Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाण्याअभावी ८० उद्यानांचा बळी

$
0
0

रामचंद्र वायभट

कोट्यवधी खर्चून सिडको आणि महापालिकेने शहरामध्ये सुंदर उद्याने बनविली. मात्र, महापालिकेने याकडे सतत दुर्लक्ष केल्याने उद्याने बकाल झाली आहेत. मोडलेल्या खेळण्या, तुटलेले ट्रॅक, पाण्याअभावी जळालेल्या हिरवळीमुळे मुलांनी खेळायचे कुठे आणि नागरिकांनी फिरायचे कुठे, असा प्रश्न आहे. शहरातील बहुतांश उद्यानांच्या या अशा अवस्थेमुळे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पाणीटंचाई हे उद्यानाच्या बकालीकरणाचे प्रमुख कारण असून, सध्या शहरातील ११० उद्यानांपैकी केवळ ३० उद्यानांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. उर्वरित ८० उद्याने टँकरवर अवलंबून आहेत. शहराच्या मोक्याच्या जागेवर असलेल्या उद्यानांत अतिक्रमण होत आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिकेला याबाबत केव्हा जाग येईल, हा प्रश्न आहे.

शहरातील सलीम अली सरोवर, स्वामी विवेकानंद उद्यान, नेहरू बालोद्यान, शास्त्रीनगर उद्यान, झाशी राणी उद्यान, कवितांची बाग, वाहतूक उद्यान, किटली उद्यान अशी अनेक उद्याने तयार करण्यात आली. कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च केला गेला. मात्र, काही प्रभावी नगरसेवकांच्या वार्डातील उद्याने वगळता इतर उद्यानांच्या देखरेखीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. खेळणींची दूरवस्था झालेली आहे. बसण्यासाठी बाकडेही नाहीत. चौकीदार आहे; मात्र स्वच्छता नाही. पाण्याची टाकी आहे; मात्र त्यात पाणी नाही अशी अवस्था या उद्यानांची झाली आहे.

विवेकानंद उद्यान; ट्रॅक उखडले

हडकोमधील स्वामी विवेकानंद उद्यानाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी रेल्वेगाडी तयार करण्यात आली होती. मात्र, काही वर्षांतच ही गाडी बंद करण्यात आली. सिडको, हडको परिसरातील नागरिकांची गर्दी होत असलेल्या या उद्यानातील संपूर्ण ट्रॅक उखडून गेले आहेत. उद्यानातील सर्व खेळण्या तुटल्या आहेत. उद्यानात असलेली मोठी कारंजी पाण्याअभावी बंद आहेत.

सलीमअली सरोवरः खेळणी गायब

सलीमअली सरोवर परिसरात असलेल्या उद्यानाचीही अशीच अवस्था झाली आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विमान तसेच विविध प्राणी तयार करण्यात आले होते. मात्र, आता या खेळणी येथून गायब झाल्या आहेत. शहरातील इतर उद्यानांची अवस्थाही काहीशी अशीच झाली आहे. अनेक उद्यानांतील खेळणी चोरीला गेलेली दिसून येतात. खेळणींचे फक्त सांगडे उद्यानात दिसून येतात, तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस उद्यानातील झाडांची कत्तल करून लाकडांची चोरी सुरू आहे.

दारुचे अड्डे; पत्त्यांचा डाव

बकाल झालेल्या उद्यानांना चौकीदार नसल्यामुळे येथे सर्रास सर्रास पत्त्यांचे डाव चालतात. अनेक टवाळखोर या ठिकाणी निवांतपणे झाडाखाली बसून पत्ते खेळतात. उद्यानांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दारुडे आणि टवाळखोरांचा वावर वाढल्याने मुलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. उद्यानातील रंगीत कारंजे काळवंडले, तर हिरवळ दिसेनाशी झालीय. नागरिकांना निवांत आणि रम्य वातावरणात काही क्षण घालविण्यासाठी या उद्यानांचा पर्याय होता; पण तोही आता टवाळखोर आणि दारुड्यांच्या ताब्यात गेला आहे.

सुरक्षेच्या नावाने बोंब

महापालिकेने शहरात उद्यानांची संख्या वाढवली. मात्र, उद्यानातील सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. संवेदनशील असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये सिद्धार्थ उद्यान वगळता एकाही उद्यानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. किमान प्रत्येक उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे.

सिद्धार्थ उद्यान १० टक्के राहणार

शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या सिद्धार्थ उद्यान ही शहराची ओळख. प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या या उद्यानात सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी होते. मात्र, आता या उद्यानात प्राणिसंग्रहालयाचा विस्तार होणार आहे. उद्यानातच हैदराबाद मुक्तिसंग्राम स्तंभ, संग्रहालय, खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी कॉम्लॅक्समुळे एकूण जागेच्या तुलनेत उद्यान केवळ १० टक्केच शिल्लक राहणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सिद्धार्थ उद्यानाचा बळी जाणार आहे.

बिघडलेली आर्थिक गणिते

शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने उद्याने तयार केली. मात्र, आर्थिक गणिते न बसवल्यामुळे उद्यानांची अशी अवस्था झाली आहे. बहुतांश उद्यानात पाणी ही मुलभूत गरजही भागवण्यात आली नाही. आपल्या वार्डात उद्यान असावे, असा हट्ट धरणाऱ्या नगरसेवकांच्या वार्डात उद्याने तयार केली. त्यानंतर मात्र उद्यानांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्यानासाठी बजेटमध्ये काय खर्च होतो, असा प्रश्न पडतो. उद्यानामध्ये महापालिकेने पाण्याची व्यवस्था केली असती, तर उद्यानासाठी करण्यात येणारा खर्च सत्कारणी लागला असता.

शासनाचे निकष काय म्हणतात?

उद्यानाबाबत शासनाच्या निकषांची पूर्तता होत नाही. त्यामुळे उद्याने बकाल झाली आहेत. सध्या महापालिकेकडे १ उद्यान अधीक्षक, २ पर्यवेक्षक व १२० माळी आहेत. शासनाच्या निकषानुसार उद्यानाची देखभाल करण्यासाठी प्रत्येक एक एकर उद्यानासाठी २ यानुसार औरंगाबादमध्ये ३५० माळी आवश्यक आहेत. ४ सुपरवायझर तसेच १ सहायक उद्यान निरीक्षकाची आवश्यकता आहे. इतर महापालिकांमध्ये उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. मात्र, औरंगाबादमध्ये या पदासाठी एकच अधिकारी आहे.

