Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धान्य खरेदी महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळा सुरू झाल्याने बाजार समिती व जुन्या मोंढ्यात वार्षिक धान्य खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे यावर्षी धान्याचे भाव चढे असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व धान्याचे भाव प्रति किलो सरासरी १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिक वर्षभराचे धान्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जुना मोंढा आणि जाधववाडीतील व्यापाऱ्यांनी गेल्या महिन्यात भरविलेल्या तांदूळ महोत्सवात विक्रमी विक्री झाली. त्यापाठोपाठ आता वार्षिक खरेदीला सुरुवात झाली आहे. कृष‌ी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपासून दररोज सरासरी २२५ क्विंटल गहू, २५० क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगाव व सोलापूर जिल्ह्यातून ज्वारीची आवक होत आहे. बाजरीची आवक घटली असून दररोज सरासरी सुमारे ४० ते ५० क्विंटल बाजरी येत आहे. गव्हाची आवक मराठवाडा, इंदूर, राजस्थान, आणि गुजरातमधून होत आहे.

गहू सुमारे १४५० ते २८०० रुपये क्विंटल या दरम्यान ‌विकले जात आहे. तूर डाळ ४६०० रूपये ते ५४०० रूपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजार समितीत विकली जात आहे. हरभरा ३२०० रुपये क्विंटल ते ३६०० रुपये क्विंटल या दराने विकले जात आहे. बाजारीचे दर १२४० ते १४५० या दरम्यान आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणारे ग्राहक हैराण झाले आहेत.

राजस्थानी आडत्यांची भूमिका महत्वाची

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जुन्या मोंढ्यातील खरेदी-विक्रीत राजस्थानचे आडते महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर गव्हाची आवक आहे. परंतु, ग्राहकांची मागणी मध्यप्रदेशाच्या गव्हाला आहे. सध्या दहापेक्षा जास्त प्रकारचे गहू उपलब्ध आहेत. लोकवन, शरबती, सिहोर या गव्हाला अधिक मागणी आहे. या गव्हाचे दर साधारणत: २८ ते ३८ रुपये किलो दरम्यान आहेत.

गहू २८ ते ३५ रुपये किलो

तांदूळ ३८ ते ६० रुपये किलो

ज्वारी १६ ते २३ रुपये किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीतील उपकरणांचा उद्यापर्यंत निकाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीमध्ये तब्बल पाच वर्षांपासून नसलेले तीन कोटी रुपयांचे लिथोट्रिप्सी, वर्षानुवर्षे प्रतीक्षा असलेले डिजिटल मॅमोग्राफी, दाताच्या डिझाईनपासून निर्मितीपर्यंत सर्व काही अत्यल्प वेळेत पूर्ण करणारे डेंटल कॅड-कॅम दंत महाविद्यालयाला मिळणे प्रतिक्षेत आहे. याशिवाय व्हेंटिलेटर, डिफ्रिबिलेटर, हिमोडायलिसिस मशीन आदी सुमारे दहा कोटींच्या उपकरणांची प्रतीक्षा असून, यापैकी नेमकी किती उपकरणे मिळणार, हे मंगळवारपर्यंत (३१ मार्च) स्पष्ट होणार आहे.

या संदर्भात राज्य खरेदी समितीच्या बैठका मागच्या दोन ते तीन आठवड्यांत मुंबईमध्ये झाल्या. यामध्ये विविध उपकरणांवर सविस्तर चर्चा झाली असून, अनेक उपकरणांचा मार्ग मोकळा होणार आहे. शस्त्रक्रिया विभागातील लिथोट्रिप्सी उपकरण कायमस्वरुपी नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. मुतखड्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे हे उपकरण नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. राज्य खरेदी समितीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये एकाच कंपनीने निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याचे समजते आणि कमीत कमी तीन कंपन्यांचा सहभाग आवश्यक असतो. त्यामुळे हे उपकरण यंदाही दूर जाते का घाटीला मिळते हे मार्चअखेरपर्यंत स्पष्ट होणार आहे. तसेच २६ व्हेंटिलेटरपैकी किमान डझनभर तरी मिळतील, अशी अपेक्षा केली जात आहे. स्तनांच्या कर्करोगाच्या निदानासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे डिजिटल मॅमोग्राफी हे दोन कोटींचे उपकरण यंदा तरी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. घाटीकडे डिफ्रिबिलेटरची अत्यल्प संख्या लक्षात घेता यंदा २० उपकरणांपैकी किती मिळणार, हिमोडायलिसिसच्या पाच उपकरणांपैकी किती मिळणार, 'एनआयसीयू'साठी १५ बबलसीपॅक उपकरणांपैकी किती मिळणार, हे ३१ मार्चपर्यंत स्पष्ट होणार आहे.

