेऊन अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले असताना ही चोरी झाली.

संशयित आरोपी गजाआड

औरंगाबादः चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयित आरोपीस वाळूज पोलिसांनी तुर्काबाद शिवारात मंगळवारी (११ मार्च) रात्री दीड वाजता पकडले. बाळू शिवराम भोसले (वय ४४, रा. गोदगाव, तालुका वैजापूर), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतमातानगरातून दुचाकी लंपास

औरंगाबादः भारतमाता नगरातून चोरट्याने छगन पारडे यांची दुचाकी (एम.एच. २०, बी.डी ३४१६) सोमवारी (९ मार्च) सायंकाळी पाच वाजता पळवली. त्यांनी दुचाकी घरासमोर पार्क केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळकर समितीच्या शिफारशीवर राज्यपालांना अहवाल पाठवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न राज्याच्या इतर भागांपेक्षा कमी आहे. या भागात शिक्षण, आरोग्य, अवर्षणासारखे प्रश्न आहेत. त्या तुलनेत मराठवाड्याला केळकर समितीच्या शिफारशींमध्ये कमी महत्व दिले आहे, या शिफारशींमध्ये मराठवाड्याच्या हिताचे काय मुद्दे असावेत, याबाबत अहवाल तयार करून राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे.

मराठवाडा विकास मंडळाची सर्वसाधारण सभा विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात मंगळवारी (१० मार्च) घेण्यात आली. यावेळी मंडळाचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी विक्रम कुमार, सदस्य डॉ.डी.एस. लोहिया, प्रा. विजय दिवाण, मुकूंद कुलकर्णी, शांताराम पंदेरे, प्रदीप पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत समितीच्या शिफारशींवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. राज्याच्या इतर भागांचा विचार करता मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न, संपर्क क्षमता, शिक्षण, आरोग्य, पतपुरवठा व वीज पुरवठा या विकासाच्या पाच महत्वाच्या क्षेत्रामध्ये असलेली तूट तसेच कृषी विकास आराखडा, एकात्मिक राज्य जल आराखडा या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. मंडळाकरीता असलेल्या विषेश निधीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सिंचन क्षेत्रातील पाण्याचा वापर कसा करावा, त्याचे निकष काय असावेत, पाण्याच्या कार्यक्षम वापरावर भर, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबरोबरच त्यांना पीक उत्पादनातून जास्त पैसा कसा मिळेल याचा विचार होणे आवश्यक आहे, देशभरातील एकूण धरणांपैकी राज्यात ४० टक्के धरणे आहेत. त्यासाठी जलधोरण नियोजनबद्ध असावे, असे डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. एप्रिल महिन्यांत मराठवाड्याच्या हिताच्या मुद्द्यांवर तयार करण्यात आलेल्या अहवालाला बैठकीमध्ये मंजूरी देण्यात येईल व त्यानंतर हा अहवाल राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीतील आरोपींना वाचविण्याची धडपड?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद, कन्नड

दहावी परीक्षेत मंगळवारी झालेल्या बीजगणिताच्या पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठ, बोर्ड कॉपी कायद्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कायद्यातील कलम सहा नुसार गुन्हा दाखल करणे पोलिसांकडून अपेक्षित होते, पण त्यांनी दुसऱ्याच कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 'एफआयआर'च्या नोंदीवर अधिक बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. कलम व नोंदीबाबत पाळली जात असलेली गोपनियता, यामुळे गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेबद्दलच संभ्रम आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड असल्याची चर्चा आहे.

