Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाळूपट्टा लिलावाकडे ठेकेदारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ४१ स्वतंत्र आणि २ संयुक्त वाळूपट्ट्यांच्या ई-ऑक्शन (लिलाव) प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरविली. ४३ पैकी केवळ ८ वाळूपट्ट्यांचाच लिलाव झाला असून उर्वरित वाळूपट्ट्यांसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया प्रशासनाला काढाव्या लागणार आहेत.

गेल्यावर्षीही ई ऑक्शन प्रक्रीयेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली होती, तीच परंपरा यावर्षीही पहावयास मिळाली. जिल्हा प्रशासनाने नदीपात्रातील वाळूउपसा करण्यासाठी वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात ४१ स्वतंत्र आणि २ संयुक्त वाळूपट्ट्यांसाठी ई-ऑक्शन प्रक्रिया राबवण्यात आली. यात ९ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले, मात्र लिलावाचे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पुन्हा लिलाव प्रक्रीया राबविली. या प्रक्रियेत पूर्वी लिलाव झालेल्या वाळूपट्ट्यांमधील वैजापूर तालुक्यातील भालगाव येथील वाळूपट्टा वगळता इतर ८ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले. या सर्व वाळूपट्ट्यांची सरकारी किंमत १ कोटी २७ लाख रुपये होती. लिलावात २ कोटी २३ लाख रक्कम प्राप्त झाली. उर्वरित ३५ स्वतंत्र आणि २ संयुक्त वाळूपट्ट्यांसाठी पुन्हा ई ऑक्शन प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

वाळूपट्ट्यातून १४ कोटी अपेक्षित

१४ कोटी ३८ लाख अपेक्षित किंमतजिल्ह्यातील ४१ स्वतंत्र वाळूपट्ट्यांसाठी ८ कोटी ८० लाख आणि २ संयुक्त वाळूपट्ट्यांसाठी ५ कोटी ५७ लाख रूपये अपेक्षित सरकारी किंमत ठरविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ ८ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले आहेत. लिलावात गेलेल्या वाळूपट्ट्यांमधून वाळू उपसा करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत आहे. त्यामुळे अवघ्या ६ महिन्यांसाठी ठेकेदार हे वाळूपट्टे घेतील का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाळूपट्टा लिलावात मिळालेली रक्कम

वाघाडी (ता. पैठण) ७७,९०,३२०

पूरणगाव (ता. वैजापूर) ३५,४२,७९६

कोटनांद्रा (ता. सिल्लोड) २,१५,७८२०

मोढा खु (ता. सिल्लोड) ३१,४५,४२०

सावखेडा (ता. सिल्लोड) १०,४६,३००

चिंचखेडा (ता. सिल्लोड) ३०,१५,४२०

पिंपळगाव (ता. फुलंब्री) ६,२६,५०४

भालगाव (ता. फुलंब्री) १०,०३,५८०

एकूण २२३२८१६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानाच्या ३४१ कोटींची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे दुष्काळामुळे पीक गेले तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा सततचा होत असलेला मारा यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शासनाने आतापर्यंत २ टप्प्यांत १६९१ कोटी रुपयांचा निधी वाटप केले असला तरी विभागात अद्यापही ३४१ .१६ कोटी रुपयांची प्रतिक्षा आहे.

शासनाने घोषित केलेल्या २०३२.६६ कोटी रुपयांच्या खरीप अनुदानापैकी विभागामधील २३ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना प्रशासनाकडून १६९१.५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आता ३४१.४४ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्यात शासनाने दोन टप्प्यांत खरीप अनुदानाची रक्कम दिली आहे, परंतु बँक खात्यांच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान उशीराने प्राप्त झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेचे खाते तसेच संमत्तीपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले. पहिल्या टप्प्यामध्ये ८४५.५५ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ८४५.९५ कोटी रुपयांची अनुदान रक्कम दिली होती. त्यानुसार ६ हजार ७२० बाधित गावांमधील सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

दुष्काळी मराठवाड्यामध्ये हातची पिके गेल्यामुळे हैराण असलेला शेतकरी सरकारने दिलेल्या अनुदानाकडे डोळे लाऊन बसला असतानाच अवकाळीचा फटका बसला. गहू, आंबा, हरभरा या पिकांचे अवकाळीच्या फटक्यामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आणखीच हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्याभरामध्ये झालेल्या पावसाची काही तालुक्यामध्ये नुकसानीची टक्केवारी ५० टक्यांपेक्षा अधिक आहे. अशा गावांची नुकसानीची आकडेवारी काढण्याचे काम महसूल विभागाच्या वतीने सुरू असून नियमाप्रमाणे या गावातील शेतकऱ्यांनाही वेगळ्या निधीचे वाटप करावे लागणार आहे. खरीपासाठी शासनाने दोन टप्प्यांमध्ये दिलेले अनुदानाचे वाटप काम पूर्ण झाले असून आता ३४१ कोटी रुपयांच्या शिल्लक अनुदाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

