Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील अंधानेर शिवारात गुरांना चारापाणी करण्यास गेलेल्या तरुणाचा शेतातील वीजप्रवाह उतरलेल्या विजेच्या खांबाच्या ताणाच्या तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. अंधानेर येथील सुनील कैलास मालकर (वय १८) हा शेतातील गुरांना चारापाणी करण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तेव्हा खांबाच्या ताणाच्या तारेत वीजप्रवाह उतरला होता. या तारेला स्पर्श केल्याने त्याला विजेचा गंभीर धक्का बसला. त्याला कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी मृत घोषित केले. तरुणाचा मृत्यू वीजमंडळाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, मृत तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अंधानेरच्या ग्रामस्थांनी वीजमंडळाकडे केली आहे.

चेकवर शून्य वाढवून दोन लाख हडपले

वैजापूर : सिमेंट रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीच्या चेकवर शून्य वाढवून एका ग्रामसेवकाने दोन लाख रुपये हडपल्याची घटना उघडकीस आली. गट विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात ग्रामसेवक कल्याण शेळकेसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैजापूर तालुक्यातील वक्ती, पानवी गावांमध्ये ४ फेब्रुवारी २०१४ ते २० ऑक्टोबर २०१४ या कालावधीत जिल्हा परिषद अंतर्गत सिमेंट रस्ते तयार करण्या आले. या कामासाठी शासनाने निधी मंजूर करून धनादेशही दिले. या चेकवर संबंधित गावचे सरपंच व ग्रामसेवकाच्या स्वाक्षऱ्या झाल्या. यातील दोन धनादेशावर ग्रामसेवक शेळके याने एकूण रकमेच्या पुढे आणखी एक झिरो वाढवून इतर दोघांच्या संगनमताने दोन लाख रुपये उचलून घेतले, अशी तक्रार देण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐन सिझनमध्ये दोन शिवनेरी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद ते पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन शिवनेरी बस बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. लग्नसराई आणि शैक्षणिक सुट्यांच्या काळात या बस बंद असल्यामुळे एसटी महामंडळाचेही नुकसान होत आहे. या दोन्ही बसची एअर कंडिशनिंग यंत्रणा नादुरुस्त झाली आहे.

औरंगाबाद ते पुणे मार्गावरील शिवनेरी बस ऐन सिझनच्या काळात अचानक बंद करण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर आगाराच्या ‌एका शिवनेरी बसचा अपघात झाला आहे. त्यामुळे तीही बस सध्या बंद आहे. त्याशिवाय गेल्या तीन दिवसांपासून पुणे मार्गावरील दोन बसची एअर कंडिशनिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून तीन ते चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसचे कंत्राटदार बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको आणि सीबीएस बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात कचरा साडलेला असतो. प्रवाशांना बसण्यासाठी जागाही मिळत नाही. यामुळे एसटी प्रशासनाने स्वच्छता कंत्राट बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरासाठी भरलेले टेंडर कमी दराने भरले होते. त्यामुळे सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात होते, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

सिडको आणि सीबीएसच्या परिसर स्वच्छतेचे कंत्राट भीमाई महिला बचत गटाला देण्यात आले होते. एसटी प्रशासनाकडून सीबीएसच्या स्वच्छतेसाठी दरमहा १२ हजार ३०० आणि सिडको बस स्थानकच्या स्वच्छतेसाठी दरमहा १२ हजार रुपये दराने कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटदाराकडून सिडको बस स्थानक स्वच्छ करण्याचे काम केले जात नव्हते. स्थानकावरील अस्वच्छतेबाबत प्रवाशी कायम तक्रार करीत होते. संबंधित कंत्राटदाराला काही‌ दिवसांच्या स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या दरापैकी ६० ते ७० टक्के रक्कम दिली जात होती. जितके काम तितके बिल या नियमानुसार एसटी प्रशासनाने महिन्याला ८ ते ९ हजार रुपयाचे बिल अदा केल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. असाच प्रकार सीबीएस बस स्थानकाबाबत आहे. बारा फलाट असलेल्या या बस स्थानकाच्या स्वच्छतेचे काम व्यवस्थित न केल्यामुळे ‌भीमाई महिला बचत गटाला कमी बील देण्यात आल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी किती माणसांची नियुक्ती करावी, याबाबत कोणताही नियम एसटी प्रशासनाने स्वच्छतेचे कंत्राटात नमूद केला नव्हता. त्यामुळे संबंधित कंत्राटदार एक किंवा दोन व्यक्तींच्या मदतीने सफाईचे काम करून घेत असे. काही वेळा हे कामगार कामही करीत नव्हते. यामुळे प्रत्येक महिन्याचे बील काढताना फक्त ६० ते ७० टक्के काम केल्याचे दाखवून तेवढेच ‌बील प्रशासनाकडून अदा केले जात होते.

सिडको आणि सीबीएस येथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी किती कामगारांची नियुक्ती करावी, याचा उल्लेखही नव्या कंत्राटमध्ये केला आहे. सिडकोसाठी दरमहा १७ हजार रुपये दराने स्वच्छतेचे कंत्राट दिले जाणार आहे. त्यासाठी तीन कर्मचारी नियुक्ती करण्याची अट आहे.