सव्वाकोटी रुपयांचे 'कॅड-कॅम' प्रभावी

एका तासांत कृत्रिम दात तयार करणारे डेंटल कॅड-कॅम या एक कोटी ३० लाखांच्या उपकरणाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच्या राज्य खरेदी समितीच्या बैठकीत हे उपकरण मिळू शकते, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन जिल्ह्यावर केला सवलतींचा वर्षाव

0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

राज्य सरकारने सिंधूदुर्गनंतर औरंगाबाद जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित केले आहे. पर्यटन राजधानीचा दर्जा असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी ही घोषणा पर्वणी ठरणार आहे. शासकीय धोरणानुसार हॉटेल्स, उद्योग, टूर व्यावसायिक आणि पर्यटन उद्योगांना विशेष सवलती मिळणार आहेत. पर्यटनस्थळांना प्रकाशझोतात आणतानाच उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

पर्यटन विस्तारासाठी राज्य सरकारने २००६ मध्ये 'पर्यटन जिल्हा' धोरण तयार केले. याअंतर्गत सिंधूदुर्ग जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित करून पर्यटन व्यवसायाला गती देण्यात यश मिळाले. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वेरूळ-अजिंठा लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला, ऐतिहासिक दरवाजे, लहान-मोठे किल्ले, अभयारण्य असा समृद्ध वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित केल्यामुळे पर्यटन विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. 'जागतिक वारसास्थळ असल्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा औरंगाबादला पूर्वीच मिळाला आहे. आता पर्यटन जिल्हा झाल्यामुळे पर्यटन व्यवसायाला अधिक वाव मिळेल' असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया यांनी 'मटा'ला सांगितले. पर्यटनस्थळांना जागतिक पातळीवर पोहचवताना पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे. शिवाय पर्यटनपूरक उद्योग आणि सेवा क्षेत्राला विशेष सवलती मिळणार आहेत.

हॉटेल्स, उद्योग, टूर-ट्रॅव्हल्स व्यवसाय, टूर ऑपरेटर आणि पर्यटन उद्योगांना कर सवलत दिली जाणार आहे. रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक आणि इतर पायाभूत सुविधांसाठीही विशेष निधी उपलब्ध केला जाणार आहे. महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे प्रकाशझोतात आणण्यासाठी प्रचार व प्रसारावर भर दिला जाणार आहे. कर सवलतीमुळे पर्यटन व्यवसाय व उद्योगांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

रोजगार निर्मितीचे लक्ष्य

वेरूळ-अजिंठा लेणी विकासासाठी जपानची वित्तीय संस्था ९२० कोटी रुपये निधी देणार आहे. तर पर्यटन जिल्ह्यात सवलती देऊन मोठ्या उद्योगांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन वारसा लाभला आहे. पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटन वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. सिंधूदुर्गप्रमाणे औरंगाबाद जिल्हा जागतिक स्तरावर प्रकाशात आणू.

- पराग जैन नैनुटिया, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी

२००६ मधील पर्यटन जिल्हा धोरणानुसार औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग-व्यवसायांना पुरेशा सवलती मिळणार आहेत. सेवा आणि उद्योग क्षेत्राला विशेष फायदा होईल. याबाबत लवकरच अध्यादेश जारी होणार आहे.

- सतीश सोनी, सहव्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद : टंचाईच्या झळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दिवसेंदिवस उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आता टँकरची मागणीही वाढू लागली आहे. सध्या ५१ टँकरद्वारे जिल्ह्यातील ४३ गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच विहिर, कूपनलिकांच्या अधिग्रहणाचा आकडा ३५० इतका झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट भेडसावत आहे. दरवर्षी मार्च महिन्यात पाण्यासाठी ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागते. उस्मानाबाद जिल्ह्यावरील दुष्काळाचे दृष्टचक्र संपता संपत नाही. यंदा तर मार्च महिना संपत असतानाच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. जिल्ह्यातील लोहारा तालुक्याशिवाय सर्वच तालुक्यात टँकरची मागणी वाढत आहे.

सध्या जिल्ह्यात ५१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये १४ शासकीय आणि ३७ खासगी टँकरद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविली जात आहे. तर कांही गावांतून टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून वाढत आहे.

सध्या जिल्ह्यातील १९८ गावातील ३५० विहिर व कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने आता कुपनलिका बंद होण्याची संख्याही वाढू लागली आहे. पूर्वी जिल्ह्यात ३०० ते ४०० फूट खोलीवर कुपनलिकेला पाणी लागायचे. सध्या हे प्रमाण ७०० फुटाच्या पुढे गेले आहे. तरी देखील कुपनलिका खोदण्याचा (खोदाई करण्याचा) नागरिकांचा मोह आवरताना दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे गावातील पाणी साठे आटत चालले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या

