Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोल्हे कमीच; पण दुर्मिळ नाही!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील दोन तगडे वाघ देऊन पुणे येथील प्राणिसंग्रहालयातील दोन कोल्हे आणले आहेत. दुर्मिळ वाघ देऊन कोल्हे आणल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत वन्यजीव अभ्यासकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. नैसर्गिक अन्नसाखळीत महत्त्व असलेले कोल्हे कमी झाले आहेत; मात्र वाघांच्या बदल्यात कोल्हे स्वीकारण्याचा महापालिकेचा निर्णय हास्यास्पद ठरला आहे.

देशात वाघांची संख्या घटत असताना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाने वाघांची संख्या वाढविण्यासाठी बहुमोल कामगिरी केली आहे. योग्य संगोपन केल्यामुळे पिवळ्या आणि पांढऱ्या जातीच्या वाघांची संख्या वाढली आहे. एका ठिकाणी पंधरा वाघ ठेवल्याबद्दल 'नॅशनल झू अॅथॉरिटी'ने आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुण्याच्या प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ घेऊन दोन कोल्हे सिद्धार्थमध्ये आणण्यात आले. जगभरात दुर्मिळ झालेल्या वाघाच्या बदल्यात कोल्हे घेण्याचा निर्णय हास्यास्पद ठरला आहे. प्राणिसंग्रहालयात दुसरे दुर्मिळ प्राणी आणण्याची गरज होती. जिल्ह्यात भरपूर कोल्हे असून मनपा प्रशासनाचा निर्णय आश्चर्यजनक आहे, असे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. नैसर्गिक अन्नसाखळीत कोल्ह्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. उंदीर, ससे, हरिण आणि इतर छोट्या प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे काम कोल्हा करतो. कोल्ह्याची संख्या घटल्यामुळे गंगापूर व वैजापूर तालुक्यात हरणांची संख्या वाढली आहे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्ह्यांची संख्या भरपूर असली तरी मराठवाड्यात कोल्हे कमी आहेत. सातारा डोंगर, फुलंब्री परिसरातील माळरान आणि गौताळा अभयारण्यात कोल्हे आढळतात असे पाठक म्हणाले.

उसात कोल्हेच कोल्हे

पैठण आणि कन्नड तालुक्यातील उसाच्या पट्ट्यात भरपूर कोल्हे आहेत. पिण्यासाठी पाणी, लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि उसात भरपूर खाद्य असल्यामुळे कोल्हे उसात आढळतात. मादी एकावेळी चार पिलांना जन्म देते. परिसरातील शेतकऱ्यांना नियमित कोल्हे दिसतात. झुपकेदार शेपूट आणि निमुळते तोंड असलेले कोल्हे कमी असले तरी वाघापेक्षा निश्चितच जास्त आहेत.

कोल्हा दुर्मिळ प्राणी नाही. ऊस असलेल्या परिसरात कोल्हे मोठ्या प्रमाणात आढळतात. पुरेशी संख्या असल्यामुळे कोल्ह्यांना दुर्मिळ म्हणता येणार नाही.

- एस. पी. जयकर, वन अधिकारी

वाघांपेक्षा जास्त संख्या असली तरी मराठवाड्यात कोल्ह्यांची संख्या कमी झाली आहे. नैसर्गिक अन्नसाखळीत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. असे असले तरी वाघांची आणि कोल्ह्याची बरोबरी करता येणार नाही.

- डॉ. किशोर पाठक, वन्यजीव अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर संचालक कोठडीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एन. ए. ले आऊट मंजूर करण्यासाठी पाच लाखांची लाच घेणाऱ्या नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या दोन सहायक संचालकांना, सोमवारी कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींच्या घरझडतीमध्ये रोख पावणेदोन लाख रुपये व २८ तोळे सोने सापडले. आरोपींची पुणे व लातूर येथीही मालमत्ता आहे.

