Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मनपासाठी मोदी करणार प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रचारासाठी चित्रपट कलाकारांना आणण्याचे नियोजन उमेदवारांनी केले आहे. तर भाजपचे उमेदवार थेट नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करणार आहेत. अर्थात, हे मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नसून विकास मोहंते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आकर्षणबिंदू ठरलेले मोहंते मनपा निवडणुकीतही मतदारांचे लक्ष वेधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व लाभलेले विकास मोहंते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजले होते. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरण्यासाठी मोहंते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपच्या उमेदवारांनी संपर्क साधल्यानंतर मोहंते यांनी प्रचाराला येण्यास होकार दिला आहे. मोदी यांच्यासारखी चेहरेपट्टी आणि दाढी असलेले मोहंते यांना भेटताना आपण मोदी यांना भेटत आहोत असा क्षणभर भास होतो. मोदी जॅकेट घातलेल्या मोहंते यांना पाहताच हमखास चाहत्यांचा गराडा पडतो. या ग्लॅमरमुळे भाजपच्या नगरसेवकांनी मोहंते यांना बोलावले आहे. वॉर्डा-वॉर्डात मोहंते यांची सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यात येणार आहे. काही उमेदवार चित्रपट कलाकारांना आणण्याच्या तयारीत असताना भाजप उमेदवारांनी वापरलेला फंडा लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोंढा नाका येथील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी अर्ध्या शहराच्या पाणीपुरवठा विस्कळित झाला. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सहा तासांत दुरुस्ती केली, पण शहरात पाणी येण्यास अडचणी आल्याने शुक्रवारीही अर्ध्या शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

गुरुवारी दुपारी मोंढा नाका परिसरातील ७५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड निखळला होता. वाहनाची वर्दळ, सततची जड वाहने व अरुंद रस्ता यामुळे व त्यातच जड वाहनाचा दणका, हादरा पाइपला बसल्यामुळे या ठिकाणी पाइपलाइनचा जोड असलेल्या ठिकाणी गळती झाली होती. कंपनीने सहा तासांत दुरुस्ती केली. पाइपलाइन फुटल्याने सिंधीकॉलनी, गांधीनगर, रोकडिया हनुमान कॉलनी, मित्रनगर, विष्णूनगर, रोजाबाग, अबू बकर मशीद, हिनानगर, रशीदपुरा, शताब्दी नगर, गणेश कॉलनी, घाटी परिसर, आरिफ कॉलनी अंगुरी बाग, कैसर कॉलनी, शहा बाजार, नवाबपुरा लोटाकारंजा, हिलाल कॉलनी, हर्ष नगर, मंजुरपूरा, भवानी नगर, आलमगीर कॉलनी, जिन्सी (संजयनगर) आदी भागात चार ते पाच तास उशिराने पाणीपुरवठा झाला. दरम्यान याचा फटका शुक्रवारीही बसणार आहे. उद्याही पाच तास उशिराने पाणीपुरवठा होईल, असे कंपनीने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गफ्फार कादरी यांच्या गाडीवर हल्ला

$
0
0

औरंगाबाद - एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांच्या गाडीवर गुरुवारी (९ एप्रिल) सायंकाळी हल्ला झाला. महापालिकेसाठी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराजांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.

संजयनगर येथील एमआयएमच्या अधिकृत उमेदवार शेख समिना इलियास यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी डॉ. कादरी गेले होते. कार्यालयाचे उदघाटन करून येताना, त्यांना नाराजांनी घेराव घातला. पालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याबाबत विचारणा केली. या कार्यकर्त्यांमधून बाहेर पडण्यासाठी डॉ. कादरी आपल्या गाडीत बसले. गाडी बाहेर पडत असताना, त्यांच्या गाडीवर काही नाराज कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्याची माहिती डॉ. गफ्फार कादरी यांनी दिली. दरम्यान, घटनेनंतर जमावाने जिन्सी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी परिस्थिती
नियंत्रणात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराची व्यूहरचना ठरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने चार स्तरांत प्रचार यंत्रणा तयार करण्यात आली आहे. प्रचाराच्या चौथ्या टप्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. पालकमंत्री रामदास कदम तब्बल आठ दिवस शहरात तळ ठोकून बसणार आहेत.

