Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डॉ. झकेरिया यांना होता विकासाचा ध्यासः पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विशेषतः औरंगाबादच्या विकासप्रश्नांसंदर्भात डॉ. रफिक झकेरिया यांनी कधीही तडजोड केली नाही. मंत्रिमंडळात ते नेहमीच आग्रही भूमिका घेत असत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी औरंगाबादच्या विकासाचा ध्यास कायम ठेवला होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अँड अॅडव्हान्स रिसर्च; तसेच डॉ. रफिक झकेरिया स्मृती ग्रंथालयाचे शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा झकेरिया, विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, डॉ. ए. जी. खान, प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, '१९६३मध्ये झकेरिया यांनी मौलाना आझाद कॉलेजच्या रुपाने शैक्षणिक क्षेत्रात एक छोटेसे रोपटे लावले होते. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. झकेरियांचा शिक्षणाबाबत जो दृष्टिकोन होता, तो हा कँपस पाहताना जागोजागी दिसून येत आहे. या संस्थेच्या नावलौकिक केवळ देशातच नव्हे तर विदेशातही पोहचला आहे. शिक्षणामुळेच परिवर्तन घडू शकते. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. रिसर्च सेंटर आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध झाले आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.'

झकेरिया यांच्यासमवेत काम करण्याच्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, '१९७२मध्ये मंत्रिमंडळात असताना मराठवाड्यातील खास करून औरंगाबादच्या विकास कामांबाबत ते खूपच आग्रही असत. शैक्षणिक, औद्योगिक प्रगतीविषयी ते जागरूक होते. औरंगाबादच्या विकासाला दिशा देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. १९५८मध्ये मी विद्यार्थी असताना एनसीसी कँपच्या निमित्ताने सर्वप्रथम औरंगाबादला आलो होतो. कँपमुळे १५ दिवसांचा मुक्काम होता. त्यावेळचे औरंगाबाद आणि आताचे औरंगाबाद यात जमीन-आसमानाइतका फरक आहे. युथ काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. त्यावेळी झकेरिया यांना औरंगाबादेतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगण्यात आले होते. गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवायची म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. औरंगाबादला विकासाच्या मार्गावर आणण्याकरिता झकेरियांना विजयी करा, असे आवाहन यशवंतराव चव्हाणांनी केले होते आणि त्याला औरंगाबादकरांनी प्रतिसाद दिला. झकेरिया यांनी अखेरच्या श्वासापर्यंत औरंगाबाद शहराच्या विकासाचा ध्यास घेतला होता.'

या प्रसंगी फातेमा झकेरिया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर, शायर बशर नवाज, सुधाकर सोनवणे, विंग कमांडर अनिल सावे, कमाल फारुकी, चंद्रकांत दानवे, अभिजीत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पवारांचे बसून भाषण

राजकारणाच्या फडात सभा शरद पवार यांनी अनेक सभा गाजविल्या आहेत. त्याशिवाय अनेक संस्था, संघटनांच्या कार्यक्रमांतही त्यांची भाषणे गाजली आहेत. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत शरद पवार यांनी प्रथमच बसून भाषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सध्या असलेले सरकार फक्त शहरी लोकांचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण/औरंगाबाद

सध्याचे सरकार उद्योग आणि शहरी भागाकडे अधिक लक्ष देणारे आहे. शेतीमालाला किंमत मिळाली नाही तरी चालेल; पण शहरी लोकांसाठी भाववाढ करायची नाही, हे सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. मराठवाड्यातील दुष्काळी दौऱ्याची सुरवात पवार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एकतुनी व चित्तेपिंपळगावातून केली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सध्या आमच्याकडे खायला अन्न नाही. प्यायला पाणी नाही, हाताला काम नसून सध्या शेतकरी दारिद्रयाचे जीवन जगात आहे. शासनाने किमान खरीप पिक लागवडीसाठी मदत व वीज बिल माफ करून जीवन जगण्यास काही अंशी मदत करण्याचे आवाहन तालुक्यातील एकतूनी येथील शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे केले. आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेवून मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याचे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख सुधाकर सोनावणे, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी साहित्य महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी साहित्याला ८०० वर्षांचा इतिहास आहे. या साहित्याचा मुख्य प्रवाह आपण ठरविला पाहिजे. याचे निकष लक्षात घेतले असता असे लक्षात येईल की, वारकरी साहित्य हे मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, असे प्रतिपादन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी येथे केले.

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे मोरे यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सतीश बडवे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले, कार्यवाह कुंडलिक अतकरे, डॉ. दादा गोरे व्यासपीठावर होते.

मोरे म्हणाले, '' घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात माझी भूमिका मांडताना मी मराठी साहित्याचे निकष ठरविण्याबाबत भाष्य केले होते. लिहणाऱ्या लोकांना आपण सर्वजण एकाच परंपरेतील आहोत याची जाणीव असली पाहिजे, सर्व स्तर, जातीधर्मातील लेखक हवेत हे निकष आपल्याला संत साहित्यात दिसून येतील. त्यामुळे हेच साहित्य मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी मी हभप बहिरट यांचे नाव सुचविले होते, पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ते वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे ७०० वे वर्ष होते. त्याला अनुसरून नाव सुचविले होते. पण ऐनवेळी त्यांचे नाव मागे घ्यावे लागले. संत साहित्याविषयी योग्य भूमिका योग्य वेळी मांडण्याचे मी त्यावेळी ठरविले. २०१५ मध्ये ही संधी चालून आली,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