जिल्हानिहाय अनुदान

जिल्हा अनुदानाची प्रतिक्षा

(रक्कम कोटीत)

औरंगाबाद ४८.४८

जालना ४९.८८

परभणी ३८.४१

हिंगोली २२.०६

नांदेड ५३.७८

बीड ५८.०५

लातूर ४१.०६

उस्मानाबाद २९.४४

एकूण ३४१.१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करून गॅस सिलिंडरची चोरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको भागातील शिवाजीनगर परिसरात पुतण्याच्या लग्नाला गेलेल्या एका कुटुंबियाच्या घरातून दोन हजार रुपये आणि एक गॅस सिलिंडरची चोरी केल्याची घटना सिडको पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागात राहणारे सुहास वैद्य हे २७ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान हैदराबाद येथे पुतण्याच्या लग्णासाठी गेले होते. २७ फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात कोणतरी अज्ञात व्यक्तीने सुहास वैद्य यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात ठेवलेले दोन हजार रुपये आणि भारत गॅस कंपनीचे २५०० रूपये किंमतीचे गॅस सिलिंंडर चोरून नेले. या प्रकरणात सुहास वैद्य यांनी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी जरारे हे करीत आहेत.

हॉटेलच्या वेटरकडून मारहाण

पगाराचे पैसे मागण्यासाठी हॉटेल नैैवेद्य मध्ये गेलेल्या राजेंद्र आव्हाळे यास तीन वेटरनी मारहाण केली. राजेंद्र आव्हाळे यांनी सिडको पोल‌िस ठाण्यात तक्रारीनुसार, १४ मार्च रोजी कामाचे पैसे मागण्यासाठी दुपारी गेला होता. या ठिकाणी भक्त बंधू पाठी, विजय व बाळा या तिघांनी पैसे मागण्यासाठी का आला असे विचारुन लाथाबुक्याने मारहाण केली.

तीन हजारांची दारू जप्त

एमआयटी कॉलेज येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिनेश रमंडवाल याला अवैधरित्या दारू विकताना पकडले. त्याच्याकडून ३ हजार १३८ रूपये किंमतीच्या दारुच्या ९६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाच्या धडकेने मृत्यू

गंगापूरला जाणाऱ्या मोटारसायकला इसारवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेख हुसेन शेख करीम हे ठार झाले. त्यांच्यासोबतचे बाळकृष्णा सोनवणे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतोष घुनावत यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनधारकाविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाळूजमधून वृद्धा बेपत्ता

वाळूज येथील साठेनगरमधील मालनबाई हरिश्चंद्र आठवले (वय ७८) या वेडाच्या भरात १३ मार्च रोजी घरातून निघून गेल्याची तक्रार वाळूज पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यांचा रंग सावळा, नाक दबके, अंगात सुती पिवळ्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज, पायात काळ्या रंगाची चप्पल, काळी टिकली लावली आहे. या वर्णनाची महिला आढळल्यास वाळूज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाँटेड अटकेत

क्रांतीचौक पोलिसांना एका गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून वाँटेड असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संदीप प्रकाश राठोड (वय २२, रा. मुुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी मुुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजाऱ्याने दुचाकी जाळल्याचा संशय

$
0
0

साताराः शेजाऱ्यासोबत जागेवरून वाद झाल्याने साताऱ्यातील सत्संग सोसायटीत रविवारी (१५ मार्च) पहाटे एक मोटारसायकल जाळण्यात आली. अंबादास मारुती मुळे (वय ३८) यांनी रात्री घरासमोर मोटारसायकल (एम. एच. २०, सी. झेड. ८८९५) उभी केली होती. ती रविवारी पहाटे जाळल्यामुळे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुळे यांचा जागेवरून अनेक दिवसांपासून शेजाऱ्यासोबत वाद चालू आहे. या वादातून शेजाऱ्यानेच मोटारसायकल जाळल्याची तक्रार त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्ल‌िम आरक्षणासाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्लिम समाजे पाच टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम आरक्षण कृती समितीतर्फे पैठण गेट येथे शनिवारी (१४ मार्च) निर्दशने करण्यात आली. तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने सहा महिन्यांत विधेयक मांडले नाही. त्यामुळे हे आरक्षण रद्द झाले आहे. याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शकांनी न्यायालयाने शैक्षणिक आरक्षणाला मंजुरी दिली होती, याकडे लक्ष वेधले. परंतु, सरकाने विधेयत न मांडल्याने नोकरी व शैक्षणिक दोन्ही आरक्षणाला समाज मुकला आहे, याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मुस्लीिम समाजातील ४७ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेख बब्बु शफिक, सय्यद अजीम इस्माईल, अब्दुल मोहीब, फिरोज खान, जफर कुरेशी, शेख मुश्ताक, परवेज खान, शेख शहानवाज, के. ए. पठाण, शेख शोएब यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळक पथच्या व्यापाऱ्यास टोळक्याकडून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टिळकपथावर चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या एका बुटाच्या दुकानात रविवारी (१५ मार्च) दुपारी सात- आठ जणांची एक टोळी आणि दुकानदारात वादावादी झाली. त्यानंतर काही तरुणांनी दुकानमालकाला मारहाण केली आहे.