सिडकोचे कंत्राट पंचशील महिला बचत गटाला देण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. याशिवाय सीबीएसच्या स्वच्छतेच्या कामासाठी दरमहा ३७ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी नऊ कर्मचारी नेमण्याचा उल्लेख कंत्राटात करण्यात आला आहे, अशीही माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

एसटी स्टँण्डच्या कर्मचाऱ्यांच्या दररोज नोंदी नाहीत

सीबीएस किंवा सिडको बस स्टँडच्या स्वच्छतेच्या नोंदी एसटी कर्मचाऱ्यांनी रोज ठेवणे अपेक्षित आहे, मात्र दोन्ही स्टँडवर कोणत्याही नोंदी केल्या जात नाहीत. महिन्यातून अहवाल एकदाच भरला जातो. अखेरीस सुमारे ३० ते ४० टक्के रक्कम बीलातून रक्कम वजा केली जात असल्याची माहिती एसटी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकुंदवाडीतील मंडई महापालिकेने हटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर, शिवाजीनगर पाठोपाठ महापालिकेने शुक्रवारी मुकुंदवाडी येथील भाजी मंडईवर कारवाई केली. मुख्य रस्त्यावर भरणारी ही भाजी मंडई हटविण्यात आली. रेल्वे स्टेशन भागातही कारवाई करून येथील हातगाड्या हटविल्या.

मुकुंदवाडी येथे भर रस्त्यावर भाजी मार्केट भरविले जात होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. हे भाजी मार्केट हटवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकवेळा झाला, पण त्यात ठोस यश आले नव्हते. पुंडलिकनगर भागातील भाजी विक्रेत्यांवर गेल्या आठ दिवसांत वारंवार कारवाई करून येथील भाजी मार्केट स्थलांतरित करण्यात पालिकेच्या यश आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर भरणारे भाजी मार्केटही महापालिकेने स्थलांतरित केले. त्यानंतर आज मुकुंदवाडीत अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली.

सिडको आणि म्हाडाने या भाजी विक्रेत्यांना जागा दिली आहे. त्यामुले भाजी विक्रेत्यांनी त्याच जागेवर बसावे, असे महापालिकेतर्फे बजाविण्यात आल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी सांगितले. रेल्वे स्टेशन भागातही हातगाडीवाले व फळ-भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या दोन्हीही ठिकाणी दररोज कारवाई सुरूच राहील असे झनझन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीएची २० जणांवर कारवाई

$
0
0

औरंगाबाद : अन्न व औषधी प्रशासनाने गेल्या महिन्याभरात जिल्ह्यांत कृत्र‌िमरित्या फळे पिकवणाऱ्या २० जणांवर कारवाई केली असून, ३ व्यापाऱ्यांवर खटले भरले आहेत, अशी माहिती सहआयुक्त सी. डी. साळुंके यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांत काही ठिकाणांहून माल जप्त करण्यात आला आहे. ८ एप्र‌िल २०१५, ११ मे व १२ मे २०१५ रोजी मोहिमेंतर्गत किरकोळ घाऊक विक्रेते, वाहतूकदार व गोदाम आदींची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठेही कृत्र‌िमरित्या फळे पिकवण्यात येत असल्याचे आढळून आले नव्हते. मागील वर्षी अन्न व औषधी प्रशासनाने १३ क्विंटल आंबे व कार्बाईड पावडर जप्त करून ३ व्यापाऱ्यांवर खटला भरला होता. जनतेने प्रतिबंधित पद्धतीने किंवा कृत्र‌िमरित्या फळे पिकवत असल्याबाबत माहिती मिळताच०२४०-२३४६८१० यानंबरवर संपर्क साधावा, संबंधितांवर कारवाई करून, माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे सहआयुक्त सी. डी. साळुंके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारी करू नकाः खैरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नगरसेवकांनो ठेकेदारी करू नका. ठेकेदरांना मदतही करू नका. बदनामी होईल असे वागू नका,' असे आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी केले. समर्थनगर येथील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. मित्रपक्षाशी कसे वागायचे ते तुम्ही ठरवा, असे म्हणून त्यांनी भाजपबद्दल शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य तो संकेत देण्याचा प्रयत्न केला.

खैरे म्हणाले, 'नगरसेवकांची प्रतिमा हीच पक्षाची प्रतिमा असते. त्यामुळे जबाबदारीने काम केले पाहिजे. केंद्रात 'युपीए' चे सरकार होते, तेव्हा मी या शहरासाठी १,२०० कोटी रुपयांच्या दोन योजना आणल्या. आता माझे 'एनडीए' चे सरकार आहे, पण मला शहरासाठी दहा-वीस कोटी रुपये देखील सरकार कडून आणणे शक्य होणार नाही, कारण परिस्थितीच तशी आहे. मित्रपक्षाशी कसे वागायचे ते तुम्ही ठरवा,' असे नगरसेवकांना सांगताना खैरे म्हणाले, 'मित्रपक्षामुळे आपल्या नऊ जागा पडल्या. मित्रपक्षाचे लोक धूर्त आहेत हे लक्षात घ्या आणि तसे वागा. एमआयएमच्या नगरसेवकांना जशास तसे उत्तर द्या,' असा सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर समित्यांवर वर्णी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेतील महिला नगरसेवकांच्या कामात त्यांच्या पतीनी ढवळाढवळ करू नये. त्यांना स्वतंत्रपणे काम करू द्यावे. अन्यथा त्यांचा शासकीय समित्यांसाठी विचार केला जाणार नाही,' असा सज्जड दम शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी शुक्रवारी दिला.