शिवसेनेची निवडणूक यंत्रणा राबवण्याची प्रमुख जबाबदारी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यावर आहे. या दोघांनी प्रचाराचे बारकाईने नियोजन केले आहे. आता प्रचाराचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात प्रत्येक वॉर्डात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या बैठका घेण्यावर भर दिला जात आहे. एका दिवसातून २० ते २२ वॉर्डांत बैठका घेतल्या जात आहेत. मतदारांशी थेट संपर्क साधावा, शिवसेनेच्या नगरसेवकाने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे मतदारांसमोर मांडावीत, अशा सूचना या बैठकांत देण्यात येत आहेत. या बैठकांसाठी दानवे, जैस्वाल यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, संपर्कनेते विनोद घोसाळकर, प्रभारी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे सक्रिय झाले आहेत. येत्या दोन दिवसांत प्रचाराचा पहिला टप्पा संपेल, असे मानले जात आहे. त्यानंतर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्‍‍‍घाटन आणि प्रचार फेऱ्यांवर भर दिला जाणार आहे. प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात १५ एप्रिलच्या सुमारास शिवसेनेचे मुंबईतील काही नेते प्रचारासाठी शहरात दाखल होणार आहेत. शहरातील विविध वॉर्डांत आणि प्रमुख चौकात त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे.

पदाधिकारी येणार

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार; दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांचा गट करून त्यांना प्रचारासाठी वॉर्ड वाटून दिले जाणार आहेत. या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची तांत्रिक बाजू सांभाळावी, असे त्यांना सांगण्यात येणार आहे.

१८ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची सभा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पालकमंत्री रामदास कदम १२ एप्रिल रोजी शहरात येणार आहेत. त्यांचा मुक्काम २० एप्रिलपर्यंत राहणार आहे. या काळात त्यांच्या सभांचे शहराच्या विविध भागात आयोजन केले जाणार आहे. १८ एप्रिल रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारीही आतापासूनच केली जात आहे.

काँग्रेसची सभा

महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी (१२ एप्रिल) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या
मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेत जोरदार शक्त‌िप्रदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIMचे डॅमेज कंट्रोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएम उमेदवारांच्या यादीमधील झालेल्या गोंधळानंतर नाराज झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. त्यांना समजविण्यासाठी स्थानिक आणि पक्षाच्या पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. एमआयएमने 'डॅमेज कंट्रोल'ची जबाबदारी खास नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे. बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न हे नेते करीत आहेत.

महापालिका निवडणुकीत म‌जलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून पाचशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरून मुलाखती दिल्या होत्या. एमआयएमला मिळालेल्या प्रतिसादामुळे उमेदवारी वाटपात गोंधळ होणार असल्याचे चित्र होते. एमआयएमने पहिली यादी जाहीर केल्यानंतर समता नगर, आरेफ कॉलनी, कबाडीपुरा बुढीलेन, गणेश कॉलनी या भागांतील इच्छुकांनी तीव्र आक्षेप घेतला. काही इच्छुकांनी थेट पक्षाच्या निवड समितीवर आरोप केले होते. कार्यकर्त्यांच्या या संतापानंतर दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात रोझा बाग, कैसर कॉलनी, शरीफ कॉलनी, इंदिरानगर खास गेट या वॉर्डांतील उमेदवार बदलण्यात आले. यामुळे पहिल्या यादीतील घोषीत उमेदवार आणि दुसऱ्या यादीतील उमेदवार आमने-सामने आले होते. या प्रकारामुळे पक्षाबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.

