Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१० मिनिटांत सिटीबस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅपेचे धक्के, रिक्षातील असुरक्षित प्रवास, चिल्लरसाठी वादावादी यापासून कंटाळलेल्या शहरवासियांना एक खूशखबर. जालना रोडवर २३ मार्च, सोमवारपासून दहा मिनिटाला एक सिटीबस धावताना दिसेल. चिकलठाणा-मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर या फेऱ्या होतील.

चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान चालणाऱ्या सिटीबस सेवेचा प्रवाशांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी या फेऱ्यांना आता सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकाची जोड दिली आहे. चिकलठाणा येथून निघणारी सिटीबस सेव्हनहिल, आकाशवाणी, क्रांतिचौक, बाबा पेट्रोल पंप मार्गे मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत पोहचेल. त्यासाठी सकाळी ६.४५ पासून दर दहा मिनिटाला एक फेरी सुरू होईल, अशी माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३६ कोटीत प्लास्टिक रस्ते

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दहा रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेले २४ कोटी ३३ लाख रुपये अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी पालिकेने ३६ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दहा पैकी दोन रस्ते प्लास्टिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्याचा प्रस्तावही पालिकेने तयार केला आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून पहिल्या टप्यात २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळवला. या निधीतून रस्त्यांचे

काम करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून महापालिकेचे आयुक्त समितीचे सदस्य आहेत. दिलेल्या निधीतून

दहा रस्त्यांची कामे करा, असे शासनाने या समितीला कळवले आहे. कोणत्या रस्त्यांची कामे करायची याची यादीही शासनाने दिली आहे. समितीच्या पहिल्याच बैठकीत रस्त्यांची कामे महापालिकेच्या

माध्यमातून करण्याचे ठरवण्यात आले. महापालिकेवर रस्त्यांच्या कामाची जबाबदारी दिल्यावर अधिकाऱ्यांनी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार केले. दहा

रस्त्यांसाठी ३६ कोटींचे अंदाजपत्रक या संस्थेने तयार केले. ३६ कोटींचा निधी उपलब्ध झाला तरच दहा रस्त्यांची कामे होऊ शकतील, अन्यथा जास्तीत जास्त सात रस्त्यांची कामे करता येणे शक्य आहे,

असे या संस्थेने तयार केलेल्या अंदाजपत्रकानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले मत तयार केले आहे. आता हे मत प्रस्तावाच्या स्वरुपात विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार आहे. 'दहा पैकी दोन

रस्ते प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याची सूचना प्रस्तावात करण्यात आली आहे. प्लास्टिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या रस्त्याला तुलनेने खर्च कमी लागतो. साठ टक्के खर्चात एक रस्ता पूर्ण होऊ

शकतो आणि या रस्त्यांचे आयुष्यमानही जास्त असते,' अशी माहिती सूत्रांनी दिली. विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव मान्य केला तर शहरात प्रथमच प्लास्टिक तंत्रज्ञानाचे रस्ते होऊ शकतील.

४० टक्के कमी खर्च; चेन्नईत तंत्रज्ञानाचा वापर

प्लास्टिक तंत्रज्ञान वापरून चेन्नई आणि बंगरळू शहरात रस्ते तयार करण्यात आले आहेत. तेरा वर्षापूर्वी हे तंत्रज्ञान या शहरांमध्ये वापरण्यात आले आहे. रस्त्यांची स्थिती चांगली असून कमी खर्चात हे रस्ते झालेले असल्याचे सांगितले जाते. प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या कॅरीबॅग यांचा वापर करून हे रस्ते तयार केले जातात. डांबरीकरणाला येणाऱ्या खर्चा पेक्षा चाळीस टक्के कमी खर्चात हे रस्ते तयार केले जाऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपात काँग्रेस स्वबळावर?