महापालिका निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार आणि पराभूत झालेले उमेदवार यांची संयुक्त बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत घोसाळकर बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विनोद घोसाळकर म्हणाले, 'महिला नगरसेवकांना त्यांची प्रतीमा निर्माण करू द्या. त्या काम करण्यास सक्षम आहेत. त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. शिवसेनेची महिला आघाडी व नगरसेविका एक आहेत, असे चित्र गेल्या पाच वर्षात दिसून आले नाही. आता असे चित्र दिसू देऊ नका. सर्वजण एकोप्याने काम करा.' महापौरांना उद्देशून घोसाळकर म्हणाले, 'तुम्ही सोळा लाख लोकांचे महापौर आहात हे लक्षात ठेवा आणि काम करा. तुमच्या दालनात कार्यकर्त्यांचा राबता असला पाहिजे. नगरसेवक भेटत नाहीत अशी नागरिकांची तक्रार असते. ही तक्रार येऊ देऊ नका. तुमची प्रतिमा ही पक्षाची प्रतिमा असते, हे लक्षात ठेवा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचडीएफसी बॅँकेला सहा लाखाचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्र सादर करून एचडीएफसी बँकेकडून दोन भामट्यानी सहा लाखांचे कर्ज घेतले आहे. या आरोपींविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतनानगर येथील एचडीएफसी बँकेमध्ये १२ मार्च रोजी दोनजणांनी सहा लाखांच्या कर्जमंजुरीसाठी फाइल टाकली होती. यामध्ये अॅक्सेस बँकेत नोकरीला असल्याचे दर्शवून त्यांनी बनावट आयडी कार्ड तसेच सॅलरीस्लीप जोडली होती. एचडीएफसीने ही फाइल मंजूर करत, त्यांना सहा लाखांचे कर्ज वितरित केले होते. मात्र, तपासणीमध्ये ही कागदपत्रे बनावट असल्याचे नंतर बँकेच्या लक्षात आले. या प्रकरणी बँक मॅनेजर फरिदखान तडवी यानी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विश्वास सोनवणे व प्रशांत शेळके (रा. एन २, रामनगर, सिडको) यांच्या विरूध्द पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसात तक्रार दिल्यावरून महिलेला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार का दिलीस, या कारणावरून सुंदरबाई वाघ (वय ४० रा. एकतानगर, जटवाडा) या महिलेला मारहाण करण्यात आली. बुधवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी सुंदरबाईच्या तक्रारीवरून आरोपी नयन गरड, कविता सातदिवे, सोनी गरड व प्रियंका गरड (सर्व रा. एकतानगर) यांच्या विरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राची अॅक्टिवा पळवली

शेख इरशाद (रा. अंगुरीबाग) याची अॅक्टिवा दुचाकी त्याचा मित्र साकेत कासलीवाल हा मंगळवारी रात्री घेऊन गेला आहे. दोन दिवस उलटले तरी कासलीवाल याने इरशादची दुचाकी त्याला वापस आणून दिली नाही. याप्रकरणी इरशादच्या तक्रारीवरून त्याच्या विरूध्द क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा

चिकलठाणा मेनरोडवरील चौकामध्ये दुचाकीस्वाराच्या धडकेत सुशिलाबाई शेलार (वय ५० रा. आडूळ) या जखमी झाल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजता हा अपघात घडला होता. उपचारादरम्यान सुशिलाबाईंचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल डेपो लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पानेवाडी येथील पेट्रोल डेपोवर ताण वाढला आहे. मराठवाड्यातील डिलरला अनेकदा पेट्रोल खरेदीबाबत अडचणी निर्माण होतात. या अडचणी लवकरच कमी होणार आहेत. आता औरंगाबादमध्ये पेट्रोल डेपो उभारणी केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शेंद्रा येथे या डेपोसाठी शंभर एकर जागा देण्यात येणार आहे,' अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली. औरंगाबादमध्ये अनेकदा पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होतो.

याबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद येथे स्वतंत्र पेट्रोल डेपो उभारणीचा प्रस्ताव होता. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात होणारी पेट्रोल टंचाई कमी होणार होती. या पेट्रोल डेपोबाबत डीएमआयसी किवां शेंद्रा परिसरात ३०० एकर जागा देण्याचे ठरले होते. मात्र, तिन्ही कंपन्यांसाठी शंभर एकर जागा लागणार आहे, अशी माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे आता शंभर एकरच्या जागेवरच हा पेट्रोल डेपो उभारला जाणार आहे. पेट्रोल डेपोसाठी आलेला प्रस्तावही मार्गी लागला आहे. याबाबत आता मुंबई किंवा दिल्ली येथे पेट्रोलियम कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत आपण पेट्रोल डेपोचा प्रस्ताव मान्य करून त्यासाठी आवश्यक कारवाई सुरू करायला लावणार आहोत, अशी माहिती खासदार खैरे यांनी दिली. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पेट्रोल डेपो होण्यासाठी किमान दोन वर्षांचा काळ लागणार आहे. पानेवाडीतून स्वतंत्र पाइपलाइन टाकून पेट्रोल औरंगाबादपर्यंत आणले जाणार आहे. ही पाइपलाइन टाकणे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या टाक्यांची उभारणी सुरू होईल, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केला.

