Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लग्न मोडण्याची सुपारी महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्राच्या नातेवाईक तरुणीचे लग्न मोडण्यासाठी दोन हजार रुपयांची सुपारी घेणे नांदेडच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणीच्या भावी पतीने मित्राच्या साह्याने त्याला रेल्वेस्टेशनवर चांगलाच चोप दिला. लग्न मोडण्याची सुपारी घेणाऱ्यास उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

नांदेड येथील दीपक ठाकूर या तरुणाचे नात्यातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. तिच्या पालकांनी तिचे लग्न पैठण तालुक्यातील एका तरुणासोबत ठरवले. हे लग्न मोडण्याची जबाबदारी दीपकने त्याचा मित्र अभय गंगाधर पैतवाल (वय २५, रा. गाडीपुरा, नांदेड) याच्यावर सोपवली. त्यासाठी दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले. अभय पैतवाल तरुणीच्या भावी पतीला फोन करून तिच्याबद्दल खोटी माहिती देत होता. तिचे व दीपकचे फोटो आहे, असे त्याने सांगितले होते, तसेच लग्न न करण्याबद्दल धमकी देत होता. त्याने औरंगाबादला बुधवारी (२५ मार्च) येऊन फोटो दाखविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता अभय रेल्वे स्टेशनवर पोहचला, परंतु भावी पती व त्याच्या मित्रांनी अभयच्या स्वागताची चांगलीच तयारी केली होती. अभय समोर येताचा त्याला चोप देण्यास सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या मारामारीबद्दल नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर स्टेशनजवळ असलेले क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी अभयला सोडवून उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी अभयविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टेशनवर अफवा

रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण होत असल्याने नेमके काय झाले याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी पकडली, तरुणाचे अपहरण केले, आदी अफवा पसरल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात प्रकरण वेगळेच निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसे, आपचे तळ्यात मळ्यात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळाल्यामुळे आम आदमी पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु, पक्ष पालिका निवडणुकीबद्दल अजून चाचपणीतच करीत आहे. पक्षाचे राज्य संयोजक सुभाष वारे यांनी बुधवारी (२५ मार्च) प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शहरातील ताकदीचा आढावा घेतला. या बैठकीत महापालिका निवडणुकीबाबत निर्णय होईल, अशी उपस्थितांना अपेक्षा होती; मात्र कोणताही निर्णय झाला नाही.

सुभाष वारे यांनी कोणत्या वार्डात ताकत आहे. निवडूण येण्याची शक्यता, पक्षाची प्रत्येक वार्डातील सदस्य संख्या याची माहिती घेतली. दिल्ली निवडणुकीतील विजयामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. स्थानिक नेत्यांनीही महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीमध्ये इतर पक्षांतून इच्छुकांचा ओघ सुरू झाला आहे. परंतु, पक्षाची ताकद असेल तरच निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यामुळे निर्णयाकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाव्यतिरिक्त स्वच्छ प्रतिमा असलेल्या आम आदमी पार्टीचा पर्याय मतदार स्वीकारू शकतात.

पक्षाच्या ताकतीचा आढावा घेतला आहे. २८ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत ही माहिती निर्णयासाठी मांडली जाईल. त्यानंतर निर्णय होईल. निवडणूक लढविण्यासाठी थोडी घाई होईल, पण कार्यकर्त्यांसोबत निर्णय घेणे महत्वाचे ठरणार आहे. .

- सुभाष वारे, राज्य संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाराटंचाईचा आढावा घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सध्या विभागात चारा उपलब्ध आहे; मात्र तरीही विभागात सर्कलनिहाय चाराटंचाईचा आढावा घेण्यात यावा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

सध्या विभागामध्ये कुठल्याही ठिकाणाहून चारा छावणीची मागणीही झालेली नाही तरीही प्रत्येक सर्कलनिहाय चाराटंचाईची आजची स्थिती काय आहे, विभागात उपलब्ध असलेला चारा किती दिवस पुरू शकतो याची माहिती संकलित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. पाणीटंचाईसोबतच चाराटंचाईची स्थिती निर्माण झाली, तर त्याबाबतच्या उपाययोजना काय असाव्या यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यातील ५५५ गावे व २२५ वाड्या तहानल्या असून सध्या ७९४ टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अवघ्या आठवडाभरात १५४ टँकर वाढले आहेत. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता भासणार आहे. सध्या मराठवाड्यात कुठल्याच ठिकाणी चाराटंचाईची स्थिती नाही, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गस्तीच्या पोलिसांवर कंटेनर चालकाचा जीवघेणा हल्ला

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिकठाण फाट्यावर भर रस्त्यावर कंटेनर उभा करणाऱ्या कंटनेर चालकास हटविण्यासाठी गेलेल्या गस्तीच्या पोलिसांवर कंटेनर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद-नगर रोडवर जिकठाण फाटा येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत कंटेनर (एम.एच. ४०, सी.यू. ९००१) उभा करण्यात आला होता. दरम्यान, रात्री वाळूज पोलिस ठाण्यातील गस्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे, पोलिस हेडकॉन्सटेबल ज्ञानेश्वर शेळके, अय्युब पठाण यांच्या ही बाब लक्षात आली. चालक इक्बाल सय्यद खलील महोमद हा कंटेनरमध्ये झोपलेला होता.

