Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खासगीकरणातून होणार साफसफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा भागात साफसफाईची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे येत्या काळात या भागात खासगीकरणातून साफसफाईचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी 'मटा' शी बोलताना दिली.

सातारा परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या भागातील साफसफाईच्या संदर्भात कालच आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. त्यानुसार बुधवारी (२० मे) सकाळी काही अधिकाऱ्यांसह सातारा परिसराची पाहणी केली, अशी माहितीही त्यांनी दिली. सातारा परिसरात साफसफाईची कोणतीही यंत्रणा नव्हती. तीन ते चार कर्मचारी तेथे कार्यरत होते. कचरा गोळा करून तो जाळून टाकण्याचेच काम केले जात होते. आता महापालिकेला तसे करता येणार नाही. कचरा गोळाकरून तो कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकला पाहिजे त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे, असा उल्लेख करून डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, खासगीकरणाच्या माध्यमातूनच हे काम करावे लागणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर निविदा काढून काम सुरू केले जाईल. कचऱ्याचे 'डोअर टू डोअर कलेक्शन' हा फार महत्वाचा भाग आहे आहे. त्याची संपूर्ण यंत्रणा सोमवारपर्यंत उभी करून सातारा भागात स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. फवारणीच्या कामाचेही नियोजन काही दिवसात केले जाईल. आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता फवारणीचे काम युध्दपातळीवर करावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा परिसरातील आरोग्य केंद्र बंद पडेल आहे, हे केंद्र सुरू करण्यालाही प्राधान्य द्यावे लागेल. या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्याच्या पाण्यासाठी उपलब्धतेचा विचार

$
0
0

म.टा . प्रतिनिधी, औरंगाबाद

'साताऱ्यासाठी पाणी देताना पाण्याचा उपलब्धतेचा आणि सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा विचार करावा लागेल,' असे मत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे उपाध्यक्ष अर्णव घोष यांनी 'मटा' शी बोलताना व्यक्त केले.

सातारा, देवळाई परिसर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खासगीकरण केले असून पाणीपुरवठ्याचे काम महापालिकेच्यावतीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी करीत आहे. त्यामुळे या कंपनीची सातारा, देवळाई भागाला पाणीपुरवठा करण्याबद्दल काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी अर्णव घोष यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. घोष म्हणाले, 'सातारा, देवळाई परिसराला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेने आम्हाला अद्याप काहीही कळवलेले नाही. त्यांनी आम्हाला या संदर्भात पत्र दिले नाही किंवा चर्चाही केली नाही. नुसते पत्र देऊन किंवा चर्चा करून चालणार नाही. मुळात सातारा, देवळाईला देण्यासाठी पाणी उपलब्ध आहे का, यंत्रणा सक्षम आहे का याचा विचार करावा लागणार आहे. महापालिकेने पत्र दिल्यावर किंवा चर्चेसाठी पाचारण केल्यावर आम्ही या बाबी त्यांच्या समोर मांडणार आहोत, असे घोष म्हणाले.

पाण्याची लेव्हल कमीच

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली स्थिती अद्याप आटोक्यात आली नाही. उपसा विहिरीच्या जवळची पाण्याची लेव्हल कमीच आहे. पाण्याच्या सोबत पंपहाऊसमध्ये वाहून आलेले गवत काढून टाकण्यात यश आले आहे. पण उपसा विहिरीजवळ पाण्याची लेव्हल वाढेपर्यंत शहराची पाण्याची स्थिती सुधारणार नाही. तरीही आहे त्या परिस्थितीत समाधानकारक पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे अर्णव घोष यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी प्रवासी वाहतूक आता नव्या मार्गाने होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातून धावणाऱ्या प्रवाशी लक्झरी बस सेवेला गुरुवारपासून 'ब्रेक' लागणार आहे. पोलिस आयुक्तांनी लक्झरी बस सेवेविरुद्ध कडक कारवाईची भूमिका घेतल्याने या बस वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

राज्य परिवहन महामंडळ, कामगार वाहतूक, विद्यार्थी वाहतूक, शासकीय निमशासकीय बस, अत्यावश्यक सेवा, लग्न व पर्यटनासाठी शहरात येणारी लक्झरी वाहने व परवानगी घेऊन विशिष्ट कालवधीत प्रवास करणारी वाहने या आदेशातून वगळण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लक्झरी बसचे नवे मार्ग