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेला दुरावा औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही कायम राहणार आहे. चार दिवसांपूर्वी विधानपरिषद सभापतिंविरुद्ध संमत झालेल्या अविश्वास ठरावाने त्यात भर पडली आहे. महापालिका निवडणुका एकट्याने लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी काँग्रेसकडे विचारणा करावी, अशी गळही काँग्रेस नेत्यांनी घातली आहे. त्यामुळे आता आघाडीचा चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात गेला आहे.

२०१०च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आणि शहर प्रगती आघाडीची महायुती झाली होती. काँग्रेसने १९, राष्ट्रवादीने ११ तर प्रगती आघाडीने तीन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस - राष्ट्रवादी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले होते. गेल्या आठवड्यात विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास ठराव आणला. भाजपला हाताशी धरून हा ठराव संमत झाला. या खेळीमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शनिवारी औरंगाबादेत आले. त्यांनी काँग्रेस कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेतली. आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तयारीविषयी चव्हाणांनी चर्चा केली. आघाडीबद्दल बहुतांश स्थानिक नेते अनुकूल नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. कॉँग्रेसकडे ३५० हून अधिक अर्ज विविध वॉर्डातून जमा झाले आहेत. हा प्रतिसाद पाहून स्वतंत्र लढण्याची तयारी करा, असा संदेश प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूसह तीन ट्रॅक्टर पकडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

कायगाव (ता. सिल्लोड) परिसररात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वाळूसह पकडले. वडोदबाजार पोलिसांनी शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना ही कारवाई केली. कारवाईची माहिती मिळताच इतर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पसार झाले.

फुलंब्री तालुक्यातील गावांना लागून गिरजा नदी तर सिल्लोड तालुक्याच्या गावांना लागून पूर्णा नदी वाहते. वडोदबाजार पोलीस ठाणे हद्दीत बोरगाव कासारी, चिंचखेडा भवन, तांडाबाजार, परिसरात पूर्णा नदीतून तर पाल, पाथ्री, वडोदबाजार, भालगाव, कविटखेडा, बोरगाव अर्ज, शेवता, पेंडगाव, पाडळी, निमखेडा, टाकळी या गावालगत गिरजा नदी वाहते. परंतु, यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे या भागात अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली आहे.

शनिवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वाळूसह वडोदबाजार पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप सागर, यांच्यासह पोलिस कर्मचारी खंडागळे, एन. आर. नागझरे, मुरकुटे, वाघुळे, यांच्या पथकाने गस्त घालत असताना कायगाव शिवारात आरोपी एकनाथ देवमाण रोठे (वय २१ रा. जैनपूर कोठारा ता. भोकरदन), रामदास शेषराव आठावने (रा. तांदुळवाडी ता. भोकरदन) कारभारी त्रिंबक रोठे (रा. जैनपूर कोठारा ता. भोकरदन) यांना वाळू वाहतूक करताना रंगेहाथ पकडले.

.........

जालना जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारण्यात आला. या दोन्ही वाळू वाहतूकदारांवर पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पहिल्या घटनेत सदर बाजार पोलिसांनी रामनगर परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. एमएच २१-६०४७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी सापळा रचून हे ट्रॅक्टर पकडले. याप्रकरणी पोलिस शिपाई संदीप आंबटकर यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी अनिल जोशी आणि भाऊसाहेब मगरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या ताब्यातून वाळू आणि ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस जमादार डी. डी. दिवटे हे करीत आहे. दुसरया घटनेत आष्टी पोलिसांनी देखील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. एमएच २०- क्रमांकाच्या या ट्रॅक्टरमधून बेकायदा वाळू तस्करी सुरू होती. पोलिस जमादार एकनाथ पडूळ यांच्या तक्रारीवरुन या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमानःगोरोबा काकांची दिंडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबा काकांची दिंडी घुमान (पंजाब) मध्ये रंगणार आहे. घुमानमध्ये ३ ते ५ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या गोरोबाकाकांच्या दिंडीत जिल्ह्यातील १९० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गोरोबा काकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबाकाका आणि नामदेवांच्या भेटीचा देखावा या दिंडीतून पंजाब वासीयांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी सुरू केलीआहे.

