Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बसमध्ये चढताना दागिने लंपास

$
0
0

औरंगाबाद : एसटी बसमध्ये चढत असताना एका महिलेचे ४० हजार रुपयांचे दागिने चोरट्यानी लंपास केले. ही घटना मंगळवारी (२८ एप्रिल) हर्सूल टी पॉइंटजवळ घडली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल्याबाई गाडेकर (वय ५५, मुळ रा. चिंचोली, सध्या रा. एन ९) या खामगावला जाण्यासाठी हर्सूल टी पॉइंट चौकात आल्या होत्या. बसमध्ये चढताना अज्ञात चोराने त्यांच्या कापडी पिवशीची चेन उघडून सोनसाखळी व एकदानी, असा ४० हजार रुपयांचा ऐवज चोरला. हा प्रकार कौशल्याबाईंच्या लक्षात काहीवेळानंतर आला. याप्रकरणी जमादार शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मामा, मावशीची भाच्याला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घर रिकामे करण्याच्या वादातून मामा व मावशीने भाच्याला मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (२८ एप्रिल) फाजलपुऱ्यात घडली. सय्यद काशीद (वय २०) याला राहील शेख गुलाम दस्तगीर व शकिरा परवीन दस्तगीर (रा. एसटी, कॉलनी, फाजलपुरा) यांनी घर रिकामे करण्यास सांगितले. काशीद यांने त्याबद्दल आईसोबत चर्चा करा, असे सांगितले. त्याचा राग आल्याने दोघांनी काशीदला लाकडी स्टंपने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा हात मोडला आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानुदासनगरातून कार चोरी

भानुदासनगर येथील पंडित पळसकर यांची कार (एम. एच. २०. वाय ८५४९) चोरांनी घरासमोरून रविवारी रात्री पळवून नेली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केदारेंच्या लॉकरमध्ये सापडले २९ तोळे सोने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रीडा अधिकारी विशाखा केदारे यांच्या बँक लॉकरच्या झडतीत २९ तोळे सोने, अडीच किलो चांदी सापडली आहे. अॅन्टी करप्शन विभागाने व्यायामशाळतील साहित्य खरेदी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच घेताना विशाखा केदारे व गौतम साळवे या दोन क्रीडा अधिकाऱ्यांना पकडले आहे. विशाखा केदारे यांच्या डीसीबी बँकेच्या लॉकरची तपासणी केली. या तपासणीत लॉकरमध्ये २९ तोळे सोने व अडीच किलो चांदी सापडली. केदारे यांच्याकडे दोन चारचाकी, तीन दुचाकी वाहने आहेत. दुसरे क्रीडा अधिकारी गौतम साळवे यांच्या घरझडतीत काही आक्षेपार्ह सापडले नाही, अशी माहिती देण्यात आली. कोर्टाने त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी उपाध्यक्षपुत्रास ३४ हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन स्पर्धेत साडेबारा लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी छावणी परिषद उपाध्यक्षांच्या मुलाला गंडवले. त्यांची ३४ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

छावणी परिषदेचे उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांचा मुलगा ‌अमित याच्या मोबाइलवर मंगळवारी सकाळी आठ वाजता एक मेसेज आला. त्यात ऑनलाइन स्पर्धेत अमित यांना १२ लाख ६० हजार रुपयांचे प्रथम बक्षीस लागल्याचा उल्लेख होता. बक्षिसाच्या रकमेसाठी सुमीत अग्रवाल व रतनलाल भगत यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले होते. अमित यांनी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर बक्षिसाच्या रक्कमेवरील व्हॅट व इतर करापोटी २५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. सायबर भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर २५ हजार रूपये भरली. त्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी ९ हजार ६०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. अमित यांनी ही रक्कम सुद्धा भरली. ही रक्कम काढून घेतल्यानंतर त्या भामट्यांनी अमितसोबत संपर्क तोडला. वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अमित यांनी वडील किशोर कच्छवाह यांना यांना ही माहिती सांगितली. कच्छवाह यांनी बुधावारी सकाळी अमितला सोबत घेऊन सायबर सेलमध्ये पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौदात पडून वकिलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी काढताना तोल जाऊन हौदात पडून बुडाल्याने एका वकिलाचा बुधवारी (२९ एप्रिल) मृत्यू झाला. दिलीप शिवप्रसाद इंदानी (वय ४९, रा. मातोश्रीनगर, गारखेडा, प्लॉट क्रमांक ११५) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अॅड. इंदानी बुधवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉकहून परतल्यानंतर बाथरूमला जाण्यासाठी हौदातून पाणी घेताना त्यांचा तोल गेला. हौदात पडल्याने नाकातोंडात पाणी जाऊन इंदानी बेशुद्ध पडले. ही घटना सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. इंदानी याना मधुमेहाचा आजार असल्याने घेरी येऊन ते हौदात पडले असावेत, अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली. याप्रकरणी नोंद घेऊन मुकुंदवाडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांची शुगर अन् खासदारांची चिडचिड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्री रामदास कदम यांना असलेला शुगरचा त्रास, त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांची झालेली चिडचिड आणि पालकमंत्र्यांच्या पाठोपाठ महापौर त्र्यंबक तुपे यांची 'सुभेदारी'वारी या घडामोडींमुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या नंतर वेगळेच नाट्य रंगले.