कन्नड येथील न्यू हायस्कूल केंद्रावर मंगळवारी गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच उत्तरपत्रिका तयार करताना सचिन शिवाजी भामरे, राजेंद्र चिंधा वाणी, संतोष दादासाहेब गायके व अरूण भिकनराव सोनवणे या शिक्षकांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी एस. पी. दाभाडे यांचा शोध सुरू आहे. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजता घडला, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी नऊ तासांपेक्षा अधिक वेळ घेतला. ज्या कलमांद्वारे गुन्हा नोंदविण्यात आला, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कलम सातनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याबद्दल अतिशय गोपनियता पाळली जात आहे. कोणत्या वेळेमध्ये हा प्रकार घडला, एफआयआरच्या नोंदी न सांगणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे यामुळे आरोपींना वाचविण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, चारही आरोपींना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालप्रॅक्टिसेस कायद्यातील तरतूद

'दी महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिसेस अॅट युनिव्हर्सिटी, बोर्ड अँड ऑदर स्पेसिफाइड एक्झामिनेशन अॅक्ट-१९८२' कलम सहानुसार परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फोडणे, काही प्रश्न बाहेर आणणे यासाठी एक वर्षाची शिक्षा किंवा एक हजार दंड, अन्यथा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कायद्यातील कलम सात कलमनुसार कॉपी करताना आढळले तर शिक्षा केली जाते. या कलमाद्वारे विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते.

चौकशीत काही गोष्टी निष्पन्न झाल्या, तर त्याआधारे अतिरिक्त कलमही लावता येतात. परंतु घटनाक्रम पाहता आरोपींना वाचविण्यासाठी काही खास प्रयत्न होत असल्याचे नाकारता येत नाही.

अॅड. बी. एल. सगर किल्लारीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाखा अभियंत्यास लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंत्राटदाराचे बिल काढून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकतील शाखा अभियंता बाबुलाल गायकवाड यांना अँन्टी करप्शन ब्युरोने बुधवारी (११ मार्च) पकडले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कंत्राटदाराला ११ नोव्हेंबर २०१३ रोजी आसेफिया कॉलनीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम मिळाले होते. त्यांनी जानेवारी २०१५मध्ये काम पूर्ण केले. या कामाचे मोजमाप करून बिल तयार करण्याचे काम वॉर्ड अचे शाखा अभियंता बाबुलाल कचरू गायकवाड (वय ५५, रा. प्लॉट नंबर १७, नंदनवन कॉलनी) यांच्याकडे देण्यात आले होते. गायकवाड यांनी बिल मंजूर करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ३५ हजार रुपये घेतल्यानंतर मोजमाप केले. उर्वरित ८५ हजारासाठी टाळाटाळ केली जात होती. तडजोडीनंतर २० हजार रुपयांत बिल मंजूर करू असे सांगितले होते. तक्रारीनंतर भडकलगेट येथील एस. के. ऑटो वर्क्स येथे सायंकाळी साडेसहा वाजता तक्रारदारकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना गायकवाड यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक विवेक सराफ यांच्यासह पोलिस निरीक्षक निलेश बेसल, कर्मचारी अजय आवले, सचिन शिंदे आदींनी केली.

घरझडती सुरू

गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर नंदनवन कॉलनीतील घराची रात्री झडती घेतली जात आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरच्या झोन ऑफिसमध्ये राडा

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या क्रांत‌िचौक येथील झोन कार्यालयात बुधवारी (११ मार्च) सायंकाळी राडा झाल्याचे समजते. या घटनेनंतर वरिष्ठाच्या सूचनेनूसार कार्यालय रात्री उशिरापर्यंत कुलूप बंद होते. दुसरीकडे अशी कुठलेही घटना घडलेलीच नाही, कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे कार्यालय बंद आहे, असा दावा करण्यात आला.

समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम घेतलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे क्रांतीचौक परिसरात ग्राहक सेवा केंद्र आणि झोन कार्यालय आहे. बुधवारी सायकांळी चार ते साडेचारच्या दरम्यान झोन कार्यालयात काहीजणांनी गोंधळ घातला. त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी केल्याचे समजते. ही माहिती मिळाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली असता कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने तातडीने कार्यालयास कुलूप लावण्याचे निर्देश सुरक्षारक्षकांना दिले. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला, खिडकीची काच कशी फुटली, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.

