Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एमआयएमचा ‘पतंग’ कटला!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसल्याने एमआयएमला आमदारांच्याच वॉर्डातून पंतग चिन्ह गमाविण्याची वेळ एमआयएमवर आली. भडकल गेट वॉर्डातून पंतग चिन्हासाठी एमआयएम सह रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मागणी केल्याने चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. यात चिठ्ठीत रिपब्लिकन पक्षाच्या उमदेवाराला पतंग चिन्ह मिळाले.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपाच्या दिवशी आमदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या भडकल गेट वॉर्डातून एमआयएमने गंगाधर ढगे यांना उमेदवार आहेत. एमआयएम उमेदवारासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या प्रशांत प्रितम शेगावकर यांनीही पंतग या निवडणूक चिन्हावर दावा दाखल केला. पंतग हे एमआयएमचे अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण गंगाधर ढगे यांनी दिले, मात्र हा पक्ष राज्यात अधिकृत नसल्याने निवडणूक चिन्हावर प्रशांत शेगावकर यांनी‌ही आपला दावा दाखल केला. त्यामुळे चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. चिठ्ठी काढल्यानंतर पतंग चिन्ह शेगावकर यांना मिळाले. यामुळे आमदारांच्याच वॉर्डातून पतंग चिन्ह शिवाय एमआयएम उमेदवाराला निवडणूक लढवावी लागणार आहे.

याशिवाय म्हसोबा नगर (वॉर्ड क्रमांक २) येथेही एमआयएम पक्षाने कांबळे पद्माकर शामराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तेथे पतंग चिन्हावर आंबेडकर नॅशलिस्ट पक्षाचे वसंत बनसोडे यांनीही दावा केला होता. तेथे चिठ्ठी काढण्यात आली. या वॉर्डातही एमआयएमच्या उमेदवाराला पतंग हे चिन्ह मिळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयशरच्या धडकेने युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

भरधाव वेगाने निघालेल्या आयशरने मोटार सायकलला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास श्रीक्षेत्र राजुर येथील पेट्रोल पंपासमोर घडली. मंजाराम दत्तू हिवाळे (वय ३७, मानदेऊळगांव) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. श्रीक्षेत्रराजुरकडून जालन्याकडे बेकरीचा माल घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एम.पी. ०९ जी.एफ. ८५४६) व जालन्याहून राजुरकडे येणाऱ्या मोटारसायकलीस (एम. एच. २१ ए. के. ७६८४) समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील मंजाराम दहिवाळे यांच्या डोक्याला,पायाला मार लागल्याने ते जागीच मरण पावले. याप्रकरणी बाबासाहेब दत्तू हिवाळे यांनी दिलेल्या फियार्दीवरून ट्रक चालकाविरोधात राजुर पोलिस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी विक्रेत्याविरोधात कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहर व परिसरात अप्रमाणित व बेकायदेशीररित्या पाणी‌ विक्री करणाऱ्या दहा विक्रेत्यांना उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे.

शहरात अप्रमाणित (सब स्टॅण्डर्ड) पाणी विकून लाखो रूपयांची माया कमविणाऱ्यांचा गोरखधंदा गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. सर्व कायदे व नियम पायदळी उडवत हे विक्रेते पाणी विक्रीतून लाखो रुपयांची गोळा करीत आहेत. या विक्रेत्यांविरोधात कारवाईचे नाटक करण्यापलीकडे येथील अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी काहीच करत नसल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वताच सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह या पाणी विक्रेत्यांच्या कार्यस्थळी भेटी दिल्या व पंचनामे केले.

पत्र्याचे रोड वापरणे, अस्वच्छता, आयएसआय परवाना नसणे, प्रयोगशाळा नसणे, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसणे अशा अनेक त्रुटी या पंचनाम्याच्या वेळी आढळून आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या आदेशावरून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १३३ नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी पाणी विक्री संबंधी परवाना नसलेल्या दहा विक्रेत्यांना नोटीस बजावल्या आहेत.

मानवी आरोग्यास हानीकारक द्रव्य अथवा पदार्थ विक्री केल्याबाबतचा जाब नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे. उस्मानाबाद शहरातील दहा विक्रेत्यांकडे महत्त्वाचा आयएसआय परवाना, अद्ययावत प्रयोगशाळा व अन्य सुविधा नसल्याने त्यांच्यावरील कारवाई अटळ असल्याचे मानले जाते.