महापौर -उपमहापौरपदाची निवडणूक झाली. त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा यांच्यासह भाजपचे आमदार अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, डॉ. भागवत कराड व अन्य पदाधिकारी नूतन महापौर त्रिंबक तुपे यांची वाट पहात महापौरांच्या दालनात बसले होते. तिकडे सभागृहत निवडणूक झाली, निकालही जाहीर करण्यात आला. त्यानंतर तुपे सभागृहाच्या बाहेर पडले. पालिकेच्या आवारात कार्यकर्ते जल्लोष करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तुपे थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन मिसळले. इकडे दालनात नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. तेवढ्यात पालकमंत्र्यांनी बिस्कीट आणण्याचे फर्मान सोडले. पाच - दहा मिनिटे झाली तरी बिस्कीट काही येईनात. त्यामुळे ते मावळत्या महापौर कला ओझा यांना उद्देशून म्हणाले, 'तुम्ही नुसत्याच महापौर दिसता. काही बिस्कीट वगैरे आहेत की नाही.' त्यावर गोऱ्यामोऱ्या होत ओझा यांनी टेबलवरची बेल दाबली, पण त्याला कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तेवढ्यात पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा बिस्कीटाची आठवण केली. त्यावर ओझा म्हणाल्या, 'पिशवी भरून बिस्किटे आणली होती. आता ती कुठे गेली काहीच कळत नाही. ओझा यांच्या या अवस्थेमुळे खासदार खैरेही संतापले. कर्मचाऱ्यांना बोलवा असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्ते काही हालायला तयार नव्हते. हा सगळा रागरंग पालकमंत्री पहात होते. शेवटी ते कुणाशीही न बोलता महापौर दालनाच्या बाहेर पडले. पालकमंत्री सहज उठून गेले असतील असे सर्वांना वाटले. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी ते परतले नाहीत. त्यामुळे खैरे यांच्यासह सर्वच नेत्यांचे इंडिकेटर लागले. इतक्यात कुणीतरी निरोप आणला. पालकमंत्री गाडीत बसून सुभेदारी विश्रामगृहात निघून गेले आहेत. पालकमंत्री कसे काय निघून गेले, त्यांना राग आला का, नेमके काय झाले, अशी चर्चा सुरू झाली. पालकमंत्री गाडीत बसून बाहेर निघून जाताना त्रिंबक तुपे यांनी पाहिले. तुपेही त्यांच्या मागे गेले. इकडे दालनात सर्वच नेत्यांची घालमेल सुरू झाली. काय करावे काहीच कळेना. त्यामुळे खैरे यांची चिडचिड वाढली. त्यांनी आपला राग महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर काढला. तितक्यात तुपे परतले.

महापौर आले, महापौर आले अशी कुजबूज सुरू झाली, पण पालकमंत्री येणार की नाही या बद्दलचा सस्पेन्स कायम होता. काही वेळांनी पालकमंत्रीही आले. त्यानंतर तुपे यांना महापौरपदाची सूत्रे बहाल करण्याचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम होताना पालकमंत्र्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'मला शुगरचा त्रास आहे. त्यामुळे मी विश्रामगृहात गेलो होतो. आता ठीक आहे. उगीच गैरसमज नको म्हणून मी खुलासा करीत आहे.'

चॉकलेटचा खुमासदार धमाका

नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बिस्कीटाची चर्चा सुरू होती, पण बिस्कीट काही येत नव्हते. शेवटी खासदार चंद्रकांत खैरे यांनीच पुढाकार घेतला आणि बिस्कीटे मागवली. बिस्कीटाच्या प्लेटस् टेबलवर ठेवण्यात आल्या. बिस्कीट पाहून पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, 'आले आले खैरेंचे बिस्कीट आले.' त्यावर एका नेत्याने उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना, 'खैरेंना चॉकलेट देण्याची सवय आहे. त्यांनी बिस्कीट कसे काय आणले,' असा प्रश्न उपस्थित केला आणि दालनात हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडेंच्या पुण्याईने घडमोडेंची बाजी

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत रामनगर वॉर्डातून भारतीय जनता पक्षाचे भगवान घडमोडे निवडून येण्याचे कारण म्हणजे कै. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग. त्या वर्गाने घडमोडेंना केलेले मतदान. या वॉर्डातील मतदारांनी उमेदवार न पाहता मतदान केले हे ही तितकेच खरे. तरीही विद्यमान नगरसेवक घडमोडेंना विजयी होण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला.

ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रामनगर वॉर्डात घडमोडेंपुढे काँग्रेसचे प्रल्हाद बनसोडे, राष्ट्रवादीच्या भाग्यश्री राजपूत आणि सोनाजी गिरी, कैलास आघुडे, राजेंद्र तोरडमल, शिवाप्पा बेंद्रे या चार अपक्षांनी आव्हान दिले होते. शिवसेना बंडखोर व अपक्षांनी अशी फिल्डिंग लावली की भाजपचे शहराध्यक्ष असूनही घडमोडेंना स्वतःच्याच वॉर्डात अडकून पडावे लागले. त्यामुळे दुसऱ्यांचा प्रचार करण्याचा विचार सोडाच. अखेरच्या टप्प्यात उमेदवारांनी जोर वाढवला. या वॉर्डात एकूण ७,६२० मतदार आहे. विकास कामे आणि जातनिहाय मतदानाची टक्केवारी यावरून निवडून येण्याचे गणित मांडले गेले. अखेरच्या टप्प्यात ही लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होण्याची शक्यता असताना ती लढाई अपक्ष व घडामोडे अशी झाली हे आवर्जून नोंदवावे लागेल. रामनगर, प्रकाशनगर, तानाजीनगर, संघर्षनगर आणि संजयनगर भागातून कोणाला किती मतदान मिळेल, यावर या वॉर्डातील उमेदवाराचा विजय अवलंबून होता.

अखेर चुरस राजेंद्र तोरडमल व घडामोडेंमध्येच झाली आणि घडामोडे विजयी झाले. याआधीही घडामोडे यांनी १९९५मध्ये विठ्ठलनगर, २००५मध्ये रामनगरमधून विजय मिळवला आहे. २०१०मध्ये त्यांनी पत्नी सविता घडामोडे यांना विठ्ठलनगरमधून निवडून आणून नगरसेवकपद घरातच ठेवले होते.

यापूर्वीच्या निवडणुकीत युतीत दगाफटका झाला नव्हता. त्यामुळे घडमोडेंना सलग एकहाती विजय मिळवणे शक्य झाले होते. यंदा शिवसेनेकडून उमेदवारी मागणारे राजेंद्र तोरणमल यांनी अपक्ष अर्ज दाखल करून युतीच्या उमेदवाराला थेट आव्हान दिले होते. बदलेली वॉर्ड रचना, न झालेली कामे आणि आता यावेळी भाजप, शिवसेनेचे नाराज इच्छुक, बंडखोरी यामुळे विद्यमान शहराध्यक्षांच्या नाकी नऊ आले होते.