पैठणगेटजवळील टिळकपथवरील न्यू लुक या बुटाच्या दुकानात दुपारी दहा ते बारा जण अचानक घुसले. त्यांनी काही वेळ दुकानातील महमंद जैद अब्दुल मजीद यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत वाद वाढत गेला. त्यातून एकाने महमंद जैद यांच्या तोंडात मारली. त्यावरून भांडण चांगलेच पेटले. दुकानात मारहाण होत असल्याने शेजारच्या दुकानदारांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. काही व्यापाऱ्यांनी या टोळीने दुकानदाराला लाठ्या काठ्या व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत महमंद जैद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडेल’ प्राचार्याचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी घनसावंगीच्या मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांना पोलिसांनी अटक केली. विद्यापीठाने नेमलेल्या समितीने कॉलेजला भेट देत पाहणी केली. प्राचार्यपद स्वीकारण्याबाबतही विद्यापीठाकडून अनेकांना विचारणा झाली, परंतु अद्याप कोणी तयार झाले नाही. त्यामुळे या प्राचार्यावरील कारवाईबाबत प्रशासनाची मात्र भूमिका 'वेट अँड वॉच' अशीच आहे.

कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याप्रकारणी प्राचार्य डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच विद्यार्थिनीला केबिनमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर नागरिकांनी पाटील यांना मारहाण केली, यानंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतर विद्यापीठाने नेमलेल्या समितीने कॉलेजला भेट देत, घटनेचा आढावा घेतला. तसेच कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून काही प्राध्यापकांना विचारणा करण्यात आली. परंतु, या घटनेनंतर कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याचे त्यांनी नाकारले. इतर कोणतीही जबाबदारी द्या, आम्ही स्विकारतो. परंतु ही नको, अशा प्रकारची विनंती प्राध्यापक करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील तीन जाणांना याबाबत विचारणा करण्यात आली. प्रकरणाला पाच दिवस उलटल्यानंतरही विद्यापीठाने प्राचार्यांवर कारवाई केलेली नाही.

आढावा समितीचा आज अहवाल

या प्रकारानंतर घटनेचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तीन जणांची समिती नेमली. यात डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. एम.डी. सिरसाठ, डॉ. देवानंद शिंदे यांचा समावेश असून समितीने कॉलेजला भेट देत पाहणी केली. घटनेचा आढावा घेत, परिस्थितीबाबतचा अहवाल तयार केला असून ही समिती आपला अहवाल सोमवारी (१६ मार्च) कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक तडाखा औरंगाबादला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आहे. यामध्ये सर्वाधिक ४३. ८६ मिलिमीटर पाऊस एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झाला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

शनिवारी व रविवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १५.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जालना जिल्ह्यात ४.११, तर बीड जिल्ह्यामध्ये २ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात थंडीचा जोर कमी होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. फेब्रुवारी महिन्यामध्येही विभागातील निम्म्या तालुक्यामध्ये पाऊस झाला होता. सलग होत असलेल्या अवकाळी सरींमुळे रब्बीतील पिके व फळबागांना फटका बसला आहे. मराठवाड्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत १, २, ९, १०, ११, १२, १४ व १५ मार्च रोजी पावसाची नोंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ मार्च महिन्यांमध्ये ४३.८३ पावसाची नोंद करण्यात आली. जालना ३४.५९, परभणी २३.९७, हिंगोली ३८.०९, नांदेड २८.५३, बीड ३१.३३, लातूर १३.९० तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २१.७३ अशी एकूण पावसाची नोंद झाली. विभागामध्ये एकूण २९.५० सरासरी नोंदली गेली.

दोन दिवस पावसाचा अंदाज

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील सरासरी कमाल व किमान तापमानामध्ये घट झाली असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात सोमवारी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाचा तसेच हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भामध्ये मंगळवारीही पाऊस होण्याचा अंदाज असल्यामुळे लगत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

औरंगाबाद ४४.८० मिमी.

फुलंब्री ४५.८० मिमी.

पैठण २३.६० मिमी.

सिल्लोड ४८.१३ मिमी.

सोयगाव ४१.३३ मिमी.

वैजापूर ४३.७० मिमी.

गंगापूर ३८.७८ मिमी.

कन्नड ४९.८८ मिमी.

खुलताबाद ५९.०० मिमी.