अन्न व औषध प्रशासनाची कुचकामी कारवाई

येथील अन्न व औषध प्रशासनाने उस्मानाबाद शहरातील या पाणी विक्रेत्यांच्या कारखान्यावर यापूर्वी दोन वेळा धाडी टाकून त्यांचे हे प्रकल्प सील करण्याचे नाटक केले. या पाणी विक्रेत्यांकडून विकण्यात येणाऱ्या ड्रगवर (प्लास्ट‌िक टाकी) पिण्याचे पाणी असा उल्लेख नसल्यामुळे आम्ही त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकत नाही. असा पवित्रा अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात तांत्रिक अडचणी होत्या तर धाडी टाकून कारवाई करण्याची दिशाभूल या विभागाकडून का केली जात होती, असाही प्रश्न यानि‌मित्ताने आता चर्चिला जावू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. ढोबळे राष्ट्रवादी सोडण्याच्या मार्गावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सध्या अन्याय सुरू आहे. त्यामुळे आपणास आधाराची नितांत गरज आहे. लवकरच राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून पुढील भूमिका घोषित करणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना दिली.

आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वाघाली (जि. सोलापूर) येथील महात्मा फुले सूतगिरणी ही दलित चळवळीचे शक्तीस्थळ आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून राज्यातील दलितांना गरजेनुसार यथायोग्य मदत केली जाते. त्यांना आधार दिला जातो. जिथे केरसुणी तयार होत होती तेथे सध्या सूत तयार होते, अशी प्रगतीकडे वाटचाल करणारी ही सूतगिरणी आहे. परंतु, जिल्ह्यातील काही नेतेमंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वेसर्वा असलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विरोधात कारवाया करीत आहेत. एवढेच नव्हे तर दलित चळवळ संपविण्याच्या मार्गावर त्यातूनच नुकत्याच झालेल्या वाघोली येथील सूतगिरणीच्या निवडणुकीत काही गैरप्रकार झाले. मात्र, या सूतगिरणीत आपण आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले, असल्याचेही ढोबळे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळीमध्ये काही संघर्षवाद सुरू आहे. मला हा विषय वाढवायचा नाही. मी सध्या पडक्या घरात राहत आहे. पक्षाने आपणाकडे दुर्लक्ष केले म्हणून मला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही, असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील भाजपमध्ये नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'तान्हं गेल राना, अन् पाठीला फुटला पान्हा' अशीच काहीशी अवस्था जालन्यातील भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांची झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्ष नेत्यांची साथ संगत देऊन आणि निवडणुकीत राबणारी मंडळी अडगळीत, अन् हौशे, गवशे, नवशे, निवडणुकीत चक्क विरोधात काम केलेल्यांचीच मोठी चलती सुरू झाली असल्याने पक्षाच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाजपची ग्रंथालय आघाडी जाहीर करण्यासाठी नुकतीच एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधित इच्छूक कार्यकर्त्याने चक्क प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे डायरेक्ट ग्रंथालय आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचे पत्र कुठून तरी मिळवले. समोर पत्र हातात घेऊन त्यांनी बैठक सुरू केली. अन्य पदाधिकाऱ्यांना पदाचे वाटप करण्याची जोरजोरात चर्चा सुरू झाली. सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळाने ठरल्या आणि मग याची बातमी काढण्यात आली.

दरम्यान, कुठेतरी माशी शिंकली अन् चक्क प्रेस नोट रद्द करण्यात आली. त्यांनतर या सर्वच प्रकारावर पुन्हा वेगळीच चर्चा सुरू झाली. ग्रंथालयात आघाडीवर सगळे नवखे-नवखे, नुकत्याच झालेल्या विधानसभा अन् त्या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचार करणारे? भाजपच्या ग्रंथालय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ? आणि मग सगळी एक एक माहिती पुढे आली आणि घरचे सगळे लोक अडगळीच्या खोल्यात डांबून बाहेरच्यांचीच कशी चांदी सुरू झाली आहे, याच्या चर्चा भाजप कार्यालयात रंगल्या. मंडळींना ग्रंथालय आघाडीच्या अजेंड्यावर तूर्त ब्रेक घेण्यासाठी आदेश दिले आहेत.

केंद्रात सत्ता आली, राज्यात सत्तेवर आले अन् दोन अधिवेशनाचे सूप वाजून गेले तरी कोणत्याही कमिट्यांवरील नियुक्त्यांचे नाव कुणीही काढत नाही. चर्चेत दुसरीच दूर-दूरची मंडळी आघाडीवर आहेत. त्यामुळे पायाभूत कार्यकर्ते हिरमुसले चेहरे घेऊन फिरत आहेत. कमिट्यांवरील नियुक्त्या करतांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शिफारशींची गरज महत्त्वाची असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दानवे यांच्या सभोवताली कमिट्यांवरील इच्छूक कार्यकर्त्यांची जास्त गर्दी जमते. सरकारी अधिकारी अन प्रशासकीय कामासाठी पालकमंत्र्याच्याच दरबारात आल्याशिवाय काहीच जमत नाही. त्यामुळे पालकमंत्री लोणीकर यांना वेगळ्याच मंडळींनी एकत्र येऊन घेराव घातला असल्याचे जालना जिल्ह्यातील वातावरण आहे.

