Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संसर्ग लाखांना; मृत्यू काहींचा

$
0
0

भीती सोडा, काळजी घ्या; 'स्वाइन फ्लू'च्या चर्चासत्रात डॉक्टरांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१२ लाखांच्या औरंगाबादमध्ये 'स्वाइन फ्लू'चा जंतुसंसर्ग एक लाख व्यक्तींना झाल्यास, त्यांच्यापासून केवळ दीड ते दोन हजार व्यक्तींमध्येच 'स्वाइन फ्लू'ची लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यातील ५०० ते १००० लोकांनाच दाखल करण्याची वेळ येऊ शकते. यातील मोजक्याच लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे भीती सोडा आणि काळजी घ्या, असे आवाहन शहरातील वैद्यकतज्ज्ञांनी केले.

एमआयटी हॉस्पिटलच्या वतीने 'स्वाइन फ्लू'बाबत 'धोका सर्वांना, जबाबदारी सर्वांची' या विषयावर रविवारी हॉस्पिटलमध्ये चर्चासत्र झाले. या प्रसंगी एमआयटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. जगन्नाथ दीक्षित, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय गायकवाड, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी नागरिकांना 'स्वाइन फ्लू'विषयी शास्त्रीय माहिती दिली.

डॉ. गायकवाड म्हणाले, 'या आजाराचा संसर्ग हा 'स्वाइन फ्लू'बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकल्यातून, थुंकण्यातून होऊ शकतो. दोन ते तीन फुटांपर्यंत हे विषाणू खोकल्यातून जाऊ शकतात. त्यामुळे बाधित व्यक्तींनी किंवा संशयित रुग्णांनी किंवा या काळात सर्दी-खोकला होणाऱ्या रुग्णांनी रूमाल अथवा मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच अशा रुग्णांपासून नागरिकांनी दूर राहणे आणि रुग्णांनी स्वतःहून गर्दीपासून शक्यतो दूर राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी अनेकांना जंतुसंसर्ग होऊनही त्याची कुठलीही लक्षणे किंवा त्रास होत नसतो; परंतु त्यांच्यापासून इतरांना जंतुसंसर्ग होत राहतो. अशांना 'सब-क्लिनिकल केसेस' म्हटले जाते आणि त्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. रोग प्रतिकारशक्तीमुळेच बहुतेकांना याचा त्रास होत नाही, तर काहींना याचा त्रास होता. आजाराची तीव्र लक्षणे दिसल्यानंतरच किंवा इतर आजारांमुळे 'स्वाइन फ्लू' होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांना 'टॅमी फ्लू' औषधी सुरू केली जाते. यामध्ये ६५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक, पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले, गर्भवती यांनाही जंतुसंर्गाचा जास्त धोका असतो,' असेही डॉ. गायकवाड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला आयोगाला वाली मिळेना

$
0
0

सहा महिन्यांपासून अध्यक्षांची नियुक्ती नाही; सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत

>> पृथा वीर, औरंगाबाद

महाराष्ट्रात स्त्री अत्याचार, बलात्कार, छेडछाडीच्या घटना वाढल्याची कबुली स्वतः केंद्रीय महिला मंत्री मेनका गांधींनी लोकसभेत दिली. त्याच राज्यात महिला आयोगाला सहा महिन्यांपासून अध्यक्ष मिळू नये, ही चीड आणि संताप आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकार अजूनही या नियुक्तीला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.

एकीकडे म‌हिलांना समान न्याय व अधिकार मिळावा यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होताना दिसतात. महिला सबलीकरणाचा ध्यास घेऊन सामाजिक संस्था, एनजीओंचे काम सुरू आहे. त्याचवेळी महिलांची सुरक्षा व सन्मानासाठी झटणारा राज्य महिला आयोग मात्र सहा महिन्यांपासून अध्यक्षाविनाच काम करतोय. यापूर्वी २००९मध्ये अशी परिस्थिती होती. इतकेच नव्हे तर आयोगाचे काम एका सदस्यावर सुरू होते. याबाबत ओरड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ जानेवारी २०१४ मध्ये अॅड. सुसीबेन शहा यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. उर्वरित सदस्यांमध्ये डॉ. आशा मिरगे, आशा भिसे, अॅड. विजया बांगडे, चित्रा वाघ, ज्योत्स्ना विसपुते, उषा कांबळे यांचा समावेश होता.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुसीबेन शहा व ज्योत्स्ना विसपुते यांनी निवडणूक लढवली. शहा यांनी काँग्रेसतर्फे मलबार हिल येथून तर ज्योत्स्ना विसपुते यांनी जळगाव जिल्हातील जामनेरमधून निवडणुकीत उतरल्या. नियमाप्रमाणे या दोघींनीही राजीनामा दिला, मात्र राज्य सरकारला अजूनही हे अध्यक्षपद भरण्यासाठी वेळ नाही. राज्य महिला आयोगाचे संकेतस्थळही अद्ययावत नाही. त्यामुळे येथे अजूनही जुन्याच नियुक्त्या पहायला मिळतात.

