Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ते’ रस्ते २४ कोटींमधून वगळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने ज्या रस्त्यांचे नुकतेच मजबुतीकरण केले आहे ते रस्ते २४ कोटींच्या पॅकेजमधून वगळण्याचे संकेत महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिले. 'या संदर्भात आमदार अतुल सावे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ,' असे ते म्हणाले.

'चकचकीत रस्त्यांना मुलामा' या मथळ्याखाली 'मटा' ने १२ मार्चच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. शहरातील दहा रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपये दिले आहेत. या दहा रस्त्यांची यादीही शासनाने जोडली आहे. जे रस्ते शासनाने सुचवले आहेत, त्यापैकी सहा रस्त्यांचे काम महापालिकेने आपल्या फंडातून सहा महिने ते वर्षभराच्या काळात केले आहे. याच रस्त्यांवर पुन्हा शासनाच्या निधीतून खर्च केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेने केलेला खर्च वाया जाईल असे 'मटा' ने आपल्या वृत्तात म्हटले होते.

दरम्यान, त्या दहा रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले असून ते पन्नास कोटी रुपयांचे झाले आहे. २६ कोटींनी जास्तीचे अंदाजपत्रक झाले आहे. जास्तीचा निधी पालिकेने उभारावा असे शासनाने म्हटले आहे, पण रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांचेच पेमेंट देण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यामुळे 'जास्तीचा निधी शासनानेच द्यावा, अशी विनंती शासनाला करू,' असे महाजन म्हणाले.

तेच ते रस्ते त्या यादीत असतील तर काही रस्ते बदलता येतील का, याचा विचार केला जाईल. यादीतील रस्ते बदलण्यासाठी आमदार अतुल सावे यांच्याशी चर्चा करावी लागेल. पालिकेने काही महिन्यांपूर्वी ज्या रस्त्यांवर खर्च केला त्याच रस्त्यांवर शासनाच्या निधीतून खर्च करायचा असेल तर त्यातून काही साध्य होणार नाही.

- प्रकाश महाजन, पालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यासाठी चोरीची वाळू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चोरीची वाळू वापरून रस्ता तयार करण्यात येत असलेल्या एका रस्त्याचे काम सोमवारी (३० मार्च) बंद करण्यात आले आहे. डॉ लोंढे हॉस्पिटल ते जिल्हा परिषद शाळा गेटपर्यंतचा सिमेंट रस्ता कंत्राटदार चोरीची वाळू वापरून तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी डी. डी. क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.

पैठण नगरपालिकेकडून नगरोत्थान योजनेतून ६८ लाख रुपये खर्च करून, शहरातील डॉ. लोंढे यांचे हॉस्पिटल ते इंडिया बँक या साडेपाचशे मीटर सिमेंट रस्त्याचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. कंत्राटदाराने सुरुवातीला जिल्हा परिषद गेट ते श्रीनाथ हायस्कूल चौकापर्यंत रस्ता तयार केला. नगरपालिकेने उर्वरित रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर गेल्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

हा कंत्राटदार नाथ समाधी मंदिरामागील गोदावरी नदीच्या पात्रातून चोरी केलेली वाळू रस्ता बांधकामासाठी वापरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पैठणचे तलाठी क्षीरसागर यांनी घटनास्थळी जावून कंत्राटदाराकडे वाळुच्या रॉयल्टी पावतीची मागणी केली. कंत्राटदार पावतीन दाखवू न शकल्याने तलाठ्याने रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील कोणताही शासकीय वाळूपट्टा सुरू नाही. तरीही या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू येत आहे.