सोमवारपर्यंत पुरवठा सुरळीत

शहरातील अनेक पेट्रोलपंपांना पानेवाडी डेपोतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक पंपांवर ड्रायचे बोर्ड झळकत आहेत. याबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांनी ऑईल कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली. सोमवारपर्यंत पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. सुभेदारी विश्रामगृहावर पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन आणि आइल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. नगर आणि विदर्भातील ‌पेट्रोल डिलर्सना पानेवाडी ऑईल डेपोतून पेट्रोल द्यावे लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पेट्रोल डिलर्सना पेट्रोल मिळत नाही. ही अडचण खैरे यांनी पेट्रोलियम मंत्र्यांच्या सचिवांपुढे मांडली. दरम्यान, पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्या विक्रेत्यांना ऑइल विकण्याचे टार्गेट देत आहेत. हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर आपण मांडणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये पेट्रोल डेपो व्हावा यासाठी आपण पाच ते सात वर्षांपासून प्रयत्न करित आहोत. हा डेपो औरंगाबादला सुरू झाल्यास मराठवाड्यासह अन्य भागातील पेट्रोल डिलर्सच्या अडचणी या डेपोमुळे दूर होणार आहेत.

- चंद्रकांत खैरे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’ची जलवाहिनी ‘हवेत’च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील पहिल्याच स्वतंत्र शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलसाठी नियोजित स्वतंत्र जलवाहिनीच्या कामाचा अजूनही श्रीगणेशाच झालेला नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार आणि गोरगरिबांच्या कॅन्सर हॉस्पिटलला कधी पुरेसे पाणी मिळणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. परिणामी, कॅन्सर हॉस्पिटल मागच्या तब्बल तीन वर्षांपासून चक्क खासगी टँकवरच सुरू आहे. दुर्दैवाने याचे गांभीर्य शासनासह महापालिकेला अजूनही नाहीच.

कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन मोठा गाजावाजा करीत २१ सप्टेंबर २०१२ मध्ये झाले. मात्र, त्यापूर्वीपासून हॉस्पिटलला तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहेत. हॉस्पिटलला पाणी पुरवठ्याची ८ इंची पाइपलाइन आहे; परंतु या पाइपलाइनमधून हर्सूल तलावाचे अत्यल्प पाणी मिळते. ८ इंचीनुसार हॉस्पिटलला कधी पाणी मिळालेच नाही. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येने येणाऱ्या गोरगरीब कर्करुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये रेडिएशनच्या उपचारांसाठी सहा-सहा महिने वेटिंग आहे. इतरही उपचार-शस्त्रक्रियांसाठी वेटिंग आहे. यावरून रुग्णसंख्येचा वाढता ताण सहज लक्षात येतो. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे उपचार-शस्त्रक्रियांसाठी, पिण्यासाठी-वापरण्यासाठी-स्वच्छतेसाठी आणि इतर अनुषंगिक गरजांसाठी हॉस्पिटलला दररोज दीड लाख लिटर पाणी लागते. मात्र, हॉस्पिटलच्या पाइपलाइनमधून दर तिसऱ्या दिवशी जेमतेम दहा-वीस हजार लिटरपेक्षा जास्त पाणी मिळत नाही. त्यामुळेच हॉस्पिटलला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. मागच्या तीन वर्षांपासून रोज सरासरी चार ते पाच टँकर मागवावे लागतात. साहजिकच उन्हाळ्यात टँकरची संख्या काहीशी वाढते. उपचार-शस्त्रक्रिया व स्वच्छतेसाठी प्रक्रियायुक्त पाण्याची गरज असताना, हॉस्पिटलला दुर्दैवाने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते.

गांभीर्य नसल्यानेच तांत्रिक घोळ

हॉस्पिटलच्या पाणी प्रश्नावरून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, ज्युबली पार्कच्या जलकुंभापासून कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे आणि या जलवाहिनीद्वारे हॉस्पिटलला पुरेसे पाणी मिळण्याची आशा आहे. मात्र, या स्वतंत्र जलवाहिनीचे काम अद्याप सुरुच झालेले नाही. या कामाच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये चुका झाल्याचे समजते आणि त्यामुळे पुन्हा हे काम रखडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली

कॅन्सर हॉस्पिटलच्या जलवाहिनीचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश खंडपीठाने डिसेंबर २०१४ महिन्यामध्ये दिले होते. मात्र, साडेपाच महिने झाले तरी कामाला प्रत्यक्षात सुरुवातच झालेली नसून, हे काम प्रशासकीय मान्यतेमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली आहे, असाही सूर व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइन ऑपरेटर पोतलवाड सूत्रधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेटींग सट्टा चालवणारा सूत्रधार लाइन ऑपरेटर नरेश पोतलवाड याच्या मोबाइल लाइन बॉक्समध्ये १९० मोबाइल व सिमकार्ड सापडले. या सिमकार्ड धारकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, एक मोबाइल लाइन चालवण्यासाठी पोतलवाड चार हजार घ्यायचा. ही यंत्रणा अपडेट ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते.

