Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेशन दुकानाचा परवाना निलंबित

$
0
0

वैजापूरः धान्य वाटपात अनियमितता केल्याबद्दल तालुक्यातील पोखरी येथील स्वस्त धान्य दुकानदार आर. टी. ठुबे यांच्या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे. दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या. तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी चौकशी केली. त्यावेळी गंभीर त्रुटी असल्याचे आढळले. गेल्या १५-२० वर्षांपासून बाहेरगावी राहणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या नावे माल उचलल्याचे निष्पन्न झाले. दरपत्रक न लावणे, पावत्या न देणे या त्रुटीही आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सुनावणीत समाधानकारक खुलासा न आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी परवाना निलंबित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘सेतू’ने वाढव‌िला वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध प्रमाणपत्र तातडीने मिळावे यासाठी सेतू सुविधा केंद्राची वेळ वाढव‌िण्याचा निर्णय जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी घेतला आहे. सोमवारपासून सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार आहे. सार्वजनिक सुटी तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवार आणि रविवारी सेतू सुविधा केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहील.

बारावीच्या निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रहिवासी, उत्पन्न, डोमेसाइल, राष्ट्रीयत्व, जातीचे, भूमिहीन यासह इतर प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. प्रवेशासाठी दिलेल्या वेळेत या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. निर्धारीत वेळेत प्रमाणपत्र सादर करताना विद्यार्थी व पालकांची धावपळ उडते. या काळात विद्यार्थी, पालकांना एजंटकडून लुबाडण्याचेही प्रकार घडतात. या गोष्टी टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सेतू सुविधा केंद्राचे मुकुंद मागूळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितांच्या ज्योतीला गवसली प्रकाशाची वाट!

$
0
0

औरंगाबाद : बारावीचा निकाल जाहीर झाला. गुणवंतांचे कौतुक सुरू झाले. आपल्या मुलाच्या यशाचा अभिमान प्रत्येक आई-वडिलाला असतो, पण लहानपणापासून वंचित म्हणून जगणाऱ्या मुला-मुलींचे काय? छावणीतल्या विद्यादीप अनाथाश्रमात राहणारी ज्योती वामन ढोकळे ही विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण झाली. तिला ६३% गुण मिळाले.

ज्योतीने मिलिंद कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला व मोठ्या मेहनतीने यश मिळवले. मात्र, ज्योतीचा आनंद साजरा करायला तिचे आपले कुणीच नाही. तिचे आई-वडील नाहीत. आप्त याच शहरात राहतात, पण इतक्या वर्षांत तिची विचारपूस करायला कुणीच आले नाही. लहानपणापासून तिला या गोष्टीची सवय झाल्याने तिने विद्यादीपलाच आपले घर मानले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष दिले. 'ज्योतीला कुणी विचारत नसेल. मात्र, आम्ही तिला तिच्या आवडीचे करिअर करण्यास प्रोत्साहन देऊ,' अशी प्रतिक्रिया विद्यादीपच्या अधीक्षक सिस्टर व्हिन्सेटिना यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

प्रशासकीय सेवचे स्वप्न

प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा निर्धार ज्योतीने 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. आता नियमाप्रमाणे ज्योतीला विद्यादीपमध्ये राहता येणार नाही. त्यामुळे पुढील शिक्षणाकरता नाशिकला पाठवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारूंना वेसण घाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या शिक्षणसंस्था, शिक्षणसम्राटांना वेसण घाला. त्यासाठी केंद्रीयस्तरावर कायदा करा. शै‌क्षणिक न्यायाधीकरण स्थापन करा,' अशी एकमुखी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेत करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परिषदेचा शुक्रवारी (२९ मे) समारोप झाला. त्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला.

