Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आमदार समर्थकांची सूर्यवंशींना धक्काबुक्की

$
0
0

पैठण : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीचा चेकबद्दल तक्रार केल्याचे प्रकरण तालुक्यात चांगलेच तापले आहे. ही तक्रार करणारे भाजप नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी आमदार संदीपान भुमरे समर्थकांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याची तक्रार पैठण पोलिस ठाण्यात केली आहे.

तालुक्यातील हिरडपुरी येथील शेतकरी जनार्धन भोसले यांनी १ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबासाठीचा मदतीचा एक लाख रुपयांचा चेक तहसील कार्यालयाला प्राप्त झाला होता. हा आमदार भुमरे यांच्या स्वीय सहाय्यकाने आठ दिवसांपासून दाबून ठेवला. यामागे आमदारांच्या हस्ते चेक देवून श्रेय लाटण्याच्या उद्देश आहे, अशी तक्रार सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीमुळे आमदार भुमरे समर्थक किशोर चौधरी, अशोक फासाटे व अन्य दहा ते बारा लोकांनी, बुधवारी (१ एप्रिल) पैठण तहसील कार्यालयात धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. आमदारांच्या नादी न लागण्याची धमकी दिल्याची तक्रार पैठण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आमदार संदीपान भुमरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एम.जी.एम.विरोधात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशनकडून (एमजीएम) सिडकोने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर होत आहे. सिडकोने चौकशी करून एमजीएमवर कारवाई करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यास १०हजार रुपये भरण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी भीमसेनाचे अध्यक्ष विशाल कडुबा पाखरे व संजय बापूराव चव्हाण यांनी ही याचिका केली आहे. एमजीएमला भूखंड क्लब, स्टेडियम आणि शैक्षणिक बाबींसाठी देण्यात आला आहे. या भूखंडाचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे, तेच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. क्लब, स्टेडियम आणि जिमखान्याऐवजी एमजीएम परिसरात शाळा, हॉस्पिटल आणि हॉटेल चालविले जाते. स्टेडियम व क्लबच्या भूखंडाच्या जागेचा मूळ वापर बदलून वाणिज्य व व्यावसायिक वापरासाठी आलिशान हॉटेल, कॅफे, खादी व पैठणी केंद्र, जलतरण तलाव आणि पेट्रोल पंप सुरू केला आहे.

सिडकोने शपथपत्र दाखल केले आहे. यास उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी २ आठवडयाची वेळ मागितली. त्यास कोर्टाने मंजुरी दिली. याचिकाकर्त्यातर्फे बी. एल. सगर -किल्लारीकर, एम. बी. संदानशिव यांनी बाजू मांडली. सिडकोतर्फे अनिल बजाज, एमजीएमतर्फे वरिष्ठ वकील आर. एन. धोर्डे, महापालिकेतर्फे संजय पगारे हे काम पाहत आहेत. या याचिकेची १३ एप्रिल रोजी होणार आहे.

व्यावसायिक बाबी बंद करण्याची विनंती

एमजीएमला दिलेल्या भूखंडावरील व्यावसायिक बाबी ताबडतोब बंद करा, चालू असलेली बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपाइंची २४ तासांची डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या २४ तासांत महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय घ्यावा. अन्यथा वेगळी चूल मांडू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी शिवसेना व भारतीय जनता पक्षाला दिला आहे. किमान पंधरा जागा मिळाल्याच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महापा‌िलकेसाठी शिवसेना-भाजपमध्येच अजून युती झाली नाही, त्यापूर्वीच रिपाइंने हा इशारा दिला आहे.

भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याआधाची या दोन्ही पक्षानी ११३ जागासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत एकमेकांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पावलांवर पाऊल ठेवत रिपाइंनेही गुरुवारी (१६ एप्रिल) हॉटेल कार्तिक येथे ३५ वॉर्डांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अशी माहिती प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली. निवडणूक समितीचे मिलिंद शेळके, दौलत खरात, संजीव ठोकळ, प्रियानंद शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

या जागा हव्यात

भगतसिंगनगर-म्हसोबानगर (वॉर्ड २), रोजाबाग-भारतमातानगर (वॉर्ड १०), पहाडसिंगपुरा-बेगमपुरा ( वॉर्ड १२),नंदनवन कॉलनी-शांतीपुरा (१७), एमआयडीसी चिकलठाणा (वॉर्ड ३८), अयोद्धानगर (वॉर्ड ३९),कोतवालापुरा-गरमपाणी (वॉर्ड ५०), समर्थनगर (वॉर्ड ६८), कोकणवाडी ( वॉर्ड ७४), शिवशंकर कॉलनी-बालाजीनगर (वॉर्ड ७४) किंवा बौद्धनगर (वॉर्ड ७५) यापैकी एक. संजयनगर (वॉर्ड ८४), संजयनगर-मुकुंदवाडी (वॉर्ड ८५), विठ्ठलनगर (वॉर्ड ८७), चिकलठाणा (वॉर्ड ८९), प्रियदर्शनी इंदिरानगर (वॉर्ड १११) किंवा भारतनगर शिवाजीनगर (वॉर्ड ११३) यापैकी एक जागा.

३२ जागांची यादी सेना-भाजप नेत्यांकडे दिली आहे. त्यापैकी किमान १५ जागा रिपाइंला मिळाल्या पाहिजेत. दोन्ही पक्षनेत्यांशी यापूर्वी चर्चा झाली आहे. काही जागा सोडण्याबाबत तयारीही दर्शवली आहे, परंतु निवडणुकीसाठी कमी कालवधी शिल्लक असल्याने जागा वाटपबाबत येत्या २४ तासांत निर्णय घ्यावा. अन्यथा वेगळा विचार करू.

- बाबूराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष, रिपाइं

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमानच्या संमेलनावर टीकेची झोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घुमान (पंजाब) येथील नियोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि साहित्यिक गुरुवारी (२ एप्रिल) विमानाने रवाना झाले. तीन ते पाच एप्रिल दरम्यान संमेलन होणार आहे. संमेलनात साहित्यिकांना संधी देण्याऐवजी मसापचे पदाधिकारी स्वतःचे नाव यादीत घुसवून मक्तेदारी निर्माण करीत असल्याची टीका साहित्य वर्तुळात सुरू आहे.

घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचा चमू विमानाने रवाना झाला. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे, देविदास कुलकर्णी, डॉ. दासू वैद्य, पी. विठ्ठल, सुनंदा गोरे, प्रा. ललित अधाने आणि प्रा. ज्योती अधाने यांचा त्यात समावेश आहे. दिल्लीहून सर्वजण घुमानला बसने जाणार आहेत. शहरातील साहित्यप्रेमी सोमवारी रात्री रेल्वेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनासाठी साहित्यिकांची नावे सूचवण्यास कळवले होते. दरवर्षीप्रमाणे मसापच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःची नावे घुसवली आहेत, अशी टीका प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांनी केली. इतर साहित्यिक व कवींना संधी देण्याऐवजी स्वतःच घुसखोरी करीत आहेत. परिसंवाद आणि कविसंमेलनातील सहभागी साहित्यिकांचा वकुब पाहिल्यास त्यांना संधी कशी मिळाली, असा प्रश्न पडतो असेही उमरीकर यांनी म्हटले आहे. याबाबतची पोस्ट दोन दिवसांपासून सोशल साइट्सवर गाजत आहे.

साहित्य‌िकांचे टीकास्त्र

घुमान येथील साहित्य संमेलनात दलित, भटके-विमुक्त, आदिवासी आणि पददलितांचे साहित्य आणि संस्कृतीवर एकाही परिसंवादात चर्चा नाही. संमेलन अखिल भारतीय असेल, तर सर्व घटकांना संधी देणे आवश्यक आहे, असे म्हणत शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी संमेलनाचा निषेध केला आहे. याबाबत प्रा. मोहन सौंदर्य, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. युवराज धबडगे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. मिलिंद वाव्हळे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे निषेध नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या सूचनेवरून टोलनाका बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

लासूर येथील टोल नाक्याची मुदत ३१ मार्चअखेर संपल्यानंतरही टोलवसुली सरू असल्याने आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांनी गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी टोल वसुली बंद पाडली. लासूर टोलनाका दहा वर्षांपासून नियमांचे पालन न करता सुरू आहे, असा आमदार बंब यांचा आरोप आहे. हा रस्ता हडस पिंपळगाव, बोर दहेगाव या गावाजवळ रस्ता खराब असूनही एमएसआरडीसीमार्फत टोलवसुली सुरू होती.

आमदार बंब यांनी दोन दिवसांपूर्वी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना या पत्र पाठवून ३१ मार्च रोजी संपणार असून या टोल बंद करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रानंतरही वसुली सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी टोलनाका बंद पाडला. यावेळी रज्जाक पठाण, संतोष वाकळे, विनोद वाकळे, दिनेश वरकड, संजय पाटील, बाबासाहेब नरोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्याच्या अपहरणाचा रोशनगेट भागात प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोशनगेट भागातील अरिष कॉलनीतून पत्रकाराच्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न बुधवारी (१ एप्रिल) करण्यात आला. तीन अनोळखी व्यक्तींनी मुलाचे वडील व काकांनी फोटो काढण्यासाठी बोलावल्याची थाप मारली. परंतु, मुलाच्या आईने प्रसंगावधान दाखविल्यामुळे त्या तिघांनी धूम ठोकली.

अरिष कॉलनी भागात टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार मोहमद आकेफ हे पत्नी इफत फातेमा व मुलगा अशाज (वय २ वर्षे) यांच्या सोबत राहतात. अरिष कॉलनी परिसरातील वीज पुरवठा बुधवारी रात्री (१ एप्रिल) खंडित झाला होता. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी दार वाजवले. तेव्हा घरात इफत फातेमा व अशाज दोघेच होते. इफत यांनी लगेच दार न उघडता दुर्बिणीतून पाहिले असता तीन जण दिसले. त्यांनी अशाजचा फोटो आयडी काढायचा असून त्याला आकेफ व त्यांचे दीर आमेर यांनी बोलावल्याचे सांगितले. त्यांनी विचारूनही नावे सांगितले नाहीत. त्यामुळे संशय आल्याने इफत फातेमा यांनी पतीला फोन करते असे सांगून गॅलरीतून भाडेकरूंना बोलावले. हे लक्षात येताच तिघांनी दुचाकीवरून पलायन केले. दरम्यान याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरवाडीतही घेतला शोध

