Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीचे ७० उमेदवार जाहीर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाशी वाटाघाटी यशस्वी होऊ न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ११३ पैकी ७० वॉर्डांमध्ये उमेदवारांना तिकिटांचे वाटप केले आहे. त्यात आजी-माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांंचा समावेश आहे. अन्य वॉर्डांतील उमेदवारी मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर तसेच स्थानिक पातळीवरही चर्चेच्या दोन-तीन फेऱ्याही झाल्या, परंतु या चर्चा निष्फळ ठरल्या. काँग्रेसने आघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ७० वॉर्डांसाठी उमेदवारी जाहीर केली. संपर्कमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष व विनोद पाटील, नगरसेवक अभिजित देशमुख आदी पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक झाली. त्यानंतर आघाडी होणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी ११३ पैकी ७० वॉर्डांतील इच्छुक उमेदवारांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यात काशीनाथ कोकाटे, डॉ. बाळासाहेब पवार, मोतीलाल जगताप, सुनील जगताप, राहुल तायडे, जया बनकर, राजेंद्र तुपे, प्रकाश मते आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असे (कंसात वॉर्ड क्रमांक) रितेश यादव पाटील (५), अनिता जाधव (६), लक्ष्मण औताडे (७), राजेश सुरे (८), मीना वाघे (९), राजू थोरात (२०), सुनीता पवार (२८), प्रकाश मते (३०), आशा साळवे (३१), तुषार वाघमारे (३८), काशीनाथ कोकाटे (४०), प्रदीप शेळके (४८), राजेंद्र तुपे (५१), सोनाली कांबळे (५३), वसंतराव देशमुख (५७), राहुल तायडे (६०), आर. बी. पाटील (६४), जया विनोद बनकर (७१), सौ. शेजुळ (७५), डॉ. बाळासाहेब पवार (७८), मोतीलाल जगताप (८२), सुनील जगताप (८४), सौ. विसपुते (९१), प्रेमसिंग चव्हाण (९४), ज्योती मोरे (९५), सौ. शिंदे (९९), जयंत प्रकाश जावळे (१०२), जनार्दन कांबळे (१०७), प्रकाश खंदारे (१११), सीताराम कदम (११२), श्री. नाडे (११३).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसे इच्छुकांच्या हाती अपक्षांचा झेंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. आता यापैकी बहुतेक इच्छुकांनी स्वतःची ताकद आजमविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेल्या अपयशानंतर पक्षात मरगळ पसरली. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या ‌तोंडावर पक्षातील कार्यकर्ते सक्रीय झाले होते, परंतु निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केला. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. मध्यंतरी राज ठाकरे शहरात दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते, मात्र त्यावेळी कार्यकर्त्यांबरोबर पालिका निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. पक्ष निवडणूक लढणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर आता मनसेच्या काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून रिंगण्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्यांने महिला आघाडीच्या गुलमंडीवरून अॅड. नूतन जैस्वाल, एन पाचमधून रुपाली पवार, पुंडलिकनगर प्रभागातून अजय गटाणे, समर्थनगरमधून राजीव जावळीकर, जयभवानीनगर प्रभागातून भारत गायकवाड, एन ३, एन ४मधून शीतल अमोल सुरडकर, एन ७मधून पृथ्वीराज राठोड, नारळीबागेतून अमोल खडसे, टीव्ही सेंटर वॉर्डातून राहुल सोनवणे यांच्यासह अनेक इच्छुक अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहे. मनसेचे हे पदाधिकारी अपक्ष लढल्यास, त्यांना त्या तेथील मनसे कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर यांचे यश अपयश अवलंबून आहे.

पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली होती, परंतु मनसे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक कायकर्ते व पदाधिकारी अपक्ष निवडणूक लढवून त्यांची ताकत आजमाविणार आहेत. - ‌आशिष सुरडकर, शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत

$
0
0



प्रमोद माने, औरंगाबाद

६ मे १९८८ रोजी औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारणसभा बोलाविण्यात आली होती. या पहिल्याच गाजलेल्या सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. जणू काही सभागृहात दंगलीसारखीच परिस्थिती होती. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी ही सभा बोलाविण्यात आली होती. शिवसेना पहिल्यापासूनच आक्रमक होती. या निवडणूक प्रक्रियेची नियमावली मराठीत देण्यात न आल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. राजभाषेचा मान राखावा, अशी त्यांची मागणी होती. मतपेटी उचलण्यापर्यंत मजल गेल्यामुळे तत्कालीन आयुक्त आणि पीठासन अधिकारी मोहन फडतरे यांनी सभा तहकूब केली. या पहिल्याच बैठकीत दुपारी अडीच ते साडेतीनदरम्यान विचित्र परिस्थिती उद्भवली होती. आयुक्त फडतरे यांनी नगरसेवकांना बाहेर जाण्यास सांगून बैठक तहकूब केल्याचे जाहीर केले आणि साडेचार वाजता त्यांनी पुन्हा बैठक बोलावून पदाधिकाऱ्यांची निवडणुकही घेतली होती. शिवसेना नगरसेवकांच्या गैरहजेरीत या निवडणुका झाल्या होत्या. एकदा स्थगित केलेली ही बैठक बेकायदा आहे, हे सांगून शिवसेनेच्या २८ सदस्यांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. आयुक्तांनी घेतलेली ही तहकुबीनंतरची बैठक अवैध होती, असा दावाही त्यांचा होता. महापौरपदी काँग्रेसचे डॉ. शांताराम काळे, उपमहापौरपदी मुस्लिम लीगचे तकी हसन खान यांची निवड झाली. या निवडीला शिवसेनेने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टाने या निवडी वैध असल्याचा निर्वाळा दिला. या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे आताचे खासदार आणि त्यावेळचे गटनेते चंद्रकांत खैरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. शिवसेनेने दिलेल्या या आव्हानावर सुप्रिम कोर्टाने २१ जुलै १९८८ रोजी निर्णय राखून ठेवला होता.

