Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उमेदवारी अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र द्यावेच लागणार आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधतेचे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी न देता पुढील सहा महिन्यात उमेदवाराला सादर करता येईल असा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने जाहीर केला, पण तसे लेखी आदेश अजून मिळाले नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला. उमेदवारी अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र जोडण्याची व जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. निवडणूक झाल्यावर पुढील सहा महिन्यात संबंध‌ित उमेदवाराने हे प्रमाणपत्र जमा करावे असे या निर्णयात म्हटले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, 'शासनाचा निर्णय झालेला असला तरी तसे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जुन्या आदेशानुसारच उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवाराला जमा करावे लागेल.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सर्व प्रकारच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना व महिलांना २,५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारी अर्जाची किंमत दहा रुपये असून या अर्जाच्या सोबत तीन शपथपत्रांचे नमुने उमेदवारांना दिले जाणार आहेत.'

अर्ज ऑनलाईन भरावा लागणार

उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. अर्जासोबत जोडायचे प्रमाणपत्र मात्र उमेदवारांना समक्ष द्यावे लागणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवून दिली आहे. पूर्वी एका उमेदवाराला तीन लाख रुपये खर्चाची मर्यादा होती, आता ही मर्यादा एक लाख रुपयांनी वाढवून चार लाख रुपये केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारखेडा भाजपचा की सेनेचा?

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

नव्या रचनेनंतर शिवसेनेच्या गारखेडा-मेहेरनगर वॉर्डावर भाजपने दावा केला आहे. महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्डात पत्नी किंवा आईला उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजप-सेनेतील प्रत्येकी चार इच्छुकांची उमेदवारीसाठी धडपड सुरू असली तरी युतीच्या निर्णयानंतरच वॉर्डातील चित्र स्पष्ट होणार आहे.

गारखेडा-मेहेरनगर (क्रमांक ९६) वॉर्डात उमेदवारीसाठी भाजप-सेनेत रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान नगरसेवक सुशील खेडकर शिवसेनेचे असल्यामुळे हा वॉर्ड सेनेसाठीच ठेवावा असा दावा आहे. तर नवीन रचनेनंतर केलेल्या पाहणीत वॉर्ड अनुकूल असल्यामुळे भाजपच्या इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनधरणी केली आहे. त्यामुळे हा वॉर्ड कुणाच्या पदरात पडणार याची उत्कंठा वाढली आहे. मध्यमवर्गीय मतदारांचे अधिक प्रमाण असल्यामुळे निवडणूक सहजसोपी असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. सध्या शिवसेनेकडून संतोष पाटील, राजू राठोड, संतोष लोखंडे व दिलीप हेकडे इच्छुक आहेत. तर भाजपकडून मनोज घोडके, प्रल्हाद निमगावकर, गोविंद केंद्रे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेचे संतोष पाटील जुने कार्यकर्ते असून जनसंपर्काच्या जोरावर उमेदवारीसाठी दावा करीत आहे. तर संतोष लोखंडे अनुभवी कार्यकर्ते आहेत. भाजपचे गोविंद केंद्रे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे तिकीट त्यांनाच द्यावे असे एका गटाचे म्हणणे आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या मनोज घोडके यांना वॉर्डातील उमेदवारीचे आश्वासन मिळाले होते. वरिष्ठ नेत्यांनीच आश्वासन दिल्यामुळे आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा घोडके यांनी केला आहे. उल्कानगरी किंवा गारखेडा या दोन्ही वॉर्डापैकी कोणत्याही एका वॉर्डात उमेदवारी द्या असा आग्रह निमगावकर यांनी धरला आहे. सतत तीन टर्म नगरसेवक म्हणून विजयी झालेले निमगावकर अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. ही इच्छुकांची चढाओढ असली तरी भाजप-सेना युती झाल्यानंतरच वॉर्डाचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्यातरी उमेदवारांचे राजकीय गणित जुळवणे सुरू आहे.

प्रचाराची घाई

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी उत्साही इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रमुख सोसायटीतील मुख्य पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा सुरू आहे. सोसायटीच्या समस्या आणि मागण्यांबाबत ठोस आश्वासन दिले जात आहे. येत्या हनुमान जयंतीनिमित्त इच्छुकांनी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. या माध्यमातून प्रचाराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आखाड्यातील सामना ते सिंहासन

$
0
0

प्रमोद माने, औरंगाबाद

औरंगाबाद नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. तो दिवस होता ९ डिसेंबर १९८२. तब्बल सहा वर्षे औरंगाबाद महापालिकेवर प्रशासकाचे राज्य होते. महापालिकेची पहिली निवडणूक १९८८च्या एप्रिलमध्ये झाली. या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बदल घडविला. १९८५ मध्ये मुंबई महापालिका ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेने १९८८ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. या यशामुळे शिवसेना मुंबई, ठाण्याबाहेर मराठवाड्यात केवळ रुजलीच नाही तर भरभक्कमही झाली. हिंदुत्व, मुस्लिम द्वेष आणि विद्यापीठ नामांतराला विरोध या जोरावर शिवसेनेने बाजी मारली. गेल्या दोन दशकांपासून शिवसेना औरंगाबाद महापालिकेत सत्ता गाजवत आहे.

गुलमंडी या प्रभागात मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा प्रारंभ झाला. याच प्रभागात शिवसेनेचे कार्यालय होते. उमेदवारांच्या मुलाखतीच्या दिवशी हा परिसर खच्चून भरलेला होता. कार्यकर्ते जोशात होते. मात्र, योग्य उमेदवार शिवसेनेकडे नव्हते. तरीही शिवसेनेचे संपर्क नेते कै. मधुकरराव सरपोतदार, विलास भानुशाली यांनी गोमटेश मार्केटमधील हॉटेल गोमटगिरीमध्ये बसून शिवसेनेची व्यूहरचना रचली. औरंगाबाद शहरावर मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधींची सत्ता होती. दरम्यान या निवडणुकीनिमित्ताने शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. मुस्लिम द्वेष आणि कडवे हिंदुत्व यावर

जोर देणारे शिवसेनाप्रमुखांचे मराठवाड्यातील पहिले भाषण जनमानसावर मोहिनी टाकणारे होते. या यशानंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना अक्षरश: फोफावली, स्थिरावली आणि भक्कमही झाली. आजही शिवसेनेचे प्राबल्य औरंगाबाद शहराबरोबर मराठवाड्यात कायम आहे.

शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीत उतरली होती. उमेदवार मिळत नव्हते, पण कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह होता. हा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकार दादा कोंडके यांच्या जाहीर सभांना आणि मिरवणुकीला औरंगाबादकरांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. औरंगाबाद शहरातील वातावरण भगवामय झाले होते. या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने साठपैकी २७ जागा जिंकून सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. शिवसेनेचे हे यश कोणत्याच राजकीय पंडिताला अपेक्षित नव्हते. ६ मे १९८८ ला औरंगाबाद महापालिकेची पहिली सभाही ऐतिहासिक ठरली. पहिल्या सभेपासूनच नगरसेवकांचा गदारोळ सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे.