मोरे यांच्या साहित्यप्रवासावर बडवे यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले,''महाराष्ट्राच्या संत परंपरेचा नेटका आणि संशोधनाच्या अंगाने अभ्यास करणारे जे मोजके लोक आहे. त्यात सदानंद मोरे अग्रणी आहेत. आपल्या अभ्यासनातून त्यांनी नवीन प्रमेये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लिखाणातून त्यांनी समाजशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाशज्योत टाकण्याचे काम मोरेंनी केले आहे. तत्वज्ञान आणि संशोधनाचे निखळ प्रतिबिंब डॉ. मोरे यांनी 'तुकाराम दर्शन' मधून घडविले आहे. खरे तुकोबा सांगण्याचा प्रयत्न मोरेंनी केला. संत साहित्य आणि ग्रामीणता याचे एक नाते असते. हे त्यांनी दाखवून दिले.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले,''जातीच्या अस्मिता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात महाराष्ट्राचे असलेले स्थान दुय्यम होत आहे. अशा परिस्थितीत सर्व घटकांना सामावून घेणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. लोकमान्य ते महात्मा या पुस्तकातून मोरे यांनी इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक नवा अन्वयार्थ लावण्याचे काम डॉ. मोरे यांनी केले. चळवळी पुढे न्यायच्या असतील तर व्यवस्थेतील समर्थ गोष्टी लोकांसमोर आणल्या पाहिजेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PI, जमादाराला लाचप्रकरणात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे पोलिस निरीक्षक श्रीराम चौधरी व जमादार सुदाम चुंगडे यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शनिवारी पकडले. वाळूची वाहतूक करणारी ट्रॅक्टर व ट्रॉली सोडण्याकरीता या दोघांनी लाच मागितल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

शिऊर पोलिस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल झालेला असून, या प्रकरणात तक्रारदार व इतर दोघा जणांचे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. यामध्ये तक्रारदार व अन्य दोन जणांना अटक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास जमादार चुंगडे यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात तिघांचा जामीन लवकर होईल व गुन्ह्यात मदत करण्याकरिता तसेच जप्त केलेले ट्रॅक्टर, ट्रॉलीचा कोर्टात चांगला रिपोर्ट पाठवून देण्याकरिता पोलिस निरीक्षक चौधरी यांनी तक्रारदारांकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. यातील २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिल्यानंतर तिघांचा जामीन झाला. त्यानंतर ट्रॅक्टर व ट्रॉली परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. या आदेशाची प्रत घेऊन तक्रारदार शिऊर पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा पोलिस निरीक्षक चौधरी व जमादार चुंगडे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने शनिवारी दुपारी चार वाजता सापळा रचून लाच स्वीकारल्यानंतर चौधरी व चुंगडे यांना पकडले. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांनी सापळ्याचे नियोजन केले. कैलास कामठे, गणेश पंडुरे, अजय आवले, सचिन शिंदे, संदीप चिंचोले यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसवाहतुकीचा राजकीय ‘बे’रंग

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

लातूर शहरामध्ये पुन्हा एकदा शहर बस वाहतुकीला सुरुवात झाली. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ७०व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला. मात्र, पहिल्या दिवसापासून या वाहतुकीला वाद आणि संशयाच्या स्पीड ब्रेकरमध्ये अडकवून ठेवण्यात आले आहे. सुरुवातील डेमो बसवरून वाद सुरू करण्यात आला आणि त्यानंतर बसच्या रंगावरून राजकारण रंगविण्यात आले. ही सेवा अधिक चांगल्या पद्धतीने कशी राबविता येईल, याकडेच लक्ष देण्याची गरज असताना नको त्या गोष्टींचेच राजकारण होताना दिसत आहे.

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यापेक्षा थोडे वेगळे राजकारण करण्याची आमदार अमित देशमुख यांची हातोटी आहे. शहराच्या ४० वर्षांच्या राजकारणामध्ये लातूरचे नगराध्यक्ष पद मुस्लिमांना मिळाले नव्हते. मात्र, लातूर शहर महापालिकेचे महापौरपद ओबीसींसाठी आरक्षित झाल्यानंतर अमित देशमुख यांनी ते मुस्लिम ओबीसीला देऊन राजकीय धक्का दिला होता. काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे सर्वांनी ते मुकाटपणे मान्य केले आहे. मात्र, त्याचे एक-एक पैलू समोर येऊ लागले आहेत.

गेल्या आठवड्यात शहरात बस वाहतुकीचे उद्घाटन झाले. त्याच दिवशीपासून या बस वाहतुकीला वादाचे आणि संशयाच्या स्पीड ब्रेकरने अडकवून ठेवले. शुभारंभाच्या वेळी आलेल्या दोन बसपैकी एक बस कंपनीने चक्क डेमो बस पाठवली, तसे कागदपत्रही पाठवले. त्याकडे ना अधिकाऱ्यांनी ना पदाधिकाऱ्यांनी गांभीर्यानी पाहिले. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली, ती बस जुन्या आहेत म्हणून. त्यानंतर बस जुनी नाही तर डेमो बस होती, असा खुलासा झाला आणि एक स्पिडब्रेकर या प्रकल्पाने ओलांडले.

त्यानंतर वाद सुरू झाला तो बसरच्या रंगावरून. काँग्रेसचे नेते अॅड. विक्रम हिप्परकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमातच हिरवा रंग समृद्धीचा असल्याचे म्हटले होते. त्यानंतरही या रंगाविषयी वाद वाढतच गेला. या चर्चेचा फायदा शिवसेना, रिपाइं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला. या बसच्या रंगाला कोणी मान्यता दिली, त्या ठरावावर सह्या होण्याअगोदरच त्याची अंमलबजावणी कशी झाली? याची विचारणा करीत या नगरसेवकांनी महापौराच्या रिकाम्या खुर्चीला बांगड्याचा आहेर घालून निषेध नोंदवला. बस वाहतूक कशी असावी, याहीपेक्षा बसच्या रंगात ही सेवा अडकण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