शरणापूर येथील जमीन मालकाने त्याच्या तीस गुंठे जमिनीचे लेआऊट मंजूर करण्यासाठी नगररचना व मूल्य निर्धारण कार्यालयातील सहायक संचालकाकडे अर्ज केला होता. या कामासाठी त्यांना प्रसाद सोनबा गायकवाड, (रा. वेदांतनगर) आणि संजय यशवंत टोणपे, (रा. शिवम अपार्टमेंट, ज्योतीनगर) या दोन सहायक संचालकांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून रविवारी (१२ एप्रिल) सायंकाळी टोणपे यांच्या फ्लॅटमध्ये पाच लाखांची लाच घेताना दोघांना अटक करण्यात आली. सोमवारी गायकवाड व टोणपे यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींची चौकशी करणे, पुणे, लातूर येथील घरांची, लॉकरची घरझडती घेणे आदी कारणासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. या मागणीवरून दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपअधिक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

१९ तोळे सोने, ३५ लाखांचा फ्लॅट

घरझडतीमध्ये प्रसाद गायकवाड यांच्या घरी एक लाख तेरा हजार रुपये रोख १९ तोळे सोने, पुणे येथे ३५ लाखांचा फ्लॅट व पुणे येथील एबीएच बँकेत लॉकर असल्याचे आढळले. तसेच संजय टोणपे यांच्या घरी ६५ हजार रुपये रोख, नऊ तोळे सोने व लातूर येथे नऊ लाखांचे घर असल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रचारावर पाणी !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण तीन दिवसांपासून वरूणराजा वादळी वाऱ्यासह हजेरी लावत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावर पाणी फेरले जात आहे.

निवडणुकीत प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे सर्वात अवघड असते. उमेदवार धावपळ करून कसेबसे कार्यकर्ते जमा करीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उमदेवार व कार्यकर्त्यांनी सकाळी व सायंकाळीच्या प्रचाराचे नियोजन केले आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी एकत्र आलेले कार्यकर्ते सैरभैर होत आहेत. त्यामुळे उमेदवार त्रस्त झाले आहेत. पावसामुळे उमदेवाराला सतत प्रचाराचे नियोजन बदलावे लागत आहे.

निवडणुकीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाले. त्यानंतर उमेदवारांनी वॉर्डांमध्ये प्रचाराचा नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटनही केले आहे. कोणत्या कार्यकर्त्यांनी वॉर्डात कशा पद्धतीने प्रचार करायचा याचीही तयारी झाली आहे. कार्यकर्ते प्रचारपत्रके वाटप करत असून उमदेवार वॉर्डात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. मात्र पावसाच्या भीतीमुळे सध्या दुपारपर्यंतच प्रचार आटोपता घ्यावा लागत आहे. पावसाने शनिवारी दुपारी तीन वाजेपासून शहराला झोडपले. कार्यकर्त्यांना रविवारीही पाऊस पडण्याची भीती होती. पाऊस आला नाही पण कार्यकर्त्यांनी पावसाच्या सावटाखालीच प्रचार केला. सोमवारी सकाळी प्रचार फेऱ्या आटोपल्या, दुपारी अचानक आभाळ भरून आले. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले. सायंकाळी धो- धो पाऊस पडल्याने प्रचाराला फटका बसला.

२० मिलिमीटर

सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने शहराला तब्बल पाऊण तास झोडपले. सिडको, हडको, शहागंज, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गारखेडा परिसर, निरालाबाजार, औरंगपूरा, विद्यापीठ परिसर अशा नव्या जुन्या शहराच्या बहुतांश भागामध्ये पाऊस झाला. दुपारी चारपासून आभाळाने गर्दी केल्यामुळे अचानक अंधारून आले होते. शहरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांवर कारवाई; दानवेंचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिका निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर करू,' असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. सोमवारी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक दानवे यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख कार्यकर्त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपची युती कागदावरच उरली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार संकटात सापडले आहेत. याची दखल घेत युतीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला भाजपचे सुरजितसिंह ठाकूर, डॉ. भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवाणी, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल उपस्थित होते.

बैठकीबाबत 'मटा' ला माहिती देताना रावसाहेब दानवे म्हणाले, 'बंडखोरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत उमेदवार निवडून यावेत यासाठी युतीचे नेते संयुक्त प्रचार फेऱ्या काढाणार आहेत.' विनोद घोसाळकर म्हणाले, 'जे प्रमुख बंडखोर आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. शांत झालेच नाहीत, तर कारवाईच्या संदर्भात विचार करून निर्णय घेऊ.

युतीच्या प्रमुख नेत्यांच्या संयुक्त प्रचार फेऱ्या काढण्यात येणार आहेत. जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नाहीत त्यांना प्रचारात आणण्यासंदर्भातही चर्चा झाली. निवडणुकीच्या निमित्याने पालकमंत्री रामदास कदम मंगळवारी शहरात येणार आहेत. पुढील काही दिवस ते शहरातच थांबतील.

