Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जायकवाडीच्या पाण्यावर अहवाल सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद, परभणी, जालना, बीड येथील नागरिकांना नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने आणि त्यांना किती तास पाणी मिळते यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्या. मोहित शहा व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी दिले. जलसंपदा विभागाचे सचिव, गोदावरी मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळ, या चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका व नगरपालिकेचे आयुक्त व मुख्याधिकारी यांना हा अहवाल सादर करावा लागणार आहे.

मराठवाडा जनता विकास परिषदेने केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी ३० एप्रिलला झाली. औरंगाबाद पालिका क्षेत्रात आठवड्यातून केवळ दोनवेळाच फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. या उलट नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात रोज दोन तास पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडीवर अवलंबून असलेल्या या चारही जिल्ह्यातील शहर आणि गावांची परिस्थिती पाण्याच्या बाबतीत गंभीर आहे. त्यामुळे नियमितपणे किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप देशमुख यांनी केली. जायकवाडीत पिण्याच्या पाण्याचा साठा पुरेसा आहे. प्रशासनाच्या गैरकारभारामुळे नियमित पाणीपुरवठा होत नाही, असे सांगून ज्येष्ठ विधीज्ञ आर. एन. धोर्डे यांनी जायकवाडीत वरच्या भागातून पाणी सोडण्यास जोरदार विरोध केला. औरंगाबाद, परभणी, जालना, बीड येथील प्रशासनाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचाही उल्लेख अहवालात असावा. तसेच नाशिक पालिकेलाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नाशिककरांना किती तास पाणीपुरवठा केला जातो, याचा त्यात अंर्तभाव असावा. हे सर्व अहवाल सरकारी वकील ए. बी. वग्यानी यांच्याकडे ७ मे पूर्वी सादर करावेत. याची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसील विभाजन अडकले लालफितीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद तहसील कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत आहे. या इमारतीला गळती लागली आहे. दरवर्षी पावसाळ्यात कागदपत्रे भिजू नयेत म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असते. पावसाळ्यात कार्यालयात बसणेही अवघड होऊन जाते. इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला होता. ही इमारत आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे दुरुस्ती शक्य नाही, असा निष्कर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्यानंतर तहसील कार्यालयासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरू झाली. दुसऱ्या बाजुला कार्यालयावर वाढलेला कामाचा ताण विचारात घेऊन तहसील विभाजनाचा प्रस्तावही शासन दरबारी सादर करण्यात आला. विभाजनाचे सोडा, पण नव्या इमारतीसाठी जागा शोधणेही प्रशासनाला शक्य झालेले नाही.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असल्यापासून तहसील कार्यालयाच्या विभाजनाचा मुद्दा समोर आला. औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन तहसील कार्यालयाचे विभाजन करणे आवश्यक आहे. तालुक्यात २२६ गावे आहेत.

तहसील कार्यालयातून दरवर्षी विविध प्रकारची सुमारे ६ लाख प्रमाणपत्रे वितरित करण्यात येतात. त्याशिवाय जमिनीशी संबंधित प्रकरणांच्या सुनावण्याही कार्यालयात सुरू असतात. औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ, अजिंठ्यासह अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांना भेटी देण्यासाठी विविध राज्यांचे राज्यपाल, हायकोर्टांचे न्यायमूर्ती, उच्चपदस्थ अधिकारी, विविध देशांचे राजदूत, विविध राज्यांतील मंत्री शहरात येत असतात. राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तैनात केले जाते. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाचे शहर आणि ग्रामीण असे विभाजन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता.

हा प्रस्ताव नव्याने सादर करावा, असे युती सरकारकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात दोनवेळा त्रुटी काढण्यात आल्या. त्यादूर करून नवे प्रस्ताव सादर करण्यात आले, मात्र तहसील कार्यालयाच्या विभाजनासाठी सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. नव्या प्रस्तावानुसार अप्पर तहसीलदार हे पद निर्माण करण्यात येणार आहे. त्याशिवाय जागा निश्चिती, इमारतीच्या बांधकामाचा खर्च, एका वर्षासाठी कार्यालयाला येणारा खर्च आदी माहितीही पाठविण्यात आली आहे.

तहसील कार्यालयातून वितरित करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांची संख्याही दरवर्षी वाढत जाणार आहे. तहसील कार्यालयाच्या विभाजनाशिवाय प्रशासकीय कामकाज सुसह्य होणार नाही आणि सर्वसामान्यांची कामे वेळेत होणार नाहीत, हे खरे असले तरी, तहसील कार्यालयाचे विभाजन कधी होणार आणि तहसील कार्यालयाची गळकी इमारत कधी बदलणार, याचा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती आहे.

प्रस्तावित विभाजन औरंगाबाद शहर

गावे - ६५

लोकसंख्या -१४ लाख १२,३४०

क्षेत्र-३५ हजार ६५२.७१ हेक्टर

एकूण महसूल- २८ लाख २४, १३२रु

औरंगाबाद ग्रामीण

गावे - १६१

लोकसंख्या-२ लाख ७ हजार ७८३

क्षेत्र - १ लाख ५६,१०७.३२ हेक्टर

एकूण महसूल ५ लाख ४३, ८६६.२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाची कासवगती

$
0
0

श्रीपाद कुलकर्णी, औरंगाबाद

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेंद्रा-बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्क उभारण्याची घोषणा सरकारने केली खरी, मात्र या प्रकल्पासाठीचे भूसंपादनच गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याने प्रत्यक्षात कारखाने कधी येतील, हे सांगणे सध्यातरी अवघड आहे.