या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वाळू कोठून आणली याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक माहिती न मिळाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

- डी. डी. क्षीरसागर, तलाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

RTO कार्यालयाचे ११ लाख पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तलवारीचा वार करून भरणा करण्यासाठी घेऊन जात असलेली अकरा लाख रुपयांची रक्कम लुटली. ही घटना सोमवारी दुपारी बीड येथील आरटीओ कार्यालयात घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड येथील आरटीओ कार्यालय औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरापासून सात ते आठ किलोमीटर लांब नामलगाव फाट्यावर आहे. सध्या मार्च अखेर असल्याने दररोज लाखो रुपये आरटीओ कार्यालयात जमा होत आहेत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आरटीओ कार्यालयाचे वरिष्ठ कॅशियर ताहेर चौधरी बँकेत रक्कम भरण्यासाठी जात होते. यावेळी जिरेवाडी येथून बीडकडे निघालेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या तिघा जणांनी चौधरी यांना अडवून त्यांच्यावर तलवारीचा वार केला. त्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून घेत बीडकडे पळ काढला. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी पोलिसांत तक्रार दिली असून जिल्हा पोलिस अधीक्षकाशी संपर्क साधला आहे. बँकेत भरण्यासाठी अकरा लाखांच्या जवळपास रक्कम कार्यालयातून नेली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यात ८१ टँकरची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाल्याने मराठवाड्यात टँकरची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत आठ जिल्ह्यांत ५५५ गावे व १४३ वाड्यांना ८७५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. ही संख्या एका आठवड्यात ८१ ने वाढली आहे.

पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसल्या असून सध्या जिल्ह्यात ३२९ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद पाठोपाठ बीड जिल्हाही पाणीटंचाईने होरपळून निघाला आहे. वाड्या वस्त्यावर राहणारे लोक पाण्यासाठी पायपीट करत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील १३४ गावे व १०८ वाड्यांची तहान १९२ टँकरने भागवण्ण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तरी काही प्रमाणात पाण्याची टंचाई दूर होईल, असा अंदाज होता. मात्र उन्हाचे चटके वाढल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. आठवड्यापूर्वी मराठवाड्यामध्ये टँकरची संख्या ७९४ होती.

प्रशासनातर्फे २०२८ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २३१, जालना १८९, परभणी ६७, हिंगोली ४५, नांदेड ४५४, बीड ३२२, लातूर ३७० तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ३५० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आठवड्याभरात तब्बल २२२ विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्ती वेतन ६ एप्रिलनंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या सुट्यांमुळे निवृत्तीवेतन धारकांना आठवड्याभरानंतर निवृत्तीवेतन मिळणार आहे. जिल्ह्यात राज्य शासनाचे सुमारे ३० हजार निवृत्तीवेतनधारकांचे ३४ कोटींचे पेन्शन विविध बँकांमध्ये जमा होते. लेखांकन व आयकर कपातीच्या दृष्टीने मार्च अखेरची कामे, तर १ एप्रिलरोजी वार्षिक लेखे बंद करण्यानिमित्त बँकांना सुटी आहे. २ एप्रिल रोजी महावीर जयंती, तर ३ रोजी गुड फ्रायडे निमित्त सुटी आहे. त्यामुळे या दिवशी निवृत्तीवेतन प्रदानाची माहिती राष्ट्रीयकृत बँकांना सादर करता येणार नाही. ५ एप्रिल रोजी रविवार असल्याने ६ एप्रिलनंतरच निवृत्तीवेतन मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज १८ ची; मिळाले ३ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित आणि दीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेल्या चिकलठाणा परिसरातील सिव्हील हॉस्पिटलचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये १८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना केवळ ३ कोटी रुपये मिळाले. तब्बल ४ वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता आणि ३ वर्षांपूर्वी बांधकाम सुरू अद्याप पूर्ण झालेले नाही. हे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते.