या रंग पुराणाविषयी महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, 'बसचा रंग कोणता असावा? याबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्या समितींनी मान्यता दिल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून रितसर मान्यता घेतली आहे. प्रश्न उरतो तो मोठ्या बस शहराच्या काही भागातून वळवताना अडचणी निर्माण होणार आहेत, त्याचा. त्यामुळे मोठ्या बसची संख्या कमी करून लहान आकाराच्या बसची संख्या वाढवावी लागेल. पुढील आठवड्यात किमान पाच बस तरी या सेवेत येतील आणि प्रवाशांना वाहतूक सेवा सुरळीत देता येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’शी २ हात करणारा अवलिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निधड्या छातीने कर्करोगाला अगदी बेधडकपणे भिडणे कसे असते, यांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सुभाष देशमुख. वयाची पासष्टी ओलांडलेल्या सुभाष देशमुखांची हिम्मत बघितल्यावर कोणत्याही रुग्णाला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हीच त्यांची हिम्मत अनेकांचा आधार ठरला आहे. इच्छाशक्ती असेल आणि बेडर वृत्ती असेल तर कॅन्सरच काय, कुठलाही आजार तुमच्यावर मात करू शकत नाही, असे अनुभवाचे बोल त्यांनी 'मटा'शी शेअर केले.

कोण्या एकेकाळी वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार-कर्मचारी म्हणून काम केले. जिथे जमले तिथे मनसोक्त काम केले आणि जिथे जमले नाही तिथे ते क्षणभरही थांबले नाहीत. कुठेही अन्याय दिसला की तुटून पडायचे आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवायची, असा त्यांचा खाक्या होता. मनमुक्त व जोशात जगण्यात ते बिडी-सिगारेटचे पाकिटच्या पाकिट फस्त करायचे. गुटखा-पान-तंबाखू यांचेही व्यसन होते, मात्र या सगळ्या प्रवासात अचानक त्यांची भेट कॅन्सरशी झाली आणि बघता-बघता त्यांनी कॅन्सरलाच आपला मित्र बनवून टाकले. २०११मध्ये त्यांना जेवताना, घास गिळताना क्षणभर आग व्हायची, त्रास व्हायचा, मात्र देशमुखांनी तब्बल दीड-दोन वर्षे दुर्लक्ष केले. हळुहळु टाळूला चट्टा दिसू लागला आणि एक दिवस त्या चट्ट्यावर बारीकसे छिद्र पडले. मग मात्र देशमुखांनी जवळच्या डॉ. राजेश गुजराथी यांना दाखविले. काही दिवस औषधांनी बरे वाटले, पण पुन्हा त्रास सुरू झाला. डॉ. विजय देशमुख यांना दाखविताच त्यांनी तुकडा काढून तपासणीसाठी दिला. तपासणीचा अहवाल घेण्यास गेलेले सुभाषराव रिपोर्ट बघून काहीसे गंभीर झाले (कदाचित पहिल्यांदाच), कारण तो कॅन्सरचा रिपोर्ट होता आणि ते त्यांच्या लक्षात आले होते.

जन्मलो तेव्हा एकटाच आलो

सुभाषराव डॉ. देशमुखांकडे रिपोर्ट घेऊन गेले आणि दाखवताच डॉक्टर थोडे आवाक झाले. त्यांनी विचारले, 'तुमच्यासोबत कोण आहे,' असे विचारताच, 'अहो मी जन्मलो तेव्हा एकटाच होतो, एकटाच जाणार आहे आणि मला रिपोर्ट काळाला आहे, तुम्ही पुढचे सांगा,' असे म्हणताच डॉक्टरांनीही कॅन्सर हॉस्पिटसमध्ये उपचार घेण्यासाठी पत्र दिले. देशमुखांनी थेट एकट्यानेच कर्करुग्णालयामध्ये जाऊन रेडिएशन-किमोथेरपी घेण्यास सुरुवात केली आणि ३३ रेडिएशन, तीन किमोच्या चेन असे काही महिने उपचार कुणालाही सोबत न घेता घेतले. वजन ४० किलोवर आले, खाता-पिता येत नव्हते, पण हिम्मत कमी झाली नव्हती. तशाही अवस्थेत ते दुसऱ्यांना आधार देत होते. वर्षभराने आता त्यांना थोडे-थोडे खात येऊ लागले, १० किलो वजन वाढले आणि पुन्हा एकदा त्यांची तब्येत ठणठणीत झाली आहे. चालताना ठेच लागतेच, त्याचा विचार न करता काळजी घेत चालत राहाचे, हीच मनोवृत्ती कॅन्सरवर मात करू शकते, असे ते म्हणतात. आता त्यांनी सगळी व्यसने सोडली आहेत. शिवाय कुणीही करू नयेत, असेही ते आवर्जून म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत डॉक्टरांची चौघांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शनिवारी पहाटे २२ दिवसांच्या बालकाचा मृत्यू झाला. यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या जालन्यातील दाम्पत्यासह मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांना ३० ते ३५ डॉक्टरांनी खोलीत डांबून बेदम मारहाण केली. मारहाणीत शेख रौनक (३०) व त्याची पत्नी सुमैय्या (२५) हे जागीच बेशुद्ध पडले होते. विशेष म्हणजे ही मारहाण घाटीचे अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांच्यासमोर सुरू होती. शनिवारी दुपारी डॉ. जेवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, हे प्रकरण घाटी प्रशासनाने आपसात मिटवून घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

जूना जालना तट्टूपुरा येथील सुमैय्या हिला २५ दिवसांपूर्वी घाटीतील प्रसूती विभागात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिची प्रसुती केली होती. यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या वेळी बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे शेख दाम्पत्याने बाळाला जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नऊ दिवसांपूर्वी शेख दाम्पत्याने बाळाला पुन्हा घाटीत दाखल केले. शुक्रवारी रात्री बाळाची प्रकृती खालावल्याने सुमैय्या यांनी वॉर्ड क्र. २४ मधील एका परिचारिकेला याबाबत कळवले. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष करत सुमैय्याला दमदाटी करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, बाळाची हालचाल बंद पडली आणि त्याचा मृत्यू झाला. सकाळी सहाच्या सुमारास तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

शेखचा संताप अनावर

बाळ मृत पावल्यानंतर शेखचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे त्यांनी या वॉडार्तील डॉ. रमेश यांना जाब विचारला. यावेळी डॉक्टर उद्धटपणे बोलल्यामुळे शेख आणखीनच संतापले. यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने शेखने डॉ. रमेश यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे डॉ. रमेश यांनी देखील शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुरैय्याच्या पोटात वॉडार्तील परिचारिकांनी लाथा मारल्या. तसेच यादरम्यान, डॉ. रमेश यांनी निवासी डॉक्टरांसह अन्य ३० ते ३५ जणांना वॉर्डात बोलावून घेतले. यानंतर डॉक्टरांनी शेख दांपत्यासह शेजारील रुग्णाची नातेवाईक निलोफर (१६) आणि शेखचा मेव्हणा जावेद खान युसूफ खान याला बेदम मारहाण केली.

