Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाचे बळ

$
0
0

इंग्रजी शाळांच्या मेळाव्यात मेस्टाचा गंभीर आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिक्षण विभागाने ठरविले तर शहरातील अनधिकृत शाळा किंवा त्रुटी असलेल्या शाळांवर एका दिवसात कारवाई होऊ शकते. मात्र, त्यांच्या आशिवार्दामुळेच अशा शाळांना अभय मिळते अन् प्रश्न निर्माण होत आहेत,' असा गंभीर आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी्ज असोसिएशन अर्थात 'मेस्टा'ने केला आहे.

'मेस्टा'ने गुरुवारी शहरातील इंग्रजी शाळांचा मेळावा घेतला. यावेळी अनधिकृत चालणाऱ्या अन् मान्यता नसताना 'सीबीएसई'च्या नावाखाली चालणाऱ्या अन् परवानगी न घेता भरमसाठ शुल्क वाढविणाऱ्या शाळांचा प्रश्न समोर आला. चुकीच्या शाळांना 'मेस्टा' पाठिशी घालणार नाही, असे 'मेस्टा'च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उलट या शाळांना शिक्षण विभाग पाठिशी घालत आहे. यामध्ये शिक्षण विभागाचे काय हित आहे, हे त्यांनाच माहित. शहरात कोणत्या अनधिकृत शाळा आहेत, कोणत्या शाळांत त्रुटी आहेत, हे शिक्षण विभागाला माहित आहे. शिक्षण विभागाने मनावर घेतले, तर अशा शाळांवर एका दिवसांत कारवाई होऊ शकते. मात्र, ते कारवाई करत नाहीत. त्यामुळे शाळांचे फावत असल्याचाही आरोप मेस्टाने केला आहे.

नोटिसा पाठविण्याचेही नाटक

त्रुटी असलेल्या शाळांना शिक्षण विभाग फक्त नोटीस पाठविल्याचे नाटक करते. अनेक शाळांना नोटीस मिळालेलीच नाही, असा आरोपही मेस्टाने केला. शहरातील २५७ शाळांची तपासणी केल्यानंतर त्रुटी असलेल्या शाळांना नोटीसा पाठविल्याचे शिक्षण विभागाने सांगितले होते. अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याचे तसेच अतिरिक्त शुल्क वाढ, शिक्षक-पालक संघ, परिवहन समिती योग्य नसल्याचे आढळल्याचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले होते. हा सारा फार्स असल्याचा दावा मेस्टाने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डीसीसी’वर नाना-दादांची सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस नेते सुरेश पाटील (दादा) आणि भाजप नेते हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या सहकार विकास पॅनेलने बाजी मारली. गुरुवारी (७ मे) झालेल्या मतमोजणी त्यांनी २० पैकी १८ जागांवर विजय मिळवला.

'डीसीसी' बॅँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ९७.१५ टक्के मतदान झाले होते. बँकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी कॉँग्रेसच्या सुरेश पाटील यांनी भाजपच्या हरिभाऊ बागडे सोंबत युती केली होती. अन्य पक्षातील दिग्गजांना सामावून घेत सहकार विकास पॅनेलकडून वीस उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यांच्या विरोधात काही अपक्षांसह सर्वपक्षीयांनी सहकार बँक उत्कर्ष पॅनलकडून अकरा उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली.

सहकार विकास पॅनलचे पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडूण आले आहेत. उत्कर्ष पॅनलचे अशोक मगर आणि पुंडलिक जंगले यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अवघ्या एका मतांनी पराभव केला. सहकार विकास पॅनलचे प्रभाकर पालोदकर यांना विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला, तर रंगनाथ काळे यांना अवघ्या तीन मतांनी विजय मिळविता आला.

गड आला, सिंह गेला

बिगर शेती संस्था मतदारसंघातून विजयी झालेल्या सुरेश पाटील यांना ३०५, हरिभाऊ बागडे यांना २९६, तर अब्दुल सत्तार यांना २८५ मते मिळाली. कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अनुक्रमे कन्नड व फुलंब्री मतदार संघात आपल्याच उमेदवाराला विजयी करण्यात बागडे-पाटील यांना अपयश आले. याठिकाणी उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी अवघ्या एका मताने विजय खेचून धक्का दिला.

मतपेटीत दहाची नोट

'एका मतदाराने मतपेटीत दहा रुपयांची नोट टाकल्याचे समोर आले आहे. पंचनामा करून ती नोट ताब्यात घेतली,' अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एन. व्ही. आघाव यांनी दिली.

२० पैकी १८ जागा जिंकल्या. आता बँकेची प्रगती आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा पुरविणे यावर भर दिला जाईल. बँकेचा व्यवसाय वाढवून त्यातून नफा मिळेल. पर्यायाने शेतकऱ्यांना अधिक कर्ज देता येणे शक्य होईल. - हरिभाऊ बागडे, नेते, सहकार बँक विकास पॅनल.

दोन जागा गाफील राहिल्याने गेल्या. यापुढे बँकेची प्रगती करतानाच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी, ग्राहकांना चांगली सेवा कशी देता येईल, यावर भर असेल. चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध होईल, याबाबत सर्वजण मिळून निर्णय घेऊ. - सुरेश पाटील, नेते, सहकार बँक विकास पॅनल.

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच विजय झाला. बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवू. बैठक यापुढे लवकर संपणार नाही. पूर्वी शेतकऱ्यांना समान न्याय मिळत नव्हता. यापुढे असे चालणार नाही. - अशोक मगर, नवनिर्वाचित संचालक, उत्कर्ष पॅनल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाण, धनंजय मुंडेंना धक्का

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील जिल्हा बॅँकांच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसच्या मदतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. नांदेडमध्ये युतीने काँग्रेसचा सुफडासाफ केला आहे. तर लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

बीडमध्ये युतीची सरशी

बीड जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. गेल्या तीन वर्षांपासून बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. या निवडणुकीनंतर संचालक मंडळ पुन्हा बँकेच कामकाज बघू शकणार आहे. मात्र, आता बँक अडचणीत बाहेर काढून राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांच्यापुढे असणार आहे. जिल्हा बँकेच्या १९ जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी गुरुवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीसाठी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे केवळ १४ जागांसाठी निवडणूक झाली. केज , बीड , आष्टी , पाटोदा आणि शिरूर या तालुक्यातून प्रत्येकी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने या पाच तालुक्यातून जिल्हा बँकेवर पाच संचालक बिनविरोध निवडून गेले होते. केजमधून ऋषिकेश आड्सकर, बीडमधून शीतल दिनकर कदम, आष्टीमधून साहेबराव थोरवे आणि पाटोद्यातून बांगर सत्यभामा रामकृष्ण व शिरूरमधून संध्या वनवे हे बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये भाजपचे समर्थक चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर समर्थक एक संचालक बिनविरोध निवडून आला आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचे सहकारी पतसंस्था गटातून आदित्य सारडा, महिला प्रतिनधी मतदारसंघातून संगीता धस आणि मिनाबाई राडकर, विमुक्त भटक्या जमातीमधून सर्जेराव तांदळे, इतर मागास वर्ग प्रतिनिधी म्हणून दिनेश परदेशी, अंबाजोगाई तालुक्यातून दत्ता पाटील, वडवणी तालुक्यातून फुलचंद मुंडे, परळी तालुक्यातून नितिन ढाकणे, धारूर तालुक्यातून गोरख धुमाळ यांचा एका मतांनी विजय झाला. धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे कृषा पणन संस्था मतदार संघातून भाऊसाहेब नाटकर, गेवराई तालुक्यातून कैलास नलावडे, व माजलगाव तालुक्यातून चंद्रकांत शेजूळ हे तिघेच निवडून आले आहेत.