छोटछोट्या सभाही गदारोळाविना पार पडल्या असे चित्र सर्वसाधारण सभेत दिसत नाही. महापौर निवडीसाठी ही पहिली सर्वसाधारण सभा होती. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांच्याकडे मताधिक्य नव्हते. सत्ता मिळविण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती त्यामुळेच की काय आताचे 'औरंगाबाद मध्य'चे माजी आमदार आणि शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रदीप जैस्वाल, दुसरे नगरसेवक प्रदीप दत्त यांनी मतपेटीच डोक्यावर घेतली आणि खऱ्या अर्थाने गदारोळाला प्रारंभ झाला. अभूतपूर्व असा गोंधळ या सभेत झाला. शिवसेनेचे निरक्षर असलेले नगरसेवक सुग्रीव रिडलॉन हे मतदानास जात असताना हा गदारोळ सुरू झाला. ते निरक्षर असल्यामुळे त्यांना मदतनीस द्यावा लागला होता. शिवसेनेकडे असे किमान तीन नगरसेवक निरक्षर होते. शिवसेनेने त्यावेळी निवडून आलेल्या एकमेव महिला नगरसेवक लता दलाल यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती आणि काँग्रेसने माजी मंत्री बाबूराव काळे यांचे नातेवाईक डॉ. शांताराम काळे यांना उमेदवारी दिली. गदारोळ होताच शिवसेनेने पहिल्याच सभेवर बहिष्कार घातला.

हा गदारोळ पाहण्यासाठी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, छगन भुजबळ(आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये), कै. सुधीर जोशी हे मुंबईहून खास आले होते. लगेचच काँग्रेसने दुसरी सभा बोलावून महापौर निवडणूक पूर्ण केली. औरंगाबाद शहराचे पहिले महापौर होण्याचा मान काँग्रेसचे डॉ. शांताराम काळे यांना मिळाला. उपमहापौर म्हणून मुस्लिम लिगचे तकी हसन हे निवडून आले होते. या दोघांनाही ३२-० असे मतदान मिळाले होते. प्राबल्य असूनही पहिला महापौर शिवसेनेचा होऊ शकला नाही, याची हळहळ आजही शिवसेनेचे नेते व्यक्त करतात. काँग्रेसचे नेते कै. विलासराव देशमुख, माजी खासदार कै. बाळासाहेब पवार, कै. अब्दुल अजीम आणि तत्कालीन संपर्कमंत्री बाळासाहेब जाधव हे औरंगाबाद शहरात ठाण मांडून बसले होते. त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर, मुस्लिम लिग आणि अपक्ष यांची मोट बांधून काँग्रेसला सत्तेवर आणले. काँग्रेसचे १८, अपक्ष ५, मुस्लिम लिग ३, रिपाइं ३, दलित पँथर २ असे ३२ नगरसेवक काँग्रेसच्या आघाडीत होते. पहिल्याच पाच वर्षांत काँग्रेसने दोन वेळा महापौरपदाचा मान मिळविला. अशोक सायन्ना यादव हे शेवटच्या वर्षी काँग्रेसचे महापौर झाले. काँग्रेसच्या पाठिंब्याने मनमोहनसिंग ओबेरॉय आणि शिवसेनेच्या पाठिंब्याने मोरेश्वर सावे या दोन अपक्षांनी महापौरपद पटकाविले.

पहिला महापौर ते विरोधक

औरंगाबादमध्ये पहिल्या पाच वर्षांत शिवसेनेचा महापौरपदाचा मान मिळाला तो प्रदीप जैस्वाल यांना. ते मुंबई-ठाण्याबाहेरही शिवसेनेचे पहिला महापौर ठरले. या पहिल्या पाच वर्षांत महापालिकेत महापौरपद भूषविणारे मोरेश्वर सावे हे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. एकदा शिवसेनेचे समर्थक म्हणून तर दुसऱ्यांदा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले.

दंगलीच्या झळा

शिवसेनेची पहिली शाखा असलेल्या गुलमंडी प्रभागातून निवडून आलेले चंद्रकांत खैरे हे १९९० मध्ये शिवसेनेचे औरंगाबाद शहरातील पहिले आमदार झाले. पहिल्या पाच वर्षांत महापौरपदाच्या दोन निवडणुकीत औरंगाबाद शहरात दोन वेळा दंगल उसळली होती. त्यामुळेच औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक सर्वच अर्थाने ऐतिहासिक ठरलेली आहे.

इतरांना संधी देण्यासाठी निवडणुकीतून माघार

हर्सूल वॉर्ड नंबर ११ त्यावेळी ओबीसी महिलांसाठी आरक्षित होता. मी त्या काळी म्हणजेच १९९७ ते १९९८ दरम्यान महापौर होते. पहिल्यांदा नगरसेवक आणि नंतर महापौर ही झेप अगदीच साधी आणि सरळ वाटली. त्याकाळीही बंडखोरी वगैरे होतीच, पण इतकी नाही. सत्तेसाठी सगळेच भांडतात. पण तेव्हा त्याचे प्रमाण एवढे नव्हेतच. आजच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाले, तर एक लाखाची निवडणूक आता एक कोटीत सहज जाते. या शिवाय आम्हाला त्या काळी बाळकडू दिले होते, आदरणीय कै. बाळसाहेब ठाकरे यांनी. '८०टक्के समाजकारण करा आणि २० टक्के राजकारण करा,' असे ते म्हणायचे. आता परिस्थिती काय हे तुम्हाला माहितच आहे. मी तर पहिल्यांदा नगरसेवक व महापौर झाले. तेव्हाच ठरवले पुन्हा या पदासाठी उभेच राहायचे नाही. संधी द्यायची ती दुसऱ्यांनाच. आपणच पुन्हा-पुन्हा ते पद का भूषवत राहायचे? हा विचार पक्का केला आणि पुन्हा काही निवडणुकीत उभीच राहिली नाही, परंतु एक सांगते तेव्हा या पदाला एक वर्षाचा कालमर्यादा होती. आता अडीच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक महापौर पदाला ‌मर्यादा आहे. माझं तर असं झालं की पहिले सहा महिने महापौरपद व अधिकार हे शिकण्यातच गेले. नंतर शिकले तर सहा महिन्यात पायउतारही व्हावे लागले, पण खूप काही शिकले. आजही मी हर्सूल येथे शिवसेनेच्या माध्यमातून म्हणा, माझ्या वैयक्तिक व पतीच्या सहकार्यामुळे म्हणा समाजकारण करतच आहे. सोबत शेती आहे. आजचे राजकारण पाहता मी शेती, समाजकारण यात आनंदी आहे.

- शीलाताई गुंजाळे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या चितेवर उडी घेऊन पत्नीने जीवन संपव‌िले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पतीच्या अकाली निधनानंतर शोकाकुल झालेल्या पत्नीने पतीच्या जळत्या चितेवर उडी घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ही घटना औसा तालुक्यातील लोहटा येथे सोमवारी (३० मार्च) रात्री घडली आणि मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

लोहटा येथील तुकाराम मसाजी माने (वय ५५) यांना रविवारी (२९ मार्च) पहाटे झोपेतच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांना माकणी (ता. लोहारा) येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रविवारी सायंकाळी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी पहाटे तुकाराम यांची पत्नी उषा घरात न दिसल्याने नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध केली. दरम्यान, अस्थी घेण्यासाठी तुकाराम माने यांचे बंधू नारायण यांनी स्मशानभूमी गाठली. त्यावेळी तुकाराम यांच्या चितेवरच उषा माने यांचा मृतदेह जळत असल्याचे आढळले. ही बाब त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. या वेळी ग्रामस्थांसह नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी तुकाराम यांच्या पत्नीचा मृतदेह बाजूला काढून पतीच्या शेजारीच त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार केले. या दांपत्याला दोन मुले आहेत.