घुमान येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्यातील भूमीत जन्मलेले आणि पंढरीच्या विठ्ठलाचा कृपाशिर्वाद घेऊन देशात वारकरी सांप्रदायाची पताका घेऊन जाणारे संत नामदेव यांची परीक्षा घेणाऱ्या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावन भूमीत १२ व्या शतकात पहिला मराठी सारस्वतांचा मेळा झाला होता. त्याला संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, विसोबा खेचर, संत नामदेव यांच्यासह तत्कालिन संत मंडळी जमली होती. याच ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईने नामदेवांच्या ठायी असलेला अहंकार गोरोबा काकांच्या निदर्शनास आणून दिला होता. गोरोबा काकांनी नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे, असे सांगत 'गोरा म्हणे कोरा, राहिला गं बाई शुन्यभर नाही ‌भाजिला कोठे' या अभंग ओळी लिहून ठेवल्या आहेत.

त्यानंतर संत नामदेवांनी आत्मपरीक्षण करीत मूळ बार्शीच असलेले आणि औंढा नागनाथ येथे वास्तव्यास असलेल्या विसोबा खेचरांचा अनुग्रह प्राप्त केला. त्यांना गुरुस्थानी मानून पुढील कामाची दिशा ठरविली. आणि सबंध हिंदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पत्रका पोहोचविण्याचे अलौकिक कार्य केले.

तेरे येथे बाराव्या शतकात झालेली संत मंडळींची सभा खऱ्या अर्थाने पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्याची श्रद्धा उस्मानाबादकर आजही बाळगताहेत. संत नामदेव गोरोबा काकांच्या भेटीसाठी तेर येथे मोठ्या श्रद्धेने येवून गेले. तीच श्रद्धा मनात ठेवून उस्मानाबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने यंदा धुमानमध्ये गोरोबाकाका आणि नामदेव महाराजांची अलौकिक भेट घडविण्यासाठीचा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी सुरू केलीअसल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.

दिंडी ३१ मार्चला होणार रवाना

घुमानमध्ये ३ ते ५ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त काढण्यात येणारी गोरोबाकाकांच्या दिंडी ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ना‌शिक येथून घुमानकडे रवाना होणार आहे. गोरोबा काकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबाकाका आणि नामदेवांच्या भेटीचा देखावा या दिंडीतून पंजाब वासीयांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीप्ती सांगवीकर यांचे निधन

$
0
0


औरंगाबाद : जिंतूरजवळ शनिवारी सकाळी झालेल्या एका कार अपघातात उद्योजक मिलिंद सांगवीकर यांच्या पत्नी दीप्ती सांगवीकर (वय ५१) यांचे निधन झाले. झाडावर गाडी धडकल्याने कारचा जागीच चुराडा झाला. त्यांच्या मागे पती मिलिंद सांगवीकर, मुलगा शेखर सांगवीकर आणि मुलगी पूजा मराठे आहेत. उस्मानपुरा भागातील त्यांच्या राहत्या जानकी निवासस्थानापासून रविवारी सकाळी साडेआठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपातील जागांवरुन युतीत तिढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विधानसभा निवडणुकीत आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत मागच्या वेळेपेक्षा जागा द्या,' अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत झालेल्या युती संदर्भातल्या बैठकीत केली आहे. आता उद्या, रविवारी पुन्हा शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. शुक्रवारी रात्री सुभेदारी विश्रामगृहात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला शिवसेनेतर्फे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, सुहास दाशरथे उपस्थित होते. भाजपतर्फे आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी आमदार किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भगवान घडमोडे उपस्थित होते. २०१० च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपने जेवढ्या जागा लढवल्या तेवढ्या जागांचाच विचार करावा, जे १४ वॉर्ड वाढलेले आहेत ते समप्रमाणात वाटून घ्यावेत असा प्रस्ताव शिवसेने या बैठकीत ठेवला. भाजपच्या नेत्यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत औरंगाबादच्या तिन्हीही मतदार संघात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद वाढली आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारात पाच हजारांचा फरक होता. पूर्व मतदारसंघात शिवसेनेला भाजपपेक्षा तब्बल पन्नास हजार मते कमी पडली. मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये फक्त एक हजारांचा फरक होता. त्यामुळे या तिन्हीही मतदार संघांचा विचार केला, तर भाजपची ताकद वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी मांडली. पण त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेच्या नेत्यांनी सहमती दर्शवली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० मिनिटांत सिटीबस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅपेचे धक्के, रिक्षातील असुरक्षित प्रवास, चिल्लरसाठी वादावादी यापासून कंटाळलेल्या शहरवासियांना एक खूशखबर. जालना रोडवर २३ मार्च, सोमवारपासून दहा मिनिटाला एक सिटीबस धावताना दिसेल. चिकलठाणा-मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर या फेऱ्या होतील.

चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान चालणाऱ्या सिटीबस सेवेचा प्रवाशांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी या फेऱ्यांना आता सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकाची जोड दिली आहे. चिकलठाणा येथून निघणारी सिटीबस सेव्हनहिल, आकाशवाणी, क्रांतिचौक, बाबा पेट्रोल पंप मार्गे मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत पोहचेल. त्यासाठी सकाळी ६.४५ पासून दर दहा मिनिटाला एक फेरी सुरू होईल, अशी माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपात काँग्रेस स्वबळावर?

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेला दुरावा औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही कायम राहणार आहे. चार दिवसांपूर्वी विधानपरिषद सभापतिंविरुद्ध संमत झालेल्या अविश्वास ठरावाने त्यात भर पडली आहे. महापालिका निवडणुका एकट्याने लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी काँग्रेसकडे विचारणा करावी, अशी गळही काँग्रेस नेत्यांनी घातली आहे. त्यामुळे आता आघाडीचा चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात गेला आहे.

२०१०च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आणि शहर प्रगती आघाडीची महायुती झाली होती. काँग्रेसने १९, राष्ट्रवादीने ११ तर प्रगती आघाडीने तीन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस - राष्ट्रवादी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले होते. गेल्या आठवड्यात विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास ठराव आणला. भाजपला हाताशी धरून हा ठराव संमत झाला. या खेळीमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शनिवारी औरंगाबादेत आले. त्यांनी काँग्रेस कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेतली. आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तयारीविषयी चव्हाणांनी चर्चा केली. आघाडीबद्दल बहुतांश स्थानिक नेते अनुकूल नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. कॉँग्रेसकडे ३५० हून अधिक अर्ज विविध वॉर्डातून जमा झाले आहेत. हा प्रतिसाद पाहून स्वतंत्र लढण्याची तयारी करा, असा संदेश प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने असलेली पर्स रिक्षातून लंपास

$
0
0

औरंगाबादः बाबा पेट्रोलपंप ते न्यायनगर दरम्यान रिक्षातून प्रवास करताना एका महिलेची रोख रक्कम व दागिन्यासह ७८ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग सहप्रवाशी असलेल्या महिलेने लंपास केली. ही घटना शुक्रवारी (२० मार्च) घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा राजकुमार शिंदे (रा.मायानगर) असे फिर्यादीचे नाव आहे.

