Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुकानात घुसून व्यापाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टातील निकाल आमच्या बाजुने लागल्याने हे दुकान आमचे आहे, असा दावा करीत उस्मानपुऱ्यातील एका दुकानदाराला दोघांनी मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर अग्रवाल (वय २३, रा. पिरबाजार) यांचे उस्मानपुरा भागात दुकान आहे. रविवारी सकाळी सागर दुकान उघडत होते तेव्हा बबीता अग्रवाल (रा. चिकलठाणा) व शेख अश्फाक (रा. उस्मानपुरा) हे दोघे दुकानात आले. दुकानाबाबत कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचा दावा करीत दुकानातील साहित्य बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच सागरला शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सागर अग्रवालच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीचे नुकसान क्षेत्र बदलण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात झालेल्या वादळासह झालेला पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचे छायाचित्रण केले जात आहे. त्यामुळे यापूर्वी अंदाजित १२ हजार हेक्टर क्षेत्रात बदल होऊ शकतो, अशी माहिती राहुल गायकवाड यांनी दिली. अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतात महसूल व कृषी विभागाकडून छायाचित्रण केले जात आहे. यावेळी शेतकरी उपस्थित राहत आहेत. या पद्धतीने नुकसानीचा आढावा घ्यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.

या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याच्या उपस्थितीत तलाठी व कृषी सहायक छायाचित्रण करून पंचनामा करणार आहेत. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यातील चार महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे. या पद्धतीमुळे पंचानाम्यात होणाऱ्या चुकांची छायाचित्रणाआधारे दुरुस्ती केली जाऊ शकते. शिवाय शासनाकडे वस्तुनिष्ट माहिती उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील सिंचन घोटाळ्याचीही चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील काही सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची ओरड असून त्यांची लवकरच चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आघाडी सरकारमधील काही पुढाऱ्यांनी दबाब आणून कामे करून घेतली, असेही अधिकारी सांगत आहेत, चौकशीत सर्व समोर येईल, असा दावा त्यांनी केला.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. चितळे समितीच्या अहवालनूसार मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचे आढळून आलेल्या प्रकल्पांची चौकशी सध्या चौकशी सुरू आहे. त्यात कोकणातील बारा आणि विदर्भातील तीन, असे एकूण पंधरा प्रकल्प आहेत. या कामांची चौकशी अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत केली जात असल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले. तपास अधिकाऱ्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे पुरविण्यात येत असून एक वर्षात चौकशी पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाच वेळी सर्व प्रकरणाची चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे ठराविक प्रकरणे हाताळण्यात येत आहेत. मराठवाड्यातील सिंचन घोटाळा प्रकरणात प्रामुख्याने गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी लवकरच सुरू केली जाईल, अशी त्यांनी दिली. आदर्श घोटाळा ज्यांनी घडवून आणला ते बाजूला राहिले आणि ज्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या, अशा केवळ दहा टक्केच लाभार्थ्यांवर कारवाई झाली आहे. याचा दाखला देत सिंचन घोटाळ्यातही तत्कालीन पुढाऱ्यांनी दबाब आणून कामे करवून घेतली, असे काही अधिकारी भेटून सांगतात. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दबाब आणणाऱ्या पुढाऱ्यांची नावे निश्चितच पुढे येतील, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पाण्यासाठी नियोजन

जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात काही धरणे त्या त्या काळी तेथील पुढाऱ्यांनी बांधून घेतली. त्यामुळे मराठवाड्याचे पाणी वरच्या भागातच अडविले जाते, अशी कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. सर्वांना पाणी मिळालेच पाहिजे, हीच शासनाची भूमिका असून मराठवाड्यास त्यांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी स्थायी समितीत प्रशासनावर हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्षानुवर्षे कुठल्याही कामाचा निपटारा न करता केवळ चालढकल केली जाते. बिंदूनामावली नसताना आंतरजिल्हा बदल्यांना मान्यता कशी दिली? तीन महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुठले निर्णय घेतले? असे अनेक प्रश्न उपस्थित करून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरीही निरुत्तर झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामदास पालोदकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. स्थायी समितीची सभा सोमवारी झाली. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती विनोद तांबे, सरला मनगटे, सुदाम मोकासे, ज्ञानेश्वर मोठे, अनिल चोरडिया आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीला बिंदूनामावलीचा मुद्दा पालोदकरांनी उपस्थित केला. सोमवारी सायंकाळी आंतरजिल्हा बदलीने २२२ शिक्षकांना परवानगी दिली जाणार होती. यात आंतरजिल्हा बदली, आपसी आणि पती पत्नी एकत्रिकरणाची प्रकरणे होती. पालोदकरांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्याकडे बिंदूनामावलीची विचारणा करत कोणत्या नियमाच्या आधारे हे केले असे विचारले. ३१ मार्च ही अंतिम मुदत असताना एवढा उशीर का? यात कुणाचे इंटरेस्ट होते का? असा थेट सवाल केला. या प्रश्नावर पालोदकर अडून राहिले. प्रशासनाकडे उत्तर नव्हते. सदस्य व पदाधिकाऱ्यांनी कामे करताना नियम व तुम्ही निर्णय घेताना काहीच कसे पाळले जात नाही असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ' या प्रकरणात कुणाचा इंटरेस्ट आहे? ' हे वाक्य सीइओ चौधरी यांना खटकले. त्यांनी अध्यक्ष महाजन यांच्याशी चर्चा केली. तो धागा पकडून पालोदकर यांनी ' मी वैयक्तिक कुणावरच आरोप केले नाहीत. नियमानुसार बोललो जर तुम्हाला तेही नको असेल तर पुढे चर्चा नको.' असे म्हटले, मात्र ज्ञानेश्वर मोठे यांनी चर्चेत सहभागी होत सीइओंवर हल्लाबोल केला. 'जिल्हा परिषदेला आयएएस अधिकारी मिळाला. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. असे आम्हाला वाटले होते, पण प्रत्यक्षात तीन महिन्यांत काय काम झाले ते सांगा. आम्ही प्रश्न उपस्थित करतो पण त्याची दखल घेतली जात नाही. आम्ही काय भाडोत्री बैल आहोत काय? दहा रुपयांच्या नाष्ट्यासाठी येथे येतो काय?' असा सवाल उपस्थित केला. सीइओंनी मोठेंच्या वक्तव्यानंतर 'तुम्हाला सर्व पर्याय खुले आहेत', असे सांगितले. त्यावर मोठे यांनी आमच्यावर प्रेशर आणू नये. प्रशासनाने त्यांचे काम करावे आम्ही आमचे करू असे सुनावले. त्यावर सीइओ निरूत्तर झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साम दाम दंड भेदास सुरुवात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मनपा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडून येण्यासाठी उमेदवाराकडून विविध मार्गांचा अवलंब करणे सुरू झाले आहे. रंगारगल्ली येथे गुलमंडीचे अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांच्यासह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अटक व सुटका करण्यात आली. तसेच भडकलगेट येथे अज्ञात आरोपीकडून वाहनांची नासधूस करण्याचा प्रकार घडला.

गुलमंडी वॉर्डाअंतर्गत येणाऱ्या रंगारगल्ली भागात रविवारी रात्री साडेदहा वाजता पोलचीटसोबत पैसे वाटप होत असल्याची माहिती सिटीचौक पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी रंगारगल्ली गाठली. अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांचे प्रचार साहित्य वाटत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. शेख मोहसीन, शेख बद्रोद्दीन शेख नुरोद्दीन व सिद्दीकखान युनूसखान यांच्याकडून तेरा हजार रुपये जप्त करण्यात आले. हे कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. उमेदवार राजू तनवाणी तसेच या तिघांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनवाणी यांच्यासह तिघांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.

दुसऱ्या घटनेत भडकलगेट येथे अज्ञात आरोपींनी वाहनांची नासधूस केली. मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या तरुणांच्या टोळक्याने नागरिकांच्या घरासमोरील अॅटो रिक्षा तसेच दुचाकींचे टप व सीट फाडून ते पसार झाले. यामध्ये पाच रिक्षा व पंधरा दुचाकींचा समावेश होता. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