जिल्हाभरातील रुग्णांसाठी तसेच शहरातील सिडको-हडको-मुकुंदवादी-रामनगर यासारख्या अनेक वस्त्यांमधील गोरगरीब रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकणारे हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमुळे घाटी हॉस्पिटलवरील ताण कमी होऊ शकेल, या उद्देशाने उशिरा का होईना सिव्हील हॉस्पिटलची रुग्णालयाची कल्पना अस्तित्वात आली. २०११ मध्ये २०० खाटांच्या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली. २०१२ मध्ये प्रत्यक्षात काम सुरू झाले. सुमारे ३८ कोटींपैकी आतापर्यंत सुमारे २२ कोटी रुपये मिळाले. शेवटच्या टप्प्यात म्हणजे २०१४-१५ या आर्थिक वर्षात १८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना केवळ ३ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून काम जवळजवळ ठप्प

झाले आहे. रुग्णालयाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना १५ कोटींच्या निधीअभावी रखडले आहे. हा निधी मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागणार, अशी चिन्हे आहेत. अर्थातच, हा निधी कधी मिळतो, यावर हॉस्पिटलचे काम किती लांबणार, हे स्पष्ट होणार आहे.

विधान परिषदेत प्रश्न

सिव्हील हॉस्पिटलच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार सतीश चव्हाण यांनी अधिवेशन काळात विधान परिषदेत प्रश्न मांडला. मात्र या प्रश्नावर अद्याप तरी चर्चा झाली नसल्याचे समजते. या प्रश्नी स्थानिक नेत्यांकडून पाठपुरावा होणे अपेक्षित असताना नेत्यांचे पार दुर्लक्ष असून, त्यामुळेच राज्य सरकार या विषयी फारसे गंभीर नसल्याचे दिसते.

महत्वपूर्ण काम होणे बाकीच

२०० खाटांच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये सेंट्रल ऑक्सिजन लाइन, सेंट्रल सक्शन लाइन, विद्युतीकरण, ट्रान्सफॉर्मर, पाण्याची व्यवस्था अशी अनेक महत्वीचा कामे अपूर्ण आहेत. ही कामे झाल्याशिवाय हॉस्पिटल सुरू करणे अशक्य आहे. या कामांसाठी किमान चार ते पाच महिने लागणार आहेत. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतरच पदनिर्मितीसाठी राज्य सरकारची मान्यता मिळणार आहे. त्यामुळेच हा निधी लवकरात लवकर मिळाला तरच २०१५ या वर्षामध्ये हॉस्पिटल सुरू होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाच लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पाझर तलावाच्या बांधकामात बनावट हजेरीपट तयार करून सुमारे साडे पाच लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लघुपाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अभियंत्यासह तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.

अंबड येथील लघुपाटबंधारे विभाग (लघु सिंचन) चे तत्कालीन शाखा अभियंता एच. आर. खान, विभागीय अभियंता पद्माकर दाभाडे व हजेरी सहायक एस. आय. देशमुख या तिघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, वलखेड (ता. अंबड) येथे रोजगार हमी योजनेतून पाझर तलावाचे काम करण्यात आले होते. हे काम मजुरांमार्फत करणे आवश्यक असतानाही हा नियम डावलून ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेनसारख्या मशिनींद्वारे हे काम करण्यात आले. बनावट हजेरीपट तयार करून त्यावर खोट्या सह्या, अंगठे घेण्यात आले. हे प्रकार माहीत असूनही अंबड येथील लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) च्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी संगनमत करून या ५ लाख ४२ हजार ६२३ रुपयांचे बिल काढून अपहार केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन जालना येथील लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक प्रताप शिकारे यांनी सुरुवातीला गोपनीय व नंतर उघड चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. याआधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद व परभणी येथील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत विभागाकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

ठेकेदाराचे पाच लाख रुपयांच्या बिलाची नोंदणी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वाकारताना उस्मानाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शंकर महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाजन यांना ताब्यात घेतल्यानंतर बिलाच्या नोंदणी संदर्भातील तांत्रिक मान्यतेचे रजिस्टर (टीएस बुक) विभागामधून गायब झाले आहे. यासंदर्भात वारंवार मागणी करूनही उपअधीक्षकांना हे बुक देण्यात आले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला नोंदणी पुस्तक देत नसल्याने या कार्यालयातील अन्य अधिकारी महाजन यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनंजय मुंडे, पंडितअण्णा यांचे अर्ज अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह पंडित अण्णा मुंडे यांचे अर्ज मंगळवारी अवैध ठरवण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ यांनी कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