नर्सरी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षण राजाश्र‌ित न राहाता, समाजाश्र‌ित असावे. ते लोकाभिमुख व सहजशक्य असावे, अशी परंपरा असताना शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या व्यापारीकरणाबद्दल यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. समाजात उद्योजक, रोजगार वाढीसाठी योजना आखण्याची गरज असल्याचा प्रस्ताव मंजूर झाला. केंद्र शासनाने उद्योजकता व कौशल्य विकासासाठी 'स्किल इंडिया मिशन'साठी पावले उचलल्याबद्दल आणि यासाठी खास मंत्रालय बनवल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्यात आले. व्यवसायांचा विकास घडवून आणून त्यास मान्यता देणे, त्यास प्रमाण मानून त्यांना पदवी-पदविका प्रमाणपत्र देण्यात यावे, शाळा महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, कौशल्यप्राप्त युवकांना अल्पदरात कर्ज आणि आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागण्या या प्रस्तावात आहेत.

देशाच्या ‌सद्यस्थितीवरील प्रस्तावात भारत सरकारने देश-विदेशात भारताला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. देशभरात जनधन योजना, स्वच्छता अभियान, पेन्शन योजना या सारख्या समाजहितकारी योजना राबिवल्या याबद्दल सरकारचे स्वागत करण्यात आले. जम्मू-काश्मीर सरकारने मसरत आलम या दहशतवाद्याची तुरुंगातून मुक्तता केल्याच्या घटनेचा यावेळी विरोध व निषेध करण्यात आला. देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल प्रस्तावात चिंता व्यक्त करण्यात आली.

पूर्वांचल, मेडिव्हिजनची माहिती

अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर यांनी पूर्वांचल, अरुणाचल प्रदेश, मणिपूरसह जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या प्रवासाचे वृत्त कार्यकारिणीसमोर ठेवले. ज्यात या राज्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या 'सविष्कार' या कार्यक्रमातील सहभाग, आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी झालेला 'मेडिव्हिजन' या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. 'दोन दिवस अनुसूचित जाती व जमातींच्या विद्यार्थ्यी वसतिगृहात मुक्काम' या अभियानाचे वृत्तही बैठकीसमोर ठेवण्यात आले.

निर्भिड प्रहारचे प्रकाशन

शहरातील राष्ट्रीय विचारसरणीचे साप्ताहिक निर्भिड प्रहारच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनिमित्त विशेष आवृत्ती काढण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर यांच्या वैशिष्टयपूर्ण संपादनाखाली तयार झालेल्या या विशेषांकाचे प्रकाशन अभाविपचे अध्यक्ष डॉ. नागेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीहरी बोरीकर व मान्यवरांची उपस्थिती होती.

दिग्गजांच्या भेटी

अभाविपच्या राष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भारतीय जनता पक्षाच्या मह‌िला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, भारतीय शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव ठोंबरे, लघुउद्योग भारतीय राष्ट्रीय उपाध्यक्ष आबासाहेब देशपांडे, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवजीभाई पटेल, हर्षवर्धन जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह हरिष कुलकर्णी, देविगरी प्रांताचे प्रचार प्रमुख वामनराव देशपांडे, प्रांत महानगर सहसंघचालक देवानंद कोटगिरे, जिल्हा कार्यवाह दिवाकर कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेटी दिल्या. या सर्वांचे यावेळी स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणीतील व्यवस्थेतील कार्यकर्ते मनोज पत्की, सविता कुलकर्णी, अविनाश जहागिरदार, मनिष पाटील यांचा परिचय उपस्थित सदस्यांना करून देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच प्रमुख बुकींचा पोलिसांना शोध

$
0
0

औरंगाबाद : आयपीएल बेटींग प्रकरणात सहभागी असलेल्या शहरातील पाच प्रमुख बुकींचा आ‌र्थिक गुन्हेशाखेकडून शोध सुरू आहे. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग सट्टा चालवणाऱ्या सहा जणांच्या बुकींच्या टोळीला पंधरा दिवसांपूर्वी गुन्हेशाखेने अटक केली होती. यामध्ये लाईन ऑपरेटर नरेश पोतलवाडसह शहरातील पाच प्रतिष्ठितांचा यामध्ये समावेश होता. पोतलवाड चालवत असलेल्या मोबाइल लाईन बॉक्समध्ये सुरू असलेल्या २८ लाईनपैकी शहरातील काही बुकींचा यामध्ये समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. हा प्रकार कळताच यामध्ये सहभागी असलेले उद्योजक समीर भंडारी तसेच इतर बुकी पसार झाले होते. समीर भंडारी यांना कोर्टाने एक तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