बिडकीनसह पाच गावांच्या भूसंपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. शेंद्रा विस्तारित औद्योगित वसाहतीसाठी करमाड येथे सुमारे ५५५ हेक्टरचे संपादन करण्यात आले. तेथून डीएमआयसीच्या भूसंपादनाला सुरुवात झाली. करमाड येथे एकरी २३ लाख रुपये भाव देण्यात आला. त्यानंतर बिडकीन, निलजगाव, नांदलगाव, बन्नी तांडा आणि बंगला तांडा या गावांतील सुमारे २३६३.२८ हेक्टरचे संपादन करण्यात आले आहे. त्यात सरकारी जमिनीचाही समावेश आहे. सुरुवातीला करमाडच्या तुलनेत या पाच गावांसाठी कमी दर जाहीर करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकरी २३ लाख रुपयांचा भाव देण्यात आला, मात्र फळबागा, झाडे, विहिरी, शेतातील घरे यांची यांचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. संपादित जमिनीपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के क्षेत्र फळबागांचे आहे. या मोबदल्यापोटी सुमारे ७० ते ९० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अद्यापपर्यंत मूल्यांकनाचे काम पूर्ण झालेले नाही. या संपादनानंतर चिंचोली, निलजगाव, जांबळी, मेहेरबन नाईक या गावांतील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत. या शेतीच्या मोजणीचे काम अद्याप करण्यात आलेलेले नाही. भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी पैसे भरण्यात आलेले नसल्यामुळे हे काम सुरू झाले नसल्यांचे सांगण्यात येते. बिडकीनसह पाच गावातील संपादनानंतर १८ गावांतील भूसंपादन शिल्लक आहे. पाच गावांच्या भूसंपादनाची कासवगती पाहिल्यास उर्वरित भूसंपादनही वेळे पूर्ण होणार काय, शेतकऱ्यांना वेळेत मोबदला मिळणार काय, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

डीएमआयसी प्रकल्पात औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शेंद्रा एमआयडीसीतील जागा देण्यात येणार आहे. राज्य सरकारने या सेंटरला दीड एफएसआय मंजूर केला आहे. त्याचबरोबर डीएमआयसी प्रकल्पांतर्गत सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारणीचे कामही डीएमआयसीच्या टेंडर प्रक्रियेत आहे.

सारे काही गोपनीय...

डीएमआयसी प्रकल्पात शेंद्रा-बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्कसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असली तरी या प्रकल्पाचे नियोजन, नियंत्रण, तेथील उद्योग, स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांना उपलब्ध होणाऱ्या संधी आदींबद्दल सरकारकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. प्रकल्पाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, डीएमआयसीसाठी जमिनी देणारे शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांनाही फारशी माहिती नाही. प्रकल्पाची सारी सूत्रे दिल्लीतून हालविण्यात येत असल्याने अंमलबजावणीत सरकारी संथपणा आहे.

भूसंपादनाचा पुढील टप्पा

खासगी जमीन ः भालगाव ३२.२२ हेक्टर, आपतगाव २३.८५, लायगाव ५८७.५५, पांढरी पिंपळगाव ३१.७२, गाडीवाट ४८४.२७, कादराबाद २१९.६६, घारदोन ७३३.६१, घारदोन तांडा ५५९.२, खोडेगाव ९०३.८५, पाचोड १५६.९६, बेंबळवाडी १३५.३१, चितेगाव ४३३.१६, चित्ते पिंपळगाव ४९.५५, पाडळी २१६.५, चिंचोली १११.९८, मेहरबन नाईक तांडा २४८.६९, जांभळी ४४०.९२, निलजगाव ६९३.०६ हेक्टर (एकुण ६०६२.०८ हेक्टर) सरकारी जमीनः १६ गावांतील ८४८.४५ हेक्टर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार, मतदारांत सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड/ पैठण

प्रस्तावित जळगाव-सोलापूर रेल्वेमार्गाने गंभीर वळण घेतले आहे. खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (४ एप्रिल) औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहावर पैठण येथील रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावे, असे आव्हान केले आहे. दुसरीकडे पैठण येथील नागरिकांनी हे आव्हान स्वीकारले असून ते खुली चर्चा करण्यासाठी औरंगाबादला जाणार आहेत.

खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठण येथून जाणारा रेल्वेमार्ग वळवल्याचा आरोप होत असून त्याबद्दल या आठवड्यात चांगलीच चर्चा होत आहे. या आरोपांना उत्तर देण्याचे खासदार दानवे यांनी ठरवले आहे. सिल्लोड येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मी एका जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा प्रतिनिधी नसून मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे सर्व तालुके विकास कामांसाठी समान असल्याचा दावा केला. ' रेल्वेमार्गासाठी आंदोलन सुरू केलेल्या संघटना व लोकांबरोबर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्ग बदलण्यासाठी लोकसभेत दिलेली एखादी मागणी, एखादे पत्र किंवा एखादा पुरावा दाखला,' असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

हा रेल्वेमार्ग कसा होणार याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसताना आंदोलन करणे चूक असल्याचे दानवे म्हणाले. यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (४ मे) सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत सुभेदारी विश्रामगृहावर यावे, असे आव्हान त्यांनी दिले. दिलेल्या वेळेत आंदोलक भेटीसाठी न आल्यास रेल्वे आंदोलन राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचे समजण्यात येईल, असे ते म्हणाले.

पैठणला वगळण्याचा प्रयत्न केला नसल्याचे खासदार दानवे सतत सांगत आहेत. पण पैठणमार्गे रेल्वे व्हावी, यासाठी काय केले व भविष्यात काय करणार, असे प्रश्न खासदारांना विचारणार आहोत.