पोलिसांनी त्याला उठवून कंटेनर हटविण्याची सूचना केली, मात्र कंटनेर चालकाने तो हटविण्याऐवजी थेट पोलिसांच्या अंगावर घातला. त्यात ठाकरे हे जखमी झाले असून प्रसंगावधानामुळे बचावले. या प्रकरणी ठाकरे यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाच्या विरुद्ध जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सट्टाबाजारात ऑस्ट्रेलियास अनुकूल वातावरण

$
0
0

औरंगाबादः गुरूवारी होणाऱ्या विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया व भारताचा सामना होणार आहे. क्रीडाप्रेमींप्रमाणे सटोडियाचे देखील या सामन्याकडे लक्ष लागले आहे. सट्टाबाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टाबाजारात ऑस्ट्रेलियाला पसंती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने जर प्रथम फलंदाजी केल्यास तीनशे ते सव्वा तीनशे धावांचे टार्गेट भारतासमोर ठेवण्याची शक्यता सटोडियांनी व्यक्त केली आहे. हे लक्ष्य गाठणे भारताला अशक्यप्राय असल्याचा अंदाज आहे. सट्टाबाजारात बुधवारी रात्री उशीरापर्यंत भारतावर रुपयाला पावणेदोन रुपये, तर ऑस्ट्रेलियाच्या विजयावर रुपयाला चाळीस पैशांचा भाव देण्यात आल्याची माहिती बुकींनी दिली. यावरून सट्टाबाजारात ऑस्ट्रेलियाच्या विजयाबाबत अनुकूल वातावरण आहे. प्रत्यक्ष टॉस झाल्यावर या भावामध्ये बदल होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांत २४ दातांचे रोपण शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंतारोपणासाठी (इम्प्लांट) सरासरी आठ ते नऊ महिने लागत असताना, केवळ तीन ते पाच दिवसांत तब्बल २४ दातांचे रोपण करण्याचे 'कॉर्टिकल इम्प्लांट' हे खास तंत्रज्ञान शहरामध्ये उपलब्ध झाले आहे. या तंत्राद्वारे शहरातील एका ६२ वर्षीय महिलेवर दंतारोपण करण्यात आले आहे.

प्रचलित पद्धतीनुसार दंतारोपण करण्यासाठी विविध प्रकारच्या आजारांचा विचार केला जातो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा इतर आजार असल्यास दंतारोपण करणे अवघड होते. तसेच सगळ्या दातांचे रोपण करण्यास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. एवढ्या मोठ्या कालावधीमुळे संबंधित रुग्ण त्रस्त होऊन जातो. मात्र 'कॉर्टिकल इम्प्लांट' हे हाडांची झीज झाल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारानंतर आणि साठीनंतरही केले जाऊ शकते. विशेष म्हणजे सगळे म्हणजे वरचे १२ आणि खालचे १२ अशा २४ दातांच्या रोपणासाठी केवळ तीन ते पाच दिवसही पुरे होतात. यात हिरडीला उघडावे लागत नाही की हिरडीला टाके देण्याची गरज राहात नाही. या प्रक्रियेत दहा स्क्रूच्या आधारे सपोर्ट दिला जातो. रक्तस्त्रावही कमीत कमी होतो आणि ही प्रक्रिया वेदनारहीत आहे. या प्रकारच्या दंतारोपणासाठी वेगळ्या उपकरणांची गरज लागत नाही, तर वेगळ्या तंत्राद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रकारचे दंतारोपण शहरातील एका ६२ वर्षीय महिलेवर नुकतेच करण्यात आले, अशी माहिती शहरातील श्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉ. विक्रांत जैस्वाल व डॉ. मयूर खैरनार (मुंबई) यांनी मंगळवारी (२४ मार्च) पत्रकार परिषदेत दिली.

विदेशात ६० लाख, शहरात ३ लाख खर्च

कॉर्टिकल इम्प्लांटसाठी अमेरिका व इतर देशांमध्ये २४ दातांच्या रोपणासाठी ६० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. मुंबईत साडेचार लाख, तर शहरात तीन लाखांपर्यंत खर्च येतो. एका दातासाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. विदेशामध्ये आरोग्य विमा असतो, पण दातांचा विमा नसतो. त्यामुळे या प्रकारच्या इम्प्लांटसाठी शहरात 'डेंटल टुरिझम' वाढू शकते, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. जैस्वाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलचे विभाजन जूनपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झपाट्याने वाढत असलेल्या औरंगाबाद शहराला येत्या जून महिन्यापर्यंत नवीन तहसील कार्यालय मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. तहसील कार्यालयाच्या विभाजनसाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मंगळवारी (२४ मार्च) बैठक आयोजित करण्यात आली होती.

औरंगाबाद शहराच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे शहर आणि परिसरात होणारे स्थलांतर यामुळे तहसील कार्यालयातील काम वाढणार आहे. त्याचा विचार करून आतापर्यंत दोन वेळा शासनाकडे विभाजनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सध्याच्या भाजप- शिवसेना युती सरकारने पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तहसील कार्यालयाच्या धर्तीवर नवीन तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार, इतर आवश्यक पदे, कार्यालयासाठी एका वर्षासाठी लागणारा खर्च, इमारतीसाठी जागानिश्चिती, इमारत बांधणीचा खर्च आदींबद्दल नवीन प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांचा लाभ

शहर व ग्रामीण कारभार स्वतंत्र झाला तर कामांची विभागणी होईल. औरंगाबादच्या शहरी तालुक्याची लोकसंख्या सुमारे १४ लाख असून ग्रामीणची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. तहसीलचे विभाजन झाले, तर तहससीलदार वितरीत करत असलेल्या प्रमाणपत्रांची विभागणी होईल, शासन राबवत असलेल्या विविध योजनांची अंलबजावणी होणे शक्य होईल. दैनंदिन कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची कामे सध्याच्या तुलनेत लवकर होतील. महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळी तहसीलदारांना विमानतळ, सुभेदारी विश्रामगृह येथे जावे लागते. त्यामुळे तलाठी सजांवर नियंत्रण ठेवता येत नाही. एक तहसीलदार वाढल्यामुळे या कामाचेही विभाजन होईल व सर्वसामान्यांसाठी तहसीलदार उपलब्ध होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या चौकशीला अनुकूलता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या समांतर जलवाहिनी योजनेत गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सय्यद इम्तियाज जलील यांनी बुधवारी (२५ मार्च) विधानसभेत केली. त्यावर नगरविकास मंत्र्यांनी सचिवस्तरावरील अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन दिले आहे.

औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांनी समांतर जलवाहिनीचा प्रश्न बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी योजना कार्यान्वित न झाल्याने शहरातील नागरिकांनी पाण्याची झळ पोहोचत असल्याचे सांगितले. यावर चर्चा करताना आमदार जलील यांनी समांतर जलवाहिनीसाठी नेमण्यात आलेल्या औरंगाबाद युटिलिटी कंपनीच्या कार्यपद्धतीवर विधानसभेत प्रश्न उ‌पस्थित केले.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने शहरातील नागरिकांचा विचार न करता, ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी दिली. पाण्याचे खासगीकरण करून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारी ही देशातील एकमेव योजना ठरल्याचाही आरोप त्यांनी

यावेळी ‌केला. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली. योजनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांवर बोजा टाकला जात असल्याचे ते म्हणाले.