पोलिस अनभिज्ञ

या घटनेची पोलिसांना कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. गावात घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अनिल महाबोले, शोभा जाधव, तहसीलदार दत्ता भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. किल्लारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सहायक पोलिस निरीक्षक घोडके पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनमध्ये कार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका प्रवाशाने नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीत कार घुसवली. २३ मार्च रोजी रात्री घडलेली ही घटना उघडकीस आली असून रेल्वे विभागाकडे त्याची नोंदही नाही. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर २३ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता एक चारचाकी वाहन थेट रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीत फलाटापर्यंत आले होते. येथील रिक्षाचालक आणि हमालांनी कार जप्त होऊ शकते, असे सांगितल्यानंतर ती परत घेऊन प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर ही कार स्टेशन परिसरात पार्क करण्यात आली होती. रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीत सीसीटीव्ही फुटेल नसल्याने ती आरपीएफ किंवा जीआरपीएफच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे ही गाडी कोणाची याचाही तपास करण्यात आला नाही.

सुरक्षारक्षक गायब

काही दिवसापूर्वी औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. मागील दोन महिन्यापासून ते गायब झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगद नारायणांकडून वरकमाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या निमित्याने काही राजकीय पक्षांनी वरकमाईच सुरू केली आहे. पार्टी फंडाच्या नावाखाली इच्छुक उमेदवाराकडून तिकीट देण्यासाठी पाच लाखांपासून बोली लावली जात असल्याची आणि ही बोली दहा लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता औरंगाबादकर महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ही निवडणूक गल्लीबोळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची असल्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येक वॉर्डात चुरस निर्माण झाली आहे. एका वॉर्डात कमीतकमी पाच कार्यकर्ते उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. यावेळी पन्नास टक्के महिला नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत. सध्या राजकीय पक्षांचे तंबू इच्छुकांच्या गर्दींमुळे फुलून गेले आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी आपली तिजोरी भरून घेण्यासाठी नवनवीन फंडे अंमलात आणणे सुरू केले आहे. त्यातील एक फंडा पार्टी फंडचा आहे. हा फंड जमा करण्यासाठी पक्षांनी काही विशीष्ट व्यक्तींची नियुक्तीच केली आहे. त्यामुळे 'प्रशांत' महासागरासारखी शांत वाटणारी निवडणुकीची प्रक्रिया आता ढवळून निघू लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांसमोरच सर्वप्रथम खिसा रिकामा करावा लागतो आहे. अशा प्रकारच्या 'नगद नारायणाच्या' खेळामुळे संभाव्य उमेदवारांचे बजेट अचानक वाढू लागले आहे. कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठेने काम केल्यावरही उमेदवारी मिळवण्यासाठी फंड देण्याचा फंडा वापरला जाऊ लागल्यामुळे ही निवडणूक एका उमेदवारासाठी किती लाखांची जाईल याचा अंदाज बांधणे कठीण होऊ बसले आहे. पार्टी फंडचा हा फंडा निवडणुकीच्या रिंगणात नव्याने आलेल्या पक्षानेही अवलंबल्याचे चित्र आहे. या पक्षाकडेही इच्छुकांची मोठी गर्दी आहे. विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत 'अच्छे दिन' येतील अशा मानसिकतेत असलेल्या या पक्षाने देखील तिकीट विक्रीचे काउंटर सुरू केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे शहरासाठी काही 'हटके' करू इच्छीणाऱ्यांच्या मनब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाखांची निवडणूक

पार्टी फंड आणि निवडणुकीतील प्रत्यक्ष खर्च यामुळे महापालिकेची निवडणूक लाख मोलाची ठरणार आहे. निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला चार लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे, पण हा खर्च लाखांची पंचविशी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम असलेल्या आचारसंहितेच्या भरारी पथकांसमोर येत्या काळात मोठे आव्हान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक रखडली..!

$
0
0

अब्दूल वाजेद

रस्त्यावर प्रचंड वाढलेली वाहनसंख्या, सुमार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यावरील हातगाड्यांचे अतिक्रमण हे आता ‌औरंगाबादचे वैशिष्ट्य झाले आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणि इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील वीस वर्षांत वाहतूक व्यवस्थेकडे महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे औरंगाबादकर त्रस्त झाले आहेत.

एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. याशिवाय एकाच वेळी ११० मर्सडीज घेऊन या शहराची वेगळीच ओळख झाली. आगामी काळात स्मार्ट सिटी, डीएमआयसीसारखे महत्त्वाचे प्रकल्प औरंगाबादमध्ये येणार आहेत. मात्र, मागील २५ वर्षात शहरातील रस्त्यांच्या नियोजनाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते तयार करताना, या रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आणि भविष्यात या रस्त्यावर वाढणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन रस्त्यांचे नियोजन करण्यात आले नाही.

काही वर्षांपूर्वी सिल्लेखाना चौक‌ ते लक्ष्मण चावडीचा चौक या रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होती. मात्र, वर्षभरात या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे टेलिफोनभवन चौकात वाहतुकीची कोंडी होते. याशिवाय सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक, निराला बाजार चौक, औरंगपुरा चौक या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. सिडको भागातील टी.व्ही. सेंटर ते जकात नाका रस्ता डिफर्ट पेमेंटवर तयार करण्यात आला होता. याठिकाणी पोलिस मेसजवळील चौक, आझाद चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच वसंतराव नाईक चौकापासून ते हर्सूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबेडकर चौक, एबीआय बँकेसमोरील चौकापासून ते जकात नाका रोडवरील चिश्तिया पोलिस चौकीचा रस्ता हा कोंडीचा बनला आहे. मध्य शहरातील शहाबाजार चौक, चेलीपुरा चौक या‌ठिकाणीही वाहतुकीची कोंडी होते.

जालना रोडवरील तीन पुलाच्या कामांमुळे वाहनधारकांना मोंढा नाका चौकात वाहतूक कोंडीतून रस्ता काढावा लागत आहे. याशिवाय अमरप्रीत चौकातही कोंडी होते. क्रांतिचौक उड्डाणपूल तयार केला. या पुलाखाली अनेकदा अॅपे, रिक्षा थांबलेले असतात. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

ट्रॅफिक इंजिनीअरिंगचा अभाव

महापालिकेकडून रस्ते तयार करताना वाहतूक अभियांत्रिकीचा विचार तयार केले जातात. मात्र, औरंगाबाद महापालिकेच्या अनेक रस्त्यांवर वाहतुकीसाठी रोटरी तयार करताना वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. उलट काही ठिकाणी रोटरी किंवा वाहतूक बेटामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहने उदंड जाहली

औरंगाबादची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या रिक्षा आणि सिटीबस चालवितात. जिल्हयात १७ हजार ५०० रिक्षा परवाने धारक असताना, रिक्षांची संख्या २३ हजारांवर पोहोचली आहे. याशिवाय चार वर्षांपूर्वी एसटीने सुरू केलेल्या सिटीबस सेवेचा विस्तार झाला नाही. ही सेवा फक्त २९ सिटीबसवर चालविली जाते.