- प्रा. संतोष तांबे (रेल्वे आंदोलक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक महर्षी चौक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरील अत्यंत वर्दळीचा व महत्वाचा महर्षी चौकाची (दूध डेअरी चौक) अवस्था दिवसेन् दिवस वाईट होत आहे. चौकातील महावितरणच्या शेजारी रस्त्याकडेला खड्डे, काल्डा कॉर्नरपर्यंत जाणारा खराब रस्ता यामुळे हा चौक वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. दूध डेअरी चौक ते शहानूरवाडी पर्यंतचा रस्ता एकेकाळी फार रहदारीचा नव्हता. दोन दशकात लोकसंख्या वाढल्याने या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर पुढे संग्रामनगर उड्डाणपूल झाल्यामुळे सातारा- देवळाई, बीडबायपास परिसरातील वाहने याच रस्त्यावरून धावतात. याशिवाय या भागातून शहरात येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे.

या चौकातील वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा भार सहन करण्या इतपत चौकाची अवस्था चांगली राहण्याची गरज आहे. परंतु, काल्डा कॉर्नरपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्याने अनेक गाडया या खड्डयात बंद पडतात. त्यामुळे बंद वाहनांमागे इतर वाहनांची रांग लागते व कोंडी होते. या चौकात अलिकडेच कसे-बसे पॅचवर्क उरकरण्यात आले. पण मूळ रस्ताच वाईट अससल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.

पुतळ्याच्या जागेकडे दुर्लक्ष

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा या चौकात बसविण्याचा निर्णय शिवसेना- भाजपच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार होते. या घोषणेला दोन वर्षाचा काळ उलटूनही सुशोभीकरण किंवा उत्तम दर्जाचा रस्ता करण्याची पालिकेतील सत्ताधाऱ्यांना आठवण राहिलेली नाही.

दोन वर्ष पाठपूरावा करून एमएसआरडीसीकडून सहा कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्यात आला. चौकातील रस्त्याची स्थिती वाईट आहे. त्याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. पालिकेकडे सध्या पैसे नसल्याने विकासकामे थांबली आहेत.

- मधुकर सावंत, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाने आवळला फास

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

नापिकीतून वाढलेला कर्जबाजारीपणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गळफास ठरला आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून आत्महत्येची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे चाळिशीच्या आतील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी मदतीची वाट पाहून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू सुकले आहेत.

आडगाव जावळे (ता. पैठण) गावातील तरुण शेतकरी ओमप्रकाश जावळे यांनी २५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतातील मोसंबीची ६०० झाडे वाचविण्यासाठी जावळे यांनी जिवाचे रान केले. शेतातील विहीर आटल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर पाझर तलावालगत दोन गुंठे जमीन विकत घेऊन बोअर खोदला. महिनाभरात बोअरचे पाणी आटले आणि टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरला नाही. गावातील घर विकून जावळे यांनी पैशाची जमवाजमव केली. कपाशीच्या पिकातही तोटा झाल्याने जावळे परिस्थितीच्या कात्रीत अडकले. मोसंबी फळबाग वाचविणे पाणी टंचाईमुळे जमले नाही. डोळ्यांसमोर फळबाग वाळत असताना पाहून निराश झालेल्या ओमप्रकाश यांनी मृत्यूला कवटाळले. घरात पत्नी, मुलगा आणि म्हातारे आई-वडील आहेत.

वडील का गेले, याचे कोडे लहान मुलाला पडले आहे. तर ओमप्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या जागेजवळ म्हातारे वडील शून्यात नजर लावून बसतात. ओमप्रकाश जावळे यांचे उदाहरण प्रातिनिधीक आहे; पण गेल्या चार महिन्यांपासून वाढलेले आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरू आहे. जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लालफितीच्या कारभारात ३५ आत्महत्या अपात्र ठरल्या असून ७४ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या तडाख्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. केवळ शेतीवर उपजिविका असलेल्या शेतकरी चरितार्थासाठी कर्जबाजारी झाला आहे. खासगी सावकार आणि बँकांच्या कर्जाच्या जंजाळात हजारो शेतकरी अडकले आहेत. कुटुंबातील कर्ता पुरूष गेला; मात्र डोक्यावरील कर्जाचा डोंगर कायम आहे. राज्य सरकारने किमान कर्ज माफ करण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

मरणाची किंमत एक लाख

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २००५ च्या अध्यादेशाप्रमाणे फक्त एक लाख रुपये मदत दिली जाते. गेल्या दहा वर्षांत महागाई दसपट वाढलेली असताना ही लाखाची मदत तुटपुंजी ठरत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला योग्य मदत करण्याची गरज आहे.

तरुण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे हाल सुरू आहेत. विधवा पत्नी आणि लहान मुलांचे भवितव्य अधांतरी आहे. कर्ज वसुलीसाठी सावकाराचा तगादा वाढला आहे. क्रियाकर्म करता येईल एवढी नुकसान भरपाईसुद्धा सरकार देत नाही.

- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष, महाराष्ट्र मोसंबी उत्पादक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजप विभक्त होणार: पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आल्यानंतर सातत्याने 'हे सरकार टिकणार नाही', अशी भविष्यवाणी करणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना-भाजप विभक्त होणार असल्याची माहिती आपल्याला सत्ताधारी पक्षातीलच व्यक्तीने दिल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप कोणत्याही मित्राला सत्तेत स्थान न देता ३१ ऑक्टोबर रोजी सत्तारुढ झाला. त्यानंतर शिवसेनेच्या सत्तासहभागाने फडणवीस सरकारला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभले. मात्र, या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार हे मात्र सातत्याने चर्चेत राहिले आहेत. पुन्हा निवडणुका होऊ नयेत, म्हणून भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा करणारे शरद पवार वारंवार राज्यातील सरकार कोसळणार असल्याची वक्तव्य करून शिवसेना-भाजपाच्या 'सुखी' संसारात मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. आज औरंगाबाद येथे पत्रकारांनी विचारले असता पवार यांनी शिवसेना-भाजप युती मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तुटणार, असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. ही माहिती सत्ताधारी पक्षातील व्यक्तीच्या हवाल्याने त्यांनी दिली मात्र या व्यक्तीचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे ही पवारांचीच 'पुडी' तर नाही ना?, असाही सवाल जाणकार विचारताहेत.