पोतलवाड उस्मानपुरा येथील रामगोविंद अर्पाटमेंटमध्ये पत्नी व मुलासह राहतो. त्याची पत्नी शासकीय नोकरीला आहे. नरेश काही कामधंदा करत नाही. त्याचा २ बीएचकेचा फ्लॅट आहे. यापैकी तीन रूममध्ये एसी बसवले आहेत. एका रूममध्ये एसीत मोबाइल लाइन बॉक्सची सुविधा ठेवली होती. एका मोठ्या एलइडीवर क्रिकेट सामना सुरू होता. पोलिसांनी छापा मारला तेव्हा त्याच्या एका लाइन बॉक्समधील २८ लाइन म्हणजेच २८ मोबाइल बुकींचे फोन सुरू होते. समजा एखादा मोबाइल खराब झाल्यास त्वरित त्याच्या जागी दुसरा मोबाइल बसवण्याची सुविधा तयार होती. नरेशच्या ताब्यातून १९० जुने, ४८ नवीन मोबाइल, मोठ्या प्रमाणावर चार्जर, हेडफोनचा साठा जप्त केला आहे. एक लाइन चालवण्यासाठी नरेश एका दिवसाचे चार हजार रुपये घ्यायचा. २८ लाइन चालवण्याचे त्याला एक लाख बारा हजार रुपये मिळणार होते. विशेष बाब म्हणजे काही कामधंदा करीत नसलेल्या नरेशकडे दोन कार पोलिसांना आढळून आल्या. यापैकी एक कार त्याने दोन दिवसांपूर्वीच खरेदी केली आहे.

सिमकार्ड कोणाच्या नावावर?

नरेश एकाच वेळी १९० सिमकार्ड वापरून बेटींगचा सट्टा फोनवर घेत होता. हे सिमकार्ड कोणाच्या नावावर आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सिमकार्डधारकांचा शोध सुरू आहे. बनावट कागदपत्राआधारे बुकींनी ही सिमकार्ड मिळवली का याचा देखील तपास करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टरलाइटने सादर केली गुन्हे शाखेकडे कागदपत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीत घातक रसायन सोडल्याप्रकरणी स्टरलाइट कंपनीने शुक्रवारी गुन्हे शाखेकडे तपासासाठी काही कागदपत्रे सोपवली. गुन्हे शाखेने एक दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर कंपनीने कागदपत्रे सादर केली. दरम्यान, अटकेत असलेला कंपनीचा मॅनेजर अमित रत्नपारखी याच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली होती. रत्नपारखी याला कोर्टात हजर करण्यात आले असता ‌तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

खाम नदीमध्ये स्टरलाइट कंपनीचे रसायन सोडण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेने कंपनीचा पुरवठा व्यवस्थापक अमित रत्नपारखी याला सोमवारी अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून गेल्या चार वर्षांत कंपनीने ६५ हजार टन रसायनाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात गुन्हेशाखेने कंपनीला तपासासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगितले होते. यावेळी कंपनीचे टोलवाटोलवी करीत आठ दिवसांची मुदत मागितली होती, मात्र गुन्हे शाखेने ही मागणी धुडकावत एका दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. पोलिसांच्या या इशाऱ्यानंतर कंपनीने शुक्रवारी काही कागदपत्रे सादर केली. अटकेत असलेल्या अमित रत्नपारखी याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ दिवसांत शहरात ८०० ऑटो रिक्षा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षांची मूळ रचना बदलून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. गेल्या ४ दिवसांत ८००हून अधिक रिक्षांवर कारवाई करून अवैध प्रवाशी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शहानूरमिया दर्गाच्या चौकातून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. शहानूरमिया दर्ग्यासह शहराच्या अन्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू होती.

कागदपत्रे सोबत न ठेवणाऱ्या, रिक्षा चालकांचा ड्रेस न घालता प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. अॅपे चालक रिक्षांच्या मागील बाजुला गेट लावून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरही कारवाई करण्यात आली. गेल्या ३ दिवसात ६०० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय शुक्रवारी आणखी २०० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यातील अनेक रिक्षा चिकलठाणा विभागीय कार्यशाळा, छावणी पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्तांलयात जप्त करून ठेवण्यात आल्या आहेत.

आरटीओंना सूचना

शहरात चालणाऱ्या अॅपे किंवा एलपीजी रिक्षांच्या मागील बाजू बंद असावी, मात्र डिलर्सकडून रिक्षा देताना मागील बाजू बंद केली जात नाही. तेथे दार लावून रिक्षांची विक्री केली जात आहे. याबाबत आरटीओंच्या अधिकाऱ्यांना बोलावून कंपनीकडून मंजूर केलेला नकाशा कसा आहे, या नकाशानुसार गाड्यांची पासिंग होते का, असे प्रश्न उपस्थित करून डिलरवर कारवाई करावी, अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रिक्षांच्या बेशिस्त वाहतूकीला नियंत्रित करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनेक रिक्षांच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत. अशा रिक्षांवरही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे.

- खुशालचंद बाहेती,सहाय्यक पोलिस निरीक्षक, (वाहतूक शाखा) औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत ‘मनोविकृती’चा आंतररुग्ण विभाग बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृती विभागासह त्वचारोग विभागाचा आंतररुग्ण विभाग दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंदच आहे. त्वचारोग विभागामध्ये तर मागच्या सहा महिन्यांपासून एकही अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक उपलब्ध नसून हा विभाग चक्क हाऊस ऑफिसरच्या हवाली करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरामध्ये शासकीय मनोरुग्णालय नाही. जिल्हा रुग्णालय अस्तित्वात नसल्याने आणि महापालिकेच्या रुग्णालयात मनोविकृतीच्या रुग्णांवर उपचार होत नसल्याने केवळ घाटीतील मनोविकृती विभागावर जिल्ह्यातील गोरगरीब मनोरुग्ण अवलंबून आहेत. मात्र घाटीतील मनोविकृती विभागामध्ये मागच्या एक ते दीड वर्षांपासून मनोरुग्णांना दाखल करणे बंद करण्यात आले आहे.