शुक्रवारी सायंकाळी बसस्थानकावर उतरल्यानंतर त्या दिरासोबत एका अॅपेरिक्षाने न्यायनगरकडे जात होत्या. पुंडलिकनगर येथील स्वामी समर्थ चौकामध्ये उतरल्यावर त्यांच्या जवळ असलेली बॅग सहप्रवाशी महिलेने चोरुन नेल्याचे लक्षात आले. या बॅगमध्ये रोख ८ हजार रुपये व ७० हजार रुपयांचे दागिने होते. शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-ऑटोच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू

$
0
0

नांदेडः किनवट शहरापासून पासुन २५ किलो मीटर अंतरावर असलेल्या सारखणी येथे ट्रक व ऑटोचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत संतोष नागोराव कदम (वय १७ रा. राजगड), करण बालाजी गायकवाड अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली मा‌हिती अशी की, इंडीयन गॅस कंपनीचे टँकर (क्रमांक सीडी-१५ एसी ०६) किनवटहून माहूरकडे जात होते. यावेळी सारखणी येथे परीक्षा देऊन घरी परतत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑटोला (क्रमांक एमएच २६-एसी ४७३३) धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर सुरेखा गेमसिंग राठोड व मनीषा विजय पवार या दोघीजण गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संत सखाराम महाराज माध्यमिक विद्यालय राजगड येथिल दहावीच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र सारखणी येथे होते. येथील विद्यार्थी पेपर सुटल्यावर घरी परतत असतांना हा अपघात घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

अतिदुर्गम व जंगलाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर भागांत अनेक वर्षांपासून पावसाचे कमी प्रमाण आहे. यामुळे जंगलात वावरणाऱ्या वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. परंतु, वन विभागाने जंगलात पानवटे उभे केली नसल्याने वन्य प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याने सध्यस्थितीत पाण्यासाठी वन्य प्राणी मानववस्तीकडे धाव घेत आहेत.

माहूर तालुक्यात सर्वात जास्त जंगलाचा भाग आहे. त्यामुळे वानर, अस्वल, वाघ, माकडे, हरण यासह अन्य जंगली प्राण्याचा वावर असतो. या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने पाणवटे उभी करण्याची गरज आहे. यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. मानववस्त्यावर वाडी-तांड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीतही वन्य प्राण्यासाठी नागरीक घराबाहेर पाणी ठेवत असल्याने वन्य प्राणी ही पाण्याचा आसरा घेत आहेत. वन्या प्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानव वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या शोधात असलेल्या अस्वलाने एका साठ वर्षीय वृद्धावर हल्ला केला होता. त्यामुळे पाण्यासाठी पाणवटे उभारण्याची गरज आहे. वन विभागाने पानवटे तयार केली नसल्याने वन्य प्राणी आता मानववस्तीकडे धाव घेत आहेत. नागरिकांनी पाणीटंचाई लक्षात घेता घराबाहेरील हौदात पाणी साठवून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना तहान भागवता येईल, अन्यथा पाण्याविना वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागाार आहे. या पाणी टंचाईच्या काळात या प्राण्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वन्य प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे. वन विभागाने मात्र, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्म‌हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

शेतीमालाला हमी भाव न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत आल्याने बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे घडली. जालिंदर नारायण आंधळे (वय ५५ रा. आंधळवाडी त. आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. जालिंदर आंधळे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दिवसेंदिवस जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे दररोज टँकरची मागणी वाढत आहे. सध्या ३६ टँकरद्वारे जिल्ह्यातील २९ गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यासोबतच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच विहिर, कुपनलिकांच्या अधिग्रहणाचा आकडाही तीनशेच्या पुढे सरकला आहे. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत

आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे संकट भेडसावत आहे. दरवर्षी मार्च महिन्यात पाण्यासाठी ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागते. दुष्काळाचे दुष्टचक्र संपता संपत नाही. यंदा तर मार्च महिना संपताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. जिल्ह्यातील लोहारा तालुक्याशिवाय अन्य सर्वच तालुक्यांत टँकरची मागणी वाढत आहे.