एमआयएमच्या विरोधात असलेली नाराजी दूर करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी; तसेच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट हैदराबादशी संपर्क करून आपली नाराजी व्यक्त केली. हैदराबाद येथील पक्षश्रेष्ठींनी यातील काही कार्यकर्त्यांनी नाराजी दूर करून 'पॅचअप'चा प्रयत्न केला आहे. त्यानंतर काही इच्छुकांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगून करून आपण पक्षासोबत असल्याचे जाहीर केले. काहींची नाराजी दूर झालेली नाही. त्यांची समजूत समज काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे.

पक्षातील नाराजांबाबत आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही जणांना उमेदवारी देणे शक्य झाले नाही, याचे मलाही दुखः आहे. मी त्यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित इच्छुकांचीही नाराजी दूर करण्याचा पक्ष आणि माझ्याकडून प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय-लेक आमनेसामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजकारणात नाते संबंध बाजूला पडतात. याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीत येतो आहे. माजी नगरसेवक कैसर खान यांच्या कुटुंबातील आई व मुलगी या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या लढतीत समोरासमोर उभ्या आहेत. वॉर्ड क्रमांक २१ मधील ही लढत सर्वांचे लक्ष वेधणारी ठरत आहे.

राजकारणात कोणीच कोणाचा नसतो असे म्हणतात. काहीवेळा नातेसंबधही बाजूला पडतात. त्यामुळेच एकाच कुटुंबातील भाऊ-भाऊ, बहीण-बहीण निवडणूक रिंगणात असल्याचे अनेक निवडणुकीत समोर येते. असाच प्रकार पालिका निवडणुकीतही पहायला मिळतो आहे. माजी नगरसेवक कैसर खान यांच्या कुटुंबातील तिघे निवडणूक रिंगणात आहेत. कैसर खान नबावपुरा वार्डातून उभे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी व मुलगी समोरासमोर एकाच वार्डातून उभे आहेत. प्रभाग क्रमांक २१ मध्ये त्यांच्या पत्नी परवीन कैसर खान व मुलगी खान राना कैसर या निवडणूक रिंगणात आहेत.

दोघींनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. माय, लेक समोरासमोर उभे असल्याने त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. नगरसेवक म्हणून पालिकेत सत्ता गाजविण्यासाठी अन् सत्ता आपल्याच कुटुंबात राहावी यासाठीही असा प्रयत्न होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदासीनतेचा गैरफायदा

$
0
0

धनंजय लांबे

'जया अंगी नगरसेवकपण तया यातना कठीण' याची प्रचीती देणारे असंख्य किस्से गेल्या पाच वर्षांत घडले. नगरसेवकांनी आपले दु:ख वेगवेगळ्या व्यासपीठांवर बोलून दाखविले, तरीही निवडणूक येताच नगरसेवक होण्याचा हव्यास कोणालाही सोडवत नाही. या निवडणुकीतही दोनेक हजार लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांचे उद्देश काय आहेत, हे मतदारांपासूनही लपून राहिलेले नाही. यापैकी बरीच मंडळी 'अर्थपूर्ण' माघार घेतील, तर काही लोक केवळ आपल्या नावाची चर्चा व्हावी म्हणून माघार घेणार नाहीत. नावासाठी लोक बरंच काही करतात, पण निवडणूक हा चर्चेत येण्याचा, कमी खर्चाचा राजमार्ग आहे.

आपल्या महापालिकेची तिजोरी कायम रिकामी. त्यामुळे विकासकामे मिळवण्यासाठी नगरसेवकांची स्पर्धा लागते. अनेकदा केलेल्या कामांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून कंत्राटदार कामे अपूर्ण ठेवतात आणि नागरिक नगरसेवकांनाच दोष देतात. सकाळी वेळेवर पाणी आले नाही की नगरसेवकाचा फोन खणखणतोच, पण कचरागाडी आली नाही किंवा संध्याकाळी रस्त्यावरील दिवे लागले नाहीत तरी लोकांना नगरसेवकच आठवतो. मुळात इतकी कटकट असूनही निवडणुकीत हे पद मिळविण्यासाठी चढाओढ चालते. यामागे नक्कीच काहीतरी गूढ असावे. पक्षाचे तिकीट मिळविण्याचे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्येक मतदाराचे घर गाठून हात जोडायचे. त्याने गेल्या वेळी मत दिलेले नाही हे ठाऊक असताना 'तुमच्यामुळेच मी निवडून आलो, यावेळीही आशीर्वाद द्या,' अशी आर्जवं करायची, उधार-पाधार करून, कर्ज काढून किंवा एखादा प्लॉट विकून काही लाख रुपये उभे करायचे आणि एवढे सगळे करूनही निवडणुकीत पराभव पत्कराला लागला की सर्वकाही विसरून पुढील निवडणुकीची तयारी करायची...