मोहम्मद आकेफ यांची एन आठ परिसरात सासरवाडी आहे; त्या तिघांनी अरिष कॉलनीत येण्यापूर्वी अशाजचा तेथे शोध घेतला. त्यांच्या वृद्ध आजीसासूंकडे अशाजची चौकशी केली. घरात कसे आलात, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा किंग जोशींच्या याचिका फेटाळल्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला गुटखा किंग जगदीश जोशी यांनी आव्हान दिलेल्या तीन याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या.आय. के.जैन यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे पोलिसांना जोशी यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात गुटखा बंदी असतानाही नांदेड जिल्ह्यात गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून नांदेड गुन्हे शाखेने विविध ठिकाणी कारवाई करून गोवा, बाबा,आरएमडी, माणिकचंद अशा विविध कंपन्यांचा दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्तकेला. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाणे ,कंधार व हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक रोहित सावंत यांनी विविध गुटखा कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावल्या. गोवा गुटखा ब्रॅण्ड असलेल्या जेएमजी ग्रुपचे मालक जगदीश मोहन जोशी (रा. मुंबई) वगळता अन्य मालकांचे जबाब पोलिसांनी नोंदविले; मात्र जगदीश जोशी यांनी पोलिसांच्या नोटीसला उत्तर देऊन खंडपीठात आव्हान दिले. गुटखा विक्रीशी आपला संबंध नसल्याने नोटीस रद्द करावी अशी विनंती केली. सुनावणीत सरकारतर्फे आर. के. लड्डा यांनी बाजू मांडली. त्यानंतर खंडपीठाने पोलिसांना फौजदारी संहितेच्या कलम ४१ (अ) अन्वये चौकशीचा अधिकार आहे, त्यामुळे पोलिस चौकशी करू शकतात असा निर्वाळा देऊन जगदीश जोशी यांनी दाखल केलेल्या तीनही याचिका फेटाळून लावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अट्टल सातपुते’ जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१ एप्रिल) दुपारी शहानूरमिया दर्गा चौकात करण्यात आली. या टोळीतील सदस्यांवर सव्वाशे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहानूरमिया दर्गा परिसरातील पाकिजा रसवंतीमागे काही संशयीत आरोपी एकत्रित आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी हे सातही आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सचिन चंद्रकांत त्रिभूवन (रा. हर्षनगर), अजय रमेश ठाकूर (रा. साईनगर), रवी रमेश गायकवाड (रा. ब्रिजवाडी), सिद्धार्थ रमेश गायकवाड (रा. कबीरनगर), दीपक चंद्रभान क्षीरसागर (रा. मिलींदनगर), ईश्वर महादेव गावडा (रा. टाऊन हॉल) व अनिल फुलचंद लाहोट (रा. गांधीनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, हॅक्सॉ ब्लेड, बॅटरी, पक्कड, मिरची पावडर व रोख ५५० रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अण्णासाहेब शेजूळ, सहायक फौजदार शेख आरेफ व पथकाने केली.

गुन्हे वेगळे तरी एकत्र

पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांची गुन्ह्याची पध्दत वेगवेगळी आहे. ते वेगवेगळ्या परिसरातील रहिवासी असून हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. तरीही हे गुन्हेगार एकत्र आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आरोपी दाखल गुन्हे गुन्ह्याचे स्वरूप

सचिन त्रिभूवन १७ खून, जबरी चोरी, दरोडा

अजय ठाकूर २४ घरफोडीच्या गुन्ह्यात तरबेज

रवी गायकवाड १३ चोरी व घरफोडी

सिद्धार्थ गायकवाड १६ घरफोडी, जबरी चोरी व दरोडा

दीपक क्षीरसागर ३१ चोरी, घरफोडी व जबरी चोरी

ईश्वर गावडा १४ घरफोडी, चोरी

अनिल लाहोट ११ घरफोडी, चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजीनगर होणारच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे औरंगाबादेच नाव संभाजीनगर होणारच, असे सांगत भाजप नेत्यांनी भावनिक मुद्याचा आधार घेतला आहे. वॉर्डातून उमेदवारी कोणा एकालाच मिळणार आहे, इतर निष्ठावंताना महामंडळासह अन्य संधी मिळेल, असे गाजर दाखवत बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, महिला कार्यकर्त्यांना न्याय द्या, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना नको, असे म्हणत कोअर कमिटीच्या सदस्यांना काही महिला कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची घटना मेळाव्याआधी घडली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शहानूरमियाँ दर्गा रोडवरील श्री हरी पॅव्हेलियन येथे गुरुवारी (२ एप्रिल) आयोजित करण्यात आला होता. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार अमर साबळे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, किशनचंद तनवाणी, प्रवीण घुगे, डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, शिरीष बोराळकर, संजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

युतीबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होईल, असे याप्रसंगी बोलताना पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगत यंदा महापौर भाजपाचाच होणार, असा विश्वासही व्यक्त केला. मानगुटीवर बसलेले समांतरचे भूत उतरविणारच, असे सांगत त्यांनी नागरिकांना पुरेसे पाणी माफक दरात देऊ, असे आश्वासन दिले. राज्यात सत्तेत येताच केवळ रस्त्यांसाठी भाजप सरकारने ३१ कोटी रुपये या शहराला दिले. यापुढे विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल, प्रसंगी जागतिक बँकेतून कर्ज काढू, असेही लोणीकर नमूद केले. तिकीट एकालाच देता येईल, मात्र इतरांनी नाराज होऊ नये, निष्ठावंताना पक्षाकडून योग्य संधी दिली जाते. महामंडळावरील नियुक्तीपासून योग्य त्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खासदार साबळे यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे झाली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले होते. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. मेळाव्याची वेळ दुपारी तीन वाजेची होती, परंतु सायंकाळी साडेचारपर्यंतही अपेक्षित गर्दी झाली नव्हती. त्यामुळे रिकाम्या खुर्ची सभास्थळावरून बाजूला नेण्याची वेळ भाजपावर आज आली.