असे जुळले गणित

वॉर्डात अनुसूचित जातीतील २८५६, अनुसूचित जमातीचे १२७ मतदार होते. एकूण मतदार ७,६२० होते. यात पुरुष ४,१७८ तर महिला ३,४४२ एवढ्या होत्या. यात भगवान घडामोडेंना २ हजार १११ तर तोरडमल यांना १,६३६ मते मिळाली व घडमोडे विजयी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंद्य्रात गळफास घेऊन उद्योजकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा परिसरातील तरुण उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी (२९ एप्रिल) सकाळी उघडकीस आला. अविनाश बाळासाहेब अमृतराव (वय ३२) असे या उद्योजकाचे नाव आहे. ते चिकलठाणा एमआयडीसीमधील देवी इंजिनीअरिंग कंपनीचे मालक होते.

अविनाश अमृतराव हे शेंद्रा परिसरातील बंगल्यामध्ये आई व पत्नीसह राहत होते. मंगळवारी त्यांची पत्नी मावस बहिणीच्या लग्नासाठी मयूरपार्क भागात माहेरी गेली. रात्री त्यांची आई बंगल्यात खालच्या हॉलमध्ये, तर अविनाश वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले होते. सकाळी सहा वाजता त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली. तेव्हा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, अविनाश यांनी छताला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती नातेवाईकांना कळविली. चिकलठाणा पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी रवाना केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुळचे तुळजापूरचे रहिवासी

अविनाश अमृतराव मुळचे तुळजापूरचे (जि. उस्मानाबाद) रहिवासी आहेत. त्यांचे वडील तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी होते. चिकलठाणा एमआयडीसीमध्ये त्यांची डाय बनवण्याची देवी कंपनी आहे. तसेच शेंद्रा येथील एक कंपनी त्यांनी तीस हजार रुपये किरायाने चालवण्यास दिली होती. २००९ साली त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागडेंचे भवितव्य कोर्टाच्या निकालावर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद ‌जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले; मात्र त्यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. या याचिकेच्या निकालावर त्यांचे या निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.

औरंगाबाद तालुका मतदार संघातून राधाकिशन देवराव पठाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 'दत्तप्रसन्न दूध उत्पादक सहकारी संस्था (वरझडी)'चे ते प्रतिनिधीत्व करतात. २०१३-१४ या कालावधीत टंचाई व दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई. त्यामुळे या संस्थेचे दूध संकलन कमी झाले. त्यामुळेच संस्थेला लेखा परिक्षणात 'क' वर्ग मिळाला. त्याचाच आधार घेत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला; मात्र त्यांनी दूध संघाच्या उपविधीतील तरतुदीनुसार सामान्य सभासदांना आवश्यक असणारी पात्रता पूर्ण केली आहे. त्यांच्या संस्थेला २०१४-१५ या कालावधीसाठी 'ब' वर्ग मिळालेला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात यावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. जिल्हा विभागीय निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनीही राधाकिशन पठाडे यांचे अपील फेटाळून लावले. या निर्णयाला पठाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. याचिका दाखल करून घेऊन याचिकेच्या अधीन राहून दूध संघातील उमेदवारी हरिभाऊ बागडे यांचे भवितव्य असणार आहे. या याचिकेची सुनावणी न्या. सुनील देशमुख यांच्यासमोर झाली. याचिकाकर्त्यांची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली. या याचिकेची पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे, वाहतूक कोंडीचा टीव्ही सेंटर चौकात वैताग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेशिस्त पार्किंग, हातगाड्यांचे अतिक्रमण आणि खड्डेमय रस्ते यांमुळे टीव्हीसेंटर चौकात कायम वाहतुकीची कोंडी होते. त्यातून सुटका करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने वाहनधारक वैतागले आहेत.

एसपीआय संस्था, पोलिस अधीक्षक कार्यालय, मजनू हिल, शरद टी पॉइंटकडून या चौकात रस्ते येतात. या चारही रस्त्यांवर फेरीवाले, भाजी-फळ विक्रेते, खाद्यपदर्थ विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रस्ता निमूळता झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद टी पॉइंट; तसेच एसपीआय संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू अाहे. त्यामुळे एका बाजुची वाहतूक बंद आहे. यामुळे दोन्ही रस्त्यांवर सायंकाळी गर्दी होते. सायंकाळी या रस्त्यांवर फळे व भाजी विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. पसिरामध्ये कुठेही पार्किगची सोय नाही. फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांसमोरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. परिणामी दररोज किरकोळ अपघा. आणि भांडणे होतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती असलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक वर्षांत चौकाची डागडुजीही करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनधारक व पादचारी वैतागले आहेत.

रिक्षांचालकांची मनमानी : चौकाच्या शेजारीच रिक्षांसाठी वेगळा थांबा तयार करण्यात आला आहे, मात्र येथे रिक्षा तेथे न थांबता बस स्टॉप आणि चौकाच्या आजुबाजुला उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पोलिस चौकी आणि रिक्षा पार्किंग समोरासमोर आहे, मात्र पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतात.

सिग्नल, कारंजे बंद

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच पोलिस चौकी आहे. या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल बसविण्यात आले आहेत, मात्र काही दिवसांतच सिग्नल बंद पडले. त्यामुळे याचौकात वाहतुकीला शिस्त राहिली नाही. पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असले तरी पाण्याअभावी कारंजे बंद आहेत. जयंती उत्सव प्रसंगीच हे कारंजे सुरू करण्यात येतात.

टीव्ही सेंटर चौक परिसरातील रस्त्यांना निधी वेळेवर मिळाला नाही. त्यामुळे चौक व परिसर बकाल झाला. डागडुजी करण्यासाठीही अनेक अडचणी आल्या. मी, मोहन मेघावाले, किशोर नागरे यांनी महापालिकेत टीव्ही सेंटर चौकाच्या संदर्भात अनेकदा आवाज उठवला होता. आता निधी प्राप्त झाला असून, बहुतांश रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. निधी मंजुरीसाठी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही प्रयत्न केले.