दुसऱ्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरून सेनेचे अपिल सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्या. ए. पी. सेन व न्या. एन. नटराजन यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले होते. ही बैठक तहकूब झाली नव्हती; तर थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आली होती, असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा सुप्रीम कोर्टातही कायम करण्यात आला. एकदा तहकूब केलेली बैठक पुन्हा बोलाविण्यासाठी एक आठवड्याची सूचना जारी करणे आवश्यक असते. आयुक्तांना त्या सभेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही जण जखमी झाले होते. ६० सदस्यांच्या महापालिकेत काँग्रेसने मुस्लिम ‌लीग, भारिप आणि अपक्षांशी आघाडी करून सत्ता काबीज केली होती.

हायकोर्टाचाच निर्णय कायम झाल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. हायकोर्टाचे न्या. पी. व्ही. निरगुडकर व न्या. के. एन. पाटील यांनी महापौर डॉ. शांताराम काळे व उपमहापौर तकी हसन खान यांची निवड वैध ठरविली होती. तत्कालीन आयुक्त फडतरे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर खंडपीठाने गौरवोद्गार काढले होते. ६ मे रोजीची सभा तहकूब करण्यात आली होती का? आणि जर हो, तर ती दिवसभरासाठी तहकूब झाली होती का, हा या याचिकेतील महत्त्वाचा मुद्दा होता. सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा घेतलेल्या सभेसाठी सात दिवसांची नोटीस मुंबई प्रांतिक महापालिका कायदा १९४९च्या कलम एच प्रमाणे आवश्यक ठरते. अधिनियम - ३प्रमाणे सभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला तर सभा तीन दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात येऊ शकते, असा दावा शिवसेनेचा होता. शांतता प्रस्थापित होईपर्यंत आणि सामानाची आवराआवर करेपर्यंत सभा स्थगित करण्यात आली होती आणि पुन्हा साडेचार वाजता ही

सभा सुरू होईल, असे आयुक्तांनी शपथपत्रात म्हटले होते. आयुक्तांचे हे म्हणणे सुप्रीम कोर्टानेही ग्राह्य ठ‌रविले होते. हायकोर्टाने संभवतेवर अधिक भर दिला होता. आयुक्तांचे शपथपत्रही संभवतेच्या तत्त्वावर उतरणारे आहे. हे शपथपत्र अधिक प्रभावी व पटणारे आहे, त्यामुळेच ते आम्ही स्वीकारले, असे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आपल्या निकालात म्हटले होते. पुन्हा सभेसाठी आवश्यक ती नोटीस आयुक्तांनी दिली होती. स्थगित सभेसाठी नोटीसची आवश्यकता नसल्याचे मतही खंडपीठाने निकालपत्रात स्पष्ट केले होते.

महापौर आणि उपमहापौर यांना ३२-३२ मते पडली, हे सत्य पुरेसे बोलके आहे, त्याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. पदावर असणाऱ्या व्यक्तींकडे स्पष्ट बहुमत असेल तर, पुन्हा निवडणुकीची गरज काय, हा युक्तिवाद औरंगाबाद खंडपीठाने ग्राह्य धरला होता. काँग्रेसकडे बहुमत असल्यामुळेच पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती कोर्टाने मान्य केली नाही. ६ मे १९८८च्या सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ चालू असताना पोलिसांना पाचारण केल्यामुळे कोर्टाने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे शपथपत्र दाखल करण्याचे सांगितले होते. केवळ नगरसेवकच सभागृहात नव्हते तर, अन्य लोकही सभागृहात ये-जा करत होते, असे त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले होते. तत्कालीन महसूलमंत्री विलासराव देशमुख हे बंदोबस्त पाहण्यासाठी सभागृहाच्या ठिकाणी आले होते, असेही या शपथपत्रात स्पष्ट करण्यात आले होते. विधानसभेतील शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ यांना पोलिस अधीक्षकांनी सभागृहाबाहेर जाण्याची विनंती केली होती, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या शपथपत्रात स्पष्ट करण्यात आले होते. अभूतपूर्व गोंधळ चालू असतानाच शिवसेनेने बहिष्कार टाकला. पीठासन अधिकाऱ्यांनी घेतलेला दुसऱ्या बैठकीचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही मान्य केला आणि या बैठकीतच महापौर व उपमहापौरपदाची निवड झाली होती, ती वैध असल्याचा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टानेही खासदार चंद्रकांत खैरे यांची याचिका फेटाळून लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून थेट एबी फॉर्म

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याची अनिश्चितता, एमआयएमने विधानसभेत विजय मिळविल्यानंतर काँग्रेसची झालेली पीछेहाट यामुळे धडकी भरलेल्या काँग्रेसने पालिका निवडणुकीची उमेदवार यादीच जाहीर केली नाही. मंगळवारी अर्ज भरण्याच्या मुदतीनंतरच यादी जाहीर करण्यात येणार आहे, मात्र निश्चित झालेल्या ५५ वॉर्डातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसकडे महापालिकेसाठी गर्दी होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते, पण अनेक वॉर्डांतून २५ इच्छुक पुढे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होणार की होणार नाही याबाबत चर्चा सुरू होती. आघाडीला स्थानिकांचा विरोध पाहिल्यानंतर नेतेही शांत बसले. दुसरीकडे एमआयएमने जोरदार मुसंडी मारल्याने काँग्रेसच्या तंबूत घबराट पसरली होती. कुठलाही धोका न पत्करता काँग्रेसने उमेदवार निश्चित केले, पण यादी अखेरपर्यंत जाहीर केली नाही. सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत बैठकांचा फार्स सुरू होता. एकाही स्थानिक नेत्याने फोन उचलले नाहीत. मिटिंगमध्ये असल्याचे निरोप पाठविले गेले. दिवसभर काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट होता. रात्री उशिरा ५५ वॉर्डातील उमेदवार निश्चित करून त्यांना शहागंजमधील गांधीभवनात बोलावून एबी फॉर्म देण्याचे काम सुरू होते. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वॉर्डातील संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे - भाऊसाहेब जगताप, शीला मोकळे, कल्पना नेवे, विजयेंद्र जाधव, बाळू गजहंस, अमोल देशमुख, अयुब खान, अफसर खान, राजेश मोरे, अशोक पगार, हबीब कुरेशी.