खोलीत डांबले

डॉक्टरांनी मारहाण करण्यासाठी सुरैय्या, रौनक आणि जावेद खान या तिघांना सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या खोलीत डांबले. यानंतर तिघांना डॉक्टरांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुरैय्या आणि रौनक बेशुद्ध पडले. सुरैय्याच्या फुटलेल्या बांगड्या तिच्या हातात शिरल्या होत्या. त्यामुळे तिच्या हाताला जबर जखम झाली आहे.

फौजफाटा दाखल

मारहाणीत जखमी झालेला शेखचा मेव्हणा जावेद खान याने बेगमपुरा पोलिस ठाणे गाठत डॉक्टरांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यामुळे बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक परोपकारी यांनी तात्काळ फौजफाट्यासह घाटीत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्ट्रायकिंग फोर्स मागविण्यात आला. तसेच या ठिकाणी सुमारे ४० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी डॉक्टरांची चूक असल्याने त्यांनी हे प्रकरण आपसात मिटवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाचा निधी दुष्काळाला द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'राज्यातील ऊस उत्पादक अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने ऊस उत्पादकांकडून वसूल केलेला ऊस विकास निधीचा वापर दुष्काळी भागातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करावा,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बीड जिल्ह्यातील माजलगाव, बीड आणि पाटोदा या तालुक्यांतील दुष्काळी भागांना; तसेच बीड पालिकेला त्यांनी भेट दिली. बीड तालुक्यातील डेकनमोहा, पाली येथील तालुका दूध संघ यथे तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांचे न मिळालेले अनुदान, दुधाचे घटलेले दर, जनावरांचा चारा आणि पाणी संकट, शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील आत्महत्या, कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकाचे पडलेले भाव, दुष्काळी अनुदान मिळण्यास येणाऱ्या अडचणी, भूसंपादन कायदा याविषयीचे प्रश्न शरद पवार यांच्यासमोर मांडले. त्यानंतर पवार यांनी बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरणाला भेट दिली. हे धरण कोरडे पडल्याने पाण्याचे संकट या ठिकाणी उभे राहिले आहे.

बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडला आहे. राज्यातील अनेक भागात ऊसाला १५०० रुपये भाव मिळाला आहे. सरकार ऊस उत्पादकांकडून 'ऊस विकास निधी' नावाखाली प्रतिटन शेतकऱ्यांकडून वसुली करते. साधारणपणे ३००० कोटी रुपयांच्या जवळपास ही रक्कम आहे. हा निधी दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खर्च करावा.'

एकनाथ आवाड यांच्या कुटुंबीयांची भेट

बीड जिल्ह्यातील मानवी हक्क मोहिमेचे संस्थापक आणि दिवंगत दलित नेते एकनाथ आवाड यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या वेळी आवाड यांच्या पत्नी, मुलगा, मुली, खासदार रामदास आठवले उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे एकनाथ आवाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना पवार म्हणाले, 'आवाड त्यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला असून ते आता आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. एलएलबी केले; पण अंगात कोट घालून वकिली करण्यापेक्षा आयुष्यभर गोरगरीब लोकांसाठी आवाड यांनी वकिली केली. आवाड यांनी ज्या जिद्दीने काम केले त्याच पद्धतीने ते काम सुरू ठेवण्यासाठी आवाड यांच्या कुटुंबीयांसोबत राहू. उपेक्षित समाजातील स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे आवाड यांचे कार्य खूप मोठे होते. त्यांच्या कार्याला पुढे नेणे, त्यांनी सुरू केलेल्या परिवर्तनवादी चळवळीत सहभागी होणे, तिला मदत करणे आणि बळ देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.'

बळजबरी भूसंपादनाला विरोध

भूसंपादन कायद्यातील बळजबरीने जमीन घेण्याच्या कलमास आमचा विरोध राहील. ऊसाच्या भावाचा, ऊसतोडणी मजुरांचे प्रश्न, मागण्या न सोडवल्यास पुढील हंगामात राज्यातील अर्धे कारखाने सुरू होणार नाहीत, असे भाकीत पवारांनी केले. फळबागांना विशेष मदत, पीक विमा, वीजबिल माफी, खरिपासाठी मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

आत्महत्या करू नका

विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. केंद्र सरकार मात्र महाराष्ट्रात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे खोटे बोलत आहे. एकट्या बीड जिल्ह्यात ५ महिन्यात १०८ आणि मराठवाड्यात १५०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात हा आकडा वाढला आहे. शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या