जयसिंगपुऱ्याच्या एमआयएम उमेदवाराला धमक्या

जयसिंगपुरा वॉर्ड क्रमांक १८ मध्ये प्रचार करत असताना काही अनोळखी तरूणांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जयसिंगपुऱ्याचे एमआयएमचे उमेदवार अनिक पटेल यांनी पोलिस आयुक्तालयात दिली. याबाबत अनिक पटेल यांनी दिलेल्या पत्रात ही धमकी त्यांच्याविरोधात असलेल्या लोकांकडून देण्यात आली असावी असाही आरोप केला आहे. याशिवाय १६ एप्रिल रोजी एमआयएम उमेदवार अनिक पटेल यांनी जयसिंगपुरा भागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे बोगस मतदान थांबविण्यासाठी स्थानिक पोलिस न ठेवता, राखीव दलाचे पोलिस कर्मचारी ठेवण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याची मागणी वाढली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अक्षय्य तृतीयेनिमित्त फळांचा राजा असलेल्या आंब्याची मागणी वाढली आहे. आवक कमी असल्याने भाव वाढले असून आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा होणारा वापर पाहता अन्न व औषध प्रशासनही सतर्क झाले आहे. गेल्या तीन दिवसात विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली, पण कुठेही कार्बाईडचा वापर आढळून आला नाही, असा दावा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तर बाहेरगावाहून माल येतानाच तो प्रवासादरम्यान कार्बाईडने पिकविला जात असावा, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सुरुवातीला कर्नाटकमधील लालबाग आंबा बाजारात दाखल झाला. त्यानंतर जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पायरी, दसरी, लंगडा, आदी आंब्याबरोबरच हापूस आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. प्रामुख्याने कर्नाटक, आंध्रप्रदेशसह स्थानिक भागातूनही आवक होत असून दररोज सरासरी ८० ते १०० क्विंटल आंब्याची आवक होत असल्याचे बाजार समितीचे सहसचिव विजय शिरसाट यांनी सांगितले. तर आवक कमी असल्याने सध्या भाव जास्त असल्याचे फळ विक्रेते के. के. उर्फ करीम बागवान यांनी सांगितले. कर्नाटकचा केशर १३० ते १५० रुपये किलो, लंगडा १२० ते १४० रुपये एक किलो, पायरीसाठी १०० ते १२०, लालबाग आंबा ८० ते १००, दसरी १०० ते १२० रुपये किलो असा भाव असल्याचे बागवान यांनी सांगितले.

कार्बाईडयुक्त आंबे ?

आंबा लवकर पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर चोरट्या पद्धतीने केला जातो. कार्बाईडच्या सहाय्याने आंबे पिकविणे आरोग्याच्या दृष्टीने घातक म्हणून नैर्सगिकरित्या किंवा इथिलिन गॅसने आंबा पिकवावा, असे आवाहन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कार्बाईडचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या तीन दिवसापासून विविध ठिकाणी आंब्याची तपासणी करण्यात आली असून कुठेही कार्बाईडचा वापर होत असल्याचे आढळून आले नाही, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली. दरम्यान, बाहेरगावाहून येथील बाजारपेठेत माल येईपर्यंत दोन ते तीन दिवस लागतात. या प्रवासादरम्यानच कार्बाईडने आंबे पिकविले जात असावेत, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या वॉर्डात MIM ची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएमच्या आमदारांचे कार्यालय आणि घर असलेल्या भडकल गेट वॉर्डात एमआयएमच्याच उमेदवारांची परीक्षा होणार आहे. या वॉर्ड क्रमांक ४९ मधून दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या वॉर्डात एमआयएमच्या उमेदवाराला हक्काचे निवडणूक चिन्ह न मिळाल्याने मेहनत घ्यावी लागत आहे.

भडकल गेट वॉर्डात औरंगाबाद मध्यचे आमदार सय्यद ‌इम्तियाज जलील यांचे घर आहे. यावेळच्या वॉर्ड रचनेत भडकल गेट वॉर्डाला बुढ्ढीलेन काचीवाडा हा भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे वॉर्डाचा आकार वाढला आहे. एमआयएमने येथून गंगाधर ढगे यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमचे निवडणूक चिन्ह 'पतंग' ढगे यांना मिळाले नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्या चिन्हावर लढावे लागत आहे. हे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळाल्याने त्यावर एमआयएम समर्थकांची मते जाण्याचा धोका पक्षाला सतावत आहे.

या वॉर्डातून भारिप बहुजन महासंघाचे अमित भुईगळ, विशाल रमेश आमराव, विजेंद्र जाधव, गाजी सादोद्दीन, महेंद्र साळवे, सतिश सोनोने, आनंद कस्तुरे, प्रशांत प्र‌ितमकुमार शेगावकर, संजय वाघुले आणि विनोद जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत. अनुसूचित प्रवर्गातून एकमेव मुस्लिम उमेदवार गाझी सादोद्दीन हे या वॉर्डातून निवडणूक लढवित आहेत. भडकल गेट वॉर्डातून दिग्गजांनी प्रचारात घेतलेला वेग आहे. दुसरीकडे एमआयएमच्या उमेदवाराला निवडणूक चिन्ह पोहोचवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत. ओवेसी बंधूंच्या दोन सभांमुळे एमआयएमकडे मते वळतील, असे बोलले जात आहे. पण आमदारांच्याच वॉर्डात 'पतंग' चिन्हावर दुसरा उमेदवार लढत असल्याने पक्षाच्या उमेदवाराला चाचपडावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परगावी असलेल्या मतदारांसाठी फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संपली. बुधवारी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून नोकरी, शिक्षणानिमित्त परगावी गेलेल्या मतदारांना आणण्याची लगबग सुरू झाली आहे.