अर्ज अवैध ठरल्याने धनंजय मुंडे यांना हा जोरदार धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राजकीय सूडबुद्धीने आणि पराभवाच्या भीतीमुळे सत्तेचा गैरवापर करून ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ यांनी केला असून कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे व भटक्या विमुक्त गटातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंडित अण्णा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. पंडित अण्णा मुंडे यांचा सहकारी संस्था गटातून अर्ज होता. तो अवैध ठरल्याने या गटात आता एकही उमेदवार नाही. धनंजय मुंडे यांची भटके विमुक्त गटातून उमेदवारी होती. त्यांचाही अर्ज अवैध ठरला.

माजलगाववरून यादी पाठवली

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम मोडून मंगळवारी दिवसभर कार्यालयात उपस्थित न राहता माजलगाव येथून निवडणुकीशी संबंध नसणाऱ्या नायब तहसीलदारास वैध अर्जांची यादी पाठवली. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी माजलगावमध्ये होते. या सर्व बाबींचा पंचनामा करण्यात आला असून याबाबत वरिष्ठांकडे अधिकाऱ्यांची तक्रार करण्यात येणार असल्याचे पौळ यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त प्राध्यापकाची न्यायासाठी फरफट

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवानिवृत्त प्राध्यापकाची शासन दरबारी न्याय हक्कासाठी फरफट चालू आहे. ग्रॅच्युएटीमधून कपात केलेल्या १ लाख रकमेवर ९ टक्के व्याजदराने पैसे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्राध्यापकाने केलेल्या अवमान याचिकेत राज्य लेखापाल व नांदेडचे उच्च शिक्षण सहसंचालक यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

उदगीर येथील याचिकाकर्ते विजयकुमार पाटील हे २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांच्या ग्रॅच्युएटीमधून १ लाख रुपये इतकी रक्कम बेकायदा कपात करण्यात आली. या कपातीला २०१३मध्ये औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. कोर्टाने कपात केलेल्या रकमेवर ९ टक्के व्याजदराने रक्कम देण्याचे आदेश २७ मार्च २०१४ रोजी सहसंचालक व लेखापाल यांना दिले होते. आदेश असूनही नांदेडच्या सहसंचालकांनी रकमेच्या परताव्याचा प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे राज्य लेखापाल यांना हायकोर्टात दिवाणी अर्ज दाखल केला. हायकोर्टाने १२ डिसेंबर २०१४ रोजी ४ आठवड्यांच्या आत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सहसंचालकांना दिले. या दोन्ही आदेशांची अंमलबजावणी न केल्याने विजयकुमार पाटील यांनी अवमान याचिका केली. या याचिकेत प्रतिवादी राज्य लेखापाल दिनेश पाटील व नांदेडचे उच्च शिक्षण सहसंचालक मोहन खताळ यांना नोटीस बजावण्यात आली. या याचिकेची सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे. याचिकाकार्त्याची बाजू अजिंक्य रेड्डी यांनी मांडली. सरकारतर्फे डी. वाय. टेळे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करासाठी शाळांना टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

महानगरपालिकेने प्रथमच मालमत्ता कर वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर वसुली मोहीम सुरू केली असून सोमवारी पाच आणि मंगळवारी पाच अशा दहा शाळांना टाळे ठोकले आहे. जलसंपदा विभागाच्या तावरजा कॉलनीतील विश्रामगृहालाही टाळे ठोकण्यात आले आहे. पालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक ओमप्रकाश मुतंगे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