नगरसेवकांचे हे शल्य असले, तरी निवडणुकीत रंग भरतोच. याची कारणे अनेक आहेत. शहरातील बहुसंख्य नागरिक कामकरी आहेत. सकाळी कामावर किंवा व्यवसायावर जाऊन संध्याकाळी घरी परतणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. जे कामकरी नाहीत, त्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी आहेत. ते आपापल्या अभ्यासात, मौजमजेत मग्न, तर गृहिणीदेखील दिवसभर आपल्या घरकामात रमलेल्या असतात. त्यामुळे सहसा कोणी नगरसेवकाची आठवण काढत नाही. वॉर्डाच्या ज्या भागातून कायम तक्रारी येतात, तेथील व्यवस्था चोख ठेवली तर फारसा त्रास होत नाही, याची कल्पना नव्या नगरसेवकाला वर्षभरातच येते. एखादे काम होतच नसेल तर त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडून तो मोकळा होतो. लोक खूपच तक्रारी करत असतील तर फोन बंद करून ठेवणारे किंवा आपला फोन एखाद्या आज्ञाधारक कार्यकर्त्याच्या हाती सोपवणारे नगरसेवक गेल्या महापालिकेत तरी बरेच होते. पाणी, स्वच्छता, वीज, रस्ते या क्रमाने तक्रारींचे प्रमाण असते. उच्चशिक्षित मतदार एखाद्या कामासाठी एक-दोन वेळा फोन करतात आणि ते होत नसेल तर पिच्छा सोडून देतात. पाणी वगळता एखाद्या विकासप्रश्नावर नगरसेवकाला नागरिकांनी घेराव घातल्याची किती उदाहरणे गेल्या २५ वर्षांत सापडतात?

आपण ज्या नगरसेवकाला निवडून दिले, त्याने आपल्या वॉर्डात नागरी सुविधा पालिकेच्या खर्चाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याचेच भान बहुसंख्य मतदारांना नसते. पाच वर्षांतून एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण झाले, अशीच बहुतेकांची धारणा आहे. त्यांना नगरसेवकाचे घर किंवा फोन नंबरही ठाऊक नसतो. जे वॉर्डाच्या विकासाबद्दल जागरुक आहेत, ते नगरसेवकाला क्षणाचीही उसंत घेऊ देत नाहीत. नवनवीन कल्पना सांगून ते भंडावून सोडतात, पण असे वॉर्ड अत्यल्प आहेत. तेथे एकही समस्या शोधून सापडत नाही.

शहरातील काही वॉर्डांमधील निवडक वसाहती अशा आहेत, जेथे किमान तीन तास पाणी सोडले जाते. रस्त्यावरील एकही दिवा बंद दिसत नाही आणि कचरा नियमितपणे उचलला जातो. नगरसेवकाच्या कार्यकुशलतेचा हा परिणाम आहे. बहुतेक वॉर्ड असे आहेत, जेथील मतदारांना नगरसेवक निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीतच दिसतो. अर्थात, नगरसेवकांकडून अपेक्षा आहेत आणि शहराबद्दल आस्था आहे म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडतात. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न क्वचितच काही वॉर्डांमध्ये दिसून येतो. एरवी महापालिकेत निवडणूकवीरांचेच प्रमाण मोठे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र उमेदवार कोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या १३ उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी न्या. सुनील पी. देशमुख यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