तालुका गावे टँकर

उस्मानाबाद ६ ६

तुळजापूर ५ ५

उमरगा ४ ५

कळंब १४ १७

भूम १० १३

वाशी ३ १

परंडा १ १

एकूण ४३ ५१

तालुकानिहाय विहिर, कूपनलिकेचे अधिग्रहण

तालुक्याचे नाव गावे अधिग्रहण

उस्मानाबाद ५३ १०५

तुळजापूर २४ ३६

उमरगा १२ १६

लोहारा २५ ५६

कळंब ४४ ७९

भूम १७ २०

वाशी ०८ १२

परांडा १५ २६

एकूण १९८ ३५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायता निधीचा वायदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग तीन वर्षांपासूनची दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क माफ करावे, त्यासाठी आपत्कालीन सहायता निधीत साडेतीन कोटींची तरतूद करावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. त्यावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही मागणी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक रविवारी (२९ मार्च) महात्मा फुले सभागृहात कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत २०१५-१६च्या २१६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत शुल्क माफीचा मुद्दा चांगलाच गाजला. विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. सतत तीन वर्ष मराठवाड्यात दुष्काळ आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही भरणे अवघड झाले आहे. याबाबी लक्षात घेत विद्यापीठाने तत्काळ शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवावा. तसेच आपत्कालीन सहायता निधीत साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करावी. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली होती. परंतु, या बैठकीत त्याबद्दल निर्णय झाला नाही. या बैठकीत कुलगुरू, कुलसचिवांच्या निवासस्थातील जीमसाठीची तरतूद, बीसीयुडींच्या दालनावर होणारा लाखो रुपयांचा खर्च आदी मुद्दे चर्चेला आली. सदस्यांनी केलेल्या कपात सूचना केवळ कागदापुरत्याच असल्याचे समोर आले. निवासस्थानी उभारण्यात येणाऱ्या ज‌िमसाठीची तरतूद असली, तरी ज‌िम उभारणार नसल्याचे कुलगुरूंनी सांगितले. बीसीयुडीच्या दालनावर होणाऱ्या खर्चावरही सदस्यांनी जाब विचारला. चर्चेत डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. पंडित तुपे, प्रा. संभाजी भोसले, प्रा. गजानन सानप, डॉ. गनी पटेल, डॉ. धर्मराज वीर, डॉ. दिलीप खैरनार, संजय निंबाळकर, लखनलाल भुरेवाल यांनी सहभाग घेतला.

विलासराव देशमुखांचे नाव

विद्यापीठात आठ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या डिजिटल स्टुडिओला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या चर्चेत अण्णासाहेब खंदारे, भाऊसाहेब राजळे, डॉ. रवींद्र दळवी यांनी सहभाग घेतला.

कपात सूचनांचा देखावा

अर्थसंकल्पीय बैठकीत सदस्यांकडून मांडलेल्या १२ कपात सूचना म्हणजे देखावा असल्याचे दिसले. डॉ. शिवाजी मदन यांनी कपात सूचना मागे घेण्याचे सदस्यांना सांगितले. यानंतर सदस्यांनी कपात सूचना मागे घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलमंडी सोडायचीच नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमंडी हे जर शहराचे नाक असेल तर नाक पकडण्याची हीच वेळ असून गुलमंडीवरच आपला खेळ आहे. काय पकडायचे व काय सोडायचे हे आमच्यावर सोडा, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी (२९ मार्च) खा. दानवे यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

उद््घाटनप्रसंगी झालेल्या भाषणामध्ये किशनचंद तनवाणी यांनी गुलमंडी हवी असेल तर त्यांना सोडून देऊ, मात्र इतर जागांबाबत सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, असे विधान केले. यावर दानवे यांनी गुलमंडी सोडण्याची भाषा करू नका, असे स्पष्ट केले. युतीबाबत दानवे म्हणाले की, 'औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती व्हावी, अशी भूमिका दोन्ही पक्षांची आहे. या संदर्भात आतापर्यंत तीन ते चार वेळा बैठका झाल्या असून, युतीबाबत ४ एप्रिलपर्यंत निर्णय केला जाईल. ज्या जागांबाबत अडचणी आहेत त्याबाबतचा अहवाल स्थानिकांनी वरिष्ठ स्तरावर पाठवल्यानंतर या जागांबाबत निर्णय घेण्यात येईल.' ते पुढे म्हणाले की, देशात, राज्यात आपले सरकार आहे. औरंगाबाद महापालिकेमध्येही भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा, असे सर्वांचे स्वप्न आहे, मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या पक्षामध्ये गर्दी आहे, ‌पक्षाच्या तिकीटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तिकीट मात्र एकालाच मिळणार. त्यामुळे तिकीट जाहीर झाल्यानंतर गर्दीचे रुपांतर हे मतांमध्ये झाले पाहिजे.'

मध्यवर्ती कार्यालयाच्या उद््घाटनप्रसंगी रविंद्र भुसारी, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे तसेच विजया रहाटकर, बापू घडामोडे, श्रीकांत जोशी, संजय जोशी, बसवराज मंगरुळे, अनिल म‌करिये, प्रशांत देसरडा आदींची उपस्थिती होती.

गुंडगिरी कुणाची?

शहरातील निवडणुका या सुरक्षा, विकासाच्या मुद्यावर लढण्यात येणार आहेत. शहरातील राजकारणातील गुंडगिरी ही थांबवली पाहिजे, असे वक्तव्य दानवे यांनी केले. ही गुंडगीरी नेमकी कुणाची आहे, असे त्यांना विचारले असता त्यांनी केवळ राजकीय गुंडगिरी असे सांगितले.