काँग्रेस सरकारने चार वर्षांनंतर आयोगाला अध्यक्ष दिले. तर नव्या युती सरकारने सहा महिन्यांची का होईना, बरोबरी केली आहे.
......

एकीकडे सरकारने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या, तर दुसरीकडे देशात सर्वाधिक बलात्कार व महिलांवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रातच होत असल्याची माहिती स्वतः केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी नुकतीच लोकसभेत दिली. अशा परिस्थितीत ६ महिन्यांपासून आयोगाला अध्यक्ष नसणे ही बाब गंभीर आहे. आयोग दिशाहीन झाला आहे. राज्य सरकारने या बाबीची दखल घेत तत्काळ नियुक्ती करावी.

- अॅड. सुसीबेन शाह, माजी अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती करा; फडणवीसांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर युती करा,' असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सोमवारी मुंबईत दिले. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत युती होणार हे स्पष्ट झाले आहे.

पालिकेत शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्हीही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून ताणाताणी सुरू होती. विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. शिवाय बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे २०१० मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीपेक्षा यावेळी ताकद वाढली म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निम्म्या जांगावर दावा केला होता. त्याला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता.

सोमवारी भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे आणि शहराध्यक्ष भगवान घडमोडे मुंबईत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. पालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे, असे आदेशच फडणवीस- दानवे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेसाठी नारळ फुटला!

$
0
0

२२ एप्रिलला मतदान, आचारसंहिता लागू; प्रचारासाठी फक्त दहा दिवस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या ११३ वॉर्डातील निवडणुकीचा नारळ सोमवारी फुटला. २२ एप्रिल रोजी मतदान आणि २३ एप्रिल रोजी निकाल, असा निवडणूक कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केला. निवडणुकीची आचारसंहिता मध्यरात्री बारापासून लागू झाली. आता प्रचारासाठी फक्त दहा दिवस मिळणार आहेत. वॉर्ड आरक्षण सोडतीसंदर्भात हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात तीन याचिका दाखल होत्या. त्यावर गुरुवार, शुक्रवार सुनावणी झाली. कोर्टाने आज यावर निकाल देत, या याचिका फेटाळल्या. त्यानंतर लगेचच दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी औरंगाबादसह नवी मुंबई पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना प्रसिद्ध करणे - ३१ मार्च २०१५

उमेदवारी अर्ज देणे- स्वीकारणे - ३१ मार्च ते ७ एप्रिल

उमेदवारी अर्जांची छाननी - ८ एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - १० एप्रिल

निवडणूक चिन्हांचे वाटप - ११ एप्रिल

मतदान - २२ एप्रिल (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत)

मतमोजणी - २३ एप्रिल (सकाळी १० वाजे पासून)

महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना ३०

भाजप १५

काँग्रेस १९

राष्ट्रवादी ११

शहर प्रगती आघाडी ०३

भारिप बहुजन महासंघ ०२

मनसे ०१

आरपीआय ०२ (डेमोक्रेटिक)

अपक्ष १६

एकूण ९९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखाचा ऐवज तीन चोऱ्यांत लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिन्सी व सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन चोऱ्यांमध्ये जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमजीएमसमोरील राज हाईटस येथील ऋषभ शहा हे दाराला कडी न लावता सोमवारी रात्री झोपले होते. ही संधी साधून चोरांनी घरातील दोन आयफोन, लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा मोबाइल व घड्याळ, असा ६२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिवाजीनगर एन ९ येथील किरण साळुंके यांनी रविवारी रात्री खिडकीत चार्जिंगसाठी ठेवलेला मोबाइल चोरांनी पळवला. या मोबाइलची किंमत १७ हजार रुपये आहे. हे दोन्ही गुन्हे सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. शरीफ कॉलनीतील शेख मोहम्मद नासेर यांच्या घरी भरदिवसा घरफोडी झाली. ते सोमवारी सकाळी कुलूप लावून कामावर गेले होते. त्यानंतर चोरांनी भिंतीवर उडी मारून घरात प्रवेश करून सोन्याचे मणी व रोख रक्कम, असा सतरा हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरीकरांसह ४९ जणांवर ‘WPC’ची कारवाई

$
0
0

औरंगबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सुभाष बोरीकरसह यावर्षी परीक्षा देणाऱ्या ४९ कर्मचाऱ्यांवर 'डब्ल्यूपीसी'ची (होल परफॉर्मन्स कॅन्सल) कारवाई करणार आहे. या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची परवानगी घेतलेली नाही.