वॉर्डांमधील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी यादीतील एकेक नाव ट्रॅक करणे सुरू केले आहे. एखाद्या घरातून लग्न होऊन परगावी केलेल्या विवाहितांना मतदानासाठी आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत मंगळवारी सायंकाळपर्यंत मतदार औरंगाबादेत कसे पोचतील यासाठी स्वतंत्र टीम कार्यान्वित झाल्या आहेत. औरंगाबादमधून पुण्यात नोकरी, शिक्षणानिमित्त गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारांना आणण्यासाठी खासगी गाड्या, बसची व्यवस्थाही काही राजकीय पक्षांनी केली आहे. संबंधित वॉर्डातील विद्यमान नगरसेवकांवर याची अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस; तसेच अन्य पक्षांनी यात आघाडी घेतली आहे. रविवारी अनेक कार्यालयांमधून याद्या अपडेट करण्याचे काम सुरू होते. बाहेरगावी गेलेल्या मतदारांची नावे मार्क करून त्यांना संपर्क साधला जात आहे.

गाड्या रवाना

मंगळवारी पुणे, मुंबई, हैदराबाद येथून मतदार आणण्यासाठी खासगी गाड्या रवाना झाल्या आहेत. याशिवाय गेल्या वर्षभरात विवाह होऊन परगावी गेलेल्या मुलींना आणण्याचे नियोजन एका वॉर्डात १५ दिवसांपूर्वीच केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकूणच एकेक मत जमविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोनपेक्षा जास्त अपत्ये; सुप्रीम कोर्टात याचिका

$
0
0

औरंगाबादः कैसर कॉलनी (४५) वॉर्डातील एमआयएमचे उमेदवार शाहेदा खातून शहानवाझ खान यांना दोन जास्त अपत्य आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी फेटाळली होती. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

कैसर कॉलनीतून एमआयएमच्या उमेदवार शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला याचिकाकर्ते खातिजा कुरेशी छोटू कुरेशी यांनी आक्षेप घेतला होता. शाहेदा खातून यांना १३ सप्टेंबर २०००नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत. त्याआधी त्यांना २ अपत्ये होती. कायद्यानुसार १३ सप्टेंबर २०००नंतर दोन अपत्ये झालेल्यांना निवडणूक लढविता येत नाही. तरीही शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आक्षेप घेताना पुरावे जोडण्यात आले होते, पण निवडणूक निर्णय अधिकारी उबाळे यांनी शाहेदा खातून यांची उमेदवारी अर्ज वैध ठरविला होता. त्याला खातिजा यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. ही याचिका फेटाळण्यात आली. या निर्णयाला खातिजा कुरेशी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याचिकाकार्त्याची बाजू सुधांशू चौधरी मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करणार : कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर निकृष्ट झाली आहेत. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकू आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न बिकट बनला आहे. रस्त्यांसाठी शासनाने पैसे दिलेले नसले तरी रस्त्यांची अनेक कामे महापलिकेच्या फंडातून केली आहेत. अनेक कामे महापालिकेने डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून केली आहेत. या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे कदम यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, 'शहरात झालेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती मी घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डांबरामध्ये रॉकेल मिसळून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जात असे. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते वाहून जात होते. या सर्व कामांची चौकशी केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासनाकडून औरंगाबद शहरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. त्यातून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. निम्मे खड्डे बुजविले आहेत. रस्त्यांचे काम दर्जेदारच झाले पाहिजेत, यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.' प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी क्वालिटी कंट्रोल ठेवला जाणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. महापालिकेचा स्तर उंचाविण्याचे काम नैतिकदृष्ट्या पालकमंत्री या नात्याने यापुढे मलाच करावे लागणार आहे आणि ते मी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रावसाहेब दानवेंची प्रतीक्षा

महापालिकेच्या निवडणुकीचा वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, पण रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर अकरा वाजता पत्रकार परिषदेसाठीच्या व्यासपीठावर आले. तोपर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले नव्हते. त्यांनी कदमांसह पत्रकारांना आजून १५ मिनिटे वाट पहायला लावली. सव्वाअकराच्या सुमारास पत्रकार परिषद सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात दररोज २ शेतकरी आत्महत्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीषण दुष्काळ आणि गारपीटीच्या दुष्टचक्रात मराठवाड्यातला शेतकरी अडकला आहे. कर्जबाजारीपणामुळे दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या १०८ दिवसांत २५५ शेतकऱ्यांनी, तर गेल्या वर्षभरात पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातून दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. ऐन पावसाळ्यात वरुणराजाचा रुसवा सुरू होतो. त्याची मनधरणी करता-करता शेतकऱ्यांची आयुष्य उद्धवस्त होत आहेत. यंदाही दुष्काळाची भीषणता कायम आहे. अनेक भागांत कसेबसे पिक तगले आणि आले. मात्र, या पिकांवरही अवकाळी पावसाने नांगर फिरवला. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले. हातातोंडाशी आलेले पिक, वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डिसेंबर २०१४पर्यंत पाचशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे. मात्र, २०१५ वर्षांत अवघ्या तीन महिने १८ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचा आकडा आहे.