वॉटर युटिलिटी कंपनीचे कानावर हात

झोन कार्यालयात काय घडले, याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही कंपनीचे अधिकारी शिवांगी यांनी कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. कर्मचारी कामानिमित्त बाहेर असल्याने कार्यालय बंद करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या बिल्डरला अडीच कोटींचा गंडा घालणारे त्रिकूट जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील गायरान जमीन स्वतःच्या मालकीचे आहे, असे भासवून मुंबईतील एका बिल्डरची अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (१० मार्च) अटक केली. हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना एका हॉटेलमध्ये पकडण्यात आले.

मिर्झा आरेफ बेग मुजीबउल्ला (वय ४१, रा.राहत कॉलनी), बब्बु मुल्ला उर्फ शेख बब्बु शेख करीम (वय ४८, रा. न्यु बायजीपूरा), सय्यद मीर शकील अली सय्यद नजीम अली (वय ३९, रा. कैसरकॉलनी), असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

हर्सूल येथील गट नंबर २१७ येथील १ एकर १२ गुंठे जमीन जवाहरलाल नेहरू पार्ट ट्रस्टमधील अग्निशमन अधिकारी अरुणकुमार राऊत यांच्याकडून २ कोटी ४० लाख रुपयांत खरेदी केली आहे, अशी बतावणी या त्रिकुटाने मुंबई येथील बिल्डर युनूस सत्तार शेख यास २०१४ मध्ये केली होती. हा भूखंड अडीच कोटी रुपयांना विकण्याची तयारी दाखवून अरुणकुमार राऊत यांच्याकडूनच खरेदीखत करून देऊ, अशी थाप मारली.

बिल्डरने २० मे २०१४ रोजी पाच लाख रुपये रोख आणि ५५ लाख रुपयांचा धनादेश, बीडबासपास येथील सुमारे ४० लाख रुपये किमंतीच्या दोन प्लॉटची कागदपत्रेही तिघांना दिली. ३० नोव्हेंबर रोजी एक कोटी ४० लाख रुपयांचा धनादेशही दिला. मोरे नावाच्या व्यक्तील दहा लाख रुपये देण्यास भाग पाडले. नोटरीनंतर खरेदीखत करून देत नसल्याने माहिती घेतल्यानंतर ही गायरान जमीन असल्याचे स्पष्ट झाले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात ८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे फरार होते. कोर्टाने या तिघांना १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अरुणकुमार राऊतवर दुसरा गुन्हा

अरुणकुमार राऊत याने गायरान जमिनीपैकी एक एकर ३० गुंठे जागेवर माजी सैनिक, माजी पोलिस कर्मचारी, मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यासाठी जनरल माणेक शॉ यांच्या नावे हाउसिंग सोसायटी स्थापन करणार असल्याची जाहिरात २००८ साली दिली होती. त्यात २५० जणांची फसवणूक झाल्याबद्दल आश्रुबा तात्याबा बोरगावकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा यापूर्वीच दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समांतरचे सर्वेक्षण पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २००० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी जागेचे सर्वेेक्षण पूर्ण केले आहे. पाइपसह अन्य महत्वाच्या वस्तुंच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरासाठीच्या समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात दहा दिवसांपूर्वी मुंबईत 'मातोश्री'वर बैठक झाली. समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात महापालिकेने ज्या कंपनी बरोबर करार केला आहे, त्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड या कंपनीचे प्रमुख सुभाष गोयल देखील या बैठकीला उपस्थित होते. जलवाहिनीचे काम लगेचच सुरू करण्याचा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार आता समांतर जलवाहिनी योजनेच्या अनुषंगाने विविध कामांना गती येत आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत टाकण्यात येणाऱ्या २००० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जागेचे सर्वेेक्षण कंपनीने पूर्ण केल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाइपलाईनसह अन्य महत्वपूर्ण साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने हायड्रॉलिक मॉडेल तयार केले असून त्याचा अंतिम डीपीआर (अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेला सादर केला आहे. नियुक्त करण्यात आलेल्या स्वतंत्र अभियंत्यालाही तो सादर करण्यात आला आहे. समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाचे काम एकाच वेळी विविध ठिकाणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने हेडवर्क, रॉ वॉटर पाईपलाईन, जल शुध्दीकरण केंद्र, ट्रीटेड वॉटर पाईपलाईन, मुख्य जलकुंभ, फिडर मुख्य जलवाहिनी, वितरण मुख्य जलवाहिनी, जलकुंभ आदींचा समावेश आहे. नव्याने ३४ जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्याशिवाय जलशुध्दीकरण केंद्रही बांधले जाणार आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे.