बजेटमध्ये उद्यानांना डावलले

महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यानांची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येते. सिद्धार्थ उद्यानाचे वर्षभरात १ कोटी २० लाखांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होते. मात्र, दरवर्षी महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यानाची देखभाल दुरुस्तीसाठी ६० लाख व नवीन उद्यान विकसित करण्यासाठी ६० लाख असे एकूण १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात येते. तर खेळण्यादुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांची वेगळी तरतूद करण्यात येते. एकूणच बजेटमध्ये उद्यानासाठी करण्यात येत असलेली तरतूद अपुरी असून, उद्यानांचा विकास व दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलीम अली सरोवर : पक्ष्यांची शिकार

$
0
0

तुषार बोडखे

हायकोर्टाचे प्रतिबंध असूनही सलीम अली सरोवरात मच्छिमार आणि उपद्रवी तरुणांचा उच्छाद वाढला आहे. या उच्छादातूनच सरोवरातील बदकांची शिकार झाल्याची घटना शुक्रवारी (३ एप्रिल) उघडकीस आली. बाभूळबनातून सरोवर परिसरात प्रवेश करून मच्छिमारी आणि शिकारीचे प्रकार वाढल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवर ५२ जातींच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील हजारो पक्षी या सरोवरात आहेत. महापालिका प्रशासनाने प्रवेश शुल्क आकारुन सरोवर खुले केले होते. परिसरात नागरिकांचा वावर वाढल्यास पक्ष्यांचा अधिवास नामशेष होईल. त्यामुळे हा परिसर खुला करू नये, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली होती. याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर पक्ष्यांचा अधिवास टिकवण्यासाठी हायकोर्टाने सरोवर परिसरात नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध घातला आहे. या आदेशानंतर सरोवराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले; मात्र उनाड तरुण आणि मच्छिमारांनी सरोवराची दुर्दशा केली आहे. दररोज शेकडो मच्छिमार सरोवरात गळ लावून मच्छिमारी करतात. बदकांची राजरोस शिकार सुरू आहे. दाट बाभूळबनातील झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक नसून सध्या माळवे नावाचा माळी सरोवराची देखभाल करतो. माळवे यांना उनाडांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरोवर परिसरात विरोध केल्यास गुंड तरुण शिवीगाळ करीत असल्याचे माळवे यांनी सांगितले. सरोवरातील तीन बदकांची शिकार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक नेहमीप्रमाणे सरोवरात फेरफटका मारत असताना हा प्रकार दिसला. पक्षीमित्रांनी हायकोर्टात धाव घेतली होती, म्हणून मनपा प्रशासन सरोवराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाठक यांनी केला.

सरोवराची रया गेली

देश-विदेशातील सुंदर पक्ष्यांसाठी सलीम अली सरोवर प्रसिद्ध आहे. पक्षी अभ्यासक, छायाचित्रकारांची येथे नेहमी वर्दळ असते. हायकोर्टाच्या आदेशानंतर नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध असले तरी घुसखोरी वाढली आहे. या घुसखोरांमुळे वनस्पती आणि पक्ष्यांची वाताहत झाली आहे. पक्ष्यांची माहिती देणारे फलकही फोडले आहेत.

मनपाने झटकले हात

शिकारीच्या प्रकाराबाबत मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असतात्यांनी हा अधिभार आपल्याकडे नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. तर वारंवार दूरध्वनी करूनही सरोवराची जबाबदारी सांभाळणारे सिकंदर अली यांच्याशी संपर्क झाला नाही.

पाणकोंबडी किंवा इतर पक्ष्यांची शिकार न करता फक्त बदकांची शिकार केली जात आहे. कारण बदक मांसासाठी प्रसिद्ध आहेत. घुसखोरांनी ताबा घेतल्यामुळे ऐतिहासिक सरोवराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संभाजीनगर’ने तारले; ‘कलगीतुऱ्या’ने बुडवले!

$
0
0

प्रमोद माने, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत प्रथमच निवडणूकपूर्व भाजप-शिवसेनेची युती झाली. गेल्या निवडणुकीत एकमेकांचे विसर्जन करायला निघालेले हे पक्ष एकत्र आल्यामुळे निश्चितपणे हिंदू मतपेढीची विभागणी झाली नाही. याचा युतीला फायदाच झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेने पुन्हा एकदा महापालिकेवर भगवा फडकविता आला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होऊ शकली नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या त्या राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये. या दोन पक्षांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला होता. घड्याळ आणि पंजाचे एकत्र नाते किती विजोड आहे याचेच दर्शन या प्रचारादरम्यान घडले होते. राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर. आर. आबा पाटील यांनी काँग्रेसला गाडून टाकण्याची भाषा केली होती. काँग्रेसचे तत्कालीन सहकारमंत्री व औरंगाबादचे संपर्कमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीला बेडूक म्हणून संबोधले होते. तत्कालीन आमदार आणि आताचे नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याचा साक्षात्कार झाला होता. या कलगीतुऱ्याला रंग चढविला तो कै. आर. आर. आबा यांनी. त्यांची हडकोतील सभा चांगलीच गाजली होती.

'जिल्हा परिषद निवडणुकीत जातीयवादी शक्तीशी युती करून आम्हाला धर्मनिरपेक्ष नसल्याचा आरोप केला जातो,' असा सवाल कै. आर. आर. पाटील यांनी त्या वेळी केला होता. 'धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटविणाऱ्या काँग्रेसने राज्यामध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली. आता आम्हाला योग्य संधी असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला गाडून टाका,' असे आवाहन त्यांनी या वेळी केले होते. 'सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने जेव्हा एकत्र नांदतात, तेथे समृद्धी येते. हा विचार राष्ट्रवादीचा आहे,' असेही ते म्हणाले होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष श्रीमती प्रभा राव यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला बेडूक असल्याचे त्यांनी संबोधले होते. 'बेडकाने बैल होण्याचा प्रयत्न करू नये. बेडूक कधी बैल झाला आहे का हो?' असा सवाल डॉ. कदम यांनी सभासभांमध्ये केला होता. 'आर. आर. आबांनी केलेली टीका अनाठायी आहे. त्यांनी या पद्धतीने बोलू नये,' असा सल्ला काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठमंत्री अजितदादा पवार यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला होता. 'निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्यांक आणि मागसवर्गीयांसमोर काँग्रेस मतांचा जोगवा मागते आणि नंतर त्याच्याकडे पाठ फिरविते. ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे,' अशी टीकाही त्यांनी केली होती.

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन किती दिवस राहणार,' असा सवाल तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. 'त्यांच्या कुबड्या घेऊन फार काळ चालता येणार नाही,' असेही ते म्हणाले होते. 'औरंगाबादमध्ये घड्याळाचे काय काम,' असा सवाल तत्कालीन मुख्यमंत्री कै . विलासराव देशमुख यांनी केला होता.

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेनेची वज्रमूठ कायम ठेवा. मग कोणीही तिला धक्का लावू शकणार नाही, ती मोडू शकणार नाही, तोडू शकणार नाही. मी प्रचारासाठी नव्हे तर तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे.' संभाजीनगरचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात काढला. प्रकृती साथ देत नसतानाही बाळासाहेबांनी सभा घेतली होती. २००५ मध्ये दांडीयात्रेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता. या यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. 'गांधीजींच्या नावावर हे कुटुंब कमाई करत आहे. एक गोरं कातडं घालवलं आता हे दुसरं गोरं कातडं घालवायचं आहे,' असे आवाहन शिवसेनाप्रमुखांनी केले होते. शिवसेनेतील तत्कालीन नेते राज ठाकरे हे औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून दूर होते. प्रचारासाठीही ते आले नव्हते. या शंकेचे निरसन खुद्द शिवसेनाप्रमुखांनी केले. 'राज पुस्तकांच्या कामात गुंतला आहे. त्यामुळे तो प्रचाराला आला नाही. उद्धव आणि राजमध्ये भांडण लावता का,' असा सवालही त्यांनी केला होता.

संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद या लढाईत तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार? अर्थातच संभाजीनगर. या युतीच्या आक्रमक आव्हानाला औरंगाबादकरांनी साद घातली होती. सुरक्षेला मतदान असे आवाहन युतीतर्फे करण्यात आले होते. संभाजीनगर हा कळीचा मुद्दा आहे हे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला शेवटपर्यंत उमगलेच नव्हते. लागोपाठ चौथ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वांत मोठा पक्ष म्हणून नावलौकिक कायम ठेवला होता. शिवसेनेने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यात २००७ मध्ये १ जागेची भर पडली. शिवाजीनगर हा प्रभाग नव्याने औरंगाबाद महानगरपालिकेत आला. शिवाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार निवडून आला. निवडणुकीपूर्वी युती करण्याचा निर्णय भाजप-सेनेला फलदायी ठरला. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत सेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. त्याच्या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी न झाल्याने त्याचा त्यांना फटका बसला. या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. युतीचे सात बंडखोर निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाची कामगिरी लक्षणीय अशी होती. ०-७-१६ आणि २१ अशी त्यांची आजपर्यंतची महापालिकेतली कामगिरी. भाजपच्या तुलनेत शिवसेनेची कामगिरी २७-३४-२० आणि २५ अशी आहे. सिडको-हडकोमध्ये १४ पैकी १० जागा युतीने जिंकल्या होत्या. नवीन औरंगाबादकरांनी युतीच्या झोळीत घवघवीत यश टाकले होते. मायावतीचा हत्ती मनपात पोहोचला. ४० पैकी १ जागेवर बसपाला यश मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम वस्त्यांमध्ये चांगली मुसंडी मारून १३ जागा जिंकल्या होत्या. नंतर त्यांच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते.

मुस्लिम वस्त्यातील २३ पैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ७-७ जागा जिंकल्या होत्या. औरंगाबादचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी या निवडणुकीत प्रस्थापित दलित नेत्यांना खड्यासारखे बाजूला टाकले होते. त्यांची ही खेळी कमालीची यशस्वी ठरली होती. प्रस्थापित दलित नेत्यांना शह देत राजेंद्र दर्डा यांनी सात जणांना काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्यातील चार जण निवडून आले होते. भाकप, माकप, जद, सपा आणि समाजवादी जन परिषद यांनी औरंगाबाद नागरी विकास आघाडीची मोट बांधली होती. त्यांना मात्र औरंगाबादकरांनी झिडकारले होते. भावनिक मुद्यावर सेना-भाजप युतीने महापालिकेवरचा भगवा झेंडा कायम ठेवला होता. युतीला त्यांच्याच बंडखोरांची साथ सत्ता टिकविण्यासाठी घ्यावी लागली होती. त्यांना पदेही द्यावी लागली होती. त्यामुळे निष्ठावान नगरसेवकांवर अन्याय झाला होता.

रहाटकरांचा लक फॅक्टर

किशनचंद तनवाणी हे चौथ्या महानगरपालिकेतील शिवसेनेचे पहिले महापौर होते. डॉ. भागवत कराड यांना औरंगाबाद शहराचे दुसऱ्यांदा महापौर होण्याची संधी मिळाली होती. सर्वात नशीबवान ठरल्या त्या विजया रहाटकर. त्यांना करारानुसार एकच वर्ष महापौरपदाची संधी होती, पण नशिबाने त्यांना दीड वर्षे अधिक मिळाली. अडीच वर्षे महापौरपद सांभाळणाऱ्या औरंगाबाद महापालिकेतील त्या एकमेव महापौर ठरल्या. शिवसेनेच्या वाट्याला महापौरपद केवळ सव्वावर्षच आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची यादी आज जाहीर करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतीय जनता पक्षाकडून युतीचा निरोप उद्या (शनिवारी) सायंकाळपर्यंत आला नाही तर नाईलाजाने आम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करावी लागेल,' असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बहुतेक उमेदवारांची यादी तयार झाली असून त्या यादीवर पालकमंत्र्यांनीही नजर फिरवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याबद्दल शिवसेना-भाजपचे तळ्यात मळ्यात सुरूच आहे. चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या होत आहेत, पण अद्याप युतीबद्दल निर्णय झालेला नाही. त्यातच काल (गुरुवारी) रात्री मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रात्री बारा वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीवरून कदम यांनीही नजर फिरवली. युतीच्या संदर्भात भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांची यादी शिवसेनेने जाहीर केली नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगळूर येथे सुरू आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेले आहेत. ते उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन युतीबद्दलचा निर्णय होईल, असे मानले जात आहे. युतीच्या निर्णयाची उद्या सायंकाळपर्यंत वाट पाहू आणि युतीचा निर्णय झालाच नाही, तर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे प्रदीप जैस्वाल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराने टळेल स्वाइन फ्लू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादसह मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. स्वाइन फ्लू टाळण्यासाठी योग्य काळजी व संशय आल्यानंतर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे, असा सूर मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित चर्चासत्रात उमटला.

स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर शुक्रवारी (३ एप्रिल) एमजीएममधील रुक्मिणी सभाग्रहात चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात एमजीएमच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. एच. तालीब, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, धूत हॉस्पिटलचे प्रशासक व असोसिएशनचे सचिव डॉ. हिमांशू गुप्ता, धूत हॉस्पिटलमधील वरिष्ठ चिकित्सक डॉ. विवेक तडवळकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी, कमलनयन बजाज हॉस्पिटलचे आयसीयू तज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे सूत्रसंचलन सुधीर मोघे यांनी केले.

गर्दीच्या ठिकाणी वावरणारे व रुग्णांच्या सानिध्यातील व्यक्तिंनी जागरूक राहिल्यास संसर्ग टाळणे शक्य होते, असे डॉ. एस. एच. तालीब यांनी सांगितले. स्वाइन फ्लूचा व्हायरस दोन तास ते एक आठवडा जिवंत राहू शकतो. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत झालेल्याच्या संपर्कात येणाऱ्यांनी योग्य काळजी घेतलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डॉ. विवेक तडवळकर यांनी, ८० टक्के रुग्ण हे केवळ भीतीपोटी तपासणी करण्यासाठी येतात. त्यांची भीती घालवणे घालविणे डॉक्टरांचे प्रथम कार्य आहे, असे सांगितले. नातेवाईक स्वाइन फ्लूमुळे आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या जीविताला धोका आहे, असा सर्वसाधारण समज असून दूर होणे गरजेचे आहे, याकडे डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे लक्ष वेधले. डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या जनजागृतीची माहिती दिली.