- महेश माळवतकर, माजी नगरसेवक

टीव्ही सेंटर चौकालगत असलेले रस्त्यांसाठी आम्ही सर्वांनी मिळून निधी आणण्याचा प्रयत्न केला. रस्त्या व चौकाचे काम मंजूर होते. कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्यामुळे कामाला विलंब झाला, मात्र पालकमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने कामांना गती मिळाली आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मी व महेश माळवतकर यांनी संभाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी आणला. कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करू.

- मोहन मेघावाले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल टंचाईच्या शक्यतेने पंपांवर वाहनांच्या रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पानेवाडी डेपोतून पेट्रोलचा पुरवठा अचानक बंद करण्यात आला आहे. पंप चालकांना लोणी येथून पेट्रोल घेण्याचे आदेश हिदुस्थान पेट्रोलिअम कंपनीने दिल्यानंतर शहरात पेट्रोल टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी गर्दी केली.

शहरातील पेट्रोल पंपांना पानेवाडीच्या आइल डेपोतून इंधन पुरवठा केला जातो. गुरुवारी औरंगाबादच्या चार ते पाच पेट्रोल पंप चालकांचे टँकर पानेवाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पेट्रोल देण्यात आले नाही. पानेवाडीत पेट्रोल नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोल‌िअमच्या अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी शहरातील काही पंपांवर सायंकाळपर्यंत पेट्रोल नव्हते. एचपी कंपनीच्या पंपावर पेट्रोल विक्री बंद झाल्याचा ताण अन्य पंपावर पडला. तेथे पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लागल्या. संभाव्य टंचाईमुळे शुक्रवारी काही पंपांवरील पेट्रोल संपण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षांपासून पानेवाडी आइल डेपोमध्ये उन्हाळ्यात पेट्रोलचा ठणठणात होतो. त्यामुळे या डेपोत येणाऱ्या वाहनांना लोणी येथील डेपोतून पेट्रोल घ्यावे लागते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील आइल डेपो बंदकरून पानेवाडीत शिफ्ट करण्यात आला. तेथून मराठवाड्यासह खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा केला जातो. इंधन पुरवठ्यात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे औरंगाबाद येथे ऑइल डेपो उभारावा, अशी मागणी आहे.

- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांनी धरले शहर वेठीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मनात येईल तो मार्ग, मनात येईल तो थांबा, प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमधील स्पर्धा, मनमानी पद्धतीने भाडेवसुली, बंद असलेले मीटर आदींमुळे शहरात रिक्षांतून प्रवास करणे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक होऊन बसले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी नागरिकांना सहन करावी लागत आहे.

रेल्वे स्टेशनहून शहागंज किंवा टीव्ही सेंटरकडे जाण्यासाठी शंभर ते दिडशे रुपये मोजावे लागतात. पैसे वाचवायचे असतील तर शेअर रिक्षा करून २० ते ३० रुपयांत जावे लागते. स्टेशनहून साताऱ्याकडे जाण्यासाठी रिक्षाचालक किमान दोनशे रुपयांची मागणी करतात. साताऱ्यातून परतताना भाडे मिळत नाही, असे कारण सांगितले जाते. मीटरप्रमाणे भाडे आकारणीसाठी कायम नकार दिला जातो. शहरात एकही रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नाही. जवळच्या एखाद्या ठिकाणी जाण्यास रिक्षाचालक नकार देतात, हे सर्वसामान्य नागरिकांचे अनुभव आहेत.

शेअरिंग रिक्षा चालकांची वर्तणूक चांगली नसते. विशेषः महिलांना रिक्षाप्रवासात त्रास सहन करावा लागतो. शेअरिंग रिक्षांतून प्रवासाचा अनुभव अत्यंत त्रासदायक आहे. प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला कोठेही अचानक वळण घेऊन रिक्षा थांबविली जाते. त्यामुळे अन्य वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागतात. अचानक रिक्षा थांबविण्याच्या प्रकारांमुळे वाहतुकीच्या कोंडीचेही प्रकार घडतात.

बेशिस्त रिक्षांची शहरभरात फेरी : शहरात मिनीडोअर रिक्षा दाखल झाल्यानंतर हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या रिक्षांना शहरात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मिनीडोअर रिक्षांमध्ये प्रवासी क्षमता जास्त असल्याचा फटका शहरातील रिक्षाचालकांना बसत होता. यामुळे या रिक्षांवर निर्बंध घालण्यात आले होते, मात्र हे आदेश धाब्यावर बसवूत शहरात अॅपे रिक्षांतून सर्रास प्रवासी वाहतूक सुरू आहे. शहराच्या विविध रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षांची संख्याही वाढली आहे.

सिटी बसचे अस्तित्व किरकोळ : शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी महामंडळाकडे आहे. सध्या शहरात केवळ २९ बस धावतात. संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना या सेवेची खात्री वाटत नाही. त्यामुळे सिटी बसला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर शहराच्या मध्यवस्तीत सिटी बस सेवा नाही. यामुळे नागरिकांसमोर रिक्षांतून प्रवासाशिवाय पर्याय उरला नाही.

प्री-पेड रिक्षा योजना कुचकामी : मुंबई आणि पुणे शहरांप्रमाणे औरंगाबादेत रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर प्री-पेड रिक्षा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली.

स्मार्ट स्टिकर योजनाही बारगळली : शहरात रिक्षा चालकांवर होणारी कारवाई ही एकतर्फी असते. चालकांकडे सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही पोलिस किंवा आरटीओंकडून कारवाई केली जाते, अशा तक्रारी होत्या. वाहतूक पोलिस आणि काही रिक्षा संघटनांच्या पुढाकारातून स्मार्ट स्टिकर योजना राबविण्यात आली. या योजनेत अनेक चालकांनी रिक्षांच्या मालकीची पूर्ण कागदपत्रे भरून घेतली, मात्र ही योजना आतापर्यंत राबविण्यात आली नाही.

अडीच हजार रिक्षांवर कारवाई: शहरातील बेशिस्त वाहतुकीबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर पोलिस आणि आरटीओ यांच्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे अडीच ते तीन हजार रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. काही रिक्षा चालकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सुमारे साडेचारशे ते पाचशे रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.