विद्यापीठाने आपल्या कर्मचाऱ्याला परीक्षा सोपी जावी यासाठी सोयीचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रकार समोर आला. कर्मचाऱ्याबद्दलची ही तत्परता चव्हाट्यावर आल्यानंतर विद्यापीठाने हात झटकण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी परीक्षा विभागातील इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र बदलून घेतल्याचा दावा, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मिक सरवदे यांनी केला आहे. परीक्षा केंद्र बदलण्याच्या अर्जावर परीक्षा नियंत्रकांची स्वाक्षरी असते, परंतु त्यावर आपण स्वाक्षरी केली नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. हे प्रकरण गंभीर असून त्यावर विद्यापीठ निश्चित कारवाई करेल. परीक्षा मंडळासमोर हा प्रकार ठेवून यापूर्वी दिलेले इतर पेपरही तपासले जाणार नाहीत. परीक्षेतील सर्व परफॉर्मन्स रद्द करण्यात येणार आहे, असे डॉ. सरवदे यांनी सांगितले. विद्यापीठातील कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रवेश हवा असेल, तर त्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी लागते. अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल तर रजा काढून पूर्ण करावा लागतो, पण परवानगी न घेता किंवा विद्यापीठाला न कळविता ४९ कर्मचारी परीक्षा देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची केंद्राच्या धोरणांमुळे घुसखोरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

बंद झालेल्या शासकीय औषधी कंपन्या सुरू करण्याऐवजी परकीय औषधी कंपन्यांना परवानगी देण्याचे चुकीचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे. त्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्या पेटंटच्या नावाखाली भारतीय बाजारपेठेत घुसखोरी करत असल्याचा आरोप अखिल भारतीय वैद्यकीय विक्री व प्रतिनिधी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दत्तू देशपांडे यांनी केला.

महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या जालना शाखेच्या प्रतिनिधींचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशननिमित्त येथे आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे बोलत होते. या वेळी राज्य महासचिव नरेंद्रसिंग, उपसचिव के. बी. कदम, संजय चटर्जी, सलीम पटेल, आर. डी. मोजेस यांची उपस्थिती होती. 'औषध उद्योगांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण होत असून, १९७८ साली केलेल्या कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. औषधी कंपन्यांनी चालवलेल्या भ्रष्टाचारी विपणन पद्धतीमुळे औषधी विक्रेते आणि प्रतिनिधी अडचणीत आले आहेत. विक्री संवर्धन व कर्मचारी सेवा शर्ती या कायद्याची कंपन्यांकडून पायमल्ली होत आहे. महिला प्रतिनिधींना सुट द्यावी, विक्रीचे टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांना मानसिक त्रास देऊन राजीनामा देण्यास भाग पाडल्या जात आहे.'

प्रतिनिधींना कामाचे आठ तास नियमीत करुन द्यावेत, विक्री संवर्धन सेवा शर्ती कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, किमान पंधरा हजार वेतन आणि महागाई भत्ता वाढवून द्यावा यासाठी संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. औषधांवरील विक्री कर काढून घ्यावा, औषधांच्या किंमती ठरवण्याचे अधिकार ग्राहकांना नाहीत, तर कंपन्या मार्केटची परिस्थिती पाहून त्या ठरवतात. हे बंद होण्यासाठी सरकारच्या हिंदुस्थान अॅन्टी बायोटिक्स, आयडीपीए, एचए यांसारख्या देशी कंपन्या सुरू कराव्यात, त्या सुरू झाल्यास माफक दरात जनतेला औषधी उपलब्ध होईल, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी जनतेसाठी धावले बीडचे ‘धन्वंतरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मार झेलणाऱ्या बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थिती खडतर झाली आहे. यातच येणाऱ्या आजारपणामुळे कुटुंबे कोलडू शकतात. मात्र, ग्रामीण जनतेवरील परिस्थितीच्या जाणिवेतून बीड शहरातील सात डॉक्टरांनी पावसाळ्यापर्यंत मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे किमान आरोग्य तपासणीच्या खर्चातून तरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