गड राखण्याचे प्रयत्न

शिवसेनेचे आमदार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यात खोतकर यांच्या मंत्रीमंडळात जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येते. तर दुसरीकडे माजीमंत्री आमदार राजेश टोपे हे घनसावंगीचा किल्ला अजिंक्य ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाटोळे करणाऱ्यांच्या हाती बँक देऊ नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक लागली आहे. त्या बँकेवर अनेकांचे लक्ष्य आहे. ज्यांनी या बँकेचे वाटोळे करण्याचे पाप केले. त्यांच्या हाती बँक देऊ नका असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खसदार आशोक चव्हाण यांनी केले.

देगलूर तालुक्यातील नंदुर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर हे होते. पुढे बोलतांना खासदार चव्हाण म्हणाले, 'काँग्रेसच्या कालावधीत १६ टक्के मराठा आरक्षण आणि ५ टक्के मुस्लीम समाजांना आरक्षण जाहीर केले. परंतु भाजप सरकारने हे आरक्षण बंद केले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मी मुख्यमंत्री असतांना १०० कोटी रुपये अनुदान म्हणून दिले होते. आणि ते अनुदान बुडविण्याचे काम काही जणांनी केले. यावेळी मी बँकेला १०० कोटी अनुदान दिले नसते तर ज्यांचे ज्यांचे या बँकेत खाते होते त्यांचे पैसे बुडाले असते. बँकेचे वाटोळे होवू नये म्हणून हाच मुख्य उद्देश होता आणि मी या बँकेला कर्ज म्हणून नव्हे तर अनुदान म्हणून दिले.' राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा जेंंव्हा पर्यंत कोरा होणार नाही तोपर्यंत आत्महत्या रोखता येणार नाही असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत गारपीट

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. रविवारी बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारा पडल्याने फळबागा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

बीड जिल्ह्यात गारपीट

बीडः जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले. बीड शहरासह अनेक भागात वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे व विजेचे पोल कोसळण्याच्या घटना घडल्या. केज, बीड, धारुर तालुक्यात रविवारी गारांचा पाऊस झाला. धारुर तालुक्यातील आंबेवडगाव, पहाडी पारगाव, धुनकवड परिसरात गारपीट झाल्याने फळबागा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या परिसरात आंब्याच्या बागात कैऱ्याचा सडा पडला होता. बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथेही गारपीट व पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीटभट्याचे नुकसान झाले आहे.

कळंबमध्ये गारांचा पाऊस

उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. कळंब परिसरात सायंकाळच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झाडाला लागलेल्या आंब्याचा सडा पडला आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास गाराच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा लाभला. मात्र, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी पहिल्यांदाच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

नांदेडमध्ये वादळी वारे

नांदेडः नांदेड जिल्ळ्यात शनिवारी रात्री उशीरा विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाबरोबर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, नायेगावसह अनेक तालुक्याला बसला आहे. हिमायतनगर, किनवट, भोकर तालुक्याला या अवकाळी पावसाने हैराण करून सोडले आहे. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणीसह सरसम, पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी , वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी, पोटा, सिरंजनी या ग्रामीण भागात बसला आहे. त्यामुळे कापून ठेवलेला हरभरा, करडी, उभा गहू आडवा होवून, हाती आलेल्या संत्र्या -मोसंबी सह आंब्याची कार्याची फळे गळून पडली आहेत. तर तालुक्यातील अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली.

लातूर परिसरात अवकाळी पाऊस

लातूरः लातूर जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला. ला‌तूर श‌हर व चाकूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी रात्री लातूर शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. फळबागा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहातील कैद्यांनी कारागृह अधीक्षक राजकुमार माळी यांच्या आश्वासानंतर रविवारी सकाळी (१२ एप्रिल) उपोषण मागे घेतले. सर्व कैद्यांनी चौदा वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या २१ कैद्यांची सुटका करावी या मागणीसाठी शुक्रवारपासून (१० एप्रिल) उपोषण सुरू केले होते.

पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहातील एकूण ४१४ कैद्यांपैकी २१ कैद्यांची शिक्षा पूर्ण झालेली आहे. मात्र, ९ जुलै २०१४ नंतर सुटका होणाऱ्या कैद्यांच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, ते नऊ महिन्यांपासून सुटकेच्या आदेशाची वाट पाहत आहे. सहकारी कैद्यांच्या समर्थनार्थ सर्व ४१४ कैद्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस उपोषण केल्यानंतर रविवारी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी कैद्यांसोबत बैठक घेवून कैद्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचवल्याची माहिती दिली. तसेच, शासन याविषयी गंभीर असून लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती साळी यांनी कैद्यांना दिली. त्यानंतर कैद्यांनी उपोषण मागे घेतले.

सुटकेच्या प्रतीक्षेतील कैदी

बापू खंडू कोळी, दिलीप पंढरी जांभुळे, दत्ता राजाराम जाधव, उत्तम गणपत पंगेवर, दीपक चंद्रकांत पाटील, रामान जगन पाटील, भारत बहादूर इंगळे, किशोर रुपसिंग पाटील, जयवंत पाडुरंग सुर्वे, महादेव बाळू गिरी, राजेंद्र मनोहर देसाई, सुरेश आदमसाब रुंगी, योगराज गबा पाटील, शिवशंकर रामजीतसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर महादेव गोहात्ते, दत्ता नामदेव पोळ, सत्यदेव महादेवराव जामगडे, भगतसिंग बालमानसिंग ठाकूर व पंडित वामन मोरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येळगंगा पात्रात बांधकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

वेरूळ येथील येळगंगा नदीपात्रात बेसुमार बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे व अतिक्रमणांमुळे नदी स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, तहसीलदार सचिन घागरे यांनी अतिक्रमणांची पाहणी करून नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदार राजकुमार धूत यांनी वेरूळ हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. त्याअंतर्गत सध्या येळगंगा नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, नदीपात्रातील अतिक्रमणे, बेकायदेशीर अनियंत्रित बांधकामे यामुळे साफसफाईच्या कामात अडथळा येत आहे. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार सचिन घागरे यांनी येळगंगा नदीची नुकतीच पाहणी करून अतिक्रमणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, मंडळ अधिकारी शेखर शिंदे, तलाठी लक्ष्मण जाधव हे सोबत होते. यावेळी अनेक अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे झाल्याचे दिसून आले. तहसीलदारांनी अतिक्रमणांबद्दल नोटीस बजावून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नदीची स्वच्छता करण्याआधी अतिक्रमणे काढण्याचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे. त्याचवेळी नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नदी संवर्धनाची वारंवार मागणी होत होती. या परिस्थितीत आदर्श सांसद ग्राम योजनेमुळे नदी पात्राची स्वच्छता होणार असल्याने स्थानिक नागरिक व भाविकांना अपेक्षा निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छतेत्या कामांना सुरुवात करण्यात आली. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे स्वच्छता मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.

येळगंगा नदीची अवस्था मरणासन्न

वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री घृष्णेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे येतील येळगंगा नदीच्या किनाऱ्यावर शिवरात्रीसाठी भक्तांचा मेळा भरलेला असायचा, असे सांगण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत नदीपात्रात मातीचे ढिगारे, गाळाचे डबके, झाडेझुडपे आहेत. नदीत ड्रेनेजचे पाणी, कचरा टाकला जातो. घाटावर होणाऱ्या दशक्रिया विधीमुळेही प्रदूषणात वाढ धझाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरविक्रीत २९ लाखांची फसवणूक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तरुणाची २९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार सिडको भागात घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन ११, मयूरनगर भागातील चंद्रकांत घोडके या तरुणाने गोपाळ बच्छीरे व संदीप शिंगणे यांच्याकडून घर खरेदी केले होते. या घराची २९ लाख ७० हजार रुपयांची रक्कम त्याने काही टप्प्यांत दोघांना दिली होती. खरेदी-विक्रीचा रितसर प्रस्ताव घोडके यांनी सिडको कार्यालयात सादर केला होता. यावेळी त्यांना सिडको कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी खोट्या सह्या करून बनावट व्यव्हार केल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने घोडके यांनी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