शेअर रिक्षांचे भाडे ठरविले : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने शेअर रिक्षांमध्ये प्रतिप्रवासी दर ठरविले होते. त्यात शहरातील ९९ थांब्यांचा समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय रेल्वे स्टेशनहून ९६ थांब्यांपर्यंतचे भाडे ठरविण्यात आले होते, मात्र प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरांनुसार भाडे आकारले जात नाही.

रोज १५ हजारांवर रिक्षा रस्त्यांवर

सुमारे १२ लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरात सिटी बसची व्यवस्था नावापुरती शिल्लक आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा सर्व भार रिक्षांवर पडला आहे. जिल्ह्यात १७ हजार ७५० रिक्षांना परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे १५ हजारांवर रिक्षा रोज शहरांतील रस्त्यांवर धावत असतात. ग्रामीण भागासाठी परवाने असलेल्या रिक्षाही शहरात असतात. त्याकडे पोलिस किंवा परिवहन विभाग (आरटीओ) लक्ष देत नाही.

रिक्षा स्टँड कागदावर

शहरात विविध भागांत, त्याचबरोबर अनेक चौकांत पाच ते दहा रिक्षा उभ्या करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी २०० रिक्षा स्टँड निश्चित केले होते, मात्र हे स्टँड अद्याप कागदावरच आहेत. शहरात परमीट नसलेल्या रिक्षा बंद करा, अशी आमची मागणी आहे. सध्या ओला आणि टॅक्सी फॉर शुअर या सेवा सुरू केल्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. शहरात रिक्षा चालकांना नो पार्किंगच्या पावत्या देण्यात येतात. पोलिस, परिवहन विभागाने पावतीप्रेम सोडून शहरात बेकायदा धावणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली पाहिजे. चोरटी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई झालीच पाहिजे.

- अश्फाक सलामी, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन.

शहरात स्क्रॅप रिक्षा, कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करा, अशी आमची मागणी आहे. संबंधित विभाग आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांचे वचक राहिला नाही. शिस्तीत असलेल्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई अन् बेशिस्त रिक्षा चालकांना अभय देण्याचे प्रकार बंद झाल्यास वाहतुकीत सुधारणा होईल.

- निसार अहेमद, अध्यक्ष, संयुक्त रिक्षा चालक कृ‌ती समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील पाणीसाठा तळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी मराठवाड्याला उन्हाचे चटके जाणवू लागले असून उन्हामुळे विभागात असलेल्या लहान मोठ्या प्रकल्पांमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या विभागातील ८३३ प्रकल्पांमध्ये फक्त ११ टक्के (८४३.७५ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या मराठवाड्यात ९७१ गावे व ३३९ वाड्यांची तहान १२५६ टँकर भागवत असून येणाऱ्या महिन्यांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रशासन टँकरची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. टँकर वाढीसाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी होत असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यातूनच टँकर वाढवावे लागणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने सुरू असलेला अवकाळी पावसाचा जोर काही दिवसांपूर्वी कमी झाला. यानंतर सातत्याने तापमान वाढत असल्यामुळे विभागातील पाणीसाठ्यांमध्ये प्रचंड घट होत आहे. महिन्याभरात विभागातील पाणीसाठ्यात तब्बल ४ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना-कोळेगाव या चार मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे. मराठवाड्यातील ११ मोठे, ७५ मध्यम, ७२० लघू प्रकल्प, गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील १६ बंधारे अशा ८३३ प्रकल्पांत सध्या ८४३.७५ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा वेगाने कमी होत असल्याने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

महिन्याभरात ४ टक्क्यांनी घट

वेगाने होत असलेले बाष्पीभवन व पाण्याची गरज वाढल्यामुळे विभागात असलेल्या प्रकल्पांमध्ये एका महिन्यात ४ टक्क्यांची घट झाली आहे. २३ मार्च रोजी विभागात ११५८.०३ (१५ टक्के) दशलक्ष घनमीटर पाणी होते, मात्र आज पाणीसाठ्यामध्ये ३१४. ५५ दशलक्ष घनमीटरने घट होऊन हा साठा ८४३.२७ (११ टक्के) द.ल.घ.मी. शिल्लक राहिला आहे.

मे महिन्यात अडचणी अधिक

पाणीसाठ्यामध्ये वेगाने होत असलेली घट व उपयुक्त पाणीसाठा यामध्ये ताळमेळ बसवताना मे महिन्यामध्ये प्रशासनाची अडचण होणार आहे. मे महिन्यामध्ये पाण्याची वाढती गरज पुरवण्यासाठी प्रशासनाला अधिक टँकर सुरू करावे लागणार आहेत. टँकरसाठीही पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीकडून बच्चेकंपनीचा हिरमोड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या २० वर्षांपासून न चुकता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या औरंगपुरा येथील मैदानावर लायन्स आनंद नगरी भरविली जात होती. यंदा झेडपी प्रशासनाने आपल्या लालफितीच्या कारभारात आनंदनगरीची फाइल अडवून ठेवली. परिणामी, एप्रिल महिना संपतानाही आनंदनगरी सुरू झालेली नाही. सुटीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीची आनंदनगरी न लागल्याने बच्चेकंपनी मात्र नाराज झाली आहे.

लायन्स क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने गेल्या ३५ वर्षांपासून एप्रिल महिन्यात आनंदनगरी भरविली जाते. या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या महसुलातून लायन्स बाल सदन, हॉस्पिटल तसेच अन्य समोजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. पूर्वी निराला बाजार परिसरातील मोकळ्या जागेत आनंदनगरी भरविली जात होती, पण तिथे बांधकाम झाल्यानंतर औरंगपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आनंदनगरी भरते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लायन्स क्लबकडून जिल्हा परिषद प्रशासनाला रितसर पत्र देऊन पुढील व्यवहार निश्चित केले जातात. पाच वर्षांपूर्वी या उपक्रमासाठी दरवर्षी जागा देण्याचे जिल्हा परिषदेने मंजूर केले. शिवाय दरवर्षी दहा टक्के भाडेवाढही करण्याचे ठरले होते. २०१४ मध्ये जागेच्या भाड्यापोटी तीन लाख ८४ हजार रुपये लायन्स क्लबतर्फे जिल्हा परिषदेला दिले गेले. यंदा मात्र लायन्ससाठी मोठी अडचण झाली आहे. १६ मार्चपासून लायन्स परिवारातील सदस्य जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत, पण त्यांना अधिकारी भेटत नाहीत. झेडपीच्या स्थावर मालमत्तांची जबाबदारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची असते. श्री. बावस्कर यांच्या दालनात अनेक चकरा मारल्या तरी त्यांची भेट झाली नसल्याचे लायन्सच्या सदस्यांनी सांगितले. बऱ्याच फालोअपनंतर फाइल तयार झाली. ग्रामविकास खात्याच्या नवीन नियमानुसार तीन लाखांच्या वरच्या कंत्राटासाठी इ टेंडरिंग करावे लागते. आनंदनगरी हा कार्यक्रम मनोरंजनातून महसूल कमाविणे हा नसून सामाजिक उपक्रम म्हणून राबविला जातो. हे माहित असूनही जिल्हा परिषद प्रशासनाने लायन्सला इ टेंडरिंगच्या चर्चेसाठी अडकवून ठेवले.