नवीन कनेक्शन सोबत मीटर

कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या नवीन नळ जोडणीसोबत आता पाण्याचे मीटर लावले जाणार आहे. त्यामुळे मीटरसह नळ कनेक्शन अशीच कार्यपध्दती येत्या काळात कंपनीतर्फे अवलंबिली जाणार आहे. दरम्यान शहरात आठ ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीतील मतभेद स्थानिक पातळीवर नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. या प्रकरणांचा कार्यकर्त्यांवर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा पातळीवरील नेते कामाला लागले आहेत. दिल्लीतील मतभेदात पडू नका, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवत कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशाचा आनंद काही काळ टिकत नाही तोच पक्षामध्ये रणकंदन माजले आहे. काही नेत्यांना पदावरून हटवण्यात येत आहे, तर काही नेते पक्ष सोडून जात आहेत. पारदर्शक प्रतिमा असलेल्या या पक्षामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत असतांना देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबादसह राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने तयारी करणे सुरू केले आहे, मात्र दिल्लीमधील गोंधळाच्या वातावरणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता तसेच मतदारांमध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम निवडणुकांमध्येही होईल. यामुळे ‌मराठवाडा विभागातील जिल्हास्तरावरील नेते कार्यकर्त्यांना दिल्लीतील मतभेदात न पडण्याचा संदेश देत आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकींमध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, मात्र दिल्लीतील वादाचा काही प्रमाणावर परिणाम शहरातील कार्यकर्त्यांवर होण्याचा अंदाज काही नेत्यांनी व्यक्त केला. आता महापालिका निवडणुकीची तयारी करत असताना पक्षाच्या वतीने विविध सर्वेक्षण तसेच पक्षाला जनाधार असलेल्या वार्डांमध्ये उमेदवार निवडीसाठी हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्याने संपवला पक्ष्यांचा मुक्काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक कंपन्यांचे विषारी पाणी नदीत सोडल्यामुळे पक्ष्यांसाठी आवश्यक जैविक परिसंस्था धोक्यात आली आहे. स्वच्छ पाण्यातील अन्नसाखळी खंडित झाली असून पक्ष्यांच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाला आहे. जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची गुणवत्ता ढासळल्यामुळे पक्ष्यांचा मुक्काम लवकर संपला आहे. पाणीसाठ्यांचे व नदीचे प्रदूषण पक्ष्यांना गंभीर इजा पोहचवत असल्याबाबत पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