फडणवीस, ठाकरे येणार

पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे १७ एप्रिल रोजी शहरात येणार आहेत. पुंडलिकनगर, हडको आणि गुलमंडी, औरंगपुरा-समर्थनगर येथे त्यांचा रोडशो होणार आहे. १८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तर १९ एप्रिल रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन युतीच्या नेत्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांचा दारुसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूजमहानगरपालिका निवडणुकीत मतदारांना भूलविण्यासाठी आणलेली विदेशी बनावटीची तब्बल १० लाख १४ हजार ८९१ रुपयांची अवैध दारू गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे निवडणुकीसाठी दारुचा वापर करणाऱ्या अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरातील कोलगेट कंपनीसमोर बजाजनगर येथील हॉटेल आरुष परमीट रुम अॅण्ड बारच्या बाजूस असलेल्या प्लॉट नं. ४२ मध्ये विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा आणल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या अधारे गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक गिरीधर ठाकर यांच्या टिमने काल (१२ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ए. बी. चौधरी, पोलिस कॉन्सटेबल ढाले यांच्यासह छापा मारला. त्यावेळेस परमीट रुम अॅण्ड बारचे मालक रांजेद्र लालासिंग सलामपुरे (३२) रा. बेगमपुरा औरंगाबाद यांची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर बाजूच्या प्लॉट नं. ४२ मधील एक रुमची झाडाझडती घेण्यात आली. त्यात ३५ वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूचा साठा आढळला. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक चौधरी यांनी लायसन्सची पाहणी केली असता लायसन्सवरील हॉटेलचा पत्ता हा प्लॉट नं. पीएपी (PAP) ४३ कोलगेट कंपनीसमोर बजाजनगर असा उल्लेख होता, मात्र दारुचा साठा असलेल्या प्लॉटचा नंबर ४२ असल्याने हा दारुचा साठा अधैध असल्याचे उघड झाले. हॉटेल व दारुचा साठा हा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस उपनिरिक्षक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र सलामपुरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारुचा महापूर

मनपा निवडणुकीच्या तोंडावर सदरील दारुचा साठा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दारुसाठ्यामध्ये विदेशी कंपन्याच्या महागड्या दारुचा समावेशकरण्यात आला आहे. त्यात एकूण २०४ वेगवेगळ्या प्रकारच्या दारुचा समावेश असल्याचे निष्पन्र झाले आहे. तर अॅन्टीक्युटी व्हिस्कीच्या दोन बाटल्यांचा समावेश असून या सर्व दारुसाठ्याची किंमत १० लाख १४ हजार ८९१ रुपये असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांचा कानाडोळा

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त पोलिसांकडून करण्यात येते, मात्र पोलिसांनी अवैध व छुप्या धंद्यांकडे डोळझाक केली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर असलेल्या या दारुसाठ्याकडे दुर्लक्ष झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून हा अवैध दारूसाठा जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राची मान्यताच नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावरील प्रकल्पाला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाअंतर्गत असलेल्या इकॉनॉमिक अफेअर सेलची मान्यता नसल्याचे उघड झाले आहे. जलाधिकार समितीचे कार्यकर्ते विजय शिरसाट यांना माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली. त्यामुळे या प्रकल्पाला केंद्राची मान्यता असल्याचे सांगत पालिका अधिकाऱ्यांनी जनतेची दिशाभूल का केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेने वाढलेल्या शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली. या योजनेला समांतर जलवाहिनी प्रकल्प असे नाव दिले. सुरुवातीला या योजनेचे काम शासन आणि महापालिका यांच्या निधीतून करण्याचे ठरविले. त्यानंतर ही योजना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाअंतर्गत असलेल्या इकॉनॉमिक अफेअर सेलची मान्यता असल्याचे महापालिकेचे अधिकारी वारंवार सांगायचे. महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत या बाबात वारंवार चर्चा झाली. त्यावेळी पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी या प्रकल्पाला इकॉनॉमिक अफेअर सेलची मान्यता असल्याचे स्पष्ट केले. मात्र, 'मटा' च्या हाती लागलेल्या माहितीनुसार या योजनेला इकॉनॉमिक अफेअर सेलची मान्यताच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