जमिनीचे खोदकाम करताना सोन्याच्या माळा सापडल्याचे सांगून बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काळूराम असलाराम सोळंकी (वय २८, रा. थुल जि. झालोर, राजस्थान) पद्माराम सावजी वाघरी (वय - ४५ रा. सोमता जिल्हा झालोर, राजस्थान) मुळाराम दोलाराम वाघरी (वय - ३०, रा. शेवडी जि. झालोर, राजस्थान, ह.मु. करमाड रेल्वे स्टेश्नजवळ) हे तिघे परपांतीय नागरिक एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुनील रमेश गवळी (रा. असारामबापू नगर, राजणंगाव शेणपुंजी) याला भेटले. त्यांनी 'आमच्याकडे खोदकाम सापडलेले दीड ते पावणे दोन किलो सोने असल्याचे त्याला सांगितले. ते सोने विकून दे व त्यातून तुला पैसे घे, असेही ते त्याला म्हणाले. खऱ्या सोन्याचा तुकडा त्यांनी तपासणीसाठी दिला. हे सोने खरे असल्याची गवळी यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी 'पाच लाख रुपये दे, सर्व सोने तुला देतो', असे सांगून सिडको बसस्टँड परिसरात गवळींना बोलवून घेतले, मात्र त्यानंतर पुन्हा जागा बदलून दुसरीकडे येण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा जयभवानी चौकात बनावट सोने देतो, असे सांगितले.

आरोपी वारंवार जाग बदलत असल्याने त्यांची ही माहिती गवळी यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह जयभावानी चौकात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून बनावट सोन्याची माळ, तीन मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षांच्या तरूणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. सहा महिन्यापूर्वी औरंगपुरा व वाळूज परिसरात त्याने हे कृत्य केले होते. पैठणगेट परिसरातील सतरा वर्षांच्या तरूणीची सोपान विठ्ठल काळे (वय २२ रा. पाडळी ता. खुलताबाद) याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत सोपानने तीला लग्नाचे आमिष दाखवले. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सोपानने तरूणीला औरंगपुरा व वाळूज परिसरात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला. तरूणीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार सोपानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पीएसआय मयुरी पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल कारागृहात दोन कैद्यांचे उपोषण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारागृहातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दडपशाहीविरुद्ध दोन बंदीवानानी गेल्या अकरा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे, मात्र कारागृह प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने या दोघांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी घाटीमध्ये हलवण्यात आले आहे.

खेडकर चव्हाण व कैलास बनसोडे अशी या कैद्यांची नावे आहेत. चार महिन्यापासून या दोघांना कोर्टात तारखेसाठी ह‌जर केले नसल्याने त्यांनी कारागृहातील अधिकारी मोमीन यांना विचारणा केली होती. या कारणावरून मोमीन व इतर अधिकाऱ्यांनी त्यांना १७ फेब्रुवारी रोजी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर या बंदीवानानी कोर्टात देखील अर्ज करून दाद मागितली होती. तसेच कारागृहात उपोषण सुरू केले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते. उपोषण मागे घेतल्यानंतरही कारागृह प्रशासनाने मोमीन यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे बनसोडे व खेडकर यांनी १ एप्रीलपासून पुन्हा उपोषण सुरू केले होते.

या उपोषणाची देखील कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने या दोघांची प्रकृती खालावली. कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोघांना घाटीमध्ये उपचारासाठी हलवले आहे. घाटीतील वॉर्ड क्रमांक १० मध्ये या दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती बंदीवान चव्हाण यांची पत्नी सीमा चव्हाण यांनी दिली. दरम्यान, कारागृहातील कैद्यांना अध‌िकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे इतर कैद्यांत असंतोष पसरला आहे. या उपोषणामुळे अधिकाऱ्यांच्या दादागिरीवर चाप बसेल अशी चर्चा पोलिसांत दबक्या आवाजात सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीला गंडा घालणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रे सादर करून इंदोर येथील फायनान्स कंपनीला एक कोटी चोवीस लाखांचा गंडा घालणाऱ्या संतोष जैस्वाल याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या विरुध्द सिडको पोलिस ठाण्यात ३१ जुलै २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिडकोतील एडमिनम फायनान्स कंपनीमध्ये एजंट असलेल्या संतोष जैस्वाल (रा. एन सात, सिडको) याने बनावट कागदपत्रे तसेच बनावट कर्जधारक सादर केले होते. या कंपनीतून ८० वाहनांवर जैस्वाल याने एक कोटी चोवीस लाखांचे कर्ज घेतले होते. यानंतर जैस्वाल पसार झाला होता. शहरात असूनही जैस्वाल पोलिसांना चकवा देत होता. दोन दिवसापूर्वी जैस्वालला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पीएसआय सुभाष खंडागळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलामुळे वळवलेली वाहतूक ठरतेय घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुराणानगर-बसय्यैनगर परिसरामधील नागरिक सध्या वाहतुकीची गर्दी व खराब रस्त्यांमुळे मेटाकुटीला आले आहेत. उड्डाणपुलामुळे वळवलेली वाहतूक, रस्त्यांची लागलेली वाट आणि पाणीपुरवठ्याची अनियमितता डोकेदुखी ठरत आहे. वॉर्डात उद्यान, मंदिरे, सभागृह असल्याने लोकांचे मन रमते. पाणी, वीज आणि ड्रेनेजची इतर अनेक कामे या भागात झाली आहेत, असे मत मटाच्या 'कट्टा मीटिंग'मध्ये येथील नागरिकांनी व्यक्त केले.