आमदारांनी जोडले कार्यकर्त्यांना हात

मेळावा सुरू होण्यास थोडा वेळ राहिलेला असतानाच उमेदवारीच्या मुद्यावरून काही महिला कार्यकर्त्यांनी निवडणूक समितीचे आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांच्यासह अन्य सदस्यांना घेराव घातला. पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, नातेवाईक यांनाच उमेदवारी मिळणार असेल तर पक्षाशी एकनिष्ठ काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना केव्हा संधी मिळणार, असा सवाल करत पक्षनेत्यांना धारेवर धरले. भाजपच्या महिला कार्यकर्त्या खूपच आक्रमक झाल्या होत्या. इतक्या की एका महिला कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी आमदार अतुल सावेंनी अक्षरशः हात जोडले. अजून कोणाचेही तिकिट फायनल केलेले नसून प्रबळ, योग्य उमेदवारांनाच संधी मिळेल, असे सांगत नेत्यांनी मेळाव्यापूर्वी आलेले हे विघ्न दूर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये युती संकटात

$
0
0

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीवर संकटाचे मळभ निर्माण झाले आहे. सकारात्मक वळणावर सुरू असलेली चर्चा अचानक संकटाच्या वळणावर पोहचली. त्यामुळे शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना सायंकाळी अचानकपणे विमानाने मुंबईला बोलावण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम यांच्या निवासस्थानी या सर्वांची बैठक रात्री आठच्या सुमारास सुरू झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीवरून दोन्हीही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद औरंगाबादच्या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथील साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुनील बळीराम राठोड (वय १०), सुमीत मोहन जाधव ( वय ९), अजित अंबादास चव्हाण (वय ११) आणि तानेश सुभाष राठोड (वय १०, रा. सर्वजण आष्टाकासार ता. लोहारा) अशी मरण पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. चौघे मिळून गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हंगरगा येथील साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हंगरगा गावात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटननगरीत पर्यटकांची दैना

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

खड्डेमय रस्ते, प्रचंड धूळ, वाढते प्रदूषण, बेपत्ता मार्गदर्शक फलक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे औरंगाबाद शहराचा पर्यटन व्यवसाय अक्षरशः रसातळाला गेला आहे. देश-विदेशातील लाखो पर्यटक समस्यांचा सामना करीत पर्यटनस्थळांपर्यंत पोहचतात आणि निराश होतात. महापालिका प्रशासनाने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या नाहीत. परिणामी राज्याची पर्यटन राजधानी बकाल झाली आहे.

राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा औरंगाबाद शहराला मिळाला आहे. वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी ही जगातील दोन प्राचीन वारसास्थळे जिल्ह्यात आहेत. शहरात बीबी-का- मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, सलीम अली सरोवर अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. तसेच जिल्ह्यात गौताळा अभयारण्य, म्हैसमाळ, सारोळा ही वन पर्यटनस्थळे आहेत. शहरात मुक्काम करून पर्यटनाचा पर्यटकांचा बेत असतो; मात्र प्राथमिक सोयीसुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाला अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. शिवाय खराब रस्ते आणि कचराकुंड्यांनी पर्यटन राजधानीची रया घातली आहे. जगभरातील लाखो पर्यटक शहरात येत असूनही रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बसस्थानकावर पर्यटकांसाठी माहिती केंद्र नाही. पर्यटनस्थळी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून पर्यटकांची लूट करीत आहेत. हा प्रकार शहराची वाईट प्रतिमा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून महसूल मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल याचा विचार महापालिका प्रशासनाने केला नाही. या उदासिनतेमुळे शहरातील पर्यटनस्थळांचा बट्टयाबोळ झाला आहे. शिर्डीसह इतर तीर्थस्थळांना पर्यटक औरंगाबाद शहरातूनच जातात. या काळात शहरातील पर्यटनस्थळे पाहण्यावर त्यांचा भर असतो. अर्थात, पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी शहरात स्वतंत्र यंत्रणा नसल्याने पर्यटकांची फसवणूक होते. त्यामुळे वैतागलेले पर्यटक दुसऱ्या शहरात गेल्याचा अनुभव पर्यटन व्यावसायिकांना आला आहे. शहराचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे प्रशिक्षित गाइड नाही. पर्यटनस्थळ पाहण्यापूर्वी पूर्वेतिहास जाणून घेण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांची घोर निराशा होते. रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांच्याकडून फसवणुकीचा अनुभव आल्यामुळे औरंगाबाद शहर पर्यटनासाठी अयोग्य असल्याचा संदेश जगभर पोहचत आहे. शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून उद्याने आणि स्मारके विकसित करण्यात आली आहेत. या ठिकाणांची शहरातील नागरिकांनाच माहिती नाही. ज्योतीनगरमधील कवितेची बाग, सहकारनगरमधील लोककला उद्यान, विश्वभारती कॉलनीतील भारतमाता मंदिर, सलीम अली सरोवर अशी अनेक ठिकाणांची दुर्दशा झाली आहे. या उद्यानांच्या नियमित देखरेखीसाठी पुरेसा निधी नाही आणि मनपा प्रशासनाला अजिबात स्वारस्य नसल्यामुळे शहराचे आकर्षण केंद्र उजाड झाले आहेत.

सर्वात गचाळ शहर

औरंगाबाद शहरात पर्यटकांशी संवाद साधल्यानंतर हे शहर किती बकाल आहे याची खात्री पटते. शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यांनी गांजलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुभाजकांचे सुशोभीकरण नसल्यामुळे शहर बकाल दिसत आहे. तालुका पातळीवरील गावांप्रमाणेच सुविधांची वानवा आहे. आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर असा नव्वदच्या दशकात लौकिक मिळवलेल्या शहराचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे. शहराच्या गचाळपणाबाबत विदेशी पर्यटक प्रतिक्रिया नोंदवत असल्यामुळे स्थानिक संयोजक आणि हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. या प्रकारामुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन पर्यटन व्यवसाय नामशेष होण्याची भीती आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या लहान शहरात पर्यटनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या शहरातील सुविधांमुळे दरवर्षी पर्यटकांचा ओघ वाढत असून औरंगाबादची बकालपणामुळे रया गेली आहे.