नरेश पोतलवाडला जामीन

आरोपी नरेश पोतलवाड याचा जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एच. ठोंबरे यांनी मंजूर केला. त्याला दर सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. हा ऑनलाइन सट्टा असल्याने त्यावर लोकच पैसे लावतात. यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला नाही. जुगार कायद्यातील गुन्हे हे जामीनपात्र आहेत. नरेश यास बारा दिवसांची कोठडी मिळाली होती. त्याच्याकडून जप्त करायचे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे नरेशचा जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्याचे वकील अभयसिंह भोसले यांनी कोर्टाला केली. कोर्टाने ती सशर्त मंजूर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरगाव पोलिसांचे आरोपींना अभय

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसात तक्रार केल्याप्रकरणी तरुणावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना २१ एप्रिल रोजी सिरसगाव ता. वैजापूर येथे घडली होती. या प्रकरणी महिना उलटला तरी आरोपीला पकडण्यात वीरगाव पोलिसांना यश आलेले नाही.

दत्तात्रय अंबादास झिने (वय ३५) हा तरूण २१ एप्रिल रोजी दुचाकीवर कोंडीराम मलिक यांच्यासोबत विरगावकडून सिरसगावकडे जात होता. यावेळी जुन्या वादातून त्यांना आरोपी रवींद्र निंबाळकर, प्रकाश निंबाळकर, मदन निंबाळकर, कल्याण निंबाळकर व दिनेश निंबाळकर यांनी अडवले. या आरोपींनी लोखंडी गजाने तसेच दगडाने दत्तात्रयला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या डाव्या पायाला फॅक्चर झाले. त्याच्यावर सुरूवातीला घाटी हॉस्पिटल तसेच नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी झिने याच्या तक्रारीवरून वीरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला महिना उलटला तरी आरोपींना पकडण्यात वीरगाव पोलिसांनी स्वारस्य दाखवले नाही. या प्रकरणी झिने कुटुंबियांनी तत्कालीन पोलिस अधिक्षक अनिल कुंभारे यांची भेट घेत दाद मागतली. मात्र, त्यानंतरही आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले नसून आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप दत्तू झिने यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळविले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सासूसोबत सकाळी‌ फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले. गुरूवारी सकाळी साडेसहा वाजता अभिनय टॉकीज चौकाजवळील तार भवन येथे ही घटना घडली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता सुभाष मगरे (वय ४० रा. कैलासनगर) ही महिला सासूसोबत सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. येथील तार भवन जवळून जात असताना त्यांच्या पाठीमागून एक तरूण पायी चालत आला. त्याने संगीताबाईच्या गळ्यातील साडेबारा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यानंतर पुढे दुचाकीवर असलेल्या साथीदारासह तो गांधीनगरच्या दिशेने पसार झाला. या प्रकरणी संगीताबाई यांनी पतीसह क्रांतिचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही आरोपींविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाचे घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव परिसरातील मीरानगर भागात माजी सैनिकाचे घर फोडून ७० हजार रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरानगर येथे माजी सैनिक दत्तात्रय थोरात राहतात. थोरात व्हिडीओकॉन कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गुरूवारी त्यांची रात्रपाळी असल्याने ते ड्यूटीवर गेले होते. त्यांच्या पत्नी मंदाबाई (वय ३५) आणि त्यांची दोन मुले घरी झोपलेली होती. पहाटे २ वाजेच्या सुमारास दोन तरूण घरात घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदाबाईनी आरडा ओरडा केल्याने या दोघांनी पलायन केले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी घरातील एक तोळ्याची सोन्याची पोत, एक तोळ्याचे झुंबर आणि आठ ग्रॅमचे सोन्याचे वेल असा एकूण ६८ हजारांचा चोरला होता. ही चोरी झाल्याचे लक्षात येताच मंदाबाई यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक विजय घेरडे करीत आहेत.

रेल्वेतून पडल्याने जवानाचा मृत्यू

रेल्वेतून पडल्याने नाशिक येथील जवानाचा मृत्यू झाला. गुरुवार सकाळी संग्रामनगर उड्डाण पुलाजवळ हा प्रकार घडला. अमोल श्रीकृष्ण शेवाळे (वय २३, रा. चवगाव, ता. सटाणा, जि. नाशिक) असे या जवानाचे नाव आहे. सकाळी जखमी अवस्थेत शेवाळे नागरिकांना आढळून आले. त्यांना घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.