लातुरात काँग्रेसचे वर्चस्व

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार दिलीप देशमुख व अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखलील पॅनलने १९ पैकी १७ जागा पटकावल्या आहेत. या निवडणु‌‌‌कीत भाजपने चंचूप्रवेश केला आहे. भाजपचे रमेश कराड आणि धर्मपाल देवशेट्टे या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार अमित देशमुख यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत एकूण १९ पैकी १३ जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध जाहीर झाल्या होत्या. अहमदपूर, जळकोट, देवणी, चाकूर व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातून प्रत्येकी एक संचालक व नागरी बँक पतसंस्था मतदार संघातून एक अशा जागेसाठी ५ मे रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी गुरुवारी पणन महामंडळाच्या कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी घोलकर यांनी सकाळी आठ वाजता मतमोजणीस आठ टेबलवर सुरुवात झाली. पहिल्या फेरीत निकाल पूर्ण होऊन मतमोजणी संपली. पतसंस्था मतदार संघातून अशोक गोविंदपूरकर विरूद्ध रमेश कराड अशी लढत झाली. यामध्ये अशोक गोविंदपूरकर यांना ८९ तर रमेश कराड यांना ११४ मते मिळाली. २५ मतांनी कराड विजयी झाले. माजी चेअरमन शीलाताई पाटील यांचा जळकोटमधून धर्मपाल देवशेट्टे यांचा चार मतांनी पराभव केला. अहमदपूर तालुक्यातून माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आबासाहेब देशमुख यांचा पराभव केला. देवणी तालुक्यातून भगवान पाटील विजयनगरकर यांनी भगवान पाटील तळेगावकर यांचा पराभव केला. चाकूर तालुक्यातील एका जागेसाठी शिवाजी काळे यांना १५, तर नागनाथ पाटील यांना २५ मते मिळाली. शिरूर अनंतपाळ तालुक्यात व्यंकट बिरादार विरूद्ध लक्ष्मण बोधले असे उमेदवार होते. येथे बिरादार यांना २६ पैकी२६ मते मिळाली.

नांदेडमध्ये शेतकरी विकास पॅनेल विजयी

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ पैकी १६ जागांवर विजय मिळवीत शेतकरी विकास पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वखालील काँग्रेसप्रणीत किसान समृद्धी पॅनलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. नांदेड जिल्हा बँकेची सत्तासुत्रे जुन्या व नव्या कारभाऱ्यांच्या हाती गेली आहेत. गुरुवारी सकाळपासून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणुकीचे चित्र दुपारी तीननंतर स्पष्ट झाले. हदगाव मतदारसंघातून आमदार नागेश पाटील आष्टीकर ५२ मते घेऊन निवडून आले आहेत. पराभूत उमेदवार प्रभाकर देशमुख यांना केवळ १२ मते मिळाली. कंधार मतदारसंघातून प्रवीण पाटील-चिखलीकर यांना विजय मिळवित हनुमंत लुंगारे व पांडूरंग कंधारे यांचा पराभव केला. देगलूर मतदारसंघातून अन्नपुर्णा देशमुख आणि माधवराव पाटील या दोघांना समान ३८ मते मिळाली परंतु चिठ्ठीमध्ये मात्र, समृद्धी पॅनलच्या अन्नपुर्णा देशमुखांची लॉटरी लागली. अर्धापूरमधून केशवराव पाटील यंनी प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ता कदम यांचा पराभव केला. उमरीमधून माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर ४२ मते घेऊन निवडून आले. धर्माबाद महिला राखीव मतदारसंघातून शेतकरी पॅनलच्या जिजाबाई जगदंबे ६४६ मते घेऊन निवडून आल्या तर मथुरा सोनटक्के यांना ४८६ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून लक्ष्मण ठक्करवाड ६९६ मते घेऊन निवडून आले. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून हरीहरराव भोसीकर ७१५ मते घेऊन निवडून आले. विमुक्त जाती मतदार संघातून सुशांत शेषराव चव्हाण तर नागरी सहकारी बँका मतदार संघातून दिलीप कंदकुर्ते विजयी झाले. इतर सहकारी संस्था मतदार संघातून मोहनराव पाटील-टाकळीकर तर कृषी पतपुरवठा मतदारसंघातून गंगाधर राठोड विजयी झाले. कृषी पतपुरवठा मतदार संघातून बिलोलीतून माजी खासदार भास्कराव पाटील-खतगावकर तर नायगावमधून राजेश देशमुख कुंटूरकर विजयी झाले. नांदेड मतदारसंघातून डॉ. सुनील कदम, लोह्यातून आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, माहूरमधून गयाबाई चव्हाण, किनवटमधून दिनकर दहीफळे, भोकरमधून बाळासाहेब कदम, हिमायतनगरमधून शंकरराव शिंदे, मुदखेडमधून गोविंदराव शिंदे नागेलीकर विजयी झाले. यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी निकाल जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीतून उद्योगभरारी

$
0
0

>> सुधीर भालेराव

एखाद्या क्षेत्राची आवड माणसाच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवते. त्याचबरोबर यशोशिखरावर पोहचवण्यास कारणीभूतही ठरते. सुभाष नहार यांची उद्योग क्षेत्रातील वाटचाल आणि यश हे उद्यमशील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.