सर्कशीचा मीच रिंगमास्टर

सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. आपल्याला पक्षाचे कुटुंब नियोजन करायचे नाही. ज्याला पक्षात यायचे त्याला येऊ द्यावे, मात्र नव्याने पक्षात येणाऱ्या प्राण्यांना इतरांप्रमाणेच खाना-दाना देण्यात येईल. सर्कशीचा रिंगमास्टर मीच आहे. प्रशांत बंब यांच्यासारखे काही लोक पक्षात नवीन आहेत, मात्र ते त्यांची व्यवस्था स्वतःच करतात, असे दानवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य खरेदी महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळा सुरू झाल्याने बाजार समिती व जुन्या मोंढ्यात वार्षिक धान्य खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे यावर्षी धान्याचे भाव चढे असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व धान्याचे भाव प्रति किलो सरासरी १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिक वर्षभराचे धान्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जुना मोंढा आणि जाधववाडीतील व्यापाऱ्यांनी गेल्या महिन्यात भरविलेल्या तांदूळ महोत्सवात विक्रमी विक्री झाली. त्यापाठोपाठ आता वार्षिक खरेदीला सुरुवात झाली आहे. कृष‌ी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपासून दररोज सरासरी २२५ क्विंटल गहू, २५० क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगाव व सोलापूर जिल्ह्यातून ज्वारीची आवक होत आहे. बाजरीची आवक घटली असून दररोज सरासरी सुमारे ४० ते ५० क्विंटल बाजरी येत आहे. गव्हाची आवक मराठवाडा, इंदूर, राजस्थान, आणि गुजरातमधून होत आहे.

गहू सुमारे १४५० ते २८०० रुपये क्विंटल या दरम्यान ‌विकले जात आहे. तूर डाळ ४६०० रूपये ते ५४०० रूपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजार समितीत विकली जात आहे. हरभरा ३२०० रुपये क्विंटल ते ३६०० रुपये क्विंटल या दराने विकले जात आहे. बाजारीचे दर १२४० ते १४५० या दरम्यान आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणारे ग्राहक हैराण झाले आहेत.

राजस्थानी आडत्यांची भूमिका महत्वाची

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जुन्या मोंढ्यातील खरेदी-विक्रीत राजस्थानचे आडते महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर गव्हाची आवक आहे. परंतु, ग्राहकांची मागणी मध्यप्रदेशाच्या गव्हाला आहे. सध्या दहापेक्षा जास्त प्रकारचे गहू उपलब्ध आहेत. लोकवन, शरबती, सिहोर या गव्हाला अधिक मागणी आहे. या गव्हाचे दर साधारणत: २८ ते ३८ रुपये किलो दरम्यान आहेत.

गहू २८ ते ३५ रुपये किलो

तांदूळ ३८ ते ६० रुपये किलो

ज्वारी १६ ते २३ रुपये किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-BJP : ५ वी बैठकही ‘फेल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपची युती करण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांची पाचवी बैठकही रविवारी फेल झाली. अखेरचा प्रयत्न सोमवारी करण्यात येणार आहे, पण चार जागांवर अडलेली युती अखेरीस मुंबईतूनच निश्चित होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना - भाजपच्या नेत्यांनी युतीबद्दल सकारात्मक मते व्यक्त केली. स्थानिक नेत्यांनी बसून युतीचा निर्णय घ्यावा, असे सांगितले. गेल्या दहा दिवसांत स्थानिक नेत्यांच्या चार बैठका झाल्या. त्यात कोणते वॉर्ड कुणाला घ्यायचे यावरच चर्चा झाली. सुरुवातीला शिवसेनेने ५८-५१ चा फॉर्म्यूला मान्य केला; पण गुलमंडी, राजाबाजार, सिडको - एन सहा आणि मयूरपार्क या चार वॉर्डांमधून दोन्ही पक्षांत मतभेद कायम आहेत. रविवारी पाचवी बैठक झाली. शिवसेनेकडून महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय सिरसाट, अंबादास दानवे, सुहास दाशरथे तर भाजपकडून आमदार अतुल सावे, भगवान घडमोडे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, शिरीष बोराळकर, भागवत कराड हे उपस्थित होते. बैठकीत चार जागांवरून ताणाताणी झाली. भाजपची ५१ जागांवर लढण्याची तयारी दाखवू शकते. पण शिवसेनेने ४७ पेक्षा एकही जागा जास्त सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चौथी बैठक फिस्कटली होती. त्याचीच पुनरावृत्ती पाचव्या बैठकीत झाली. दोन तास झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. वरील चार वॉर्डांवर भाजपने दावा केला आहे. शिवसेना त्या जागा सोडण्यास तयार नाही.

सोमवारी स्थानिक नेत्यांची सहावी बैठक होईल. त्यात निर्णय होण्याची शक्यता फार कमी आहे. निर्णय झाला नाही तर शनिवारपर्यंत मुंबईतून युती जाहीर केली जाईल. पाच बैठका फेल झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये मात्र घालमेल वाढली आहे.

दोन जागांवरून जागावाटपाविषयी दोन्ही पक्षांत किरकोळ मतभेद आहेत. मात्र, उर्वरित वॉर्डांच्या याद्या निश्चित होतील. सोमवारी बैठक होईल. त्यातही तोडगा निघाला नाही, तर मुंबईतून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून युतीची घोषणा होईल.