समांतर जलवाहिनीच्या विरोधात जनमताचा रेटा उभा करण्याचा प्रयत्न करणारे जलाधिकार समितीचे कार्यकर्ते विजय शिरसाट यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या इकॉनॉमिक अफेअर विभागाशी ऑनलाइन संपर्क साधला आणि समांतर जलवाहिनीच्या पीपीपी प्रकल्पाला इकॉनॉमिक अफेअर विभागाची मान्यता आले का, याची माहिती द्या अशी विनंती केली. त्यांना १६ जानेवारी २०१५ रोजी इकॉनॉमिक अफेअर विभागातर्फे ऑनलाइन उत्तर दिले. त्यात 'समांतर'च्या 'पीपीपी'ला केंद्राची मान्यताच नसल्याचे कळविले. केंद्राच्या इकॉनॉमिक अफेअर सेलनेच केलेल्या या भांडाफोडमुळे महापालिचे अधिकारी उघडे पडले आहेत. या अधिकाऱ्यांनी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची फसवणूक का केली, असा प्रश्नही निर्माण होत आहे.

कोणताही प्रस्ताव नाही

केंद्राच्या इकॉनॉमिक अफेअर विभागाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, 'केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या सेलसाठी नेमलेल्या इकॉनॉमिक अफेअर विभागाला 'आैरंगाबाद वॉटर सप्लाय पीपीपी प्रॉजेक्ट अॅट औरंगाबाद, महाराष्ट्र' या नावाने कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव इकॉनॉमिक अफेअर सेलला मिळालेला नाही. अथवा इकॉनॉमिक अफेअर सेलने अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघांचा अन्नत्याग सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील १२ वाघांचा अन्नत्याग सोमवारी सुरूच होता. कैफ आणि रिद्धी हे वाघ शनिवारी पुण्याला रवाना झाल्यापासून तीन पांढऱ्या, नऊ पिवळ्या वाघांनी काहीच खाल्ले नाही. विरहामुळे या वाघांच्या चेहऱ्यावरची रौनक गेली आहे. वाघ कमालीचे सुस्त झालेत. या संदर्भातील वृत्त 'मटा' ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले. तेव्हा पालिका वर्तुळात पडसाद उमटले. आयुक्त प्रकाश महाजन यांनी या संदर्भात विचारणा केली व वाघांची काळजी घ्या, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. वाघांनी मांस खावे म्हणून प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पिंजऱ्यात मांस टाकले होते, पण आज दिवसभर वाघांनी मांस खाल्लेच नाही. रात्री पुन्हा त्यांच्या पिंजऱ्यात मांस टाकले जाणार आहे. टाकलेले हे मांस त्यांनी खाल्ले की नाही ते उद्या मंगळवारी सकाळीच कळेल, असे सूत्रांनी सांगितले.

वाघांचा विरह, त्यातून अन्नत्याग ही नित्याची बाब आहे. दोन-तीन दिवसांत ते पुन्हा मुळपदावर येतील. प्राणिसंग्रहालयातून नेहमीच प्राण्यांची देवाणघेवाण केली जाते.

- संजय नंदन, कार्यालयीन अधीक्षक, सिद्धार्थ उद्यान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय राऊतांची पलटी!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

मुस्लिम व्होटबँक व मताधिकाराबद्दल लिहिलेल्या लेखावरून टीकेची झोड उठताच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पलटी मारली आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्या असं आपण लिहिलंच नव्हतं. मुस्लिमांचा मताधिकार काढला तर त्यांच्या मतांचं राजकारण थांबेल असं लिहिलं होतं, अशी सारवासारव राऊत यांनी केली आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 'मुस्लिमांचा मताधिकार काढणं चुकीचं आणि घटनाबाह्य आहे. मताचा अधिकार काढा असं, मी लिहिलेलं नाही. माध्यमांनी बातमी हवी असते, त्यामुळं त्यांनीच माझ्या विधानाचा विपर्यास केला, असं म्हणत लेखावरून उद्भवलेल्या वादाचा खापर मीडियावर फोडलं.