जायकवाडी धरण, सुखना धरण आणि जलसाठ्यांवर दरवर्षी लाखो स्थलांतरित पक्षी चार महिने मुक्काम करतात. अनुकूल हवामान, विपूल खाद्य आणि गुणवत्तायुक्त पाण्यामुळे हा परिसर पक्ष्यांसाठी माहेरघर ठरला आहे; मात्र मागील काही वर्षांत जायकवाडीचे प्रदूषण वाढल्यामुळे पक्षी जीवन संकटात सापडले आहे. औरंगाबाद शहरातील सांडपाणी खाम नदीत सोडले जात आहे. तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीचे विषारी पाणी या नदीत सोडल्यामुळे जायकवाडी प्रकल्प दूषित झाला आहे. सांडपाणी व रसायनयुक्त पाणी जायकवाडी प्रकल्पात पोहचत असल्यामुळे 'इको-सिस्टीम' संपुष्टात आली आहे. पाण्याचे जडत्त्व वाढल्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी लाखो पक्षी जायकवाडी परिसरात येतात. सध्या प्रदूषित पाण्यामुळे धरणातील जीवजंतूंचे प्रमाण घटले आहे. ही अन्नसाखळी खंडित झाल्यामुळे पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. शिवाय स्वच्छ पाणीसाठे नसल्यामुळे पक्ष्यांच्या एकूण आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. 'पाणी प्रदूषणावर राजस्थानात अभ्यास करण्यात आला आहे. या धर्तीवर जायकवाडी प्रकल्पाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. दूषित पाण्याचा पक्ष्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. स्थलांतरित पक्ष्यांनी उशीरा येणे आणि लवकर जाणे यावरून बिकट परिस्थिती लक्षात येते' असे ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले.

बेटांचा अभ्यास

जायकवाडी प्रकल्पासाठी पैठण तालुक्यातील अनेक गावे संपादित झाली होती. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर यातील काही बुडित गावे दिसतात. या गावांचे आता बेट झाले असून या बेटांचा अभ्यास पक्षीमित्र करीत आहेत. या अभ्यासात पाण्याचा दर्जा, पक्ष्यांचा अधिवास आणि जैविक परिसंस्थेची नव्याने उकल होणार आहे.

पक्ष्यांच्या अधिवासासाठी स्वच्छ पाणीसाठे आणि नद्या आवश्यक असतात. दूषित पाणी पक्ष्यांसाठी धोकादायक ठरते. नैसर्गिक अन्नसाखळी टिकली तरच पक्षी टिकाव धरू शकतील. सद्यस्थितीत पक्ष्यांचा मुक्काम कमी झाला आहे.

- दिलीप यार्दी, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यातील दुष्काळी मदतीचे ६० कोटी गेले परत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

दुष्काळाची गडद छाया, खिशात दमडी नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्यांनी महाराष्ट्र हवालदिल झाला आहे. या खचल्या जीवांना उभारी देण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला, पण बीड जिल्ह्यात ६० कोटींचा दुष्काळी मदतनिधी लालफितीच्या कारभारामुळे परत गेला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व १,४०३ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. राज्य सरकारने अस्मानी संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून ३४५ कोटींची रक्कम मंजूर केली. यापैकी २८६ कोटी जिल्हा प्रशासनाला मिळाले. मात्र जिल्ह्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा संप सुरू झाला. त्यानंतर शेतकऱ्यांची खाते कुठे आहेत, त्यांच्या याद्या करणे यात वेळ गेला. अनेकांचे खातेच नसल्याने मदतीचे घोडे अडले. त्यामुळे उपलब्ध मदतनिधीचे संपूर्ण वाटप झालेच नाही

दुष्काळी मदत निधी आकस्मिक खर्च निधीतून मिळाला आहे. अखर्चित निधी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असल्याने परत करण्याचे आदेश आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुष्काळी मदतीसाठी आलेले ६० कोटी रुपये सरेंडर केले आहेत.

- भाऊसाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नांदेडः कोंढा येथील शेतकऱ्याने अर्धापूर कोर्टाच्या आवारात असलेल्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी नऊच्या सुमारास घडली. केशव दत्तराव कदम (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कदम यांना तीन एकर शेती आहे. त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. २०१२ मध्ये दिवाणी कोर्टात केशव व त्यांचे वडील दत्तराम कदम यांच्यातला वाद कोर्टात सुरू होता. सकाळी हा प्रकार घडला तेव्हा कोर्ट सुरू झाले नव्हते. कोर्टाच्या शिपायाला झाडलोटीचे काम करताना झाडला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली. केशव याच्या मागे तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्नही झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images