यामुळे मोजक्या मार्गावर सिटीबस धावत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मागील चार वर्षांत सिटीबस सेवा चांगली व्हावी यासाठी काही मोजक्या पक्ष संघटना सोडल्या तर सत्ताधाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत.

रिक्षा थांब्यांची चणचण

शहरात रिक्षांची संख्या ही बारा हजारांपर्यंत पोहोचली आहे. यात अॅपे आणि आता नवीन आलेल्या थ्री सिटर रिक्षांमधून पाच ते दहा प्रवासी प्रवास करतात. शहरातील रिक्षा चालकांसाठी १५० रिक्षा थांबे देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी घेतला होता. मात्र, महापालिकेने जालना रोड आणि अन्य मार्गावर रिक्षा थांबे नसल्याचे कारण सांगितल्याने ही योजना बारगळली. शहरात रिक्षांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी तीनशेच्यावर रिक्षा थांबे देण्याची गरज आहे.

वाहतूक पोलिसांचे मरण

वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, चौकाचौकात वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक पोलिसांच्या खांदयावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे कठीण आव्हान आहे. महापालिकेकडून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी लेन कटिंग, लेन सिस्टीम, वन वे वाहतूक, झेब्रा क्रॉसिंग आणि डिवायडरचे योग्य नियोजन केले जात नाही. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

बीआरटीचा विचारही नाही

पुण्यात पीएमटीसाठी बीआरटी योजना कार्यान्वित केली आहे. याशिवाय अनेक शहरात सिटीबस सेवेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. मात्र, औरंगाबाद सारख्या १२ लाख लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा चांगली करण्यासाठी कोणताही प्रयत्न झालेला नाही.

रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न कायम

शहराच्या दक्षिणेस सातारा देवळाई हा परिसर विकसित झाला आहे. याशिवाय एमआयटी तसेच अन्य शैक्षणिक संस्थाही मोठया प्रमाणात आहेत. यामुळे औरंगाबाद शहरातून आणि सातारा देवळाई भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या भागातून येणारे अनेक वाहनधारक शिवाजीनगर, शहानूरमियॉ दर्गाह आणि एकनाथनगर रेल्वे क्रासिंग ओलांडून येतात.

शहानूरमियॉं दर्गाह जवळ संग्रामनगर उड्डाणपूल तयार करण्यात आला, पण शिवाजीनगर आणि एकनाथनगर रेल्वे क्रॉसिंगवर दरवेळेस वाहतुकीची कोंडी होते. या समस्या सोडविण्यासाठी सीएमआयए या औदयोगिक संघटनेसह अन्य संघटनांनी पुढाकार घेतला. मात्र याबाबत अदयापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

हातगाडीचा धंदा मस्तच

शहरातील शहागंज, गुलमंडी, पैठणगेट औरंगपुरा तसेच तीस कोटींच्या बाळासाहेब ठाकरे मार्गासह रोपळेकर चौक, गजानन महाराज मंदिर रोड या मार्गावर मोठया प्रमाणात हातगाडी चालकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. शहरात नो हाकर्स झोन तयार करण्यात आले आहेत. मात्र, हॉकर्स झोन तयार करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांना हातगाड्यांनी विळखा घातलेला दिसतो. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

१४ रस्त्यांचे रुंदीकरण; अडचणी कायम

औरंगाबाद महापालिकेच्या चौदा मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या रस्त्यांचे काम काही भागांत अजूनही रखडले आहे. लक्ष्मण चावडी ते एमजीएमचा रस्ता हा कैलासनगर भागातील मंदिरापासून ते महेशनगर भागाला जोडतो. या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. किराडपुरा भागातील रस्त्याचे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. ‌बुढ्ढीलेन ते मंजुरपुरा रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, या रस्त्यांमधील खांब हटविण्यात आले नाहीत. पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत रस्ता रूंद केला. मात्र, गुलमंडी, मच्छलीखडक ते सिटीचौक या रस्त्यांना जोडणारा रस्ता हा राजकीय दबावामुळे रूंद केला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरवरून तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर वॉर्डावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षातील तणाव वाढला आहे. शिवाजीनगर वॉर्ड शिवसेनेलाच सोडला पाहिजे असा आग्रह महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी धरला, पण त्यांच्या आग्रहाला नेत्यांनी जुमानले नाही. त्यामुळे मुंबईतील बैठक अर्ध्यावर सोडून जैस्वाल सायंकाळी औरंगाबादेला परतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देत 'मातोश्री'वर जाऊन चर्चा केली. युतीसाठी दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकीच्या पाच फेऱ्या झाल्या, पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे काल सोमवारी रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या सर्वांना मुंबईत बोलावून घेतले.

रात्री भाजप नेत्यांची प्रदेश कार्यालयात बैठक झाली. यावेळी भाजपचे शहाराध्यक्ष भगवान घडमोडे, डॉ. भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवाणी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पालकमंत्री रामदास कदम यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, प्रभारी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित होते. पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिवसभर युतीच्या नेत्ू यांच्या संयुक्त बैठकांचे सत्र सुरूच होते. सायंकाळी बैठकीत शिवाजीनगरचा विषय निघाला. भाजपच्या नेत्यांनी या वॉर्डावर दावा केला. सेनेच्या नेत्यांनी हा दावा मान्य करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे जैस्वाल संतापले. हा वॉर्ड शिवसेनेसाठीच सोडला पाहिजे, अशी भूमिका मांडत ते बैठकीतून बाहेर पडले आणि विमान गाठून परतले. या वॉर्डातून जैस्वाल यांनी राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गुलमंडी, राजाबाजार, सिडको एन ३- एन ४, मयूरपार्क या वॉर्डांवरूनही शिवसेना - भाजपमध्ये तणातणी सुरूच आहे. युती झाली तरी या प्रमुख वॉर्डांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाजीनगर वॉर्डावरून कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. दिवसभर भाजपच्या नेत्यांनी हा वॉर्ड मागितलादेखील नाही. हा वॉर्ड शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे मी बैठक अर्ध्यावर सोडून निघून आलो, असे म्हणण्यात तथ्य नाही. कुणीतरी अशी अफवा पसरवत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटाघाटींसाठी एकत्र बसवले. त्यानंतर मी औरंगाबादला आलो. आतापर्यंत झालेल्या चर्चेवरून दोन्ही पक्षांत युती होईल असेच वाटते.