लाइफलाइन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या उपक्रमामध्ये पुढाकार घेतला आहे. बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर दोन-पाच वर्षाला बीडला दुष्काळी परिस्थितीला समोर जावे लागते. गेल्या चार वर्षांमध्येत तर दुष्काळ आणि त्यातून सावरेपर्यंत गारपीट अशी मालिकाच सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. बीड येथील सात डॉक्टरांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यात मोफत सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. डॉ. अनिल सानप, डॉ. वृषाली सानप, डॉ. संतोष शिंदे , डॉ. उज्ज्वला शिंदे, डॉ. विश्वास गवते, डॉ. संजय राऊत, डॉ. जया नितीन रायमुळे अशी या डॉक्टरांची नावे आहेत. 'ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्या समाजाचे आपण देणे लागतो. बीड जिल्हा पावसाअभावी अडचणीत आहे. त्यामुळे आमच्या ज्ञानाचा समाजासाठी काही उपयोग व्हावा, यासाठी गुढी पाडव्यापासून या उपक्रमाला सुरुवात केली,' असे डॉ. अनिल सानप यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला व्यवसायाच्या माध्यमातून मदत कशी करता येईल, हा विचार होता. रोटरी क्लबच्या सहकार्याने महिला दिनानिमित्त स्त्रीरोग आरोग्य शिबिर घेतले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा पुढील भाग म्हणून तीन महिने मोफत आरोग्य तपासणी करण्याचा विचार पुढे आला.

- डॉ. अनिल सानप, लाइफ लाइन हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैनगंगेच्या घाटावरून बेकायदा वाळू उपसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

विदर्भ-मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पळसपूर, कोठा, एकम्बा हद्दीत पुन्हा बेकायदा वाळू उपसा जोमाने सुरू झाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या वाळूउपशाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे फावत असून, सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. पैनगंगा नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याचे अनेक दिवसांपासून समोर येत आहे. वाळूमाफियांनी पावसाळा संपताच अवैधरित्या वाळूउपसा सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नाही.

या वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. काही काळ चर्चा झाल्यानंतर थातूरमातूर कारवाई होत असते. वाळू माफियांकडून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाबरोबरच पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

साठेबाजीची तयारी

पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाळूची साठेबाजी करून दुप्पट किमतीने विकण्याच्या उद्देशातून वाळू माफिया अवैधरित्या साठा करुन ठेवण्याच्या तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर गौनखनिज उपसण्याच्या शासकीय नियमांना बगल देत अवैधरित्या राजरोसपणे काढलेल्या वाळुचासाठा शेतातील आडरानात व काही गावालगत करून ठेवल्याचे चित्र धानेारा, हिमायतनगर, पळसपुर, वारंगटाकळी, एकंबा, घारापुर, विरसणी परीसरात दिसुन येत आहे.

नदीकाठाला धोका

वाळूमाफियांकडून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे नदीकाठावरील शेतजमिनींची दरड तुटून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी वाळू उपसण्याची कायदेशीर बोली अद्याप झाली नसल्याने रेती चोरीचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. प्रामुख्याने नदी काठावरील पळसपूर, कोठा, धानोरा, रेणापुर, मसोबा नाला सरसम, कामारी, वारंगटाकळी, डोल्हारी, दिघी, घारापुर, गावच्या हद्दीतही वाळू उपसा सुरु असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीबी’तील गोंधळात ७१ विषय बाजूला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्य विषय सोडून अन्य विषयांवरच गोंधळ झाला. त्यामुळे विषय पत्रिकेवरील ७१ विषय बाजूलाच राहिले आणि गोंधळामध्ये सभा तहकूब करण्यात आली.

विशेष सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे पाटील यांनी अर्थसंकल्प महापौर अब्दुल सत्तार व आयुक्त सुशील खोडवेकर यांच्याकडे सुपूर्त केला. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. 'एलबीटी' रद्द होणार असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवता येतील, यावर सर्वांनीच चिंता व्यक्त केली. या वेळी अर्थसंकल्पीय सभेचे ३१ मार्च रोजी आयोजन करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले आणि सभा तहकूब केली. त्यानंतर सर्वसाधारण सभा सुरू झाली. यामध्ये विषयपत्रिकेप्रमाणे चर्चा होईल, असा अंदाज होता. मात्र, आयत्या वेळच्या विषयावरच चर्चा झाली. 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी देगलूर नाक्याजवळील हैदरबाग येथे महापालिकेचा दवाखान्याचा विषय चर्चेमध्ये आणला. हा दवाखाना निव्वळ शोभेचाच आहे. तेथे डॉक्टर नाही, पुरेशी औषधेही नाहीत आणि त्यामुळे रुग्णही येत नाहीत. रुग्णालय बंद करत, या जागेत मोकाट जनावरांच्या कोंडवाड्यासाठी जागा करण्याची मागणी शेरअली या नगरसेवकाने केली.