ऑक्टोबर ते मे...पवारांचा 'थांग' लागेना

२० ऑक्टोबर २०१४ : काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार शक्‍य नव्हते. कोणतेही पर्याय जुळत नसल्याने व राज्याच्या हिताचा विचार करूनच भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

१८ नोव्हेंबर २०१४ : फडणवीस सरकार टिकवण्याचा मक्ता राष्ट्रवादीने घेतलेला नाही. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची परिस्थिती दीर्घकालिन स्थिरतेला मदत करणारी दिसत नाही. ती आणखी बिघडली तर निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

७ एप्रिल २०१५ : मुंबई महापालिकेत सत्तेची चटक शिवसेनेला लागली आहे. अशावेळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला जागा वाढवून देणे शिवसेनेला परवडणारे नाही. महापालिकेची सत्ता आपल्यालाच मिळणार असा शिवसेनेचा समज आहे. यातून ते कधीही भाजपला जागा वाढवून देणार नाहीत. त्यामुळे हे सरकार पालिका निवडणुकीआधी पडेल, असे मला वाटते.

शिवसेनेला गोंजारले, फडणवीसांना फटकारले

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने 'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत विचारले असता अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेवर काहीही झाले तरी ठाम राहण्याच्या शिवसेनेच्या दृढ निश्चयाचे पवारांनी कौतुक केले व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे आणि विधानसभेत याआधी अनेकदा त्यांनी त्याचे समर्थन केलेले आहे', असा थेट 'वार' पवार यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष या मुद्द्यावर विदर्भातील जनतेच्या बाजूने आहे. तेथील जनतेला जे हवे आहे तेच व्हायला हवे, या मताचे आम्ही आहोत. मात्र, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणाऱ्यांना जनतेचा कौल मिळाला, असे कधीही घडलेले नाही. म्हणूनच जनतेला काय वाटते ते महत्त्वाचे आहे, असे पवार यांनी नमूद केले.

आव्हाडांच्या 'त्या' विधानाशी सहमत!

बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचे आज पवार यांनी समर्थन केले. त्याचवेळी आव्हाडांच्या अन्य विधानांशी पक्ष सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीत पक्षाची धोरणं सोडून अन्य मुद्यांवर वैयक्तिक मतं मांडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यात आव्हाड हे स्वच्छ आणि स्पष्टपणे बोलणारे आमचे सहकारी आहेत आणि त्यामुळेच त्यांना पुरंदरेंबद्दल जे वाटलं ते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असे पवार यांनी नमूद केले. बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीबद्दल सातत्याने लिहित आहेत. आयुष्यभर त्यांनी हे काम केले. राज्य सरकारला त्यांचे हे काम राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटलं असेल आणि त्यांनी त्यासाठी त्यांना पुरस्कार दिला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

लोकांना 'अच्छे दिन' दिसू लागलेत!

देशात पुन्हा महागाई वाढू लागली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत, याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता पवारांनी हसतच 'लोकांना आता 'अच्छे दिन' दिसायला लागलेत', अशी कोटी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाने केला सासूवर गोळीबार

$
0
0

बीडः पत्नीस सासरची मंडळी नांदवण्यासाठी पाठवत नाही म्हणून संतापलेल्या जावयाने सासूवर गोळीबार केला. ही घटना बीड जिल्ह्यातील दादाहरी वडगाव येथे रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने सासू बचावली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील शेषेराव इंगळे यांच्या मुलीचा विवाह हिंगोली जिल्ह्यातील बोरखेड येथील रहिवासी तानाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. मात्र, तानाजी भोसले हा गुन्हेगारी प्रवृतीचा असल्याने इंगळे कुटुंबिय त्यांच्या मुलीस सासरी पाठवली नव्हते. एका दरोडाप्रकरणी त्याला जेलची हवा खावी लागली होती. मात्र, पत्नीला सासरी न पाठविल्याने संतप्त झालेला जावई तानाजी भोसले हा रविवारी रात्री साडे अकरा वाजता दादाहरी वडगाव येथे सासुरवाडीला आला. यावेळी त्याने पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत म्हणून सासरच्या मंडळीशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर सासू शिवशाला इंगळे यांना मारहाण केली. त्यानंतर गावठी पिस्तुलने गोळीबार केला. सुदैवाने गोळी न लागल्याने शिवशाला इंगळे या बचावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्रक्रियेद्वारे रुग्णसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

येथील जंगमवाडी भागात मनपाच्या कै. संग्राम पोमदे दवाखान्यात नंदीग्राम लॉयन्स ट्रस्टच्यावतीने चालणाऱ्या लॉयन्स नेत्र रुग्णालयात अतिशय कमी दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची सेवा गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. आजपर्यंत या रुग्णालयात ३ हजार ४६३ रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे २२५ शिबिरात ३ हजार ४६१ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती या ट्रस्टचे सचिव अरुण तोष्णीवाल यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात फेकोइमल्सीफिकेशन आणि बिनटाक्याची शस्त्रक्रिया या दोन प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जातात. या ठिकाणी विविध दानशूर व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात. त्यामध्ये येणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. एरवी प्रत्येक शास्त्रक्रियेला लेन्सच्या किंमतीनुसार अडीच ते पाच हजार रुपये फीस आकारली जाते. ती केवळ हजार रुपये करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न सुरू आहे.