- प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगराध्यक्षाच्या वडिलांनी जाळली तक्रारकर्त्याची झोपडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

माहूरच्या नगराध्यक्षा गौतमी कांबळे यांच्या लाच प्रकरणी तक्रार ‌दिलेल्याची झोपडी नगराध्यक्षाच्या वडिलांनी जाळली. ही घटना रविवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. यामध्ये दुरुस्तीसाठी आलेले १२ टीव्ही, पलंग, कपडे, संसार उपयोगी साहित्य व रोख तीन हजाराची रक्कम असा एकूण १ लाख ५० हजाराचे साहित्य जळाले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचखोर नगरध्यक्षा गौतमी कांबळे यांचे वडील सारंगधर बबुशा कांबळे, चुलते दत्त बबुशा कांबळे, भारत बाबुशा कांबळे या तिघांनी संगनमत करून लाचलुचपत प्रकरणातील फिर्यादी केशव गणपत भगत यांचे घर जाळले. भगत हे झोपडीतच मेकॅनिकचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री त्यांची झोपडी जाळली अशी तक्रार दिल्यावरून माहूर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नगराध्यक्षांच्या वाडिलासह त्यांच्या चुलत्याला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. याघटनेचा तपास उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. अरुण जगताप व त्यांचे सहकारी कुमरे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मामाने केला अल्पवयीन भाचीचा विनयभंग

0
0

नांदेडः पळसपूर येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन भाचीचा मामानेच विनयभंग केला. नात्याला कलंक लावणाऱ्या मामाविरुद्ध हिमायतनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी अवधूत दत्ता वानखेडे याने आराम करण्यासाठी म्हणून अंथरून टाकावयास लावले. त्यानंतर १२ वर्षाच्या भाचीची छेडछाड केली. नराधम मामाच्या या वागण्याने पीडित मुलीने आरडा-ओरड केली. तिच्या आवाजाने शेजारी राहणारी आजी धावून आली. दोघींनी घडलेली घटना मुलीच्या आईला कळविली. त्यानंतर हिमायतनगर पोलिस स्थानकात मामाविरुद्ध फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी मामा अवधूत दत्ता वानखेडे याच्यावर कलम ३५४ अन्वये विनय भंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ पकडून गजाआड करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रफिक निघाले पुन्हा मोहिमेवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट व चौथ्या क्रमांकाचे शिखर ल्होत्से सर करण्यासाठी निवड झालेले पोलिस कॉन्स्टेबल शेख रफिक ताहेर यांना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते तिरंगा झेंडा व महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज प्रदान करण्यात आला.

खुलताबाद पोलिस ठाण्यातील शेख रफिक गिर्यारोहण या साहसी क्रीडाप्रकारात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, प्रदीर्घ अनुभव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलातील आघाडीचा गिर्यारोहक असा लौकिक मिळविला आहे. त्यांची एव्हरेस्ट व ल्होत्से मोहिमेसाठी निवड झाली आहे. ते ७ एप्रिलपासून काठमांडू येथून सुरुवात करणार आहेत. या मोहिमेसाठी प्रत्येक भारतीयांचा अभिमान असणारा तिरंगा झेंडा व महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज जगातील सर्वोच्च शिखरावर फडकणार आहे, त्यासाठी आर्थिक मदत करून अनेकांनी या मोहिमेला बळ दिल्याबद्दल रफिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक अमितेश कुमार, बिग्रेडियर एस. यु. दशरथ, कर्नल राजेश नायर, हरीश जेकेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या प्रेरणेतून, या मोहिमेचे विशेष सल्लागार व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, शिवलाल पुरभे, शेख अश्पाक ताहेर, संजय रोडगे, सय्यद शाहेद हमीद, विनोद नरवडे पाटील, रंजन गर्गे, स्वप्नील चकोले, कल्पेश पाटील, विकास लाटे, विलास पाध्ये, सुरेंद्र शेळके, शेखर बाबू यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्याच्या अंगावर घातला वाळूचा ट्रक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने वाळुच्या रॉयल्टीची मागणी करणाऱ्या तलाठ्यास मारहाण करून अंगावर ट्रक घातल्याची घटना तालुक्यातील पैठणखेडा येथे घडली. पैठणखेडा येथील तलाठी श्रीधर जमादार सोमवारी (३० मार्च) कार्यालयात दैनंदिन काम करत असताना कार्यालयासमोरून एम. एच. १५, सी. के. २४४२ या क्रमांकाचा ट्रक वाळू घेऊन जाताना दिसला. त्यांनी ट्रकला अडवून चालकाकडे रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली. पण चालकाने पावती न दाखवताच जमादार याच्यासोबत हाणामारी करून ट्रक तेथेच रिकामा केला व ट्रक घेवून पळ काढला. जमादार यांनी ट्रकचा पाठलाग करत बाभूळगाव पुलाजवळ ट्रकला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा ट्रकचालकाने त्यांच्या अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाला थाप मारून चार लाख पळवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

लासूरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांच्या चालकाला थाप मारून स्कॉर्पिओ गाडीतून चार लाख रुपयांची रोकड पळवण्यात आली. ही घटना सोमवारी (३० मार्च) पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात घडली.