प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना यादी मंगळवारी दुपारपूर्वी जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करत कोअर कमिटीच्या सदस्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमच्या उमेदवारांत बदल

$
0
0



औरंगाबादः एमआयएमची पहिली यादी घोषित झाल्यानंतर वाढती नाराजी लक्षात घेऊन निवड समितीने काही उमेदवारीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शरीफ कॉलनी वॉर्डातून अजीम खान यांच्याऐवजी माजी नगरसेवक निसार अहेमद, गणेश कॉलनीतून मुजीब आलम शहा यांच्याऐवजी नासेर सिद्दिकी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बुढ्ढीलेन वॉर्डातून हीना खान रफिक खान यांना उमेदवारी देण्यात आली होती. हा निर्णय रात्री उशिरा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजांचे आकांडतांडव

$
0
0



एमआयएमची यादी जाहीर होताच पदाधिकाऱ्यांना इच्छुकांचा घेराव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने (एमआयएम) ४८ वॉर्डांमधील उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (६ एप्रिल) जाहीर केली. या यादीत नाव नसल्याने नाराज कार्यकर्त्यांनी थेट उमेदवार निवड समितीविरुद्ध दंड थोपटत डॉ. गफ्फार कादरी यांना घेराव घातला. या नाराजीचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटत होते. दरम्यान, पहिल्या यादीत काही बदल होणार असल्याचे संकेत वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिले आहेत.

एमआयएमने महापालिका निवडणूक उमेदवारांची पहिली यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर केली. एका वॉर्डात अनेक इच्छुक असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होणार हे स्पष्ट होते. यादी जाहीर होताच रोहिला गल्लीतील कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या घरी जाऊन नाराजी व्यक्त केली. राहुलनगर, सादातनगर येथील इच्छुक भडकल गेट येथे जमले. त्यांनी डॉ. गफ्फार कादरी यांना यांना घेराव घातला. नवाबपुरा व आरेफ कॉलनीतील इच्छुकांनी मौलाना मुफ्ती रहेमान फारूखी यांच्या घरी जाऊन निवड समिती सदस्यांसमोर नाराजी व्यक्त केली. कैसर कॉलनी, शहाबाजार वॉर्डातील नाराजांनी पदाधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला. नाराजी वाढत असल्याने काही निवड समिती सदस्य निघून गेले.

नाराजांची दबाव वाढत असल्याने बेगमपुरा पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, नाराजी वाढत गेल्यामुळे आमदार इम्तियाज जलील यांना व घराला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

मुजीब आलम शहांचा नकार

काँग्रेसमधून एमआयएममध्ये दाखल झालेले मुजीब आलम शहा यांना गणेश कॉलनी वॉर्डातून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना शरीफ कॉलनी वॉर्डातून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे शहा यांनी गणेश कॉलनीतून निवडणूक लढविणार नसल्याचे कळविल्याची चर्चा आहे.

थेट 'एबी फॉर्म'

रविवारी ४४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नामनिर्देशन दाखल करण्याची मंगळवारी शेवटची तारिख असल्यामुळे १८ उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फार्म दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एमआयमएमची यादी

(कंसात वॉर्ड क्रमांक) पद्माकर कांबळे (२), नजीब खान हबीब खान (४), आसिफ पटेल (५) , इलियास खान फिरोज खान (१०), मिलिंद शेजवळ (१४), सय्यद हारूण (१५), अतिक पटेल (१८), जावेद कुरेशी (१९), सय्यद मतीन (२०), हीना खान (२१), तस्नीम बेगम (२२), सायरा बेगम (२३), सरवत फातेमा आरीफ खान (२४), मुजीब आलम शहा (२५), नर्गिस अंजुम (२६), जहांगीर खान (२७), संगीता सुभाष वाघुले (३४), समीर साजीद (३५), सुलताना बेगम (३६), नीता भालेराव (३७), हाजी इर्शाद खान (४१), अजीम अहेमद खान (४३), अन्सारी साजिदा तब्बस्सुम (४४), सुमैया मुस्तफा खान (४५), फिरोज खान (४६), गंगाधर ढगे (४९), नसरीन बेगम (५०), विकास एडके (५२), काझी मोहम्मद रियाज (५४), नासेर खान (५५), मैमुन्निस्सा बेगम (५६), पठाण अस्मा फिरदौस (५८), मोहम्मद रियाजोद्दीन (५९), मोहम्मद अय्युब जहागीरदार (६१), अब्दुल रहीम हनीफ (६३), जोहराबी नासेर खान (६७), प्रवीण शिंदे (६८), इशरत बानू शेख मुश्ताक (६९), शेख मुन्शी शेख भिकन (७९), बाबासाहेब सुरडकर (८४), मगन निकाळजे (१०१), रमेश भिवसने (१०४), शबाना फैसल खान (१०८),फरहीन रिजवान (१०९).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपाने रिपाइंला झुलवले

$
0
0



तोडगा निघण्याची रिपाइं नेत्यांना आशा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना- भाजपमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) युतीत सामावून घेतले जाणार किंवा नाही, यांचा निर्णय सोमवारी (६ एप्रिल) रात्री उशीरापर्यंत झाला नाही. चर्चा सुरू आहे, तोडगा निघेल, अन्यथा वेळप्रसंगी वेगळा निर्णय घेऊ, असे रिपाइं नेते बाबुराव कदम यांनी सांगितले.