प्रशासनाच्या चौकशीनंतर या पैकी केवळ १४४ आत्महत्यांच्या प्रकरणांना पात्र, ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित तर विविध करणांमुळे ३५ आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात येणारा मदतीचा लाभ, ११८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच मिळाला आहे. जानेवारी ते १८ एप्रिल २०१५ या कालावधीत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. त्या पाठोपाठ औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येकी ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. वर्षभरापूर्वी घेतलेले पीककर्ज, शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त न होणे, शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नाही तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण नसल्याच्या कारणांमुळे या आत्महत्यांच्या प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याची शक्यता, शिवसेनेच्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे. काही अपक्षांची मदत घेतली तर भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवून शिवसेना सत्ता स्थापन करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे.

शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असा अंदाज पक्षातील अंतर्गत गोटाने व्यक्त केला आहे. पाच ते सहा बंडखोरांसह शिवसेनेचे ५१ नगरसेवक निवडून येतील. महापौरपद मिळविण्यासाठी ५७ नगरसेवकांचे पाठबळ हवे आहे. '५७' हा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला सहा नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यासाठी शिवसेनेचे काही नेते आतापासूनच निवडून येऊ शकणाऱ्या अपक्ष नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने महापौरपद काबीज करण्याची व्यूहरचना आतापासूनच आखली जात आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला जाणीवपूर्वक सरकारमध्ये सामावून घेतले नाही. शिवसेनेला काही दिवस तिष्ठत ठेवून उशिरा सत्तेत स्थान दिले. हे स्थान देताना सेनेच्या वाट्याला दुय्यम खाती कशी मिळतील याचाही काळजी घेतली. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद हवे होते. भाजपने ही दोन्ही पदे शिवसेनेच्या हाती लागू दिली नाहीत.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जशी खेळी खेळली, तशीच खेळी औरंगाबाद महापालिकेत सत्ता स्थापनेच्या वेळी करण्याचा विचार शिवसेना करीत आहे. अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेचा महापौर करून भाजपला काही महिने तिष्ठत ठेवण्याची व्यूहरचना त्यातूनच आकारास आली आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.

एमआयएमचे सावट अन् प्रभावी प्रचार

पालिका निवडणुकीवर असलेले एमआयएमचे सावट आणि शिवसेना नेते, पालकमंत्री रामदास कदम यांनी केलेला प्रभावी प्रचार त्यामुळे पक्षाला पन्नाशी सर करता येईल, असे मानले जात आहे. शिवसेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य प्रचारात व्यग्र असले तरी त्यांना आपल्या नातेवाईक असलेल्या उमेदवारांकडेच जास्त लक्ष द्यावे लागले. त्यामुळे सगळी भिस्त रामदास कदम यांच्यावर होती. आक्रमक शैलीत भाषण करीत त्यांनी मैदान मारण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासोड्यात आढळला मानवी सांगडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जाफ्राबाद तालुक्यातील पासोडा शिवारात एक अनोळखी मानवी सांगडा छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पासोडा ता.जाफ्राबाद येथील गावालगत असलेल्या अॅड. शिंदे यांच्या शेताजवळ रविवारी सकाळी ८ वाजता एका अनोळखी मानवी सांगडा दिसून आला. ज्यामध्ये कवटी, हाताचे दोन हाड, पायाचे दोन हाड सापडले. तसेच काही अंतरावर पोपटी रंगाची साडी, मेहंदी रंगाचे ब्लाऊज व पिवळ्या रंगाचा परकर आढळला. ज्यामुळे हा सांगडा महिलेचा असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा तर हा प्रकार नाही ना अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जाफ्राबाद तालुक्यातील पासोडा शिवारात सांगडा सापडला आहे. परंतु, महिलेचा आहे की पुरुषाचा आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपाताचा प्रकार आहे की नाही हे सांगता येत नाही असे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप युतीला मतदार कंटाळले