संजय गाडेकर वाॅर्ड क्रमांक ९४, नीता भालेराव वाॅर्ड ३७, शेख सुलताना कय्युम ५८, आत्माराम ठुबे ८२, दीपाली करोडे ८१, कैलास राऊत ८८, बाळासाहेब पुंडे ८८, प्रकाश नाडे ११३, छाया म्हस्के ९०, शीला मगरे ७४, प्रकाश प्रधान १४,भारत दाभाडे ८७ व अवतारसिंग रंधवा १४ या उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले. या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावर सही केलेली नाही. शपथपत्राची नक्कल जोडली. गुन्हे विषयक रकान्यात निरंक लिहिले नाही. सूचक, अनुमोदकांच्या सह्या नाहीत. अपत्यांसंदर्भात शपथपत्र दाखल केले नाही आदी विविध कारणांमुळे या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हक्कावर गदा आली आहे, असा आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला आहे.

अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी दुपारी तीनपर्यंत आहे. शिवसेना, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी मोडून काढण्यासाठी व्यूहरचना निश्चित केली आहे. या व्यूहरचनेची उद्या परीक्षा होईल, असे मानले जात आहे. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ST बसला लक्झरी लूक

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

एसटीच्या गाड्यांचा चेहरा-मोहरा आता लवकरच बदलणार आहे. नव्या बसला लक्झरी गाड्यांचा 'लूक' देण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसप्रमाणेच या बसची चिकलठाण्यातील कार्यशाळेत बांधणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात वातानुकूलित, डिलक्स आणि नॉन डिलक्स या प्रकारातील सुमारे ५० ते ६० बस तयार करण्यात येत आहेत.

देशात सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसची बांधणी एकाच प्रकारात असावी, यासाठी नवीन बस कोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दापोली कार्यशाळेत 'प्रोटो टाइप' (मॉडेल) बस तयार करण्यात आली. या गाडीची 'एआरआय' (आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेकडून तपासणी करण्यात आली आहे. नव्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

चिकलठाणा एसटी कार्यशाळेत नवीन बस बांधणी सुरू करण्यात आली आहे. सध्या चिकलठाणा कार्यशाळेत डिलक्स आणि नॉन डिलक्स या बसची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी नॉन डिलक्स बससाठी २२ चेसीस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिलक्स प्रकारातील १६ बसची बांधणी केली जाणार आहे. या सर्व बसची बांधणी येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती कार्यशाळेचे व्यवस्थापक जे. पी. चव्हाण यांनी दिली.

अशी असेल नवी बस

ट्रॅव्हल्स गाड्याप्रमाणे एसटीच्या बसची उंची वाढविण्यात आली आहे.

बसच्या खिडक्याही मोठ्या केल्या जाणार आहेत.

नव्या बसमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असेल.

अल्युमिनियमऐवजी लोखंडी पोल लावण्यात येणार आहेत.

नॉन डिलक्स बसची आसनक्षमता ही '४४ अधिक १' असेल.

बसच्या पायऱ्यांची जागा थोडी वाढविण्यात आली आहे.

डिलक्स बसमध्ये पुश बॅक सीट बसविण्याचा विचार सुरू आहे.

डिलक्स बसची आसन क्षमता 'नॉन डिलक्स'च्या तुलनेत कमी असेल.

जालन्याला वादळी पावसाचा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मोसमीपूर्व पावसाने अक्षरक्षः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी झाडे, जाहिरात फलके व विजेचे खांब कोसळून नुकसान झाले, तर बदनापूर तालुक्यातील घोटण शिवारात वीज कोसळून तिघे गंभीर भाजले आहेत. जखमींवर त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालन्यात दुपारी तीननंतर शहरातील वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात आभाळ आले. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरवासीयांची मोठी तारांबळ उडाली. वाहनचालक व पादचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाउस झाला.