दरम्यान, दरवर्षी ११ एप्रिलला आनंदनगरी सुरू होते. बेंगलुरू येथील टिटूभाई सबरवाल हे लायनस सदस्य या उपक्रमाची जबाबदारी घेत असतात. यंदा झेडपीने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने ते त्रस्त झाले. दरवर्षीचा उपक्रम असल्याने दिल्ली, उत्तरप्रदेशातून मोठे रहाटपाळणे लावणाऱ्या ट्रक औरंगाबादेत दाखल झाल्या. मैदान अधिकृतरीत्या ताब्यात आल्याशिवाय तिथे सामान उतरवायचे कसे असा प्रश्न संयोजकांसमोर उभा राहिला. इकडे जिल्हा परिषदेत कुणीच जबाबदारी अधिकारी भेटत नव्हते.

दीड महिना तिष्ठत ठेवले

अखेरीस गुरुवारी दुपारी लायन्स क्लब ऑफ औरंगाबादच्या अध्यक्ष सुनिला क्षत्रीय आणि दोन सदस्य जिल्हा परिषदेत आले. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची अधिकाऱ्यांशी भेट झाली. इ टेंडरिंग प्रक्रिया मार्गी लागली. आता पुढच्या तीन - चार दिवसांत मंजुरी मिळेल आणि मगच आनंद नगरी सुरू होणार आहे. एवढ्या छोट्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दीड महिना तिष्ठत ठेवले. त्याचा फटका बच्चेकंपनीला बसला आहे. दरवर्षीची आनंदनगरी अजून सुरू न झाल्याने चिमुकले नाराज झाले आहेत.

केवळ सामाजिक भावनेतून आम्ही हा प्रकल्प राबवितो. परवानगीची प्रक्रिया दरवर्षीची आहे. यंदा एवढा उशीर झाल्याने सगळे नियोजन बिघडले आहे. किमान अशा प्रकल्पासाठी तरी प्रशासनाने सतर्कता दाखवायला हवी.

- सुनिला क्षत्रीय, अध्यक्ष, लायन्स क्लब औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक, बिल्डरकडून फसवणूक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वत:च्या प्लॉटवर घर बांधताना एका ग्राहकाने घेतलेल्या कर्जाची ७५ टक्के रक्कम, बांधकाम अर्धवट असताना बँकेने बिल्डरला दिल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. आपली फसवणूक झाल्याची तक्रार या ग्राहकाने पोलिस आयुक्तालयात दाखल केली आहे.

महाराष्ट्र बँकेच्या वाळूज शाखेतून नामदेव जनार्दन कासार यांनी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. त्यांनी हे कर्ज गारखेड्यातील जयदुर्गा हाउसिंग सोसायटीतील (भारतनगर, बाळकृष्णनगर) स्वत:च्या प्लॉटवर बंगला बांधण्यासाठी घेतले होते. त्यांचे कर्ज बँकेचे शाखा व्यवस्थापक के. एम. राव यांनी १२ मार्च २०१४ रोजी मंजूर केले. कर्जाच्या अटींप्रमाणे घराच्या वेगवेगळ्या टप्प्यांत थोडी-थोडी रक्कम बिल्डरला देणे अपेक्षित होते. सारंग सोसायटीतील सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे संचालक बी. एन. पाटील हे या प्रकल्पाचे बिल्डर आहेत; बॅंकेने त्यांना कर्जाचे २२ लाख रुपये दिले. कर्जाची ७५ टक्के रक्कम दिली जात असताना प्रकल्पाचे बांधकाम फक्त ५० टक्केच झाले असल्याचा दावा कासार यांनी तक्रारीत केला अाहे.

स्मार्ट सबव्हेशन स्कीम

घराचे बांधकाम जेवढे होईल, तेवढीच रक्कम संबंधित बिल्डरला देण्याचा करार 'स्मार्ट सबव्हेशन स्कीम' मधून कासार यांनी बँकेशी केला होता. ही रक्कम बिल्डरला देण्यापूर्वी कर्जदाराची परवानगी घेतली जावी अशीही अट आहे. परंतु, बँकेनेच ती पाळली नाही. त्यामुळे ग्राहक कासार यांना गेल्या सहा महिन्यांपासून एकीकडे बँकेचे हप्ते आणि दुसरीकडे सध्याच्या घराचे भाडेदेखील भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

बँकेचे मॅनेजर किंवा कासार यांना फसवलेले नाही. २२ लाखांत जेवढे काम होते, तेवढे पूर्ण केले आहे. तीन मजली इमारत बांधून घेण्याची कासार यांची योजना आहे, पण आता एस्टिमेट वाढले व ते डोईजड होत असल्याने कासार यांनी ही भूमिका घेतली आहे.

- बी. एन. पाटील, बिल्डर

सूरज इस्टेट डेव्हलपर्सला २२ लाख ‌रुपये कर्ज वितरीत केले हे कबूल आहे. परंतु कासार यांची सही बिल्डर आणून देणार होते. ती सही त्यांनी केली नाही. बिल्डर आणि कासार यांच्यात वाद आहे. तो वाद दोघांनीच सोडवावा.