त्यानंतर लालवाडी भागात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे, याकडे नगरसेवक बाळासाहेब देशमुख, काँग्रेसचे उमेश चव्हाण यांनी लक्ष वेधले. याशिवाय, अग्निशमन यंत्रणेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शिवाय, शिवजयंतीनिमित्तचे होर्डिंग प्रशासनाने का काढले असा जाब काही नगरसेवकांनी विचारला. यामध्ये काही काँग्रेस नगरसेवकांनीही सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. या गोंधळामध्ये महापालिकेच्या सभेपुढे ठेवण्यात आलेले ७१ विषय तसेच राहिले आणि ही सभा दीड तासात संपली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात कृष्णकुमार पांडुरंग चव्हाण (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. सागर चंद्रकांत निकाळजे (वय ३५), संभाजी शंकरराव पोळे (वय ३०) आणि प्रसाद विष्णुपंत धोतरे (वय ४६, तिघेही रा. ४६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी चव्हाण यांना नोकरीचे आमीष दाखविले आणि पैसे उकळले. मात्र, त्यानंतर तिघेही भेटलेच नाहीत. या प्रकरणात चव्हाण यांनी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तीन लाखांचा गुटखा नांदेडमध्ये जप्त

नांदेड : फारुखनगर परिसरातील दुकानातून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा अधिकारी प्रवीण काळे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वट्टमवार असे आरोपीचे नाव असून, त्याचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानामध्ये गुटखा, सुगंधी सुपारी आणि जर्दा यांचा साठा करण्यात आला होता. त्याची माहिती मिळताच, अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिचौक जलकुंभावर अखेर फायबरचे छत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

३० हजारांवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या क्रांतिचौकातील उघड्या जलकुंभावर छत टाकण्याचे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केले आहे. या जलकुंभाबद्दल 'मटा'ने सर्वप्रथम ५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिध्द केले होते.

क्रांतिचौकातील महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाच्या परिसरात दोन जलकुंभ आहेत. त्यापैकी एक जलकुंभ १९६२ मध्ये बांधण्यात आला आहे. या जलकुंभावरचा स्लॅब दोन वर्षांपूर्वी कोसळला. स्लॅब कोसळल्याचे वृत्त सर्वप्रथम 'मटा'नेच प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर उपमहापौर संजय जोशी, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि सध्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जलकुंभाची पाहणी करून पडलेला स्लॅब दुरूस्त करण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु, दोन वर्ष यावर काहीच काम झाले नाही. 'मटा' ने याचा सतत पाठपुरावा केला. ५ फेब्रुवारी रोजीही पुन्हा वृत्त प्रसिध्द केले होते. जलकुंभावर छत टाकण्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची आहे, आम्ही त्यांना त्या संदर्भात पत्र देऊन कळवू, अशी भूमिका पानझडे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि सोमवारपासून (२३ मार्च) कंपनीने जलकुंभावर छत टाकण्याचे काम सुरू केले. फायबरच्या पत्र्यांचे छत आता टाकण्यात येत आहे. जलकुंभावर इतके दिवस छतच नसल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्यांना दीड कोटीचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या २६ हजार १७३ प्रवाशांकडून औरंगाबाद स्टेशनवर मागील एक वर्षात एक कोटी ४३ लाख ८ हजार ८४६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नांदेड रेल्वे विभागात तिकीट तपासणी निरीक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे महत्त्वाच्या रेल्वेत तिकीट तपासणी होत नसल्याने फुकट्यांचे चांगलेच फावत आहे. पंरतु, रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांची औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर नियमित तपासणी केली जाते. स्टेशनवरील नऊ तिकीट तपासणी निरीक्षकांनी मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या काळात ही कारवाई केली. या कारवाईत विशेष तपासणी व अन्य मोहिमांचाही समावेश आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील दोन्ही इमारतींच्या प्रवेशद्वारावर तपासणी केली जाते. परंतु, आरपीएफ कार्यालयाच्या बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग व इतर चार ठिकाणी तपासणी करण्याची गरज आहे.

प्लॅटफार्म तिकीट तपासणीकडे दुर्लक्ष

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कमी कर्मचारी व तिकीट खिडकीवरील गर्दीमुळे अनेक जण प्लॅटफार्म तिकीट काढत नाहीत. शिवाय प्लॅटफार्म तिकीटाची तपासणी होत नसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ‘चटक्या’ची जाणीव

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम आता ओसरू लागला असून, मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये दोन दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. या वाऱ्यांमुळे अवकाळी पाऊस व गारपिटीबरोबरच सातत्याने ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आतापर्यंत कमाल तापमान कमीच नोंदविण्यात येत होते. दोन दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे उन्हाळ्याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात फेब्रुवारीपासून तापमानामध्ये बदल झाला होता. उत्तरेकडील राज्यांकडून थंड व कोरडे वारे वाहात होते, तर त्याच वेळी बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारेही येत होते. या दोन्ही वाऱ्यांच्या संयोगातून राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. अनेक दिवसांपासून राज्यामध्ये कमाल तापमान कमी नोंदविण्यात येत होते. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रताही जाणवत नव्हती. दोन दिवसांपासून आकाश निरभ्र असून, कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे. कमाल तापमानामध्ये या पुढील काळामध्येही वाढ होत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये किंचित ढगाळ वातावरण असले, तरीही ढगांची घनता पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे या ढगांचा परिणाम तापमानावर होताना दिसत नाही.