याठिकाणी डॉ. शैलेश विभूते, डॉ. वैशाली दगडे, डॉ. अजित पेडगावकर, डॉ. शैलेश विभूते आणि डॉ. तारिक अहंमद हे नेत्रतज्ज्ञ येथे सेवा देत आहेत. या लॉयन्स नेत्र रुग्णालयाची सुरुवात ७ मे २०११ रोजी करण्यात आली आहे. तेंव्हापासून आजपर्यंत १ लाख ५५ हजार ७८७ रुग्णांचे डोळे तपासण्यात आले आहेत. २२५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच बाहेरगावी आणि शहरात विविध ठिकाणी ३७ हजार ५५२ शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आतापर्यंत मोफत ३ हजार ४६१ तर नाममात्र दरांत ९ हजार ४६३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेलंगणात राबविणार शोषखड्ड्यांचा प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

टेंभूर्णी येथील शोषखड्ड्यांचा प्रयोग संपूर्ण तेलंगणा राज्यात राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे मत तेलंगणा राज्याचे उपयुक्त पी. रामाराव यांनी व्यक्त केले. हिमायतनगर तालुक्यातील निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त टेंभूर्णी येथील शोष खड्ड्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गटारमुक्ती पॅटर्नची पाहणी तेलंगणा राज्यातील पथकाने केली.

टेंभुर्णी येथील शोषखड्ड्याचा प्रयोग पाहिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत राज्यातील नऊ जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मिलिंद व्यवहारे, विलास गंगावणे यांची उपस्थिती होती.

दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ भारत मिशनच्या बैठकीत काळे यांनी टेंभूर्णी येथील शोष खड्ड्याचा प्रयोग मानवी आरोग्याच्या हितासाठी कसा उपयुक्त आहे. हे पटवून सांगितले होते. याची दाखल घेत तेलंगणा राज्यातील निझामाबाद, आदिलाबाद, वारंगल, करीमनगर, खम्मम, नालगोंडा, रंगरेड्डी, मेहबूब नगर, मेडक या नऊ राज्यातील जवळपास ३० महिला-पुरुषांची टीम रविवारी गटार मुक्तीचा पॅटर्न पाहण्यासाठी दाखल झाली होती. गावात पाहणी करताना शोषखड्डे, त्याची बनावट, कुऱ्हाड बंदी, तंटामुक्ती यासह गावात राबविण्यात आलेल्या प्रयोगाची माहिती उपसरपंच प्रल्हाद पाटील-टेंभूर्णीकर यांच्या कडून जाणून घेतली.

सीईओंचा सत्कार

दिल्ली येथे स्लाइड शोच्या माध्यमातून टेंभूर्णी गाव दिल्लीपर्यंत पोहचविणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दिल्लीला गेल्यानंतर टेंभूर्णी येथील शोष खड्ड्यांच्या प्रयोगाची माहिती दिली. प्रत्यक्ष कमी खर्चात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी फायदा कसा होतो हे पटवून दिले असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोढा येथील आगीत चार घरे भस्मसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे रविवारी (३ मे) अचानक लागलेल्या आगीत चार घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही आग रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका घराला आग लागली. त्यानंतर ही आग संजय भीमराव राऊत, प्रभाकर भीमराव राऊत, आत्माराम आनंदा भिवसने, कैलास आत्माराम भिवसने यांच्या घरात पसरली. ग्रामस्थांनी सुरुवातीला मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न कमी पडले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा बंब दाखल झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास आग विझवण्यात यश आले. आग विझवण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर सत्तार, तलाठी रवी कुलकर्णी, मंडळ अधिकारी डी. जी. धोंडकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे आदींनी मदत कार्यात भाग घेतला. या आगीत जीवितहानी झालेली नाही.

महावितरणवर नाराजी

आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती महावितरणला केली होती. परंतु, वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू झाला असता, तर गावातील विहिरीवरून टँकर भरून आग विझवता आली असती, असे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमदानातून बंधारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पोलिसांतर्फे तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे माती नालाबांध बांधण्यात आला आहे. यामुळे परिसरातील सिंचन क्षमता वाढणार असल्याचे वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले. हा मातीनाला बांध २० फूट उंच व १३ फूट रूंद आहे.

गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील पाणीपातळीत घट होऊन भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे. शेलगाव येथेही तीव्र पाणीटंचाई असल्याने माती नालाबांध बांधण्याचे ठरविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप सागर, जनार्दन राठोड, गजानन इधाटे यांनी स्थळ पाहणी करून ठिकाण निश्चित केले. या ठिकाणी रविवारी (३ मे) सकाळपासून दोन जेसीबी यंत्र व चार-पाच ट्रॅक्टरच्या साह्याने मातीनाला बांधाचे काम करण्यात आले. यावेळी पोलिस शिपायांनी श्रमदानही केले.