शेवाळे दीड वर्षापूर्वी सैन्यदलात दाखल झाले होते. मराठा लाईट बटालीयनमध्ये ते जवान होते. प्रशिक्षण संपवून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

जुन्या वादातून मारहाण

दौलताबाद येथील सय्यद हमीद सय्यद युसूफ हा तरूण मंगळवारी कोर्टाच्या कामानिमित्त शहरात आला होता. काम आटोपून वाहनाने तो घरी जाण्यासाठी निघाला होता. यावेळी दौलताबाद घाटात त्याची गाडी त्याच्या नातेवाईकांनी अडवली. जुन्या कारणावरून त्याला गाडीबाहेर ओढून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सय्यद रहीम, सय्यद जावेद व सय्यद बाबा तसेच एका अनोळखी व्यक्तीविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतुकीला अडसर ठरणारी वाहने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्य रस्त्यालगत वाहतुकीला अडसर ठरणारी भंगार वाहने ताब्यात घेण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. गणेशनगर भागात वर्षानुवर्षे पार्क केलेली १८ वाहने जप्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मनपा व पोलिसांच्या वतीने संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.

शहरातील मुख्य रस्त्यावरील गॅरेज तसेच घरांसमोर उभ्या असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सध्या शहराच्या मुख्य रस्त्यावर उड्डाण पुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे विविध भागात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विरेंद्रसिंग यांनी गेल्या गुरूवारी बैठकीमध्ये वाहनधारकांना तीन दिवसात ही काढून घ्यावी, असे आवाहन केले होते. तसेच महानगरपालिका व शहर पोलिसांनी वाहने काढण्यासाठी एक संयुक्त पथक तयार करावे व त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारपासून संयुक्तरित्या ही मोहीम सुरू करण्यात आली. गणेशनगर ते किलेअर्क परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये उभ्या असलेल्या १८ भंगार वाहनांना क्रेनद्वारे उचलून नेण्यात आले. ही वाहने जप्त करण्यात आली असून या कारवाईमध्ये महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव प्रमुख शिवाजी झनझन, महावीर पाटणी यांच्यासह वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती आदींचा सहभाग होता.

वाहनमालकांचा विरोध

ही वाहने उचलण्यासाठी गणेशनगर भागात ही मोहीम सुरू केल्यानंतर वाहनधारकांनी वाहने उचलण्यास विरोध केला. यामुळे या भागामध्ये काही वेळ वाहनधारक व पोलिसात खडाजंगी झाली. मात्र, पोलिसांनी या विरोधाला न जुमानता ही वाहने जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ कॉलेजांना भोपळा फोडताच आला नाही!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत विभागातील आठ ज्यूनिअर कॉलेजांना साधा भोपळाही फोडता आला नाही. या कॉलेजचा एकही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही. शून्य टक्के निकाल लागलेल्या या संस्थावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. औरंगाबाद विभाग बारावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल यंदा ०.७९ ने वाढला, तरी निकालाच्या टक्केवारीत विभाग सातव्या क्रमांकावर आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या आधारावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी, साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत विभाग अव्वल आहे. उत्तीर्ण झालेल्यापैकी साठ टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, असे असतानाही शून्य टक्के निकाल लागलेल्या कॉलेजांची संख्या आठ आहे. यातील अनेक संस्था या नामांकित आहेत. शून्य टक्के निकाल लागलेल्या कॉलेजांचा मंडळाकडून उजळणी वर्ग घेण्यात येतो. तसेच पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कळविल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यांचा निकाल शून्य टक्के

मिलिंद ज्युनिअर कॉलेज, परळी.

एस.बी. ज्युनिअर कॉलेज, गोंदेगाव.

शंभू महादेव ज्युनिअर कॉलेज, वाटूळ.

एमएएम वस्तावनी आर्ट उर्दू कॉलेज, रांजणी.

नामदेवराव पाटील ज्युनिअर कॉलेज, वडगाव.