- पुणे-नगरकडून येणाऱ्या लक्झरी बस पैठण लिंकरोड, महानुभाव चौक, बीड बायपास, संग्रामनगर उड्डाणपूल, शहानूरमियाँ दर्गा, काल्डा कॉर्नरपर्यंत फक्त. - वैजापूर-धुळेकडून येणाऱ्या बस नगरनाका, वाळूज रोड, पैठण लिंकरोड, महानुभाव चौक, बीड बायपास, गोदावरी टी पॉइंट, शहानूरमियाँ दर्गा चौक, काल्डा कॉर्नर फक्त. - जालनाकडून येणाऱ्या बस केंब्रीज स्कूलसमोरुन झाल्टा फाटा, बीड बायपास, गोदावरी टी पॉइंट, शहानूरमियाँ दर्गा चौक, काल्डा कॉर्नरपर्यंत फक्त. - जळगावकडून येणाऱ्या बसेस हर्सूल टी पॉइंट, जळगाव टी पॉइंट, चिकलठाणा, झाल्टा फाटा, बीड बायपासमार्गे जातील. - या मार्गांशिवाय पोलिस आयुक्तालय हद्दीत इतर सर्व मार्गांवर सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत लक्झरी प्रवासी बसेसना प्रवेश बंद राहाणार. - सार्वजनिक मार्गावर कोणत्याही लक्झरी बसमध्ये प्रवासी बसवणे किंवा उतरवणे हे करता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारासाठीचे तीन लाख रुपये हिसकवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नातेवाईकाच्या उपचारासाठी एका शेतकऱ्याने आणलेले तीन लाख रुपये ठेवलेली बॅग शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी (१८ मे) दुपारी हिसकवून घेण्यात आली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आप्पासाहेब नानासाहेब सांळुके (वय ३५, रा. तिरखेडा, वैजापूर),असे फिर्यादीचे नाव आहे. मार्च २०१५ मध्ये गुजरातच्या एका व्यापाऱ्याला त्यांनी ८० क्विंटल कापूस विकला होता. त्यापैकी सुमारे तीन लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते. पैशांची गरज भासल्याने साळुंके यांनी ती रक्कम देण्याची विनंती केली होती. दरम्यान, त्या व्यापाऱ्याने ही रक्कम सुपारी हनुमान परिसरात असलेल्या पी. क्रांती हवाला दुकान याठिकाणी पाठविली असल्याची माहिती सांळुके यांनी दिली. ही रक्कम तेथून ओळख दाखवून घेवून जाण्याचे सांगितले होते. त्यानूसार साळुंके यांनी त्या दुकानातून सोमवारी पैसे घेतले. ते भाऊ ऋषिकेश साळुंके (वय २५) यांच्या सोबत पैठण गेटहून शिवाजी हायस्कूलच्या दिशेने जात होते. ते शाळेजवळ येताच ऋषिकेशच्या हातातील पैशाची बॅग मागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या दोघांनी हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार मंगळवारी (१९ मे) क्रांतिचौक पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड करत आहेत.

उपाचारासाठी होती रक्कम

संजीवनी हॉस्पिटलमध्ये साळुंके यांचे नातेवाईक रमेश काळे यांची चार वर्षाची मुलगी उपचार घेत आहे. तिच्या उपचारासाठी पैशाची गरज असल्याने ही रक्कम ते जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोर गजाआड

$
0
0

औरंगाबादः दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस करत आहेत. शिवाजी नारायण मोरे (वय २९, रा. रामनगर) आणि परमेश्वर सुखदेव टेकाळे (वय २९, रा. टाकरखेडा जि. बुलढाणा), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चोरीच्या दुचाकी बनावट नंबर प्लेट टाकून वापरत असल्याचे समोर आले. ललिता इंजिनीअरिंग, वाळूज येथून पाच महिन्यापूर्वी हिरो होंडा सीडी डॉन कंपनीची दुचाकी चोरली होती, अशी कबुली मोरे याने पोलिसांना दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. टेकाळे याने हिरो होंडा स्पेंडर कंपनीची दुचाकी काही महिन्यापूर्वी टीव्ही सेंटर येथील एका वाईन शॉप समोरून चोरल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दुष्काळ अनुदान वाटपात झालेल्या दिरंगाईची चौकशी पूर्ण झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रंगा नायक यांनी 'मटा'शी बोलताना दिली. दुष्काळी अनुदानाची रक्कम वाटपात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक दिरंगाई झाली आहे. याबाबत मंगळवारी या दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयात स्वतंत्र आढावा घेतला आहे. या दोन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम जमा झाली आहे. असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात दिलेल्या सूचनांप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजरीपणाला कंटाळून घनसावंगी तालुक्यातील करडगाववाडी येथील एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. अण्णाभाऊ विश्वनाथ अस्वले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.अण्णासाहेब यांच्याकडे एकूण ७५ एकर जमीन असून त्याच्यावरच त्याचे व कुटुंबियांचे उदरनिर्वाह अवलंबून होते. त्यांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास विष प्राशन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. अण्णाभाऊ याच्या पश्चात पत्नी,आई, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया पोलिसांनी रुग्णाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तुमच्या खिशात गांजा आहे, असे सांगून झडती घेण्याच्या बहाण्याने तोतया पोलिसांनी शहरात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची सोन्याची अंगठी व रोख, असा साडेपंधरा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