तुरळक पाऊस शक्य

कमाल तापमानामध्ये वाढ होत असताना, राज्याच्या बहुतांश भागामध्ये स्थानिक परिस्थितीमुळे तुरळक पाऊस पडू शकतो. तापमान वाढत असताना, जमीन तापून बाष्प हवेमध्ये जाऊन पाऊस पडू शकतो. या परिस्थितीमुळे पडणारा पाऊस मात्र स्थानिक भागामध्येच असेल, असे सांगण्यात येते.

ढगाळ वातावरण निवळले

नांदेड : जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत होते. या परिस्थितीमुळे उन्हाची जाणीव होत नव्हती. तसेच, पावसामुळे तापमानामध्येही घसरण झाली होती. त्यामुळे मार्च महिना संपत आल्यानंतरही उन्हाळ्याची जाणीव होत नव्हती. गुढी पाडव्यानंतर मात्र उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत असून, उकाड्यामध्येही वाढ होत असल्याचे सांगण्यात येते.

रस्त्यावरील गर्दी कमी

बीड : अवकाळी पाऊस आणि काही भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात उन्हाळा जाणवत नव्हता. दोन दिवसांपासून तापमानामध्ये अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळीच काम उरकण्यावर नागरिकांचा भर असून, दुपारी प्रमुख रस्त्यांवरही फारशी गर्दी जाणवत नाही. तापमान वाढत जाणणार असल्याचे जाणवत असून, या काळामध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढणार आहे.

विद्यार्थ्यांची 'परीक्षा'

जालना : जालना परिसरामध्येही तीन-चार दिवसांपासून कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. नागरिकांना वाढत्या तापमानाचा चटका बसत असून, यामुळे विशेषत: विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. सध्या परीक्षांचा हंगाम असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याला पर्याय नाही. त्यामुळे अनेक वेळा भर उन्हामध्ये शाळा-कॉलेज गाठणारे विद्यार्थी रस्त्यांवर दिसून येत आहेत.

उन्हाळ्याच्या तीव्रतेला यंदा उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे तुलनेने कमी उकाडा जाणवेल. नांदेड परिसरामध्ये मे महिन्याच्या मध्यापर्यंत कमाल तापमान ४३.३ ते ४३.९ अंश सेल्सिअसदरम्यान राहील.

- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण

$
0
0

औरंगाबाद : पाणीपुरी खाल्ल्यानंतर पैसे मागणाऱ्या विक्रेत्यास तिघांनी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत रविवारी (२२ मार्च) हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुशवाह (रा. चौधरी कॉलनी) या पाणीपुरी विक्रेत्याच्या गाडीवर सोन्या काकडे (रा. चौधरी कॉलनी) व इतर दोन जण आले. त्यांनी मनसोक्तपणे पाणीपुरी खाल्ली. राहुलने पैशांची मागणी केल्यानंतर त्यास नकार देऊन काठीने मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुकानदारास मारहाण

ट्रकचे भाडे न दिल्याच्या कारणावरून एका दुकानदाराला तिघांनी सोमवारी (२३ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता मारहाण केली. बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्ससमोरील विराज टाईल्सचे सुचित बाकलीवाल दुकानात बसले होते. तेव्हा संजय सिंगल, भगवान घायवट व गोकुळ राजपूत यांनी बेल्ट व फरशीने मारहाण केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात जखमी

पडेगावजवळ दुचाकीला एका टाटासुमोने (एम. एच. १२, बी. जी. १७६३) धडक दिल्यामुळे सोन्याबापू उर्फ बाळासाहेब आवारे, त्यांची पत्नी व लहान मुल (रा. देवगाव रंगारी) हे जखमी झाले. टाटासुमोचा चालक शेख जलील याच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला जखमी