- प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्चअखेरच पाणीबाणी

$
0
0

टीम मटा

राज्यात मार्चअखेरीलाच पाणीटंचाई सुरू झाली असून, टँकरने मंगळवारी हजाराचा आकडा ओलांडला आहे. राज्यात ८७२ गावे आणि ७४१ वाडे तहानलेली असून, त्यांना १११५ टँकरद्वारे पिण्याच्या पाणी पुरविले जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरची संख्या सव्वाशेने वाढली आहे. विशेषत: मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाणीबाणी संकट गहिरे आहे. तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याला सर्वांत कमी झळ आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक ८७५ टँकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यात १५६ टॅँकर आहेत. पुणे विभागात २६ टँकर सुरू असून, त्यात सातारा जिल्ह्यातील १३ टँकरचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात तूर्त दोन गावे व २५ वाड्यांना पाच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात फक्त आठच टँकर सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात १९ गावांना ११ टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

राज्याच्या तुलनेत मराठवाड्याची पाणीपातळी खालावली असली तरी आम्ही पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत राखून ठेवले आहेत. ‌विभागात पाणी आहे. मात्र, पाणीपुरवठा योजना बंद, नादुरुस्त असल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात या योजना दुरुस्त करून स्थलांतर तसेच पिण्याच्या पाण्याच्या अडचणी दूर करू. विभागामध्ये सध्या ८७५ टँकर सुरू आहेत. वेळ पडली तर प्रशासन टँकरची संख्या आणखी वाढवणार आहे.

- बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

मराठवाड्यात अवघे १३ टक्के पाणी

मोठे प्रकल्प : ११

आजचा पाणीसाठा : ८१७.०० दलघमी १६%

जायकवाडी साठा : १६३ दलघमी १३%

मध्यम प्रकल्प : ७५

एकूण पाणीसाठा : ११३.२४ दलघमी १२%

लघुप्रकल्प : ७२०

एकूण पाणीसाठा : ११२.६२ दलघमी ०७.१%

गोदावरी नदीवरील बंधारे : ११

एकूण पाणीसाठा : १८.३७ दलघमी ८%

मांजरा नदीवरील बंधारे : १६

मराठवाड्यातील सर्व ८३३ प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा १०६१.२४ दलघमी १३%

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर मंजुरीचे अधिकार आता तहसीलदारांना

$
0
0

नांदेडः जिल्ह्यातील टंचाई सदृष्य परिस्थिती व पाण्याची गरज विचारात घेऊन जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना, वाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूर देण्याचे जिल्हाधिकारी यांचे अधिकार संबंधीत तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. हे अधिकार एक एप्रिल ते ३० जून या कालावधीकरीता प्रदान करण्यात आल्याचे एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे.

ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत इतर उपाय योजना घेणे शक्य नसेल व जेथे तीव्र पाणी टंचाई आहे. अशा ठिकाणी संबंधीत तालुक्यांच्या तहसिलदार यांची खात्री झाल्यास तसेच संबंधीत आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केल्यास त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात यावेत, असे विभागीय आयुक्त यांनीही आदेशीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त शिक्षकांना रुजू करण्यास टाळाटाळ

$
0
0

नांदेडः तुकड्या तसेच विद्यार्थी संख्येवरून अतिरिक ठरलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्यास खासगी संस्था उत्सुक नाहीत. अनेक संस्थांनी रुजू करून घेण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून आता त्यांना शेवटची संधी देण्यातआली आहे. आठ दिवसात रुजू करून न घेतल्यास हे कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असून अशा संस्थेवर उपसंचालकाच्या आदेशावरून कडक कारवाई केली जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यापैकी ५६ शिक्षकांना खासगी संस्थेवर रुजू करण्यासंदर्भात जिहा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आले. हे शिक्षक संबंधित शाळेवर रुजू होण्यासाठी गेले. मात्र, त्यांना रुजू करून घेण्यास शाळांनी स्पष्ट नकार दिला. संस्था चालकाच्या या मनमानीला आता प्रशासन वैतागले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून त्यांच्या विरोधात कडक कारवाई होणार असल्याची माहिती नांदेडचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोषागार कार्यालयाला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मुद्रांक खात्याने हजार रुपये आणि त्यावरील मुद्रांकाची (स्टॅम्प पेपर) विक्री थांबविल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयात ४३ कोटी १६ लाख ४७ हजार रुपयांचे ६७ हजार १५८ एवढे मुद्रांक (स्टॅम्प पेपर) धुळखात पडून आहेत. हीच स्थिती बहुधा राज्यातील सर्व कोषागार कार्यालयाची आहे, अशी माहिती उस्मानाबाद येथील जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक विभाग प्रधान कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार एक हजार रुपये आणि त्यावरील रकमेचे मुद्रांक (स्टॅम्पस्) वितरणावर बंदी घातली आहे. सध्या उस्मानाबाद जिल्हा ‌कोषागर कार्यालयात एक हजार, पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार, वीस हजार तसेच २५ हजार रुपये किंमतीचे ६७ हजार १५८ मुद्रांक आहेत.

एक हजार आणि त्यावरील सर्व रकमेच्या स्टॅम्प पेपरची छपाई वितरण आणि विक्री थांबविण्याचा निर्णय मुद्रांक कार्यालयाने २३ जानेवारी २०१५ रोजी घेतला. याबाबत तसे पत्रही जिल्हा कोषागार कार्यालयाला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे कोषागार कार्यालयातील शिल्लक असलेल्या मुद्रांकाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी सध्या खरेदीदाराला मुद्रांक शुल्क ऑनलाइन भरावे लागत आहे.

खरेदी दस्त करणे किंवा बँकेचे गहाण खत करताना शासनाचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीस भरण्यासाठी स्टॅम्प पेपरचा वापर केला जात होता. मात्र, २३ जानेवारी २०१५ च्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आदेशामुळे एक हजार रुपये किंमतीसह अधिकच्या रकमेच्या स्टॅम्पची विक्री बंद झाली आहे. त्यामुळे आता खरेदीदाराला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीस ऑनलाइन भरण्याशिवाय पर्याय नाही. मोठ्या रकमेचे स्टॅम्प विक्री बंद असल्याने सध्या शंभर ते पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरला मोठी मागणी वाढली आहे.

फ्रॅकिंग सुविधेचा अभाव

ज्या नागरिकांना कर्जप्रकरणी तसेच टेंडरसाठी स्टॅम्प पेपर लागतात. त्यांना शासनाच्या ग्रास प्रणालीदवारे काढलेले ई चलन चालत नाही. यासाठी त्यांना फ्रॅकिंगद्वारे काढलेले चलन किंवा स्टॅम्प चालतात. मात्र, फ्रॅकिंगची सुविधा सर्वच बँकेतून उपलब्ध नाही. त्यामुळे या फ्रॅकिंगद्वारानिर्मित पेपरसाठी काही ठराविक बँकेत नागरिकांना खेटे भरावे लागतात. शिवाय त्यासाठी अधिकची रक्कमही मोजावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाच्या चटक्याने हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून बदलले आहे. सकाळी आकाशात मळभ आलेले दिसते, तर दुपारी उन्हाचा तडाखा वाढतो. अशा विचित्र वातावरणाचा उस्मानाबादकरांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहे. सध्या तापमान ३५ अंशाच्यावर गेले आहे.