या बंधाऱ्यामुळे परिसरातील सिंचन विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. यावेळी जेसीबी यंत्रमालक कचरू मास्टर गाडेकर, रामदास काकडे, पुंडलिक तुपे, पोलिस शिपाई अनिल नागझरे, जनार्दन राठोड, भानुदास वाघमारे, बजरंग दल प्रमुख गजानन इधाटे, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब इधाटे, उपसरपंच जनार्दन तुपे, माजी सरपंच हरीदास इधाटे, सुभाष सोनवणे, अंकुश इधाटे, दादाराव इधाटे, कृष्णा तुपे, रामेश्वर इधाटे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाड्यांवर पालिकेची कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर रस्त्यावर लागणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर महापालिकेने आज (सोमवारी) कारवाई केली. या कारवाईत सुमारे २५ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. हातगाड्यांवरचा भाजीपाला फेकून देण्यात आल्याने त्याची नासाडी झाली.

पुंडलिकनगरच्या रस्त्यावर हातगाड्यांच्या अतिक्रमणाचा त्रास नेहमीचाच आहे. सकाळी आणि सायंकाळी या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. हातगाड्या हटवून भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याबद्दल यापूर्वी अनेकवेळा प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न तात्कालिक स्वरूपाचेच ठरले. आता कालपासून पालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणांच्या संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. सकाळ, संध्याकाळ अतिक्रमण हटाव पथक पाठवून हातगाड्या हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज पुन्हा ही कारवाई करण्यात आली. सुमारे २५ हातगाड्या पालिकेच्या पथकाने जप्त केल्या. हातगाड्यांवरचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. त्यामुळे नासाडी तर झालीच, शिवाय विक्रेत्यांचे आर्थिक नुकसानही झाले. यापुढेही हातगाड्या हटविण्याची कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर महागल्याने बजेट कोलमडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाईमधील बहुतांश विहिरी, बोअर कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पालिका प्रशासनाकडून २० टँकरमार्फत पाणी पुरविण्यात येत आहे. येत्या महिनाभरात पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. दरम्यान, खासगी टँकरचे दर वाढले असून नागरिकांना एक दिवसाआड सुमारे ३०० रुपये खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे बजेटही कोलमडले आहे.

सातारा आणि देवळाई गावांमध्ये पूर्वीच्या दोन पाणीपुरवठा योजना आहेत, मात्र या योजना दोन्ही गावठाणांपुरती मर्यादित आहेत. या योजनांसाठी विहिरींतून पाणी पुरविण्यात येते. या विहिरीही आटल्या आहेत. त्यामुळे नगर पालिकेकडून दोन्ही पाणी योजनांच्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. सातारा आणि देवळाई गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती झालेल्या आहेत. या वसाहतींना बोअर, विहिरी यांच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येते. परिसरातील बहुतांश विहिरी, बोअर आटले आहेत. त्यामुळे सातारा, देवळाई परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश नागरिकांनी पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. एका जारसाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत.

नगर पालिकेकडून सध्या २० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येते. प्रत्येक टँकरच्या रोज तीन फेऱ्या होतात. हा पाणीपुरवठा अपुरा आहे. काही भागांत पालिकेचा टँकर पाच दिवसांआड येतो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आणखी पाच टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरचे दरही वाढविण्यात आले आहेत. चार ते पाच हजार लिटरच्या टँकरसाठी आता ७०० रुपये मोजावे लागत आहेत. दोन हजार लिटरचे टँकर ३०० रुपयांना देण्यात येत आहे. सातारा, देवळाई परिसरातील विहिरी, बोअर आटल्यामुळे बाळापूर, गांधेली परिसरातून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे टँकरचे दर वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येते. म्हाडा कॉलनी भागात एक ड्रम पाण्यासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत.

पाणी योजनेला मंजुरीची प्रतीक्षा

सध्या नगरपालिकेचा टँकर पाच दिवसांआड येतो. एकावेळी केवळ एक ड्रम पाणी दिले जाते. हे पाणी पाच दिवस कसे पुरणार? त्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा.

- अर्चना चव्हाण, देवळाई.

परिसरातील विहीर आटली आहे. त्यामुळे सध्या एक दिवसाआड २५० ते ३०० रुपये देऊन टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी आता पाचपट पैसे खर्च करावे लागत आहेत.

- कुसूम मोगरे, रेणुकापुरम, सातारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सहारा सिटी’चे ग्राहक बेसहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

बीड बायपास रोडवर उभारण्यात येत असलेल्या 'सहारा सिटी होम्स' सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची उभारणी बारगळल्यात जमा आहे. सहारा समूहाने प्रकल्पाची जमीन विक्रीला काढल्यामुळे आपण घरासाठी दिलेल्या पैशाचे काय, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

गांधेली शिवारात सहारा समूहाने ८२ एकर जागेवर गृहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली. तीन वर्षांत घराचा ताबा देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० ग्राहकांनी वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅटसाठी बुकिंग केले होते, परंतु फ्लॅट तर दूर अद्याप तेथे बांधकामालाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. किमान आमचे भरलेले पैसे तरी परत द्या, अशी मागणी काही ग्राहकांनी सहारा समूहाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे केली, परंतु या अधिकाऱ्यांनी हात वर केले. 'आमच्या नागपूर किंवा लखनऊ येथील कार्यालयाशी संपर्क साधा,' अशी उत्तरे ग्राहकांना देण्यात येत आहेत.

बीड बायपासवरील ८२ एकर जागेत साकारणाऱ्या सहारा सिटी होम प्रकल्पात सुरुवातीला ५०० फ्लॅटची उभारणी करण्यात येणार होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची कंपनीची योजना होती. आपलं हक्काचं घर होईल, या आशेने अनेकांनी सुरुवातीला टू-बीएचकेसाठी २ लाख ८ हजार ६०० रुपये बुकिंगसाठी रक्कम भरली. ही रक्कम जवळपास ८ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.