मुतंगे म्हणाले, 'शाळांना टाळे ठोकणे म्हणजे जेथे संस्थेचे कार्यालय आहे तिथे कार्यालयाला आणि इतर ठिकाणी मुख्याध्यापकाच्या खोलीला टाळे ठोकले आहे. महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून अंदाजे ३० कोटी रुपये कर वसूल करायवयाचा आहे. त्यामध्ये शहरातील दुकानदार आणि इतरांकडून १८ कोटी ८५ लाख, एमआयडीसी क्षेत्रातून ६ कोटी, मनपाच्या गाळेधारकांकडून एक कोटी, मार्केट कमिटीच्या गाळेधारकांकडुन ९८ लाख रुपये येणे बाकी आहे. शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध असला, तरी गेल्या दोन दिवसांत मालमत्ता कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी महापालिकेत गंजगोलाई, गांधी मार्केट, धर्मशाळा कॉम्लेक्स, मनपाचे गांधी चौक कॉम्लेक्समधील व्यापारी कर भरण्यासाठी गर्दी केली होती. किमान सव्वा कोटी रुपये जमा होतील असा अंदाज आहे. चेक स्वीकारण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली आहे. गूळ मार्केटमधील व्यापारी गाळेधारकांकडून चालु वर्षाचा कर भरून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त झाले असल्यामुळे त्यांनी एकत्रच चेक दिले आहेत.'

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील वांजरखेडकर आणि सचिव विजय गिल्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी नगरविकास आणि सहकार खात्याच्या सचिवांना सूचना देउन बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून केवळ एक वर्षाचा मालमत्ता कर वसूल करण्याचे आदेश महापालिकेला देण्याचे निर्देश दिले आणि १८ एप्रिलनंतर या प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे २७७ व्यापाऱ्यांनी अंदाजे ४८ लाख रुपये भरणा केले असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितल.

लघु उद्योग भारतीचे किशोर सगर, उद्योजक गुरुनाथ मगे, चंदु बलदवा, पाटणकर, हुकुमचंद कलंत्री या उद्योजकांनी महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग याची भेट घेऊन अन्यायकारक मालमत्ता कर उद्योजकांवर लादू नये, अशी विनंती केली. औद्योगिक वसाहतीतील नागरी सेवा महापालिकेने दिलेल्या नाहीत. तरीही मालमत्ता करापोटी, शहराच्या विकासासाठी योग्य आणि न्याय पद्धतीने कर आकारणी केली, तर उद्योजक कर भरतील, अशी भूमिका मांडली आहे. त्याला प्रशासनाने अद्यापतरी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाच्या हातून वडिलांचा जमिनीच्या वादातून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जमीन विकल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना तालुक्यातील हिरापूर येथे सोमवारी (३० मार्च) रात्री घडली. खुनानंतर मुलगा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हिरापूर येथील रहिवाशी नाथाजी दगडू लोंढे (वय ६०) हे पत्नीसह घरातील ओट्यावर झोपले असताना रात्री त्यांचा मुलगा राजेंद्र तेथे आला व शेतीला आता किती भाव आलाय, तुम्ही जर आता जमीन विकली असती, तर किती पैसे आले असते, अशी विचारणा करीत वाद घालण्यास सुरूवात केली. काही वेळानंतर राजेंद्रने वडिलांवर काठीने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच्या आईने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी नाथाजी लोंढे यांना आडूळ येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी, पाचोड पोलिस ठाण्यात योगेश लोंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकास धमकीचा बरकसे यांच्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चेतक पतसंस्थेच्या चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मराठवाडा ट्रेड अॅण्ड चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कल्याण बरकसे यांच्यावर पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर संचालकांमध्ये चेअरमन निवडीवरून वाद सुरू आहे. पतसंस्थेच्या चेअरमनची निवड ९ मार्च रोजी करण्यात येणार होती. मात्र, कल्याण बरकसे यांनी ही बैठक टाळून २६ मार्च रोजी नियमबाह्य पद्धतीने घेतली व स्वतःची चेअरमनपदी निवड करून घेतली, अशी तक्रार पतसंस्थेचे संचालक राहुल परदेशी यांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे केली. या तक्रारीवरून बरकसे यांची निवड रद्द करत ३० मार्चला चेअरमन निवडीचा कार्यक्रम निश्चित केला होता. या बैठकीत कल्याण बरकसे यांनी आपल्याला संपवून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राहुल परदेशी यांनी पैठण पोलिस ठाण्यात दिली दिली आहे. परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशी यांनी पत्रकार परिषदेत बरकसे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे सांगितले. दरम्यान, मी परदेशी यांना धमकी दिली नाही. ते खोटा आरोप करीत आहेत, असा दावा बरकसे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगिरी’चे पुनर्निर्माण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात यादव राजपूत्र भिल्लम याने बांधलेल्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (एएसआय) सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे किल्ल्यास लवकरच गतवैभव प्राप्त होणार आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा हा किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित आहे. गडाच्या ऐतिहासिक इमारतींची पडझड चिंताजनक आहे. औरंगाबादहून वेरूळला जातांना अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावर मोठ्याप्रमाणावर डागडुजीची कामे सुरू झाली आहेत. प्रथम किल्ल्यातील बऱ्या अवस्थेतील भागाची दुरस्ती केली जाणार आहे. मुख्य रस्त्यासह रंगमहाल, पायऱ्या चढत असतांनाच डाव्या बाजुच्या गणेश मंदिराची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासोबतच काळकोट चिनीमहाल, मेंढा तोफ, भूलभुलैया आदींची डागडुजी करण्यात येत आहे. त्यानंतर इतर भागांचीही दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे देवगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दगड वाहतूक कठीण