एकूण ४३.८६ मिमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतनीकरणासाठी वर्षानुवर्षे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेत्रपेढीच्या परवाना नूतनीकरणासाठी चक्क वर्षानुवर्षे लागत असून, लालफितीच्या कारभाराचा फटका शहरातील नेत्रदानाला बसतो आहे. शहरातील 'दृष्टी आय बँके'ला तब्बल दीड वर्षानंतर परवाना मिळाला आहे, तर काही नेत्रपेढ्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे घाटीच्या नेत्रपेढीच्या परवान्याचे नूतनीकरणही झालेले नाही.

नेत्रदान आणि नेत्ररोपणासाठी नेत्रपेढीला परवाना लागतो आणि दर तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून नेत्रपेढ्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली असून, नेत्रपेढी चालकांना वारंवार खेटे मारूनही आरोग्य विभागाकडून दाद मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र कायम आहे. विविध कागदपत्रांच्या नावाखाली टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही अनेक नेत्रपेढी चालकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना केला. विशेष म्हणजे आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतरही प्रत्येक वेळी नवनवीन कागदपत्रे मागितली जातात आणि त्यामुळेच नेत्रपेढीचालक पुरते वैतागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत परवान्याचे नूतनीकरण होत नाही, तोपर्यंत नियमानुसार नेत्रदान व नेत्ररोपण केले जाऊ शकत नाही. याचा थेट परिणाम नेत्रदान चळवळीला बसला असून, शहरातील इच्छुकांना नेत्रदानासाठी शहरामध्ये फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच अनेकजण जालन्यातील गणपती नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्रदान करताना दिसून येत आहेत.

टोलवाटोलवी, अपमानास्पद वागणूक

शहरातील 'दृष्टी आय बँके'ने सप्टेंबर २०१३ मध्ये परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, तर मार्च २०१५ मध्ये परवाना प्राप्त झाला. परवान्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे मागितल्यानंतर त्या त्या वेळी देण्यात आली होती. मात्र तरीही आरोग्य विभागाकडून अपेक्षित सहकार्य कधीच मिळाले नसल्याचे समजते. या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते, अपमानास्पद वागळूक दिली जात असल्याचेही काही नेत्रपेढी चालकांनी 'मटा' सांगितले.

माझ्या नेत्रपेढीचा परवाना नूतनीकरण दीड वर्षानंतर झाले. सतत पाठपुरावा करूनही दाद मिळत नाही. त्यामुळे नेत्रदान व नेत्ररोपण करता येत नाही. अनेक नातेवाईकांची इच्छा असून परत पाठवावे लागते.

डॉ. सुनील कसबेकर, दृष्टी आय बँक.

परवाना नूतनीकरणाचे काम आरोग्य सचिवांकडून होते. शहरातील नेत्रपेढी चालकांचे अर्ज मुंबईला पाठवण्यात आले आहे. काहीवेळी कागदपत्रांची कमी राहिल्यास विलंब होऊ शकतो.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मी परवाना नूतनीकरणासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतो आहे. मात्र नूतनीकरण न झाल्यामुळे आता माझा उत्साह पूर्णपणे मावळला आहे.

- डॉ. संतोष अग्रवाल, नेत्रपेढीचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना-बीडला प्राधान्य; अन्य जिल्ह्यांना प्रतीक्षा

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

केंद्र सरकारने जालना व बीड जिल्ह्यांतील रस्त्यांसाठी भरभरून निधी दिला आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांनाही केंद्रीय रस्ते फंडातून (सीआरएफ) गरजेनुसार निधी मिळणे अपेक्षित आहे, मात्र उर्वरित सहा जिल्ह्यांच्या पदरी प्रतीक्षा पडली आहे.

आघाडीच्या सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याला निधीच न दिल्याने मराठवाड्यातील प्रमुख रस्ते उखडलेले आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते विकास खात्याकडून राज्यांना गरजेनुसार सीआरएफ अंतर्गत निधी दिला जातो. मराठवाड्यातून उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, लातूर जिल्ह्यांमधून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात.

या रस्त्यांचे मजबुतीकरण तसेच जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या रस्त्याच्या डागडुजीसाठी हा निधी उपयोगी पडतो. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील बीड व जालना जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांना सीआरएफमधून एक रुपयाही मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की चालू आर्थिक वर्षात बीड व जालना जिल्ह्यासाठीच निधी प्राप्त झाला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार ही रक्कम ८० कोटी आहे. वास्तविक गरज अन्य सहाही जिल्ह्यांमध्ये आहे, असे असताना दोन जिल्ह्यांनाच का प्राधान्य दिले गेले याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मराठवाड्यातील हे दोन जिल्हे आणि नागपूर या तिसऱ्या जिल्ह्यासाठी भरभरून निधी मिळाला आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांना आता पुढच्या आर्थिक वर्षावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचा अंदाज या सूत्रांनी व्यक्त केला.

रस्ते विकासासाठी नागपूर, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांनाच निधी दिला गेला. यासंदर्भात आम्ही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अन्य जिल्ह्यांनाही निधीची मागणी केली आहे. वास्तविक विशिष्ट जिल्ह्यांना निधी देणे चुकीचे आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. एप्रिलमध्ये निधी देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.

