Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यात टेक्स्टाइल पार्क

$
0
0

औरंगाबादसह पाच जिल्ह्यांचा समावेश ः मुख्यमंत्री

म. टा. प्रतिनिधी, अमरावती

राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यांत नांदगावपेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सस्टाइल पार्क) उभारण्यात येणार आहे. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असेल. शिवाय स्थानिक खाजगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली.

नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. कापूस पिकविणाऱ्या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजेत, हे शासनाचे धोरण अाहे. त्याची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, 'नांदगावपेठच्या धर्तीवर यवतमाळ, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांलाही वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल. कापसाचे अधिक उत्पादन असलेल्या भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, जलयुक्त शिवार अभियान हा त्याचाच एक भाग आहे. पाण्याचे विकेंद्रित साठे तयार झाले पाहिजेत. विहिरींची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार नाही. या जाणिवेतून शासनाने प्रक्रिया उद्योग व सिंचन या बाबींवर विशेष भर दिला आहे.'

एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारताना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी एका महिन्यात सर्व परवानग्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन राज्य शासन प्रोत्साहन म्हणून उद्योजकांना अर्थसहाय्य देत होते, परंतु आता खाजगी उद्योग व जे कोणी या स्वरूपाचे उद्योग सुरू करू इच्छितात, त्यांना प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

'अॅडव्हांटेज विदर्भ'च्या वेळी ज्या उद्योजकांनी सामंजस्य करार केला आहे. ते उद्योग विदर्भात सुरू झाले नसतील त्यांची अडचण समजून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाला केले.

वस्त्रोद्योग धोरण लवकरचः देसाई

उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी, जेथे कापूस पिकतो तिथे वस्त्रोद्योग उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानामध्ये उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आल्या आहेत. यापुढे देशात जेथे वस्त्रोद्योग उद्यान उभारले जाईल, त्यांच्यासाठी अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यान हे मॉडेल ठरेल. या वस्त्रोद्योग उद्यानामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाचे वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर करणार अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतंत्र विद्यापीठ प्रस्तावासाठी उस्मानाबादमध्ये बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रुपांतर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. आता स्वतंत्र विद्यापीठ निमिर्तीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी २९ मे रोजी उस्मानाबाद येथील उपकेंद्रात व्यवस्थापन परिषद व विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादकरांची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी आहे. २०१६ च्या प्रारंभी उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची ‌निर्मिती होईल, असे जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींना वाटते.

औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठांतर्गत ४३३ महाविद्यालयाचा कारभार चालतो. महाविद्यालयाची वाढती संख्या आणि औंरगाबादपासूनचे अंतर यामुळे सर्व महाविद्यालयावर नियंत्रण ठेवणे औरंगाबाद येथील या विद्यापीठास दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कामकाजासाठी औरंगाबादला जाणे खर्चाचे व वेळेच्या अपव्यय करणारे ठरणार आहे.

उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठातून शिक्षण घेता येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यावरील शिक्षणासाठीच्या आर्थिक खर्चाचा ताण कमी होईल. त्याशिवाय या विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम सुरू करून त्याचा लाभ घेता येईल.

- प्रा. संभाजी भोसले, अध्यक्ष, स्थायी समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आत्महत्या रोखण्यासाठी महिलांची मदत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याकरीता आता शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांची या कामी मदत घेतली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून सुसंवादाद्वारे शेतकऱ्यांचे मनोबल उंचविणार असल्याची माहिती ‌जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उस्मानाबादेत बोलताना दिली.

राज्यात अशा प्रकारचा प्रयत्न प्रथमतःच होत असून यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सावंत हे बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची यावेळी उपस्थित होती. शेतकरी आत्महत्या रोखण्याचा हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम प्रथमच उस्मानाबादेत होत असताना उस्मानाबादचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याशिवाय जिल्ह्यातील चारही आमदार यांची यावेळी अनुपस्थिती होती. कार्यक्रमप्रसंगी गैरहजर राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सीईओ सुमन रावत यावेळी आवर्जून उपस्थितीत होत्या. त्यांनी मात्र, या शेतकऱ्यांविषयीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपला शेतकऱ्यांविषयीचा कळवळा दाखवून दिला. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे पथक यावेही उपस्थित होते.

आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांचा ग्रामपातळीवरील प्रत्येक कुटुंबाचा चांगला संपर्क असतो. शिवाय त्यांचा आपसात सुसंवादही असतो. त्यामुळे या कार्यकर्ती व सेव‌िका शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याकामी सकारात्मक भूमिका बजावू शकतील. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण या आशा कार्यकर्तीना व अंगणवाडी ‌सेविकांना तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येणार आहे. शिवाय त्या बजावणार असलेल्या विशेष सेवेबद्दल त्यांना अतिरिक्त मानधन देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण सुविधा १२ तास खुली

$
0
0

लातूरः येथील जुन्या रेल्वे स्थानकावर असलेली रेल्वे आरक्षण खिडकी आता सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. बारा तास सलग आरक्षण खिडकी उघडी राहवी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पत्रकार, व्यापारी, रेल्वे विकास संघर्ष समिती, मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रयत्न सुरू होते. ग्राहक पंचायतीनेही रेल्वे प्रशासनाला पुराव्यासह रेल्वे प्रवाशांची मागणी कशी योग्य आहे हे पटवून दिले होते. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

लातूरातून रेल्वेचे आरक्षण मिळविता यावे यासाठी जुन्या रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या ठिकाणाहून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आरक्षणाचे तिकीट घेण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु, मधल्या कालावधीत ती सकाळी आठ ते दुपारी १२ व सायंकाळी चार ते आठ अशा वेळेतच सुरू होती. या वेळेतेच आरक्षणाचे तिकिट मिळत नव्हते. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही सुविधा आता सकाळी आठ ते रात्री आठ अशी सुरू ठेवण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली होती. शुक्रवारपासून (२२ मे) हे आरक्षण सलग १२ तास सुरू ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्णतेमुळे उस्मानाबादकर त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी तापमानाची नोंद उस्मानाबाद शहरात झाली असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यंदाच्या हंगामात मे महिन्यात प्रारंभी ४२ डिग्री इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यांनतर आता गेल्या पाच दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्ववयोगटातील उस्मानाबादकर त्रस्त झाले आहेत.

अंगाला चटके देणारे ऊन आणि गरम हवा यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून उस्मानाबादकर पुरते हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे बाजार पेठेतील गरजबलेल्या रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. त्यासोबतव उन वाढल्याने रस्ते ओस पडले आहेत.

उस्मानाबाद शहराच्या कमाल व किमान तापमानात गेल्या दोन तीन दिवसांपासून वाढ होत आहे. या बदलाने जिल्हावासीय घामाघूम झालेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात उन्हाचा पारा आणखीन वाढणार असून उस्मानाबादचे तापमान ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उस्मानाबादसह जिल्हयात गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्य नारायणाने रौद्र रूप धारण केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर उष्णतेची लाट पसरली असून यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम होरपळून निघाले आहे. सुर्याच्या चढलेल्या पाऱ्याने कमालीचा उकाडा वाढला आहे. वाढता पारा पाहून नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंद केले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शेतातील मशागतीच्या कामाबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाच्या कामावर होऊ लागला आहे. खरिप पेरणी पूर्वीची कामे शेतकरी पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी करताना दिसताहेत. त्याचप्रमाणे तलावातील गाळ उपसण्याचे कामही दिवसा मंदावले आहे. वाढत्या तापमनावर मात करण्यासाठी थंडगार सरबत, कुल्फी, विविध प्रकारचे ज्यूस, लिंबूसरबत, मोसंबी सरबत, मिल्कशेक, आईस्क्रीम, लस्सी आदिंचा नागरिक आस्वाद घेताना दिसत आहेत. अशा प्रकारचे पदार्थ विकणाऱ्यांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.

पेशंटच्या संख्येत वाढ

तापमान वाढू लागल्यावर खोकला, चक्कर, डोकेदुःखी, लो ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन व अपचन तसेच अस्वस्थवाटणे पोटाच्या तक्रारी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासोबतच अनेकांना विषबाधा, हगवण, उलट्याचा त्रास होण्याचे प्रकारही वाढिस लागले असल्याने पेशंटच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

उन्हात लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन किंवा उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उन्हाने मुलांना चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात भरपूर पाणी पिण्याची गरज आहे.

- डॉ. रमेश खुणे, बालरोगतज्ज्ञ

वाढत्या तापमानामुळे डोळे लाल होणे. जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे. डोळे येणे अशा प्रकारचे पेशंट वाढले आहेत.

- डॉ. श्रीराम जिंतुरकर, नेत्ररोगतज्ज्ञ, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदान रखडण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावागावात सुरू असलेल्या शौचालय बांधकामाचे अनुदान शासनाच्या नव्या निर्णयामुळे रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता ज्या गावात अर्धवट शौचालय बांधकाम झाली असतील त्या गावातील उर्वरित कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यानंतरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच काम पूर्ण ‌होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे अनुदान रखडल्यास नांदेड जिल्हा परिषदेची अडचण होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकाम अतिशय वेगाने करून जवळपास ५५ हजार ७५७ शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे राज्यात विक्रम नोंदविला गेला आहे. संपूर्ण राज्यात नांदेड जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्याला २०१४-१५ मध्ये केंद्राच्या वार्षिक कृती आराखड्यानुसार १६ हजार ९७० शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या सुधारित कृती आराखड्यानुसार ५० हजार ४७४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. जिल्ह्याने ही दोन्हीही उद्दिष्ट पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच बदलून गेलेले जिल्हाधिकारी धीरजकुमार व त्यासोबतच या कामात हिरीरीने पुढाकार घेणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने हे काम जोमाने सुरू आहे. यासंदर्भात काही जणांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रार केली होती. पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्य शासनाच्या पथकाने या कामावर समाधान व्यक्त करीत हे काम चालू ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी या कामला गती देण्यासाठी पुढाकार घेतला.

लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी अधिकाऱ्यांना धडपड करावी लागली होती. त्यानंतर कुठे २२ कोटी रूपये जिल्ह्याला प्राप्त झाले. प्रत्यक्षात जिल्ह्याला बांधकाम झालेल्या शौचालय अनुदानासाठी १०० कोटी रूपयांची गरज आहे. जिल्ह्यात ५५ हजार ७५७ शौचालयांची बांधकाम पूर्ण झाली आहेत. शौचालय बांधकामात जिल्हा राज्यात सर्व प्रथम असला तरी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी निधी अपुरा पडत आहे. त्यात शौचालय बांधकामाचे अनुदान रखडल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

त्यातच आता १०० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले तरच अनुदान देण्याचा नवा फतवा निघाल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. या निर्णयामुळे शौचालय बांधकाम करून ते वापरायला लागलेल्या लाभार्थ्यांना इतरांचे काम पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे. नेहमीच या-ना त्या कारणाने टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेट लतीफ लाभार्थ्यांच्या शौचालयांची बांधकामे पूर्ण केल्यावरच अनुदान मिळणार आहे.

पालकमंत्री, आमदारांनी लक्ष घालण्याची गरज

नांदेड जिल्ह्यात वेग घेतलेल्या शौचालय बांधकाम मोहिमेत गतिरोध निर्माण करणाऱ्या या नवीन आदेशाने चांगल्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे याप्रश्नाकडे पालकमंत्री आणि आमदार यांनी तातडीने लक्ष घालून पूर्वीप्रमाणे अनुदान देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधकामाचे तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना तांत्रिक मार्गदर्शिका पुस्तिका देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या पुस्तकाच्या दोन प्रती ठेवण्यात येणार आहेत.

- जी. एल. रामोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटक्याला सोशल मीडियाचा साज

$
0
0

चिठ्ठी ऐवजी मटक्याचे आकडे वॉटसॅपवर

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जवळपास सहा महिन्यांपासून शहरात बंद झालेला मटका सोशल मीडियाचा साज लेऊन अवतरला आहे. बुकी मंडळी पारंपरिक पद्धतीने चिठ्ठ्यांवर आकडे घेण्यापेक्षा एसएमएस व वॉटसॅपवर आकडे घेत आहेत. पोलिसांनी मात्र याबद्दल माहितीच नसल्याचे सांगितले!

शहरात जवळपास सहा महिन्यांपासून मटक्यासह अवैध धंदे पूणर्पणे बंद होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक मटका सुरू झाला आहे. 'मंठा' असे टोपण नाव असलेल्या व्यक्तीने शहरात मटका सुरू केला आहे. या जुगाराची सूत्रे बस स्थानक परिसरातील एका लॉजवरून हलवली जात आहेत. सध्या, शहरातील बसस्थानक परिसर, श्रीनाथ हायस्कूल, ढोलेश्वर मंदिर, नेहरू चौक, भाजीमंडई या भागात मटका घेणाऱ्या बुकींनी आपल्या दुकाने थाटली आहेत. अहमदनगर, बीड, जालना या जिल्ह्यातील गुन्हेगारीवृत्तीचे लोक बुकी म्हणून मटक्याचे आकडे घेत आहेत.

साधारणतः कागदाच्या चिठ्ठ्यावर आकडे घेवून मटका जुगार खेळवला जातो. यामध्ये मटका घेणारा व देणारा या दोघांनाही पकडले जाण्याचा भीती असते. त्यामुळे आता नवीन शक्कल लढवण्यात आली आहे. सध्या एसएमएस किंवा व्हॉट्स्अॅप वरून मटक्याचे आकडे घेण्यात येत आहेत. त्यातील पैशाचा व्यवहार दुसऱ्या दिवशी पूर्ण केला जातो. पण सोशल मीडिया व अत्याधुनिक तंत्राचा वापर करून मटका सुरू झाल्याने यात तरूण पिढी अडकत आहे. दरम्यान, पोलिसांकडे विचारणा केली असता मटका जुगार सुरू असल्याचे आढळल्यास कडक कार्यवाही करू, असे सांगण्यात आले.

तालुक्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटकाच नव्हे कोणतेही अवैध धंदे करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.

- चंद्रकांत अलसटवार, उपविभागीय पोलिस अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व काळात मुख्यालयी राहण्याचे आदेश

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, खुलताबाद

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे नायब तहसीलदार प्रशांत काळे यांनी सांगितले. खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात झाली असून शुक्रवारी तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व यंत्रणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा कडक सूचना बैठकीत देण्यात आल्या.