शिवसेनेसह भाजप नेत्यांनी जागा वाटपाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु, या दोन पक्षांमधील जागा वाटपाची चर्चा लवकर न संपल्याने रिपाइंला किती जागा मिळणार, यावर अधिक चर्चा झाली नव्हती. शिवसेनेने नंदनवन कॉलनी शांतीपुरा, कोतवालपुरा गरमपाणी, कोकणवाडी हे वॉर्ड सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण, अन्य काही वॉर्ड सोडण्यात यावेत, अशी मागणी असल्याचे कदम यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी काही जागा सोडण्याची तयारी दर्शवली असून रात्री उशीरापर्यंत सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थात, सकारात्मक निर्णय झाल्यास वेळप्रसंगी वेगळा निर्णय घेऊ असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप युतीला संघाच्या सूचना

$
0
0




म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

आता शहराचा विकास करा, युतीला सर्वाधिक जागांवर निवडून आणण्यासाठी रणनीती आखा आणि विजयी व्हा, अशा शुभेच्छा देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी संध्याकाळी युतीच्या उमेदवारांना सूचनाही केल्या.

रविवारी संघाने शिवसेना आणि भाजपचे कान टोचल्यानंतर सोमवारी (दि. ६) दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर संघाची नजर होती. संघाची मध्यस्थी फळाला आली, याचे चित्र संध्याकाळी स्पष्ट झाले. शिवसेना ६४ आणि भाजप ४९ जागांवर लढण्याचे ठरले. यात संघाची भूमिका महत्त्वाची ठरली. रविवारी संघप्रणित भारतीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष देवजीभाई पटेल यांनी कान टोचल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना युतीचा निर्णय घेण्यास एक दिवस लागला. संघ दिवसभर या दोन्ही पक्षांच्या घडमोडींवर नजर ठेवून होता. हॉटेल व्हिटस्, प्रचार कार्यालय, समर्थनगर येथील संघ कार्यालय आणि काल्डा कॉर्नरवरील भाजप कार्यालय, समर्थनगर येथील शिवसेना कार्यालय या परिसरात संघाचे अनेक स्वयंसेवक सोमवारी दिसले. रविवारी 'इगो बाजूला ठेवा. युती साठी तयार राहा. व्यापक हिंदुत्वासाठी युती आवश्यक आहे,' अशा शब्दांत उभय पक्षांच्या नेत्यांना डोस दिला होता. सोमवारी झालेली ही युती म्हणजे व्यापक हिंदुत्वासाठी एकत्र‌िकरण असून, याचा आपल्याला आनंदच झाला आहे, असे संघाने म्हटले आहे.

६४ आणि ४९ हे सर्वसमावेशक आकडे असून, आता कुणीही नाराज होऊन चालणार नाही, यापुढील दोन आठवडे जोमाने काम करून युतीला व्यापक ह‌िंदुत्वासाठी निवडून आले पाहिजे याचा पुनरुच्चार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

युतीचा आनंदच आहे. शहराचा कायापालट आता युतीने केलाच पाहिजे नाही. शहराचे वातावरणही सलोख्याचे ठेवत विकासाची कास धरणे युतीला आवश्यक आहे. - देवजीभाई पटेल, अध्यक्ष भारतीय समाज सेवा संघ, (संघप्रणित)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपात नाराजीचा सूर वाढला

$
0
0


नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी देत असल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निष्ठावंताना डावलून पदाधिकारी आणि बड्या नेत्यांच्या नातेवाईक व मर्जीतील लोकांनाच उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी सोमवारी एका बैठकीत करत या नेत्यांचा निषेध केला. विशेष म्हणजे पक्षाच्या स्थापना दिनीच कार्यकर्त्यांनी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाल्याने त्यातून प्रबळ उमेदवारांची निवड करण्याची कसरत भाजप निवडणूक समितीला करावी लागत आहे. पक्षासाठी केलेले काम पाहून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा ठेवत अनेकांनी मुलाखत दिली होती, पण दुसरीकडे आमदार, नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी जोरदार फिल्डींग लावल्याने आपले तिकीट कापले जाणार अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्ते असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये पसरली आहे.

काल्डा कॉर्नर येथील निवडणूक कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता काही नाराज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. नाराजांपैकी काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या निषेध बैठकीचे निमंत्रण समदुखी कार्यकर्त्यांना एसएमएसद्वारे आणि फोनाफानी करून दिले होते. त्यास २५ ते ३० कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. या बैठकीत निष्ठावंताना डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काही नेते इतरांना संधी न देता पदे आपल्याच घरात ठेवण्याचे काम करतात, असा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला.

पक्षातील काही नेतेमंडळी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करतात. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपल्या भावना या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.हे नेते कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. - दिलीप देशमुख, कार्यकर्ता, भाजप

इच्छुकांमधून केवळ कोणा एकालाच उमेदवारी देता येते. त्यामुळे स्वाभाविकपणे इतर काहीजण नाराज होणारच. अद्यापतरी कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील. - भगवान घडमोडे, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चकवा, तणाव आणि सुटका’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चकवा, तणाव आणि सुटकेचा निःश्वास अशी त्रिसूत्री सोमवारी झालेल्या शिवसेना-भाजप नेत्यांच्या संयुक्त बैठकीचे वैशिष्ट्य ठरले. थंड पाण्याच्या बाटल्या, सँडवीच आणि वडापाववर ताव मारत शेवटी नेत्यांनी युतीची घोषणा केली. रात्री सोबत जेवण घेण्याचे आश्वासन एकमेकांना देऊन नेत्यांनी बैठकीचे ठिकाण सोडले. महापालिका निवडणूकीत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही याबद्दल सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, दोन्हीही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरू होती. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत युतीबद्दलचा निर्णय होणे गरजेचे होते. त्यानुसार सकाळी दहा वाजता दोन्हीही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार होती. पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यावेळी जालन्यातच होते. त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना चकवा देत भाजपच्या स्थानिक नेत्यांना जालन्याला बोलावून घेतले. जालन्यात या सर्वांची दोन तास बैठक चालली. दोन वाजेच्या सुमारास दानवेंसोबतेच भाजपचे नेते औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये दाखल झाले. त्यानंतर बैठक सुरू झाली. ही बैठक पाच तास चालली. शेवटी युतीची घोषणा दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी केली आणि नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला शिवसेनाच ठरली वरचढ