प्रल्हाद गणपत उन्हाळे (वय ६१, रा. खामगाव, बुलडाणा) हे उपचार घेण्यासाठी बुधवारी (२० मे) शहरात आले होते. आकाशवाणीसमोरील हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर रस्त्याने जाताना त्यांना दुचाकीवरील दोघांनी गाठले. पोलिस असल्याचे सांगून त्यांना रस्त्याच्या बाजूला नेले. खिशात गांजा घेऊन कुठे फिरत आहात, असे विचारत त्यांनी दम देण्यास सुरूवात केली. त्यानंतर झडती घेण्याचे नाटक केले. यावेळी त्यांनी खिशातील पैसे व अंगठी काढून हातरुमालात ठेवण्यास सांगितले. उन्हाळे यांनी, हे खरे पोलिस आहेक, असे समजून रुमालात खिशातील चारशे रुपये रोख व पंधरा हजार रुपयांची अंगठी रुमालात ठेवली व तो त्यांच्या ताब्यात दिला. काही वेळ झडतीचे नाटक करून या दोघांनी रुमाल पुन्हा परत दिला व नीट निघा, असा दम देत पसार झाले. काही वेळाने उन्हाळे यांनी रुमाल तपासला असता, त्यात अंगठी व पैसे नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जिन्सी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर आमचे सरकार गंभीर नव्हते

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

समान पाणीवाटपाची तत्त्वे ठरलेली आहेत. मराठवाडा, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मंडळींना एकत्र बोलावून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे अनेकवेळा केली, पण सरकार गंभीर नव्हते. गोदावरीत खोऱ्यात पाणी आणण्याबाबत अनास्था होती. आघाडीतील मित्रपक्षानेही या प्रश्नावर विचार केला नाही, असा घरचा आहेर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
विखे पाटील गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,'समन्यायी पाणीवाटपाबाबत तत्त्वे ठरलेली आहेत. काही मंडळींना मराठवाडा, नगर आणि नाशिक जिल्ह्यात हा प्रश्न सातत्याने पेटत ठेवायचा आहे. त्यामुळे मी सूचना करूनही सरकारमध्ये कधीच गांभीर्याने पाहिले गेले नाही. गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासंदर्भात योजना सांगितली. पण अनास्था असल्याने मुख्यमंत्री तसेच सहकारी पक्षाच्या मंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही. दहा वर्षे लढून मला यात अपयश आले.'

'वैतरणेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणता येईल. यासाठी सातत्याने सूचना केली पण सत्तेत सहकारी असलेल्या पक्षाने त्याकडे लक्ष दिले नाही. अन्य योजनांना पूर्ण करण्यासाठी निधी दिला गेला मग गोदावरी खोऱ्याकडेच दुर्लक्ष का?' राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करत विखे पाटील यांनी असा सवाल उपस्थित केला.

दुष्काळी दौऱ्याचा आढावा घेताना त्यांनी युती सरकारवर हल्ला चढविला. हे सरकारही गंभीर नसल्याचा आरोप करत विखे म्हणाले, की राज्यात एवढा गंभीर दुष्काळ असताना जनावरांसाठी एकही छावणी सुरू केलेली नाही. शेतकऱ्यांना दिलासा नाही, सातबारा कोरा केलेला नाही, लोकांच्या अपेक्षा संपलेल्या आहेत.पंतप्रधान बाहेरच्या देशांना मदत करतात, पण देशातील शेतकऱ्यांना नाही. राज्य सरकारचा एकही मंत्री गंभीर नाही. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खते व बियाणे मोफत दिले पाहिजे, पीक कर्ज आणि वीजबिल माफ केले पाहिजे, अशी मागणी विखे यांनी केली. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, केशवराव औताडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहता इंडस्ट्रिजवर एफडीएची कारवाई