जिल्ह्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेला गारवा आता कमी होत चालला आहे. आता उस्मानाबादकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून उस्मानाबादचा पारा ३५ अंशांवर गेला आहे. त्यामुळे आगामी काळात हा उष्णतेचा पारा आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा शहरासह जिल्ह्यात फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेला वादळी व अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि फळबागांचे नुकसान झाले. तरी या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात वाढणारे तापमान २४ पर्यंत खाली गेल्याचे सुखद चित्र अनुभवायास मिळाले. परंतु, होळीच्या सणापासून उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा वरचेवर वाढत चालला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उस्मानाबाद शहरात गेले तीन-चार दिवस झाले येथील कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे, तर किमान तापमान २४ अंश आहे. थंडीच्या हंगामात किमान तापमानाचा पारा १५ ते १६ अंशाच्या आसपास घसरला होता. तो आता वरचेवर वाढू लागला आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. शिवाय तापमानातील असह्य वाढीमुळे सर्वसामान्यांची लाहीलाही होऊ लागली आहे.

उन्हाळ्याचा कडाका वाढल्यावर त्यावर मात करण्यासाठी थंडगार सरबत, कुल्फी, प्लॅस्टीकच्या कंटेनरमध्ये विक्रीला ठेवलेली विविध प्रकारचे ज्यूस जागोजागी विकले जाणारे लिंबू सरबत किंवा मोसंबी सरबताचा अस्वाद घेतात. याचबरोबर लस्सी, मिल्कशेक, आईस्क्रीम आदीच्या माध्यमातून उन्हापासून होणारी लाहीलाही कमी करण्याचा प्रयत्न करतात. या दिवसात अशा प्रकारच्या सरबतांच्या, लस्सी व आईस्क्रीमच्या विक्रीत प्रचंड वाढ झालेली दिसून येते. पण त्यासाठी कोणते पाणी वापरतात, शिवाय गोडीसाठी सॅकरीन वापरतात याची कल्पनाही नसते. हे पाणी दूषित असल्यास पोटाच्या तक्रारी तात्काळ सुरू होतात. दूषित पाण्यामुळे कावीळच्या तक्रारी वाढू लागल्याचे डॉ. प्रकाश छल्लाणी यांचे म्हणणे आहे.

उस्मानाबादचे तापमान वाढू लागल्यावर खोकला, चक्कर, डोकेदुखी, लो ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन आणि पोटाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यासोबतच अनेकांना विषबाधा, हगवण, उलट्याच्या त्रास होण्याचे प्रकार वाढीस लागले असून दवाखान्यासमोर रांगा लागल्याचे दिसत आहेत.

तापमान वाढीची शक्यता

उस्मानाबाद जिल्ह्यात होळीपासून अचानक वाढलेल्या तापमानाचा शिवाय सतत बदलत असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा धसका घेतलेल्या नागरिकांनी आताच ही सुरूवात आहे, तर आणखी किती तापमान वाढणार, असा प्रश्न उपस्थित केला असून, पारा ४२ वर पोहोचेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

उन्हात लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन किंवा उष्माघाताचे प्रमाण वाढते. उन्हाच्या तडाख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अतिउन्हाळ्याने शाळकरी मुलांना चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात भरपूर पाणी पिण्याची गरज आहे.

- डॉ. रमेश खुणे, बालरोगतज्ज्ञ, उस्मानाबाद

खोकला, सर्दी, पोटाचे विकार, हगवण, डोळ्याचे विकार, भोवळ, चक्कर, उष्माघात, घामोळे, मूत्रसंसर्ग अशा रूग्णांच्या संख्येत वाढू होवू लागली आहे.

डॉ. चंचला बोडके,

- निवासी वैद्यकीय अधिकारी, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंदे सुरू असल्याबद्दल २ राजकीय पक्षांना चिंता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शहर व तालुक्यात अवैध धंदे सुरू असल्याबद्दल दोन राजकीय पक्षांना चिंता सतावत आहे. भाजपचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष विष्णू काटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजूमियाँ देशमुख यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेश कुमार यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

लिलाव न झालेल्या नदीपात्रातून रात्री वाळू वाहतूक होत असून त्यात पोलिसांचे आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात केला आहे. सर्वसामान्यांच्या वाळू वाहनांवर कारवाई होते, तर पोलिसांशी जुळवून घेणाऱ्यांना मोकळीक मिळते. भराडी, शिवना, अजिंठा, गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव, अंभई, घाटनांद्रा, बोरगावबाजार येथे मटका, पत्त्याचे क्लबही, गटुख्याची विक्री सुरू असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपाच्या निवेदनात शहरातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. गोहत्याबंदी कायद्यानंतरही शहरात काही प्रमाणात जनावारांची कत्तल होत आहे, सट्टा, पत्त्यांचे क्लब, विनापरवाना दारू विक्री ,गुटखा विक्री सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

स्थानिक पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्यांशी साटे लोटे असल्याचा आरोप निवेदनात करम्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे, अन्यथा भाजपतर्फे आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासूरचा टोलनाका कायमचा बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लासूर येथील टोलनाक्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत असल्याने हा नाका बंद करावा, अशी मागणी करणारे पत्र गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) अनिल डिग्गीकर यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. या नाक्यावर तीन वर्षात पाचपट जादा रक्कम वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लासूर येथे दहा वर्षांपासून टोलनाका आहे; परंतु, हा रस्ता दहा वर्षात पूर्ण झालेला नाही. येथे दरमहा ३० ते ४० लाख रुपये वसूल करून संबंधित ठेकेदार आठ लाख रुपये वसुली झाल्याचे दाखवत आहे. याबद्दल विचारणा केल्यानंतर एमएसआरडीसीतील अधिकारी राम चंदानी, सुनील देशमुख, श्रीमती नाग, उदय भरडे वेळ मारून नेतात, कारवाई मात्र करत नाहीत, अशी तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. अतिरिक्त जमा रक्कम ठेकेदाराकडून वसूल करावी, १ एप्रिलपासून नाका बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीचे अधिकारी राम चंदानी, सुनील देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड ते ‘नासा’, एका शास्त्रज्ञाची वाटचाल

$
0
0

निखिल निरखी

बीड, पैठण, परभणी, नांदेडसारख्या ठिकाणी शालेय शिक्षण घेत असतानाच मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण झाली. त्याच आवडीतून बीएसस्सी-एमएस्सी करताना संशोधनामध्ये रस निर्माण झाला आणि संशोधन हाच आपला श्वास असल्याचे उमगले. संशोधनाच्या ध्यासाला 'एनसीएल'मध्ये उत्तम आकार मिळाला आणि तिथून अमेरिकेतील नामांकित विद्यापीठामध्ये तब्बल सहा वर्षे फेलोशिप घेत प्रतिष्ठेची पीएचडी मिळविली. बोस्टनमध्ये पोस्ट डॉक्टरेट ट्रेनिंग घेत असतानाच 'नासा'मध्ये संशोधनाची संधी चाचपडून पाहिली आणि कार्बन डायऑक्साईडच्या २५-५० पटींपर्यंतच्या उत्सर्जनाचा झाडांवर होणाऱ्या सर्वांगीण परिणामांवर व्यापक संशोधन करण्याची संधीही चालून आली. दोन वर्षांपासून 'नासा'तील संशोधनामध्ये रमलेला शास्त्रज्ञ म्हणजेच नांदेडचे डॉ. अनिरुद्ध दीक्षित.