बीडसह मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यातील पन्नास पैशांपेक्षा पैसेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली. दुष्काळी प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन जून रोजी मराठवाड्यातील नेत्यांसह भेटून जनतेला मदत करण्याची मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीन दिवसांच्या दुष्काळ पाहणीची भीषणता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे शरद पवार यांनी बीड येथे सांगितले. दुष्काळाच्या प्रश्नावर आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागेल, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली. या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोड वस्त्रोद्योग संस्थेच्या १६५२ जणांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड येथील वस्त्रोद्योग सहकारी संस्थेच्या मतदार यादीतील १६५२ सदस्यांचे सदस्यत्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. सिद्धेश्वर सुत गिरणी या नावाने २५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे नाव आता वस्त्रोउद्योग संस्था, असे करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी डी.डी. जैस्वाल यांनी या सस्थेच्या मतदार यादीची पडताळणी केली. यादीची पडताळणी करताना १६५२ सभासदांची फक्त प्रवेश फी भरण्यात आल्याचे लक्षात आले. या सभासदांच्या नावे शेअर्स न भरता फक्त सभासद केल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आले होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन श्रीरंग साळवे, तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर आदींनी या यादीवर आक्षेप घेतला होता. याप्रकरणी सहकार अधिकारी जैस्वाल यांनी सखोल चौकशी व पडताळणी केली. त्यावेळी २५ वर्षांपूर्वी १६५२ सभासदांची केवळ प्रवेश फी घेण्यात आली होती. त्यांच्या नावे शेअर्स करण्यात आले नव्हते ही तफावत लक्षात आल्याने जैस्वाल यांनी त्या सभासदांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१ कोटी ८० लाखांचा निधी चुकांमुळे परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तलाठ्यांच्या क्षुल्लक चुका व बँकांच्या ताठर भूमिकेमुळे तालुक्यातील जवळपास पन्नास हजार शेतकरी शासनाच्या दुष्काळ निधीपासून अजूनही वंचित आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतापर्यंत एक कोटी ८० लाख रुपयांचे धनादेश परत गेले आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ निधीसाठी तालुक्यातील जवळपास ८५ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. या मदतीचे फेब्रुवारी महिन्यापासून वाटप सुरू आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना निधी मिळाला. याबद्दल चौकशी केली असता, शासनातर्फे शेतकऱ्यांची यादी, चेक जमा झाल्यानंतर संबंधित बँक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करते. मात्र, प्राप्त यादीत एखादे नाव, बँक खाते क्रमांकात चूक आढळल्यास ते धनादेश परत पाठवले जातात, अशी माहिती मिळाली. महसूल विभागाकडे चौकशी केली असता, १५०० ते २००० शेतकऱ्यांचा यादीत एखाद्या शेतकऱ्याचे नाव,खाते क्रमांक चुकणे स्वाभाविक आहे, अशी सारवासारव करण्यात आली.

नाव किंवा बँक खाते चुकलेल्या शेतकऱ्याची मदत थांबविणे अपेक्षित असताना बँका मदत निधीचा धनादेश परत पाठवीत आहेत, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसल्याची माहिती पैठणचे तलाठी क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान, नाव व खाते क्रमांकातील दुरुस्तीसाठी शेतकरी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वीज वाहिनीची मागणी

$
0
0

सिल्लोडः पाच गावाची पाणी पुरवठा योजना असणाऱ्या अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पापर्यंत एक्स्प्रेस वीज वाहिनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवन्याचे ग्रामपंचायत सदस्य गजानन राऊत व मधुकर काळे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे केली आहे. या प्रकल्पावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणासह जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या पाच गावांच्या योजना कार्यरत आहेत. शिवना, मादणी, अजिंठा, आमसरी, नाटवी ही पाच गावे असून त्यापैकी अजिंठा व शिवना ही गावे लोकसंख्येने तालुक्यात सर्वात मोठी आहेत. प्रकल्पातून पाणी पुरवठा करणाऱ्या ४० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीसाठी उच्च दाबाचा वीज पुरवठा मिळत नाही.

त्यामुळे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या गावांना पाच किंवा आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. सध्या प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेसाठी शिवना फिडरवरून होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. महावितरणच्या अजिंठा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून पाणीपुरवठा योजनेला एक्स्प्रेस वाहिनीने जोडल्यास पुरवठा सुरळीत होईल. यासाठीचा खर्च करण्यास संबंधित ग्रामपंचायती तयार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनेनंतर भुयारी गटार योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

नगरपालिकेने तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगरपालिका प्रशासन संचालनालयाने नाकारला आहे. या योजनेतील त्रुटी दूर करून तो पुन्हा नव्याने सादर करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजना १ जून १९९८ रोजी हस्तांतरित करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील येसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्प हा आहे. मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नवीन वितरण नलिका टाकणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत नगरपालिकेने शासनाला पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला होता. शहरात सध्या वापरात असलेली पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्थेतील सर्व जलवाहिन्या बदलणे आवश्यक आहे. सक्षम वितरण व्यवस्थेअभावी बऱ्याच वेळा गळती होते. परंतु, हा प्रस्ताव नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक अनिल मुळे यांनी १२ मे २०१५ रोजी पत्र पाठवून नाकारला आहे. या प्रस्ताव त्रुटी दूर करून नव्याने पाठविण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या योजनेतील त्रुटी दूर करून नवीन योजना तयार करण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. नवीन योजनेत उपलब्ध पाणी, वीज यांचे ऑडिट असणार आहे.

प्रस्ताव नव्याने पाठवणार

नगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेसोबत शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भुयारी गटार योजनेचा सुमारे ४० कोटी ९४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु, नगरपालिका प्रशासन संचालनालयाने आधी पाणीपुरवठा योजना पूर्ण करा, नंतर भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचे नगरपालिकेला सूचित केले आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठा योजनेचा १८ कोटी २४ लाख रुपयांचा नवीन प्रस्ताव पाठविला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या श्रेयाबद्दलचे पोस्टर फाडल्याने तणाव

$
0
0

म. टा, प्रतिनिधी, पैठण

आपेगाव,हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा वाद वाढतच आहे. पाणी सोडावे यासाठी पाठपुरवठा करणारे जयाजीराव सूर्यवंशी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील मायगावच्या गावकऱ्यांनी लावलेले डिजिटल फलक अज्ञात व्यक्तींनी शनिवारी फाडून टाकले. यामुळे या परिसरात काही काळ तणाव पसरला होता.