$
0
0

औरंगाबादः अन्न व औषधी प्रशासन विभागाने बाटलीबंद पाणी निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवरील कारवाई बुधवारी (२० मे) सुरूच ठेवली. चिकलठाण्यातील मेहता इंडस्ट्रिजमधून बाटलीबंद पाण्याचे दोन नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित १०,५२० रुपयांचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी दिली. सहायक आयुक्त एम.डी. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, राम मुंडे यांनी मेहता इंडस्ट्रिजमधून दोन नमुने तपासणीसाठी घेतले. ही कारवाई अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमन २०११ मधील पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याने करण्यात आली. गेल्या आठवडात विभागाने कारवाई करून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती साळुंके यांनी दिली. अन्न पदार्थ उत्पादकांनी ३१ मे पूर्वी वार्षिक व अर्धवार्षिक परतावा न सादर केल्यास प्रतिदिन शंभर रूपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर रचना विभागात दलालाकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर रचना विभागातून अकृषक परवाना काढून देतो, अशी थाप मारत एका भामट्याने साडे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी फिर्यादीने महिन्याभरापूर्वी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली होती. पण, चौकशीअंती मंगळवारी (१९ मे) प्रवीण उर्फ राहुल इंगळे याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.

गणेश बोरडे (वय ३२, रा महालक्ष्मी चौक) यांची दरेगाव पाडळी येथील गट नं. ३९९ मध्ये एक हेक्टर १९ आर जमीन आहे. ही जमीन अकृषक करून देण्यासाठी त्यांनी नगररचना विभागाकडे फाइल सादर केली व तीन हजार रुपयांचे चलन भरले. या काळात त्यांची इंगळे याच्याशी ओळख झाली. त्याने पाच लाख रुपये दिल्यास फाइ मंजूर करून देतो, असे सांगितले. बोर्डेकडून काही रक्कम घेतल्यानंतर त्याने फाइल मंजूर करून देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. परंतु, बोरडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने इंगळेने ही फाईल मंजूर करून देतो, असे सांगत शंभर रुपयाच्या बाँडवर करारनामा करून देत ३ लाख ५४ हजार रुपये उकळले.
परंतु, काम हात नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बोरडे यांनी तक्रार दिली होती.

अधिकाऱ्यांशी लागेबंध?

इंगळे हा नगररचना विभागात दलाल असून त्याचे अधिकाऱ्यांशी लागेबंधे असल्याची चर्चा आहे. १२ एप्रिल रोजी नगररचना विभागाचे अधिकारी प्रसाद गायकवाड व त्याच्या साथीदाराला अँटी करप्शन ब्युरोने पकडले. त्याच्या आदल्या दिवशी बोरडे यांनी दलालमार्फत फसवणूक होत आहे, अशी तक्रार मुकुंदवाडी पोलिसांकडे केली होती. गायकवाड यास पकडल्यानंतरही अँन्टी करप्शन ब्युरोत संपर्क केला होता. परंतु, दखल घेतली नसल्याचा आरोप बोरडेंनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतून पळाले दोन आरोपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या हाताला झटका देऊन दोन कच्चे कैदी घाटी हॉस्पिटलमधून बुधवारी (२० मे) दुपारी पाऊणच्या सुमारास पळून गेले. त्यांना हर्सूल जेलमधून उपचारासाठी आणले होते. पोलिसांनी पाठलाग करून लुटमार प्रकरणातील एकाला पकडले. परंतु, खून प्रकरणातील कच्चा कैदी पळून पोलिसांना सापडला नाही.

खून प्रकरणात गेल्या १९ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या माळी राजू खर्डे, लुटमार प्रकरणी न्यायालयीन कोठडीतील अमोल बाबुराव खोतकर (वय २८) आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी शेख वाजीद उर्फ बबला असद (वय २३, रा. कटकट गेट) या तिघांना उपाचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यांना जेलमधून आणणे व उपचारानंतर जेलमध्ये सोडण्याची जबाबदारी पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार एन. एन. गायकवाड (वय ५२), ए. ई. तांदळे (वय ५५), पोलिस हेडकॉन्स्टेबल टी. जी. शेख आणि डी. बी. वाघ यांच्यावर सोपविण्यात आली होती. या पथकाने सकाळी साडेअकरा वाजता तिघांना हर्सूल जेलमधून ताब्यात घेऊन पोलिस जीपमधून घाटीत आणले. माळी याचे डोळे दुखत असल्याने त्यास संबंधित डॉक्टरकडे सहायक फौजदार तांदळे यांनी नेले, तर पोट दुखत असल्याची तक्रार करणाऱ्या खोतकर आणि वाजीद यांना इतर तिघांनी तपासणीसाठी नेले. त्यानंतर सोनोग्राफीसाठी केव्हा यावे लागले, यांची चौकशी केल्यानंतर खोतकर व वाजीद यांना जीपकडे घेऊन जाताना घाटी हॉस्पिटलच्या प्रवेशव्दाराजवळच या दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हाताला जोराचा झटका देत हातकडीसह पळ काढला. तिघांनाही स्वतंत्र हातकडी घालण्यात आली होती. परंतु, प्रवेशव्दाराजवळील गर्दीचा फायदा वाजीद आणि खोतकर यांनी घेतला. त्यांनी हातकडीसह शवविच्छेदन विभागाच्या दिशेने धूम ठोकली. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी गायकवाड, शेख आणि वाघ यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घाटी हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीजवळ खोतकरला पकडण्यात आले. त्याला बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण खून प्रकरणातील शेख वाजीद पसार झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती त्वरित सर्व पोलिस ठाण्यास वायरलेसहून कळविण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत असून तो अद्याप सापडलेला नाही.