मारोतीराव पाटील ज्युनिअर कॉलेज, धुपखेडा.

गजानन उच्च माध्यमिक विद्यालय, गोळेगाव.

डॉ. मोहंमद इकबाल उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई.

शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांवर कारवाईचा अधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालयाला असतो. आम्ही त्यांचे निकाल उंचावण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकांचे उजळणी वर्ग घेतो. शाळांची यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविली आहे.

- प्रकाश पठारे, विभागीय सचिव, शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा विरोध चर्चेतून थंड होईल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा मोठा विरोध आहे. या पूर्वीही राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी होत नव्हती. मात्र, चर्चेनंतर शिवसेना सहभागी झाली. त्याच पद्धतीने शिवसेनेचा विरोध चर्चेतून थंड होईल,' असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी (२९ मे) व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री गोयल शहरात होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, 'जैतापूरचा प्रकल्प राज्यासाठी खूप चांगला आहे. अणू ऊर्जेतून अनेक देशात विजेची समस्या मिटली. हा प्रकल्प उभारताना सुरक्षा आणि तंत्रज्ञानाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. या प्रकल्पाला शिवसेनेचा मोठा विरोध आहे. हा विरोध चर्चेतून सोडविला जाईल. यापूर्वीही शिवसेना सत्तेत सहभागी होत नव्हती. मात्र, चर्चेनंतर शिवसेना सहभागी झाली. त्याच पद्धतीने शिवसेनेला चर्चेतून शांत करू. जैतापूर प्रकल्पामुळे राज्यातील नाग‌रिकांना स्वस्त वीज ‌‌मिळणार आहे. गुजरातमध्येही अणू ऊर्जा प्रकल्प उभारणार आहोत.' पत्रकार परिषदेतला भाजपचे आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर, विजया रहाटकर, ज्ञानोबा मुंडे, डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

वीज स्वस्त करू

राज्यात वीज महाग असल्याने अनेक उद्योग परराज्यात जात आहेत. याची कल्पना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. राज्याचे मुख्यमंत्री वीज स्वस्त कशी होईल? यासाठी प्रयत्नशील आहेत, असे गोयल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा उचलणे रविवारपासून बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतीतील कचरा उचलण्याचे काम आजवर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून होत होते. मात्र, त्याची मुदत रविवारी (३१ मे) संपणार आहे. एक जूनपासून कचरा उचलण्याचे काम कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये छोटी मोठी ३,५०० युनिटस आहेत. याठिकाणी दररोज दोन ते अडीच टन कचरा जमा होतो. एमआयडीसीकडून मुलभूत सुविधा पुरविताना आजवर कचरा उचलण्याचे काम केले जात होते. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या कामाचे ऑडिट करताना कचरा उचलण्याचा मुद्दा समोर आला. यासाठी वार्षिक ३५ लाख रुपये खर्च होत होते. एमआयडीसीकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधांच्याय यादीत कचरा उचलण्याचे काम समाविष्ट केले नव्हते. तरीही कचरा उचलला जात होता. राज्यातील अन्य एमआयडीसीमध्ये मात्र स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वतंत्र यंत्रणेकडून हे काम होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कचरा उचलणे बंद करण्याचे ठरविले. त्यावेळी स्थानिक उद्योजक, राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून मुदतवाढ मागितली होती. ती ३१ मे रोजी संपत आहे. दहा ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलला जात होता. ते काम रविवारपासून बंद होणार आहे. दरम्यान, यासाठी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन कचरा उचलण्यासाठी यंत्रणा निर्माण करून देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला. या कामात केवळ करवसुलीचे काम एमआयडीसीने करून द्यावे, अशी विनंती करण्यात आली. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठ कार्यालयाला असल्याने हा प्रस्ताव मुंबईकडे पाठविला आहे.

कचरा उचलणे बंद केले तर महास्वच्छता अभियानात केलेली मेहनत वाया जाईल. परत कचऱ्याचे ढीग दिसायला लागतील. रोगराई पसरेल. व्हिजिटरला इंप्रेशन चांगले जाणार नाही.