असोशिएशनचे प्रयत्न

'मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे चर्चासत्राच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहोत,' असे मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले. 'हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना एकमेकाशी कसा समन्वय ठेवायला याचे शिक्षण दिले जाणार आहे,' अशी माहिती असोशिएशनचे सचिव डॉ. हिमांशू गुप्ता यांनी या चर्चासत्रात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलासराव अडगळीत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ, काँग्रेसच्या राजवटीतील यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (कै.) विलासराव देशमुख यांचे छायाचित्र काँग्रेस मुख्यालय असलेल्या गांधीभवनात अडगळीत पडले आहे. ज्या नेत्याच्या जोरावर अनेकांनी सत्ता उपभोगली त्यांच्या तसबिरीच्या बाबतीत एवढी अनास्था कशी काय, असा प्रश्न सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

गांधीभवनात काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गांधीभवनाची डागडुजी झालेली नाही. मुख्य सभागृहातील छताचे प्लास्टरही गळून पडले होते. काही दिवसांपासून गांधीभवनाची दुरुस्ती केली जात आहे. भिंती झाकण्यासाठी पांढऱ्या कपड्याचे आच्छादन केले आहे. मात्र हे करताना ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोंची काळजी घेण्यात आलेली नाही. एका कोपऱ्यात भिंतीवरचे फोटो काढून ठेवले आहेत. या अडगळीत विलासराव देशमुखांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या बड्या नेत्यांसह स्थानिक नेत्यांची वर्दळ होती, पण ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही.

मराठवाड्याच्या नेत्याचे छायाचित्र अडगळीत कसे ठेवले, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आपल्या नेत्याचा विसर कधी पडू नये, अशी बोलकी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

मला हा प्रकार तुमच्याकडूनच कळाला. कदाचित दुरुस्ती करताना विलासरावांचा फोटो बाजूला ठेवला गेला असेल. तो सन्मानपूर्वक सभागृहात लावण्यात येईल.

- सुभाष झांबड, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याअभावी ८० उद्यानांचा बळी

$
0
0

रामचंद्र वायभट

कोट्यवधी खर्चून सिडको आणि महापालिकेने शहरामध्ये सुंदर उद्याने बनविली. मात्र, महापालिकेने याकडे सतत दुर्लक्ष केल्याने उद्याने बकाल झाली आहेत. मोडलेल्या खेळण्या, तुटलेले ट्रॅक, पाण्याअभावी जळालेल्या हिरवळीमुळे मुलांनी खेळायचे कुठे आणि नागरिकांनी फिरायचे कुठे, असा प्रश्न आहे. शहरातील बहुतांश उद्यानांच्या या अशा अवस्थेमुळे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पाणीटंचाई हे उद्यानाच्या बकालीकरणाचे प्रमुख कारण असून, सध्या शहरातील ११० उद्यानांपैकी केवळ ३० उद्यानांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. उर्वरित ८० उद्याने टँकरवर अवलंबून आहेत. शहराच्या मोक्याच्या जागेवर असलेल्या उद्यानांत अतिक्रमण होत आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिकेला याबाबत केव्हा जाग येईल, हा प्रश्न आहे.

शहरातील सलीम अली सरोवर, स्वामी विवेकानंद उद्यान, नेहरू बालोद्यान, शास्त्रीनगर उद्यान, झाशी राणी उद्यान, कवितांची बाग, वाहतूक उद्यान, किटली उद्यान अशी अनेक उद्याने तयार करण्यात आली. कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च केला गेला. मात्र, काही प्रभावी नगरसेवकांच्या वार्डातील उद्याने वगळता इतर उद्यानांच्या देखरेखीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. खेळणींची दूरवस्था झालेली आहे. बसण्यासाठी बाकडेही नाहीत. चौकीदार आहे; मात्र स्वच्छता नाही. पाण्याची टाकी आहे; मात्र त्यात पाणी नाही अशी अवस्था या उद्यानांची झाली आहे.

विवेकानंद उद्यान; ट्रॅक उखडले

हडकोमधील स्वामी विवेकानंद उद्यानाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी रेल्वेगाडी तयार करण्यात आली होती. मात्र, काही वर्षांतच ही गाडी बंद करण्यात आली. सिडको, हडको परिसरातील नागरिकांची गर्दी होत असलेल्या या उद्यानातील संपूर्ण ट्रॅक उखडून गेले आहेत. उद्यानातील सर्व खेळण्या तुटल्या आहेत. उद्यानात असलेली मोठी कारंजी पाण्याअभावी बंद आहेत.

सलीमअली सरोवरः खेळणी गायब

सलीमअली सरोवर परिसरात असलेल्या उद्यानाचीही अशीच अवस्था झाली आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विमान तसेच विविध प्राणी तयार करण्यात आले होते. मात्र, आता या खेळणी येथून गायब झाल्या आहेत. शहरातील इतर उद्यानांची अवस्थाही काहीशी अशीच झाली आहे. अनेक उद्यानांतील खेळणी चोरीला गेलेली दिसून येतात. खेळणींचे फक्त सांगडे उद्यानात दिसून येतात, तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस उद्यानातील झाडांची कत्तल करून लाकडांची चोरी सुरू आहे.

दारुचे अड्डे; पत्त्यांचा डाव

बकाल झालेल्या उद्यानांना चौकीदार नसल्यामुळे येथे सर्रास सर्रास पत्त्यांचे डाव चालतात. अनेक टवाळखोर या ठिकाणी निवांतपणे झाडाखाली बसून पत्ते खेळतात. उद्यानांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दारुडे आणि टवाळखोरांचा वावर वाढल्याने मुलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. उद्यानातील रंगीत कारंजे काळवंडले, तर हिरवळ दिसेनाशी झालीय. नागरिकांना निवांत आणि रम्य वातावरणात काही क्षण घालविण्यासाठी या उद्यानांचा पर्याय होता; पण तोही आता टवाळखोर आणि दारुड्यांच्या ताब्यात गेला आहे.

सुरक्षेच्या नावाने बोंब

महापालिकेने शहरात उद्यानांची संख्या वाढवली. मात्र, उद्यानातील सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. संवेदनशील असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये सिद्धार्थ उद्यान वगळता एकाही उद्यानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. किमान प्रत्येक उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे.

सिद्धार्थ उद्यान १० टक्के राहणार

शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या सिद्धार्थ उद्यान ही शहराची ओळख. प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या या उद्यानात सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी होते. मात्र, आता या उद्यानात प्राणिसंग्रहालयाचा विस्तार होणार आहे. उद्यानातच हैदराबाद मुक्तिसंग्राम स्तंभ, संग्रहालय, खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी कॉम्लॅक्समुळे एकूण जागेच्या तुलनेत उद्यान केवळ १० टक्केच शिल्लक राहणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सिद्धार्थ उद्यानाचा बळी जाणार आहे.