मुस्लिमांच्या व्होटबँकेचं राजकारण थांबवण्यासाठी त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा, असं संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. जोपर्यंत मुसलमानी मतांचं राजकारण होत राहील, तोपर्यंत देशातील मुसलमानांना भवितव्य नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

फळांचा राजा भाव खाणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे रसदार आंबे (गावरान आंबे) बाजारात येण्यास निलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी अन्य प्रांतातून येणाऱ्या लालबाग, बदाम आणि हापूस जातीच्या आंब्याचे दर वाढू लागले आहेत. 'फळांचा राजा' यंदा भाव खाणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

उन्हाळा सुरू होताच सर्वांना रसदार आंबे खाण्याचे वेध लागतात. २१ एप्रिल रोजी अक्षयतृतीया आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादच्या मंडईत तसेच बाजारपेठेत विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आंब्याची आवक कमी होत असल्यामुळे आंब्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह शेजारील आंध्र व कर्नाटक राज्यातही अवकाळी पाऊस, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असून या तीनही राज्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर मराठवाड्यातील गावरान आंब्याचेही (देशी आंब्याचे) मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हापूससाठी कोकण प्रसिद्ध आहे, तर उस्मानाबाद जिल्हा हा विशेष करून गावरान आंब्यासाठी सर्वदूर परिचित आहे.

गोड, चवदार आंब्याच्या काही जाती परप्रांतातून बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. लालबाग व बदाम आंबा बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीचा 'हापूस' तसेच कर्नाटकातील 'दसरा' आंबाही मंडईत काही ठिकाणी दिसू लागला आहे. सध्या आंब्याच्या या जातीची आवक वाढू लागली असली, तरी आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहकांना किलोमागे मोठी रक्कम मोजावी लागत आहे. तसेच, अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेले आंबे बाजारापेठेत दाखल झाले असले, तरी ग्राहकांची गर्दी अद्याप म्हणावी तशी दिसत नाही.

फळांच्या राजाची आवक दोन-तीन दिवसांपासून वाढली असली, तरी त्यांचे भाव कमी झालेले नाहीत. गोड चवीसाठी प्रख्यात असलेल्या लालबाग आंब्याचा दर १४० ते १५० रुपये प्रतिकिलो आहे. लालबाग पाठोपाठ रत्नागिरीचा हापूसही बाजारात काही प्रमाणात उपलब्ध झाला आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्यासाठी सुमारे आठशे रुपये मोजावे लागत आहेत. दोन डझनची पेटी १५०० रुपये तर चार डझनची पेटी २८०० रुपये असा दर सध्या चालू आहे.आंध्रातील बदाम जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले असून एका किलोसाठी १४० रुपये दर चालू आहे. पायरी आंब्याचे दरही १२० ते १३० रुपये डझन असेच आहेत.

अवकाळी, गारपीट आणि वादळाच्या नैसर्गि‌क आपत्तीमुळे आंबा पिकावर आता बुरशीजन्य रोगामुळे काळे डाग पडू लागली आहेत. यामुळे आंबा उत्पादकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

- राजेंद्र मुंदडा, आंबा बागायतदार शिराढोण (कळंब)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचा फायदा; कोरड्या विहिरींना पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानाबरोबरच थोडाफार फायदाही झाला आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेने ग्रामस्थांच्या पुढाकाराने नाला सरळीकरण आणि रुंदीकरणाचे कामे केली आहेत. त्या ठिकाणी पाणी साठले असून परिसरातील विहीरींना एकाच दिवसांत दहा ते वीस फुटांपर्यंत पाणी आले आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 'किनगाव येथे नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम झाले. जुना नाला सरळ करुन चाळीस फूट रुंद आणि आठ फूट खोल करण्यात आला. हे काम सुमारे सव्वा किलोमीटर अंतरात केले गेले. दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे नाल्यात पाणी साठले. नाल्यातून वाहणारे पाणी जमिनीत मुरले. परिणामी नाल्याच्या शेजाराच्या व परिसरातील विहिरीत दहा ते २० फुटांपर्यंत पाणी आले.'