रिक्षाने झाला पसार

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला शेख वाजीद आयटीआयजवळील मैदानापर्यंत पळत होता. त्याचा माग काढत पोलिस कर्मचारी तेथे पोहचले. परंतु, अवघ्या काही मिनिटाआधीच तो एका रिक्षातून जिन्सी परिसराकडे गेल्याची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी पोलिसांना दिली.

सशस्त्र बंदोबस्त पण...

या तिघांसाठी चार पोलिसांचे सशस्त्र पथक होते. सहायक फौजदार तांदळे यांच्याकडेच शासकीय पिस्तुल होते. तांदळे यांनी बंदीवान माळी राजू यास तपासणीसाठी नेले होते, तर अन्य तीन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात खोतकर आणि वाजीद होते. पाठलाग करताना पोलिसांकडे कोणतेही शस्त्र नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. सहायक फौजदार गायकवाड हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून पोलिस कर्मचारी शेख यांच्या डाव्या पायात लोखंडी रॉड बसवलेला आहे.

शेख वाजीद उर्फ बबलाचे कारनामे

शेख वाजीद उर्फ बबला असद (वय २१, रा. कटकट गेट) हा खून प्रकरणात पाच महिन्यापासून हर्सूल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. आसेफिया कॉलनी परिसरात झालेल्या एका भांडणात मध्यस्थी केल्याच्या तसेच पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून त्याने रिक्षाचालक मजाजखान दिलबरखान (वय ३७, रा. आसेफिया कॉलनी) यांचा 9 ऑक्टोबर २०१४ रोजी खून केला आहे. हा गुन्हा उघड होऊ नये, म्हणून त्याने प्रेत खाम नदीत पुरले होते.

पळून गेलेल्या एका आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून तत्काळ पकडले. शेख वाजीदचा शोध सुरू आहे. याप्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे.

- उत्तम मुंडे - वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायरान जमिनी ताब्यात घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सातारा भागातील सर्व गायरान जमिनी महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काही गायरान जमिनी नेत्यांनीही ताब्यात घेतल्या आहेत. ते नेते कोणतेही असोत, त्यांच्या ताब्यातील गायरान जमिनीही महापालिकेला मिळवून देऊ,' असा इशारा महापौर त्र्यंबक तुपे यांनी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे नाव न घेता दिला. त्यांनी बुधवारी (२० मे) अधिकाऱ्यांसह सातारा भागाची पाहणी केली.

महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून सातारा, देवळाईचा परिसर महापालिकेत समाविष्ट केला. हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया मंगळवारी (१९ मे) अधिकृतपणे पार पडली. त्यानंतर महापौरांनी या परिसराला भेट दिली. या भेटीच्या संदर्भात त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ते म्हणाले, 'सातारा परिसरात सुमारे ३५० एकर गायरान जमीन आहे. ही संपूर्ण जमीन महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा येत्या काळात प्रयत्न केला जाईल.' काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठासाठी देखील सातारा परिसरातील गायरान जमीन देण्यात आली आहे, ती जमीन देखील परत घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी महापौरांना केला. त्यावर त्यांनी,'कोणत्याही नेत्याने गायरान जमीन घेतलेली असो, ती जमीन महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा आपला प्रयत्न राहील.'

सातारा, देवळाई भागात झालेली बांधकामे नियोजनानुसार झालेली नाहीत. मोकळ्या जागांवर, उद्यानांसाठीच्या आरक्षणावर, नाल्यांवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. साठ फुटांचे नाले वीस फुटांचे झाले आहेत. ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता किमान नाल्यावरची अतिक्रमणे तरी प्राधान्याने पाडावी लागणार आहेत. सातारा परिसरात २९ हजार मालमत्ता असल्याची नोंद आहे. या मालमत्तांना ग्रामपंचायतीच्या काळातलाच मालमत्ता कर लावण्यात आला आहे. या कराचे नुतनीकरण करावे लागणार आहे. सध्या या भागातून एक कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला जातो. नुतनीकरण केल्यावर या करातून मिळणारे उत्पन्न काही पटीने वाढेल, असा दावा महापौरांनी केला.