राज्य शासनाने गोदावरी पात्रावरील पैठण, शेवगाव व गेवराई या तीन तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २३ मे रोजी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले. हे पाणी आमच्याच पाठपुराव्यामुळे सोडल्याचा दावा पैठणचे आमदार संदीपान भुमरे व शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला आहे.

दरम्यान, जयाजीराव सूर्यवंशी यांचे आभार व्यक्त करणारे डिजिटल फलक मायगाव येथील गावकऱ्यांनी मायगाव फाट्यावर लावले होते. हे फलक अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकल्याचे शनिवारी सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मायगावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर तणाव निवळला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

वादाची शक्यता

बंधाऱ्यात पाणी सोडावे यासाठी प्रयत्न केले म्हणून जयाजीराव सूर्यवंशी यांचा येत्या आठवड्यात तालुक्यातील वडवाळी व अन्य काही गावात सत्कार आयोजित केला आहे. मायगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमामध्ये दोन गटात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपासाठी हजार कोटी

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हयासाठी २०१५-२०१६ या वर्षासाठी १५६८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १०९७ रुपये खरीप हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय शेतीपूरक व्यवसायांसाठीही कर्ज वितरित करण्यात येणार आहे.

औरंगाबाद ‌‌जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून महाराष्ट्र बँकेने उद्दिष्ट ठरवले आहे. शेती व पीक कर्जासाठी सुमारे १५६८.७६ कोटींचे कर्ज वितरित करण्यात येणार आहेत. पीक कर्जासाठी खरिपाचा हंगाम महत्वाचा मानला जातो. खरीप हंगामासाठी सुमारे १०९७ कोटी रूपये पीककर्ज म्हणून वितरित करण्यात येणार आहे. जोडधंदा आणि इतर बाबींसाठी १२४० रूपये कर्ज वितरित होणार आहे. सुमारे तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आणि गारपिटीचा सामना करताना शेतकरी आणि शेती जोडधंदा करणारे ग्रामीण व शहरी व्यावसायिकांना हा दिलासा आहे. सर्वसाधारणपणे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ही कर्ज वितरित करण्यातील वाढ आहे. बँकेच्या जिल्ह्यात ८० हून अधिक शाखा आहेत. या शाखार्तंगत सेवा सहकारी संस्थाना यापूर्वी कर्ज वाटप करण्यात आलेेले आहे. गेल्या दोन वर्षांत महाबँकेने मध्यम मुदतीचे कर्ज, थेट कर्ज, बिगर शेती कर्ज, सेवा सहकारी संस्था यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ३५२५ कोटींचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते उद्दिष्ट १०८ टक्के पूर्ण करण्यात आले. सुमारे ३८४० कोटींचे कर्ज वाटप झाले होते. पीक कर्जासाठी सुमारे १०२५ कोटी कर्ज वितरित करण्यात आले. इतर जोड धंदे व व्यावसायिक कारणांसाठी सुमारे १४५० कोटींपर्यंत कर्ज वितरित करण्यात आले. या कर्ज वितरित करण्यामागे खरीप हंगाम चांगला जावा, जोडधंद्यांसाठी खेळते भांडवल असावे हा हेतू होता. जिल्ह्यात १०९ टक्के प्रमाणात कर्ज वितरित करताना एनपीए कमीतकमी राहील व कर्ज वसुली अधिक होईल याकडे लक्ष देण्यात आले.

अर्थसहाय्याची गरज कोठे?

भारत सरकारच्या कृषी धोरणात कृषी उत्पादन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करण्याचे ठरवण्यात आले आहे. बँका शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मुदत कर्जे व उत्पादनासाठी अल्प मुदत कर्जे देतात. आपल्या कामाचा विस्तार करण्यासाठीच नव्हे, तर छोट्या व मध्यम घटकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी, ओसाड आणि निरुपयोगी जमीन शेतीखाली आणण्याला प्रवृत्त करण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची आवश्यकता आहे.

कर्ज वितरित करताना यंदा शेतीसाठी १५८६ कोटींचे उद्दिष्ट आहे. जोडधंद्याकरिता सुमारे हजार कोटींहून अधिक निधी उपलब्ध आहे. हे लक्ष्य २०१५-२०१६ या वर्षासाठी आहे.

- अनंत घाटे, व्यवस्थापक, महाबँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चे मिशन मराठवाडा विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पश्चिम महाराष्ट्रानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठवाड्यात विस्तार सुरू केला आहे. प्रत्येक आंदोलनाचे पूर्वनियोजन करून गावागावात शाखा उघडण्याच्या सूचना जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. येत्या वर्षभराच्या कामाचे 'ऑडिट' करून केवळ मिरवत असलेल्या जिल्हाध्यक्षांना डच्चू दिला जाणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्याचे संकेतही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ऊस आणि दुधाच्या आंदोलनातून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रबळ पक्ष ठरला आहे. कापूस आणि सोयाबीन दराचे प्रश्न तीव्र असूनही मराठवाड्यात आंदोलन उभे राहत नाही. या पार्श्वभूमीवर 'स्वाभिमानी'ने मराठवाड्यात विस्ताराला सुरूवात केली आहे. औरंगाबाद शहरात नुकत‌ाच विभागीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पक्ष विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच पणन विभागाचे माजी संचालक सुभाष माने यांनी पक्षात प्रवेश केला आहे. माने यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी केला जाणार आहे. येत्या वर्षभरात प्रत्येक जिल्हाध्यक्षाने गावोगाव पक्षाच्या शाखा उघडून नवीन सदस्य नोंदणी करावी, अशा सूचना कार्याध्यक्ष अॅड. सतीश बोरुळकर यांनी केल्या. 'प्रत्येक कार्यक्रमाला खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना बोलावण्यात येते. प्रमुख नेत्यांसोबत फोटो झळकण्यातच जिल्हाध्यक्ष आनंद मानतात. कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवले जात नाही. त्यामुळे पक्षविस्तार होत नसल्याचे बोरुळकर म्हणाले. आता प्रत्येक जिल्हाध्यक्षाला सदस्यसंख्या आणि शाखा वाढवण्याचे 'टार्गेट' दिले आहे. वर्षभरानंतर कामाचे 'ऑडिट' सुभाष माने करणार आहेत. त्यानंतरच संबंधित जिल्हाध्यक्षाच्या पदाबाबत विचार केला जाणार आहे.

उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हाध्यक्षाला 'स्वाभिमानी कार्यकर्ता पुरस्कार' मिळणार आहे. नेत्यांच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. प्रत्येक आंदोलनाचे पूर्वनियोजन न करता ऐनवेळी आंदोलन करतात. या प्रकारामुळे पक्षाची शक्ती वाया जाते, असे निरीक्षण पदाधिकाऱ्यांनी नोंदवले. मराठवाडा आणि विदर्भातील कार्यकर्त्यांसाठी वेरूळ (ता. खुलताबाद) येथे जून महिन्यात मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

जिल्ह्याचा इ-मेल अकाउंट

प्रत्येक जिल्ह्याच्या संपर्कासाठी स्वतंत्र 'इ-मेल' अकाउंट उघडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना करुन देण्यासाठी ही सुविधा असेल. प्रत्येक कार्यकर्त्यात समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र पदाधिकारी नेमले जाणार आहेत.

निवडणुकीचे संकेत

मराठवाड्यात पक्षविस्तार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देऊन राजकीय वजन वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. शेतीचे अनेक प्रश्न घेऊन पक्ष ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिटमिट्यात ४ दुकानांत चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा प‌रिसरातील देवगिरी व्हॅली हाउसिंग सोसायटीमध्ये चोरट्यानी चार दुकानांची शटर उचकटवून वीस हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही चोरी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झाली. एका दुकानाचे शटर तुटले नसल्याने ते बचावले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरांनी सुरुवातीला दिनकर जगदाळे यांचे सदगुरू कृपा प्रोव्हिजन फोडले. या दुकानाच्या गल्ल्यातील साडेपाच हजार रुपये पळवण्यात आले. त्यानंतर योगेश बडजाते यांचे चिंतामणी सुपर शॉपीचे शटर तोडण्यात आले. यामध्ये गल्ल्यातील ३,४५० रुपये काढून घेऊन चोरांनी गल्ला दुकानाबाहेर फेकून दिला. यानंतर चोरट्यानी सनी पितळे यांचे जय आनंद मेडिकल फोडून ७,८५० रुपये चोरले. तसेच त्यांच्या शेजारी असलेले संकेत जाधव यांचे संकेत गिफ्ट कॉर्नर फोडून २,३०० रुपये पळवण्यात आले. या चोरीमध्ये चोरट्यांनी एकूण १९,६५० रुपये तसेच एक मंगळसूत्र व जोडवे, असा ऐवज पळवला. चोरट्यानी सर्वात शेवटी कीर्ती प्रोव्हिजन दुकान फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानाला सेंटर लॉक असल्याचे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. छावणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांत खळबळ

चोरट्यानी एकाच रात्री चार दुकाने फोडून छावणी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेमुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिकठाण फाट्याजवळ अपघातात तरूण ठार

$
0
0

वाळूज : जिकठाणहून वाळूजकडे मोटरसायकलवर येताना जिकठाण फाट्याजवळील २० नंबर खोलीजवळ झालेल्या अपघातात एका मोटरसायकलस्वाराचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१मे) पहाटे दोनच्या सुमारास घडली. धनंजय रामचद्र रोकडे (वय ३१, रा.जिकठाण ता.गंगापूर), असे मयत तरुणाचे नाव आहे.

रोकडे मोटरसायकलवरून (एम.एम. २०, ए एन ७०६१) वाळूजकडे येत होते. जिकठाण फाट्यावरून औरंगाबाद-नगर महामार्गवरील २० नंबर खोलीजवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाइटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने ताबा सुटून मोटरसायकलची रस्त्याच्या डिव्हायडरला जोरदार धडक बसली. त्यात धनंजय हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिनीव्दारे तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत वाळूज पोलिस ठाण्यात आक्समात मृत्युंची नोंद करण्यात आली.

एकाची आत्महत्या

वाळूजः वडगाव कोल्हाटी येथील बाळासाहेब दत्ताराव मगर (वय ४२) यांनी आमहत्या केल्याची घटना रविवारी (३१ मे) उघडकीस आली. ते रात्री घरात नेहमीप्रमाणे झोपले होते. सकाळी मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरबसअभावी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा, पडेगाव भागातील नागरिकांना शहरबसअभावी खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरबस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन वारंवार देऊनही एस. टी. महामंडळातर्फे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मिटमिटा व पडेगाव भागाचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. या परिसरात अलिकडच्या काळात मोठे गृहप्रकल्प झाल्याने लोकसंख्येत मोठी भर पडली आहे. परंतु, नागरी सुविधांअभावी या भागाचा विकास झालेला नाही. अनेक गैरसोयीला तोंड देत येथे राहत असलेल्या नागरिकांना किमान शहरबसची सुविधा मिळावी, अशी मागणी आहे. या भागातील नागरिक, विद्यार्थी व महिलांना विविध कामांसाठी सतत शहरात यावे लागते. शिवाय वाळूजमधील कामगारही येथे राहतात. त्यांना सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने खासगी प्रवासी वाहतुकीवर जीव धोक्यात घालून मोठा खर्च करावा लागतो. सातत्याने मागणी करूनही शहरबस सुरू होत नसल्याने एस. टी. महामंडळाविरुद्ध येथील नागरिकांमध्ये असंतोष आहे. एस. टी. महामंडळातर्फे १ जून रोजी प्रवाशांना आकर्षित केले जाते. जास्तीत जास्त प्रवाशांनी महामंडळाच्या बसने प्रवास करावा, यासाठी प्रयत्न केले जातात. पण मागणी असतानाही मिटमिटा, पडेगाव या भागात शहरबस सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. येथील नागरिकांनी एस. टी. महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, वाहतूक अधिकारी व शहर बस वाहतूक विभागास निवेदन देऊन मिटमिटा ते चिकलठाणा शहरबस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात महादेव थत्ते, नगरसेवक रावसाहेब आमले, नगरसेवक सुभाष शेजूळ, शिवाजी गायकवाड यांचा समावेश होता.