बालाजी स्वामी यांच्या विहिरीत २० फूट, वैजनाथ मुंडे, निजाम शेख, देवेंद्र आमले, व सखाराम कुलकर्णी यांच्या विहिरीत १० फुटांपर्यंत पाणी आले आहे. विशेष म्हणजे या विहिरी काही दिवसांपूर्वी कोरड्या होत्या. किनगावचा अनुभव लक्षात घेउन इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्यांच्या परिसरातील नदी नाले सरळीकरण, खोलीकरणाचे काम लोकसहभागातून करून घेउन जलस्वावलंबी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कुचे ‘आउट ऑफ रीच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे आमदार नारायण कुचे जालन्यामधून 'आउट ऑफ रीच' झाले आहेत. औरंगाबादमध्ये लक्ष असल्याने बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वय साधताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत कुचे यांनी प्रचार कार्याला प्राधान्य दिल्याने अंबड, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात पसरलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या कव्हरेज क्षेत्राच्या सध्या ते बाहेर आहेत. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. बदनापूरमधील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भयंकर वाईट आहे. खासदार रावसाहेब दानवे यांनी आदर्श संसद ग्राम योजनेतून निवड केलेल्या श्री गणपती राजूर या तीर्थक्षेत्र विकासासाठी अद्याप आवश्यक तेवढे प्रयत्न झालेले नाहीत. मराठवाडा आणि महाराष्ट्र राज्यातील गणेश भक्त राजूरला लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. खासदार दानवे हे आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने राजूरला ते पूर्वीइतका कितपत वेळ देतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे दानवे यांच्या निष्ठावंत गटात असलेल्या कुचे यांच्याकडेच ही जबाबदारी ओघाने येणे स्वाभाविक आहे.

रस्त्यांच्या समस्येबरोबरच अनेक पायाभूत विकासाच्या क्षेत्रामध्येही लक्ष देणे गरजेचे आहे. अंबड आणि भोकरदन तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क, राजकीय वर्तुळात रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, तिन्ही तालुक्यातील सरकारी अधिकारी अन कर्मचारी यांच्याशी समन्वय आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय सहभाग, अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजापुरात नवोदित मराठी साहित्य संमेलन

0
0

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित २२वे नवोदित मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी तुळजापूर येथे होणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे व सरचिटणीस दशरथ यादव यांनी नुकतीच दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत हे साहित्य संमेलन होत असून, हे संमेलन उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या संमेलनातून सुमारे ८०० साहित्यिक उपस्थित राहतील,

असा अंदाज आहे. देशभरात साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, बारा हजारांहून ‌अधिक सभासद आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, कवीसंमेलन होणार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले भालचंद्र नेमाडे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे यासाठी त्यांना विनंतीवजा साकडे घालण्यात येत असल्याची माहिती यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार करणाऱ्यांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनधी, नांदेड

अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या तीन जणांना नांदेडचे विशेष जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. अल्पवयीन बालिकेने अर्धापूर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली आहे. येळेगाव (ता. अर्धापूर) येथील अक्षय उर्फ बंडू भीमराव कपाटे (१९) याने १२ एप्रिल रोजी तिच्यावर प्रेम करत असल्याची चिठ्ठी बालकासोबत तिच्याकडे पाठविली. बालिका १२ एप्रिलला सकाळी शेताकडे जात असताना अक्षयने तिला गाडीवर बसण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर दुसऱ्या मोटारसायकलवर आलेले नवनाथ उर्फ दादा, केशवराव कपाटे (२१) आणि सदाशिव उर्फ सदानंद देविदास गंगातीर (२२) या दोघांनी बळजबरी तिला मोटारसायकलवर बसविले आणि दोन्ही मोटारसायकली नांदेडला आल्या. नांदेडच्या तरोडा नाका येथे त्या बालिकेला या तीन युवकांनी खिचडी खाऊ घातली आणि पुन्हा तिला गाडीवर बसवून निळा शिवारात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला त्यांनी गावात सोडून दिले आणि झालेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केली, तर जिवे मारण्याची धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना राज्याच्या ग्रामविकास, जसंधारण, रोजगार हमी योजना आणि माहिला व बालविकास खात्याच्या मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वसंतबावीस्कर, अंबाजोगाईचे अपर जिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोषकुमार देशमुख, आमदार भीमराव धोंडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. पंकजा म्हणाल्या, 'जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.' 'एप्रिल आणि मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता जेथे टँकरची मागणी आणि आवश्यकता असेल त्या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करावेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा, राष्ट्रीय पेयजल योजना आदी अंतर्गत नादुरुस्त असलेल्या विहीरी आणि पाणी पुरवठा योजनाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी.' या वेळी वि‌िवध विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live

Latest Images