अनेक इमारती, तटबंदीच्या भिंती ढासळलेल्या आहेत. मजूर ५० किलो वजनाचे दगड घेऊन किल्ल्यावर जात आहेत. त्यासाठी मजुरांना दररोज १२० रुपये मजुरी दिली जात आहे. भर उन्हाळ्यात डोक्यावर दगड वाहून नेणे मजुरांसाठी अत्यंत कठीण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत कर्मचाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाची अंतिम मंजुरी मिळण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल संतापलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य नंदाताई शिवाजी काळे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरिष्ठ सहायक अरूण गावंडे यांना मंगळवारी दुपारी मारहाण केली. या प्रकाराने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंमध्ये समेट झाल्याने प्रकरण आपसात मिटविण्यात आले.

नंदाताई काळे महालगाव (ता. वैजापूर) सर्कलमधून निवडून आल्या आहेत. त्यांच्या सर्कलमधील बाजारठाण ते कमलापूर या रस्त्याच्या कामासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. बांधकाम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची फाइल तयार झाल्यानंतर चार ते पाच वेळा त्रुटी काढण्यात आल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेली. सीइओंनी फाइलवर स्वाक्षरी केली. त्यानंतरही फाइल पुढे सरकत नव्हती. दरम्यान या गावाची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्वी मंजूर झालेले काम मार्गी लागले नाही. यामुळे चिडलेल्या काळे मंगळवारी दुपारी दीड वाजता बांधकाम विभागात पोचल्या. कामाबाबत चौकशी केली असता गावंडे यांनी काळे यांना ओळखले नाही. माहिती देण्यास टाळाटाळ केली, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काळे यांनी अरूण गावंडे यांना मारहाण केली. गावंडे यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार मी काम करतो, असे सांगून काळे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून घेतली. काळे यांना महिला कर्मचाऱ्यांनीही अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. हा प्रकार घडल्यानंतर काळे तिथून निघून गेल्या. दरम्यान, या घटनेची माहिती झेडपीत पसरली. सर्व कर्मचारी मुख्य इमारतीसमोर आले. काही कर्मचाऱ्यांनी सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. चौधरींनी कर्मचाऱ्यास वैयक्तिकरीत्या गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. या प्रकरणाची जिल्हा परिषद स्तरावर चौकशी करण्यासाठी कार्यकारी अभियंता भरतकुमार बावीस्कर यांची समिती नेमल्याचे चौधरींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल होईपर्यंत काम करणार नाही असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. गावंडे यांना घेऊन काही कर्मचारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पोचले. तिथे गावंडे यांच्याविरुद्धच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी दीड तास आमचा गुन्हाच दाखल करून घेतला नाही. पोलिस ठाण्यात शिवसेना गटनेते मनाजी मिसाळ उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर तिथे पोचले. 'महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे. जमावबंदी आदेश लागू आहे. पाचपेक्षा जास्त जण थांबू नका.' असे सांगून कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यातून पाठवून दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. गुन्हा दाखल करून घेऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचीही चर्चा होती. दोन्ही गटामध्ये आपसात चर्चा होऊन प्रकरण मिटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