मागणीकडे कायम दुर्लक्ष

शहरबस सुरू करण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते महादेव थत्ते सातत्याने पाठपुरावा करतात. मिटमिटा ते औरंगपुरा शहरबस सुरू करण्याच्या मागणीसाठी ३ डिसेंबर २०१०, १० जानेवारी २०११, २७ ऑगस्ट २०११ व ५ सप्टेंबर २०११ रोजी येथील नागरिकांनी एस. टी. महामंडळास निवेदन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली. एवढ्या पाठपुराव्यानंतर २८ ऑगस्ट २०११ रोजी मिटमिटा ते औरंगपुरा बस सुरू करण्यात आली. परंतु, हा मार्ग तोट्यात असल्याचे कारण पुढे करून ती बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्वायत्तेच्या नावाखाली सुरू असलेली संशोधनाची प्रक्रिया योग्य नाही. त्यामुळे कॉलेजवर कारवाई करा,' अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषद सदस्यांनी केली.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेची शनिवारी (३० मे) बैठक झाली. यात कॉलेज संलग्नीकरण, अभ्यासक्रम अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चेचा मुद्दा राहिला तो शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचा. कॉलेजमध्ये स्वायत्ततेच्या नावाखाली संशोधनाची प्रक्रिया चालते. विद्यापीठाव्यक्तीरिक्त अशा प्रकारची प्रक्रिया इतर संस्थांमध्ये चालविता येत नसल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. अशा प्रकारे चा‌लविण्यात येणारी प्रक्रिया बेकायदा असून, ती थांबवा असे सदस्यांनी सांगितले. याबाबत चौकशी केली जाईल असे सांगत प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जयप्रकाश नारायण अध्यापक कॉलेजच्या प्राचार्यांचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. संलग्नीकरण समित्यांनी सादर केलेला ऑनलाइन रिर्पोट स्वीकारण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीला बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. विलास खंदारे, डॉ. भारत हंडीबाग, डॉ. कल्याण लघाने, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. गणेश शेटकर, डॉ. प्रदीप दुबे, डॉ. मगदूम फारुकी, डॉ. एम. एस. बारी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ प्रशासनाचे वरातीमागून घोडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी संसदेची आठवण झाली आहे. परीक्षेनंतर विद्यार्थी घरी गेले आहेत. अन् विद्यापीठ प्रशासनाने मात्र उद्या विभाग विद्यार्थी परिषद व विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद‍्घाटनाचा मुहूर्त शोधला आहे. याबद्दल विद्यार्थी संघटनांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

विद्यापीठाच्या २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद व विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक ऑगस्ट-सप्टेंबर २०१४ दरम्यान झाली. यानंतर परीक्षा संपल्यानंतर आता जून २०१५ मध्ये संसदेच्या उद‍्घाटनाचा मुहूर्त विद्यापीठ प्रशासनाला गवसला आहे. नवे शैक्षणिक वर्ष ८ जूनपासून सुरू होत आहे.

पदवी, पदव्युत्तर परीक्षा संपली, आठ दिवसावर नवे शैक्षणिक वर्ष आले अन् विद्यार्थी नव्या शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना प्रशासनाचा हा खटाटोप कशासाठी, हे कोडे उलगडलेले नाही. तसेच उद‍्घाटन कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना काय लाभ, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. निवडणूक विलंबाने होते. यामुळे संसदेवर अध्यक्ष, सचिव म्हणून निवडून आलेल्यांना काम करण्याची फारशी संधी मिळत नाही, याबाबतही ओरड होते.

सरत्या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचिव माधुरी मिरकर, पदव्युत्तर विभाग सचिव नामदेव कचरे हे आहेत. विद्यापीठाच्या कारभाराबद्दल त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.

परंपरा कायम

कुठलीही परीक्षा असो, युवक महोत्सवाचे आयोजन असो की विद्यार्थी संसदेचे उद‍्घाटन. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विलंबाची परंपरा कायम ठेवली आहे. परीक्षेचे निकाल हमखास उशिरा लागतात. विद्यार्थी संसदेच्या उदघाटनातही मागील वर्षी अशा प्रकारे विलंब झाला होता. तेव्हा पुढील वर्षी असा प्रकार होणार नाही, असा शब्द प्रशासनाने दिला. विलंबामुळे संसदेवर निवडून आलेल्या पद‌ाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करण्याची फारशी संधी मिळत नाही. विद्यार्थ्यांमधून नेतृत्त्व घडावे, यासाठी विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेतल्या जातात. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे विद्यार्थी संसदेचा मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि कार्यक्रमाचे नियोजन योग्य करावे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.

शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर उद‍्घाटन हे अयोग्य आहे. विद्यापीठ प्रशासनाला याची जाणीव असायला हवी.

- राहुल तायडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

प्रशासनाचा विलंबाचा हा पहिला प्रकार नाही. सलग दुसरे वर्ष आहे. यंदा तर परीक्षा संपल्यानंतर, विद्यार्थी गावी गेल्यानंतर हा कार्यक्रम आखला आहे. हा प्रकारच अयोग्य आहे.

- सुनील राठोड, राज्य सहसचिव, एसएफआय

विद्यार्थ्यांच्या हिताकडे विद्यापीठ किती दुर्लक्ष करते, हे संसद उद‍्घाटनाच्या निवडलेल्या वेळापत्रकावरून दिसते. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अशा प्रकारे उद्घाटन करणारे राज्यातील हे एकमेव विद्यापीठ असेल.

वैभव मिटकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images