केंद्र शासनाचा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अन्वये नैसर्गिक आपत्तीत बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. नगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व साफसफाईचे कामे पूर्ण करावित. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात यावी. पंचायत समितीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लीचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. ग्रामपंचायत हद्दीतील नदी-नाले साफ सफाई करण्यात यावी. ज्या इमारती मोडकळीस आल्या असतील घरे मोडकळीस आलेले आहेत, अशा घरमालकाना नोटीस देऊन तत्काळ दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर झाडे पडल्यास तत्काळ बाजूला करून रस्त्यावरील अडथळे दूर करावे. महावितरणने विजेच्या खांबावरील लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. लघुपाटबंधारे उपविभागाने पाझर तलाव फुटून लगतच्या शेताचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. तलावाच्या सांडव्याची योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग पसरणार नाही, यासाठी साथ प्रतिबंधक औषधी साठा उपलब्ध ठेवावा. गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, लाइनमन, गँगमन, पोलिसपाटील, कोतवाल यांनी सतर्क राहून नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवावा या सूचना देण्यात आल्या. या बैठ्कीस नायब तहसीलदार श्रीराम बेंडे, पोलीस निरीक्षक संभाजी डौले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोरे, पंचायत समितीचे काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, आदी अधिकारी उपस्थित होते.

नियंत्रण कक्ष स्थापन

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी खुलताबाद तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२४३७-२४१०२३ असा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अद्रकाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यात अद्रक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा कमी भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव व भूजल पातळी घसरल्याने यावर्षी अद्रकच्या क्षेत्रात सुमारे दोन हजार हेक्टरची घटन होण्याचा अंदाज आहे..

कन्नड तालुका अद्रक उत्पादनात आघाडीवर आहे. या पिकाचे भाव कधी खूप वाढतात, तर कधी अचानक कोसळतात. त्यामुळे या पिकाला 'लकी पीक' संबोधले जाते. योग्य शेती व्यवस्थापन करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत अद्रकचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. परंतु, यावर्षी अद्रक बेण्याचे भाव पडले व खात्रीचे बेणे उपलब्ध होत नसल्याने क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, नेवपूर, अंधानेर, कन्नड, बहिरगाव, चिकलठाण व हतनूर या गावांच्या परिसरात अद्रकची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात दरवर्षी सुमारे ४५०० हेक्टर क्षेत्रावर अद्रकची लागवड होते. यावर्षी ही लागवड २५०० हेक्टरपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. अद्रकच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना १० मे पासून पूर्व मशागतीची तयारी करावी लागते. कोंबडीखत, शेणखत व उसाची मळी यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ही मागणी औरंगाबाद शहराजवळील गावे व साखर कारखान्याकडून भागते. या पिकाचा मशागत व उत्पादन खर्च मोठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व मिरचीला बसला उन्हाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील मान्सून पूर्व मिरचीवर उष्णतेचा परिणाम झाला आहे. वाढत्या उन्हामुळे मिरचीची रोपे अर्धमेले झाली असून ते वाळण्याची शक्यता आहे. परिणामी यावर्षी मिरची उत्पादनावर परिणाम होईल, असे शेतकरी सांगत आहेत.

सिल्लोड तालुक्यात निर्यातक्षम मिरची पिकाची लागवड दरवर्षी वाढत आहे. तालुक्यातील काही भागातील जमीन मान्सूनपूर्व मिरची पिकाला मानवली आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई झाल्याने इतर शेतकऱ्यांनीही नकदी पीक म्हणून मिरची लागवडीला प्राधान्य दिले. मुंबईच्या बाजारपेठेत या मिरचीची ओळख निर्यातक्षम पीक म्हणून झाली आहे. तालुक्यातील काही शेतकरी खास मिरचीसाठी पाणीसाठा राखून ठेवतात व मे मध्ये ठिबक सिंचन करून मान्सून पूर्व मिरचीची लागवड करतात. ही मिरची जुलै, ऑगस्ट महिन्यात तोडणीस येते. त्यामुळे बाजारात मिरचीला चांगला भाव मिळतो.

पानवडोद, अन्वी, आमठाणा, शिवना परिसरातील गावांमध्ये मिरची उत्पादकांची संख्या वाढली आहे. येथील शेतकऱ्यांनी गटशेती पद्धतीने मिरचीचे क्षेत्र वाढविले आहे. मिरची लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून प्लॉस्टिक पेपर मल्चिंगचा वापर केला आहे. अत्यंत महाग व जोपण्यासाठी नाजूक पिकासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. मेहनती शेतकऱ्यांनी हे तंत्र अवगत केले आहे.