समांतर जलवाहिनीबद्दलच्या गंभीर आरोपाची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्र्यांनी सचिवस्तरावरील अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहात केली आहे, अशी माहिती आमदार जलील यांनी 'म.टा.'ला दिली.

मातोश्रीवर निर्णय का ?

औरंगाबाद युटिलिटी कंपनी नेमल्याचा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागणार आहे. महापालिकेत २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा युतीने हे जनतेवर लादल्याचा आरोप आमदार जलील यांनी केली. त्यावरून शिवसेना आमदारांनी आमदार जलील यांचा विरोध केला. या गदारोळात समांतर जलवाहिनीच्या जाचक नियमांचा निर्णय औरंगाबादकरांनी घ्यावा, हा निर्णय 'मातोश्री'वर का घेतला जातो, अशी विचारणा त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेपर विक्रेत्याचे सोंग घेऊन मोबाइल चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेपर विक्रेता असल्याचे भासवून घरात घुसून साधून मोबाइल पळविणाऱ्या एका तरुणाला क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याने भोईवाड्यातून मोबाइल पळवला होता. पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

कैलास बनकर हा तरूण भोईवाड्यात मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहतो. त्यांच्या खोलीवर २५ फेब्रुवारी रोजी एक पेपर विक्रेता आला, कैलास यांनी त्याच्याकडून पेपर घेतला व ते आंघोळीसाठी गेले. तेवढ्यात य़ा तरुणाने साथीदाराच्या साह्याने दोन मोबाइल व बनकर यांचे पाकीट चोरून पलायन केले. याबद्दल क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस जमादार सय्यद रियाज अहमद यांनी या गुन्ह्यात मोबाइल कॉल डिटेल्सच्या माध्यमातून शोध घेतला. या गुन्ह्यात महावीर चौकातील एका हॉटेलमधील वेटर गणपत लक्ष्मण मोरे (वय १९, रा. भोकरदन) याला पकडण्यात आले. त्याने हॉटेलमालकाला दिलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस त्याच्या राकेश नावाच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

बसस्टँडजवळ तरुणास लुबाडले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामावर जाण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या एका तरुणाला तिघांनी मारहाण करून साडेसहा हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे. ही घटना महावीर चौक ते बसस्टँड या रस्त्यावर सोमवारी पहाटे पाच वाजता घडली. पवन रणवीर (वय ३०, रा. पार्वतीनगर, बेगमपुरा) हे चिकलठाणा एमआयडीसीतील व्होडाफोन कॉलसेंटरमध्ये नोकरीस आहेत. ते कामावर जाण्यासाठी बसस्टँडकडून महावीर चौकाकडे पायी जात होते. तेव्हा मागून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धक्का देऊन पाडले व मारहाण करून खिशातील रोख चारशे रूपये व सहा हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून घेऊन पळून गेले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाब विचारल्याने मारहाण

औरंगाबाद : दोन आठवड्यापूर्वी ट्रकचे भाडे देण्यावरून झालेल्या वादानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या संजय सिंगला (रा. हनुमाननगर) यांना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बीडबायपास रोड येथे ‌तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी सुचित बाकलीवाल, अमित बाकलीवाल व रतन काकडे (सर्व रा. बीड बायपास ) यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकीस दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निवडणुकीच्या तोंडावर शांतता आहे. मुंबई येथे मंगळवारी (२४ मार्च) मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीपासून गळती लागली आहे. निकालानंतर तर अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी रामराम ठोकत शिवसेना-भाजपसोबत घरोबा करणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचे शहरात दोन दौरे झाले; त्याला कार्यकर्त्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या आठवड्यात राज ठाकरे दोन दिवस शहराच्या दौऱ्यावर होते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु, पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांना खाम नदीत विषारी रसायन सोडल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आधी ठाकरे यांनी खांबेकरांची हकालपट्टी केली; त्यानंतर षडयंत्र करून गोवल्याचा आरोप करीत शहराध्यक्षपद कायम ठेवले. या निर्णयाचा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमिवर मनपा निवडणुकीबाबत मुंबईला बोलावण्यात आलेल्या बैठकीला कोणीही फिरकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहराध्यक्ष खांबेकर जामीन न मिळाल्याने अद्याप जेलमध्ये आहेत. दुसरीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांत निवडणूक लढवण्याबद्दल अनास्था आहे. इच्छुक अनेक आहेत, पण मनसे निवडणूक लढवणार का नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खाम नदीत पक्ष वाहून जाणार

पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेल अम्बेसिडरमध्ये स्थानिक १२ पदाधिकारी गेले होते. त्यावेळी ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना मुंबईला येण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांपैकी एकाने हताशपणे 'आमचा पक्ष देखील खाम नदीत वाहून जाणार असल्याचे चित्र दिसते' असे उद्गार काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध डोंगररांगांना ‘ग्लिरीशीड‌िया’चा वेढा