सध्या जिल्ह्यात ३६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये २९ गावांत १३ शासकीय, तर २३ खासगी टँकरद्वारे ग्रामीण नागरिकांची तहान भागविली जात आहे. काही गावात टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांत अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये ३१० विहिरी, तसेच कूपनलिकांचा समावेश आहे. पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका दररोज बंद पडत आहेत, मात्र नागरिक कूपनलिका खोदाई करण्याचा मोह सोडत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एक कूपनलिका बंद पडल्याने पुन्हा दुसरी कूपनलिका अधिग्रहण करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रात सावळा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून जिल्हा परिषदेने बी. एडचे विद्यार्थी नेमले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. या गोंधळातच विद्यार्थ्यांना नुकसान सहन करत परीक्षा द्यावी लागली.

जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावार रविवारी ( २२ मार्च रोजी) शहरातील ३२५ विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यांची गणित आणि समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाला देण्याऐवजी चक्क, इंग्रजी माध्यमातील प्रश्नप‌त्रिका वितरीत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला.

हा प्रकार परीक्षा केंद्रावर आलेल्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यांनतर शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी परीक्षा केंद्राला ताबडतोब भेट दिली. तेंव्हा संतप्त पालक आणि शिक्षकांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून बी. एडच्या विद्यार्थ्यांना नेमण्यात आले होत‌े. शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी जागरूक पालक आणि शाळा विद्यार्थ्यांची वर्षभर तयारी करून घेत असतात. एकेका मार्कावर त्यांचे मेरीट अवलंबून असते. पण जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परीक्षा केंद्र चालकाच्या सावळा गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

माझ्या मुलाला मराठी माध्यमाची प्रश्न पत्रिका द्यायला हवी होती. त्याने वर्गात मागणी करूनही दिली नाही, तो रडत खाली आला. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- आर.पी. साळुंखे पालक, उस्मानाबाद

हा गोंधळ बी. एडचे विद्यार्थी शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमल्यामुळे झाला आहे. मराठी माध्यमांचे नुकसान आम्ही सहन करणार नाही.

यापुढील काळात आंदोलन करणार आहोत.

राहुल बचाटे, शिक्षक संघटना, उस्मानाबाद

परीक्षा व्यवस्थापनात हयगय आणि निष्काळजीपणा झाला आहे. या प्रकाराणांशी संबधित असलेल्यांवर कारवाई करू.

- शिवाजी जाधव, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूसंपादन कायद्यातील सुधारणा फसव्या

$
0
0

औरंगाबाद : भूमी अधिग्रहण मुद्दा हा जमीनीसोबत जोडलेल्या सर्व बाबींना जोडणारा आहे. त्यामुळे शेतीला जोडलेल्या या मुद्द्यांना वाचा फोडली पहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. माती म्हणजे सोनं आहे, मात्र मोदी सरकार करत असलेल्या भूसंपादन कायद्यातील सुधारणा म्हणजे फसवणूक असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात पाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या, व्यासपीठावर अण्णा खंदारे यांची उपस्थिती होती. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा हा अत्यंत गंभीर असून शासन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीनी घेत आहेत. १९९४ च्या भूसंपादन कायद्यात अनेक चुका होत्या. त्या सुधारण्यासाठी अनेक आंदोलने झाली. २०१३ मध्ये तयार झालेला कायदा २०१५ मध्ये लागू झाला, मात्र आता मोदी सरकार या कायद्यात नवीन सुधारणा करत आहेत. त्या हिताच्या नाही, असेही पाटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंग करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजने अँटी रँगिंग कायद्यामध्ये दोषी ठरवून दोन विद्यार्थ्यांचे निलंबन केले. हा निलंबनाचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी रद्द केला.