गेल्या पंधरा दिवसांत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यास मारहाणीची ही दुसरी घटना आहे. दरवेळी प्रशासन आणि राजकीय दबावामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले. असे झाले नाही तर काम करणे अवघड होईल, अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅपेरिक्षाचालकाची पोलिसाला धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिग्नल तोडून जाणाऱ्या अॅपेरिक्षाचालकाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने धडक दिली. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता दूध डेअरी सिग्नलजवळ घडली. याप्रकरणी घाटी पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत पोलिसांना रिक्षाचालक सापडला नव्हता.

बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने दूध डेअरी सिग्नलवर लक्ष केंद्रित केले आहे. येथे सहायक पोलिस निरीक्षकासह चार ते पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी दिलीप अंभोरे (वय ४९) हे वाहतूक पोलिस ड्युटीवर असताना काल्डा कॉर्नरकडून आलेल्या एक अॅपेरिक्षा सिग्नल तोडून भरधाव वेगात जुना मोंढा सिग्नलकडे निघाली. दुसऱ्या बाजुला डुटीवर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक शेख अकलम मसूद यांनी अंभोरे यांना रिक्षा थांबविण्यास सांगितले.

अंभोरे यांनी चालकास रिक्षा बाजुला घेण्यास सांगितले. परंतु, चालकाने अंभोरे यांना जोरदार धडक देत रिक्षासह पसार झाला. गंभीर जखमी अंभोरे यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचा कोणी पाठलाग केला नाही. मोंढानाका उड्डाणपुलाजवळील वाहतूक पोलिसाकडे वॉकीटॉकी नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांच्या सहीसाठी अडली ‘ZTCC’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ब्रेन डेड' रुग्णांच्या अवयव दानासाठी व इच्छुकांवरील प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या 'झेडटीसीसी' समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे नाव दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाले आहे. परंतु, या संबंधीचा अध्यादेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. या निर्णयाच्या फाइलवर वैद्यकीय सचिव मेधा गाडगीळ यांची सही झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मराठवाड्यातील रुग्णांसाठी 'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी'ला (झेडटीसीसी) सुमारे चार वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शहरातील डॉ. व्ही. जी. काळे यांची नियुक्ती होऊनही समितीमध्ये इतर सदस्यांची नियुक्ती न झाल्यामुळे समितीची स्थापनाच होऊ शकली नाही. त्यानंतर कुठलीच हालचाल न झाल्यामुळे शहरामध्ये समिती स्थापन होऊ शकली नाही. मागच्या वर्षी अवयव दान दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'च्या औरंगाबाद आवृत्तीच्या शहर कार्यालयात झालेल्या 'आरटीसी'मध्ये विविध मूत्रपिंडविकारतज्ज्ञ व इतर डॉक्टरांच्या उपस्थितीत या विषयांकडे लक्ष वेधण्यात आले होते. तत्कालिन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी त्यानंतर ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे नाव जाहीर केले. डॉ. भोपळे यांनी त्यासंबंधीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमइआर) पाठविला. मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व 'डीएमइआर'चे प्रभारी सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी दोन महिन्यांपूर्वी 'मटा' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेट दिली. त्यावेळी हा विषय पुन्हा उपस्थित झाला. डॉ. लहाने यांनी डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या अध्यक्षपदाबद्दल लवकरच अध्यादेश काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाची फाईल मंत्रालयात पाठवूनही त्यावर वैद्यकीय सचिव मेधा गाडगीळ यांची सही अद्यापपर्यंत झालेली नाही. अधिवेशनामुळे हा विषय मागे पडल्याचेही सांगण्यात आले.

या आठवड्यात जीआर?