यावर्षी दुष्काळाच्या गडद छायेत पाणी राखून ठेऊन संरक्षित पाण्याच्या भरवशावर ठिबक सिंचन, प्लॉस्टिक मल्चिंग पेपरच्या साह्याने शेतकऱ्यांनी या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यापासून मिरचीची लागवड सुरू केली. परंतु, सध्याचे वाढते ऊन व जोराच्या वाऱ्यामुळे पाणी आटत आहे. त्यामुळे मिरचीची लागवड धोक्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन तूर्त लागवड थांबवली आहे. रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वातावरण बदल होईल, तेव्हा लागवड करण्याच्या मनःस्थितीत ते आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ जमिनीवरील कर रद्द करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारितील जमिनीवर तहसील कार्लायालयातर्फे लावण्यात येणारी सालाना लावणी (महसूली कर) बेकायदेशीर आहे. त्यामुळे हा कर त्वरित बंद करावा, अशी मागणी येथील अॅड. राफे हसन यांनी तहसीलदार सारिका शिंदे यांच्याकडे केली आहे.

वैजापूर तालुक्यात वक्फ बोर्डाच्या मालकीची शेकडो एकर शेतजमीन आहे. वक्फ प्रॉपर्टी घोषित झाल्यानंतर वक्फ अधिनियम १९९५ च्या कायद्यानुसार सदर मिळकत ही कायम वक्फच्या मालकीची असते. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढले आहे. मात्र, तहसील कार्यालयातर्फे बेकायदेशीरपणे वक्फ मिळकतीवर सर्रासपणे सालाना लावणी सुरू आहे. वक्फ संस्थेचे उत्पन्न कमी असल्याने त्यांची मिळकत त्यांना देण्यासाठी शासनाने स्वतंत्र कायदा केला. परंतु, तहसील कार्यालयातर्फे वसुली होत असल्याने संस्थेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने वक्फ मिळकतीवरील सालाना लावणीवर निर्बंध घालून वसुली त्वरित थांबवावी. आतापर्यंत वसूल केलेली लावणीची रक्कम वक्फ बोर्डला परत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर वाहेद पठाण, शेख अक्रम, शेख रियाजोद्दिन, शेख मौजम, अकिल मिस्त्री आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठ, रस्ते उन्हामुळे सामसूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी तालुक्यातील मोठा गावातील बाजारपेठा सामसुम होत आहेत. हमरस्त्यांवर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत वाहनांची संख्या अत्यंत कमी राहत आहे. जनावरे सावलीसाठी झाडांचा आसरा घेत आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता जरा जास्तच असते. या दोन्ही महिन्यातच खरा उन्हाळा जाणवतो. तीव्र उष्णतेमुळे सावलीचा आसरा जनावरे आणि माणसे घेतांना दिसत आहेत. झाडाखाली बसल्यावर उष्णतेच्या झळा कमी लागत आहे. उन्हामुळे नागरिक सकाळी दहापर्यंत कामे उरकरण्यावर भर देत आहेत.

पेरणीचे दिवस जवळ येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर भर उन्हात राबत आहेत. शेतातील काडी कचरा, धसकट वेचण्याच्या कामात महिला मग्न आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण डोक्यावर ओला कपडा बांधत आहेत. औरंगाबाद जळगाव महामार्गावर देखील दुपारच्या वेळी वाहतूक तुरळक असते. वाहनचालकही झाडे असलेल्या ढाब्याचा आसरा घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिअरच्या ट्रकला उलटल्यानंतर आग

$
0
0

वैजापूरः बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने उलटल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत बिअरच्या मालासह नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. नागपूर मुंबई महामार्गावरील लाडगाव चौफुली येथे गुरुवारी (२१मे ) रात्री दोन वाजता ही घटना घडली. गुरुवारी रात्री बिअर घेऊन जाणारा एक ट्रक (एम एच ३१, सी बी ४९३७) औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने जात होता. लाडगाव चौफुलीजवळ या ट्रकचे टायर फुटल्याने तो जवळच्या शेतात जाऊन उलटला. शाॉर्टसर्किटमुळे पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक आगीत भस्मसात झाला. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन, एपीआय प्रतिभा बिरारे, एपीआय आर. एम. जाधव, पोलिस नाईक बाबासाहेब धनुरे, आर. आर. थोरात, अविनाश भास्कर, आर. एस. तळपे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दत्ता काळे (रा. जामगाव, गंगापूर) यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये सिडको ग्रोथ सेंटर उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज महानगर तीनसाठी आता ग्रोथ सेंटर उभारून नियोजित विकासाकडे सिडको भर देणार आहे. आगामी काळात पायाभूत सुविधा देताना याकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी माहिती सिडकोचे (नवीन शहरे) प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी दिली.

शुक्रवारी (२२ मे) पत्रकार परिषदेत माहिती देताना केंद्रेकर म्हणाले, आगामी काळात पैठण रोड ते वाळूज महानगर ३ या भागात लिंकिंग रोड तयार करायचे आहेत. सिडको नगर ३ साठी ग्रोथ सेंटर उभारून सुमारे ४०० हेक्टर जागा विकसित करण्यात येणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने नगर ४ व ५ चा विचार केला जाईल. जमीन किंवा बंगलामालकांच्या वारसदार (नॉमिनेशन) नेमण्याची प्रक्र‌िया सुटसुटीत करून केवळ शंभर रूपयांच्या बाँडवर वारस आता नेमता येईल, अशी सोय सिडकोने केली आहे.

महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार शहरासाठी नवा सिवेज ट्र‌िटमेंट प्लँट (एसटीपीआय)साठी जागा देऊन या योजनेसाठी मदत करण्याचा निर्णयही सिडकोने घेतला आहे. सिडको महानगर ४ साठी सुमारे ४०० हेक्टरहून अधिक जागेची मोजणी आणि पाहणी लेझर बिम सॉफ्टवेअर मशिनद्वारे केली गेली आहे.

यात जमिनींचे मोजमाप आणि इतर गोष्टींत पारदर्शकता आणण्यासाठी मशिनद्वारे मोजणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात सिडकोतील महानगर ३ व ४ साठी किमान २० हजार स्क्वेअर मीटर भाव दिला जाईल, असेही सुनील सुनील केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराचा विकास पाहता पैठण रोड आणि वाळूज महानगर ३ साठी सर्व सुविधा देताना लिकिंग रोड, ड्रेनेज, रस्ते यांना आधी प्राधान्य दिले जाईल. या भागात सुमारे दीड एफएसआयचीही परवानगी आम्ही दिली आहे, असेही ते म्हणाले.

फ्री होल्ड जमिनीविषयी सरकार निर्णय घेणार

सिडकोतील लिज होल्डची जागा फ्री होल्ड करताना सिडको प्रशासकाला काहीही अधिकार नाही. सिडको बोर्डही याबाबत हस्तक्षेप करू शकत नाही. राज्य सरकारने याविषयी निर्णय घेतला तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टपरीप्लॉटधारकांना एएलपी आवश्यकच

सिडकोतील टपरीप्लॉटधारकांविषयी औरंगाबादेत बरेच गैरसमज आहेत. लिज पेमेंट आणि अॅडिशन लिज पेमेंट भरणे आवश्यकच आहे. याबाबत काहीच करता नाही, सिडको बोर्डाने घेतलेला हा निर्णय असतो आणि तो सगळ्यांनी मान्य करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडही भरावा लागतो. हा दंड एकूण जमिनीच्या किंमतीचा ७ टक्के ते ४० टक्के एवढा असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर भामट्याचा सोळा हजारास गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणिता कुलकर्णी (वय ४४, रा.१३ वी योजना, जिजामाता कॉलनी) यांना ७०३३६११६२८ या मोबाइबँक अधिकारी असल्याची बतावणी करत एका सायबर भामट्याने महिलेकडून एटीएम कार्डचा पासवर्ड मिळवला. त्यानंतर खात्यातून साडेसोळा हजार रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी (२० मे) सायंकाळी घडली. ल क्रमांकावरून सायबर भामट्याने फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगितले. बँक खात्याची पडताळणी करायची आहे, असे सांगत त्याने कुलकर्णी यांचा विश्वास मिळवला. त्यानंतर एटीएम कार्डवरील व महत्वाची माहिती मिळवली. बँकेतून पडताळणी सुरू

असल्याचा समज झाल्याने कुलकर्णी यांनी पासवर्ड दिला. थोड्याच वेळात बचत खात्यातून १६ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली. बँक अधिकारी असल्याची बतावणी करत आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी भामट्यावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक नाथा जाधव अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालक संघटनांची एकजूट

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

शहरातील रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहरातील तेरा संघटनांनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचा मेळावा २५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे बुद्धिनाथ बराळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, लालबावटा रिक्षा युनियन, परिवर्तन रिक्षा चालक मालक संघटना, रोशन अॉटोरिक्षा युनियन, पँथर पाॅवर रिक्षा चालक मालक संघटना, वाय. एफ. खान ‌अॉटो रिक्षा युनियन, न्यू जनता अॅटो रिक्षा युनियन, राजीव गांधी रिक्षा युनियन, भ्रष्टाचारविरोधी रिक्षा युनियन, रिक्षाचालक सेना या संघटनांनी एकत्र येऊन औरंगाबाद रिक्षा चालक मालक युनियनची स्थापना केली. रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई, रिक्षा चालकांच्या विविध मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ही संघटना स्थापन करण्यात आली असल्याची माहिती बुद्धीनाथ बराळ यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज हॉल, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला, म्हाडा कॉलनी येथे २५ मे रोजी कृती समितीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात पोलिस कारवाईविरुद्ध आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

१३०० रिक्षा परमिट बाद होण्याच्या मार्गावर

शहरातील १३०० रिक्षा परमिट सहा महिन्यांच्या आत नियमित न केल्याने, सदर रिक्षाचालकांचे परमिट बाद केले जाणार आहेत. आरटीओ कार्यालयात १३०० परमिट अडकून पडल्यामुळे हे परमिट नियमित करण्याच्या मागणीसाठीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती बराळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटच्या मृत्यूनंतर अधीक्षकांना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीमध्ये उपचारांसाठी आलेला हार्ट अॅटॅकचा रुग्ण दादाराव रगडे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक व प्रत्यक्षदर्शींनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर व इतरांना घेराव घातला. हार्ट अॅटॅकच्या रुग्णांना वेळेत योग्य उपचार का नाही मिळत, असा सवाल उपस्थित करीत, अपघात विभागात जागेवर नसलेल्या निवासी डॉक्टरवर तातडीने कारवाईची मागणी नातेवाईक व प्रत्यक्षदर्शींनी केली.