राहुल ढवळे व राहुल जायभाये या दोन विद्यार्थ्यांनी ही याचिका केली होती. रँगिंग झाल्याची तक्रार अजय चंद्रवंशी यांचे वडील दत्तात्रय चंद्रवंशी यांनी जे.एन.इ.सी.प्राचार्यांकडे केली होती. ढवळे, जायभाये व चंद्रवंशी हे तिघे एकाच खोलीत राहत होते. आर्थिक व्यवहारामुळे या तिघांमध्ये वाद झाला. २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान या तिघांमध्ये भांडण होऊन मारामारी झाली. अजयच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर प्राचार्यांनी चौकशी समिती नेमली. या समितीने दिलेल्या चौकशी अहवालानुसार प्राचार्यांनी ७ सप्टेंबर २०१४ रोजी ढवळे व जायभाये यांना अँटी रँगिंग कायद्यान्वये दोषी ठरविले. २० नोव्हेंबर २०१४ रोजी या दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले. या आदेशाला दोन विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

जे.एन.इ.सी. प्राचार्यांनी ए.आय.सी.टी.इ.च्या नियमानुसार अँटी रँगिंग समिती नेमली नाही. ही समिती महाराष्ट्र रँगिंग प्रतिबंधात्मक कायद्याशी सुसंगत नाही. नियम व कायद्यात फरक असेल तर कायदा श्रेष्ठ ठरतो. समितीचा निर्णय नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नाही. याचिकाकर्ते व तक्रारदार हे एकाच वर्गातील असल्यामुळे झालेली मारामारी रँगिंगच्या व्याखेत मोडत नाही. वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्याने ज्युनिअर विद्यार्थ्याशी असभ्य वर्तणूक किंवा शारीरिक, मानसिक छळ केला तरच रँगिंगच्या शिक्षेस विद्यार्थी पात्र ठरतो, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील सतीश तळेकर यांनी केला. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर अँटी रँगिंग समितीची स्थापना केली. समितीने कायद्याच्या चौकटीत राहूनच याचिकाकर्त्यांना एक वर्षांसाठी निलंबित केले, असा युक्तिवाद जे.एन.इ.सी.चे वकील व्ही.एस.कदम व एन.के. चौधरी यांनी केला. कोर्टाने निलंबनाचे आदेश रद्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या जागेची हवामान खात्याला प्रतीक्षा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या औरंगाबाद येथील कार्यालयाला हक्काची जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये हा विभाग असून हक्काच्या जागेच्या प्रतिक्षेत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हवामान खात्याचा हा विभाग स्वतंत्र जागेमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र जागा न मिळाल्यामुळे डॉप्लर रडारसारखे महत्वाचे प्रकल्प मंजूर होऊनही रखडले आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमधील दोन खोल्यांमध्ये हवामान खात्याचा कारभार सुरू आहे. याच आवारामध्ये जमीन पातळीवरील हवामानाचा अंदाज वर्तवणारे यंत्र तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही आहेत.

विमानतळ प्राधिकरणाला विमानांना येण्या-जाण्यासाठी तापमान, हवामान, वाऱ्याची दिशा या विषयांची माहिती हवामान खात्याकडून देण्यात येत असल्यामुळे प्राधिकरणाच्या जागेचे भाडे दोन्ही विभागांच्या वरिष्ठ पातळीवरून वळते करून घेण्यात येते.

हवामानशास्त्र विभागाला कार्यालय, डॉप्लर रडार, कर्मचारी निवासस्थान, विविध यंत्र यासाठी अडीच एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी प्रा‌धिकरणाकडेच जागेची मागणीही करण्यात आली, मात्र अद्यापही जागेच्या आकारावरून कोणताही निर्णय झाला नाही. यापूर्वी डॉप्लर रडार तसेच हवामान खात्याच्या स्वतंत्र जागेसाठी खुलताबाद, मूर्तिजापूर या जागांचाही विचार करण्यात आला होता.