$
0
0



सावेंनी डोळे पुसले, तनवाणींनाही पडल्या मर्यादा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणूकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झाली. युती होताना शिवसेनाच नेहमीप्रमाणे वरचढ ढरली. ५२ वॉर्डांवर अडून बसलेल्या भाजपला ४९ वॉर्डांवर समाधान मानावे लागले. आपल्या समर्थकांसाठी वॉर्ड सोडवून घेताला भाजपच्या नेत्यांची अक्षरशः दमछाक झाली. आमदार अतुल सावे यांच्यावर तर डोळे पुसण्याची वेळ आली. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या किशनचंद तनवाणी यांनाही मर्यादा पडल्या. युतीच्या घोषणेनंतर भाजपच्या नेत्यांचे चेहरे खुलण्याऐवजी पडल्याचे जाणवत होते.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज युतीबद्दल निर्णय होणे गरजेचेच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सकाळी दहा वाजता बैठक होणार होती, पण एकमेकांना 'चकवा' देत दोन्हीही पक्षांच्या नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये झाली.

गुलमंडी, राजाबाजार, सिडको एन ६, मयूरपार्क या वॉर्डांवरून दोन्हीही पक्षांमध्ये ओढाताण सुरू होती. त्यापैकी गुलमंडी वॉर्ड पूर्वीच शिवसेनेला सोडण्यात आला होता. आज झालेल्या बैठकीत काही वॉर्डांच्या आदलाबदलीबद्दल निर्णय झाला. त्यानुसार सिडको एन ६, नक्षत्रवाडी, सुरेवाडी हे वॉर्ड शिवसेनेला सोडण्याचे ठरवण्यात आले. राजाबाजार, मयूरपार्क, हर्सूल हे वॉर्ड भारतीय जनता पक्षाला देण्याचा निर्णय झाला. आमदार अतुल सावे यांनी त्यांचे खंदे समर्थक अनिल मकरिये यांच्यासाठी नागेश्वरवाडी वॉर्ड सोडवून घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. बैठक सुरू झाल्यावर त्यांनी नागेश्वरवाडी वॉर्ड भाजपला देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर दोन्हीही पक्षाच्या नेत्यांमध्ये तणातणी सुरू झाली. नागेश्वरवाडी सोडणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे भाजपचे सावे, डॉ. भागवत कराड, भगवान घडमोडे, किशनचंद तनवाणी बैठकीच्या खोलीतून बाहेर पडले. औरंगाबाद जिमखाना क्लबच्या दुसऱ्या खोलीत या चौघांची बैठक झाली. बैठक झाल्यावर ते पुन्हा शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नागेश्वरवाडी शिवसेनेनी सोडली नाही. त्यामुळे बैठक संपल्यावर सावे यांचे डोळे पाणावले.

तनवाणी यांनी राजाबाजार, मयूरपार्क, सिडको एन ६, सुरेवाडी या वॉर्डांसाठी आग्रह धरला होता. त्यापैकी त्यांच्या पदरात राजाबाजार आणि मयूरपार्क हे दोन वॉर्ड पडले. सर्व वॉर्ड सोडवून घेण्यासाठी त्यांना मर्यादा पडल्या. बैठकीतून काही वेळासाठी तनवाणी यांनी अंग काढून घेतले होते, शेवटीशेवटी ते पुन्हा बैठकीत सहभागी झाले. बाळकृष्णनगर, रामनगर, गजानननगर या वॉर्डांवरूनही युती झाल्यानंतर दोन्हीही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले नव्हते. या वॉर्डांमध्ये बदल होऊ शकतो असे संकेत दोन्हीही पक्षांच्या नेत्यांनी दिले. भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांना त्यांच्या भावासाठी रामनगर हा वॉर्ड हवा आहे. बाळकृष्णनगर हा वॉर्ड सध्या भाजपकडे आहे. गजानननगर वॉर्ड सध्या शिवसेनेकडे आहे. बाळकृष्णनगर वॉर्ड शिवसेनेला देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. पुंडलिकनगर वॉर्ड दिला तर, बाळकृष्णनगर वॉर्ड सोडू, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली. पुंडलिकनगर वॉर्ड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे हा वॉर्ड कसा सोडायचा असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांसमोर निर्माण झाला.

विद्यानगरातून कला ओझा

विद्यानगर या वॉर्डातून विद्यमान महापौर कला ओझा यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले. ओझा यांच्यासाठी बाळकृष्णनगर हा वॉर्ड सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण या प्रयत्नाला भाजपच्या नेत्यांनी खो दिला. त्यामुळे ओझा सध्या ज्या वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत त्या विद्यानगर वॉर्डातूनच त्यांना उमेदवारी देऊ, असे खैरे म्हणाले. या वॉर्डातून आज सोमवारी शिवसेनेचे शहरप्रमुख रेणुकादास वैद्य यांनी उमेदवारी अर्ज भरला याकडे पत्रकारांनी खैरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, वैद्य यांना बी - फॉर्म देण्यात आला नाही आणि त्यांना पक्षाचा आदेश मानावाच लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंनी कापले सावेंचे पंख

$
0
0



प्रमोद माने, औरंगाबाद

शिवसेनेबरोबर युती करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच पक्षाचा घात केला. भाजपचे नेते तहात पराभूत झाले असून, शिवसेनाच औरंगाबाद महापालिकेत मोठा भाऊ ठरला आहे. पुन्हा एकदा भाजपलाच नमते घ्यावे लागले. तह करताना दानवे यांनी औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार व निवडणूक प्रमुख अतुल सावे, माजी आमदार, सहनिवडणूक प्रमुख किशनचंद तनवाणी यांचेच पंख कापले आहेत. जागावाटप जाहीर झाल्यानंतर दानवे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतून बाहेर पडलेले तनवाणी यांचा, युतीचे जागावाटप करताना दानवे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मदतीने गेम केला, अशी जोरदार चर्चा भाजपमध्ये चालू आहे.