सातारा भागात पंधरा रस्त्यांचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे झाले आहे. त्यापैकी आठ रस्त्यांसाठी प्रत्येकी दहा लाख या प्रमाणे ऐंशी लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या रस्त्यांचे काम लवकर सुरू करून उर्वरीत रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी पालकमंत्र्यांना विनंती करू, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले. या संपूर्ण भागाचा विकास आराखडा नव्याने तयार करावा लागेल. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

पाण्याचा खर्च पालिका करणार

सातारा परिसरात सध्या २१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या टँकर्सचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केला जात होता. आता हा परिसर महापालिकेकडे वर्ग झाल्यामुळे टँकर्सचा खर्च महापालिका करेल, अशी माहिती महापौर तुपे यांनी दिली. सातारा नगरपालिकेत ३६ कायमस्वरूपी तर सात दैनिक वेतनावरील कर्मचारी आहेत. त्यांनाही महापालिकेत सामावून घ्यावे लागणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांना भरावा लागेल एलबीटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, देवळाई भागातील व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्थाकरासाठी (एलबीटी) महापालिकेकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यासाठी पुढील आठवड्यापासून या भागात रिक्षा फिरवल्या जातील, अशी माहिती उपायुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.

महापालिकेच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाने एलबीटी लागू केला आहे. सर्व व्यापाऱ्यांना एलबीटी अंतर्गत महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिकेकडे नोंदणी करून दर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत त्यांनी एलबीटी महापालिकेकडे जमा केला पाहीजे. आतापर्यंत सातारा, देवळाई परिसराला जकात कर किंवा एलबीटी लागू नव्हता. आता या परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यामुळे एलबीटीची अंमलबजावणी महापालिकेला करावी लागणार आहे. या संदर्भात 'मटा' ने उपायुक्त किशोर बोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सातारा भागातील व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी महापालिकेकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यासाठी येत्या सोमवारपासून रिक्षा फिरवली जाईल. सातारा भागात नेमके किती व्यापारी आहेत, त्यांच्या माध्यमातून किती एलबीटी वसूल होऊ शकतो याचा अभ्यास येत्या काही दिवसात करू असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी ‘समांतर’ला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठ्याची स्थिती येत्या दोन दिवसांत सुधारा, अन्यथा कार्यालये बंद करू. पाण्याच्या संदर्भात आम्ही जनतेसोबत आहोत, असा इशारा महापौर त्र्यंबक तुपे यांनी समांतरवाल्यांना दिला. आम्ही खूप संयम ठेवला, आता ते शक्य नाही. तुम्हाला चांगले काम करायचे की नाही ते सांगा, असेही ते म्हणाले.

सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे या भागातील काही नगरसेवक व महिला नगरसेवकांचे पती महापौरांना भेटण्यासाठी आले. त्यात दामूअण्णा शिंदे, अशोक वळसे, पूनम बमणे, सुरेंद्र कुलकर्णी, विजय औताडे, बालाजी मुंडे, नंदकुमार घोडेले, कैलास चव्हाण यांचा समावेश होता.या सर्वांचे नेतृत्व उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केले.

यावेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फलक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे शिवांगी, प्रलय मुजूमदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. हे अधिकारी गाऱ्हाणे ऐकून घेण्याचेच काम करीत होते. त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही किंवा आम्ही निर्णय घेऊ, असे महापौरांना सांगितले नाही. सर्व नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबद्दल आक्रमकपणे तक्रारी केल्या. पालिकेचे आणि कंपनीचे अधिकारी काहीच उत्तर देत नाहीत, असे लक्षात आल्यावर महापौर त्र्यंबक तुपे संतापले. ते म्हणाले, 'तुमचे काम पाणीपुरवठा करण्याचे आहे, पण या कामाकडे दुर्लक्ष करून वसुलीचेच काम केले जात आहे. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत ही समस्या सुटली नाही तर, कंपनीची कार्यालये आणि वसुलीची केंद्र बंद केली जातील. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ. कोणी काहीही म्हणले तरी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी जनतेच्या सोबत राहणार आहे.'