बदनापूर तालुक्यातील घोटण येथील जगताप यांच्या शेतात वीज कोसळली. या घटनेत तीन जण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वादळी पावसामुळे बस स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवरील जाहिरातफलक जमीनदोस्त झाले. या घटनेत एका रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानि झाली नाही. गांधीचमन भागातील एक वृक्ष वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुमारे वीसहून अधिक झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणची छोटी-मोठी झाडे वादळी वाऱ्याने उखडली गेली. श्रीकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या कृष्णा पाखरे यांच्या घराचे पत्रे उडून गेले व भिंत कोसळल्याने त्यांचा संसार अक्षरक्षः उघड्यावर पडला.

जाफराबाद तालुक्यात वादळी वारे जास्त होते. भोकरदन तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त होते. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे तर मंठा आणि परतूर तालुक्यात आभाळ भरून आले वीणा वीजांचा कडकडाट होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर, आयुक्तांविरोधात पोलिसांत तक्रार दा‍खल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीत सुरू असताना जागेवर बसून राहून महापौर अख्तर शेख आणि आयुक्त सुधाकर तेलंग यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

४ एप्रिल रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रचंड गोंधळ झाला. हा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. राष्ट्रगीत सुरु झाले तरीही महापौर अख्तर शेख आणि मनपा आयुक्त सुधाकर तेलंग हे बसून होते, अशी तक्रार शिवसेनेचे नगरसेवक गोरोबा गाडेकर, रवी सुडे आणि सुनीता चाळक यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मनियार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या सभेदरम्यान नेमके काय झाले हे पहावे लागेल. त्या सभेच्या कामकाजाचे चित्रीकरण असलेली सीडी उपलब्ध करुन ती पाहिल्यानंतर नेमकी काय घटना घडली हे लक्षात येईल. त्यानंतरच कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवारी मत्स्योदरी महाविद्यालयात एम. ए. इंग्रजीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. हा प्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने तात्काळ ईमेलद्वारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविली. त्याच्या झेरॉक्स काढून विदयार्थ्यांना देण्यात आल्या. याप्रकारामुळे परीक्षार्थीना दीड तास ताटकळत बसावे लागले.

येथील मत्स्योदरी महाविदयालयाच्या परीक्षा केद्रावर शुक्रवार एम. ए. इंग्रजी प्रथम वर्षाचा लिट्रेचर इन इंग्लिश (१७९८-१९१४) पेपर-३ याविषयाची परीक्षा होती. वेळेनुसार सकाळी नऊ वाजता २३ परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. गार्डिंगवर असलेल्या प्राध्यापकाने सुरुवातीला विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या. परीक्षार्थींनीही उत्तर पत्रिकेवर परीक्षा क्रमांक व इतर माहिती भरली. त्यांनतर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यास सुरवात केली. दरम्यान, प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण, त्यांना जी प्रश्नपत्रीका देण्यात आली होती. ती जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका होती. काही विद्यार्थ्यांनी ता‌त्काळ हा प्रकार गार्डिंगवर असलेल्या प्राध्यपकाच्या निदर्शनास आणून दिला. हा प्रकार परीक्षा नियंत्रक प्रा. शिवकुमार सोळूंके आणि प्राचार्य डॉ. आर. जी. गायकवाड यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी विद्यापीठाला दूरध्वनीद्वावारे या प्रकाराची माहिती दिली.

याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली आणि विद्यापीठाने आपली चूक मान्य करीत तडकाफडकी ईमेलदवारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविली. त्यानंतर झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर परीक्षेला सुरवात झाली. त्यानंतर प्रशासनासह परीक्षार्थींनी सुटकेचा निश्वास सोडला. ऑनलाइन पद्धतीने ईमेलद्वारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रीका मिळून त्याच्या झेरॉक्स काढण्याच्या या संपूर्ण प्रकियेला तब्बल दीड तास लागल्याने परीक्षार्थी तोपर्यंत ताटकळत बसले होते. दीड तास विलंब लागल्याने परीक्षार्थींचे पुरते नियोजन विस्कळीत झाले. विद्यार्थीनी वेळेवर घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतित झाल्याचे परीक्षार्थींनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