बिघडलेली आर्थिक गणिते

शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने उद्याने तयार केली. मात्र, आर्थिक गणिते न बसवल्यामुळे उद्यानांची अशी अवस्था झाली आहे. बहुतांश उद्यानात पाणी ही मुलभूत गरजही भागवण्यात आली नाही. आपल्या वार्डात उद्यान असावे, असा हट्ट धरणाऱ्या नगरसेवकांच्या वार्डात उद्याने तयार केली. त्यानंतर मात्र उद्यानांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्यानासाठी बजेटमध्ये काय खर्च होतो, असा प्रश्न पडतो. उद्यानामध्ये महापालिकेने पाण्याची व्यवस्था केली असती, तर उद्यानासाठी करण्यात येणारा खर्च सत्कारणी लागला असता.

शासनाचे निकष काय म्हणतात?

उद्यानाबाबत शासनाच्या निकषांची पूर्तता होत नाही. त्यामुळे उद्याने बकाल झाली आहेत. सध्या महापालिकेकडे १ उद्यान अधीक्षक, २ पर्यवेक्षक व १२० माळी आहेत. शासनाच्या निकषानुसार उद्यानाची देखभाल करण्यासाठी प्रत्येक एक एकर उद्यानासाठी २ यानुसार औरंगाबादमध्ये ३५० माळी आवश्यक आहेत. ४ सुपरवायझर तसेच १ सहायक उद्यान निरीक्षकाची आवश्यकता आहे. इतर महापालिकांमध्ये उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. मात्र, औरंगाबादमध्ये या पदासाठी एकच अधिकारी आहे.

बजेटमध्ये उद्यानांना डावलले

महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यानांची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येते. सिद्धार्थ उद्यानाचे वर्षभरात १ कोटी २० लाखांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होते. मात्र, दरवर्षी महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यानाची देखभाल दुरुस्तीसाठी ६० लाख व नवीन उद्यान विकसित करण्यासाठी ६० लाख असे एकूण १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात येते. तर खेळण्यादुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांची वेगळी तरतूद करण्यात येते. एकूणच बजेटमध्ये उद्यानासाठी करण्यात येत असलेली तरतूद अपुरी असून, उद्यानांचा विकास व दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीम अली सरोवर : पक्ष्यांची शिकार

$
0
0

तुषार बोडखे

हायकोर्टाचे प्रतिबंध असूनही सलीम अली सरोवरात मच्छिमार आणि उपद्रवी तरुणांचा उच्छाद वाढला आहे. या उच्छादातूनच सरोवरातील बदकांची शिकार झाल्याची घटना शुक्रवारी (३ एप्रिल) उघडकीस आली. बाभूळबनातून सरोवर परिसरात प्रवेश करून मच्छिमारी आणि शिकारीचे प्रकार वाढल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवर ५२ जातींच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील हजारो पक्षी या सरोवरात आहेत. महापालिका प्रशासनाने प्रवेश शुल्क आकारुन सरोवर खुले केले होते. परिसरात नागरिकांचा वावर वाढल्यास पक्ष्यांचा अधिवास नामशेष होईल. त्यामुळे हा परिसर खुला करू नये, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली होती. याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर पक्ष्यांचा अधिवास टिकवण्यासाठी हायकोर्टाने सरोवर परिसरात नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध घातला आहे. या आदेशानंतर सरोवराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले; मात्र उनाड तरुण आणि मच्छिमारांनी सरोवराची दुर्दशा केली आहे. दररोज शेकडो मच्छिमार सरोवरात गळ लावून मच्छिमारी करतात. बदकांची राजरोस शिकार सुरू आहे. दाट बाभूळबनातील झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक नसून सध्या माळवे नावाचा माळी सरोवराची देखभाल करतो. माळवे यांना उनाडांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरोवर परिसरात विरोध केल्यास गुंड तरुण शिवीगाळ करीत असल्याचे माळवे यांनी सांगितले. सरोवरातील तीन बदकांची शिकार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक नेहमीप्रमाणे सरोवरात फेरफटका मारत असताना हा प्रकार दिसला. पक्षीमित्रांनी हायकोर्टात धाव घेतली होती, म्हणून मनपा प्रशासन सरोवराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाठक यांनी केला.

सरोवराची रया गेली

देश-विदेशातील सुंदर पक्ष्यांसाठी सलीम अली सरोवर प्रसिद्ध आहे. पक्षी अभ्यासक, छायाचित्रकारांची येथे नेहमी वर्दळ असते. हायकोर्टाच्या आदेशानंतर नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध असले तरी घुसखोरी वाढली आहे. या घुसखोरांमुळे वनस्पती आणि पक्ष्यांची वाताहत झाली आहे. पक्ष्यांची माहिती देणारे फलकही फोडले आहेत.

मनपाने झटकले हात

शिकारीच्या प्रकाराबाबत मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असतात्यांनी हा अधिभार आपल्याकडे नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. तर वारंवार दूरध्वनी करूनही सरोवराची जबाबदारी सांभाळणारे सिकंदर अली यांच्याशी संपर्क झाला नाही.

पाणकोंबडी किंवा इतर पक्ष्यांची शिकार न करता फक्त बदकांची शिकार केली जात आहे. कारण बदक मांसासाठी प्रसिद्ध आहेत. घुसखोरांनी ताबा घेतल्यामुळे ऐतिहासिक सरोवराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालन्यात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

घरफोडीची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करीत जालन्यातील तिघाजणांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तिघांवर जालन्यातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी तडकाफडकी जालन्यात येऊन याप्रकरणाचा आढावा घेतला.

अंबड रोडवरील सर्जेराव जाधव यांच्या घरातून ३० मार्च रोजी कंम्प्यूटर व इतर सामानाची चोरी झाली होती. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात सुरज चव्हाण (रा. दरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. परंतु, तपासावेळी प्रकरणाने नवीनच वळण घेतल्याने पोलिसांनी फिर्यादी व कुटूंबीयांची चौकशी सुरू केली होती. या चौकशीला कंटाळून संतोष जाधव व इतर दोघांनी शुक्रवारी रात्री विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांना रात्री शहरातील संजीवनी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्य आले आहे. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी ४८तास देखरेखीत ठेवावे लागणार असल्याचे उपचार करणारया डॉक्टरांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी याघटनेचा आढावा घेतला. अमितेशकुमार यांनी संजीवनी हॉस्पीटलमध्ये जाउन पीडितांच्या कुटूंबीयांशी चर्चा केली.

दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी

घरफोडी प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तर अटक केली. मात्र, फिर्यादीची व कुटूंबीयांचीच उलटतपासणी सुरू केली. सदर तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांकडून फिर्यादीवर दबाव टाकला जात होता. दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याप्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयल्न होत आहे. लवकरच याप्रकरणी इतर गुन्हे पण दाखल केले जाणार आहेत. पीडितांच्या कुटूंबीयांकडून तीन पोलिसांवर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

-अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमान मंदिराची पुजारी महिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मंगरुळ ( ता. कळंब) येथे पंरपरेला बाजूला सारून पंचमुखी हनुमान मंदिरात महिला पुजारी रोज पूजा करीत आहे. हनुमान जयंतीनिमित्त येथे शनिवारी मोठ्या भक्तीभावाने पूजा करण्यात आली. मंगरुळ (ता. कळंब) येथे हनुमानाची पंचमुखी पुरातन मूर्ती आहे. ही मूर्ती दगडी शीलेत कोरलेली आहे. या दगडी शीलेच्या चारही बाजूस सुंदर अशी हनुमानाची मूर्ती कोरण्यात आली आहे. भव्य व वेगळेपणा असणारी ही मूर्ती सापडणेही आता दूर्मिळ आहे. त्यामुळे दर शनिवारी अनेक हनुमान भक्त मंगरुळ येथे दर्शनासाठी येत असतात.