कंपनीने यापैकी ४० ग्राहकांचे पैसे त्यांनी भरलेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम कपात करून परत दिले आहेत, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ३ वर्षांत बांधकामालाही सुरुवात न झाल्याने ग्राहकांचे अवसानच गळाले आहे. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली असता तेथील अधिकाऱ्यांनी, 'कंपनीची आर्थिक स्थ‌िती नाजूक आहे. सध्या तुमचे पैसे परत देऊ शकत नाही. तुम्हाला यासंदर्भात नागपूर किंवा लखनऊ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल किवा ई-मेलद्वारे तुमची तक्रार करा. येथील जमिनीचा व्यवहार झाला तर आलेल्या रकमेतून तुमचे पैसे परत मिळतील,' असे सांगितल्याची माहिती काही ग्राहकांनी दिली. अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब सातुरे, नरेंद्र कर्डिले, पद्मा कर्डिले, भगवान गायकवाड, संतोष गायकवाड, प्रकाश ‌‌त्रिभुवन, राहुल पवार, प्रवीण मराठे, बिरारेअप्पा, कृष्णा वाघ, भारत सपकाळ यांनी फ्लॅटच्या किमतीच्या १० टक्के, म्हणजे प्रत्येकी २ लाख ८ हजार ६०० रुपये प्रत्येकी भरले आहेत. आमचे पैसे बाजारभावाप्रमाणे आम्हाला परत करा, अशी मागणी त्यांनी सहारा सिटी होमकडे केली आहे.

येथील जमीन विकण्यात येणार आहे. त्याचा व्यवहार सुरू आहे. जमीन विकल्यानंतर आम्ही बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे देणार आहोत.

- नवीनकुमार मौर्य, वरिष्ठ अधिकारी, सहारा सिटी होम्स, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्ड्यांत जमली वाहनांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपूल बांधण्यात आला; पण उड्डाणपूल बांधूनही शहानूरमिया दर्गा चौकातील वाहतुकीची समस्या कायम आहे. शिवाजीनगर आणि उस्मानपुरा रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने वाहनचालकांच्या गैरसोय वाढली आहे. या चौकात सिग्नल सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यानंतरच वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहेत.

वर्दळीच्या रस्त्यांमुळे शहानूरमिया दर्गा चौक वाहनचालकांसाठी तापदायक ठरत आहे. रोपळेकर चौक, उस्मानपुरा चौक, सूतगिरणी चौक आणि बीड बायपास रोड हे चार रस्ते चौकातून जातात. प्रत्येक रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असल्यामुळे हमखास वाहतूक कोंडी होते. सकाळी नऊ ते दुपारी १२ आणि सायंकाळी पाच ते रात्री ८ या वेळेत चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. संग्रामनगर उड्डाणपुलावरून येणारी वाहने सरळ आल्याने अनेकदा किरकोळ अपघात घडतात. तसेच वाहतूक बेटाला पूर्ण वळसा घालून जाण्याचा प्रयत्न वाहनचालक करीत नाही. भररस्त्यात वाहन घालणारे बेशिस्त वाहनचालक वाहतूक कोंडीला कारणीभूत आहेत. वाहतूक कोंडी वाढल्यामुळे मागील काही महिन्यांपासून संध्याकाळी दोन तास वाहतूक पोलिस तैनात असतो. त्यामुळे काही प्रमाणात प्रश्न सुटला आहे. अर्थात, बीड बायपासकडे जाणारी आणि शहरात येणारी जड वाहने वाहतूक समस्येचे मुख्य कारण आहे. या वाहनांना अटकाव घालण्याचा प्रयत्न आहे. सूतगिरणी चौक रस्ता खिळखिळा झाला असून उस्मानपुरा चौकापर्यंत वाहनचालक जेरीस येतात. खड्डे चुकवत वाहन चालविणे त्यांच्यासाठी कसरत ठरत आहे. या रस्त्यावर पोदार स्कूल असून दुपारी शाळा सुटल्यानंतर किमान तासभर वाहतूक कोंडी होते. स्कूल बस, रिक्षा आणि खासगी वाहने भररस्त्यात उभी असतात. शाळेने वाहतुकीचा विचारच केला नसल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. दैनंदिन वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहानूरमिया दर्गा चौकात सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच कार्यवाही पूर्ण करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखा व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत.

आठवडी बाजाराची भर

दर सोमवारी दर्गा चौक परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे पीरबाजार भरतो. त्यामुळे दिवसभर ग्राहकांच्या वाहनांची गर्दी असते. रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून ग्राहक खरेदीसाठी बाजारात जातात. वाहनांची गर्दी वाढत गेल्यानंतर चौकात वाहनांची रांग लागते. त्यामुळे किमान सोमवारी पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे.

चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा सुरू असून महिनाभरात सिग्नल सुरू होईल. या माध्यमातून वाहनचालकांची दररोजची अडचण दूर करण्याचा प्रयत्न आहे.

- शोभा बुरांडे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाकडून प्रवाशाचा पन्नास हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