मनाजी मिसाळ यांनी सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास खासगी कामासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामधून चार लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर ते स्कॉर्पिओ गाडीतून (एम. एच. २०, बी. डी. १११) पंचायत समिती कार्यालयात आले. त्यांनी गाडी कार्यालयाच्या डाव्या बाजुच्या मोकळ्या जागेत उभी केली होती. गाडीच्या समोरील सीटखाली कॅरीबॅगमध्ये रक्कम ठेवून ते कार्यालयात गेले. त्यावेळी अज्ञात व्यक्तिने चालक शेख याला 'तुला साहेबांनी बोलावले आहे,' असे सांगितले. त्यामुळे शेख कार्यालयात गेले, ही संधी साधून चोरट्याने गाडीची काच फोडून पैशाची पिशवी लांबवली. पंचायत समिती सदस्य शिवाजी आधुडे व रामदास वाघ यांनी गाडीतून कोणीतरी बॅग पळवल्याचे मिसाळ यांना सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन, एपीआय आर. एम. जाधव., प्रकाशकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बँकेत जाऊन चौकशी केली. दरम्यान मिसाळ यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना

गेल्या आठवड्यात सोमवारी तहसील कार्यालयाच्या परिसरात सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता खांडगौरे यांची एक लाख रुपयांची बॅग दुचाकीस्वारांनी हिसकावली होती. या घटनेमध्येही दुचाकीस्वारांचा हात असल्याचा संशय आहे. यामुळे नागरिक भीती व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारण समितीत १० योजनांना मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक झाली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न करता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली.

श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पळशी, इटावा, नारायणपूर, आडूळ, शेकटा, आडगाव (पि), अमदाबाद, मोहरा, टाकळी (ता.कन्नड) या गावांना अंजना पळशी धरणातून पाणीपुरवठा योजना, पिसादेवी, बोरगावबाजार, हिरडपुरी, गवळी शिवरा आदी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या योजनेतून संबंधित गावाची योजना पूर्ण होताना अर्थसहाय्य केले जाते. ५० टक्के रक्कम केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारकडून दिली जाते. योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते.

गावे निवडताना गरज, जलस्त्रोत उपलब्धतता याचे सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळ आहे. जलस्त्रोत आटत चालले आहेत. मे महिन्यात चारा टंचाईही भासण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काही निर्णय घेण्याऐवजी केवळ दहा योजनांना मंजुरी देण्यात आली. योजनांची मंजुरी हा प्रशासकीय विषय आहे. त्याऐवजी पाणीपुरवठा व जलव्यवस्थापनासाठी विशेषतः दुष्काळी उपायोजना करताना धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही.

१२५ उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातून ३२० गावांचे सर्वेक्षण करून गावे निवडण्यात आली होती. पुढील आर्थिक वर्षात यापैक १२५ गावांत योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांमधल मतभेद, गावांची निवड करताना सदस्यांकडून होणारा त्रास लक्षात घेता पुढील काळात गावे निवडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७ जणांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’

0
0

धनंजय कुलकर्णी

सातजण शालेय जीवनापासून एकत्र. कॉलेज सोडल्यानंतरही समाजकार्याच्या हेतूने गेल्या १५ वर्षांपासून कुठेही स्वत:चे नाव प्रसिद्धीच्या झोतात न येऊ देता काम करत आहेत. गर‌जूंना वस्तू, अपंगांना सायकल, वैद्यकीय सहकार्यासाठी एक अॅम्बुलन्सही त्यांनी विकत घेतली. दर हिवाळ्यात शॉल, स्वेटर वाटप असो की एखाद्याला आर्थिक मदत असो... आपली दोस्ती दिलदारपणे निभावत ते दुनियादारी करत आहेत. त्या विषयी....

दिल, दोस्ती जुळून आली की, दुनियादारीही आपोआप काही ना काही शिकवून जातेच. अशाच सात जणांना एकदा एका ओळखीच्या व्यक्तिसाठी वैद्यकीय मदत हवी होती. सगळ्यांना मदत करणाऱ्या एका संस्थेकडे मदत मागायला गेले. तेव्हा त्या संस्थेने मदत झिडकारली आणि तिथेच दुनियादारी काय असते हे यांना कळाले. त्या प्रसंगाने म्हणा किंवा आलेल्या शहाणपणाने त्यांनी आपलाच ग्रुप स्थापन केला. औरंगाबाद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी असे रीतसर त्याचे नावही ठेवले आणि त्यातून गरजूंना, अडल्या नडलेल्यांना मोफत मदत करायची हा निर्धार झाला.