पर्यटकांची लूट

विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा बसस्थानक येथून हॉटेल किंवा पर्यटस्थळांपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही. मोजक्याच सिटी बस धावत असल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांचे रेटकार्ड नसल्यामुळे पर्यटकांची हमखास फसवणूक होते. अगदी मध्यवर्ती बसस्थानक ते औरंगाबाद लेणीसाठी अडीचशे रुपये रिक्षाभाडे आकारल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पर्यटक पैसे देण्यास तयार असतात; मात्र फसवणुकीची भावना निर्माण झाल्यास पर्यटनावर परिणाम होतो, असे पर्यटन अभ्यासक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. पर्यटनाबाबत जर्मनी, स्वित्झर्लंड या देशातील सेवांचा आपल्या शहराने अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

समन्वयाचा अभाव

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी महापालिका प्रशासनाचा योग्य समन्वय नाही. शहरातील पर्यनटस्थळांची माहितीपत्रके मोठी हॉटेल्स आणि एमटीडीसी कार्यालयात ठेवण्याबाबत वारंवार प्रस्ताव पाठवण्यात आला; मात्र मनपा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. परिणामी पर्यटकांची गैरसोय कायम आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी मनपा सांस्कृतिक महोत्सव भरवला नाही. तसेच पर्यटन समिती नेमली नसल्यामुळे पर्यटननगरीत पर्यटनाची दैना झाली आहे.

जिल्ह्यातील लहान-लहान पर्यटनस्थळांना विकसित करून पर्यटकांपर्यंत माहिती पोहचवणे गरजेचे आहे. एमटीडीसी पर्यटनस्थळांच्या प्रसारासाठी काम करीत आहे. जयपूर शहरात गेल्यानंतर 'आपण किती सुंदर शहरात आलो' अशी पर्यटकांची भावना होते. तर अगदी उलट भावना औरंगाबाद शहरात येते. अस्वच्छता, खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे पर्यटकांच्या मनात प्रतिकूल प्रतिमा निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. स्थानिक पातळीवर समिती नेमून त्यांनी काम करावे. शहराचा प्रत्येक बाबतीत विकास करताना पर्यटनाचाही विचार झाला पाहिजे. शहराचा विकास संस्कृती आणि पर्यटनावरही अवलंबून असते. सध्यातरी पर्यटनाबाबत प्रचंड उदासिनता आहे.

- आरती पाटणकर, सदस्य, पर्यटन सल्लागार समिती.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची वेबसाइट तयार करण्याची गरज आहे. परराज्यात सुटीच्या कालावधीपूर्वी पर्यटनस्थळांची पुरेपूर जाहिरात अपेक्षित आहे. रेल्वे स्टेशन, बसस्टँड आणि विमानतळावर पूर्णवेळ माहिती सेवा केंद्र सुरू करणे शक्य नसल्यास पर्यटकांना माहितीपुस्तिका उपलब्ध करून द्यावी. शहरातील दुभाजकांचे सुशोभीकरण आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांना पर्यटक मित्र बनवून त्यांच्याकडे माहितीपुस्तिका ठेवा. बीबी- का-मकबरा, पाणचक्की परिसरात काटेकोर स्वच्छता ठेवून पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करा. अनधिकृत विक्रेते हटविण्यासाठी दुकानांसाठी गाळे बांधा. त्यामुळे अतिक्रमणाचा वेढा पडणार नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी सध्यातरी पर्याय दिसत नाही; मात्र रेटकार्ड जाहीर केल्यास पर्यटकांची फसवणूक होणार नाही.

- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेनड्राइव्हच्या माध्यमातून परस्पर लागली ‘फिल्डिंग’

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदार याद्या हस्तगत करण्यासाठी इच्छुकांनी परस्पर 'फिल्डींग' लावल्यामुळे महापालिकेतून अधिकृतपणे आतापर्यंत फक्त ७६८ याद्यांचीच विक्री झाली आहे. १६५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेले असताना मतदार याद्यांची विक्री त्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी झाल्यामुळे खुद्द निवडणूक विभागातील कर्मचारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या धर्तीवर वॉर्डनिहाय मतदार याद्या तयार केल्या आहेत. निवडणूक विभागाच्या कार्यालयात या याद्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एका यादीची किंमत पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार याद्या खरेदी करणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. उमेदवारी अर्ज नेण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींची झुंबड उडत आहे. तीन दिवसात १६५० जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यांच्या तुलनेत निम्म्या मतदार याद्याही विकल्या गेलेल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदाराने अनेकांना पेनड्राईव्हच्या माध्यमातून मतदार याद्यांची विक्री केली आहे. १६०० ते २००० रुपयाला एका वॉर्डाची मतदार यादी पेनड्राईव्हमध्ये विकण्यात आली आहे. तर पालिकेच्या परिसरात असलेल्या झेरॉक्सच्या काही दुकानातूनही याद्यांची विक्री होत आहे. सर्वसामान्यांना महापालिकेच्या संकेतस्थळावरून मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येत असताना झेरॉक्सच्या दुकानातून याद्या डाऊनलोड करून त्याची विक्री कशी काय केली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या निवडणूक विभागात मतदार याद्यांचे गठ्ठे पडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळा पैसा, पेड न्यूजवर कारवाईचे आदेश नाहीत

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी काळ्या पैशाचे वाटप केले जाते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई झाली, पण आता महापालिकेच्या निवडणुकीत अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून आलेले नाहीत. पेड न्यूजच्या संदर्भातही कारवाई करण्याबद्दल सुस्पष्ट आदेश नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी स्टेशनरीचा तुटवडा असून खासगी वाहनांवर मात्र मुक्तपणे उधळण केली जात आहे.