माजी आमदार तनवाणी यांना त्यांच्या मनाप्रमाणे जागा दिल्या नाहीत. केवळ राजाबाजार प्रभागच त्यांना देऊ केला आहे. हर्सूलमध्ये पूनमचंद बमणे यांना तिकीट दिले असले तरी ते भाजपचे नगरसेवक होते हे विसरून चालणार नाही. मयूरपार्कमध्ये विजय औताडे यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते तनवाणी यांचे कार्यकर्ते नाहीत, असा दावा भाजप कार्यकर्त्यानी केला.

सुरेवाडी, सिडको एन -६, नक्षत्रवाडी या जागा तनवाणी यांनी मागितल्या होत्या. या जागा त्यांना दिल्या नाहीत. या सर्व जागांवरूनच युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला होता.

आमदारांना सहा वॉर्ड

आमदार अतुल सावे यांच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ३४ वॉर्ड येतात. यापैकी केवळ त्यांच्या पसंतीच्या सहा कार्यकर्त्यांनाच दानवे यांनी तिकीट देऊन सावे यांचे पंख छाटले. नागेश्वरवाडी प्रभाग शिवसेनेला सोडून सावे यांच्या जखमेवर मीठ चोळले. सावे यांचे निकटवर्तीय अनिल मकरिये यांना तेथून तिकीट पाहिजे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना ६४, भाजप ४९!

$
0
0



युतीचा तिढा सुटला; प्रचाराचा नारळ एकत्रित फुटणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या घोषणेपासून निर्माण झालेला शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचा तिढा अखेर सोमवारी सुटला. शहरातील ११३ वॉर्डांपैकी शिवसेना ६४ आणि भाजप ४९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची संयुक्त बैठक झाली. दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत ही बैठक चालली. संध्याकाळी पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे म्हणाले, 'राज्यात नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर घेण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत युती करण्याचे आज निश्चित करण्यात आले. नवी मुंबईत ११३ वॉर्डांपैकी शिवसेना ६८, तर भाजप ४३ वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करण्यात येतील. दोन्ही पालिकांवर युतीचाच झेंडा फडकेल.'

भाजपमध्ये ज्या नगरसेवकांनी प्रवेश केला, त्यापैकी बहुतेकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करून रावसाहेब दानवे म्हणाले, आता आमची युती झाली आहे. त्यामुळे रामदास आठवले, महादेव जानकर आणि शिवसंग्राम पक्ष यांच्याबरोबर बसून पुढील जागांचे वाटप ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार खैरे म्हणाले, 'पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन केले आहे.' या बैठकीला शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, भगवान घडमोडे, डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

खरी बैठक आजचीच

शिवसेना-भाजपची युती होण्यासाठी अकरा बैठका झाल्या. एवढी ओढाताण सुरू होती का, असा प्रश्न पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारला असता ते म्हणाले, 'अकरा बैठका झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण त्यापैकी काही बैठकांमध्ये फक्त चहा-पाणी झाले. काही बैठका जेवणावळीत गेल्या. युतीसाठीची खरी बैठक आजच झाली आणि दोन तासांत मार्ग निघाला.'

महापौर-सभापतीबद्दल नंतर चर्चा

युतीचे जागावाटप झाले, पण महापौर आणि सभापतिपदाबद्दल दोन्ही पक्षांत काही ठरले आहे का, या प्रश्नावर रावसाहेब दानवे म्हणाले, 'या दोन्ही पदांबद्दल आता चर्चा झाली नाही. निवडणुकीचे निकाल आल्यावर आम्ही पुन्हा बसणार आहोत. त्यावेळी या दोन्ही पदांबद्दल चर्चा करून निर्णय घेऊ.'

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काडीमोड

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. एकमेकांवर आरोप करत दोन्ही पक्षांनी उमेदवारांना ए, बी फॉर्मचे वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेसने ७५ तर काँग्रेसने ८० वॉर्डांसाठी ए, बी फॉर्म वाटप केले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये काडीमोड झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले. काँग्रेसचे निरीक्षक सचिन सावंत म्हणाले, आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडला होता. स्थानिक काँग्रेस नेते राष्ट्रवादीसोबत जाण्यास उत्सुक नव्हते. औरंगाबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीही ताकद दिसली नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व जागा लढविणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख यांनी सांगितले की, आघाडीसाठी आम्ही प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूर्मगतीवर दानवेंचा संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्याच्या प्रशासनाची अतिशय मंद चाल आणि लोकप्रतिनिधींचा संताप या रंगलेल्या खेळाच्या पहिल्या डावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाली, तर दुसऱ्या डावात आणखी धक्के बघण्यास मिळण्याची चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रशासनाच्या कूर्मगतीवर नुकताच संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकामांचा आढावा मार्च महिन्याच्या शेवटी घेण्यात आला. तो पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पारा अक्षरशः चढलेला आहे. आदर्श ग्रामसेवकांना सन्मानित करण्यासाठी योजलेल्या जाहीर कार्यक्रमात दानवे यांनी जिल्हाधिकारी नायक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांना जाहीर व्यासपीठावर नुकतेच सर्वांसमक्ष खडसावले आहे. जालन्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून मंजूर झालेली आणि प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कामांचा लेखाजोखा मार्च महिन्याअखेरीस घेण्यात आला. कामे पूर्ण झालेला आकडा बघून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संताप व्यक्त केला.