नव्या औरंगाबादमध्ये ज्या चकाचक असलेल्या वॉर्डांचा नेहमी उल्लेख केला जातो, त्यात सुराणानगर-बसय्यैनगरचा समावेश आहे. नव्या वॉर्डरचनेनुसार वॉर्ड क्रमांक ६५ म्हणून या वॉर्डाला गणले जाते. सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या या वॉर्डामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या रस्ते व वळवलेल्या वाहतुकीची आहे. वॉर्डात केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याच्या वेळा निश्चित असल्या तरी अनेक वेळा नागरिक त्रस्तच असतात. शहरातील नागरिकांना महापालिका प्रशासन 'समांतर' नावाचे गाजर गेल्या काही वर्षांपासून दाखवित आहे. यासाठी वाढीव पाणीपट्टीही वसूल करण्यात येते, मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होत नाही. कमी दाबाने पाणी येतच असते. नव्या वॉर्डातील शौर्य व इतर संस्थांनी या वॉर्डात वृक्षसंवर्धन आणि संस्कृतीसंवर्धनाबाबत कामे केली आहेत. वळवलेली वाहतूक व रस्तांची झालेली चाळणी याविषयी येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाडे तक्रारी केल्या, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

वॉर्डामध्ये असलेले साईमंदिर, शिवगणेश मंदिर व उद्याने विकसित झाली आहेत. काही ठिकाणी नाला नेहमीच चोकअप होतो. नाल्यावर झाकण टाकण्याची मागणी करण्यात आली, मात्र हे काम करण्यात आले नाही. आता सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल असा व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणारा उमेदवार आम्हाला हवा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

वॉर्डातील कैलासनगर ते एमजीएम कॉलेज या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. वॉर्डात झोपडपट्टीचा काही भाग आहे. या भागाला अद्यापही पुरेशा नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, अशा व्यथा येथील नागरिकांनी कट्टा मीटिंगमध्ये मांडल्या. या मीटिंगसाठी शिवगणेश मंदिर व माया अपार्टमेंट परिसरातील नागरिकांसह शौर्य या स्थानिक युवक संघटनांमधील नरेंद्र पंडित, संकेत इंगळे, शिवा दामोदरे, मयुरी मालवी परेश्वर कालापाड, वैभव जोशी, संदीप काळे यांची उपस्थिती होती.

आमच्या वॉर्डात खूप काही समस्या नाहीत. मात्र, वाहतूक आणि रस्त्यांची समस्या कायम मेटाकुटीला आणते. या समस्या सोडवल्या जाव्यात. - ऋषिकेश कविमंडन

कैलासनगर ते एमजीएम कॉलेज या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तो नवीन नगरसेवकाने लवकरात लवकर सोडवावा.

- विशाल बोरले

वॉर्डात काही ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न भेडसावतो. निय‌मित स्वच्छता करण्यात यावी. वेळोवेळी कचरा उचलण्यात यावा. त्यामुळे रोगराई पसरणार नाही.

- सागर साबळे

स्वच्छतेची समस्या मोठी आहे. थातुरमातूरपणे झाडू मारण्यात येतो. वेळेवर कचरा उचलला जात नाही. स्वच्छता ठेवावी. त्यामुळे साथीचे आजार पसरणार नाहीत. - अविनाश देशपांडे

आमच्या भागाला पुरेशा नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत. उद्यानांना परिसरातील विहिरीतून पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. नव्या कारभाऱ्यांनी रखडलेली कामे करावी. - भूषण काळे

सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल असा व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणारा उमेदवार आम्हाला नगरसेवक म्हणून हवा आहे. - गौरव जावळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेने साथ नव्हे, ‘हात’ दिला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत शिवसेना कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करत नाहीत. काही ठिकाणी शिवसेनेकडून बंडखोरांना रसद पुरविणे सुरू आहे, अशा एक ना अनेक तक्रारी भाजपच्या उमेदवारांनी रविवारी (१२ एप्रिल) आयोजित मेळाव्यात पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्या. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा सकाळी साडेअकरा वाजता काल्डा कॉर्नर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात झाला.