नहार कुटुंबीय हे मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे. सुभाष नहार यांनी मेहकर व नागपूर येथे शिक्षण पूर्ण केले. बी. एस्सी.ची पदवी त्यांनी संपादन केली. एमबीबीएस करण्याची त्यांना संधी होती, परंतु उद्योगाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याकाळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा जमाना होता. साहजिकच भांडी निर्मिती क्षेत्रात उतरण्याकडे त्यांचा कल होता. १९७६मध्ये औरंगाबादेत एका उद्योजक शिबिरात त्यांनी सहभाग घेतला. त्या शिबिरातच त्यांनी प्रस्ताव दाखल केला. जिल्हा उद्योग केंद्राने प्रस्ताव मंजूर केल्याने बँकेनेही त्यांना तातडीने कर्ज मंजूर केले. त्यामुळे सुभाष नहार यांचा उत्साह द्विगुणित झाला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत १९७९मध्ये त्यांनी बंद पडलेला कारखाना विकत घेऊन तेथे 'लक्ष्मी मेटल वर्क्स' या नावाने भांडी तयार करणाऱ्या कारखान्याची उभारणी केली. व्यवसायाचे मार्केटिंग त्यांनी राज्यभर केले. काही चांगले तर, काही वाईट अनुभवही त्यांना आले. फसवणुकीच्या प्रकारांमुळे त्यांना त्याकाळी वीस लाखांचे नुकसानही सोसावे लागले. अनेक अडचणी समोर असतानाही त्यांनी चिकाटीने व्यवसाय केला आणि वयाच्या २१व्या वर्षी ते तीन कारखान्यांचे मालकही झाले.

जपानच्या स्टेनलेस स्टील भांड्याचे निर्मितीत नहार यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. बजाज ऑटो कारखान्यातील कँटिनला भांडी पुरविण्याच्यानिमित्ताने त्यांना एका नव्या उद्योगाची संधी चालून आली. गाइड ट्यूब पुरवणाऱ्या कंपनीत संप सुरू झाल्याने हे काम करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला. नहार यांनी भांड्याच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाइड ट्युबचे काम केले. या कामामुळे त्यांना बजाज ऑटोत काम करण्याची संधी मिळाली आणि आजतागायत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. या कामाने नहार यांनी इंजिनिअरिंग निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. सायलेन्सरचे सुटे भाग तयार करण्याचा कारखाना त्यांनी नहार इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून सुरू केला. सद्यस्थितीत नहार यांचे चिकलठाणा येथे दोन आणि वाळूज येथे तीन युनीट कार्यरत आहेत. नाशिक येथे सायकलचे सुटे भाग तयार करण्याचा कारखाना आहे. लवकरच ते ग्लास उत्पादन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

ग्लास उत्पादन क्षेत्रात उतरणार

रिक्षाला लागणारी विंडफॉल फ्रेम तयार करण्याचे काम अन्य ठिकाणांहून करून घ्यावे लागते. त्यामुळे हे काम स्वतःच करण्याचा निर्णय नहार यांनी घेतला. वाळूज औद्योगिक वसाहतीत आवश्यक तेवढी जागा मिळत नसल्याने त्यांनी औरंगाबाद-नगर रस्त्यावर ग्लास निर्मितीचा कारखाना उभारण्याचे ठरवले आहे. येत्या काही महिन्यांत हा कारखाना आकारास येईल. या कारखान्यात युपोरिय आणि इटालियन तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने केला जाणार आहे. शंभर कोटींचा हा प्रोजेक्ट संपूर्णतः ऑटोमॅटिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. स्थानिक पातळीवरच ग्लास निर्मिती होणार असल्याने सध्याच्या दरात निश्चितच फरक पडणार आहे.

अवघ्या पाच लाखांच्या भांडवलावर व्यवसायवृद्धी

स्टेनलेस स्टीलची भांडी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकताना नहार यांना त्यांच्या वडिलांनी अवघे पाच लाख रुपये भांडवल म्हणून दिले होते. या पाच लाखाच्या भांडवलावर नहार यांनी साडेतीन दशकांच्या काळात पाच युनीटची उभारणी केली. तीनशे कोटींवर त्यांनी आपला व्यवसाय पोहचविला. व्यवसायवृद्धीचे श्रेय नहार हे चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी याला देतात; तसेच वेळेवर अचूक निर्णय घेणे हेही महत्त्वाचे ठरते असे ते आवर्जून सांगतात. व्यवसायातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता व विश्वासार्हतेमुळे यशाचा मार्ग दाखवतो आणि हाच आपल्या यशाचा मंत्र आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही काम करण्याची नहार यांना मोठी आवड आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे ते अध्यक्ष आहेत. 'जीतो'च्या माध्यमातून लवकरच दिल्ली पब्लिक स्कूल सुरू करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. भांगशीमाता गडाच्या परिसरातच ही शाळा उभारण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रातही ते सक्रिय आहेतच. उद्योग क्षेत्रातील कामांची दखल घेऊन त्यांना राज्य; तसेच राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

रोबोटचा उपयोग

नहार इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून नहार हे रिक्षाची संपूर्ण बॉडी तयार करण्याचे काम करतात. हे काम अधिक प्रभावी व दर्जेदार होण्यासाठी त्यांनी रोबोट अर्थात यंत्र मानवाची मदत घेतली आहे. २२ रोबोटच्या माध्यमातून ते हे काम करून घेतात. रोबोटा वापर केल्याने सातत्य व दर्जा कायम राहतो. वेळ आणि मनुष्यबळाची बचत होते, असा अनुभव ते दोन वर्षांपासून घेत आहेत. भविष्यातही या तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग करण्याचा त्यांचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या वेळापत्रकाचा गोंधळ

$
0
0

रिड्रेसल प्रकरणांचा निकाल रखडला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग परीक्षांमधील रिड्रेसल प्रकरणांचा निकाल रखडला आहे. काही विद्यार्थ्यांना अद्याप उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीच मिळालेल्या नाहीत. एकीकडे ही प्रकरणे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे परीक्षांच्या वेळापत्रकाचे काय ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांची फरफट सुरू आहे.

विद्यापीठातर्फे डिसेंबर-जानेवारीत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या. याच्या निकालानंतर आता रिड्रेसल प्रकरणांचा प्रश्न समोर आला आहे. सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी रिड्रेसलसाठी अर्ज सादर केलेले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना छायांकीतप्रत मिळाली नाही. बीए, बीकॉम, लॉ सारख्या अभ्यासक्रमाचा निकाल वेळेत जाहीर झाला, परंतु अभियांत्रिकीच्या निकालानंतर रिड्रेसलच्या प्रकरणांचा गोंधळ कायम आहे. छायांकीत प्रती मिळणार केव्हा, अन् त्या तपासून पुन्हा विद्यापीठाला पाठविणे, यानंतर निकालाची प्रक्रिया. याला विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. अपुरे कर्मचारी यामुळे छायांकीत प्रतीला उशीर लागत असल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकीच्या परीक्षा २४ मेपासून?