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

वनक्षेत्र वाढवण्याचे 'टार्गेट' गाठण्यासाठी वन विभागाने तीन महिन्यात उंची गाठणाऱ्या 'ग्लिरीशीड‌िया' या विदेशी वनस्पतीची लागवड वाढवली आहे. जिल्ह्यातील डोंगररांगांना या झाडांचा वेढा पडला आहे. लाकडासाठी उपयुक्त नसलेल्या 'ग्लिरीशीड‌िया'वर पक्षीसुद्धा घरटी करीत नाही. जैवविविधतेसाठी प्रतिकूल झाडांनी देशी झाडांवर मात केली असून परिणामी निसर्गाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ साडेसात टक्के वनक्षेत्र असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वनराई दिवसेंदिवस घटत आहे. बेसुमार वृक्षतोड आणि लागवडीतील उदासिनतेने जिल्हा उजाड झाला आहे. 'शतकोटी वृक्ष लागवड योजना' राबवूनही वनक्षेत्र वाढले नाही. या परिस्थितीत वनक्षेत्राचे उद्दिष्ट 'झटपट' गाठण्यासाठी वन विभागाने 'ग्लिरीशीड‌िया' या विदेशी वनस्पतीची लागवड वाढवली आहे. अवघ्या तीन महिन्यात सात फुटांपेक्षा अधिक उंच होणारे 'ग्लिरीशीड‌िया' वृक्षारोपणासाठी फायदेशीर आहे; पण जैवविविधतेसाठी प्रतिकूल असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले. सातारा-देवळाई डोंगरावर जवळपास ३० हजार झाडांची लागवड झाली आहे. तर वेरूळ घाट, अजिंठा डोंगर, फुलंब्री डोंगररांगासह जिल्हाभर ग्लिरीशीड‌ियाचा उच्छाद वाढला आहे. या झाडांनी डोंगररांगाना वेढल्यामुळे खैर, चिंच, बाभूळ, वड, पिंपळ, साग, कडूनिंब, बाभूळ या देशी झाडांची संख्या घटली आहे. देशी झाडांची किमान दोन वर्षे जपणूक करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत झपाट्याने वाढणारे ग्लिरीशीड‌िया वन विभागाचे आवडते झाड आहे. 'प्रदूषण नियंत्रणासाठी या झाडाचा उपयोग असला तरी भारतीय वातावरणासाठी झाड मारक आहे. या विषारी झाडावर पक्षी घरटी करीत नाही. मुंग्या, मुंगळे, फुलपाखरे आणि इतर जीवजंतूसुद्धा बागडत नाही. जैवविविधता धोक्यात आणणाऱ्या झाडांची लागवड थांबवणे गरजेचे आहे' असे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

निरुपयोगी वृक्षसंपदा

ग्लिरीशीड‌िया झाडाची पुरेशी सावलीही पडत नाही. कडवट वासामुळे जळनासाठी लाकूड वापरत नाही. फेब्रुवारी महिन्यात फुले आल्यानंतर फक्त भुंगे दिसतात. या झाडांच्या सहवासात गेल्यास डोकेदुखी आणि मळमळ झाल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. मराठी भाषेत ग्लिरीशीड‌ियाला 'गिरीपुष्प' तर बोलीभाषेत 'उंदीरमार' या नावाने ओळखतात. काही देशात ग्लिरीशीड‌ियावर बंदी आहे.

जमिनीची धूप थांबवणे आणि मातीत मूलद्रव्ये वाढवण्यासाठी ग्लिरीशीड‌ियाची लागवड केली आहे. डोंगरावर झाडांच्या दाटीत पारंपरिक वृक्षही आहेत. वन विभाग विविध जातींच्या झाडांची लागवड करीत आहे.

- अजित भोसले, उपवनसंरक्षक, वन विभाग

ग्लिरीशीड‌ियावर बसलेला पक्षी दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन करतो. केवळ डोंगर हिरवेगार करण्याच्या नादात भारतीय वातावरणाला मारक झाडे लावली जात आहेत. या झाडांचा त्रास जाणवत आहे.

- डॉ. किशोर पाठक, पर्यावरण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० लाखांचा घोटाळा; तिघांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाझर तलावाच्या कामात दहा लाखांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा तत्कालीन शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता व कंत्राटराला अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली. दत्तात्रय गवळी, रावसाहेब वाघमारे, भानुदास राईद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने २००७ ते २०१० या कालावधीत कोल्हापुरी बंधारा व पाझर तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून जास्त बांधकामाची किंमत असलेल्या तलावापैकी मौजे रेलगाव पाझर तलाव ( किंमत ५० लाख ) व कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा, चौका (किंमत ४८ लाख १३ हजार रुपये) या दोन कामांची चौकशी करण्यात आली. यामध्ये रेलगाव येथील कामामध्ये २००९ ते २०१० साली भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले. यात सध्या कार्यरत असलेला लघु पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता दत्तात्रय किसन गवळे (सिल्लोड), तत्कालीन कार्यकारी अभियंता रावसाहेब मिराजी वाघमारे व संत ज्ञानेश्वर मजूर सहकारी संस्था मर्यादितचे कंत्राटदार भानुदास गजानन राईद यांनी घोटाळा केल्याचे उघड झाले. यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामापेक्षा वाढीव स्वरुपात मोजमापाच्या नोंदी पुस्तिकेमध्ये घेतल्या. बनावट कागदपत्र तयार करून वेळोवेळी रकमा मंजूर केल्या. यामध्ये त्यांनी शासनाची १० लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपी विरुध्द फुलंब्री पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गवळी (रा. पद्मपाणी हौसिंग सोसायटी, प्लॉट क्रमांक ९, न्यू नंदनवन कॉलनी), रावसाहेब वाघमारे (रा. सिडको, एन ७), भानुदास राईद (रा. चित्ते पिंपळगाव) यांना अटक केली.

झडतीत कागदपत्रे हस्तगत

आरोपी दत्तात्रय गवळे यांच्या न्यू नंदनवन कॉलनी येथील घराची झडती उपअधीक्षक विवेक सराफ, श्यामसुंदर कौठाळे यांच्या पथकाने घेतली. तर रावसाहेब वाघमारे यांच्या एन ७ येथील रो हाऊसची झडती उपअधीक्षक प्रवीण मोरे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने घेतली. तीन तास सुरू असलेल्या या झडतीमध्ये पोलिसांना महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ दिवसानंतरही वाहने कारवाईविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

महसूल विभागाने तालुक्यातील लाडगाव शिवारात १९ मार्च रोजी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणारी पाच वाहने पकडली. मात्र पाच दिवस उलटूनही या वाहनांवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. वाळुने भरलेली ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात उभी आहेत.