- के. एम. राव, शाखा व्यवस्थापक

पोलिस आयुक्तालयात तक्रारीचा अर्ज आलेला आहे. तो अर्ज माझ्याकडे आला की मी त्यात लक्ष घालणार आहे.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आता विकासाची चिंता नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संपूर्ण ताकदीनिशी त्रिंबक तुपे यांना महापौर केले. आजपर्यंतच्या इतिहासात महापौरांना मिळाली नव्हती, एवढी मते मिळाली. केंद्रात, राज्यात, पालिकेत युतीची सत्ता आहे. त्यामुळे आता शहराच्या विकासाची चिंता नाही. विकासाचे दरवाजे शहरासाठी खुले झाले,' अशी प्रतिक्रिया पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, 'वीस अपक्ष नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला. महापौरपदी त्र्यंबक तुपे, उपमहापौरपदी प्रमोद राठोड विराजमान झाले. एमआयएमची भीती दाखवली जात होती. आता कशाचीही भीती नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही यापुढे ठाम निर्णय घेऊ. विकासाच्या संदर्भात आतापर्यंत या शहराबाबत दुजाभाव केला जायचा. आता युतीचे सरकार आहे. शहर विकासासाठी निधीची अडचण येणार नाही. 'समांतर'च्या कामाला प्राधान्य देऊ. या करारात अनेक त्रुटी आहेत. त्यात सुधारणा करून 'समांतर'च्या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करू आणि टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देऊ. शहर खड्डेमुक्त करायला प्राधान्य देऊ. खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. यादी हातात आल्यावर टप्प्या टप्प्यांने सर्व रस्त्यांचे काम करू. 'औरंगाबाद'चे 'संभाजीनगर' असे शासकीय दृष्ट्या नामकरण करण्याकडे विशेष लक्ष देऊ. पालिकेत काम करताना सेना-भाजपमध्ये मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी समन्वय समिती नियुक्त केली आहे. पालिकेतील धोरणात्मक निर्णयांबद्दल युतीचे पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेतील. त्याची जबाबदारी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांच्यावर राहील,' असे कदम यांनी स्पष्ट केले.

बंडखोरी दुर्दैवी

'पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी दुर्दैवी आहे. पक्षशिस्तीला ते मान्य नाही. भविष्यात अशी घटना घडणार नाही याची दक्षता घेऊ,' असे कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिंबक तुपे नवे महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरपदाच्या निवडणुकीत पालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ७१ मते घेऊन शिवसेनेचे त्र‌िंबक तुपे यांनी बाजी मारली. त्यांनी एमआयएमचे गंगाधर ढगे यांचा ४५ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदाच्या लढतीत भाजपचे प्रमोद राठोड यांनी एमआयएमचे फेरोज खान यांचा ४४ मतांनी पराभव केला. बुधवारी झालेल्या या तिरंगी लढतीत महापौरपदासाठी काँग्रेसचे अफसर खान आणि उपमहापौरपदासाठी भाऊसाहेब जगतापही रिंगणात होते.

महापौर, उपमहापौर निवडीसाठी सकाळी अकरा वाजता विशेष सभा सुरू होणार होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. पालिकेकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते. पावणेअकराच्या सुमारास एमआयएमचे नगरेसवक पालिकेत आले. पुरुष नगरसेवकांनी अंगात शेरवानी आणि डोक्यावर टोपी घातली होती. तर दलित नगरसेवकांनी गळ्यात निळे रुमाल आणि डोक्यावर निळा फेटा बांधला होता. आमदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयापासून हे सर्व नगरसेवक पालिकेत घोषणा देत पायी आले. त्यांनंतर एका बसमधून आमदार अतुल सावे, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासोबत 'युतीचा विजय असो,' अशा घोषणा देत भाजपचे नगरसेवक आले. त्यांनी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे फेटे बांधले होते. १० वाजून ५० मिनिटांनी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक बस आणि चारचाकी वाहनांतून आले. तत्पूर्वी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल पालिकेत पोहचले होते.

११ वाजता विशेष सभेला सुरू झाली. पिठासन अधिकारी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी छाननीत सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. त्यावेळी भाजपचे राजू शिंदे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेचे तुपे, एमआयएमचे ढगे आणि काँग्रेसचे अफसर खान रिंगणात राहिले. या तिघांसाठी मतदान झाले. त्यात तुपे यांना ७१, ढगे यांना २६ तर अफसर खान यांना १३ मते मिळाली. बसपचे पाचपैकी दोन नगरसेवक तटस्थ राहिले.

उपमहापौरपदासाठी शिवसेना-भाजप युतीतर्फे राठोड, एमआयएमतर्फे फेरोज खान तर काँग्रेसतर्फे जगताप रिंगणात होते. त्यापैकी प्रमोद राठोड यांना ७० मते मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या बसपच्या दोन नगरसेवकांसह जोहरा बेगम नासेर खान आणि अपक्ष नगरसेविका खतीजा बेगम सलीम कुरैशी यांनी राठोड यांना मतदान केले नाही. त्यामुळे तुपेंपेक्षा राठोड यांना एक मत कमी पडले. दुपारी एक वाजता महापौर आणि उपमहापौरपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

विमल कांबळे यांना गेटवरच थांबवले

कांचनवाडी-नक्षत्रवाडी वॉर्डातून निवडून आलेल्या नगरसेवक विमल कांबळे यांनी पालिकेत येताना सोबत छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र आणले नव्हते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर थांबविले. सुमारे १५ मिनिटे त्या बाहेरच उभ्या होत्या. शेवटी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी त्यांना सभागृहात नेऊन सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलजित, दयानंद, ऋतुजा, सागरला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे यंदाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार कुलजितसिंग दारोगा, डॉ. दयानंद कांबळे, ऋतुजा बक्षी आणि सागर मगरे यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रदिनी शुक्रवारी या पुरस्काराचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते. गुणवंत खेळाडूचा पुरस्कार सागर मगरे व ऋतुजा बक्षी या खेळाडूंना जाहीर झाला. सागर मगरे हा तलवारबाजी खेळातील राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने गतवर्षी २३व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले. गेल्या तीन वर्षांतील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी

लक्षात घेऊन त्याला हा पुरस्कार देण्यात आला. ऋतुजा बक्षी ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. २०११-१२, २०१२-१३ या वर्षात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी तिने केली आहे. तसेच तिने २०१३-१४ च्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक पटाकाविले आहे.

