Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डेंगीसदृश्य रूग्ण खासगी रूग्णालयात

$
0
0
शहरामध्ये विविध ठिकाणी डेंगीसदृश्य रूग्ण आढळत असून हेडगेवार हॉस्पिटलमध्ये विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये काम करणा-या एका रूग्णाला दाखल करण्यात आले आहे.

विभागीय चौकशीसाठी झेडपीच्या ३७ कर्मचा-यांची प्रकरणे

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ३७ कर्मचाऱ्यांची प्रकरणे गेल्या सहा महिन्यांत चौकशीसाठी विभागीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

विशेष सभेस निवडणूक आयोगाची परवानगी

$
0
0
शहर अभियंत्याच्या नियुक्तीसाठी विशेष सभा घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला परवानगी दिली आहे.

काँग्रेस आघाडीचे सदस्य सहलीला

$
0
0
औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे सुमारे सव्वादोनशे सदस्य आज विविध ठिकाणी सहलीला रवाना झाले.

‘ओके मीटर’ तपासणीत फास्ट

$
0
0
जीटीएलच्या तपासणीत ‘ओके’ असलेले वीज मिटर महावितरणच्या तपासणीत शंभर टक्के ‘फास्ट’ असल्याचे उघडकीस आले. वीज ग्राहक तक्रार निवारण मंचने ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर जीटीएलला मीटर बदलून देणे, बिल दुरुस्त करून देणे व व्याज, डीपीसी चार्जेस रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिष्ठितांचीही वीजचोरी

$
0
0
जीटीएलच्या भरारी पथकाने तीन महिन्यांत ६४३ ग्राहकांनी केलेली एक कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे.

पालिकेच्या ब्रेकरने नहर फोडली

$
0
0
जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या पालिकेच्या ब्रेकरने पानचक्की जवळची ऐतिहासिक नहर फोडली. त्यामुळे लाखो लिटर पाणी खाम नदीत वाहून गेले.

मराठवाड्यात पाऊस

$
0
0
सुमारे दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंत मराठवाड्यात सरासरी २१.६५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

लातुरात विलासराव देशमुख यांना आदरांजली

$
0
0
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने बाभळगाव येथे त्यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहण्यासाठी बुधवारी नागरीकांनी गर्दी केली होती.

विकासाचा ध्यास हीच श्रद्धांजली

$
0
0
सरपंच ते केंद्रीयमंत्री असा धडाडीचा प्रवास अतिशय आश्वासकपणे करण्याचे कौशल्य केवळ (कै.) विलासराव देशमुख यांच्यामध्येच होते. अनुभवसिद्ध शहाणपण, माणसे पारखण्याची पारख आणि विलक्षण तारतम्य असलेल्या विलासरावांच्या निधनाने मराठवाड्यासह महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

२ विविध घटनांत विवाहितांचा छळ

$
0
0
दोन विविध घटनांमध्ये विवाहितांचा छळ करण्यात आल्याचा प्रकार गारखेडा व देवळगावराजा येथे घडला. याप्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नातीच्या औषधात आजीने घातले विष

$
0
0
वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा या अट्टहासापोटी आजीनेच नातीला संपवण्यासाठी खोकल्याच्या औषधात विष घातल्याचे घटना उघड झाली आहे.

‘स्वाइन फ्लू’चे संशयित २ पेशंट दाखल

$
0
0
घाटी हॉस्पिटलमध्ये संशयित स्वाइन फ्लूचे दोन पेशंट बुधवारी दाखल झाले आहेत. यात एका सात वर्षीय बालिकेचा समावेश आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात स्वाइन फ्लूची साथ नसल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी केला होता.

एकोणीस मतदारांना हवे मदतनीस

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ मतदारांनी मतदानासाठी मदतनीस मिळावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे केला आहे.

अनौरस बालकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

$
0
0
बलात्कारातून जन्मलेली बालके बलात्काराशी संबंधित खटल्यातील पुरावा किंवा वस्तू नाही. नकोशा आणि अनौरस बालकांना प्रेम, हक्काचे घर आणि पालक, दत्तक विधानाद्वारे त्वरेने मिळणे त्यांचा मूलभूत हक्कच आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिला आहे.

असंतोषाचा फायदा होईल

$
0
0
मतदारांमध्ये मतपरिवर्तन होऊन ते मलाच मतदान देतील, असा दावा औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार आमदार किशनचंद तनवाणी यांनी आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

निसर्ग-मानवता-संवर्धनाचा संकल्प करू या...

$
0
0
समतामूलक शाश्वत विकास साध्य करून सुखी-समाधानी-समृद्ध भारत निर्माण करण्याचा. खरंतर भारतीय राज्य घटनेचा हा पाया आहे.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे

$
0
0
विभागीय आयुक्तालयात गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमीत्त म़ुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येताना छत्री मोबाईल वगळता कोणतीही वस्तू सोबत आणू नये.

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तपासणी

$
0
0
स्वाइन फ्लूने शहर पोलिस आयुक्तालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. या घटनेने पोलिसांत खळबळ उडाली आहे.

औद्योगिक क्षेत्रात त्वरित मुलभूत सुविधा पुरवाव्यात

$
0
0
औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह इतर संबंधित विभागाने त्यांच्याशी संबंधित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी केले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images