$
0
0

औरंगबाद : 'गेल्या २५ वर्षांत शिवसेना-भाजप युतीने शहराला लुटले आहे. शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. समांतर भ्रष्टाचार वाहिनी घराघरातून वाहिली. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये भ्रष्टाचाराचा चिखल झाला आहे. कचऱ्यातून भ्रष्टाचाराचा कुबट वास येत आहे. जनता याला कंटाळली असून आता युतीची सद्दी संपली. पालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकणार,' असा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले,'या निवडणुकीत आम्ही ताकदीने उतरलो. सक्षम उमेदवार दिले. औरंगाबादकरांना वास्तवाची जाणीव झाली असून ते आमच्या पारड्यात मत टाकतील. चार दिवसांआड पाणी मिळते. रस्त्यावर खड्डे, कचऱ्याचे ढीग याला जनता कंटाळली आहे. ठिकठिकाणी आम्हाला मिळालेला प्रतिसाद पाहता आमचे 'मिशन ६० प्लस' नक्की यशस्वी होईल. महापौर आमचाच होईल,' असा दावा सावंत यांनी केला. शिवसेना-भाजपने राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. अकार्यक्षमता लपवून ठेवण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तांत्रिक बाबी माहीत नसताना आघाडीवर आरोप करत आहेत. त्यांना नुसते लुटणे माहीत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला. याप्रसंगी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरपर्यंत मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणूक प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रामदास कदम, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्यासह नेते, मंत्र्यांच्या पदयात्रांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. स्थानिक नेत्यांच्या बरोबरीने राज्यस्तरावरील नेत्यांनी अखेरपर्यंत प्रचाराचा धडाका लावल्याने निवडणुकीतील चुरस कमालीची वाढली आहे. बंडखोर तसेच अपक्षांनीही जोर लावल्याने अनेक वॉर्डात विविध पक्षांच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

गेल्या २८ वर्षांपासून महापालिकेची सत्तासूत्रे ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेना-भाजप युतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार असल्याने शहराचा कारभारही आपल्या हाती राहावा, यासाठी युतीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने शहरात प्रवेश केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराची शिकस्त केली. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी वॉर्डात अभिनेते अमोल कोल्हे यांची सभा झाली. पालकमंत्री रामदास कदम यांनीही या सभेत आक्रमकपणे विरोधकांवर हल्ला चढविला. कोल्हे व कदम यांनी सभेबरोबरच अन्य वॉर्डातही प्रचार फेऱ्यांत सहभाग घेत निवडणुकीतील वातावरण अधिकच तापविले. जलसंपदामंत्री आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी उल्कानगरी, पवननगर, यादवनगर आदी वॉर्डांमध्ये प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका घेतल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार स्मिता वाघ, देवयानी फरांदे यांनी सिडको, गारखेडा आदी भागात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मयूरपार्क, अंबिकानगर, जयभवानीननगर आदी भागांत प्रचार बैठका घेतल्या. भाजप नेत्यांनी शेवटच्या तासापर्यंत प्रचाराचा धडाका लावला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री रामदास कदम यांनी संयुक्तपणे युतीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी विविध वॉर्डातील उमेदवारांसाठी प्रचार फेऱ्या काढल्या. काही वॉर्डांत पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला आणि मतदारांच्या गाठीभेटीवरही त्यांनी भर दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३०० कोटींची पर्यटननगरी

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

'औरंगाबादमध्ये ३०० कोटींची पर्यटननगरी आकार घेणार आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम २०० एकर जागेवर काही महिन्यात सुरू होईल,' अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी (२० एप्रिल) 'मटा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

पालकमंत्री म्हणून कदम यांनी सूत्रे स्वीकारली आणि जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची आखणी केली. त्यासंदर्भात त्यांनी 'मटा'शी दिलखुलास चर्चा करून आगामी उपक्रमांची माहिती दिली. कदम म्हणाले, 'औरंगाबादपासून ५ ते ७ किमीवर पर्यटननगरीसाठी २०० एकर जागा निश्चित केली. येत्या पंधरा दिवसात ही जागा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष दाखवली जाईल. मुंबईतले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, संयुक्त महाराष्ट्राचे दालन आणि औरंगाबादेतील हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय या तिन्ही वास्तू उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाल्या. पर्यटननगरीच्या संदर्भातही त्यांच्या काही संकल्पना आहेत. त्यानुसार या जागेचा विकास केला जाणार आहे. त्या जागेवर केवळ प्राणिसंग्रहालय न बनविता विविध प्रकल्प विकसित केले जातील. या कामासाठी बजेटमध्ये ३०० कोटी राखून ठेवले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी सहकार्य केले.'

समांतर जलवाहिनीः 'समांतर जलवाहिनी प्रकल्पातील त्रुटी दूर करू. येत्या पाच महिन्यांत या योजनेतून नागरिकांना २४ तास शुध्दपाणी मिळेल. हे काम सुरू केले नसते, तर केंद्राचा निधी परत गेला असता. भविष्यात ही योजना झाली नसती. या योजनेचा भार नागरिकांवर पडू देणार नाही,' असे कदम म्हणाले.