गुणवंत क्रीडा संघटक म्हणून डॉ. दयानंद कांबळे आणि कुलजितसिंग दारोगा यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

दारोगा हे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव असून त्यांनी २०११-१२ या वर्षात २३ टेबल टेनिसपटू घडवले. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक कामगिरी बजावली. डॉ. कांबळे हे अॅथलेटिक्स क्षेत्रात सक्रिय असून सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत. क्रीडा प्रचार व प्रसार करणे, तसेच पुस्तक प्रकाशन, चर्चासत्राचे आयोजन आदी विविध उपक्रम राबवले आहेत. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना क्रीडा संघटकाचा पुरस्कार देण्यात आला.

या क्रीडा पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी क्रीडा संकुलावर होणार आहे. या प्रसंगी पालकमंत्री रामदास कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन सुट्ट्यांमध्ये एसटी प्रवाशांना मनस्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ता सुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामुळे एसटीच्या फेऱ्यांनाही फटका बसला. औरंगाबाद विभागाच्या ३३४ फेऱ्या वाहक आणि चालकांअभावी रद्द करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे एसटी विभागाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र एसटीच्या भरवशावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आंदोलनाचा त्रास सहन करावा लागला.

खासगी वाहतूकदारांसह विविध संघटनांनी रस्ता सुरक्षा विधेयक २०१४ विरोधात देशव्यापी संपाचे आवाहन केले होते. या संपात एसटी विभागाच्या एकाही संघटनेकडून सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच अनेक आगारांमध्ये नियमित बसच्या फेऱ्या रद्द होण्यास सुरुवात झाली होती. आगार क्रमांक एक सिडको आगारात सिटीबसची सेवा बंद करण्यात आली होती. याशिवाय जालन्यासह अन्य मार्गांवर चालणाऱ्या बस सेवांवरही आंदोलनाचा परिणाम दिसून आला. सीबीएस आगारात लांब पल्ल्यांच्या गाड्या नियमितपणे सुरू होत्या. मात्र, ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी मिळत नव्हती. यामुळे या फलाटांवर मोठी गर्दी होती. एसटी विभागाच्या विविध आगारात अशीच परिस्थिती होती. सर्वाधिक फटका शहर बस सेवेला बसला. अनेक ठिकाणी बससाठी प्रवाशांना ताटकाळत उभे राहावे लागले.

कर्मचारी असूनही अनुपस्थित

काही आगारांमध्ये काही कर्मचाऱ्यांनी कामावर असूनही त्यांनी फेऱ्या काढण्यास नकार दिला. काहींनी सुट्टी मारली. दुपारी देशव्यापी संप मागे घेतल्याची माहिती मिळाल्यानंतरही अनेकांनी आपली सुट्टी रद्द केली नाही.

११५ कर्मचारी राहिले गैरहजर

औरंगाबाद विभागीय नियंत्रक कार्यालयात येणाऱ्या सात आगारांमध्ये ११५ वाहक चालक गैरहजर राहिले होते. यात औरंगाबाद आगार क्रमांक एक येथून चालक ३४ वाहक २९ गैरहजर होते. सिल्लोड येथून १८ चालक, २० वाहक गैरहजर राहिले. गंगापूर येथे एक वाहक गैरहजर होता. तर पैठण आगारातून चार कर्मचारी गैरहजर होते. वैजापूरमधून एकूण नऊ वाहक चालक गैरहजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा कंपन्यांसाठीच

$
0
0

नितीन तोटेवार, धामणगाव

पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. पीक विमा हा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. शेतकऱ्यांना त्याचा काहीच लाभ होत नाही. धोरणात बदल होणे आवश्यक आहे. उत्पादन खर्चाच्या कितीतरी पट अधिक कीटकनाशकांची किंमत आकारण्यात येते. याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती तालुक्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.

राहुल यांनी पदयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात जुने धामणगाव येथील हिरापूर हनुमान मंदिरात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विम्याबाबत विचारले तर आमच्या पातळीवर काहीच होत नाही, असे सांगून नुकसान भरपाई नाकारण्यात येते. शेतकऱ्यांच्या भरवशावर कंपन्या कोट्यवधी रुपये नफा कमावतात, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. राहुल यांनी लगेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विचारणा केली. केंद्राची 'अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी'च्या माध्यमातून विमा काढण्यात येतो. खासगी कंपन्या तयार होत नाहीत. यात केंद्र ७५ टक्के आणि शेतकरी २५ टक्के विम्याचा हप्ता देतो, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. हमीभाव आणि लोडशेडिंगचाही मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या पदयात्रेत राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सरचिटणीस मुकुल वासनिक, खासदार अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, कुणाल राऊत, बंटी शेळके सहभागी झाले होते.

धामणगाव तालुक्यात २००६ ते २०१४ या काळात १७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा १० फेब्रुवारीपर्यंत १८ शेतकऱ्यांनी कर्ज व नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले, याकडे एका शेतकऱ्याने राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. राहुल यांनी चर्चेदरम्यान कुठलेच आश्वासन दिले नाही. पण बँकेची कर्जमाफी आणि घरसंसार चालविण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या दौऱ्यावर समाधान ठेवावेच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना २३ वर्षीय नीलेशचे वडील भरतराव वावके यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी वावके यांच्याकडे सतरंजीवर बसून पाणी आणि चहा घेतला. चहा चांगला झाल्याचेही ते न विसरता म्हणाले.

अंबादास वाहिले यांचे कुटुंब सरकारी मदतीपासून वंचित असल्याकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर त्यांनी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे विचारणा केली. मदतीच्ळा निकषात हे प्रकरण पात्र ठरले नाही. मात्र, या प्रकरणाचा पुनर्विचार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले. किशोर कांबळे यांचा मुलगा पुत्र अमित याने आर्थिक मदत व सरकारी नोकरीची राहुल गांधींकडे मागणी केली. यावर गांधी यांनी जगताप यांना सूचना केल्याने हा प्रकार म्हणजे चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात ढकलण्याचा प्रकार असल्याची खंत अमितने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images