कोणत्याही निवडणुकीच्या काळात मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च केला जातो. त्यामुळे अशा खर्चावर निवडणूक आयोगाचे नियंत्रण असते. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत याचा प्रत्यय आला. अनेक ठिकाणी आचारसंहितेच्या पथकांनी नोटांनी भरलेल्या बॅगा आणि गाड्या पकडल्या होत्या. महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची कारवाई होणार आहे का, असे पत्रकारांनी उपायुक्त किशोर बोरडे यांना विचारले असता ते म्हणाले, तशी कारवाई करण्याबद्दल अद्याप निवडणूक आयोगाचे आदेश आलेले नाहीत.

महापालिकेची निवडणूक तुलनेने खूपच लहान असल्यामुळे अशा कारवाईची तरतूद असण्याची शक्यता नाही. पेड न्यूजवरही कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून सूचना आलेल्या नाहीत.

पालिकेच्या प्रशासनाने निवडणुकीसाठी दहा कार्यालये स्थापन केली आहेत. या दहा कार्यालयात स्टेशनरीसाठी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा लागत आहे, पण स्टेशनरी उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. दुसरीकडे खासगी वाहनांचा मात्र मुक्तपणे वापर केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या मालकीच्या वाहनांशिवाय पन्नास खासगी वाहने लावण्यात आली आहेत. एका वाहनाचा एक दिवसाचा खर्च तीन हजार रुपये आहे.

चार कोटींची तरतूद

महापालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेच्या फंडातून हा खर्च केला जाणार आहे. निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्र शासन निधीचा भार उचलत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीच्या बहाण्याने पळवले स्मोक डिटेक्टर

$
0
0

औरंगाबाद : फायर सिस्टीम दुरुस्तीचा बहाणा करीत घुसलेल्या दोन भामट्यांनी सिडको एन ४मधील एमआयटी हॉस्पिटलमधील ६६ स्मोक डिटेक्टर पळवले आहेत. दोन वर्षांपूर्वी कोकणवाडीतील एका हॉटेलमधूनही याच पद्धतीने स्मोक डिटेक्टर पळविण्यात आले होते.

इमारतीत थोडाही धूर निघाल्यास डिटेक्टर अर्लाम वाजवून धोक्याचा इशारा देते. एमआयटी हॉस्पिटलमध्ये आगीपासून बचाव करण्यासाठी स्मोक डिटेक्टर लावण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये १९ मार्च रोजी दोन तरुण आले. त्यांनी मुंबई येथील रॉयल फायर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून फायर सिस्टीम दुरूस्त करणार असल्याचे सांगितले. हॉस्पिटल व्यवस्थापनाला हे खरे वाटल्याने त्यांनी दुरुस्तीची परवानगी दिली. हे दोन तरुण हॉस्पिटलमधील ६६ ‌स्मोक डिटेक्टर काढून घेऊन पसार झाले. ते निघून गेल्यानंतर काही वेळाने हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी दत्तू मोरे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीचोरांना अटक; सात दुचाकी हस्तगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींचे क्रमांक बदलून धुळयात विकल्या जात होत्या.

विशेष पथकाने गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी एन २ कामगार चौकात सापळा लावून चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या अर्जून लिंबाजी जाधव (वय २०, रा. मुकुंदवाडी) याला अटक केली. त्याने ही दुचाकी संतोष बडनाळेच्या मदतीने चोरल्याचे सांगितले. या दुचाकी गोपाल उर्फ भुऱ्या देविदास पाटील (वय २९, रा. जयशंकर क‌ॉलनी, मोहाडी, जि. धुळे) याला विकण्यासाठी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी धुळ्यातून गोपाल उर्फ भुऱ्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

केटरिंगकडून चोरीकडे

या टोळीचा सूत्रधार संतोष बडनाळे असून तो खुनाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्सूल जेलमध्ये आहे. केटरिंगच्या व्यवसायातून आनंदसोबत व मुकुंदवाडीतील दारूच्या गुत्त्यावर गोपाल पाटील बरोबर ओळख झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संभाजीनगर’ने तारले; ‘कलगीतुऱ्या’ने बुडवले!

$
0
0

प्रमोद माने, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत प्रथमच निवडणूकपूर्व भाजप-शिवसेनेची युती झाली. गेल्या निवडणुकीत एकमेकांचे विसर्जन करायला निघालेले हे पक्ष एकत्र आल्यामुळे निश्चितपणे हिंदू मतपेढीची विभागणी झाली नाही. याचा युतीला फायदाच झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेने पुन्हा एकदा महापालिकेवर भगवा फडकविता आला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होऊ शकली नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या त्या राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये. या दोन पक्षांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला होता. घड्याळ आणि पंजाचे एकत्र नाते किती विजोड आहे याचेच दर्शन या प्रचारादरम्यान घडले होते. राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर. आर. आबा पाटील यांनी काँग्रेसला गाडून टाकण्याची भाषा केली होती. काँग्रेसचे तत्कालीन सहकारमंत्री व औरंगाबादचे संपर्कमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीला बेडूक म्हणून संबोधले होते. तत्कालीन आमदार आणि आताचे नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याचा साक्षात्कार झाला होता. या कलगीतुऱ्याला रंग चढविला तो कै. आर. आर. आबा यांनी. त्यांची हडकोतील सभा चांगलीच गाजली होती.