पंचमुखी हनुमान मंदिरबरोबरच मंगरुळ येथील हनुमान मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिरात महिला पुजारी आहे. मंदिरात पुरुष पुजारी असतात मात्र, या मंदिरात महिला पुजारी आहे. हनुमान मंदिरात अनेक ठिकाणी महिलांना प्रवेश वर्ज्य आहे, तर काही ठिकाणी महिलांना स्पर्श करू दिला जात नाही. मात्र, मंगरुळ येथील या हनुमान मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून महिला पुजारी असलेल्या मीनाक्षी गुरव यांच्या हस्ते सर्व पूजा केल्या जातात. या मंदिरातील साफसफाईपासून अभिषेक पूजा-अर्चा तसेच दिवाबत्ती लावणे, मूर्तीला हार घालणे, प्रसाद देणे हे सर्व काम या मीनाक्षी गुरव करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रथेला गावातील नागरिकांचा विरोध नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद रस्त्यावर कचऱ्याचा महापूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हनुमान जयंतीनिमित्त श्री भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी औरंगाबादेतून शुक्रवारी रात्री लाखो भाविक पायी रवाना झाले होते. भक्तांच्या सेवेसाठी सेवेकऱ्यांनी जागोजागी खाद्यपदार्थ, चहा, सरबत याचे स्टॉल लावले होते. सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या प्लेट, प्लास्टिकग्लासचा कचरा खुलताबादपर्यंत दुतर्फा पसरला होता. त्यांनी चांगल्या हेतुने सेवा केली पण प्लास्टिकची विल्हेवाट न लावता आल्याने कचऱ्याचा खच पडला होता. या कचऱ्याची विल्हेवाट कोण लावणार ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

हनुमान जयंतीनिमित्त शहरातून दरवर्षी लाखो भाविक खुलताबाद येथील भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी जातात. दरवर्षी भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन दौलताबादी टी पॉइंटपासूनचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. शुक्रवारी रात्री लाखो भाविक खुलताबादकडे रवाना झाले. छावणी टी पॉइंट, मिटमिटा, पडेगाव, शरणापूर फाटा, अब्दीमंडी, दौलताबाद, घाट, कागजीपुरा आणि खुलताबाद गावाच्या वेशीपर्यंत खाद्यपदार्थ, पाणी, चहा, थंडपेयांचे स्टॉल लावण्यात आले होते. सेवेकऱ्यांकडून पायी जाणाऱ्या भाविकांना चांगल्या भावनेने मदत केली. पण पदार्थ देताना प्लास्टिकच्या प्लेटस, ग्लासचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले होते. दिवसभर या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या वाऱ्यामुळे हा कचरा आजूबाजूला पसरला. प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे हा कचरा नष्ट होणे अवघड आहे.

परिणामी, कचरा साठून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होण्याची भीती आहे. दुर्देवाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. रस्त्यालगत साचलेले प्लास्टिक कचऱ्याचे ढीग लवकर हलविले गेले नाही तर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेतीवर परिणाम होण्याची भीती आहे. प्रशासन दरवर्षी सुरक्षा व अन्य व्यवस्थेची उपाययोजना करते. पण कचरा निर्मूलनासाठी काहीच उपाययोजना केली जात नसल्याने ही समस्या दरवर्षीची असल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.

रस्त्यालगत साचलेला कचरा पर्यावरणासाठी धोकादायक आहे. प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे. स्टॉलच्या शेजारी रिकामे ड्रम किंवा कचरा उचलून न्यावयाचे वाहन ठेवले तर हा धोका उद्भवणार नाही.

- राजेंद्र काळे, सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे सोन्याचे गंठन लांबविले

$
0
0

खुलताबादः हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पायी आलेली महिला बसमध्ये चढतांना तिच्या गळ्यातील सोन्याचे ४१ हजार रुपये किंमतीचे गंठन चोरट्यांनी लांबविले. ही घटना शनिवारी सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. औरंगाबाद संजयनगर येथील रेखा संतोष धोत्रे ही महिला गल्लीतील महिलांसह औरंगाबाद ते खुलताबाद भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आली होती. भद्रा मारुती भक्तनिवास येथील बसस्थानकावर औरंगाबादला जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन ४१ हजार रुपये किंमतीचे काढून चोरून नेले. घरी आल्यानंतर गळ्यातील गंठन चोरीला गेल्याचे लक्षात येताच खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रात्यक्षिक परीक्षा न घेता हेतुपरस्पर केले नापास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या 'कॉलेज ऑफ व्होकेशनल गायडन्स अँड अरिअर कौन्सिलिंग' या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षकांवरच आरोप करत, उत्तीर्णतेसाठी त्यांनी विद्यार्थ्यामागे पाच हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार दिली आहे. शनिवारी या विद्यार्थ्यांनी कुलगुरूकडे धाव घेत आपले गऱ्हाणे मांडले.

मराठवाडा अध्यापक कॉलेजमधील बी. एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा व्हायवा घेतला गेला नसल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार समोर आला आहे. जन शिक्षण संस्थेच्या या कॉलेजमध्ये अभ्यासक्रम असून अभ्यासक्रमाला चाळीस विद्यार्थी आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास केल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे केली आहे. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या विद्यार्थ्यांना लघु संशोधन प्रबंध सादर करावा लागतो. या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षक म्हणून डॉ. गणेश शेटकार यांना पाठविले. प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच डॉ. शेटकर यांनी निकाल सादर केला, त्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यामागे पाच हजार रूपयाची मागणी केल्याचा आरोपही तक्रारपत्रात करण्यात आला आहे.

विद्यापीठाने मुळात आमच्याकडे परीक्षक पाठविलेले चुकीचे होते, त्यांनी प्रात्यक्षिक न घेता, हेतुपुरस्पर विद्यार्थ्यांना नापास केले. सर्व विद्यार्थ्यांना सरसगट गुण दिले. त्यांनी उत्तीर्णतेसाठी पैशाचीही मागणी केली. ही बाब कुलगुरू समोर मांडली आहे.

डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसादातून शंभर जणांना विषबाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमीत्त वाटण्यात आलेला खव्याचा प्रसाद खाल्ल्याने गावातील शंभरच्या जवळपास लोकांना विषबाधा झाली. ही घटना बीड जिल्ह्यातील नांदूर घाट येथे शनिवारी सकाळी घडली. नांदुर येथील प्राथमिक व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांना उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सूर्योदयापूर्वी हनुमान जन्म सोहळा साजरा करण्यात आला. मात्र, केज तालुक्यातील नांदुर घाट येथे हनुमान जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना खव्याचा प्रसाद म्हणून वाटला होता. गावातील अबाल वृद्ध यांना हा प्रसाद वाटण्यात आला. हा खव्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर शंभराच्यावर भाविकांना विषबाधा झाली. प्रसाद खाल्यानंतर मळमळ होऊन उलट्या आणि संडासच त्रास गावकऱ्यांना होऊ लागला. सुरूवातीला त्यांच्यावर नांदुर येथील प्राथमिक रुग्णालयात व गावातील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा आकडा वाढल्यानंतर काही जणांना बीडला उपचारासाठी पाठवण्यात आले.

यामध्ये अत्यवस्थ्य असलेल्या चार मुलांवर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. केज येथील पोलिस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. पांडुरंग गोंदरे, श्रीराम गोंदरे , अनिकेत सातपुते, संतोष सातपुते, अर्जुन गोंदरे, आदित्य कानडे, दुर्गा वागिरे, शकुंतला जाधव, देवई जाधव, उमा जाधव, किसान वाघमारे, उमेश जाधव, अश्विनी जाधव, विजय सातपुते, सत्यभामा झोडगे, संतोष वाघमारे, परसराम चव्हाण, पांडुरंग गुंड, श्रीराम गुंड यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० लाख रुपयांना व्यापाऱ्यास लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक खात्यात पैसे नसतानाही विविध रकमेचे चेक देत हात उसने पैसे देण्याचे नाटक करणाऱ्या एका भामट्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने एका व्यापारी मित्राकडून दहा लाख रुपये व्यवसायासाठी हात उसने घेतले होते.

योगेश गायके (वय ३६, रा. श्रेयनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बांधकाम व्यवसायांशी निगडीत धंदा करणाऱ्या योगेशने तीन वर्षापुर्वी व्यापारी मित्र असलेल्या हरचरणासिंग गुलाटी (रा. उस्मानपुरा) यांच्याकडून साडे अकरा लाख रुपये हात उसने घेतले होते. सुरुवातीला त्याने दीड लाख रुपये फिर्यादीला परत केले. परंतू, त्यानंतर विविध कारणे सांगत तो उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत होता.

पैशांची मागणी केल्यानंतर विविध बँकेचे चेक फिर्यादीला देत असे. परंतू, खात्यावर पैसेचे नसल्याने ते चेक बाउन्स होत होते. गेल्या दोन वर्षात तब्बल दहा चेक बाउन्स झाले तसेच वारंवार मागणी करुनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या फिर्यादी गुलाटी यांनी उस्मानपुरा पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंग चव्हाण करत आहेत. दरम्यान, एकाच फ्लॅट दोन व्यक्तींना विकल्याचा आरोपही गायके यांच्यावर असून त्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपास अधिकारी चव्हाण यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाडा दुष्काळमुक्त करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती घोषीत करण्यात यावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार माळाकोळी येथील पाणी परिषदेप्रसंगी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे प्रत्येक लोकप्रतिनिधींने पाणी या विषयाशी निगडीत काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मराठवाड्यातील जनता दुष्काळाचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे. या संकटातून सामान्य माणूस बाहेर पडला पाहिजे यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे. सरकारने मदत दिली. परंतु, ती लाभार्थ्यांपर्यंत पोहचलीच नाही, अशा तक्रारी आहेत. मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचा संदेश सगळीकडे गेला पाहिजे. पाण्यासंदर्भात मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांची लवकरच मुंबईला बैठक घेण्यात येईल. या. रा. जाधव यांच्यासारख्या जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने पाणी परिषदा घेण्यात येतील.'

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री रावते म्हणाले, 'पाणी परिषदेच्या माध्यमातून पाणी हे जीवनात किती महत्त्चाचे आहे हे सजगता निर्माण करण्याचे काम केले जाते. आगामी पावसाळ्यात त्यादृष्टीने जलसंवर्धनाचे काम होईल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात पाणी टंचाईचे संकट आहे. गेली पाच वर्ष सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. येणारे दोन महिनेही आव्हानात्मक आहेत. यावर मात करण्यासाठीचे प्रयत्न गावात सुरू झाले आहेत. त्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत नांदेड जिल्ह्यात शंभरहून अधिक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.'

पाणी परिषदेला लोहा, कंधार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर पाणी परिषदेचे संयोजक आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, खासदार संजय जाधव, आमदार जयप्रकाश मुंदडा, आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मनपा आयुक्त सुशिल खोडवेकर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आदींची उपस्थिती होती.

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता

पाणी परिषदेचे संयोजक आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी प्रास्ताविकात परिसरातील जलसंधारणाच्या विविध योजनांचा उल्लेख करतांनाच, सध्यस्थितीतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्याच्या नारायणाची अनोखी नामदेव सेवा

$
0
0

रमेश पडवळ, भट्टीपाल, पंजाब

'संत नामदेवांच्या अभंगवाणीने गुरू ग्रंथसाहिबमध्ये स्थान मिळवून शीख धर्माच्या पायाभरणीत योगदान दिले आहे. मात्र, त्यानंतर नामदेवांचा वारसा चालवायला कोणीच आले नाही. महाराष्ट्रातून येथे येणाऱ्यांना नामदेवांची माहिती मराठीतून द्यायला कोणीही नसल्याचे मला ४३ वर्षांपूर्वी येथे आल्यावर लक्षात आले. नामदेवांचा दास होऊन त्यांची सेवा करण्यासाठी मी येथेच राहिलो. पंजाबकरांनी मला आपलेसे केले अन्‌ मीदेखील नामदेवांच्या तपश्चर्येचा गुरूद्वारा म्हणून ओळखला जाणारा नामियाना तेव्हापासून सांभाळतो आहे,' असे अस्खलित मराठीत आणि मध्येच एखादा पंजाबी शब्द उच्चारीत नारायणदास सांगत होते.

घुमानपासून तीन किलोमीटर अंतरावर भट्टीपाल हे छोटेसे गाव आहे. या गावात नामदेवांची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे, ती येथील तीन गुरूद्वारांमुळे. यातील एक म्हणजे नामदेवांनी विहीर खोदलेला खुसाहेब गुरूद्वारा, दुसरा खुंडीसाहेब गुरूद्वारा अन्‌ तिसरा म्हणजे नामदेवांच्या तपश्चर्येचे ठिकाण असणारा नामियाना. 'नामियाना म्हणजे संत नामदेवांची तप करण्याची जागा. म्हणून याला नामियाना असे नाव पडले,' असे नारायणदास सांगत होते. नामियानाला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर मंदिरासमोर साहित्य संमेलनामुळे गेटवरील मनोहर लाल या स्काउट गाइडने आम्हाला नारायणदास यांच्याकडे नेले. नामदेवांबद्दल माहिती हवी असेल, तर हे तुम्हाला मराठीत माहिती देतील असे लाल यांनी सांगितल्यावर धक्काच बसला.