- चंद्रकांत खैरे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्च एंडला बँकांना सुट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडयातील पाच दिवस, या १० दिवसांच्या काळात केवळ अडीच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २७ मार्चपूर्वी बँकांतील कामे करावी लागतील. राष्ट्रीय व साप्ताहिक सुट्या, आर्थिक वर्षाचे क्लोजिंग यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

शनिवारी (२८ मार्च) श्रीरामनवमीची सुटी, तर २९ मार्च रोजी रविवारची साप्ताहिक सुटी आहे. त्यानंतर ३० व ३१ मार्चला बँका सुरू राहतील. १ एप्रिलला बँका सुरू असल्या तरी वार्षिक लेखापरीक्षणामुळे ग्राहकांची कामे मात्र होणार नाहीत. २ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुटी आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडेची सलग सुटी आहे. शनिवारी (४ एप्रिल) बँकेचे कामकाज अर्धा दिवस, तर ५ एप्रिलला रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद असतील.

बँका सलग बंद राहणार असल्याने मार्च महिन्याचा शेवटचा व एप्रिलचा पहिला आठवडाही याच कालावधीत येत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन जमा होण्यासही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांची सारी भिस्त प्लास्टिक मनीवरच असेल. त्यामुळे विविध दुकानांपासून ते मॉल पेट्रोल पंपांपर्यंत ऑनलाइन व्यवहार करावे लागणार आहेत. त्यासाठी एटीएम कार्ड, डेबिट कार्डचा वापर वाढणार असून, सुट्यांमध्ये बँका सुरू राहणार असल्याने एटीएमची सेवा सुरळीत राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले.

२७ पूर्वी करा व्यवहार

आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे बँकांमध्ये शेवटच्या आठवड्यात प्रचंड गर्दी असते. यावर्षी याकाळात केवळ दोनच दिवस बँका सुरू राहणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी करदाते किंवा विमा पॉलिसीधारकांनी २७ मार्च व्यवहार करणे योग्य ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’चे ८ मृत्यू कबूल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरामध्ये ''स्वाइन फ्लू'ने एकही मृत्यू झालेला नाही' असे सांगणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर शहरामध्ये ८ मृत्यू झाल्याचे कबूल केले. याच बैठकीत खुद्द खासदारांनीही जिल्हाभरात २१ मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांची स्क्रिनिंग करण्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेपर्यंत महापालिकेचे पाच सेंटर सुरू ठेवावे, असे आदेशही खासदारांनी याच बैठकीत देऊन टाकले.

'स्वाइन फ्लू'ची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्रकारांना घाटीतून रुग्णांची माहिती मिळू नये, यासाठी पूर्ण प्रयत्न तडीस नेले आणि त्याचवेळी पालिकेच्या आरोग्य विभागातूनही चुकीचे माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. घाटीमध्ये शनिवारी दोन स्वाइन फ्लूचे रुग्ण दगावल्याची माहिती मिळाल्यानंतर 'महाराष्ट्र टाइ्म्स'ने खात्री करण्यासाठी घाटीमध्ये संपर्क साधला असता, माहिती न देण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना विचारले असता, 'एकही स्वाइन फ्लूने मृत्यू नाही' असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दुसऱ्या बाजूला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांनी शनिवारी 'स्वाइन फ्लू'ने दोन रुग्ण दगावले असून, यातील एक रुग्ण शहरातील असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शासकीय यंत्रणांमुळे संभ्रमावस्था दिसून आली आणि माहिती दडवण्याचे पालिकेचे प्रयत्न स्पष्ट झाले. या विषयी खासदार खैरे यांनी रविवारी (१५ मार्च) सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर बोलावलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडले पडले. खासदारांनी सर्व माहिती घाटीच्या प्रशासनाकडून समोरासमोर घेतली आणि जिल्हाभरात दगावलेल्या २१ रुग्णांपैकी ८ रुग्ण शहरातील असल्याचे डॉ. जयश्री कुलकर्णी यांना खासदारांसमोर कबूल करावे लागले. त्याशिवाय आतापर्यंत जिल्हाभरात ५५ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी जाहीर केले.

आठ ते आठ स्क्रिनिंग करा

महापालिकेच्या केवळ पाच स्क्रिनिंग सेंटरवर दुपारी बारा-एकपर्यंतच 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांचे स्क्रिनिंग केले जाते, असे खासदारांसमोर उघड झाल्यानंतर खैरे यांनी, सकाळी आठ ते रात्री आठ असे रुग्णांचे स्क्रिनिंग करावे, असे आदेश डॉ. कुलकर्णी यांना तातडीने बैठकीत दिले. विशेष म्हणजे सर्व संबंधित रुग्णांची माहिती माध्यमांना उशिरापर्यंत द्या, असे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना खैरे यांनी दिले.