रस्ते विकासः 'पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी शहरातील आठ रस्त्यांची कामे सुरू केली, पण निधी दिला नाही. आपण पालकमंत्री झाल्यावर रस्ते विकासासाठी भरघोस निधी दिला. आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासासाठी २५ कोटी दिले. डीपीडीसीतून आपण १५ कोटींचा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून ३० कोटी दिले. या निधीतून रस्त्यांची कामे सुरू होतील. रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी क्वालिटी कंट्रोलची सक्ती करू. अजिंठा-वेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यांना विशेष प्राधान्य देऊ. पालिकेला आर्थिक शिस्त लावणार आहे. प्रत्येक महिन्याला शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन पालिकेच्या महसूल वाढीबद्दल प्रयत्न केले जातील. गुंठेवारी भागातील घरे नियमित झाल्यावर पालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. त्याचा फायदा विकास कामांना होईल. त्यामुळे अर्थसंकल्प फुगवण्याची वेळ येणार नाही,' असे कदम म्हणाले.

आराखड्याला स्थगिती

शहराच्या विस्तारित विकास आराखड्याला आपण स्थगिती दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी योग्य होत नाही असे लक्षात आले आहे. विस्तारित विकास आराखडा विशिष्ट अधिकाऱ्यांनी हितसंबंध जोपासत तयार केल्याचे लक्षात आल्यामुळे या आराखड्याला स्थगिती दिली आहे' असे कदम यांनी सांगितले.

उद्धव महापौर ठरविणार

महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातीलच महापौर होणार का, असा प्रश्न कदम यांना विचारला असता ते म्हणाले, 'महापौर कोण असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील. त्यांचाच तो अधिकार आहे. शिवसेनेचे बंडखोर निवडून आले तरी त्यांच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही,' असे त्यांनी ठासून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या टप्प्यात दणकेबाज प्रचार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेसाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी दणकेबाज प्रचार करून वातावरण ढवळून टाकले. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपाइ, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी गेल्या चार दिवसांत मॅरेथॉन प्रचार करून खऱ्या अर्थाने निवडणुकीचा आखाडा गाजवून सोडला.

वांद्रे पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक गेल्या आठवड्यात झाली. त्याचा निकाल १५ एप्रिल रोजी लागला. काँग्रेसने शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष मुंबईत लागले होते. तेथील निकाल जाहीर झाल्यानंतरच औरंगाबादकडे सर्वपक्षीय नेत्यांनी येण्यास सुरवात केली. शिवसेना-भाजप युतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी जाहीरनामा प्रसिद्ध करून निवडक वॉर्डातून उमेदवार देऊन आखाड्यात तेवढ्याच ताकदीने उतरत असल्याचे संकेत दिले होते. एमआयएमविषयी विधानसभा निवडणुकीपासून प्रचंड उत्सुकता आहे. रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही सभा घेतल्या.

गुरुवार ते रविवार प्रचारसभांची धूम होती. दिवसभरात तीन ते पाच सभा घेऊन नेत्यांनी १११ वॉर्डांमधील वातावरण तापविले. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडत शहराच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी मताचा जोगवा मागितला. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने पाहिले. पुढची चार वर्षे कुठल्याही निवडणुका नसल्याने राजकीयदृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करण्यात कोण यशस्वी होईल, याचे उत्तर गुरुवारी मिळणार आहे.

राज्यभरातील नेत्यांची प्रचारासाठी शहरात हजेरी

शिवसेना : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई, आमदार नीलम गोऱ्हे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार अर्जून खोतकर.

भाजप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राम शिंदे, दिलीप कांबळे, आमदार चेनसुख संचेती, स्मिता वाघ.

काँग्रेस : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री नितीन राऊत, आरेफ नसीम खान, डॉ. विश्वजित कदम, प्रवक्ते सचिन सावंत.

राष्ट्रवादी काँग्रेस : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण.

एमआयएम : पक्षप्रमुख असदुद्दिन ओवेसी, आमदार अकबरुद्दिन ओवेसी, वारीस पठाण, जफर हुसेन.

रिपाइं : खासदार रामदास आठवले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीः आमदार जोगेंद्र कवाडे.

रिपब्लिकन सेनाः पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर.