जिल्ह्यातील तहसील स्तरावर सन २०१३-१४ या वर्षात ४८४१ कामे मंजूर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ९४५ कामे पूर्ण करण्यात आली. कामे पूर्ण करण्यात येण्याची २४.२६ टक्केवारी आहे. सन २०१४-१५ या वर्षात ५५६८ कामांपैकी अवघी १.४९ टक्के कामे पूर्ण करण्यात आले आहेत. दानवे म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्वाधिक घोटाळ्यात अडकून पडलेल्या हजारो सिंचन विहीरींचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळत नाही. तालुक्यातील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी प्रत्येक विहीरीमागे मागे

मंजुरीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊनच मान्यता दिली आहे. असे असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय काम करतात? तहसील कार्यालयात चकरा मारून थकलेले शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपण या बाबींची तक्रार दाखल केली आहे.' या संदर्भात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काहीही बोलत नाहीत हे विशेष! देशभ्रतार यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे, तर यानंतर कुणाची बदली होते, या प्रतीक्षेत सर्वजण असल्याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस उत्पादकांवरही कारवाई होणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'बीडमध्ये खसखस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अफू तयार करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला आहे. ऊसापासून साखरेप्रमाणेच दारूही तयार होते. मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही अशीच कारवाई करणार का, असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही अन्यायकारक असून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीड येथून औरंगाबादकडे जात असताना रघुनाथदादा पाटील काही वेळ जालन्यात थांबले होते. या वेळी त्यांनी बीडमधील शेतकऱ्यांवरील कोर्टाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, 'खसखसच्या बोंडापासून अफू निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी खसखस उत्पादक शेतकऱ्यांवर कारवाई करून राजकीय सूड उगविला जात आहे. ऊसापासून साखरेप्रमाणेच दारूही तयार होते. मग तुम्ही उस उत्पादक शेतकऱ्यांवरही अशाच प्रकारची कारवाई करणार का?'

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील २५ खसखस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अफू तयार केल्याच्या आरोपाखाली दोन दिवसांपूर्वी कोर्टाने दोषी ठरविले. त्यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याविषयी पाटील म्हणाले, 'देशात इतर राज्यात खसखस उगविण्यास परवानगी आहे. मग राज्यात का नाही? खसखसच्या बोंडांपासून अफू तयार होते. अफू तयार करणारया कारखान्यांवर, त्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार भुमरेंच्या दडपशाहीविरोधात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ प्रकरणाने आता शिवसेना विरुद्ध सूर्यवंशी असे वळण घेतले आहे. सूर्यवंशी यांनी मंगळवारी (७ एप्रिल) धरणे आंदोलनादरम्यान आमदार संदीपान भुमरे यांच्यासह नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्यावर ते एका शैक्षणिक संस्थेचा कामावर न जाता फुकट पगार घेत असल्याचा आरोप केला.

आमदार भुमरे समर्थकांनी १ एप्रिल रोजी जयाजीराव सूर्यवंशी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले, धरणे आंदोलन होऊ नये यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मंडप टाकताना अडचणी आणल्या. सध्या शहरात नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या अनेक कामात भ्रष्टाचार होत असून लवकरच आपण ही सर्व प्रकरणे उघड करणार आहे. गोर्डे एका शैक्षणिक संस्थेवर कामावर न जाता फुकट पगार घेत असल्याचे त्यांनी विसरू नये, असा आरोप सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांवर केला.

आमदार भुमरे यांच्यावरही सूर्यवंशी यांनी टीका केली. 'आमच्यावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करू नये. या पद्धतीच्या दहशतीला आपण घाबरत नसून यापुढे माझ्या अंगावर येणाऱ्या आमदार समर्थक व शिवसैनिकांना जशास तसे उत्तर देणार आहे,' असा इशारा दिला. मागच्या काही दिवसांपासून आमदार भुमरे समर्थक माझ्यावर व माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ए‌का आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांसाठी आलेल्या शासकिय मदतीचा धनादेश आमदारांच्या पीएंनी ठेवून घेतल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली आहे. त्यानंतर हे प्रकरण वाढले आहे.

नगरपालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामांमधील भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे. नगराध्यक्ष दत्ता गोर्डे एका शैक्षणिक संस्थेत कामावर न जाता फुकट पगार घेत आहेत.

- जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या अपघातात एक ठार, २० जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील गोळेगावजवळ मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास झाला.

यावल-औरंगाबाद ही बस (एमएच ४०,एन ९८१८) सिल्लोडकडे येत असतांना गोळेगावजवळील श्याम ढाब्यासमोर अचानक मोटार सायकलस्वार (एमएच २०,सीजी २७३८) रस्त्यावर आला. या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस निलगिरीच्या झाडावर आदळली. बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार किरण नागोराव मोकाशे जागीच ठार झाला. बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर पोलिस व गोळेगावच्या नागरिकांनी जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, राजूमियाँ देशमुख, पाशू देशमुख यांनी मदत केली.

परमेश्वर धोंडकर (वय ४०, रा. आडगाव), महादुसिंग बहादूर सिंग (वय २८, रा. आनाड), इक्बाल बशीर शेख (वय ५०, बसचालक, रा. यावल), मुश्ताक शेख लड्डू (वय ५८, रा भराडी), सुरैय्याबी शेख गुलाब (वय ५०, रा. सिल्लोड), गौसियाबी शेख नूर (वय ५४, रा. सिल्लोड) या जखमींवर प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. रिजवाना रफ‌िक शहा (वय २५), सिमरन रफ‌िक शहा (वय ४, रा. दोघाही नायगाव), पुनम शैलेद्र वाघ (वय३०), अक्षरा वाघ (वय ४ वर्ष रा. दोघेही लिहाखेडी), शोभा तोराराम वाघ (वय४०), गणेश तातेराव चव्हाण (वय ६, रा. दोघेही कांचनवाडी), अमित तडवी (वय २८, रा यावल वाहक), संजय दाभाडे (वय४५, रा. सिल्लोड), शरीफ शहा (वय २४, रा. नायगाव), यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात घेतली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

अपघातात मरण पावलेला तरूण किरण मोकाशे शेळ्या विकत आणण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात गेला होता. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात हबंरडा फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात सरपंचाचा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

रोजगार हमी योजनेच्या कामावरून सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. सुधाकर वाडेकर असे संबंधिताचे नाव असून ते जामवाडीचे सरपंच आहेत. याच्या निषेधार्थ पंचायत समिती, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे.