औरंगाबाद : रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने एका प्रवाशाचा मंगळसूत्रासह पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी (२ मे) सकाळी दहा वाजता अदालत रोडवरील तापडिया कासलीवाल मैदानजवळ घडली. श्रीकांत नागोरा (वय ४३, रा. गणेशनगर,परभणी) यांनी महावीर चौकातून शिवाजीनगरला जाण्यासाठी रिक्षा घेतली. तापडिया कासलीवाल मैदानाजवळ चालक व रिक्षातील इतरांनी रिक्षा रिझर्व्हला लागल्याचे सांगून नागोरा यांना तीन वेळा पेट्रोल कॉक फिरवण्यास लावला. याच दरम्यान त्यांचे पाकीट मारले. त्यात अडीच तोळे सोने, रोख रक्कम, असा पन्नास हजार रुपयांचा ऐवज होता. त्यानंतर रिक्षा बंद पडल्याचे नाटक करत नागोरा व त्यांच्या पत्नीस उतरवून देऊन रिक्षा घेऊन पसार झाले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळीपिवळीला शहरात ‘नो एन्ट्री’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी घेऊन सर्रास धावणाऱ्या काळीपिवळीला शहराच्या हद्दीत सकाळी आठ ते रात्री नऊवाजेपर्यंत मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा मनाई आदेश सोमवारी (४ मे) जारी केला असून त्याची अंमलबजावणी आज मंगळवारी (५ मे) दुपारी बारापासून केली जाणार आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काळीपिवळीला लगाम लावण्याचा निर्धार नुकताच व्यक्त केला होता. मध्यवर्ती व सिडको बसस्थानक परिसर व शहरात इतत्र धावणाऱ्या, रस्त्यालगत पार्किंग करणाऱ्या काळीपिवळी टॅक्सीला चाप लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या आदेशानुसार सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत शहरात काळीपिवळी टॅक्सी आणता येणार नाही.

शहरात राहणाऱ्या काळीपिवळी मालक, चालकांनी सकाळी आठपूर्वी प्रवासी न घेता टॅक्सी शहराबाहेर काढावी लागेल, त्यांना रात्री नऊनंतर प्रवासी न घेता शहरात येता येईल. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ (अधिनियम क्रमांक २२) कलम ३३(१) (ब) व इतर अधिकारान्वये हा आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश प्रायोगिक तत्त्वावर असून त्याबद्दल हरकत, आक्षेप वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त कार्यालय किंवा acptraff.abad@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर ६० दिवसांत लेखी नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रवेशबंदीतून सूट

शैक्षणिक सहल, विद्यार्थ्यांनी एकत्रित भाड्याने केलेले वाहन, रुग्ण किंवा मृतदेह असल्यास काळीपिवळी शहरात आणता येईल. लग्नकार्यासाठी केलेल्या टॅक्सीलाही सुट आहे. परंतु, त्यात वधु किंवा वर प्रवास करत असला पाहिजे.

पोलिस आयुक्तांनी काळीपिवळी टॅक्सीबद्दल काढलेल्या आदेशाची आज मंगळवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास कडक कारवाई केली जाईल.

- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्यावरून वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांशी जवळीक साधण्यावरून भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी सकाळी वादावादी झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पास न मिळाल्याने माजी महापौर भागवत कराड व माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी नाराजी मायानगरमध्ये रमेश पांडव यांच्या घरासमोर शहराध्यक्ष बापू घडमोडे यांना जाब विचारला.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सकाळी विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्यांची रांग लागली होती. त्यावेळी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पास नसल्याने प्रवेश नाकारला. पास नसल्याने स्वागतही करता आले नाही व मुख्यमंत्र्यांसोबत रमेश पांडव यांच्या निवासस्थानीही जाता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कराड व मंगळुरे यांनी नाराजी व्यक्त करत घडमोडे यांना चांगलेच खडसावल्याचे उपस्थितांनी सांगितले. पण या तिघांनीही असे काहीच घडले नाही, असा दावा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत मोटारीत बसण्यावरूनही वादावादी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्मादाय’मधील भरतीला लवकरच मान्यता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी कामांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम धर्मादाय आयुक्त कार्यालय करते. या पार्श्वभूमीवर या कार्यालयाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी लवकरच ७६४ कर्मचारी भरती प्रक्रियाला मान्यता देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले. महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येथील धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात सोमवारी मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड व न्यायमूर्ती विजय अचलिया, राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे, जिल्हा सत्र न्यायाधिश सुमंत कोल्हे, धर्मादाय सह आयुक्त विनोद पाडळकर, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद पवार उपस्थित होते.

'प्रशासकीय गतिमानता वाढण्याच्या दृष्टीने चांगल्या पायाभूत सुविधा आवश्वक आहेत. राज्यभरात सात ते साडेसात लाख विश्वस्त संस्था, संघटना कार्यरत असून या माध्यमातून कोटयवधी रुपयाची उलाढाल होते. या सर्व कामांना नियंत्रित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रणा गरजेची असून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल. त्याला मान्यता देण्याचे काम केले जाईल,' अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'धर्मादाय संस्था व संघटनाच्या प्रभावी कामकाजांसाठी धर्मादाय आयुक्तालयाकडील अधिकारांचे विक्रेंद्रीकरण केले गेले पाहिजे. त्याबरोबरच धर्मादाय संस्था, संघटनांकडे असलेल्या निधीचा विनियोग हा जास्तीत जास्त प्रमाणात जन कल्याणकारी कामांसाठी झाला पाहिजे,' असे मत न्यायमूर्ती मोहित शाह यांनी यावेळी व्यक्त केले.

मानसिंह पवारांची टोलेबाजी

प्रास्ताविकात मानसिंह पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. मराठवाड्याची संतभूमी आहे, पण आपल्याला हे संतपण नको तिथे आठवते. पायाभूत सुविधांची कमतरता आहे. नवीन उद्योग येत नाहीत. संस्था मिळत नाहीत. त्यामुळे अपेक्षित विकास साधला नाही. मराठवाड्यातील तरूण पिढीतून स्वाभिमानी नेतृत्व घडविता आले नाही, हे आमचे दुर्देव आहे. जुन्या आणि नव्या सरकारच्या धोरणांचा समाचार पवारांनी घेतला. वाक्यागणिक मिळणाऱ्या टाळ्यांनी त्यात रंगत आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images