वैजापूर तालुक्यात फक्त पुरणगाव येथील वाळुपट्ट्याचा लिलाव झाला आहे, पण कंत्राटदाराने अद्याप ताबा घेतलेला नाही. परंतु, गोदावरी नदीपात्रातील वांजरगाव, बाभुळगावगंगा, पुरणगाव, सावखेडगंगा येथील नदीपात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरटी वाहतूक होत आहे. या बद्दल माहिती असूनही कारवाई होत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तहसीलदार डॉ. विकास सूर्यवंशी यांनी २९ मार्च रोजी मध्यरात्री लाडगाव शिवारात वाळुचे दोन डंपर, दोन ट्रॅक्टर व एक ट्रक, अशी पाच वाहने पकडली. या वाहनांकडे रॉयल्टीच्या पावत्या नसून क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पाच दिवस उलटूनही या वाहनांवर कारवाई झालेली नाही. ही वाहने कोणाची याचीही माहिती दिली दिली जात नाही.

पकडलेल्या वाहनांचा तलाठ्यांनी अद्याप पंचनामा केला नाही. त्यामुळे या वाहनांवर कारवाईस विलंब होत आहे.

- डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपिटीने परिस्थिती भयावह

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

मार्च-एप्र‌िल लागला की घरोघरी वार्षिक धान्य भरण्याची तयारी केली जाते. आर्थिक पदरमोड करुन त्याचे नियोजनही केले जाते पण यंदा हे नियोजन कोलमडणार आहे. अन्नधान्याचे उत्पादनच घटतेय, गेल्या वर्षापेक्षा गहू, तांदूळ, ज्वारी, मका आणि हरभरा यांची औरंगाबाद बाजार समितीतील आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता इतकी वाढलीय की, सततच्या नापिकीमुळे विवंचनेत अडकलेल्या शेतकरी व अन्नधान्य उत्पादकांना आता अवकाळी पाऊस व गारपिटीनेही नाकीनऊ आणलेत. याचा परिणाम पिकांवर झाला असून सर्वसामान्यांना मिळणारा गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी महाग होणार आहे. गेल्या चार महिन्यांत गव्हाची निम्म्याने आवक घटली आहे. हीच परिस्थिती इतर धान्यांचीही आहे. जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ व जानेवारी २०१५ ते मार्च २०१५ या दोन वर्षांच्या तीन महिन्यांच्या कालखंडाच्या आवकीच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानहून आलेल्या गहू, ज्वारी, तांदळावर औरंगाबादकरांची भिस्त आहे. गेल्या महिन्यात त्या राज्यांतील एजंटांनी औरंगाबादला भेटी देऊन विविध सौदे पक्के केले आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे अन्य राज्यांमध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज एजंटांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, औरंगाबादेत पहिल्यांदाच राजस्थानमधून गहू येणार आहे. यानंतर एप्र‌ि‌ल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मध्य प्रदेशातील व दुसऱ्या पंधरवड्यात गुजरातमधील नवा गहू येणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, राजस्थानमधील नवीन गव्हाचे सौदे २०००ते २२०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान झाले आहेत. यासारखीच परिस्थिती ज्वारी, मका, बाजरी यांचीही आहे.

ज्वारी, बाजरी आणि गहू याचे निम्म्याने घटलेले उत्पादन आणि आता झालेली गारपीट आम्हा शेतकऱ्यांची कंबर मोडण्यास कारणीभूत ठरली आहे. यंदा नेहमीपेक्षा परराज्यांतून अधिक गहू आयात केला जाईल व मका ज्वारीचीही तिच परिस्थिती असेल.

- सुभाष जाधव, शेतकरी

गहू, मका, ज्वारी हे पीक सर्वसाधारणपणे मराठवाड्यात घेत असतात, पण मराठवाड्यातील अनेक भागात याचे उत्पादनच गेल्यावर्षांपेक्षा ७० टक्क्यांनी घटले आहे. याचा अर्थ या तिन्ही जिन्नसांचे भाव वाढणार यात शंका नाही.

- हमीद चाऊस, शेतकरी

अन्नधान्य परपेठ आवक तुलनात्मक अभ्यास केल्यास आपण केवळ मराठवाड्यातील शेतकरी व अन्नधान्य उत्पादकांवर अवलंबून नव्हतोच. आपल्याला गहू, ज्वारी, तांदूळ यासाठी गुजराथ, मध्यप्रदेश व राजस्थानवर अवलंबून राहावेच लागायचे यंदा त्याची टक्केवारी वाढेल एवढेच कारण दुष्काळ, गारपीट व नापिकी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

- एन.ए. अधाने, स‌चिव, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३,४०० मतदारांची घुसखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिका निवडणुकीसाठी शरीफ कॉलनी वॉर्डात बाहेरचे ३,४०० मतदार घुसवले आहेत,' असा आरोप नगरसेवक मुजीब अालम शहा यांनी केला. त्यांनी बुधवारी या संदर्भातला आक्षेप अर्ज आयुक्तांच्या नावे दाखल केला.

निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रारुप मतदार याद्या तयार केल्या आहेत. या याद्यांवर आक्षेप घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुजीब अालम शहा मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी पालिकेत आले होते. आयुक्तांच्या नावे आक्षेप दाखल केल्यावर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, 'शरीफ कॉलनी वॉर्डात तब्बल ३,४०० नावे बाहेरची घुसवली आहेत. ही नावे नेहरूनगर, शताब्दीनगर, किराडपुरा भागातील आहेत. मतदारांच्या या घुसखोरीसाठी पालिका प्रशासन जबाबदार आहे. या सर्व प्रकणात मोठा प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या घुसखोर मतदारांमध्ये २८ मतदार चक्क जेएनईसी कॉलेजच्या वसतीगृहातील आहेत. या विद्यार्थ्यांचा आणि शरीफ कॉलनीचा काहीही संबंध नाही. मग ही नावे मतदार यादीत कशी. शरीफ कॉलनी वॉर्डाची लोकसंख्या ९,८३४ आहे, तर मतदार १०,९०४ देण्यात आले आहेत. हा देखील एक चमत्कारच आहे. शहरातील अन्य वॉर्डातही मतदारांची बनावट ओळखपत्रे सापडण्याची शक्यता आहे,' असे मुजीब अालम शहा म्हणाले.

घुसवलेल्या मतदारांमध्ये ७५० मतदारांचे ओळखपत्र बनावट आहेत. ज्यांचे ओळखपत्र तयार केले, त्या व्यक्तीच वॉर्डात नाहीत. त्यामुळे ही ओळखपत्रे कशी तयार केली. त्यात कोणकोण सहभागी आहे, याची चौकशी करण्याची मागणी आपण पोलिस आयुक्तांकडे करणार आहोत. बनावट ओळखपत्रे देणे हा गुन्हाच आहे. त्याची पोलिसांनी गांभीर्याने चौकशी करावी.