- राहुल मोगले, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या करणाऱ्यांत तरूण शेतकरी जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात १९९५पासून २६ हजार आत्महत्या झाल्या आहेत. त्यात ६० टक्के शेतकरी २१ ते ३८ वयोगटातील आहेत, अशी माहिती शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी दिली.

नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील निवडक प्रतिनिधींची शुक्रवारी (२९ मे) स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात बैठक झाली. या बैठकीत अॅड. ढोबळे बोलत होते. या बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. विभागातील गावांना, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना, शेतकऱ्यांच्या विधवांना भेटून त्यांच्या स्थितीविषयी आम्ही माहिती घेतली. त्यांची अवस्था फार वाईट आहे. त्याचा एक अहवाल तयार करून आम्ही सरकारला देणार आहोत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरूण शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याभोवती सावकारी पाश आवळला जात आहे, असे अॅड. ढोबळे यांनी सांगितले. 'शासकीय धोरणे चुकीचे आहेत. त्यावर आम्ही चार कलमी कार्यक्रम सुचविला आहेत. बी-बियाणे, खते, औषधे यांचा सरकारकडून पुरवठा केला पाहिजे. शेतीमालाला भाव मिळण्याची हमी हवी, बँकांनी शून्य टक्के व्याजदराने पतपुरवठा करावा, गावातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा यासाठी धोरण बदलावे, अशी हा कार्यक्रम अाहे,' असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात आर्थिक आणि सामाजिक अनुशेष शिल्लक आहे. विभागाचा समग्र विकास झाला तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळापत्रक आखणे अत्यंत आवश्यक आहे.

- अॅड. विष्णु ढोबळे, अध्यक्ष, शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आरोग्य केंद्रांसाठी तज्ज्ञांची सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही शहरातील खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी शुक्रवारी (२९ मे) दिली. 'महापलिकेच्या आरोग्य केंद्रांची अवस्था' या विषयावर 'मटा'तर्फे आयोजित 'राउंड टेबल'मध्ये संचालकांनी ही ग्वाही दिली.

या 'राउंड टेबल'मध्ये महापौर त्र्यंबक तुपे, महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन, कमलनयन बजाज रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. एच. व्ही. मुदलियार, डॉ. हिना खान, माणिक हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले, एमआयटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे, अॅपेक्स हॉस्पिटलचे डॉ. अमोल देशमुख, 'आयएमए'चे शहराध्यक्ष डॉ. संजीव सावजी, सचिव डॉ. सचिन फडणीस, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी उपस्थित होते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन महापौर, आयुक्तांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीला ९४ हजारांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : टेलीफिशिंग अॅटॅकरने आयसीआयसीआय बँकेच्या डेबीट कार्डधारकाला ऑनलाइन ९४ हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार उस्मानपुरा भागात घडला आहे. बँकेतून बोलत असल्याची थाप मारून तरूणीच्या आईकडून या भामट्यांनी सांके‌तिक क्रमांक मिळविला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवैशाली सुतार या तरूणीचे आयसीआयसीआय बँकेत खाते असून तिच्याकडे बँकेचे डेबीट कार्ड आहे. सुतार यांच्या आईच्या मोबाइलवर दोन दिवसापूर्वी अनोळखी क्रमांकावरून (७५४३८६९०११) फोन आला. समोरील व्यक्तीने हिंदी भाषेत बोलत आपण बँकेतून बोलत असल्याची थाप मारली. सुतार यांच्या डेबीट कार्डवरील व्यवहार बारा वाजेपासून बंद करण्यात आला असल्याचे त्याने सांगितले. हा व्यवहार पूर्ववत करण्यासाठी डेबीट कार्डवरील नंबर सांगा, असे त्याने सांगितले. सुतार यांच्या आईने कार्डवरील नंबर त्याला सांगितला. यानंतर काही वेळातच वैशाली सुतार यांच्या खात्यामधून ऑनलाईन ९४ हजार ८२२ रूपये काढून घेण्यात आले. बँकेचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वैशाली सुतार यांचे भाऊ कपील सुतार (वय २२, रा. रामानंद कॉलनी) यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॅगीला शहरात ‘नो प्रॉब्लेम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मॅगी नुडल्सच्या कुठल्याही बॅचच्या पाकिटांची विक्री करण्यास काहीही अडचणी नाही, असे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिंद शहा यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मॅगीचे उत्पादक कंपनी नेस्लेला शुक्रवारी हरिद्वारच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने नोटीस बजाविल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांना विचारले असता ते म्हणाले,'मॅगीच्या २०१३-२०१४च्या ठराविक बॅचच्या पाकीटांमध्ये शिशे आणि काही घातक घटक आढळले होते. या ठराविक बॅचचे उत्पादन केवळ दिल्ली व उत्तर प्रदेश येथेच विकले गेले. या उत्पादनाची जाहिरात माधुरी दीक्षित करत असल्याने केवळ तिला नोटीस दिली गेली आहे. संबंधित बॅचचे उत्पादन आता संपले आहे. बाजारात आलेल्या त्यानंतरच्या बॅचच्या मॅगीमध्ये घातक पदार्थ आढळले नाहीत.'