रिड्रेसल प्रकरणांचा परिणाम एकूणच वेळापत्रकावर पडतो. विद्यापीठाने तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. यात १४ मेपासून पेपर सुरू होतील असे स्पष्ट करण्यात आले. रिड्रेसल प्रकरणांचा गोंधळ संपत नसल्याने दहा दिवस पेपर पुढे नेण्याचा विचार विद्यापीठ करत असल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले. नव्या वेळापत्रकानुसार २४ मेपासून पेपर सुरू होवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

कुलगुरू दौऱ्यावर

राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये इंजिनीअरिंग परीक्षा संपल्या तर काही ठिकाणी सुरू आहेत. यातच आपल्या विद्यापीठात अद्याप याच्या वेळापत्रकाचा पत्ता नाही. परीक्षा केव्हा, प्रात्यक्षिक केव्हा असा प्रश्न आहे. याचवेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौऱ्यांमध्ये मग्न आहेत. केंद्रीय विद्यापीठाच्या पाहणीचा दौरा आटोपून आले नाही, तोच कुलगुरू पुणे, साताऱ्याच्या दौऱ्यावर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. ते आल्यानंतरच अभियांत्रिकीच्या वेळापत्रकाबाबत काय करायचे यावर निर्णय शक्य असल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगल कार्यालये हाउसफुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील छोटे-मोठ्या १५० मंगल कार्यालय, लॉनसध्या हाउसफुल्ल झाले आहेत. जूननंतर सुमारे साडेचार महिने लग्नतिथी नाहीत आणि या महिन्यात दाट लग्नतिथी असल्यामुळे मंगल कार्यालये, लॉनचे बुकिंग काही महिने आधीच करण्यात आले आहे.

एप्रिलपासून सुरू झालेली लग्नसराई जूनपर्यंत चालणार आहे. यंदा लग्नसराईत तिथी दाट असल्याने विवाह सोहळ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये हाउसफुल आहे. लग्न धुमधडाक्यात करण्याची अनेकांची हौस असते. त्यामुळे मंगल कार्यालये, लॉनची बुकिंग लग्नाची तारीख निश्चित केल्यानंतर लगेच करण्याकडे असतो. शहरात छोटे-मोठे ८० मंगल कार्यालये आणि ६५ ते ७० छोठे-मोठे लॉन आहेत. बहुतांशी मंगल कार्यालये, लॉन दोन ते तीन महिन्यांपूर्वीच बुक करण्यात आले आहेत. पुरोहितांच्या मते मे महिन्यात ७, ८, ९, ११, १४, २७, २८, ३० या लग्नाच्या तारखा आहेत. पुढील महिन्यात १२ जुनपर्यंत तारखा आहेत. यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत लग्नतिथी नाहीत.

महापालिकेकडे नोंदच नाही

शहरात मंगल कार्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक नवीन मंगल कार्यालये, लॉन सुरू होत आहेत. असे असतानाही शहरातील मंगल कार्यालये, लॉनबाबतची माहिती महापालिकेलाच नसल्याचे समोर आले आहे. मालमत्ता विभागाला याबाबबत विचारले असता, केवळ महापालिकेच्याच मंगल कार्यालयांची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जालना रोडवरच सर्वाधिक लॉन

शहरात सुमारे दीडशेच्या घरात मंगल कार्यालये, लॉन असल्याचा प्राथमिक अंदाज मंगल कार्यालयाच्या संचालकांनी व्यक्त केला.यात सर्वाधिक २५हून अधिक लॉन, मंगल कार्यालये जालना रोडवर असल्याचेही सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयी झालेल्यांनीही निवडणूक खर्च दिला नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीचा अंतिम खर्च दाखल न करणाऱ्यांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्यामळे या सर्वांनाच महापालिकेच्या प्रशासनाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. तीस दिवसात खर्चाचा अंतिम तपशील दाखल केला नाही, तर निवडणूक लढवण्यास तीन वर्षांसाठी बंदी घातली जाईल, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ९०६ उमेदवार होते. त्यांच्या पैकी ५१३ उमेदवारांनी अंतिम खर्चाचा तपशील सादर केला आहे. ३९३ उमेदवारांनी खर्चाचा अंतिम तपशील अद्याप सादर केलेला नाही. त्यात निवडून आलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. निवडणूक झाल्यापासून तीस दिवसांत उमेदवारांनी खर्चाचा अंतिम तपशील महापालिकेच्या प्रशासनाला दाखल करणे बंधनकरक आहे. ज्या उमेदवारांनी खर्चाचा अंतिम तपशील दाखल केलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर दाखल करावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त किशोर बोरडे यांनी केले आहे.

जे उमेदवार खर्चाचा तपशील दाखल करणार नाहीत, त्यांच्यावर पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घातली जाणार आहे. निवडणूक आयोगानेच २८ डिसेंबर २००६ रोजी अशा प्रकारचे आदेश काढले आहेत. महापालिका या आदेशाचे तंतोतंत पालन करेल असे बोरडे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिकेच्या शाळा चालवायला द्या’

$
0
0

पोषण आहार देण्याचीही इंग्रजी शाळाचालकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीईनुसार होणारी २५ टक्के मोफत प्रवेशाचा एंट्री पॉइंट सरकारकडून पदरात पाडून घेतलेल्या राज्यातील इंग्रजी शाळांनी, या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द्यावा, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा आम्हाला चालवायला द्याव्यात, अशा नव्या मागण्या पुढे केल्या आहेत.

'महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन'चे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासह मोफत प्रवेश हा पहिली पासूनच दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोफत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाचा स्तर पूर्वप्राथमिक न ठेवता पहिलीपासून करण्याची संस्थाचालकांची मागणी सरकारने चुटकीसरशी मान्य करत संस्थाचालकांना खुश केले. यानंतर आता संस्थाचालकांनी या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द्यावा, अशी पुढे मागणी रेटली आहे. औरंगाबादमध्ये गुरुवारी 'महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन'ने इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांचा मेळावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता, संस्थांचालकांनी ही मागणी केली. जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांचा दर्जा नसल्याने विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. यामुळे शासनाने आपल्या शाळा इंग्रजी शाळा व्यवस्थापनाकडे चालविण्यासाठी द्याव्यात, शाळांमध्येच युनिफॉर्म उपलब्ध करून देण्यास मुभा द्यावी, महापालिका, जिल्हा परिषद शाळांतही २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश द्यावेत, अशा मागण्याही संस्थाचालकांनी केल्या आहेत. प्रवेशाच्या एंट्रीबाबत शासनाचा ३० एप्रिलचा निर्णय योग्य असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र दायमा, भरत भांदरगे, शेख जिया, मनिष हंडे, प्रल्हाद शिंदे यांची उपस्थिती होती.

महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा काय आहे, हे पालकांना माहिती आहे. त्यामुळे अशा शाळा शासनाने आम्हाला चालवायला द्यायला हव्यात. तेथे दर्जा नसल्याने पालक आमच्याकडे प्रवेशासाठी येतात. पालकांचीच इंग्रजी शाळांची मागणी आहे. - संजय तायडे पाटील, अध्यक्ष, मेस्टा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्टँड चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम ठप्प आहे. सर्व्हिस रोडचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजनही उपस्थित होते. अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर असल्याचे यावेळी लक्षात आले.