- मुजीब आलम शहा; नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्न मोडण्याची सुपारी महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्राच्या नातेवाईक तरुणीचे लग्न मोडण्यासाठी दोन हजार रुपयांची सुपारी घेणे नांदेडच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणीच्या भावी पतीने मित्राच्या साह्याने त्याला रेल्वेस्टेशनवर चांगलाच चोप दिला. लग्न मोडण्याची सुपारी घेणाऱ्यास उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

नांदेड येथील दीपक ठाकूर या तरुणाचे नात्यातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. तिच्या पालकांनी तिचे लग्न पैठण तालुक्यातील एका तरुणासोबत ठरवले. हे लग्न मोडण्याची जबाबदारी दीपकने त्याचा मित्र अभय गंगाधर पैतवाल (वय २५, रा. गाडीपुरा, नांदेड) याच्यावर सोपवली. त्यासाठी दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले. अभय पैतवाल तरुणीच्या भावी पतीला फोन करून तिच्याबद्दल खोटी माहिती देत होता. तिचे व दीपकचे फोटो आहे, असे त्याने सांगितले होते, तसेच लग्न न करण्याबद्दल धमकी देत होता. त्याने औरंगाबादला बुधवारी (२५ मार्च) येऊन फोटो दाखविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता अभय रेल्वे स्टेशनवर पोहचला, परंतु भावी पती व त्याच्या मित्रांनी अभयच्या स्वागताची चांगलीच तयारी केली होती. अभय समोर येताचा त्याला चोप देण्यास सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या मारामारीबद्दल नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर स्टेशनजवळ असलेले क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी अभयला सोडवून उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी अभयविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टेशनवर अफवा

रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण होत असल्याने नेमके काय झाले याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी पकडली, तरुणाचे अपहरण केले, आदी अफवा पसरल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात प्रकरण वेगळेच निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे, आपचे तळ्यात मळ्यात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळाल्यामुळे आम आदमी पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु, पक्ष पालिका निवडणुकीबद्दल अजून चाचपणीतच करीत आहे. पक्षाचे राज्य संयोजक सुभाष वारे यांनी बुधवारी (२५ मार्च) प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शहरातील ताकदीचा आढावा घेतला. या बैठकीत महापालिका निवडणुकीबाबत निर्णय होईल, अशी उपस्थितांना अपेक्षा होती; मात्र कोणताही निर्णय झाला नाही.

सुभाष वारे यांनी कोणत्या वार्डात ताकत आहे. निवडूण येण्याची शक्यता, पक्षाची प्रत्येक वार्डातील सदस्य संख्या याची माहिती घेतली. दिल्ली निवडणुकीतील विजयामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. स्थानिक नेत्यांनीही महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीमध्ये इतर पक्षांतून इच्छुकांचा ओघ सुरू झाला आहे. परंतु, पक्षाची ताकद असेल तरच निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यामुळे निर्णयाकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाव्यतिरिक्त स्वच्छ प्रतिमा असलेल्या आम आदमी पार्टीचा पर्याय मतदार स्वीकारू शकतात.

पक्षाच्या ताकतीचा आढावा घेतला आहे. २८ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत ही माहिती निर्णयासाठी मांडली जाईल. त्यानंतर निर्णय होईल. निवडणूक लढविण्यासाठी थोडी घाई होईल, पण कार्यकर्त्यांसोबत निर्णय घेणे महत्वाचे ठरणार आहे. .

- सुभाष वारे, राज्य संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर हवे

$
0
0



चौका-चौकातली असहनीय वर्दळ, हॉर्नचे आवाज, धूर ओकणाऱ्या गाड्या आणि रिक्षाचालकांचे बेशिस्त वर्तन... नव्या पिढीकरता औरंगाबादची हीच ओळख झाली आहे. पाच मिनिटांचे अंतर कापण्याकरता पंधरा मिनिटे जाऊ द्यावे लागतात, इतकी वाहतूक कोंडी असते. शहरात बोटावर मोजण्याइतकी वाहनतळे आहेत. त्यामुळे भर रस्त्यात वाहने उभी असतात. मोडकळलेली उद्याने, रस्त्यावर साचलेला उकीरडा आणि जवळपास संपूर्ण शहरातच पाण्याची समस्या यावर विचार केला तरी आम्हाला चीड येते.

वाहनतळ, मोकळे रस्ते व हॉकर्स झोन हवे

हे शहर अत्यंत सुस्त आहे. याला सर्वाधिक जबाबदार आहे ती म्हणजे इथली वाहतूक‌. मग तो जालना रोड असो की गुलमंडी चौक केवळ, वेळेचा अपव्यय असतो. सामान्य नागरिकांवर दंड आकारला जातो, मात्र एखाद्या पक्षाच्या कार्यालयासमोर वाहनांचे अतिक्रमण केले असले तरी वाहतूक पोलिस कारवाई करत नाही. चौकातली वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी वाहतूक पोलिस चलन फाडण्यात व्यस्त असतात. अतिक्रमण पथकाचे काम तर चूपचाप यायचे आणि गाड्या उचलून निघून जायचे इतकेच असते. प्रत्येक चौकात गर्दी, हॉर्नचे प्रचंड आवाज आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात याचा फटका प्रत्येकाला बसला. या समस्यांकडे पालिकेने कधीच लक्ष दिले नाही. वाहनतळ नसल्याने नागरिकही कुठेही गाड्या लावून मोकळे होतात. वाहनतळ, मोकळे रस्ते व हॉकर्स झोनकरता काम करणारे नगरसेवक हवे आहेत. - श्रेया अग्रवाल, सीएसएमएसएस ‌, कांचनवाडी