मनोविकृती विभागाच्या वॉर्डाची जुनी इमारत पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे दुसऱ्या वॉर्डाची दुरुस्ती करुन स्थलांतराचे नियोजन करण्यात आले आणि तसे घाटी प्रशासनाने जाहीरही केले, मात्र वॉर्डाचे स्थलांतरही झाले नाही आणि रुग्ण भरतीही सुरू करण्यात आली नाही. वस्तुतः मनोविकृती विभागामध्ये 'सिनिअर रेसिडेन्ट' म्हणून डॉ. सादिक कुरेशी यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आल्यामुळे निदान आतातरी आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.

दीड-दोन वर्षापूर्वी एवढ्याच मनुष्यबळावर आंतररुग्ण विभाग सुरू होता, याचे भान ठेवत रुग्णांची भरती सुरू करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे त्वचारोग विभागामध्ये डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करून विभाग सक्रिय करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनी हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेची नव्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करा, नव्याने सीईटी घ्यावी, या विद्यार्थ्यांना आणखी १७ गुण द्यावे अशी विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्या. इंदिरा जैन यांनी राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षण संचलनालयाच्या संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने ४ जानेवारीला राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा (पीजीएम-सीईटी) घेतली. या परीक्षेला ९ हजार ८५१ विद्यार्थी बसले होते. ७ जानेवारी रोजी संचलनालयाने त्यांच्या वेबसाइटवर अन्सर-की (उत्तरतालिका) प्रसिद्ध केली आणि १२ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले. राज्यभरातून परीक्षार्थींनी १२ हजार ५३५ आक्षेप नोंदविले. ३०० पैकी २५६ प्रश्नांवर हे आक्षेप नोंदविले गेले. संचलनालयाने या आक्षेपांची दखल घेऊन वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ कमिटीला अहवाल देण्यास सांगितले. या समितीने एकूण १३ प्रश्न चुकीचे असल्याचा अहवाल दिला. त्याआधारे संचलनालयाने या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १३ गुण बहाल केले. तरीही परीक्षार्थींनी संचलनालयाकडे संपर्क साधला. संचलनालयाने पुण्याच्या 'आर्म-फोर्सेस' मेडिकल कॉलेजकडे हे प्रकरण सोपविले. या कॉलेजने वर्धा कमिटीचा अहवाल चुकीचा असल्याचे नमूद करून २६ प्रश्न चुकल्याचे सांगितले. त्याआधारे संचलनालयाने आणखी १३ गुण सर्व परीक्षार्थींना देण्याचा निर्णय घेतला.

या परीक्षेतील १७ प्रश्नांमध्ये ४ पर्याय देण्यात आले होते. त्यातील दोन पर्याय बरोबर होते, ही बाब या नवीन समितीने निदर्शनास आणून दिली. ज्या विद्यार्थ्यांना २ पैकी १ उत्तर बरोबर दिलेले आहे, त्यांनाही गुण देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण संचलनालयाने घेतला. पहिली गुणवत्ता यादी ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

या गुणवत्ता यादीलाच सिल्लोड येथील डॉ. माधुरी ईश्वर राजपूत यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांच्या आक्षेपावर तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. पी.आर. बोरा यांनी वैद्यकीय शिक्षण संचलनालयाच्या संचालकास दिले होते. आव्हान देण्यापूर्वी त्यांनी संचनालयाकडे आक्षेप नोंदविला होता, पण हा आक्षेप वैद्यकीय शिक्षण संचलनालयाच्या संचालकाने फेटाळून लावला. या ५ मे रोजीच्या निर्णयाला डॉ. राजपूत यांनी आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे सुनील वारद हे काम पाहत आहेत. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील दयानंद भांगे यांनी नोटीस स्वीकारली. दरम्यान विद्यार्थ्यांनी नव्याने गुणवत्ता यादी प्रसिध्द करावी आणि पुन्हा एकदा सीईटी घ्यावी अशी विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेतील पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.

पुन्हा सीईटी घ्या!

४ पैकी २ उत्तरे अचूक देऊन विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना ४३ गुण देण्यात यावेत आणि त्यानंतरच नव्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी आणि पुन्हा सीईटी घ्यावी. या संपूर्ण प्रक्रियेत दोषी असणाऱ्या अधिकारी, पेपर सेटर आणि कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची दाखलपूर्व सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद लिफाफा; पाच बडे मासे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या सहा पैकी पाच बड्या माशांना गुन्हेशाखेच्या आठ पथकांनी अत्यंत गोपनीयता बाळगत गुरुवारी रात्री एकाच वेळी उचलले. ही पथके बुधवारी रात्री नऊपासून त्यांच्या मागावर होती. बंद लिफाफ्यामध्ये त्यांना कोणाला उचलायचे, याची माहिती दिली होती.