औरंगाबाद शहरातील दोन दुकानांतील मॅगीचे दोन पॅकिटे अन्न व औषधी प्रशासनाने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. त्यात काहीही आढळले नाही. मॅगीमध्ये शिशे व अन्य घातक पदार्थ आढळल्यामुळे देशभर चर्चा सुरू झाली होती, मात्र ठराविक बॅचच्या उत्पादनांमध्येत शिशे व घातक घटक होते. या पार्श्वभूमीवर हे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील एका शहरात फूड सिक्युरिटी अॅथॉरिटीला मॅगीच्या एका पॅकिटात हे घटक आढळले होते. तसे औरंगाबाद किंवा मुंबईत आढळले नाहीत, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

कंपंनीने मॅगीच्या ठराविक संबंधित बॅचचे सर्व पॅकिटे बाजारातून परत मागविले, परंतु या व्यतिरिक्त इतर बॅचच्या उत्पादनांबाबतही शंका उपस्थित करण्याचे काहीही कारण नाही. मॅगीमध्ये काही अप्रमाणित घटक आढळल्यास किंवा काही शंका आल्यास ग्राहकांनी अन्न व औषधी प्रशासनाशी संपर्क साधवा आम्ही प्रयोगशाळेत याची तपासणी करू व दोष आढळल्यास त्यानंतर विक्रेते व स्टॉकिस्टवर नक्कीच कारवाई होऊ शकते, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीटूकडून भ्रष्ट व्यवस्थेचे दहन

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

केंद्र सरकारला गेल्या वर्षभरात जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांचा विसर पडला असून राज्य सरकारनेही श्रमिक जनतेचे प्रश्न अधिक तीव्र केले आहेत. म्हणून विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने शुक्रवारी (२९ मे) क्रांतिचौकात भ्रष्ट व्यवस्थेचे दहन करण्यात आले.

सीटूच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील औद्योगिक कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार, घरकामगार, माथाडी कामगार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भ्रष्ट व्यवस्थेचे दहन करण्यात आले. देशातील ११ कामगार संघटनांनी कामगार कायद्यातील कामगार विरोधी तरतूदी रद्द करा, कामगारांना किमान वेतन १५ हजार दरमहा निश्चित करा, कोल, रेल्वे, विमा, दूरसंचार, बँक, परिवहन, पाणी इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रोखा, भूमिसंपादन अध्यादेश मागे घ्या यासह इतर मागण्यांसाठी कामगारांच्या साक्षीने देशाच्या एकात्मतेचे संरक्षण आणि श्रमिक वर्गाच्या हितासाठी भ्रष्ट व्यवस्थेचे दहन करण्यात आले. २ सप्टेंबर रोजी सर्व कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी संप होत असून यासाठी सर्व कामगारांनी सज्ज रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हे ‌अभियान यशस्वी करण्यासाठी अॅड. उद्धव भवलकर, दामोदर मानकापे, लक्ष्मन साक्रुडकर, छगन साबळे, दीपक अहिरे, विश्वनाथ शेळके, संजय गौकुंडे, साहेबराव मिरगे, राजेंद्र देवकर, श्रीकांत फोपसे, रमेश जैस्वाल, आवाळे, कमलाबाई इंगळे, उद्धव नागरे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांची टोलमधून सुटका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने राज्यभरातील ६५ टोलनाक्यातून अंशतः टोलमाफी जाहीर केली. औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) तीन तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन टोलनाक्यावर खासगी चारचाकी वाहने, बस यांना सूट मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. औरंगाबाद शहर रस्ते एकात्मिक योजनेंतर्गत (आयआरडीपी) औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चिगाव, जळगाव रस्त्यावरील सावंगी व नागपूर-मुंबई हायवेवरील लासूर या तीन ठिकाणी टोलनाके आहेत. २००४मध्ये सुरू झालेले हे नाके २०२६पर्यंत हे नाके सुरू ठेवून त्यातून जमा झालेला महसूल औरंगाबाद शहरातील रस्ते विकासासाठी करण्याचा प्रस्ताव होता.