पाच मॉनिटरसाठी २० लाख

घाटीमध्ये 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांसाठी ६ व्हेंटिलेटर आहेत, पण १० मॉनिटरची गरज असल्याचे सांगितल्यानंतर डीपीसीतून ५ मॉनिटरसाठी २० लाख लवकरच देण्यात येतील आणि आठ दिवसांत ५ मॉनिटर घाटीला उपलब्ध होऊ शकतील, असेही आश्वासन बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण, घाटीच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावर भाजीपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीच्या बेसुमार प्रदूषणाने पिण्याच्या पाण्यासोबतच औरंगाबाद शहरात पोहचणाऱ्या भाजीपाल्यालाही बाधा पोहचली आहे. दूषित पाण्यावर पिकवलेला भाजीपाला आरोग्याला अपायकारक ठरला असून नागरिकांना गंभीर आजारांनी घेरले आहे. त्वचारोग, अकाली केस पिकणे, पोटाचे विकार या आजारांचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील सांडपाणी आणि वाळूज औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांच्या घातक रसायनांनी खाम नदी दूषित झाली आहे. या पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे ऑक्सीजनचे प्रमाण संपुष्टात आले आहे. सध्या खाम नदीकाठावरील शेतीत दूषित पाण्याचा सर्रास वापर सुरू आहे. अनेकदा केमिकलयुक्त पाणी खतासारखे लागू होत असल्यामुळे शेतकरी उत्पादन वाढीसाठी दूषित पाणी वापरतात, असे वळदगावच्या ग्रामस्थांनी सांगितले. उत्पादनात वाढ झाली असली तरी पाणी आरोग्याला अपायकारक असल्याने आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाम नदीकाठावरील गोलवाडी, वळदगाव, पंढरपूर, वाळूज, लांझी, रांजणगाव, सावखेडा या गावांतील शेतकरी दूषित पाणी वापरतात. पाण्याचा वापर भाजीपाला पिकासाठी होत असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती आहे. नदी आणि परिसराची पाहणी केल्यानंतर डॉ. किशोर पाठक यांनी निष्कर्ष मांडले आहेत. 'उगमापासून वाहणारी नदी विलीन होईपर्यंत शुद्ध होते असे म्हटले जात होते. कारण पाण्यात जलचर होते. सद्यस्थितीत खाम नदीत मासे, झिंगे, खेकडे नाहीत. तसेच शेवाळ, अल्गी, स्पायरोलीना या जलवनस्पतीही नाहीत. त्यामुळे पाणी शुद्ध होण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. दूषित पाणी शेतीत वापरल्यामुळे बेचव भाजीपाला पिकतो. या भाजीपाल्यात आरोग्यासाठी आवश्यक सत्त्व नसतात' असे डॉ. पाठक यांनी सांगितले. पाण्यात किटकनाशक आणि रसायनांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. दूषित पाण्यात जस्त, कॅडमियम, कोबाल्ट या घातक घटकांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. या पाण्यावर निघणारा भाजीपाला शहरात विक्रीसाठी आणला जातो. जिल्हाभरातून भाजीपाला उपलब्ध होतो; मात्र दूषित पाण्यावरील भाजीपाला ओळखणे शक्य नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

दूषित भाजीपाल्यामुळे आजार बळावले

दूषित पाण्यातील भाजीपाला आहारात घेतल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील अनेक रुग्ण तज्ज्ञांचा आरोग्यविषयक सल्ला घेत आहेत. प्रतिकारशक्ती कमी होणे हा मुख्य आजार आहे. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, त्वचारोग, खाज येणे, भूक मंदावणे आणि पचनाच्या आजारांचाही यात समावेश आहे. खाम नदीचे प्रदूषण नागरिकांच्या जीवावरही बेतले आहे.

दूषित पाणी जमिनीत पाझरत असल्यामुळे अनेक ठिकाणी विहीरीचे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. या पाण्याला वास आणि वेगळा रंग असून आरोग्यासाठी अपायकारक आहे. या पाण्यावर पिकणारा भाजीपाला खाणे धोकादायक आहे.

- डॉ. किशोर पाठक, पर्यावरण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाला खंडणी मागितली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रसिद्ध वकील नीलेश घाणेकर यांना २५ हजारांची खंडणी मागणाऱ्या एका महिला वकिलाला, मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (१५ मार्च) अटक केली. अॅड. स्मिता पाटील असे आरोपीचे नाव आहे.