बुधवारी रात्री गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांना रोलकॉलसाठी बोलावण्यात आले. एक जमादार व चार कर्मचारी अशी पथके तयार केली. जमादाराकडे एक बंद लिफाफा सोपवण्यात आला. त्याला जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत लिफाफा उघडू नये असे सक्त आदेश देण्यात आले. अशी आठ पथके तयार करण्यात आली. सिडको, सुराणानगर, पैठणगेट, उस्मानपुरा आदी ठिकाणी या पथकांना रात्रीच पाठविण्यात आले. बुधवारची रात्र गेली. गुरुवारचा दिवस उजाडला. या पथकांना काय सुरू आहे, याची काहीही कल्पना नव्हती. कधी एकदा वरिष्ठांचा फोन येतो, याकडे या आठही पथकांचे लक्ष लागलेले. गुन्हेशाखेने इकडे वेगळीच फिल्डिंग लावली. या पथकांना दिलेली कामगिरी बुकींना पकडण्याची होती. मुख्य लाइन ऑपरेटर हातात येणे गरजेचे होते. उस्मानपुरा भागात ऑपरेटर नरेश पोतलवाडला बेटिंग घेताना जागेवर पकडले. तातडीने या पथकांना फोन करून लिफाफे उघडण्याचे सांगण्यात आले. लिफाफा उघडल्यानंतर त्यांना त्यांच्या टार्गेटचे नाव, पत्ता व मोबाइल क्रंमाक ‌दिला होता. या पथकांनी ज्या बुकींची नावे लिफाफ्यात होती, त्यांना त्या परिसरात शोध घेत अटक केली. यापैकी ललित कोठारी व विनय जैन घरासमोर कारमध्ये बसून मोबाइलवर बेटींग घेत होते, तर उर्वरित तीन जणांना घरातून उचलण्यात आले. त्यांना गुन्हेशाखेत आणल्यानंतर हे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले.

पोलिसांवरही नजर

बुकींवर पाळत ठेवलेल्या आठ पोलिस पथकांकडे गोपनीय लिफाफे देण्यात आले होते. हे लिफाफे पथकातील कर्मचारी फोडण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होती. यासाठी या पथकांवर निगरानी ठेवण्यासाठी आणखी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे ही मोहीम शभंर टक्के फत्ते झाली.

पोलिस आयुक्तांकडून कौतुक

आयपीएल सट्टा चालवणाऱ्या बुकीच्या कारवाई मोहिमेवर स्वतः पोलिस आयुक्त अमितेशकुमार लक्ष ठेवून होते. गेल्या पंधरा दिवसापासून पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. कारवाईत गुन्हेशाखेचे चाळीस पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. बुधवारी रात्रीपासून रचण्यात आलेला सापळा अखेर २४ तासानंतर यशस्वी झाला. पोलिसांच्या प्रयत्नांना सर्व आरोपी एकत्र उचलण्यात यश आले. शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या गोष्टीची दखल घेतली. मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक केले. गुन्हेशाखेसोबत आर्थिक गुन्हेशाखा तसेच सायबरसेलचे पथक यामध्ये सक्रिय सहभागी झाले होते. तांत्रिक बाजूसोबतच पोलिसांची मेहनत कामाला आल्यामुळे हे आरोपी पकडण्यात यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेस्ट प्राइसवर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील वॉलमार्टच्या बेस्ट प्राइज मॉडर्न होलसेल मॉलमधून अन्न व औषधी प्रशासनाने गुरुवारी रात्री सुमारे ४ लाखांचे मानकांनुसार नसलेले एनर्जी ड्र‌िंक्स जप्त केले. या शिवाय शहरात इतर ठिकाणीही अन्न व औषध प्रशासनाचे छापासत्र सुरूच असून, संबंधितांवर कारवाई केली जात आहे.

गुरुवारी (१४ मे) अन्न व औषध प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी छापासत्र मोहीम सुरू होते. दोन दिवसांमध्ये सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेख साळुंके यांनी दिली. वॉलमार्टच्या मॉलची तपासणी करून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने निश्चित केलेल्या निकषांनुसार खाद्यपदार्थ नसल्याचे आढळले. मॉनस्टर एन‌‌र्जी ड्र‌िंक्सचे सुमारे ३९९० टीन जप्त करण्यात आले. त्यांची किंमत सुमारे ३ लाख ७५ हजार ३५० रुपये आहे. जिंजर गार्लिक्स पेस्ट, अॅप्रिक्रॉट ड्रायफ्रुट या अन्न पदार्थांचा सुमारे २६ हजार २२१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांचे अन्न व सुरक्षा मानकांनुसार पॅक‌ेज‌िंग, लेबलिंग नव्हते. जप्त केलेल्या पेय आणि पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल मिळताच त्यांच्यावर खटला भरला जाईल व कारवाई केली जाईल, अशी माहिती साळुंके यांनी दिली. त्याचबरोबर बुधवारी शुगर कन्फेक्शनरी, व्हाइट पेस्ट आणि बटर यांचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे १ लाख ३९ हजार ६३१ रुपये एवढी होती. गेल्या दोन दिवसांत सुमारे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद शहा यांनी कारवाईचे नियोजन केले. अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, गजानन गोरे, डॉ. राम मुंडे व गोपाल कासार यांनी कारवाई केली.