४५ कोटी घेऊन ४५ लाखांची लाइनही टाकली नाही

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी फक्त पैसे वसूल करण्याचे काम करीत आहे, असा आरोप बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी केला. कंपनी नागरिकांकडून पाणीपट्टीची वसूली तर करीत आहेच, पण महापालिकेकडून दर महिन्याला पाच कोटी रुपये या कंपनीला दिले जातात. आतापर्यंत महापालिकेने कंपनीला ४५ कोटी रुपये दिले आहेत. कंपनीने मात्र शहरात ४५ लाखांची पाइप लाइनही टाकलेली नाही. नागरिकांना लुबाडण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे, असाही आरोप नगरसेवकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ड्रायपोर्ट’ जमिनीभोवती कुंपण

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

जालना जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी संपादित केलेल्या दरेगाव (ता. जालना) आणि जवसगाव (ता. बदनापूर) येथील १५१ हेक्टर जमीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात घेऊन तेथे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले. त्याचबरोबर ड्रायपोर्ट ते जेएनपीटी असा स्वतंत्र लोहमार्ग उभारणीसाठीचा शक्यता प्रस्ताव (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनुकूलता दर्शविली असल्याची, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष, जेएनपीटीचे संचालक उद्योगपती राम भोगले यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जालना औद्योगिक वसाहती शेजारी असलेली सरकारी जमीन 'जेएनपीटी'ला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभापूर्वीच प्रत्यक्ष उभारणीला आता लवकरच प्रारंभ होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या समन्वयातून भूमिपूजन समारंभाचा मुहूर्त साधारणपणे पुढील १५ दिवसांत नक्की होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत सीएमायएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, उद्योगपती जयंत पाडळकर, जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक निरज बसल उपस्थित होते. डीएमआयसी, मराठवाडा, लगतच्या विदर्भातील जिल्ह्यांतून ड्रायपोर्टच्या माध्यमातून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण किती असेल, याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी स्वतंत्र लोहमार्गाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जेएनपीटी स्वतंत्र लोहमार्गाने जालना ड्रायपोर्ट जोडल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. याविषयी स्वतः नितीन गडकरी यांनी आग्रही भूमिका घेतल्याचे भोगले यांनी सांगितले.

जालना औद्योगिक वसाहतीचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या मात्र सध्या खूप मोठा तोटा सहन करत असलेल्या लोखंड उद्योगाला ड्रायपोर्टच्या माध्यमातून आधार मिळणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि मंदीमुळे जालन्यातील लोखंड उद्योग संकटात आहे. या क्षेत्रातील ७० टक्के लोखंडी सळया उत्पादन करणारे उद्योग बंद पडले आहेत. ड्रायपोर्ट च्या माध्यमातून कच्चा माल, भंगार आणि लोखंडाच्या सळयांच्या जलद, किफायतशीर दरात वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. त्यामुळे ड्रायपोर्टकडे जालनेकरांचे लक्ष लागले आहे. . कोकण रेल्वे महामंडळाप्रमामे जालना ड्रायपोर्ट लोहमार्ग उभारणीसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून, त्या माध्यमाद्वारे बाजारातून भाग भांडवल उभारणी करण्याच्या निर्णयाचा प्रयत्नास नितीन गडकरी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. आता आम्ही या प्रस्तावावर काम सुरू केले आहे.

- विवेक देशपांडे, संचालक, जेएनपीटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदारांच्या बदलीविरुद्ध आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठणचे तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय पवार यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. त्यांची बदली रोखण्यासाठी शहरातील काही संघटनांनी आंदोलनाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे तहसीलदार पवार यांच्या समर्थनासाठी शनिवारी सह्याची घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

एक वर्षाच्या कार्यकाळात तहसीलदार संजय पवार यांनी तालुक्यातील वाळू तस्करी रोखली, वाळू चोरांकडून जवळपास पावणे दोन कोटी रुपयाचा दंड वसूल केला. पैठण तहसील कार्यालयाचे चित्र बदलून कार्यालय एजंट मुक्त केले. नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाच्या दोन महिन्याच्या कालावधीत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नगरपालिका कार्यालयातील गैरव्यवहास आळा घातला. त्यामुळे ते तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय नेत्यांना अडचणीचे ठरत होते. मागील काही महिन्यांपासून असंतुष्ट मंडळी त्यांच्या बदलीचे प्रयत्न करत होते.

संजय पवार यांची बदली करू नये यासाठी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी हे बुधवारी (२० मे) मुंबई येथे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भेटले. त्यावेळी तहसीलदार पवार यांच्या बदलीचे आदेश मुंबईतून निघाल्याची माहिती सूर्यवंशी यांना समजली. दरम्यान, तहसीलदार संजय पवार यांची पैठणहून बदली रोखण्यासाठी आंदोलन करणार असून शनिवारपासून पैठण शहर व तालुक्यात सह्यांची मोहीम राबवणार आहे. त्यांच्या समर्थनासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून ठराव मागवणार असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.

यापूर्वीही २२ जानेवारी रोजी अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासतर्फे तहसीलदार पवार यांची बदली करू नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तहसीलदारांची बदली करू नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या बदलीची माहिती खरी असेल, तर संघटना त्याविरोधात आंदोलन करणार आहे.