या निर्धाराने लक्ष्य तर ठरले, पण आर्थिक बाजू सांभाळयची कशी आणि कोणत्या क्षेत्रात काम करायचे कुठे फोकस करायचे यासाठी जरा वेळ लागला. अॅम्बुलन्स मोफत पुरवणे, रक्तदान शिबिर आणि अपंगांना-गरजूंना आर्थिक मदत यावर लक्ष्य केंद्रीत झाले. सेंट फ्रान्सिस स्कूल जालना रोड येथे पहिली ते दहावी शिक्षण घेतलेले हे सात जण आज बँक, फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, बिझनेस, इन्शुरन्स कंपनीत अधिकारी आणि उद्योजक आहेत. आज आपल्या संस्थेसाठी त्यांनी स्वत:ची अॅम्बुलन्स घेतलीय, ती ते अडल्यानडलेल्यांना मोफत देतात. एकदा २००७ साली एकाला रक्ताची गरज होती, तेव्हा रक्त लवकर मिळेना म्हणून २००७ पासून रक्तदान शिबिर घेऊन दरवर्षी किमान १०० ते जास्तीत जास्त २५० रक्तदात्यांचे रक्तसंकलन करून त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रक्तपेढीशी सं‌लग्नित होऊन हे समाजकार्य काम केले. हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो किं, बुद्ध कोणत्याही धर्माचा जातीचा या सात जणांना कधीही अडसर झाला नाही. गरजू मुलींना शिलाई मशिन, अपंगांना ‌तीनचाकी गाड्या व बेरोजगारांना हातगाड्या वाटप करून समाजकार्याचा आवाका आणखी वाढवला. दर हिवाळ्यात गरजूंना शाल, स्वेटर वाटप याच समुहाने शहरातील काही गरीबांना कपडेही वाटप केले. कामाचे स्वरूप आणि त्यातील प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा पाहून या सात जणांना सुमारे १५० मित्रांसह ३०-४० नातेवाईकांचा समूहही कधी सहकार्य करू लागला हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. या कामी विविध डॉक्टर्सचा हातभार लागला. गरजूंना या सात जणांमुळे अनेक डॉक्टरांनी त्यांची फी देखील माफ केली. गेल्या दहा वर्षांत या मित्रांनी त्यांच्या पगारातून, एफडीतून, सेव्हिंग्ज खात्यावरील व्याजातून पैसा जमा केला आहे. मुस्लिम धर्मात जकात, रमजान ईद देणगी अशा काही संकल्पना आहेत. त्याद्वारे मुस्लिमधर्मीय पैसा, देणगी देतात. या माध्यमातून या मित्रांनी निधीची कमतरता दूर केली. ही सगळी मदत मासिक, अर्धवार्षिक, वार्षिक या स्वरूपात गोळा केली जाते. हे सातजण आज वय वर्षे २८ ते ३२ या वयोगटातील आहेत. त्यांना कुठेही नावाची किंवा प्रसिद्धीची हाव नाही हे विशेष. आम्हाला हे काम करताना दर महिन्याला ८ ते १० हजार रूपये लागतात. कधी तो आकडा वाढतो पण आम्ही त्याचे समान वाटप करतो. मोठा खर्च असल्यास आमचे काम पाहून आमच्यासोबत आलेल्या १५० जणांना आम्ही फक्त एसएमएस करतो. व्हॉटसअपवर माहिती देतो ते लगेच आम्हाला आर्थिक मदत करतात. आम्ही गरजवंतांनाही आर्थिक मदत करताना चेक देतो, वैद्यकीय मदत असेल तर डॉक्टर क‌िंवा हॉस्पिटलला चेक देतो किंवा कुठलीही मदत कोणाला कधी कशासाठी, कोणत्या स्वरूपात केली याचीही नोंद ठेवतो. आज हे करण्याचे कारण म्हणजे आम्हाला कधीकधी हे गरजूही मदत करून जातात.