संसारनगर येथील नर्मदाबाई (वय ३०) या अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने शुक्रवारी जखमी झाल्या आहेत. त्या रात्री साडेदहा वाजता विवेकानंद कॉलेजकडून घराकडे पायी येत होत्या, तेव्हा झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा भाचा सचिन बनकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध क्रांत‌िचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांती चौक रस्ता मृत्यूचा मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतिचौक-रेल्वेस्टेशन रस्त्याची ओळख मृत्यूचा मार्ग अशी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत या मार्गावर दहा अपघातांत चार जणांना जीव गमावावा लागला. त्यानंतरही पालिका प्रशासनाने गतिरोधक आणि वाहतूक सिग्नल बसविण्याचे काम केले नाही. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महापालिकेने या रस्त्यासाठी सुमारे २४ कोटी रुपयांची तरतूद केली. आठ लेनचा हा रस्ता गरजेपेक्षा जास्त रुंद झाला असल्याचे आता अपघातांच्या प्रमाणावरून लक्षात येत आहे. अडीच किमी लांबीच्या या रस्त्यावर कुठेही गतिरोधक, वाहतूक सिग्नल नाही. उस्मानपुरा, एसएससी बोर्ड, कोकणवाडी, वेदांत आणि रेल्वेस्टेशन हे पाचही चौक धोकादायक बनले आहेत. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

या रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांत दहा गंभीर अपघात झाले. त्यात चार जणांचा जीव गेला, तर काही जायबंदी झाले. काँक्रिटच्या रस्त्यावर वाहन चालवताना पडले तर मार जोरात लागतो. पालिकेतील स्वच्छता निरीक्षक चव्हाण यांची मुलगी स्वातीला एसएससी बोर्डासमोर एका कारने धडक दिल्याने त‌िचा मृत्यू झाला. म्हाडा कॉलनीतील छोटू साबेर, शिवसेनेचे शाखा प्रमुख गणेश सोनवणे अपघातात गंभीर जखमी झाले. पंधरा दिवसांपूर्वी वेदांत चौकात एक मुलगी अपघातामुळे मरण पावली. चेलीपुरा हायस्कूलसमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याला व भिकारी व्यक्तीला जीव गमवावा लागला.

या रस्त्यावर प्रत्येक चौकात गतिरोधक, सिग्नल, सीसीटीव्ही बसवा अशी सूचना पालिका अधिकाऱ्यांना केली आहे. त्यासाठी पालिकेने अपघाताची वाट पाहू नये.

- विजय वाघचौरे, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाची ‘शाळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्का कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत औरंगाबादमध्ये नर्सरी-प्ले ग्रुपचे प्रवेशच ठप्प आहेत. अनेक शाळांनी प्रवेश स्तर ('एन्ट्र‌ी'लेवल) देताना चुकीची माहिती संकेतस्थळावर भरली, याची तपासणी न करताच शिक्षण विभागाने प्रक्रिया सुरू केली. यामुळे हा प्रकार घडला असून अनेक पालक शिक्षण विभागात खेट्या मारत आहेत. मंगळवारी तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर मजकुरात सुधारणा करण्याची प्रक्रियाच ठप्प झाली होती.

आरटीई कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया यंदा औरंगाबादमध्ये ऑनलाइन होत आहे. यात नर्सरीचे ऑप्शनच नसल्याने पालकांना नर्सरी किंवा प्ले ग्रुपसाठी प्रवेश घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळांनी नोंदणी केली, परंतु काहींनी नर्सरी, प्लेग्रुप असतानाही ऑनलाइन माहितीत दर्शविले नाही. प्रवेश प्रक्रियेतून पळ काढण्यासाठी शाळांनी हा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे नोंदणी नंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळांची माहिती योग्य आहे का? हे पाहणे यानंतरच प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. इतर शहरांमध्ये प्रवेश प्रक्रियेत प्रवेश स्तर हा नर्सरी-प्ले ग्रुपपासून दर्शविण्यात आलेला आहे. औरंगाबादमध्ये मात्र याला बगल देण्यात आली आहे. मंगळवारी प्रक्रियेत पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली. मुदतवाढ मिळाल्याची दिनांक दर्शविण्यात येत नव्हती. तसेच विविध स्तरावरील प्रवेश नोंदणीत काही बदल करायचे तर त्या सुधारण्याची प्रक्रिया ठप्प होती.

'वेद फाऊंडेशन'चे निवेदन

ऑनलाइन नोंदणी करताना शाळांनी चुकीची नोंदणी केल्यामुळे पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. औरंगाबादमध्ये तर नर्सरी-प्ले ग्रुप स्तरच दर्शविण्यात आलेला नसल्याने पालक खेट्या मारत आहेत. पालकांसह, वेद फाऊंडेशनने याबाबत शिक्षण विभागाकडे ही बाब मांडली. यानंतरही शिक्षण विभागाला जाग आलेली नाही. मंगळवारी पुन्हा फाऊंडेशनतर्फे पाठपुरावा करण्यात आला. निवेदनावर विवेक देवरे, किरण शिदोरे, विजय मांडवगड, सचिन जाधव यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाची ‘शाळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्का कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत औरंगाबादमध्ये नर्सरी-प्ले ग्रुपचे प्रवेशच ठप्प आहेत. अनेक शाळांनी प्रवेश स्तर ('एन्ट्र‌ी'लेवल) देताना चुकीची माहिती संकेतस्थळावर भरली, याची तपासणी न करताच शिक्षण विभागाने प्रक्रिया सुरू केली. यामुळे हा प्रकार घडला असून अनेक पालक शिक्षण विभागात खेट्या मारत आहेत. मंगळवारी तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर मजकुरात सुधारणा करण्याची प्रक्रियाच ठप्प झाली होती.