- विष्णू ढवळे, तालुका निमंत्रक, भ्रष्टाचार विरोधी न्यास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल न झाल्यास ‘हल्लाबोल’

$
0
0

शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूसंपादन विधेयकात अपेक्षित बदल न झाल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात 'हल्लाबोल' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिले आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तालयावर गुरुवारी (२१ मे) धरणे आंदोलन करण्यात आले.

भूसंपादन दुरूस्तीचा कायदा लोकसभेत मंजूर झाल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने राज्यसभेत सादर केला. ही दुरूस्ती शेतकऱ्यांसाठी कशी फायद्याची आहे, हे सरकार आग्रहाने सांगत आहे. मात्र या कायद्याच्या मसुद्यात अनुकूल बदल न झाल्यास शेतकरी संघटना या कायद्याच्या विरोधात पावसाळी अधिवेशनात हल्लाबोल करणार असल्याचेही संघटनेने जाहीर केले. जुन्या कायद्यात मोबदल्याच्या रकमेवरून दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची सोय होती. ती या नव्या कायद्यामध्ये व दुरूस्तीमध्ये नाही. केवळ नियंत्रकाकडे दाद मागण्याची सोय असल्याचेही शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, केंद्रीय सदस्य गोविंद जोशी, कैलास तवार, गीताताई खांडेभराड, पुंजाराम सुरंग, सा. मा. पंडित, रशीद मौलाना, अॅड पवार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासनाचा विसर

$
0
0

रेल्वे मार्गाच्या बैठकीचा पत्ताच नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाबद्दल चर्चा करण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनी अद्यापही बैठक आयोजित केली नाही. त्यांनी सतरा दिवसांपूर्वी या रेल्वेमार्गासाठी बैठक घेण्याचे आश्वान पैठणकरांना दिले होते.

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग जालना-भोकदन मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पैठणकरांनी आंदोलन पुकारले आहे. खासदार दानवे यांनी त्याबद्दल ४ मे रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे विशेष बैठक घेऊन त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे जालना व पैठण येथील मंडळी समोरासमोर आली. त्यामुळे खासदारांनी पैठणकरांसह रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. रेल्वे मंत्र्यांची वेळ घेऊन आठ दिवसात कळवितो, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, त्याला सतरा दिवस उलटूनही बैठकीचे पुढे काय झाले याबद्दल पैठणकरांना कळविण्यात आलेले नाही.

खासदार रावसाहेब दानवे यांनी दिल्ली रेल्वे मंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांच्याकडून अजून निरोप मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही दिल्लीत जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहोत.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक झाल्यास माफी नाही: वाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'घेईल त्याला आडत' देण्याचा निर्णय घेऊन वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने योग्य पाऊल उचलले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना बाजार समितीकडून गफलत झाल्यास कुणालाही माफ केले जाणार नाही. शेतकऱ्यांनीही दक्ष राहून चुका दाखवल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा माजी आमदार आर. एम. वाणी यांनी दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या 'घेईल त्याला आडत' या योजनेचे उद्घाटन वाणी यांच्या हस्ते गुरुवारी (२१ मे) सेल हॉलमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमात वाणी बोलत होते. बाजार समितीचे सभापती अॅड. आसाराम रोठे, उपसभापती सुनील कदम, संचालक संजय पाटील निकम, आनंदी अन्नदाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, नगरसेवक साबेरखान, बाबासाहेब जगताप, खुशालसिंह राजपूत, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष कचरू पाटील डिके, जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी सेल हॉलमध्ये आणलेल्या शेतीमालाचे विधिवत पूजन करून लिलावाचे उद्घाटन करण्यात आले. पणन महामंडळाने गेल्या अनेक वर्षापासून हा नियम लागू केला आहे. परंतु, वैयक्तिक हित जोपासण्यासाठी बाजार समित्यांनी या निर्णयाची आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही. वैजापूर येथील बाजार समितीने हा निर्णय घेऊन केवळ शेतकऱ्यांचे हित जपले आहे. येथील बाजार समिती मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. खताच्या गोणीमागे जास्त रक्कम आकारल्याप्रकरणी समितीने चौकशी समिती नेमून सचिवाला निलंबित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितास बाधा आल्यास कुणालाही माफ केले जाणार नाही, असे वाणी यांनी आवर्जून सांगितले. सभापती अॅड. रोठे यांनी प्रास्ताविक केले. यापुढील काळात बाजार समितीतर्फे पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी भाजीमंडई आदी सोयासुविधा देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गलांडे यांनी केले.

उपक्रमाची प्रशंसा

नागपूर-मुंबई महामार्गावरील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये २० लाख ५६ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल हॉलचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साताळकर यांनी बाजार समितीने केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली. 'घेईल त्याला आडत' हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images