दादाराव रगडे यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या व श्वास घेण्यास त्रास होत होता. या तक्रारीसह त्यांना शुक्रवारी (२२ मे) दुपारी एकच्या सुमारास घाटीतील अपघात विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी संबंधित निवासी डॉक्टर (रेसिडेन्ट) जागेवर उपस्थित नव्हता आणि त्याला वारंवार फोन करुनही तो तब्बल २० मिनिटांनी आला. उशिरा उपचार मिळाल्यामुळेच दादाराव यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक व प्रत्यक्षदर्शींनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जेवळीकर यांना त्यांच्या कार्यालयात तासभर घेराव घातला. याप्रसंगी डॉ. जेवळीकर, मेसिडिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी, संबंधित निवासी डॉक्टरची चूक झाल्याचे कबूल केले आणि यापुढे, असा प्रकार होणार नसल्याचे शब्द दिला, असे किरण गणोरे यांनी 'मटा'ला सांगितले. तर मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष साबळे यांनी पोस्टमार्टेमला उशीर लागल्याचा आरोप केला.

दादाराव यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी आम्ही अपघात विभागातील डॉक्टरांना सतत सांगत होतो. मात्र कमीत कमी २० ते २५ मिनिटांनी निवासी डॉक्टर आला. तातडीने प्रभावी उपचार मिळाले असते, तर दादाराव यांचा जीव वाचला असता.

- किरण गणोरे, नारळीबाग शाखाप्रमुख, शिवसेना.

दादाराव यांना दाखल केल्यानंतर २० मिनिटांनी निवासी डॉक्टर आला आणि तपासून मृत घोषित केले. जलद उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता.- सिद्धांत शिरसाट, नगरसेवक

हार्ट अॅटॅकचे उपचार ज्या तत्परतेने मिळायला हवेत, त्या तत्परतेने उपचार न मिळाल्यामुळेच रगडे यांचा मृत्यू झाला. संबंधित रेसिडेन्टला सारखे कॉल करूनही तो १५ ते २० मिनिटांनी आला. हार्ट अॅटॅकच्या उपचारांचे गांभीर्य अजिबात नव्हते.

- सुवर्णा साबळे, राज्य सचिव, क्रांतीवीर लहुजी साळवे विकास परिषद

संबंधित रुग्णावर गरजेनुसार सर्व उपचार करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल.

- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडण सोडवणाऱ्या तरुणीस मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणीला दोघांनी मारहाण केली. ही घटना बायजीपुरा भागात गुरुवारी (२१ मे) सायंकाळी चार वाजता घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद माजेद मोहम्मद रशीद (वय २८, रा. बायजीपुरा) असे फिर्यादीचे नाव आहे. संजयनगर येथे राहणारे मोहम्मद सलीम मोहम्मद रफिक आणि मोहम्मद रफिक मोहम्मद अकबर यांनी फिर्यादीला घराबाहेर बोलवून जुन्या भांडणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीची बहीण झरिना (रा. बायजीपुरा) यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या मोहम्मद सलीम आणि मोहम्मद रफिक यांनी झरिना यांना मारहाण केली, असे तक्रारीत नमूद केले आहे.

दुचाकीच्या धडकेत वृद्ध जखमी

दुचाकीच्या धडकेत एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालेत. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रासमोर सीबीएस रोडवर मंगळवारी (१९ मे) रात्री दहा वाजता ही घटना घडली. विश्वनाथ निकाळजे (वय ५९, रा. प्रतापनगर रेसीडेन्सी, उस्मानपुरा), असे फिर्यादीचे नाव आहे. मध्यवर्ती बसस्थानकाकडे (सीबीएस) ते पायी जात असतानाच भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने (एम. एच. २०, बी.पी. ५९९०) त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉस्पिटलमधून मोबाइल चोरी

औरंगाबादः एमजीएम हॉस्पिटलमधील एका एका डॉक्टरचा मोबाइल बुधवारी रात्री साडेदहा वाजता चोरीस गेला. डॉ. गुरव पुंडे हे पेशंट तपासात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील ५३ हजार रुपये किंमतीचा अॅपल आयफोन-६ मोबाइल लंपास केला. डॉ. पुंडे यांनी याची तक्रार सिडको पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचे ‘आउटगोइंग’ बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेळोवेळी सूचना देऊनही संबंधित विभागांनी थकित देयके न दिल्याने जिल्हा परिषदेतील दूरध्वनी सेवा बंद पडली आहे. पीबीएक्समध्ये जोडले गेलेले पाच फोन बंद असल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. फक्त इनकमिंग सेवा सुरू असल्याने झेडपीतून बाहेरचा संपर्क तुटला आहे.