प्रदेश संघटक रवी भुसारी, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये, प्रवीण घुगे, ज्ञानोबा मुंडे, बसवराज मंगरुळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात उमेदवारांनी निवडणुकीची काय तयारी केली, याबाबत वॉर्डनिहाय आढावा घेण्यात आला. यात अनेक उमेदवारांनी बंडखोरांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. शिवसेना कार्यकर्ते भेटत नाहीत, काम करत नाहीत. शिवसेना नेते-कार्यकर्ते प्रचारासाठी येत नाहीत. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्ते युतीऐवजी बंडखोरांना रसद पुरवत आहेत, अशा तक्रारी या उमेदवारांनी श्रेष्ठींपुढे मांडल्या. तसेच स्वपक्षाचे काही कार्यकर्तेही अपक्षांना मदत करत आहेत, अशी खंत दोन उमेदवारांनी व्यक्त केली. तर अनेक उमेदवारांनी युतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्याला सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. पक्षातील नेत्यांनी प्रचारासाठी यावे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांनी लक्ष द्यावे, स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



दानवे, घडमोडेंची दांडी

पालिका निवडणूक तयारीसाठी आयोजित या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मार्गदर्शन करणार होते. तसा निरोपही पक्षाकडून कार्यकर्त्यांना मिळाला होता, पण दानवेंनी या मेळाव्याला दांडी मारली. 'अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दानवे गेले आहेत,' असे स्पष्टीकरण प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी यावेळी दिले. दरम्यान भाजप शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांनीही मेळाव्याला दांडी मारली. ते स्वतः उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचारानिमित्त वॉर्डात राहण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

...ही तर बैठक!

भाजपच्या या मेळाव्याला मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जवळपास १० उमेदवार यामेळाव्याला आले नाहीत. ही संख्या पाहता भाजप नेत्यांनी हा मेळाव्या नव्हता, तर बैठक होती असा दावा केला.

शिवसेनेचे कार्यकर्ते काही ठिकाणी बंडखोरांसोबत फिरत आहेत. तसेच शिवसेनेचे काही नाराज कार्यकर्ते काम करत नाहीत. अशा तक्रारी काही भाजप उमेदवारांनी केल्या आहेत. युतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करू. नाराजांची समजूत काढू.

- शिरीष बोराळकर, भाजप प्रवक्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० शी नंतरच्यांना ठरविले बेरोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोटाळ्यातील एकेक पैलू समोर येत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांसाठी असलेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चाळीशी ओलांडलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तशी यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला पाठवली आहे.

पालिकेच्या प्रकल्प विभागाने १,१२४ लाभार्थींची हेअर ड्रेसर, फॅशन डिझायनिंग आणि प्लंबर या तीन ट्रेडस् साठीची यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला पाठवली आहे. या लाभार्थींच्या मोबदल्यात 'कोहिनूर' ला १ कोटी ७० लाख ८८४ रुपये पेमेंट करण्याचे षडयंत्र उपायुक्त डॉ. आशिष पवार आणि प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी आखले होते. त्याचा भांडाफोड आयुक्त प्रकाश महाजन यांनी केला. जी यादी 'त्या' दोन अधिकाऱ्यांनी 'कोहिनूर' ला दिली ती यादी 'मटा' कडे आहे. जे 'एजबार' झाले आहेत त्यांचाही या यादीत समावेश आहे. सलीम इसाक शेख (मुकुंदवाडी, वय ४० वर्ष), समद समीर शेख (मुकुंदवाडी, वय ५० वर्ष), बबलू शेख (मकुंदवाडी वय ४५ वर्ष), इरफान सलीम शेख (मुकुंदवाडी, वय ४५ वर्ष), तुषार बाबासाहेब साठे ( मुकुंदवाडी, वय ४४ वर्ष), वसंत मारोती गुंजावारे ( मुकुंदवाडी, वय ४५ वर्ष), राहुल तेनराव गाढवे (मुकुंदवाडी, वय ४० वर्ष), बंडू पवार (मुकुंदवाडी, वय ५० वर्ष), अक्षय पाखरे (मुकुंदवाडी , वय ४५ वर्ष), सूरज खनके (मुकुंदवाडी वय ४० वर्ष). एजबार झालेल्यांची अशी अनेक उदाहरणे या यादीत सापडतात. गणेश काळे, आशा मुबारक, संगीता काळे यांच्यासह काही नावे यादीत दोन वेळेस दिसतात.