आरटीई कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया यंदा औरंगाबादमध्ये ऑनलाइन होत आहे. यात नर्सरीचे ऑप्शनच नसल्याने पालकांना नर्सरी किंवा प्ले ग्रुपसाठी प्रवेश घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळांनी नोंदणी केली, परंतु काहींनी नर्सरी, प्लेग्रुप असतानाही ऑनलाइन माहितीत दर्शविले नाही. प्रवेश प्रक्रियेतून पळ काढण्यासाठी शाळांनी हा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे नोंदणी नंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळांची माहिती योग्य आहे का? हे पाहणे यानंतरच प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. इतर शहरांमध्ये प्रवेश प्रक्रियेत प्रवेश स्तर हा नर्सरी-प्ले ग्रुपपासून दर्शविण्यात आलेला आहे. औरंगाबादमध्ये मात्र याला बगल देण्यात आली आहे. मंगळवारी प्रक्रियेत पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली. मुदतवाढ मिळाल्याची दिनांक दर्शविण्यात येत नव्हती. तसेच विविध स्तरावरील प्रवेश नोंदणीत काही बदल करायचे तर त्या सुधारण्याची प्रक्रिया ठप्प होती.

'वेद फाऊंडेशन'चे निवेदन

ऑनलाइन नोंदणी करताना शाळांनी चुकीची नोंदणी केल्यामुळे पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. औरंगाबादमध्ये तर नर्सरी-प्ले ग्रुप स्तरच दर्शविण्यात आलेला नसल्याने पालक खेट्या मारत आहेत. पालकांसह, वेद फाऊंडेशनने याबाबत शिक्षण विभागाकडे ही बाब मांडली. यानंतरही शिक्षण विभागाला जाग आलेली नाही. मंगळवारी पुन्हा फाऊंडेशनतर्फे पाठपुरावा करण्यात आला. निवेदनावर विवेक देवरे, किरण शिदोरे, विजय मांडवगड, सचिन जाधव यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काचे २१ टीएमसी पाणी हवेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या २१ टीएमसी पाण्याची मराठवाड्याची मागणी प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंचनाच्या कामाविषयी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह, भाजपचे पदाधिकारी आणि कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता उपस्थित होते. या वेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी महाजन यांच्याकडे वरील केली. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळावे, उस्मानाबाद जिल्हावासीयांची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच, जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकही मोठा प्रकल्प कार्यान्वित नाही. बहुतांश प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासावर होत आहे, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

प्रकल्पाच्या कामांसाठी पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान सिंचनाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा-भीमा बोगद्याच्या कामास निधी उपलब्ध करून देणे, लिफ्ट इरिगेशन योजना क्रमांक २, घाटने बॅरेज पूर्ण असल्यामुळे प्रथम टप्प्यावरील कामे त्वरीत सुरू होणे गरजेचे आहे. सीना कोळेगावमधून जाणारी परांडा उपसायोजना पूर्ण असून, तिचा वापर करून पाणी साकत प्रकल्पात टाकणे, असे विविध कामे तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी ठाकूर व काळे यांनी केली.

मराठवाड्याच्या न्याय हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी मिळेल. ही योजना युतीच्या काळात पूर्ण झाली होती. यापुढील काळात कायम दुष्काळी व अवर्षण असलेल्या मराठवाड्याला या योजनेतून पाणी देण्याची ग्वाही महाजन यांनी या वेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरांची टोळी जालन्यामध्ये जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शहरामध्ये वाहनचोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आले असून, टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीकडून १२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

शहरातील चंदनझिरा परिसरात तीन युवक चोरीची दुचाकी विकण्यासाठी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्याच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून मनोज लक्ष्मण बंडे, विठ्ठल जयंता तांबेकर आणि सुनील विश्वनाथ घनवट या तिघांना ताब्यात घेतले. या तरुणांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांची सरबत्ती सुरूच राहिल्याने पळ काढण्याच प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी वाहने जप्त केली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, शेख अजीम, अर्जुन पवार, कल्याण आटोळे, सॅम्युएल कांबळे, कैलास कुरेवाड, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, दीपक पाटील, वैभव खोकले आणि समाधान तेलंग्रे यांनी ही कामगिरी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images