जिल्हा परिषदेच्या दूरध्वनी कक्षात सहा दूरध्वनी आहेत. हे अनुक्रमे आरोग्य, सिंचन, शिक्षण, महिला व बालकल्याण, बांधकाम विभागाच्या नावावर आहेत. दर महिन्याला या विभागांकडून बिल देण्यात येते. साधारणपणे दरमहा १२०० ते १५०० रुपये एका दूरध्वनीचे बिल येत असते. ठराविक मुदतीच्या आत जर बिल भरले गेले नाही तर आऊटगोईंग कॉल बंद होतात. दर वर्षी किमान तीन ते चार वेळा बिल न भरल्याने फोन बंद होण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर येते.

एप्रिल महिन्याचे बिल न भरल्याने जिल्हा परिषदेतील २३३१५७१, ७३,७४,७५ आणि २३५३७४४ या पाच दूरध्वनींची सेवा खंडित करण्यात आली आहे. आऊटगोइंग बंद झाल्यामुळे मुख्यालयातून तालुक्याच्या ठिकाणी वा अन्यत्र संपर्क साधणे बंद झाले आहे. प्रशासनाकडे यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली पण त्याची दखल घेतली गेली नाही. परिणामी दूरध्वनी यंत्रणा पुरती कोलमडली आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सीइओ सुखदेव बनकर यांच्या काळात अशी अडचण आली होती. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने सर्व विभागांना वेळेवर बिले भरण्याची ताकीद दिली होती. आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर उन्हाळ्यात शहरात पर्यटन हंगाम ‘हाउसफुल्ल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळा-कॉलेजांच्या सुट्या संपत असताना पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा असूनही पर्यटकांची संख्या तुलनेने जास्त आहे. सध्या परराज्यातील सर्वाधिक पर्यटक असून, उन्हाळा असल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या घटली आहे. पुढील आठवड्यात गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्याची सुटी औरंगाबाद शहरातील पर्यटन व्यवसायासाठी फायदेशीर ठरली आहे. सध्या बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. मे महिना पर्यटन हंगाम मानला जातो. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पर्यटकसंख्या घटण्याची शक्यता होती; पण रणरणत्या उन्हातही पर्यटनस्थळ पाहण्याचा पर्यटकांचा उत्साह कायम आहे. बीबी का मकबऱ्याला शुक्रवारी (२२ मे) तब्बल ४ हजार पर्यटकांनी भेट दिली. शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असतो. या विद्यार्थ्यांची संख्या गृहित धरल्यास जवळपास ५ हजार पर्यटक दररोज भेट देतात, असे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

भारतीय पर्यटकांचा ओघ वाढला असून, शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील सर्वाधिक पर्यटक शहरात आले आहेत. शिर्डीला देवदर्शनासाठी जाणारे पर्यटक आवर्जून औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळे पाहतात. या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. वेरूळ लेणी आणि देवगिरी किल्ला पाहण्यासाठीही पर्यकांची गर्दी झाली आहे. पाणचक्की पाहण्यासाठी मात्र जेमतेम पर्यटक येत आहेत.

पाणचक्कीचा नैसर्गिक धबधबा बंद झाल्यामुळे ही संख्या घटली आहे तर, शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावरील अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची कमी गर्दी आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी ओसरली आहे. सहलीचे पूर्वनियोजन असल्यामुळे परराज्यातील पर्यटकांचा ओघ कायम आहे. विदेशी पर्यटक फक्त हिवाळ्यात येतात. उन्हाचा फटका सहन होत नसल्याने मोजकेच विदेशी पर्यटक दिसत आहेत.

व्यवसाय तेजीत

पर्यटकांची गर्दी वाढताच शहरातील पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. टॅक्सी, ट्रॅव्हल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फेरीवाले यांचा व्यवसाय वाढला आहे. काही पर्यटक दिवसभरात चार-पाच पर्यटनस्थळांना भेट देत असल्यामुळे टॅक्सींची मागणी वाढली आहे. बस, रेल्वे आणि खासगी बसमध्ये पर्यटकांची गर्दी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

एप्रिल-मे महिन्यात भारतीय पर्यटकांची गर्दी अपेक्षित असते. तर विदेशी पर्यटक अजिबात नसतात. पर्यटन हंगामावर उन्हाचा अत्यल्प परिणाम झाला आहे. स्थानिक पर्यटक पर्यटनस्थळी दिसत नसले तरी शिर्डीला जाणारे पर्यटक शहरात हमखास येतात.

- जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images