मॉलवर पहिलीच कारवाई

अन्न व औषधी प्रशासनाने शहरात मोठ्या प्रमाणात कारवायांना सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत मॉलवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी शीतपेयांच्या गोदामांवर छापे टाकण्यात आले होते. एनर्जी ड्रिक्सवर कारवाईची ही पहिलीच वेळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज गायब; शहर त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भर उन्हाळ्यात जवळपास निम्म्या शहराचा विजपुरवठा दिवसभर बंद होता. त्यामुळे औरंगाबादकर दिवसभर उकाड्याने त्रासून गेले. पावसाळ्यापूर्वी कामे करण्यासाठी लाइन ब्रेक घेण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी शहरातील १७ फिडरवर लाइन ब्रेक घेण्यात आला होता. यात चिकलठाणा एमआयडीसीचे चार फिडर, चिकलठाणा गाव, ११ केव्ही मोंढा, सेव्हन हिल्स, कटकट गेट, चेतनानगर, लक्ष्मीनगर, दूध डेअरी पैठण गेट परिसर, याशिवाय सूत गिरणी आणि एन ७ केव्ही वरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याचबरोबर सारा सिद्धी फिडर, नक्षत्रवाडी, पॉवर हाउस, मकबरा फिडरवरील लाइन ब्रेक घेण्यात आला होता. यामुळे शहरातील या फिडरवर ५६ वसाहतीमध्ये वीज पुरवठा झाला नव्हता. काही ठिकाणी सकाळी ९पासून ते दुपारी ५पर्यंत, काही भागात सकाळी १०पासून दुपारी २पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

शहरातील शहागंज, विद्यापीठ परिसर, सिटी चौक, उल्कानगरी, पुंडलिकनगर, उस्मानपुरा आदी भागात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. यामुळे या भागातील नागरिक उकाड्याने त्रस्त झाले. जास्त कालावधीसाठी वीज बंद असल्यामुळे इन्व्हर्टरही काही तासांनंतर बंद पडले. संध्याकाळी सहानंतर काही भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला, परंतु त्यानंतरही लपंडाव सुरूच राहिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्येही साडेदहा ते अडीच अशी तब्बल चार तास वीज गायब होती. विद्यापीठामध्ये सुरू असलेली आर.आर.सी. प्रक्रिया, विद्यापीठ निवडणुकांसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत त्यामुळे व्यत्यय आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटवर सट्टा; ६ बुकींना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयपीएल टी-२० स्पर्धेतील क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या सहा बुकींना गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री छापा टाकून अटक केली. आरोपींमध्ये शहरातील प्रसिद्ध उद्योजक, बिल्डर व व्यापाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सट्टा चालविण्यासाठी स्पेशल मोबाइल लाइनबॉक्सचा वापर करण्यात येत होता. १९० मोबाइलचा समावेश असलेले एकूण सात बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या ताब्यातून रोख ६ लाखांसह चार महागडी चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

देशभरात सुरू असलेल्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर शहरातील काही मंडळी मोबाइल लाइनबॉक्सचा वापर करून विविध मोबाइलद्वारे बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी विविध पथके तयार केली. सुरुवातीला उस्मानपुरा येथील राम गोविंद अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ५वर छापा टाकण्यात आला. तेथे नरेश धर्माजी पोतलवाड (वय ३५) याला अटक करण्यात आली. त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांना बेटिंगसाठी वापरण्यात येत असलेले सात मोबाइल लाइनबॉक्स मिळाले. यापैकी दोन लाइनबॉक्सवर फोनद्वारे बेटिंग घेणे व पुढे लाइन जोडून देण्याचे काम पोतलवाड करीत होता. यानंतर पोलिसांनी पोतलवाड याच्या संपर्कात असलेले आरोपी अालोक अशोक अग्रवाल (वय ३०, रा. एन ८ सिडको), प्रफुल्ल अंबीरचंद राठी (वय ४८, रा. सुराणानगर), ललित हस्तीमल कोठारी (वय ४९, रा. सिडको टाउन सेंटर), अनिल पोपटलाल मुनोत (वय ५०, रा. हर्षल कॉम्प्लेक्स, जिजामाता कॉलनी, पैठणगेट) व विनय नवीनचंद जैन (वय ४९, रा. एन ५, सिडको) यांना एकाच वेळी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून रोख ६ लाख ४ हजार रुपये, ४ चारचाकी वाहने असा एकूण ५३ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी सायबर सेलचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणूक, बेटिंग जुगार चालविणे आदी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

मोबाइल लाइनबॉक्सची अफलातून शक्कल

ऑपरेटर नरेशने बेटिंगसाठी विशेष मोबाइल लाइनबॉक्स तयार करून घेतले होते. प्रत्येक बुकीच्या यामध्ये वेगवेगळ्या लाइन (नंबर) होते. प्रमुख बॉक्समध्ये ४८ मोबाइल एकाच वेळी सुरू होतात. त्यावेळी दिल्ली येथून बेटिंगचा भाव सांगणारा मोबाइल आल्यानंतर एकाच वेळी तो ४८ लाइनवर ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी छापा मारला यावेळी २८ लाइन एकाच वेळी सुरू होत्या. ४८ लाइनवर भाव आल्यानंतर उर्वरित मोबाइल लाइनबॉक्सचा वापर करून हा भाव पुढील बुकींपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली जात होती. पकडलेले बुकी नरेशच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हा धंदा सुरू होता. दिल्ली, मुंबई; तसेच परराज्यात या बेटिंगच्या व्यवसायाची लिंक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सहा जण गजाआड झाले आहेत. २८ लाइनवर बेटिंग सुरू होती. सध्या त्याचा तपास सुरू आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images