पत्ते अपूर्ण

महापालिकेच्या प्रकल्प विभागाने 'कोहिनूर'कडे सादर केलेल्या लाभार्थींच्या यादीत एकाही लाभार्थ्याचा पूर्ण पत्ता दिलेला नाही. मुकुंदवाडी, जयभवानीनगर, जयभीमनगर, रोहिदासनगर, फुलेनगर, मिलिंदनगर आदी वसाहतींचा उल्लेख आहे. घर क्रमांक, गल्ली क्रमांक यांचा उल्लेखही केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात गारपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील काही भागाला रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये गारपीट झाली. तर, जळगाव जिल्ह्यामध्ये झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. आणखी दोन दिवस हीच परिस्थिती असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये, तर बीड जिल्ह्यात केज, बीड व धारूर तालुक्याच्या काही भागांमध्ये संध्याकाळच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. लातूर, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील नेहते येथील रामसिंग साबळे यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळला. त्यातच गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, यावल तालुक्यातील साकळी येथून रिक्षावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूच्या उपशाने नदी पात्र कोरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गेल्या काही दिवसांपासून कौठा एकंबा येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. या प्रकारामुळे पाण्याची पातळी खालावून नदीचे पत्र कोरडेठाक पडले आहे. या सर्व बांबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याने बेकायदेशीरपण वाळू उपसा सुरुच आहे.

मराठवाडा - विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर अनेक ठिकाणी वाळूचे घाट आहेत. परंतु, या वर्षी एकाही वाळू घाटाचा महसुल प्रशासनाने लिलाव केला नाही. त्यामुळे शासनच रोखीने वसूल होणार महसूल बुडत चालला आहे. एकंबा - कोठा येथून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पत्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा चोरट्या मार्गाने करून वाळू वाहतूक करीत आहेत. परिणामी नागरिक व प्रशासनाला वाळू चोरीमुळे दुहेरी फटका बसत आहे. पाणी पातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात वाळू मफिया यशस्वी होत आहेत. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी हिमायतनगर तहसील प्रशासन मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

अवकाळी पावसामुळे उत्खननाचे खड्डे बुजले

पैनगंगा नदीपात्रातून करण्यात आलेल्या बेसुमार उत्खननामुळे मोठे खड्डे पडले होते. दान दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीपात्रातील खड्डे बुजले आहेत. ज्या ठिकाणी वाळूचा चढ आहे ती जागा पाण्यातून वर दिसत असल्याने नदीपात्रातून किती मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात आला याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे.

नदीपात्रील दगडाचीही चोरी

नदी पत्रातून वाळू बरोबर आता दगडाचीही चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ब्लास्टिंगद्वारे दगड काढले गेल्याने नदी पात्राच्या कडेला मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. शनिवारी झालेल्या पावसाने हे खड्डे सुद्धा भरले आहेत. या सर्व बाबीकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय बाँडचा गैरवापर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय कार्यालयातील बाँडचा गुन्हेगारांकडून गैरवापर होत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी शासकीय कार्यालयातून जुने बॉँड चोरून त्याचा गैरवापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाँडवर खाडाखोड करून जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी त्याचा वापर केला जात होता. या आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिली होती.

महाराष्ट्र व गोवा बार असोसिऐशनचे अध्यक्ष अॅड. सिकंदर अली, सचिव सुनील दौंड व अॅड. कादरी यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. यामध्ये जफरखान मजीदखान हा आरोपी विविध शासकीय कार्यालयातून जुने शपथपत्र असलेले बाँड चोरून त्याचा गैरवापर करीत असल्याचा उल्लेख होता. या प्रकरणी गुन्हेशाखेकडे चौकशी देण्यात आली होती. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जफरखान व त्याचा साथीदार रोषणगेट भागात अशा जुन्या बाँडवर नारेगाव येथील एका प्लॉटची नोटरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी जफरखान मजीदखान (रा. कटकटगेट) व सय्यद मुश्ताक सय्यद मुजफ्फर (रा. नारेगाव) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून जुना बाँड जप्त करण्यात आला.

अॅड. सुनील दौंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात चोरी, फसवणूक, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक उन्मेश थिटे व पथकाने ही कारवाई केली.

मजकूर खोडून बाँड करायचे कोरा

आरोपी विविध शासकीय कार्यालयातून हे जुने बाँड चोरत होते. त्याच्यावर असलेला मजकूर ते खोडून तो बाँड कोरा नविन असल्यासारखा तयार करीत होते. यानंतर या बाँडवर नविन मजकूर टाकण्यात येत होता. आरोपी हा मजकूर कशाने खोडत होते याचा तपास पोलिस करीत आहे. जफरखान याच्यावर दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल आहे.

या आरोपींची विविध शासकीय कार्यालयात लिंक असल्याची शक्यता आहे. जमीन खरेदीच्या व्यवहारात या बाँडचा वापर होत होता. आरोपी हा मजकूर कशाने खोडत होते याचाही तपास केला जाईल. शासकीय कार्यालयात कोणते कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत त्याचा देखील तपास करण्यात येत आहे.

- अविनाश आघाव, पोलिस निरिक्षक गुन्हेशाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images