या संदर्भातील अध्यादेशावर वैद्यकीय सचिवांची सही होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अध्यादेश घाटी हॉस्पिटलला प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतरच समिती सदस्यांची नियुक्ती होईल आणि झेडटीसीसी समिती अस्तित्वात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची विद्यापीठात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभाग व उस्मनाबाद उपकेंद्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे केली आहे. नियमानुसार सत्रात ९० दिवसांचे वर्ग होणे अपेक्षित आहे, परंतु सत्रच पूर्ण झालेले नसल्यामुळे, अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. यामुळे पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांचे द्वितीय व चतूर्थ सत्राचे वर्ग १५ जानेवारी नंतर सुरू झाले, त्यातच विज्ञान दिनानिमित्त विज्ञान विभागांना आठवडाभर सुट्या देण्यात आल्या. यूजीसीच्या नियमानुसार एका सत्रात ९० दिवस वर्ग होणे आवश्यक आहे. सुट्यांमुळे सत्र पूर्ण झाले नसून अनेक विभागांचा अभ्यासक्रमही पूर्ण नाही. त्यातच रिड्रेसलचे निकालही बाकी आहेत. कोर्टाच्या नियमानुसार रिड्रेसलचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसांनी परीक्षा घेणे अपेक्षित आहे.

या सर्व बाबी पाहता विद्यापीठ परीसर व उस्मनाबाद केंद्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना निवेदनाद्वारे केली. विद्यापीठ संसद सचिव नामदेव कचरे, विद्यार्थी विद्यार्थी परिषद लखनलाल भुरेवाल, सचिव माधूरी मिरकर यांच्यासह साडेचारशे ते पाचशे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना सादर करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन सुदानी विद्यार्थ्यांना देश सोडण्याची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्हिसा परवान्याचा कालावधी उलटल्यानंतरही त्याची पुनर्नोंदणी न करणाऱ्या सुदानचे नागरिक असलेल्या चार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तिघांना देश सोडण्याची नोटीस देऊन हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तालयातर्फे शहर राहणाऱ्या विदेशी नागरिक नोंदणी घेण्याची मोहीम सुरू आहे. शिक्षण, व्यवसायासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना १८० दिवसानंतर वास्तव्य करायचे असल्यास विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात १४ दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. तपासणी मोहिमेत सुदानच्या चार विद्यार्थ्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यापैकी तिघांना देश सोडण्याची नोटीस देऊन हद्दपार करण्यात आले आहे. एका विदेशी नागरिकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोन विदेशी नागरिकांची नावे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आली आहे. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक मनीषा राठोड, प्रकाश कायंदे, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.

घरमालकांना आवाहन

विदेशी नागरिक वास्तव्यास असलेल्या घरमालक, हॉस्टेल चालकांनी त्यांची नोंद विदेशी नागरिक नोंदणी कक्षात करणे आवश्यक आहे. तशा सूचना त्यांनी भाडेकरुंना ‌द्याव्यात, याबद्दल दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहागंजात दंगल नव्हे, सराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूम‌ीवर पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. या काळात अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मंगळवारी (३१ एप्रिल) शहागंजमध्ये दंगल काबूत आणण्याचा सराव केला.

शहागंजमध्ये मंगळवारी सायंकाळी अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यामध्ये नागरिकामध्ये घबराहट निर्माण झाली होती. हातगाडीधारकांचे अतिक्रमण काढल्यामुळे संतप्त जमावाला काबूत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. या जमावाने पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार, अश्रुधूराचा वापर करीत जमाव पांगवला. मात्र जमाव ऐकत नसल्याने अखेर इशारा देऊन गोळीबाराचे प्रात्याक्षिक केले. हा सराव असल्याचे लक्षात आल्यानंतर बघ्यांनी गर्दी केली होती. या सरावात दोन पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलिस निरीक्षक, दीडशे पोलिस सामील झाले होते. यावेळी वज्र, वरूण दंगाकाबू वाहने शहागंजमध्ये आणण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images