विद्यापीठात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पेपर सेटरने प्रश्नपत्रिकेवर नवीन अभ्यासक्रम किंवा जुना अभ्यासक्रम असा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे असते. मात्र, प्रश्नपत्रिकेवर अभ्यासक्रमाबाबतची माहिती टाकण्यात आली नव्हती. पेपर सेटरच्या या दुर्लक्षामुळेच हा सर्व गोंधळ उडाला. परंतु, विद्यापीठामार्फत तात्काळ ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळले.

- प्रा. शिवकुमार सोळुंके, परीक्षा नियंत्रक, मत्स्योदरी महाविद्यालय, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडोदचाथ्यातील आकाशची ‘भरारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

ग्रामीण भागातील विद्यार्थी अलिकडच्या काळात विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील आकाश गणपत साळवे या दुर्बल घटकातील तरुणाने जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर पायलट होण्याची पात्रता मिळविली आहे. सिल्लोड तालुक्यातील दुर्गम भागात वडोदचाथा हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाला लागून असलेल्या वडाळा येथे आकाश याने पाचवीपर्यंत व त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण सिल्लोड येथील शिवाजी हायस्कूलमध्ये पूर्ण केले. लहानपणापासून विमानाचे आकर्षण असलेल्या आकाशने वैमानिक होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यामुळे शिक्षक असलेले वडील गणपत साळवे यांनी कल लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डिफेन्स करीयर अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठविले.

आकाशनेही आवडीचे क्षेत्र मिळाल्याने अभ्यास सोडला नाही. अकादमीमधील इंडियन एअरफोर्समधील सोहन लांडगे यांच्या भाषणाने प्रभावित झाल्याचे तो सांगतो. इंदिरा गांधी उड्डयन अकादमी रायबरेलीच्या परीक्षेत आकाशने अनुसूचित जमाती प्रवर्गातून देशातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर भारतीय वैमानिक प्रशिक्षण मंत्रालयाच्या खाजगी कमर्शीयल पायलटचा २०० तासांचा कोर्स पूर्ण केला आहे. नाईट फ्लाईंगचे दहा तासाचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पहिल्या उड्डाणाचा अनुभव रोमांचकारी असल्याचे त्याने सांगितले. विमानाने टेकऑफ करताच माझे आकाशाशी नाते जुळल्याचे तो म्हणाला. पहिले उड्डाण गोंदिया ते बिलालपूर, रायपूर, नागपूर व पुन्हा गोंदिया, असे होते. यावेळी तीन तास ५० मिनिटे विमान चालवले. नागपूरसारख्या गजबजलेल्या विमानतळावर लँडिंगचा अनुभव आनंददायी असल्याचे त्याने सांगितले.

सैन्य दलात जाणार

आकाश सध्या एनडीएची तयारी करीत असून पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी जिद्द सोडलेली नाही. भारतीय सैन्य दलात प्रवेश करून देशसेवा करायची उर्मी तो बाळगून आहे. त्याच्या वडिलांनीही मोठ्या जबाबदाऱ्या असताना प्रपंच भागवित कर्ज काढून आकाशचे शिक्षण सुरू ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालविवाह पोलिस, प्रशासनाने रोखला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील पिरोळा येथे मांडवात जाऊन तहसीलदार व पोलिसांनी शुक्रवारी दुपारी (१० एप्रिल) एका अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला. पोलिस लग्न मंडपातच पोहोचल्याने वऱ्हाडींना घरी परतावे लागले.

कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथील एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणांचा विवाह पिरोळा येथील अल्पवयीन मुलीसोबत शुक्रवारी होत होता. मुलीचे वय कमी असल्याने अज्ञात व्यक्तिने तहसीलदार राहुल गायकवाड व ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे यांना विवाहाची माहिती दिली. तहसीलदार गायकवाड, नायब तहसीलदार पी. जे. सोनवणे, पोलिस कर्मचारी ठाकूर, पाईकराव, तलाठी आदी मंडळी लवाजाम्यासह लग्न मंडपात दाखल झाले. त्याच्या काही वेळानंतर विवाह होणार असल्याने तो रोखला गेला. मुलीच्या वयाची खातरजामा केली असता मुलीचे वय १७ वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. तिला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यत लग्न लाऊ नये, अशा सक्त सूचना वधु-वराकडील मंडळींना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ग्रामस्थाची बैठक घेऊन बालविवाह कायद्याची माहिती दिली. विवाह थांबविण्यात आल्याने दोन्ही बाजुंच्या मंडळींसह गावकऱ्यांची त्रेधातीरपट उडाली. वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांना पाहून काढता पाय घेतला. पोलिसांनी तालुक्यातील दोन बालविवाह एकाच आठवड्यात रोखले आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील राजकीय पुढारी आदींनी बालविवाह रोखण्यासाठी सावध राहवे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

गेल्या एक वर्षात तालुक्यातील २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत प्राप्त झाली आहे, तर एका शेतकऱ्याची आत्महत्या या महिन्यातील आहे. इतर आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळाली नाही.

गेल्या तीन वर्षातील दोन वर्षे दुष्काळी असल्याने सिल्लोड तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहेत. मागील वर्षी पाऊस चांगला झाला तरी गारपिटीमुळे हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नापिकी, सोसायट्यांचे देणे, बँकाचे कर्ज, निसर्गाचा लहरीपणा यामुळे एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी २२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. एका शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी फेरनिर्णयाची चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या निकषात बसत नसल्याने सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळू शकली नसल्याची माहिती त्यांन दिली.

अंभई येथील गणेश रहाटे भाड्याच्या घरात राहत होते, उंडणगाव येथील काशीनाथ वाघ यांना स्वतःचे घर नव्हते. शिवना येथील भास्कर काळे यांचीही परिस्थिती गंभीर होती, या सारखेच सर्वच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची स्थिती नाजूक होती. त्यामुळे तातडीने मदत केली. शेतकऱ्यांनी कुटुंबाचा विचार करून आत्महत्येचा मार्ग निवडू नये, असे आवाहन तहसीदारांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीउपशामुळे तीव्र टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील महत्वाच्या व मोठ्या प्रकल्पातून थेट पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाकडून २८ फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी शहरासह तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

कन्नड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पात ११.७६ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात सुमारे १.८० द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. अंबाडी प्रकल्पातून बारामती अॅग्रो या खासगी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना-टाकळी प्रकल्पात १०.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणात ४ द.ल.घ.मी. जिवंत साठा आहे. या धरणातून उजवा कालवा परिसर व जुने जैतापूर गावालगत मोठ्या प्रमाणावर बेसुमार पाणी उपसा होत आहे. नागद गावाजवळील गडदगड धरणात ४९.६० टक्के, पूर्णा-नेवपूर प्रकल्पात ३४ टक्के, अंजना-पळशी प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील लघू प्रकल्पामध्ये निंभोरा, गणेशपूर, वाघदरा, वडोद, आंबा या प्रकल्पांमध्ये जिवंत जलसाठा आहे. वडनेर, सिरसगाव, चापानेर, सातकुंड, कुंजखेडा, रिठ्ठी-मोहर्डा या लघुतलावात मृतसाठा आहे. बनशेंद्रा, शिवराई, औराळा, मुंगसापूर, माटेगाव, देभेगाव हे लघु तलाव कोरडे पडले आहेत. टंचाईग्रस्त जेहूर व देवगाव गटात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या परिसरातील प्रकल्पातून शेती सिंचनासाठी थेट पाणीउपसा जोरात चालू आहे. उन्हाची तीव्रता व पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जलसाठ्यातील पाणी पातळी घटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images