'जिल्हा परिषद निवडणुकीत जातीयवादी शक्तीशी युती करून आम्हाला धर्मनिरपेक्ष नसल्याचा आरोप केला जातो,' असा सवाल कै. आर. आर. पाटील यांनी त्या वेळी केला होता. 'धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटविणाऱ्या काँग्रेसने राज्यामध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली. आता आम्हाला योग्य संधी असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला गाडून टाका,' असे आवाहन त्यांनी या वेळी केले होते. 'सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने जेव्हा एकत्र नांदतात, तेथे समृद्धी येते. हा विचार राष्ट्रवादीचा आहे,' असेही ते म्हणाले होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष श्रीमती प्रभा राव यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला बेडूक असल्याचे त्यांनी संबोधले होते. 'बेडकाने बैल होण्याचा प्रयत्न करू नये. बेडूक कधी बैल झाला आहे का हो?' असा सवाल डॉ. कदम यांनी सभासभांमध्ये केला होता. 'आर. आर. आबांनी केलेली टीका अनाठायी आहे. त्यांनी या पद्धतीने बोलू नये,' असा सल्ला काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठमंत्री अजितदादा पवार यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला होता. 'निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्यांक आणि मागसवर्गीयांसमोर काँग्रेस मतांचा जोगवा मागते आणि नंतर त्याच्याकडे पाठ फिरविते. ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे,' अशी टीकाही त्यांनी केली होती.

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन किती दिवस राहणार,' असा सवाल तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. 'त्यांच्या कुबड्या घेऊन फार काळ चालता येणार नाही,' असेही ते म्हणाले होते. 'औरंगाबादमध्ये घड्याळाचे काय काम,' असा सवाल तत्कालीन मुख्यमंत्री कै . विलासराव देशमुख यांनी केला होता.

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेनेची वज्रमूठ कायम ठेवा. मग कोणीही तिला धक्का लावू शकणार नाही, ती मोडू शकणार नाही, तोडू शकणार नाही. मी प्रचारासाठी नव्हे तर तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे.' संभाजीनगरचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात काढला. प्रकृती साथ देत नसतानाही बाळासाहेबांनी सभा घेतली होती. २००५ मध्ये दांडीयात्रेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता. या यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. 'गांधीजींच्या नावावर हे कुटुंब कमाई करत आहे. एक गोरं कातडं घालवलं आता हे दुसरं गोरं कातडं घालवायचं आहे,' असे आवाहन शिवसेनाप्रमुखांनी केले होते. शिवसेनेतील तत्कालीन नेते राज ठाकरे हे औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून दूर होते. प्रचारासाठीही ते आले नव्हते. या शंकेचे निरसन खुद्द शिवसेनाप्रमुखांनी केले. 'राज पुस्तकांच्या कामात गुंतला आहे. त्यामुळे तो प्रचाराला आला नाही. उद्धव आणि राजमध्ये भांडण लावता का,' असा सवालही त्यांनी केला होता.

संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद या लढाईत तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार? अर्थातच संभाजीनगर. या युतीच्या आक्रमक आव्हानाला औरंगाबादकरांनी साद घातली होती. सुरक्षेला मतदान असे आवाहन युतीतर्फे करण्यात आले होते. संभाजीनगर हा कळीचा मुद्दा आहे हे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला शेवटपर्यंत उमगलेच नव्हते. लागोपाठ चौथ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वांत मोठा पक्ष म्हणून नावलौकिक कायम ठेवला होता. शिवसेनेने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यात २००७ मध्ये १ जागेची भर पडली. शिवाजीनगर हा प्रभाग नव्याने औरंगाबाद महानगरपालिकेत आला. शिवाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार निवडून आला. निवडणुकीपूर्वी युती करण्याचा निर्णय भाजप-सेनेला फलदायी ठरला. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत सेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. त्याच्या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी न झाल्याने त्याचा त्यांना फटका बसला. या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. युतीचे सात बंडखोर निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाची कामगिरी लक्षणीय अशी होती. ०-७-१६ आणि २१ अशी त्यांची आजपर्यंतची महापालिकेतली कामगिरी. भाजपच्या तुलनेत शिवसेनेची कामगिरी २७-३४-२० आणि २५ अशी आहे. सिडको-हडकोमध्ये १४ पैकी १० जागा युतीने जिंकल्या होत्या. नवीन औरंगाबादकरांनी युतीच्या झोळीत घवघवीत यश टाकले होते. मायावतीचा हत्ती मनपात पोहोचला. ४० पैकी १ जागेवर बसपाला यश मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम वस्त्यांमध्ये चांगली मुसंडी मारून १३ जागा जिंकल्या होत्या. नंतर त्यांच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते.

मुस्लिम वस्त्यातील २३ पैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ७-७ जागा जिंकल्या होत्या. औरंगाबादचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी या निवडणुकीत प्रस्थापित दलित नेत्यांना खड्यासारखे बाजूला टाकले होते. त्यांची ही खेळी कमालीची यशस्वी ठरली होती. प्रस्थापित दलित नेत्यांना शह देत राजेंद्र दर्डा यांनी सात जणांना काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्यातील चार जण निवडून आले होते. भाकप, माकप, जद, सपा आणि समाजवादी जन परिषद यांनी औरंगाबाद नागरी विकास आघाडीची मोट बांधली होती. त्यांना मात्र औरंगाबादकरांनी झिडकारले होते. भावनिक मुद्यावर सेना-भाजप युतीने महापालिकेवरचा भगवा झेंडा कायम ठेवला होता. युतीला त्यांच्याच बंडखोरांची साथ सत्ता टिकविण्यासाठी घ्यावी लागली होती. त्यांना पदेही द्यावी लागली होती. त्यामुळे निष्ठावान नगरसेवकांवर अन्याय झाला होता.