दीक्षित कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यातील वसमतचे, मात्र काही पिढ्यांपासून नांदेडलाच स्थायिक झालेले. अनिरुद्ध यांचे वडील रेणुकादास दीक्षित हे स्टेट बँक ऑफ हैदाराबादमध्ये. त्यामुळे संपूर्ण नोकरीच्या काळात दर दोन-तीन वर्षांनी बदली ठरलेलीच. त्यातही अनिरुद्धच्या जन्मानंतर अधिकतर काळ मराठवाड्यात गेला. बीड, पैठण, परभणी, नांदेडसारख्या अनेक छोट्या-मोठ्या गावात-शहरात जिथे कुठे शाळा असेल आणि जिथे कुठे प्रवेश मिळेल तिथे अनिरुद्धचे शालेय शिक्षण तुकड्या-तुकड्यांनी होत राहिले. क्रिकेटसह विविध खेळांमध्ये छोटा अनिरुद्ध रमत होता, पण अभ्यासावरचे लक्ष कधीच विचलित झाले नाही. आकड्यांमध्ये अनिरुद्ध कधीच रमला नाही, पण जीव-जंतूंमध्ये पार रमून जात होता. अर्थातच, विज्ञान त्याचा आवडीचा विषय होता. आपल्याला अभियांत्रिकी किंवा गणिताच्या वाट्याला जायचेच नाही, हे जणू त्याने ठरवूनच टाकले होते. दहावीला ८५ टक्के मिळ्याल्यानंतर अर्थातच त्याने विज्ञान शाखा निवडली. नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये ११-१२ वी केले. १२ वीला तुलनेने कमी गुण आले. मेडिकलचा तर विषयच नव्हता. तरीसुद्धा अनिरुद्धची कुठलीही नाराजी नव्हती. त्याने आपल्या आवडीप्रमाणे बीएसस्सीला प्रवेश घेतला. केमिस्ट्री, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी असे त्याचे मुख्य विषय होते. मायक्रोबायोलॉजीच्या निमित्ताने नवीन विषयाची ओळख झाली आणि जीव-जंतुंमध्ये अनिरुद्ध रमून गेला. पदवीस्तरावर फर्स्ट क्लास मिळवला आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये एमएसस्सी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी म्हणजेच १९९४ मध्ये नवीन असलेल्या बायोटेक्नॉलॉजी विषयाची निवड केली. त्याला पदवीसह पदव्युत्तर स्तरावर अतिशय मनापासून शिकविणारे प्राध्यापक मिळाले. या काळात त्याने केलेल्या प्रोजक्टच्या निमित्ताने छोटेखानी संशोधनाची तोंडओळख झाली. आवडते शिक्षण, आवडते शिक्षक आणि आवडत्या प्रोजेक्टवर काम, यामुळे अनिरुद्ध मनापासून बायोटेक्नॉलॉजी एन्जॉय करीत होता. एमएसस्सीलाही त्याने फर्स्टक्लास सोडला नाही. याच क्षेत्रातील आवडीमुळे त्याने पुणे विद्यापीठात एम.फीलसाठी प्रवेश घेतला. मात्र पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा दुजाभाव त्याला काही केल्या आवडेना व एम.फीलची भट्टी काही केल्या जमून येईना. म्हणून त्याने दोन-तीन महिन्यांत एम.फीलचा गाशा गुंडाळला व 'एनसीएल'ची संधी साधली.

तालीम 'हार्डकोअर रिसर्च'ची

भारत सरकारच्या प्रतिष्ठित 'नॅशनल केमिकल लॅबेरोटरी'मध्ये (एनसीएल) प्रोजक्ट असिस्टंट पदासाठी मुलाखत दिली. अभ्यास, संशोधनाची उर्मी व उत्तम अॅकॅडेमिक, यामुळे त्याला सहज संधी मिळाली. विभागप्रमुख डॉ. विद्या गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्धला अतिशय शास्त्रीय पद्धतीने 'हार्डकोअर रिसर्च' करण्याची उत्त्म संधी मिळाली आणि संशोधन हेच आपले क्षेत्र असल्याची खात्री पटली. दोन वर्षाच्या 'एनसीएल'च्या अनुभवामध्ये अनिरुद्धने संशोधन करण्याबाबत मोठा आत्मविश्वास कमावला. त्यामुळेच संशोधनामध्ये अजून पुढे जाण्याची त्याची इच्छाशक्ती जागृत झाली आणि त्याने अमेरिकेमध्ये पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जीआरई व टोफेलची तयारी सुरू केली. सकाळी नऊ ते पाच 'एनसीएल'च्या लॅबमध्ये काम आणि त्याआधी व त्यानंतरचा वेळ तयारीसाठी, अशी काटेकोर आखणी केली. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या पाचपैकी तीन विद्यापीठांमध्ये त्याला पीएचडीसाठी ऑफर मिळाली. त्यातील 'युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटस'ची त्याने निवड केली. अमेरिकेतील पीएचडी अभ्यासक्रम हा तब्बल साडेपाच ते सहा वर्षांचा आणि अर्थातच कुठल्याही पळवाटा नसलेला. अतिशय कठीण अशा पीएचडी प्रक्रियेत अनिरुद्ध पूर्णपणे तावून-सुलाखून निघाला आणि विशेष म्हणजे संशोधनाचा त्याने मनमुराद आनंदही लुटला. 'मॉलिक्युलर सेलबायोलॉजी' या विषयामध्ये त्याने संधोधन केले आणि पीएचडीच्या संपूर्ण काळात त्याला फेलोशिप मिळाली, ज्या फेलोशिपच्या आधारे तो आपले संशोधन कुठल्याही अडचणींशिवाय पूर्ण करू शकला. या काळात त्याने अंडरग्रॅज्युएट लेव्हलवर 'इंट्रोडक्टरी बॉटनी' व 'इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी' हे विषय शिकवले. त्यानंतरचे 'पोस्ट डॉक्टरेट ट्रेनिंग' त्याने बोस्टनमध्ये पूर्ण केले आणि त्याचदरम्यान 'नासा'ची संधी त्याला खुणावू लागली.

'नासा'ने बदलून गेले जीवन

'नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'मध्ये (नासा) 'पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप' मिळविण्यासाठी तुम्ही नेमक्या कुठल्या विषयात संशोधन करणार, त्या संशोधनाचा काय उपयोग होणार, कुणाला होणार, कसा होणार आणि त्याचे संशोधनाच्या क्षेत्रातील एकूणच महत्व किती, यासंबंधीचे मोठे प्रपोझलच 'नासा'ला सादर करावे लागते. त्यामुळे अनिरुद्ध यांनी सध्याच्या कार्बन डायऑक्साईडच्या २५ ते ५० पट जास्त म्हणजेच ४०० ते १५००० पार्टस पर मिलियन (पीपीपी) उत्सर्जनाचा झाडा-झुडपांवर काय, किती, कसा परिणाम होणार, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी कोणकोणती आणि कशी प्रकारची 'जेनेटिकली मॉडिफाईड' झाडं-झुडपं लागतील आणि या संशोधनाच्या निष्कर्षांचा उपयोग पृथ्वीवरील 'ग्लोबल वॉर्मिंग'साठी कसा होऊ शकतो, असे सगळे प्रपोझल अनिरुद्ध यांनी 'नासा'ला सादर केले आणि 'नासा'तील वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या वर्तुळातून त्याला वर्षानंतर का होईना मान्यता मिळाली. अर्थातच अनिरुद्ध यांनी 'नासा'ची फेलोशिप स्वीकारली आणि दोन वर्षांपासून ते 'नासा'चे शास्त्रज्ञ म्हणून मेरिट आयलँडवरील 'केनेडी स्पेस सेंटर'मध्ये कार्यरत आहेत. फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या अनिरुद्ध यांचा संशोधनाचा प्रवास पुढेही सुरू राहणार आहे. अर्थातच, 'नासा' हे त्यांचे शेवटचे डेस्टिनेशन नक्कीच नाही. जिद्द, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती असेल आणि मराठवाडा, महाराष्ट्र, देशाबाहेरही मोठे जग आहे, याचे भान असेल तर काहीही अशक्य नाही, असे ते आवर्जून म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात मोटरसायकलस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