समाजवादी पार्टीः आमदार अबू आजमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात दररोज २ शेतकरी आत्महत्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीषण दुष्काळ आणि गारपीटीच्या दुष्टचक्रात मराठवाड्यातला शेतकरी अडकला आहे. कर्जबाजारीपणामुळे दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या १०८ दिवसांत २५५ शेतकऱ्यांनी, तर गेल्या वर्षभरात पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातून दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. ऐन पावसाळ्यात वरुणराजाचा रुसवा सुरू होतो. त्याची मनधरणी करता-करता शेतकऱ्यांची आयुष्य उद्धवस्त होत आहेत. यंदाही दुष्काळाची भीषणता कायम आहे. अनेक भागांत कसेबसे पिक तगले आणि आले. मात्र, या पिकांवरही अवकाळी पावसाने नांगर फिरवला. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले. हातातोंडाशी आलेले पिक, वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डिसेंबर २०१४पर्यंत पाचशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे. मात्र, २०१५ वर्षांत अवघ्या तीन महिने १८ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचा आकडा आहे.

प्रशासनाच्या चौकशीनंतर या पैकी केवळ १४४ आत्महत्यांच्या प्रकरणांना पात्र, ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित तर विविध करणांमुळे ३५ आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात येणारा मदतीचा लाभ, ११८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच मिळाला आहे. जानेवारी ते १८ एप्रिल २०१५ या कालावधीत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. त्या पाठोपाठ औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येकी ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. वर्षभरापूर्वी घेतलेले पीककर्ज, शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त न होणे, शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नाही तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण नसल्याच्या कारणांमुळे या आत्महत्यांच्या प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याची शक्यता, शिवसेनेच्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे. काही अपक्षांची मदत घेतली तर भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवून शिवसेना सत्ता स्थापन करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे.

शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असा अंदाज पक्षातील अंतर्गत गोटाने व्यक्त केला आहे. पाच ते सहा बंडखोरांसह शिवसेनेचे ५१ नगरसेवक निवडून येतील. महापौरपद मिळविण्यासाठी ५७ नगरसेवकांचे पाठबळ हवे आहे. '५७' हा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला सहा नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यासाठी शिवसेनेचे काही नेते आतापासूनच निवडून येऊ शकणाऱ्या अपक्ष नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने महापौरपद काबीज करण्याची व्यूहरचना आतापासूनच आखली जात आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला जाणीवपूर्वक सरकारमध्ये सामावून घेतले नाही. शिवसेनेला काही दिवस तिष्ठत ठेवून उशिरा सत्तेत स्थान दिले. हे स्थान देताना सेनेच्या वाट्याला दुय्यम खाती कशी मिळतील याचाही काळजी घेतली. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद हवे होते. भाजपने ही दोन्ही पदे शिवसेनेच्या हाती लागू दिली नाहीत.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जशी खेळी खेळली, तशीच खेळी औरंगाबाद महापालिकेत सत्ता स्थापनेच्या वेळी करण्याचा विचार शिवसेना करीत आहे. अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेचा महापौर करून भाजपला काही महिने तिष्ठत ठेवण्याची व्यूहरचना त्यातूनच आकारास आली आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.

एमआयएमचे सावट अन् प्रभावी प्रचार

पालिका निवडणुकीवर असलेले एमआयएमचे सावट आणि शिवसेना नेते, पालकमंत्री रामदास कदम यांनी केलेला प्रभावी प्रचार त्यामुळे पक्षाला पन्नाशी सर करता येईल, असे मानले जात आहे. शिवसेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य प्रचारात व्यग्र असले तरी त्यांना आपल्या नातेवाईक असलेल्या उमेदवारांकडेच जास्त लक्ष द्यावे लागले. त्यामुळे सगळी भिस्त रामदास कदम यांच्यावर होती. आक्रमक शैलीत भाषण करीत त्यांनी मैदान मारण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासोड्यात आढळला मानवी सांगडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जाफ्राबाद तालुक्यातील पासोडा शिवारात एक अनोळखी मानवी सांगडा छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पासोडा ता.जाफ्राबाद येथील गावालगत असलेल्या अॅड. शिंदे यांच्या शेताजवळ रविवारी सकाळी ८ वाजता एका अनोळखी मानवी सांगडा दिसून आला. ज्यामध्ये कवटी, हाताचे दोन हाड, पायाचे दोन हाड सापडले. तसेच काही अंतरावर पोपटी रंगाची साडी, मेहंदी रंगाचे ब्लाऊज व पिवळ्या रंगाचा परकर आढळला. ज्यामुळे हा सांगडा महिलेचा असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा तर हा प्रकार नाही ना अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जाफ्राबाद तालुक्यातील पासोडा शिवारात सांगडा सापडला आहे. परंतु, महिलेचा आहे की पुरुषाचा आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपाताचा प्रकार आहे की नाही हे सांगता येत नाही असे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images