सत्ताधारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सरला वाडेकर यांचे पती व जामवाडीचे सरपंच सुधाकर वाडेकर हे मंगळवारी दुपारी आपल्या कामानिमित्त जालना पंचायत समिती कार्यालयात आले होते. रोजगार हमी योजनेच्या कामावरून आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. वादातून संतापलेल्या वाडेकर यांनी कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खुर्ची, टेबल व काचेची तोडफोड केली. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला आणि काम बंद आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती संतोष मोहिते यांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. हा पहिला प्रकार नसून यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केले असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. वाडेकर यांनी कार्यालयातून माघारी जाताना आज, बुधवारी, पुन्हा कार्यालयातील कम्प्युटर फोडण्याचीही धमकी दिल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. घटनेची माहिती 'सोशल नेटवर्किंग'द्वारे वाऱ्यासारखी पसरली. याचे पडसाद जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांबरोबरच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांतही उमटले. त्यांनीही काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अशा प्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित महिलेचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाडेकर यांनी केली आहे.

शासकीय कार्यालयात येऊन अशा प्रकारे शिवीगाळ आणि तोडफोड करणे हा अतिशय निषेधार्ह प्रकार आहे. या प्रकारामुळे कर्मचारी दहशतीखाली आहेत. देशभरातील रोहयोच्या कामाची ऑनलाइन पेमेंट १ एप्रिलपासून बंद असून शासनाकडून त्याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. तांत्रिक अडचणी समजून न घेता दहशत पसरविणे चुकीचे आहे.

-सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी,जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणीमुळे अधिकाऱ्यांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात झालेल्या कामांची तपासणी गुणवत्ता निरक्षकांकडून करण्यात येत आहेत. दोन दिवसांच्या तपासणीत पथकाला अनेक कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडत आहे.

मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, सिंचन विभागांकडून कामे करण्यात आली आहेत. या कामांची खुलताबाद तालुक्यात सोमवारपासून (६ एप्रिल) गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी करण्यात येत आहे. या पथकात गुणवत्ता निरीक्षक बी. जी. पंडित, उपअभियंता जी.व्ही. होंदरणे, विलास सोनवणे, जे. जी. कांबळे, राजू कीर्तने यांचा समावेश आहे.

या पथकाने सोमवारी भडजी येथे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या दोन रस्त्यांच्या कामांची व म्हैसमाळ येथे वनविभागाने केलेल्या सिमेंट नालाबांध कामांची पाहणी केली. दरेगाव व लोणी येथील कामांची पाहणी मंगळवारी (७ एप्रिल) करण्यात आली, तर बुधवारी (८ एप्रिल) टाकळी राजेराय, धामणगाव येथील कामाचीही पाहणी केली जाणार आहे.

या पथकाकडून तालुक्यातील २०१०-११ या कालावधीत झालेल्या कामांची तपासणी केली जात आहे. पथकाकडून चांगले काम झाल्याचे दाखवून प्रशस्तीपत्रक मिळवण्याचा खटाटोप केला जात आहे. परंतु, गुणवत्ता निरीक्षकांनी काही कामांबद्दल नाराजी व्यक्त करून विचारणा केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची धाबे दणाणले आहे.

अनेक कामांत त्रुटी

अनेक कामांमध्ये त्रुटी आढळल्याने पथकाने नाराजी व्यक्त करीत जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारल्याची माहिती मिळाली आहे. कामांचे अभिलेखे, कागदपत्रे अद्यायावत नसल्याबद्दलही उपस्थितांची चांगलीच खरडपट्टी काढली. कामाच्या गुणवत्तेचा दर्जा निकृष्ट असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो मजूर कमी कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना रोजगार हमी योजनांची कामे व मजुरांची संख्या कमी कशी झाली, अशी विचारणा राज्य सरकाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे. मराठवाड्यात एक आठवड्यात नरेगाची १३०३ कामे कमी झाली असून मजुरांच्या संख्येत २६ हजार ८०२ ने घट झाली आहे.

गेल्या आठवड्यात मराठवाड्यामध्ये ४ हजार ६१८ कामांवर तब्बल ८० हजार ९७६ मजुरांची उपस्थिती होती. मात्र एकाच आठवड्यात १३०३ कामे कमी झाली असून, त्यामुळे २६ हजार ८०२ मजूरही कमी झाले आहेत. सध्या विभागात ३,३१५ कामांवर ५४ हजार १७४ मजुरांची उपस्थिती आहे. मजूर उपस्थिती व कामांच्या संख्येत नेहमीच पिछाडीवर असलेले औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्ह्यांची परिस्थिती जैसे थे आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही मजूर संख्या कमी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ८७ कामे वाढली व ११४९ मजूर वाढले आहेत. हा एकमेव अपवाद आहे. सर्वाधिक घट नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, लातूर या जिल्ह्यांत नोंदवली गेली आहे.

रोजगार हमी योजनेत प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यातच मराठवाड्यात सध्या दुष्काळ असून शेतीत काम नाही. या परिस्थितीत मजूर संख्या वाढण्याऐवजी कमी होत असल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याबद्दल विचारणा झाल्यामुळे विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images