एमएसआरडीसीच्या माध्यमातून सिडको बसस्टँड चौकात उड्डानपुलाचे बांधकाम केले जात आहे. पूर्व-पश्चिम असा हा उड्डानपूल आहे. या उड्डानपुलाचे बांधकाम सुरू झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व्हिस रोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उड्डानपुलाच्या दक्षिणेला महापालिकेतर्फे विकसित करण्यात आलेला हरित पट्टा एमएसआरडीसीने सर्व्हिस रोड साठी ताब्यात घेतला आणि त्यातून वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली.

उड्डानपुलाच्या उत्तरेकडील बाजूला मात्र सर्व्हिस रोडसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. मूळ रस्ता आणि उड्डानपुलासाठी ताब्यात घेतलेला रस्ता यात फारच कमी अंतर असल्यामुळे वाहतुकीची कोंडी हा नित्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर कशा पध्दतीने मात करता येईल, हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्यासह या परिसराला भेट दिली आणि पाहणी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीची कोंडी होणार नाही या दृष्टीने उड्डानपुलाच्या उत्तर बाजूने सर्व्हिस रोड तयार करायचा असेल, तर काही अतिक्रमणे हटवावी लागतील असे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अतिक्रमणांमध्ये काही हॉटेल्सच्या संरक्षक भिंती, खासगी व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. हे काम महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने युध्द पातळीवर हे काम करावे, अशी अपेक्षा पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली. कायदा - सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही मदत लागल्यास पोलिस प्रशासन महापालिकेला मदत करेल, असे आश्वासन देण्यात आले.

पालकमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा

सिडको बसस्टँड चौकातील उड्डानपुलाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री रामदास कदम यांनी सायंकाळी केली. अपुऱ्या सर्व्हिस रोडमुळे होणारी वाहतुक कोंडी, उड्डानपुलाची लांबी वाढवण्याचा मुद्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही आदेशही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थांबे जवळ; बंदी राहणार कायम

$
0
0

काळी-पिवळी चालकांना अंशतः दिलासा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराबाहेर काढण्यात आलेल्या काळी-पिवळी चालक-मालकांना गुरुवारी (७ मे) पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत थोडा दिलासा मिळाला. त्यांना पूर्वी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये थोडा बदल करण्याच संकेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. पाहणी करून शुक्रवारी थांबे निश्चित करण्यात येणार असून शहरातील बंदी कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तांनी काळी-पिवळी टॅक्सी व सहा आसनी रिक्षांना मंगळवारपासून शहर प्रवेश बंदी केली आहे. या आदेशामुळे काळी-पिवळी चालक व मालक धास्तावले आहेत. या वाहनांना जळगाव रोडवरील हर्सूल, जालना रोडवरील चिकलठाणा, अहमदनगर, नाशिक रोडवर नगरनाका तसेच पैठण रोडवर महानुभाव आश्रम चौकात थांबे देण्यात आले होते. मराठवाडा टॅक्सी, जीप ओनर्स अशोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी थांब्यामध्ये बदल सूचवण्यात आले. या थांब्याची पाहणी करून शहराजवळील हे नवीन थांबे शुक्रवारी निश्चित करण्यात येणार आहेत.अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या इनिंगला धडाकेबाज सुरुवात

$
0
0

>> विजय देऊळगावकर

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्वीकारून अवघे १० दिवस झाले आहेत. या १० दिवसांमध्येच त्यांनी आपल्या कामाची पद्धत कशी असेल याची चुणूक दाखविली आहे. याच पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहिल्यास पोलिसांचे मनोधैर्य उंचावेल आणि क्राइम रेटही नियंत्रणात राहील.

पोलिस शिपायांना आतापर्यंत हव्या त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखावी लागत होती. आयुक्त अमितेशकुमार यांनी पारदर्शकपणे, सव्वापाचशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मर्जीनुसार केल्या आहेत. या निर्णयामुळे पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आयुक्त आपला विचार करत असतील तर, आता आपणही कृतीशीलपणा दाखवला पाह‌िजे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आयुक्तांनी वाहतुकीच्या बाबतीत महत्त्वाचा घेतलेला निर्णय म्हणजे काळी-पिवळी वाहने शहराबाहेर हद्दपार केली. या अवैध प्रवासी वाहतुकींने शहराला जेरीस आणले होते. या वाहनांना शहराबाहेर परवानगी असताना ते थेट मध्यवर्ती बसस्थानकापासून प्रवासी बसवून नेत होते. याकडे आतापर्यंत कोणत्याही पोलिस आयुक्तांनी लक्ष दिले नव्हते. अमितेशकुमार यांनी ही बाब मनावर घेतली. काळी-पिवळीला चिकलठाणा, हर्सूल, महानुभाव आश्रम व नगरनाका ही हद्द त्यांना ठरवून देण्यात आली. वाहतूक शाखेने देखील हा निर्णय ठोसपणे अंमलात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. 'काळी-पिवळी'प्रमाणेच शहरातील बेशिस्त अॅपेरिक्षांवरही ते कारवाईचा बडगा आयुक्त उचलतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

शहरात अनेक ठिकाणी भाऊ, दादा व गल्लीतील पुढाऱ्यांचे राज्य आहे. या झोपडपट्टी दादांचा त्रास सर्वसामान्यांना होतो. पोलिस ठाण्यात गेल्यानंतरही अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध तक्रार घेतली जात नाही. गेल्या महिन्यात पुंडलिकनगर भागात एका गुंडाने दांपत्याला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी या तरुणाची तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केला. फिर्यादी तरूणावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असे प्रकार अनेक ठिकाणी सर्रास घडतात. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनेक भागांत दारूची अवैध विक्री करण्यात येते. सबंधित पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना या बाबी माहिती नाहीत, असे नाही, मात्र 'अर्थपूर्ण' संबंधांमुळे त्याकडे डोळेझाक करण्यात येते. या झोपडपट्टी दादा, दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणेही गरजेचे आहे. नवे आयुक्त अमितेशकुमार यांच्या सुरुवातीच्या कामाच्या शैलीवरून तरी या अवैध धंद्यांना लगाम बसेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.

संजयकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील वडगाव कोल्हाटी हे गाव दत्तक घेतले होते. गुन्हेगारांचे गाव म्हणून या गावाची ख्याती होती. संजयकुमार यांनी या गावाचा कायापालट केला होता. वडगावप्रमाणे सिडको एमआयडीसी हद्दीतील नारेगाव देखील दत्तक घेण्यात येणार होते, परंतु नंतर हा निर्णय बाजुला पडला. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून वडगाव कोल्हाटीतील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली होती. अमितेशकुमार अशा काही संकल्पना राबवणार का याकडे पोलिस दलातसोबतच सर्वसामान्यांनाही उत्सुकता आहे. थोडक्यात आपल्या नव्या इनिंगला सुरुवात त्यांनी धडाकेबाज पद्धतीने केली आहे. कायदा व सुव्यस्थेसोबतच नागरिकांना गुन्हेगारापासून दिलासा देण्यास आयुक्त सक्षम राहतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीनंतरच होणार अटक

$
0
0

अॅड. घाणेकर गोळीबार, बलात्कार प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅड. निलेश घाणेकर यांच्यावरील गोळीबार व लैंगिक शोषण या दोन्ही प्रकरणात पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. त्यानंतरच या दोन्ही गुन्ह्यात संशयितांना अटक करण्यात येईल, असे संबंधित तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अॅड. घाणेकर यांनी मंगळवारी (५ मे) रात्री दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचा गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. खंडणीची केस परत घ्या व मला पैसे द्या, अशी मागणी अॅड. स्मिता लेंडवे पाटील यांनी कार अडवली; त्या निघून गेल्यानंतर दोघांनी गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून अॅड. पाटील व दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अॅड. पाटील यांची बुधवारी (६ मे) चौकशी केली, मात्र त्यांना ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून त्यानंतरच संशयितांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. दरम्यान बुधवारी सायंकाळी अॅड. घाणेकर यांच्याविरुद्ध महिला वकिलाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अॅड. घाणेकर यांनाही अटक करण्यात आलेली नाही. बलात्कार प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर अटक होईल, असे पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणात संशयीत विधीज्ञ असल्याने पोलिस सावध भूमिका घेत असल्याचे दिसते.दरम्यान, बलात्कार प्रकरणात अॅड घाणेकर शुक्रवारी (८ मे) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

आयुक्तांनाही शंका

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दोन दिवस या प्रकरणाचा आढावा घेतला. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या प्रकरणाबद्दल शंका व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेड‌िज बार चालकांना पोलिस आयुक्तांची तंबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लेड‌िज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी खासगी व्यक्ती पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. या बारमध्ये काय चालते, याची माहिती जमा केली व त्यानंतर बार चालकांना 'लेड‌िज सर्व्हिस' बंद करण्याची तंबी दिली.

शहरातील तीन हॉटेलमध्ये ग्राहकांना महिलांमार्फत सेवा दिली जाते. या ठिकाणी बारबाला काम वेटरचे काम करतात. या बारबद्दल नागरिकांकडून पोलिस आयुक्तांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तक्रारींची शहनिशा करण्यासाठी त्यांनी खाजगी व्यक्ती पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. त्यातून आयुक्तांना अनेक गैरप्रकार समजले. बारबालांचे उत्तेजक कपडे, बारमधील बंदीस्त वातावरण, बाऊंसरची दादागिरी त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे तीन दिवसांपासून पोलिसांनी लेड‌िज बारवर लक्ष दिले होते. लेड‌िज बार चालक-मालकांना गुरुवारी (७ मे) अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर आयुक्तांनी ही सेवा बंद करा, असे सुनावले. बार मालक युक्तीवाद करत असताना त्यांनी आपल्याकडे माझ्याकडे पुरावे असून त्यानंतरच ही भूमिका घेतले स्पष्ट केले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे बार चालक-मालक निरुत्तर झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यातील ८ आरोपींना ‘मकोका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी येथे ‌बेकरी उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, ११ आरोपी अद्यापही पसार आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा दरोडा टाकण्यात आला होता.

डिलक्स बेकरीचे मालक जुनेदखान यांच्या घरावर २४ फेब्रुवारी रोजी दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यामध्ये १० लाख रुपये रोख व ४ लाख रुपये किमतीचे दागिने पळवण्यात आले होते. आंतरराज्य टोळीने हा दरोडा टाकल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी टोळीप्रमुख शानील माणिक पिंपळे याच्यासह राजन काळे, संजय काळे, भाऊसाहेब पिंपळे, जयराम गोरडे, गणेश पिंपळे, निलमसिंह उर्फ महेश हरिसिंह पारधी व कोंडीराम मिश्रीलाल चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

या आरोपीच्या ताब्यातून दरोड्यातील ११ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही संघटित गुन्हेगारांची टोळी आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, जमादार द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, नवाज पठाण व महेश कोमटवार यांनी ह‌ी कारवाई केली.

मध्य प्रदेशातील सोळुंकी अद्याप पसार

या टोळीचा मास्टर माइंट मुच्छड सोळुंकी हा आहे. या दरोड्याचा कट त्यानेच रचला होता. त्याच्या शोधासाठी पोलिस मध्य प्रदेशात गेले होते, मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्याशिवाय अन्य १० आरोपीही पसार आहेत. त्यामध्ये सोळुंकीच्या टोळीतील सदस्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे शाखा लावणार का छडा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टरलाइट' कंपनीची घातक रसायने खाम नदीत टाकणाऱ्या आरोपींचा वाळूज पोलिसांना दोन महिन्यानंतरही शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे; मात्र श्रुती भागवत हत्या प्रकरण, अमिनाबी हत्या प्रकरण, अंकुश खाडे हत्या प्रकरण अशा अनेक घटनांचा तपास लावण्यात गुन्हे शाखा सपशेल अपयशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, खाम नदी प्रकरणातील आरोपी शोधण्यात गुन्हे शाखा यशस्वी ठरणार का याबद्दल बाबत साशंकता आहे.

खाम नदीत टँकरमधील घातक रसायने सोडल्याची खळबळजनक घटना २८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. नदी प्रदूषणाचा सर्वाधिक धोकादायक प्रकार म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत मनसेचा शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, माजी नगरसेवक आगा खान, तुषार पाखरे, अस्लम शेख आणि चंदन नागेंद्र सिंग या पाच जणांना अटक केली होती. सर्व आरोपी हर्सूल कारागृहात असून वाळूज पोलिस मुख्य कंत्राटदारांचा शोध घेत होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी अजय पांडे यांनी मध्य प्रदेश, गुजरात आणि मुंबईत शोध घेऊनही मुख्य सूत्रधार सापडले नाही. नदीत सोडलेले घातक रसायन 'स्टरलाइट' कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. शिवाय रसायने नामशेष करण्याचे कंत्राट ठाणे येथील बालाजी केमिकल्स इंडस्ट्रीजचे आर. सी. मेहता आणि वापीच्या 'शुभम सोल्यूशन'कडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती; मात्र त्यानंतरही मुख्य कंत्राटदारांना अटक करण्यात आली नाही. कारागृहातील पाचजण स्थानिक कंत्राटदार आहेत. मुख्य आरोपी सापडत नसल्यामुळे सर्वजण कारागृहात खितपत पडले आहेत. पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या सात टँकरपैकी चार टँकरमध्ये रसायने होती. याचे नमुने फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, हा भयानक प्रकार घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने 'स्टरलाइट'ला फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली. या कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. खाम नदीचे पाणी थेट जायकवाडी प्रकल्पात जात असल्यामुळे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही तपासाच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही तपास लागला नाही. खाम नदी प्रकरणाचा तपास करण्यात वाळूज पोलिसांना अपयश आल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपवली आहे. खाम नदीत रसायने ओतणारे मुख्य ठेकेदार पकडले जाणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गुन्हे शाखेच्या मर्यादा