रहाटकरांचा लक फॅक्टर

किशनचंद तनवाणी हे चौथ्या महानगरपालिकेतील शिवसेनेचे पहिले महापौर होते. डॉ. भागवत कराड यांना औरंगाबाद शहराचे दुसऱ्यांदा महापौर होण्याची संधी मिळाली होती. सर्वात नशीबवान ठरल्या त्या विजया रहाटकर. त्यांना करारानुसार एकच वर्ष महापौरपदाची संधी होती, पण नशिबाने त्यांना दीड वर्षे अधिक मिळाली. अडीच वर्षे महापौरपद सांभाळणाऱ्या औरंगाबाद महापालिकेतील त्या एकमेव महापौर ठरल्या. शिवसेनेच्या वाट्याला महापौरपद केवळ सव्वावर्षच आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची यादी आज जाहीर करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतीय जनता पक्षाकडून युतीचा निरोप उद्या (शनिवारी) सायंकाळपर्यंत आला नाही तर नाईलाजाने आम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करावी लागेल,' असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बहुतेक उमेदवारांची यादी तयार झाली असून त्या यादीवर पालकमंत्र्यांनीही नजर फिरवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याबद्दल शिवसेना-भाजपचे तळ्यात मळ्यात सुरूच आहे. चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या होत आहेत, पण अद्याप युतीबद्दल निर्णय झालेला नाही. त्यातच काल (गुरुवारी) रात्री मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रात्री बारा वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीवरून कदम यांनीही नजर फिरवली. युतीच्या संदर्भात भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांची यादी शिवसेनेने जाहीर केली नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगळूर येथे सुरू आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेले आहेत. ते उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन युतीबद्दलचा निर्णय होईल, असे मानले जात आहे. युतीच्या निर्णयाची उद्या सायंकाळपर्यंत वाट पाहू आणि युतीचा निर्णय झालाच नाही, तर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे प्रदीप जैस्वाल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराने टळेल स्वाइन फ्लू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादसह मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. स्वाइन फ्लू टाळण्यासाठी योग्य काळजी व संशय आल्यानंतर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे, असा सूर मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित चर्चासत्रात उमटला.

स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर शुक्रवारी (३ एप्रिल) एमजीएममधील रुक्मिणी सभाग्रहात चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात एमजीएमच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. एच. तालीब, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, धूत हॉस्पिटलचे प्रशासक व असोसिएशनचे सचिव डॉ. हिमांशू गुप्ता, धूत हॉस्पिटलमधील वरिष्ठ चिकित्सक डॉ. विवेक तडवळकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी, कमलनयन बजाज हॉस्पिटलचे आयसीयू तज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे सूत्रसंचलन सुधीर मोघे यांनी केले.

गर्दीच्या ठिकाणी वावरणारे व रुग्णांच्या सानिध्यातील व्यक्तिंनी जागरूक राहिल्यास संसर्ग टाळणे शक्य होते, असे डॉ. एस. एच. तालीब यांनी सांगितले. स्वाइन फ्लूचा व्हायरस दोन तास ते एक आठवडा जिवंत राहू शकतो. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत झालेल्याच्या संपर्कात येणाऱ्यांनी योग्य काळजी घेतलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डॉ. विवेक तडवळकर यांनी, ८० टक्के रुग्ण हे केवळ भीतीपोटी तपासणी करण्यासाठी येतात. त्यांची भीती घालवणे घालविणे डॉक्टरांचे प्रथम कार्य आहे, असे सांगितले. नातेवाईक स्वाइन फ्लूमुळे आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या जीविताला धोका आहे, असा सर्वसाधारण समज असून दूर होणे गरजेचे आहे, याकडे डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे लक्ष वेधले. डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या जनजागृतीची माहिती दिली.

असोशिएशनचे प्रयत्न

'मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे चर्चासत्राच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहोत,' असे मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले. 'हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना एकमेकाशी कसा समन्वय ठेवायला याचे शिक्षण दिले जाणार आहे,' अशी माहिती असोशिएशनचे सचिव डॉ. हिमांशू गुप्ता यांनी या चर्चासत्रात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलासराव अडगळीत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ, काँग्रेसच्या राजवटीतील यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (कै.) विलासराव देशमुख यांचे छायाचित्र काँग्रेस मुख्यालय असलेल्या गांधीभवनात अडगळीत पडले आहे. ज्या नेत्याच्या जोरावर अनेकांनी सत्ता उपभोगली त्यांच्या तसबिरीच्या बाबतीत एवढी अनास्था कशी काय, असा प्रश्न सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

गांधीभवनात काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गांधीभवनाची डागडुजी झालेली नाही. मुख्य सभागृहातील छताचे प्लास्टरही गळून पडले होते. काही दिवसांपासून गांधीभवनाची दुरुस्ती केली जात आहे. भिंती झाकण्यासाठी पांढऱ्या कपड्याचे आच्छादन केले आहे. मात्र हे करताना ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोंची काळजी घेण्यात आलेली नाही. एका कोपऱ्यात भिंतीवरचे फोटो काढून ठेवले आहेत. या अडगळीत विलासराव देशमुखांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या बड्या नेत्यांसह स्थानिक नेत्यांची वर्दळ होती, पण ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही.

मराठवाड्याच्या नेत्याचे छायाचित्र अडगळीत कसे ठेवले, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आपल्या नेत्याचा विसर कधी पडू नये, अशी बोलकी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

मला हा प्रकार तुमच्याकडूनच कळाला. कदाचित दुरुस्ती करताना विलासरावांचा फोटो बाजूला ठेवला गेला असेल. तो सन्मानपूर्वक सभागृहात लावण्यात येईल.

- सुभाष झांबड, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images