अॅड. घाणेकर यांच्याकडे स्मिता पाटील या सहायक म्हणून काम करत होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांनी काम सोडले. काम सोडल्यानंतरही अॅड. पाटील यांनी वारंवार अॅड. घाणेकर यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. वारंवार पैसे वसूल केले. 'तुम्ही मला नोकरीवरून काढले. दुसरीकडे नोकरी मिळत नाही. तुम्ही माझे आयुष्य बरबाद केले. मी ३५ लाखांचा नवी फ्लॅट घेतला आहे. यासाठी तुम्ही पैसे द्या,' अशी मागणी अॅड. स्मिता करत होत्या. अॅड. घाणेकर यांना मोबाइलवर असे मेसेज त्या वारंवार पाठवत असत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा २५ हजारांची मागणी केली. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अॅड. घाणेकर यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा अॅड. स्मिता पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी कल्याण शेळके हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुखना’तही विषवल्ली

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

सुखना नदीही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्यामुळे मरणपंथाला टेकली आहे. 'खाम' प्रमाणेच या नदीचे पाणी मनुष्यासह, प्राण्यांच्या जीवाला अत्यंत घातक आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या पात्रात कंपन्यांतील रसायन मिश्रीत पाणी सोडले जाते. प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष आणि बेफिकीरी शहरवासीयांच्या जीवावर उठते आहे.

महाराष्ट्र टाइम्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या मदतीने सुखना नदीपात्रातील पाण्याची तपासणी केली. तेव्हा हे पाणी दूषितच असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल शनिवारी मिळाला. विविध कंपन्यांमधून प्रचंड प्रमाणात रसायनमिश्रीत पाणी पात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे आयुष्य संपले आहे. पाण्यात केमिकल ऑक्सिजनचे प्रमाण लिटरमागे १०० मिलिग्रॅम असते, ते सुखनात ८०० मिलिग्रॅम आहे. बॅक्टेरियाचे प्रमाण तब्बल २,४०० मिलिग्रॅम आहे. जे अत्यंत घातक आहे. आम्लाचे प्रमाण लिटरमागे ७.७७ मिलिग्रॅम एवढे आहे. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण लिटरमागे १२१ मिलिग्रॅम आहे. पाण्यातील गढूळता १,००० मिलिग्रॅम आहे. तर पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आहे. सुखनाच्या पाण्यात अत्यंत दूषित घटक सोडले जातात. हेच पाणी जमिनीत मुरते व परिसरातील बोअर, विहिरींमध्ये मिसळते.

आजार वाढले : सुखनातील दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पोटाचे गंभीर आजार, फुफ्फुस, त्वचारोग, संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

पाण्याचा निर्देशांक खामपेक्षा कमीच

खामपेक्षाही सुखनाच्या पाण्याचा निर्देशांक कमी आहे. बॅक्टेरिया, कार्बनडाय ऑक्साइड, ऑक्सिजन, गढूळता या निकषावर पाण्याचा निर्देशांक काढला जातो. ० ते २५च्या आत निर्देशांक असेल, तर पाणी सर्वात खराब समजले जाते. सुखनाच्या पाण्याचा निर्देशांक १५.९० एवढा आहे. त्यामुळे हे पाणी अत्यंत घातक आहे.

सुखना नदीतील पाण्याचा निर्देशांक खाम नदीपेक्षा कमी आहे. सुखनाही प्रचंड प्रमाणात दूषित आहे. यामध्ये प्राणी जिवंत राहतील ही शक्यताच नाही. माणसाच्या शरीरालाही अतिशय घातक असे रसायनिक द्रव्य या पाण्यात आहेत.

- डॉ. सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

नदीतील विषारी घटक

ऑक्सिजन ०

आम्ल ७.७७

बॅक्टेरिया २,४००

गढूळता १,०००

केमिकल ऑक्सिजन ८००

कार्बनडाय ऑक्साइड १२१

एक लिटरमधील प्रमाण मिलिग्रॅममध्ये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजाऱ्याने दुचाकी जाळल्याचा संशय

$
0
0

साताराः शेजाऱ्यासोबत जागेवरून वाद झाल्याने साताऱ्यातील सत्संग सोसायटीत रविवारी (१५ मार्च) पहाटे एक मोटारसायकल जाळण्यात आली. अंबादास मारुती मुळे (वय ३८) यांनी रात्री घरासमोर मोटारसायकल (एम. एच. २०, सी. झेड. ८८९५) उभी केली होती. ती रविवारी पहाटे जाळल्यामुळे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुळे यांचा जागेवरून अनेक दिवसांपासून शेजाऱ्यासोबत वाद चालू आहे. या वादातून शेजाऱ्यानेच मोटारसायकल जाळल्याची तक्रार त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्ल‌िम आरक्षणासाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्लिम समाजे पाच टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम आरक्षण कृती समितीतर्फे पैठण गेट येथे शनिवारी (१४ मार्च) निर्दशने करण्यात आली. तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने सहा महिन्यांत विधेयक मांडले नाही. त्यामुळे हे आरक्षण रद्द झाले आहे. याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शकांनी न्यायालयाने शैक्षणिक आरक्षणाला मंजुरी दिली होती, याकडे लक्ष वेधले. परंतु, सरकाने विधेयत न मांडल्याने नोकरी व शैक्षणिक दोन्ही आरक्षणाला समाज मुकला आहे, याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मुस्लीिम समाजातील ४७ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेख बब्बु शफिक, सय्यद अजीम इस्माईल, अब्दुल मोहीब, फिरोज खान, जफर कुरेशी, शेख मुश्ताक, परवेज खान, शेख शहानवाज, के. ए. पठाण, शेख शोएब यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळक पथच्या व्यापाऱ्यास टोळक्याकडून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टिळकपथावर चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या एका बुटाच्या दुकानात रविवारी (१५ मार्च) दुपारी सात- आठ जणांची एक टोळी आणि दुकानदारात वादावादी झाली. त्यानंतर काही तरुणांनी दुकानमालकाला मारहाण केली आहे.