नारायण दास यांचे वय आहे ७५ वर्षे..गेली ४३ वर्षे ते नामियाना सांभाळत आहेत. ते मूळचे जालना जिल्ह्यातील सायगावचे. (ता. बदनापूर). संत नामदेवांची अभंगवाणी आणि कार्याचा प्रचार करण्यासाठी ते देशभर भटकत असतात. नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर येथील मठांची अन्‌ धार्मिक स्थळांची त्यांना चांगली माहिती आहे. नारायणदास म्हणतात, 'संत नामदेवांचे पंजाबमध्ये १८-२० वर्षे वास्तव्य होते. त्यांनी या काळात पंजाबमध्ये आपल्या अभंगांनी क्रांती घडवून आणली. या क्रांतीची माहिती करून देण्यासाठी येथे कोणीही नाही. जी काही ऐकीव माहिती आहे, तेवढीच आता ऐकायला मिळते. म्हणूनच मी नामदेवांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रातून येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. संत नामदेवांनी बांधलेला नामियाना तलाव सुंदर अन्‌ स्वच्छ असून, येथे स्नान केल्यास व्याधी बऱ्या होतात, असेही नारायणदास म्हणाले.

'महाराष्ट्राने मदत करावी'

संत नामदेवांच्या तपश्चर्येचे स्थळ असलेल्या नामियानाला भेट देण्यासाठी दररोज शेकडो भाविक येतात. मात्र, त्यांची राहण्याची व्यवस्था भट्टीपालच्या नामियाना गुरूद्वारामध्ये करण्यात येते. गेल्या ४३ वर्षांत एकावेळी २५० लोकांची राहण्याची सोय होईल, अशी व्यवस्था पंजाबी बांधवांच्या मदतीने उभी केली आहे. मात्र, आणखी २० ते २५ खोल्यांची मदत मिळाल्यास येथे येणाऱ्यांची उत्तम व्यवस्था करता येईल, त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. असे आवाहन नारायणदास यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवी मुंबई’मुळे अडली औरंगाबादेतील युती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिका निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती नवी मुंबई महापालिकेमुळे अडली आहे. 'नवी मुंबई'त युतीचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला औंरगाबादेतील युतीचा निर्णय होईल, असे शिवसेनेचे नेते ठामपणे सांगत आहेत. दरम्यान, शिवसेनेला ६१ आणि भारतीय जनता पक्षाला ५२ वॉर्ड सोडण्यावर मतैक्य झाल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युती होणार की नाही, या बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज दिवसभर युती तुटल्याचीच चर्चा शहरात होती. दरम्यान, भाजपचे आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडमोडे, डॉ. भागवत कराड यांना भाजपच्या प्रदेश कार्यालयातून बोलावणे आले. ते सायंकाळी मुंबईला रवाना झाले. शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले. काही पत्रकारांनी त्यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी सुरुवातीला युतीबद्दल बोलताना आढेवेढे घेतले.

घोसाळकर म्हणाले, 'शिवसेना - भाजपची युती व्हावी, अशी नागरिकांचीच इच्छा आहे. त्यामुळे आम्ही देखील युतीच्याच बाजूने आहोत. भाजपच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेनेला ६३ आणि भाजपला ५० वॉर्ड देण्यापर्यंत युतीची चर्चा थांबली आहे. गुलमंडी हे शिवसेनेचे नाक आहे. त्यामुळे गुलमंडी सोडणार नाही, असे शिवसेनेने ठासून सांगितले. भाजपच्या नेत्यांनीही ते मान्य केले आहे. राजाबाजार, सिडको एन-६ आणि मयूरपार्क या तीन वॉर्डांबाबत अद्याप मतभेद आहेत. हे तीन वॉर्ड सोडण्याची भाजपची मागणी आहे. शिवसेनेने हे तिन्ही वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली आहे, पण त्याबदल्यात भाजपने त्यांचे 'विनिंग वॉर्ड' शिवसेनेला दिले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. युती व्हावी म्हणून आम्ही भाजपसाठी तीन वॉर्ड सोडायला तयार आहोत, आता भाजप आम्हाला काय देणार, एवढाच प्रश्न बाकी आहे. त्यावरही तोडगा निघेल आणि युती होईल, असा विश्वास वाटतो.' नवी मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय झाल्यावर दुसऱ्या मिनिटाला औरंगाबाद महापालिकेत युती करण्याचा निर्णय होऊ शकतो असा उल्लेख घोसाळकर यांनी केला.

'६१-५२'वर तडजोड

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार; औरंगाबाद महापालिका निवडणुकीत युती करण्याबद्दल शिवसेना-भाजपचा निर्णय झाला. शिवसेनेला ६१ आणि भाजपला ५२ वॉर्ड सोडण्याबद्दल दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. याची अधिकृत घोषणा रविवारी दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले होते. त्यावेळी शहरात लहान भाऊ असलेल्या भाजपने लक्षण‌ीय मते घेतली. त्यामुळे महापालिकेच्या जागावाटपात भाजपने मोठा वाटा मागितला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणजे शिवसेना सरकारजमा नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झाला आहे. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. याचा अर्थ आम्ही 'सरकारजमा' झालो, असे नाही. जनमताचा आदर करून सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर, सोबत अन्यथा विरोध, हा बाणा शिवसेनेने यापूर्वी दाखवून दिला आहे,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले.

माळाकोळी येथे आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलसंधारणांच्या विविध कामांना त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'राज्यातील शेतकरी, शेतमजूर सामान्य माणसांच्या हितासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो. याचा अर्थ आम्ही सरकारजमा झालो नाही. आघाडी सरकारने १५ वर्षांच्या कार्यकाळात भ्रमनिरास केला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरकारने जे चांगले केले त्याचे कौतुक करू. जे चुकीचे असेल त्याला विरोध करू.'

पाणी परिषदेच्या माध्यमातून रखडलेले जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, असा आग्रह धरला जावा. वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधणे, तळी खोदणे अशा कामांना प्राधान्य दिले जावे. पाणी राष्ट्रीय संपत्ती मानली जावी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले

यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते, पाणी परिषदेचे संयोजक आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, खासदार संजय जाधव, जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, ज्ञानराज चौगुले, जलतज्ज्ञ या. रा. जाधव उपस्थित होते.

सरकारचे धोरण शेतकरी, सामान्य माणसांच्या विरोधात असेल तर, तेथे निश्चितच शिवसेना विरोध करेल. जनता व सरकारमधील 'दुवा' म्हणून शिवसेना काम करेल.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहराच्या विकासासाठी पालिका ताब्यात द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी महापालिका एकवेळ राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुक उमेदवार व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुनील तटकरे यांनी जाती-पातीचे राजकारण करून निवडणुकीत राजकीय पोळी भाजणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. यावेळी माजीमंत्री राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात कसे वागावे, यांच्या टिप्स दिल्या.

विनोद पाटील, मनमोहनसिंग ओबेरॉय, मेराज पटेल यांची भाषणे झाली. यावेळी आमदार सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर, विक्रम काळे, संजय वाघचौरे, सुधाकर सोनवणे, मुश्ताक अहमद आदी पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images