पर्यावरण व वाहतूक नियमावलींबाबत आग्रही असणारे नगरसेवक

पर्यटनाच्या राजधानीला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. पूर्वी हे शहर शांत व हिरवेगार दिसायचे. आता मात्र उजाड व भकास वाटते. वाहतुकीचे नियम केवळ कागदावरच उरले आहेत. अक्षरक्षः सायलेन्ट झोनमध्येही लोक हॉर्न वाजवत जातात. सिग्नलवर एक मिनिट काढणेही अवघड असते. किमान आपल्या वॉर्डातल्या नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाने उचलली तरी पुरेसे आहे. वाहतूक नियमावलींबाबत आग्रही असणारेच नगरसेवक शहराला हवे आहेत. औरंगाबादला पूर्वीसारखेच वलय मिळवून देण्याकरता झाडे लावायलाच हवीत व या कामात शेवटपर्यंत सातत्य असायला हवे. हा दृष्टीकोन बाळगून कोणतेच काम या शहरात झाले नाही. याउलट आहे त्या उद्यानांची वाट लागली आहे. शहराचे संतुलित पर्यावरण अबाधित राखण्याचा प्रयत्न करणारा व त्यादृष्टीने काम करणारे नगरसेवकच हवे आहेत. - गीतांजली जाधव, श्रीयश इंजिनीअरिंग

नवी कार्यशैली हवी

औरंगाबाद शहराची ओळख खड्ड्यांची शहर अशी झाली आहे. वारंवार रोष व्यक्त करूनही नगरसेवकांना आत्ता जाग आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचे काम सुरू झाले. ही कामेही नीट होत नाहीत. रस्ते बनविल्यानंतर सारखे विचारावे वाटते की इंजिनिअर कोण होता? वाहतूक कोंडी करणारे रिक्षाचालक बिनधास्तपणे त्यांचे काम करत असतात. या मनमानीचा त्रास होत असला तरी शहर बस नसल्यामुळे रिक्षाचांच आधार आहे. शहर बसमुळे किमान रस्त्यांवरची अन्य वाहनांची संख्या तरी कमी होईल व महिलांचा प्रवास सुरक्षित होईल. बससेवा सुरू व्हावी म्हणून पालिकेने प्रयत्न केले नाहीत. नागरिकांचा वेळ या गर्दीतून मार्ग काढण्यातच जात असेल तर रोष तर व्यक्त होणारच. त्यामुळे नवी कार्यशैली आणू पाहणारे व या समस्या सोडवू पाहणारे नगरसेवक हवे आहेत. - सुप्रिया श‌िंदे

मोबाईल आले पण पाणी नाही

मी राहते त्या भागात पिण्याच्या पाण्याकरता खाजगी टॅँकर पाणी पुरवते. महिन्याचे हजार रुपये पाण्यात खर्च होतात. कचराकुंडी नसल्याने नागरिक जिथे दिसतील तिथे कचऱ्याचे ढीग साचवतात. रात्रीच्या वेळी तर मुलींना एकटे जायची भीती वाटते. पथदिवे कधी कधीच सुरू नसतात. मग एक तर वाहने अंगावर यायची भीती असते किंवा अंधार असल्याने सुरक्षेचा प्रश्न असतो. रस्ते तर कधी बांधले होते हे आठवत नाही. क‌ारण कुठे सपाट जमीनच नाही. आमच्या भागात मूलभूत सुविधाच नसल्याने कुणी झाडे, उद्याने, मैदान, वाचनालय याविषयी विचार करत नाही. इतके वर्षे उलटली. घरात मोबाईल आले, डीटीएच आलेत, पण पाणी नाही. अशा परिस्थितीत या शहरात आमचे भविष्य काय असणार आहे असा विचार तर येणारच. त्यामुळे याच प्रश्नांना प्राधान्य देणारा नगरसेवक हवा आहे. - विशाखा मोरे

घोषणा पुरे आणि काम हवे

एकीकडे आधुनिक प्रगत तंत्रज्ञान न वापरता बांधलेली पाणचक्की या शहरात आहे. जी इतकी वर्षे उलटल्यानंतरही नि‌यमित काम करते. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याकरता नागरिकांची पळापळ होते. जलसंवर्धनाकरता काही ठोस उपाय करायला हवे. याकरता पालिकेकडून प्रयत्न झाले मी तरी कधी वाचले नाही. दरवर्षी उन्हाळा लागण्यापूर्वीच पाण्याचा प्रश्न असतो. आजवर घोषणांच्या पलीकडे काहीच काम झाले नाही. प्रत्येक चौकात अतिक्रमण असते. रिक्षा स्टॅँडऐवजी भलत्याच ठिकाणी रिक्षा उभ्या असतात. गंमत म्हणजे याच चौकात वाईन शॉप असतात, पण राहत्या वस्तीतल्या या शॉपकरता नगरसेवक हरकत घेत नाही. तेव्हा आता घोषणा पुरे आणि काम हवे. - कार्तिकी अजमेरा , सरस्वती भुवन महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळात गवसले जीवनाचे सूत्र

$
0
0

>>सुधीर भालेराव

शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अजित मुळे हे क्रिकेटचे मैदान गाजवित असत. कोणत्याही गोष्टीचे फारसे दडपण घ्यायचे नाही आणि खेळाचा पुरेपूर आनंद घ्यायचा हे खेळाडू जीवनातील सूत्र अजित मुळे यांनी एक व्यावसायिक म्हणून स्वीकारले आणि आज त्यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण झालेली आहे. मधुकरराव मुळे यांनी एकेकाळी बांधकाम क्षेत्रात आपल्या कामांच्या झपाट्यामुळे एक नावलौकिक प्राप्त केला होता. सचिन व अजित ही त्यांची दोन मुले. सचिन मुळे यांनी बांधकाम तसेच वाहन वितरण क्षेत्रात तर अजित मुळे यांनी ग्रीन गोल्ड कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजित मुळे यांना बांधकाम क्षेत्र खुणावत होते, परंतु आपल्या स्वभाववैशिष्ट्याला हे क्षेत्र माणवणार नाही याची जाणीव होताच त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्यासाठी दुसरे क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला.