खाम नदी प्रकरणाचा तपास लावण्यासाठी गुन्हे शाखा प्रयत्न करणार आहे; मात्र मागील काही गाजलेल्या प्रकरणांचा इतिहास पाहता गुन्हे शाखेच्या तपासाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. श्रुती भागवत खून प्रकरण, मिटमिटा येथील अमिनाबी या महिलेची हत्या, बाळापूर येथील अंकुश खाडे हत्या प्रकरण अशा काही प्रमुख हत्याकांडाचा तपास लावण्यात गुन्हे शाखा सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे खाम नदी प्रकरणात नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.

खाम नदीत रसायन प्रकरणाचा घटनाक्रम

२८ फेब्रुवारी : रसायने ओतताना आरोपींना अटक

१ मार्च : तीन दिवसांची पोलिस कोठडी

२ मार्च : आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

४ मार्च : तपासासाठी पुन्हा तीन दिवसांची कोठडी

७ मार्च : पाच जणांची हर्सूल कारागृहात रवानगी

५ मेः प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगराध्यक्ष पायउतार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत बांधकामप्रकरणी गंगापूरच्या नगराध्यक्ष निलम खाजेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिला. या निर्णयामुळे नगराध्यक्षांना पायउतार व्हावे लागणार आहे.

गंगापूर शहरात समतानगरमध्ये नगराध्यक्षांचे सासरे व कुटुंबाने बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष खाजेकर यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अशोक कचरू खाजेकर यांनी १९ मार्च २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत नागरी अधिनियम १९६५मधील कलम ४४नुसार नगरसेवक निलम खाजेकर यांचे पद रद्द करण्याची मागणी केली.

नगराध्यक्षा झाल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी परवानगी न घेता घराचे बांधकाम केले. नगर परिषदेने त्यांना परवानगी न घेता बांधकामाबाबत आणि हे अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस दिली होती. याप्रकरणी निलम खाजेकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अर्जदाराने केली होती. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी नगराध्यक्ष निलम खाजेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय आज घेतला. या निर्णयामुळे नगराध्यक्षा खाजेकर यांना पायउतार व्हावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाचे काम लांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उड्डाणपुलाची लांबी ३०० मीटरने वाढविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) गेल्या १२० दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सिडको बसस्टँड चौकातील उड्डाणपुलाचे काम बंद झाले आहे. पुलाची लांबी ३०० मीटरने वाढविण्यासाठी ३५ कोटी रुपये जादा खर्च करावा लागणार आहे. त्याची तरतूद होत नाही तोपर्यंत पुलाचे कामही सुरू होणार नाही.

जालना रोडवर पूर्व-पश्चिम दिशेने सिडको बस स्टँड चौकात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. पूर्वेकडे सान्या मोटर्सपासून या पुलाची सुरुवात होते आणि पश्चिमेकडे हॉटेल रामगिरी जवळ हा पुल संपतो, असे नियोजन करण्यात आले आहे. सान्या मोटर्स ते रामगिरी हॉटेल असा उड्डाणपूल झाल्यास एपीआय कॉर्नर आणि सिडको बस स्टँड हे दोनच चौक या पुलाखाली सामावले जातात. रामगिरी हॉटेलनंतरचा कॅनॉट प्लेसकडे जाणारा अग्रसेन चौक मात्र समावला जात नाही. उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या चौकातील वाहतूक धोकादायक होण्याची भिती आहे. त्यामुळे रामगिरी हॉटेलजवळ उतरणारा उड्डाणपुल ३०० मीटरने लांबविल्यास अग्रसेन चौकही त्यात समावला जाईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही, असा प्रस्ताव महापालिकेने एसएसआरडीसीकडे दिला आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपयांची जास्तीची मागणी करण्यात आली.

एमएसआरडीसीच्या स्थानिक कार्यालयाने तयार केलेला हा प्रस्ताव चार महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याला मंजुरी मिळाल्याशिवाय उड्डाणपुलाचे काम केले जाणार नाही, असे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगतात.

पुन्हा प्रयत्न करणार

बेसकँपवरील कोसळणाऱ्या टॉपचा जीवघेणा अनुभव अनेक गिर्यारोहकांनी पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेवर न येण्याचा निर्णय घेतला. ही घटना थरकाप उडविणारी, परंतु माझे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार रफिक शेख यांनी व्यक्त केली. या मोहिमेसाठी माझा जवळपास १५ लाख रुपयांचा खर्च वाया गेला. माझ्या पाठीशी राहणाऱ्या मंडळींसाठी मी पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेवर आखणार, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाणांना दणका

$
0
0

औरंगाबाद बँकेत सुरेश पाटील यांचे वर्चस्व कायम

म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभेपाठोपाठ ग्रामीण मराठवाड्याचे राजकारण तापवणाऱ्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलला दणका मिळाला. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी युतीच्या शेतकरी विकास पॅनलने चव्हाण यांना अस्मान दाखविले. बीडमध्ये ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडेंनी, परभणीमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, लातूरमध्ये माजीमंत्री दिलीप देशमुख यांनी आपले गड राखले आहेत. औरंगाबादमध्ये प्रमुख चार पक्षांच्या एकत्रित पॅनलने बाजी मारली. काँग्रेसचे सुरेश पाटील, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सहकार विकास पॅनेलने गड राखला.

नांदेडमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण गटाला जोरदार धक्का देत नांदेड बँक आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. चव्हाण गटाला ५ जागांवर समाधान मानावे लागले. परभणीमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर, माजी खासदार सुरेश वरपूडकर यांचेच वर्चस्व राहिले. त्यांच्या जय तुळजा भवानी शेतकरी विकास पॅनलने १७ जागा जिंकल्या. माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या बँक बचाव पॅनलला केवळ ४ जागा मिळाल्या.

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सहकार विकास गटाने एकतर्फी विजय मिळविला. त्यांना १९ जागा जिंकता आल्या. अपक्षांच्या उत्कर्ष पॅनलला दोन जागा जिंकता आल्या.