सध्या जमीनीपातळीवरुन प्रत्येक तीन तासांना हवामानाचा अंदाज घेण्यात येतो. यामध्ये तापमान, हवेमधील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याची दिशा, गती, ढगांचे प्रकार आदींची माहिती एकत्रित करण्यात येते. तसेच विमानांसाठी प्रत्येक अर्धा तासाला संपूर्ण तापमानाची माहिती गोळा करून एअर ट्रफिक कंट्रोलला (एटीसी) देण्यात येते. हवामान खात्याला हक्काची जागा मिळाल्यास सर्व कामांमध्ये सुसूत्रता निर्माण होऊन हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. डॉप्लर रडारसाठी जागा मिळाली तर त्याचा उपयोग मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागांनाही होणार आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार असल्यामुळे याचा उपयोग शेतीसाठीही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आजोबा’ रुखरुख लावून जाणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात प्रवेश करताच बच्चे कंपनीला मोह होतो तो त्यांच्या 'आजोबा'ला, म्हणजेच वाघोबाला बघण्याचा. त्यांची धमाल टिपण्यासाठी रोज अनेकांच्या हातातले मोबाइल सरसावतात. चारचार-पाचपाच वाघोबांची पाण्यात सुरू असलेली दंगामस्ती या रखरखत्या उन्हातही बघणाऱ्यांना सुखावून सोडते, पण आता यातले काही वाघ पुणे, तर काही वाघ मध्यप्रदेशातल्या रिता येथे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे ही ओलीकंची धमालमस्ती काही अंशी कमी होणार आहे. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात सध्या पिवळ्या वाघांची संख्या आठ झाली आहे, तर पांढऱ्या वाघांची संख्या चार आहे.

पिंजरे आणि पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ लक्षात घेता ही संख्या जास्त आहे. त्यामुळे काही वाघ कमी करा, अशी सूचना सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला केली. त्यानुसार महापालिकेने अन्य प्राणिसंग्रहालयांकडून माहिती मागवली. त्यानुसार पुणे येथील प्राणिसंग्रहालयातून मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती पालिकेच्या प्राणिसंग्रहलयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली. पुण्याला एक पिवळी वाघीण आणि एक पांढरा वाघ पाठवला जाणार आहे. मध्यप्रदेशात नव्यानेच सुरू झालेल्या रिता प्राणिसंग्रहालयातूनही वाघांसाठी मागणी आली आहे. या ठिकाणी पिवळ्या वाघांची एक जोडी पाठवली जाणार आहे.

बदल्यात मिळणार कोल्हे

पुण्याहून दोन वाघांच्या बदल्यात कोल्ह्याची एक जोडी औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला मिळणार आहे. मध्यप्रदेशातून मात्र वाघांच्या बदल्यात लगेच काही मिळणार नाही. भविष्यात प्राण्यांची गरज पडली, तर आम्हाला प्राणी द्या अशा बोलीवर वाघांची जोडी दिली जाणार आहे. वाघांच्या जोडीबरोबर सांबरही दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रस्त्यावर ठिगळपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रमुख असलेल्या जालना रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दीड वर्षांपासून डांबरीकरणाअभावी रखडले आहे. लाखो वाहने खड्ड्यातून आपला मार्ग काढत आहेत. महापालिकेच्या हद्दीतील पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील पाच रस्त्यांसाठी मंजूर केलेले २१ कोटी रुपये केवळ कागदावरच राहिले आहेत. त्याचा फटका शहरवासियांना बसत आहे.

जालना रोड, सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट ते दिल्ली गेट यासह अन्य दोन रस्ते महापालिकेत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून निधी अपेक्षित आहे. गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यांसाठी निधी मिळालेला नाही. जालना रस्ताही त्यात अडकला आहे. सर्वाधिक रहदारीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने या पाच रस्त्यांसाठी २१ कोटी रुपये मंजूर केले, पण अर्थ खात्याने अखेरपर्यंत निधीच उपलब्ध करून दिला नाही. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका लागल्या. आचारसंहितेमुळे निधी आला नाही. त्यानंतर सरकार बदलले. युती सरकारनेही या रस्त्यांच्या निधीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, खड्डे वाढले आहेत. नाही म्हणायला दीड कोटी रुपये सरकारकडून मिळाले. त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने जालना रोडची ठिगळपट्टी सुरू केली आहे. या रस्त्यांना सरकारने जर मार्चअखेर निधी उपलब्ध करून दिला, तरच संपूर्ण मजबुतीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images