२००१ मध्ये अजित मुळे यांनी आपले मामा विजय चौधरी यांच्या मदतीने ग्रीन गोल्ड या सिड्स कंपनीची स्थापना केली. बियाणे क्षेत्रातील जवळपास वीस वर्षांचा अनुभव विजय चौधरी यांना होता. नात्याने मामा असल्याने अजित मुळेंना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा कंपनी उभारण्याकरिता झाला. सोयाबीन आणि गहू या दोन उत्पादनांची निर्मिती 'ग्रीन गोल्ड'ने केली. वाळूज-लिंबेजळगाव रोडवर जवळपास ६० एकर जागेत 'ग्रीन गोल्ड'ची उभारणी करण्यात आलेली आहे. कंपनीच्या प्रारंभापासूनच त्यांनी संशोधनावर भर दिला. संशोधनासाठी तब्बल २५० एकरवर रिसर्च सेंटर उभारले. संशोधनातून निर्मिती केलेल्या सोयाबीन व गहू या वाणांमुळे त्यांना कृषी व्यापारपेठेत जम बसवण्यास मोलाची मदत झाली. सोयाबीन व गहू बियाणांत या कंपनीने आघाडीच्या तीन कंपन्यांत स्थान मिळविलेले आहे. पुढे त्यांनी कॉटन क्षेत्रात पाऊल टाकले. भाजीपाला बियाणांचीही त्यांनी संशोधन करुन निर्मिती केली. चवळी व गवार या त्यांच्या उत्पादनांला चांगली मागणीही आहे. विठ्ठल, कुबेर व वर्धन या तीन वाणांनी कॉटन क्षेत्रात त्यांना नावलौकिक मिळवून दिला.

ग्रीन गोल्ड कंपनीच्या माध्यमातून अजित मुळे यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारचे ३० उत्पादने तयार केली आहेत. कंपनीच्या उभारणीपासून त्यांनी अनेक चढउतार अनुभवले. संकटकाळात सोयाबीन व गहू या उत्पादनांनी कंपनीला तारले, असे ते आवर्जून सांगतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये त्यांच्या उत्पादनांना नेहमी मागणी असते.

वेगवेगळ्या राज्यातील हवामानाची परिस्थिती ही भिन्न असते. बियाणे निर्मिती करताना कोणत्याही हवामानात शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल, असे वाण निर्मिती करण्याच्या संशोधनावर कंपनीचा भर आहे. ऑइल व प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने त्यांच्या सोयाबीन बियाणाला गेल्या काही वर्षांत मागणी वाढली आहे. तसेच सोयाबीनचे भाव हे स्थीर असल्याने शेतकऱ्यांना याचे उत्पादन परवडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येते, असे अजित मुळे यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात जम बसवल्यानंतर अजित मुळे यांनी भूषण पाटील यांच्यासमवेत भागिदारीत चार एकर परिसरात निर्माण गोल्ड अॅलॉइज व निर्माण गोल्ड प्लास्टिक या दोन कंपन्या २०११ मध्ये सुरु केल्या. इंजिनिअरिंग तसेच प्लास्टिक मोल्डिंगची कामे या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ते करीत आहेत. नामांकित इंजिनिअरिंग कंपन्यांसाठी ते सप्लाय करतात.

उद्योग क्षेत्र हे नेहमी चढउताराचे क्षेत्र असते. त्यात बियाणे क्षेत्रात काम करणे हे खूपच आव्हानात्मक आहे. या दोन्ही क्षेत्रात काम सुरु केले तेव्हा कंपनीची स्वतःची जागा नव्हती. भाडेतत्त्वावर जागा घेऊन त्यांनी उद्योगाला सुरुवात केली. आज हे तीन्ही उद्योग हे स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरु आहेत. या तीन्ही उद्योगांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतरही त्यांनी वडिलांकडून मिळालेला बांधकाम क्षेत्रातील वारसा कायम ठेवला आहे. कमीत कमी दर आणि दर्जेदार उत्पादन हे आजच्या काळाची गरज बनली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी या गोष्टींना फाटा देऊन जमत नाही. भविष्यात कृषी क्षेत्रात अधिक व्यापक काम करण्याची एका योजनेवर काम सुरु असल्याचे अजित मुळे यांनी सांगितले. व्यवसाय म्हटला की ताणतणाव आलाच. इतरांप्रमाणे मलाही टेन्शन येते. परंतु, कठीण प्रसंग संयमाने हाताळले तर यश हमखास मिळते हा माझा अनुभव आहे आणि हेच माझ्या यशाचे सूत्र आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सामाजिक कामांची आवड

औद्योगिक क्षेत्रात काम करताना अजित मुळे यांना क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ असला तरी ज्युदो खेळाला त्यांनी मोठी चालना दिली आहे. विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीही त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवार योजनेसाठी २७२९ कोटी रुपयांची गरज

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी मराठवाड्यातून १,६८२ गावांची निवड करण्यात आली असुन प्रत्येक गावांच्या आराखड्यानुसार विभागात २७२९.४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये माती बांध तयार करणे, शेततळे तयार करणे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, वृक्ष लागवड, नाला खोलीकरण व सरळीकरण, ग्रेडेड बंडिंग व गाळ काढणे, शेततळे बांधणे आदी कामांच्या माध्यमातून दुष्काळ निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शासनाने गावांची निवड केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये शिवार भेट देऊन कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये गावाची भौगोलिक रचना, गावातील पाण्याचे स्त्रोत, पशुधन, पिकांसाठीचे पाणी, पिण्यासाठी आवश्यक असलेले पाणी या संदर्भाचा अभ्यास करण्यात आला असून १२७४ गावांमध्ये ३७७३ कामांची सुरूवातही करण्यात आली आहे. यापैकी ५२२ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये एकात्मिक पानलोट विकास, सिमेंट नाला बांधसाठी मिळालेला निधी, जिल्हा नियोजन तसेच इतर शासकीय योजनांमधून मिळालेला निधी कामांसाठी खर्च करण्यात आला आहे.

आज मुख्यमंत्री घेणार उद्योजकांची बैठक

राज्यामध्ये असलेल्या उद्योजकांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंडाच्या माध्यमातून जलयुक्त शिवारातुन कामे घ्यावी या संदर्भात शुक्रवारी (२७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. मराठवाड्यात अभियानासाठी १६४० रुपयांची तूट असून यापैकी किमान ७०० ते ८०० कोटी रुपयांची कामे सीएसआर मधून होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images