बीड बँकेच्या निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री सुरेश धस या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासोबत महायुती केली या महायुतीने १७ जागा जिंकल्या. विरोधकांना केवळ ३ जागा मिळाल्या. लातूरमध्ये माजीमंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्याच गटाने वरचष्मा कायम ठेवला. त्यांच्या नेतृत्वाखालील १९ पैकी १७ जागा जिंकल्या. भाजपचे रमेश कराड यांच्यासह दोन विरोधक येथे निवडून आले. उस्मानाबादमध्ये गुरुवारी मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेलाही मुकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटी'चे स्वप्न औरंगाबादकरांना दाखविले जात असले तरी, महापालिका प्रशासनाच्या अनास्था शहराच्या विकासाला भोवण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने 'स्मार्ट सिटी'साठी तयार केलेल्या 'अमृत' योजनेत शहराचा समावेश करण्याचा प्रस्तावच महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. त्यामुळे 'स्मार्ट' होण्याचे औरंगाबाद शहराचे स्वप्न वास्तवात येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका निवडणुकीच्या काळात प्रचार सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहर 'स्मार्ट सिटी' करू, अशी घोषणा केली. शिवसेनेच्या नेत्यांनीही या घोषणेची पाठराखण केली. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची आली. गेल्या काही वर्षांपासून पालिकेत युतीच सत्तेवर आहे. युती सत्तेवर असलेल्या महापालिकेच्या प्रशासनाची अनास्था आता शहरासाठी मोठा धोका ठरू लागली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे यापूर्वी औरंगाबाद शहराचा समावेश केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत (जेएनएनयूआरएम) होऊ शकला नाही. या योजनेत शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासनातर्फे ठोस प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले नाहीत. रस्त्यांसाठीचा सव्वासहाशे कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविला, पण तो सविस्तर नसल्यामुळे बाजुला पडला.

दरम्यानच्या काळात केंद्रात सत्तांतर झाले आणि नव्याने आलेल्या भाजप सरकारने जेएनएनयूआरएम योजना गुंडाळून ठेवली. आता या योजनेची जागा 'अमृत' (अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रांसफॉरमेशन) ही योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील ५०० प्रमुख शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या औरंगाबादचा या ५०० शहरांच्या यादीत समावेश होऊ शकतो, पण त्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने अद्याप काहीच हालचाल केली नाही.

शहरात सध्या असलेल्या एकूणच पायाभूत सोईंचा विचार 'अमृत'मधील समावेशासाठी महत्त्वाचा आहे. त्यात रस्ते, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शहर बस वाहतूक आणि महापालिकेच्या विविध करांच्या वसुलीचे प्रमाण यांचा समावेश आहे. या सर्वच आघाड्यांवर औरंगाबाद महापालिका पिछाडीवर आहे. कोणत्याही पायाभूत सुविधांचा ठोस प्रस्ताव महापालिकेने तयार केलेला नाही. प्रस्तावच तयार नसल्यामुळे शासनाकडे काही मागणी करण्याचा प्रश्नच नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; 'अमृत' योजनेचा अध्यादेश केंद्र सरकार येत्या महिनाभरात काढण्याची शक्यता आहे. त्यात ५०० शहरांचाही उल्लेख असेल. अध्यादेश जारी होण्यापूर्वी महापालिकेने ठोस प्रस्ताव सादर केला नाही तर, पुढील ५ वर्षांत औरंगाबाद शहराचा समावेश या योजनेत होणार नाही आणि स्मार्ट सिटीचे स्वप्नही वास्तवात येणार नाही.

अशी आहे 'अमृत' योजना

- या योजनेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्यात देशभरातील १०० मोठी शहरांचे रुपांतर 'स्मार्ट सिटी'त करण्यात येईल. त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ५०० शहरे स्मार्ट सिटी करण्याची योजना आहे. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे ५ वर्षांत २ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

- औरंगाबाद शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यातील शहरांमध्ये होऊ शकतो, पण त्यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरामागे लपलो अन् वाचलो!

$
0
0

>> सुधीर भालेराव

भूकंपाच्या धक्क्याने बेस कँप अक्षरशः हालत होता. पुमोरी शिखरावरील टॉप कोसळत आमच्याच दिशेने येऊ लागला. टॉप रुपात प्रचंड वेगाने साक्षात मृत्यू आमच्या दिशेने येत होता. काही क्षणांत हा टॉप आमच्यावर कोसळणार होता. बेसकँपवरील सर्वच गिर्यारोहक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करीत होते. आम्ही एका मंदिरामागे लपलो अन् थोडक्यात नशीबाने आम्ही बचावलो..., हा अनुभव आहे औरंगाबादचे गिर्यारोहक रफिक शेख यांचा. एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेलेले शेख यांनी हिमालयातील भूकंपाचा अनुभव 'मटा'शी शेअर केला.

पोलिस दलात असलेल्या रफिक शेखच्या एव्हरेस्ट मोहिमेवर सलग दुसऱ्या वर्षी संकट कोसळले. गेल्यावर्षी हिमकडा कोसळल्यामुळे १६ शेर्पांचा मृत्यू झाला होता. यावेळी भूकंपाने एव्हरेस्ट मोहीम रद्दच झाली. 'भूकंप झाला त्यावेळी आम्ही बेसकँपवर होतो. सर्व गिर्यारोहक ब्रेकफास्ट करीत होते. त्यावेळी भूकंपाचा धक्का आम्हाला जाणवला. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. त्याचवेळी एव्हरेस्टच्या विरुद्ध बाजूने असलेल्या पुमोरी शिखरावरील टॉप कोसळताना आम्हाला दिसला. हा टॉप आमच्याच दिशेने येत होता. बर्फ, मोठे दगड आमच्या दिशेने वेगाने येत होते. सर्व गिर्यारोहक हादरून गेले. जीवाच्या आकांताने सर्वांचीच पळापळ सुरू होती. महाराष्ट्रातले आम्ही तिघांनी एका मंदिराचा आधार घेतला. दगडावर दगड ठेवून हे मंदिर तयार करण्यात आले होते. कोसळलेला टॉप आर्मी कँपच्या दिशेने गेल्यामुळे आम्ही थोडक्यात बचावलो. साक्षात मृत्युचेच दर्शन आम्हाला झाले,' असे शेख यांनी सांगितले. 'बेसकँप अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलेला. कँप-२वर जाण्याचा रस्ताही शिल्लक नव्हता. साहित्य तेथेच ठेवून आम्हाला मागे परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. बेसकँप ते लुकलापर्यंतचा प्रवास पायी केला. त्याला तीन दिवस लागले. तिथे लष्कराच्या हेलिकॉप्टरने आम्ही काठमांडूला पोचलो.

भूकंपामुळे काठमांडू शहराची प्रचंड हानी झाली होती. अडचणीत सापडलेल्या नेपाळवासीयांच्या मदत कार्यातही आम्ही सहभाग घेतला. अहमद जलील यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी काठमांडू ते मुंबई आणि मुंबई ते औरंगाबादपर्यंत विमान प्रवासाची व्यवस्था केल्यामुळे सुरक्षित घरी आलो,' असा त्यांचा अनुभव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images