लासूर आणि सावंगी टोलनाक्यावर दरमहा १७ लाख रुपये तर, चितेगाव टोलनाक्यावरून २० लाख रुपये महिना महसूल जमा होत होता. यातील ९० टक्के वाहने चारचाकी खासगी होती. आता एक जूनपासून छोट्या खासगी चारचाकी वाहनांना टोलमाफी दिली जाणार असल्याने या नाक्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत औरंगाबाद-जालना रस्त्यावर लाडगाव आणि नागेवाडी या दोन ठिकाणी टोलनाके आहेत. या दोन्ही टोलनाक्यांची मुदत २०२६पर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधीपक्ष नेतेपद MIM कडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेले काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा तिढा अखेर शुक्रवारी (२९ मे) सुटला. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सायंकाळी चारच्या सुमारास एमआयएमचे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन) नगरसेवक खान जहांगीर अब्बास मुल्लानी यांची विरोधीपक्ष नेता म्हणून नियुक्ती केली.

महापालिकेत विरोधीपक्ष नेता काँग्रेसचा की एमआयएमचा अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वर्तुळात सुरू होती. विरोधीपक्ष नेतेपद नेमके कोणत्या पक्षाला द्यायचे, या बद्दल महापौरांनी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले होते. निवडणूक आयोगाने नगरविकास विभागाकडे हे प्रकरण सोपवले. नगरविकास विभागाने महापौरांना पत्र पाठवून तुम्ही तुमच्या स्तरावर निर्णय घ्या असे कळवले. त्यानंतर महापौरांनी वकिलांचा सल्ला घेतला. या सर्व घडामोडींनंतर खान जहांगीर अब्बास मुल्लानी उर्फ अज्जू पहेलवान यांची नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. पत्र मिळाल्यावर एमआयएमच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात जल्लोष केला. एमआयएमच्या गटनेतेपदी नगरसेवक सिद्दिकी नासेर यांची नियुक्ती करण्यात आली. महापौरांनी त्यांनाही नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

गटनेतेपदी राजू वैद्य

महापालिकेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या गटनेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या शनिवारी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजू वैद्य यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी महापौरांना पत्र पाठवून गटनेतेपदी राजू वैद्य यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. त्या आधारे ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेच्या नगरसेवकांसह बहुजन समाज पक्षाचे पाच आणि काही अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणात सरकारी रुग्णालयाच्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण पसरले होते. शिवाजी कसबे असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. कंधार तालुक्यातील दाताळा येथील एका रुग्णाला कसबे यांच्या रिक्षामध्ये गुरू गोविंदसिंग रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. रुग्णालयातून गावाकडे परतताना, कसबे यांची रिक्षा हिंगोली गेट परिसरामध्ये पोलिसांनी अडवली. या वेळी पोलिसांनी रिक्षा अडवून कागपत्रांची मागणी केली. काही कागदपत्रे नसल्यामुळे, पोलिस अधिकाऱ्याने शिव्या देत कसबे यांना मारहाण केल्याचे शिवाजी यांचा मुलगा भय्यासाहेबने म्हटले आहे. पोलिसांच्या मारहाणीनंतर कसबे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कसबे यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्याने एका शिपायाला केली. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत कसबे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पाचशे रुपये मागितले आणि ते न दिल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप भय्यासाहेब याने केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक जमले होते. कसबे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रात्री उशिरा वजिराबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images