पैठणगेटजवळील टिळकपथवरील न्यू लुक या बुटाच्या दुकानात दुपारी दहा ते बारा जण अचानक घुसले. त्यांनी काही वेळ दुकानातील महमंद जैद अब्दुल मजीद यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत वाद वाढत गेला. त्यातून एकाने महमंद जैद यांच्या तोंडात मारली. त्यावरून भांडण चांगलेच पेटले. दुकानात मारहाण होत असल्याने शेजारच्या दुकानदारांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. काही व्यापाऱ्यांनी या टोळीने दुकानदाराला लाठ्या काठ्या व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत महमंद जैद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडेल’ प्राचार्याचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी घनसावंगीच्या मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांना पोलिसांनी अटक केली. विद्यापीठाने नेमलेल्या समितीने कॉलेजला भेट देत पाहणी केली. प्राचार्यपद स्वीकारण्याबाबतही विद्यापीठाकडून अनेकांना विचारणा झाली, परंतु अद्याप कोणी तयार झाले नाही. त्यामुळे या प्राचार्यावरील कारवाईबाबत प्रशासनाची मात्र भूमिका 'वेट अँड वॉच' अशीच आहे.

कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याप्रकारणी प्राचार्य डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच विद्यार्थिनीला केबिनमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर नागरिकांनी पाटील यांना मारहाण केली, यानंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतर विद्यापीठाने नेमलेल्या समितीने कॉलेजला भेट देत, घटनेचा आढावा घेतला. तसेच कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून काही प्राध्यापकांना विचारणा करण्यात आली. परंतु, या घटनेनंतर कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारण्याचे त्यांनी नाकारले. इतर कोणतीही जबाबदारी द्या, आम्ही स्विकारतो. परंतु ही नको, अशा प्रकारची विनंती प्राध्यापक करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील तीन जाणांना याबाबत विचारणा करण्यात आली. प्रकरणाला पाच दिवस उलटल्यानंतरही विद्यापीठाने प्राचार्यांवर कारवाई केलेली नाही.

आढावा समितीचा आज अहवाल

या प्रकारानंतर घटनेचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तीन जणांची समिती नेमली. यात डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. एम.डी. सिरसाठ, डॉ. देवानंद शिंदे यांचा समावेश असून समितीने कॉलेजला भेट देत पाहणी केली. घटनेचा आढावा घेत, परिस्थितीबाबतचा अहवाल तयार केला असून ही समिती आपला अहवाल सोमवारी (१६ मार्च) कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक तडाखा औरंगाबादला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आहे. यामध्ये सर्वाधिक ४३. ८६ मिलिमीटर पाऊस एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झाला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

शनिवारी व रविवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १५.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जालना जिल्ह्यात ४.११, तर बीड जिल्ह्यामध्ये २ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात थंडीचा जोर कमी होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. फेब्रुवारी महिन्यामध्येही विभागातील निम्म्या तालुक्यामध्ये पाऊस झाला होता. सलग होत असलेल्या अवकाळी सरींमुळे रब्बीतील पिके व फळबागांना फटका बसला आहे. मराठवाड्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत १, २, ९, १०, ११, १२, १४ व १५ मार्च रोजी पावसाची नोंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ मार्च महिन्यांमध्ये ४३.८३ पावसाची नोंद करण्यात आली. जालना ३४.५९, परभणी २३.९७, हिंगोली ३८.०९, नांदेड २८.५३, बीड ३१.३३, लातूर १३.९० तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २१.७३ अशी एकूण पावसाची नोंद झाली. विभागामध्ये एकूण २९.५० सरासरी नोंदली गेली.

दोन दिवस पावसाचा अंदाज

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील सरासरी कमाल व किमान तापमानामध्ये घट झाली असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात सोमवारी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाचा तसेच हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भामध्ये मंगळवारीही पाऊस होण्याचा अंदाज असल्यामुळे लगत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

औरंगाबाद ४४.८० मिमी.

फुलंब्री ४५.८० मिमी.

पैठण २३.६० मिमी.

सिल्लोड ४८.१३ मिमी.

सोयगाव ४१.३३ मिमी.

वैजापूर ४३.७० मिमी.

गंगापूर ३८.७८ मिमी.

कन्नड ४९.८८ मिमी.

खुलताबाद ५९.०० मिमी.

एकूण ४३.८६ मिमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>