औरंगाबादकडून बजाजनगराकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार समोरील एका वाहनाला धडकून मृत्युमुखी पडला. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर सांडू झाल्टे (वय २६, ह. मु. बजाजनगर मूळ रा. पिंपळगाव ता. फुलंब्री) हा औरंगाबादकडून बजाजनगराकडे मोटरसायकलवर (एमएच-२०सीजी३००६) येत होता. पंढरपूर येथील तिरंगा चौकातून बजाजनगराकडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकला धडक दिली. या धडकेमुळे समोरून येणाऱ्या अन्य एका वाहनास त्याची धडक बसली. या विचित्र अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णू सखराम दहीहंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. डी. राजपूत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी तर मिळाला, मागायचा कसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्थसंकल्पात कबूल केलेली रक्कम देण्यासाठी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडतो, पण निधी मिळत नाही. कसाबसा निधी मिळाला तरी तो काढून घेण्यासाठी बिले दाखल करताना आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे सरकारी कार्यालयांची अडचण झाली होती. बुधवारी सकाळी मंत्रालयात ही अडचण सांगून कसाबसा निधी पदरात पाडून घेतला.

३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपताना जुन्या वर्षातील सर्व जमा खर्चाचा ताळेबंद सादर करावा लागतो. जिल्हा परिषदेला गेल्या वर्षी बजेटमध्ये केलेल्या तरतुदीतून गेल्या चार दिवसांत १०२ कोटी रुपये प्राप्त झाले. ३१ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठीचे तीन कोटी, अंगणवाडी बांधकामाचे दोन कोटी ३३ लाख यासह अन्य विभागांसाठी निधी प्राप्त झाला. निधी प्राप्त झाल्याचे बीडीएस प्रणालीवरून कळते. तो वर्ग करून घेण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे नोंदणी करावी लागते. निधीचे हप्ते रात्री साडेअकरापर्यंत मिळाले. त्यानंतर मागणी नोंदविताना रात्री बारा वाजता संगणकाची तारीख बदलली. त्यामुळे ३१ मार्चची बिले दाखल करून घेण्यास सिस्टमने नकार दिला.

आता हा निधी मिळणार की परत जाणार अशी चर्चा सुरू झाली. ही अडचण बहुतांश सरकारी कार्यालयांची होती. बुधवारी सकाळी मंत्रालयात संपर्क साधून स्थानिक अधिकाऱ्यांनी अडचण कथन केली. त्यावर वरिष्ठांकडून कालच्या तारखेत बिले दाखल करण्याची परवानगी दिली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यातील मुख्य आरोपीला अटक

$
0
0

वाळूजः सिडको वाळूज महानगरातील तिसगाव परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीतील फरार आरोपीस वाळूज पोलिसांनी बडोदा (गुजरात) येथून ताब्यात घेतले आहे. या टोळीतील अन्य आरोपींना २० दिवासांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. वाळूज महानगर-१ मध्ये (१० मार्च) रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना इंडिका कारमधून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यात अण्णा पारवे, प्रकाश बत्तीसे, विजय कोऱ्हाडे, गुलाम शेख या आरोपींचा समावेश होता. इंडिका कारसह, एक गावठी पिस्तूल, जंबीया, गुप्ती, मिर्चीपूड व ३ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल असा एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता, मात्र त्यातील मुख्य आरोपी मुन्ना रुस्तूम शहा फरार झाला होता. हा आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला बडोदा येथून नुकतेच ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेलाचे भाव घसरले सर्वसामान्यांना दिलासा!

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

अमूक-अमूक जिन्नसचे भाव चढे होत आहेत, धान्यबाजार महाग होतोय, तमूकतमूक महाग होतेय अशा बातम्या रोज येत असतानाच बुधवारी (१ एप्र‌िल) तेलाचे विशेषतः करडी तेलाचे भाव गडगडले आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. नव्या करडीची आवकही याचा काळत सुरू होते. ही आवक आणि तेलाची आवक सुरू झाल्याने भाव अचानक गडगडले. करडीचे पीक याच काळात जास्त येते. त्याचा परिणाम करडी तेलावर दिसून येत आहे. कालपर्यंत अर्थात ३१ मार्चपर्यंत करडीचे साधे तेल १०० रुपये होते ते आजपासून ९० रुपये लिटर झाले.

मराठवाड्यात अजूनही करडी व डबल फिल्टर करडीचे तेल खाण्याकडेच कल आहे. पॅकिंग व डबल पॅकिंगच्या तेलाच्या पिशव्या विकल्या जात असल्या तरी अजूनही सुटे तेल विकत घेणे काही कमी झाले नाही. आम आदमीला हा दिलासा मिळाला असून साध्या तेलासह करडी डबल फिल्टरही स्वस्त झाले आहे. करडी डबल फिल्टर १०५ होते ते ९५ रुपये लिटर झाले आहे. इतर तेलांचे दर ही कमी झाले असून ज्यांना शेंगदाणे तेल, पाम तेल घ्यायचे असते त्यांनाही दिलासाच मिळाला आहे. शेंगदाणे तेल १०५ लिटर ते १०० रुपये लिटर, डबल फिल्टर ११० रुपये लिटर मिळू लागले आहे. करडी तेलामुळे त्याच्यावर अवलंबून असलेले सोयाबीन ७५ रुपये लिटर होते ते ७० रुपये लिटर तर पाम तेल ६५ चे ६० रुपयांवर गेले आहे. सरकीचे तेल ६५ रुपये लिटर होते ते ६० झाले आहे. वनस्पती तूप ७० रुपये किलो होते ते ६५ झाले. तुपात ५ रुपयांनी आलेली घसरण गेल्या महिन्याभरात पहिल्यांदाच झाली. करडी तेलातील करडी १० रुपयांची घसरण ही ठोक व १५ लिटर डबा घेत असलेल्या ग्राहकांसाठी तर ‌अधिकच दिलासा देणारी आहे. आजघडीला सुटं तेल खरेदी करण्याकडे कल आहे. तेल व तुपाचे कमी झालेले दर नक्कीच महागाईच्या काळात घरच्या बजेटला दिलासा देणारे असेल असे, गुलमंडीवरील बसैये शुद्ध तेल भंडारचे जगन्नाथ बसैये यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images