डाटा ठेवण्याचा संकल्प आमच्यातील एकाने बोलून दाखवला होता. तेव्हापासून दहा वर्षांचा डाटा आम्ही आमच्या माहितीसाठी ठेवला आहे. यातून आम्हाला कुठेही सरकारी मदतीची व कुठल्याही संस्थेच्या सहकार्याची अपेक्षा नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगचे ‘तंत्र’ बिघडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या इंजिनीअरिंग व फार्मसी कॉलेजांचे 'तंत्र' बिघडले आहे. विभागातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षकांच्या केवळ २० टक्के जागा भरलेल्या आहेत. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचेही असेच चित्र असून मंजूर पदापैकी कॉलेजांनी केवळ ३५ टक्केच जागांवर शिक्षक नेमलेले आहेत. यामुळे एकूणच अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कॉलेजांची भरमसाठ संख्या वाढत असताना, कॉलेजांमध्ये भौतिक सुविधांचा ठणठणाट आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांचे चित्रही वेगळे नाही. यात इंजिनीअरिंग व फार्मसीच्या कॉलेजांमध्ये तर तब्बल ८० टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, असे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून पुढे आले आहे. विद्यापीठातंर्गत पदवी आणि पदव्युत्तर इंजिनीअरिंग कॉलेजांची संख्या २३ तर फार्मसी कॉलेजांची संख्या आठ आहे. अभियांत्रिकीसारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये मंजूर ९१४ पदांपैकी केवळ १८० पदांवर पात्र शिक्षक नेमण्यात आलेले आहेत. फार्मसी अभ्यासक्रमांच्या कॉलेजमध्ये ९० पैकी ५८ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकरणाऱ्या कॉलेजांमध्ये पात्र शिक्षक नाहीत. यामुळे या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलेजांमध्ये पात्र शिक्षक नेमण्यात संस्थांना स्वारस्य नसल्याचे चित्र धक्कादायक आहे. अनेक कॉलेजांमध्ये तुटपुंज्या पगारावरील शिक्षक नेमण्यात येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची दोन महिलांनी दोन हजार रुपयांची फसवणूक केली आहे. वाळूज बाजारतळाजवळ शनिवारी (२८ मार्च) दुपारी झालेल्या घटनेचा वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिकनगर येथील विजय गुरव यांची बेबीताई काळे नावाच्या महिलेसोबत ओळख होती. बेबीताई व रेणुका काळे यांनी विजयला फोन करून स्वस्तात विकायचे असल्याचे सांगितले. सोन घेण्यासाठी विजय वाळूज येथे गेला होता. या दोघींनी एक गंठण व दोन मणी त्याला तपासण्यासाठी देऊन दोन हजार रुपये घेतले. विजयने सोनाराकडे तपासणी केल्यानंतर हे सोने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. विजय गुरव यांच्या तक्रारीवरून बेबीताई व रेणुका काळे (रा. लक्ष्मी गायरान, वाळूज) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएसचा तोतया पोलिस गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहशतवाद विरोधी पथकाचा कर्मचारी असल्याचे सांगून तोतयेगिरी करणाऱ्या भामट्याला जिन्सी पोलिसांनी रविवारी (२९ मार्च) नाकाबंदीदरम्यान अटक केली आहे. या भामट्याने नाव कैलास बालाजी शेळके (वय ३८, रा, विजयनगर गारखेडा), असे आहे.

पीएसआय शेख रफिक हे सहकाऱ्यांसह गंजे शाहिदा मशिदीजवळ नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत होते. त्यावेळी मध्यप्रदेशची पासिंगच्या पल्सर दुचाकीवर जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला अडवण्यात आले. त्याने अरेरावी करून मी दहशतवाद विरोधी पथकाचा कर्मचारी असून मला कसे काय अडवले, असे विचारत गोंधळ घातला. दुचाकीची कागदपत्रे व ओळखपत्राची मागणी केल्यानंतर दाखवण्यात नकार दिल्याने त्याला जिन्सी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आपण पोलिस नसल्याची कबुली दिली. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पीएसआय रवींद्र बागुल तपास करीत आहेत.

मोबाइलवर एटीएसचा लोगो

कैलास शेळके याने मोबाइलवर लावलेला एटीएसचा लोगो दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे केस व वेषभुषा पोलिसासारखी होती. पोलिस व्हायची इच्छा पूर्ण न झाल्याने पोलिस असल्यासारखे भासवतो, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमध्ये सोडलेल्या विजेचा झटका बसून राधास्वामी कॉलनीतील एका मुलाचा शनिवारी (२८ मार्च) मृत्यू झाला. मात्र हर्सूल पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरलेल्या मुलाच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कारची नासधूस होऊ नये यासाठी राधास्वामी कॉलनीतील एकाने कारमध्ये विजेचा प्रवाह सोडल्याचा संशय आहे. कारला स्पर्श झाल्यानंतर झटका बसून साह‌िल भोसले हा मुलगा शनिवारी मरण पावला. याप्रकरणी दोषीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत भोसले कुटुंब व त्यांचे नातेवाईक हर्सूल पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. हा संतप्त जमाव कोणाचे ऐकत नव्हता. पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परमेश्वर भोसले, ज्ञानेश्वर, दिनकर, कमलाकर भोसले, सुभाष वाघमारे, सतीश जगधने, विनायक जगधने, संजय साठे व इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने घाटीत दोघांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वाइन फ्लू'ने सोमवारी (३० मार्च) दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना (योगेश नगर) येथील अशोक मोराळे (५४) व ढोरकीन (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील दीपक अप्पासाहेब पठाडे (३५) यांचा समावेश आहे.

अशोक मोराळे यांना १९ मार्च रोजी एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा एसआरएल प्रयोगशाळेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पठाडे यांना २८ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डात दाखल केले होते. त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांचाही एसआरएल प्रयोगशाळेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटीमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. घाटीमध्ये ५० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार झाले. त्यातील ३० रुग्ण ठणठणीत बरे झाले. आतापर्यंत वॉर्डांत १२५ रुग्ण दाखल झाले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविली आहे.

वॉर्डात सहा रुग्ण

सद्यस्थितीत घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात ६ रुग्ण आहेत. यामध्ये एका पॉझिटिव्ह, तर इतर पाच संशयित रुग्णांचा समावेश आहे. शहरातील उस्मानपुऱ्यातील एका ३७ वर्षीय महिलेवर, तर मध्य प्रदेशातील (बऱ्हाणपूर) ४५ वर्षीय महिलेवरही घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात उपचार सुरू आहेत. त्याशिवाय औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, जळगाव जिल्ह्यांतील रुग्णांवरही उपचार होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images