Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तक्रारदाराविरूद्धच गुन्हा दाखल

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीला छावणी पोलिसांनी अटक न करता फिर्यादीवरच गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला कोठडीत डांबण्याची धमकी देत बळजबरी पाच हजार रूपये घेतल्याचा आरोप करीत विजय खुडे या तरुणाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार करीत दाद मागितली आहे.

भावसिंगपुरा येथील खुडे यांनी ८ जानेवारी आणि २ मार्च रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची भिती व्यक्त करत निवेदन सादर केले होते. त्याचप्रमाणे ११ मे रोजी छावणी पोलिस ठाण्यात आशा मोरे, विनोद जाधव, शुभम शेजवळ, मनिषा शेजवळ अशा चौघांविरुद्ध तक्रार दिली होती. यावेळी छावणी पोलिसांनी अदखलपात्र (एन.सी.) गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांची हिंमत वाढली. त्यांनी १३ मे रोजी खुडे यांच्या घरात शिरून त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर खुडे यांनी आपल्या जिवितास धोका असल्याचे सांगत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी पोलिसांना वारंवार विनंती केली. मात्र, निरीक्षक गौतम फसले यांनी उलट खुडेलाच दमदाटी करत पिटाळून लावले. तसेच आपल्याला कोठडीत डांबण्याची धमकी देत निरीक्षक फसले व उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी बळजबरी पाच हजार रुपये घेतल्याचे त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले.

कारमधून पंचवीस हजार लंपास

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमधून पंचवीस हजार रूपये पळविल्याप्रकरणी एका संशयित आरोपीविरूद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजता अर्चना अपार्टमेंट येथे हा प्रकार घडला. संजय कौल रा. अर्चना अपार्टमेंट, उस्मानपुरा यांनी शुक्रवारी रात्री त्यांची कार अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी केली होती. कारच्या मागच्या सीटवर कॅरीबॅगमध्ये त्यांचे पंचवीस हजार रूपये ठेवलेले होते. दहा ते पंधरा मिनिटानंतर त्यांना पार्कींगमधून आरडाओरड झाल्याचा आवाज आला. त्यांनी खाली जाऊन बघितले. यावेळी त्यांच्या अपार्टमेंटमधीलच प्रशांत अमृतकर याने त्यांच्या कारच्या पुढची व मागची काच फोडून पैसे‌ पळवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावणेदहा लाख रुपयांचा दंड वसूल

$
0
0

औरंगाबाद : ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात नेमण्यात आलेल्या दोन विशेष पथकांनी पंधरा दिवसात विविध कारवाया केल्या. यामध्ये जुगार, अवैध वाळू तस्करी, अवैध वाहतूक आदी कारवायामध्ये पावणेदहा लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात गेल्या काही दिवसात अवैध वाहतूक, जुगार, अवैध दारू विक्री आदीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने दोन विशेष पथकांची निर्मिती या कारवायासाठी करण्यात आली. १६ मे ते ३० मे पर्यंत या पथकांनी जिल्ह्यात सर्वत्र कारवायांची मोहीम राबवली. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार ३५९ केसेस करण्यात आल्या असून २ लाख ४८ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या ८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १ लाख ६४ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ९५ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून १ लाख ७७ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ९ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये १ लाख ९६ हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीबहाद्दर विद्यार्थी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील एका डॉक्टराला पोलिस मित्र असल्याचे सांगत सोन्याचे दागिने तसेच एक लाख रुपयाची खंडणी उकळण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी घडला. परिचित तरूणीसोबतची क्लीप ‌सोशल मिडियात टाकण्याची तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी दोन तरूणांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील सूतगिरणी भागातील डॉक्टरासोबत हा प्रकार घडला. बुधवारी दर्गा रोडवरील चौबे हॉस्पिटलजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास हे डॉक्टर ऑटोरिक्षाची वाट पाहत उभे होते. यावेळी त्यांच्या परिचयाची एक तरुणी स्कूटीवर तेथून जात होती. डॉक्टरांना पाहून या तरुणीने त्यांना स्कूटीवर घरी सोडण्याची तयारी दर्शवली. सीग्मा हॉस्पिटलजवळून जात असताना या तरुणीची स्कूटी बंद पडली. डॉक्टर व तरुणी स्कूटीची पाहणी करीत असताना अचानक तीन तरूण तिथे आले. यापैकी एकाने आपले नाव विक्की राठोड तर दुसऱ्याने विशाल बनसोडे सांगीतले. आपण पोलिस मित्र असून सोबत पोलिस जीप असल्याची धमकी त्यांनी दिली. अंधारात तुम्ही अयोग्य कृत्य करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी पोलिस केस करण्याची धमकी दिली. तसेच डॉक्टराच्या अंगावरील पाच तोळ्यांची सोन्याची चेन व तीन तोळ्याची अंगठी विक्की राठोड यांनी बळजबरीने काढून घेतली. तसेच या दोघांचे अंधारात मोबाइलमध्ये फोटो काढून घेतले. यानंतर ही क्लीप मिडियात टाकण्याची धमकी देत त्यांनी दुसऱ्या दिवशी तीन लाख रूपये आणून देण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या तरुणीला स्कूटीसह जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या समोर नेण्यात आले. यानंतर पुन्हा डॉक्टरांना तिच्या मोबाइलवरून धमक्या देण्यात आल्या.

गुरूवारी सायंकाळी पुन्हा डॉक्टरांना विक्की राठोड याचा फोन आला. त्याना व्हिडियो क्लीपची धमकी देत सूतगिरणी समोरील वाईनशॉपसमोर तीन लाख रूपये घेऊन बोलावण्यात आले. या ठिकाणी एक जीप दूर उभी क‌रून पुन्हा या डॉक्टरांकडून एक लाखाची खंडणी विक्की राठोड व सहकाऱ्यांनी उकळली. अखेर या प्रकरणी डॉक्टरांनी शनिवारी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून आरोपींविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या कल्पकतेने विद्यार्थी आरोपी ताब्यात

पोलिसांनी त्यांना मिळालेल्या मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरू केला. गेवराई जि. बीड येथील हा क्रमांक निघाला. पोलिसांनी कल्पकतेने तेथील महाविद्यालयात बीएसस्सीचे‌ शिक्षण घेणारा आरोपी आनंद त्र्यंबक शिंदे (वय २६ रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत औरंगाबादला असलेला सहकारी विशाल भाऊसाहेब बनसोडे (वय २२ रा. दर्गा रोड) याचा यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले. विशाल हा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी विशालाला देखील ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरिक्षक सलीम शेख, पीएसआय शेख शकील, ज्ञानेश्वर ठाकूर, जालींदर मांटे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील सहा टोलवर सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मराठवाड्यातील सहा टोलनाक्यांवर सोमवारपासून खासगी चारचाकी वाहने आणि एसटी बसला सूट मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात दहा एप्रिल रोजी निर्णय घेतला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पैकी ११ तर एमएसआरडीसीच्या ५३ पैकी एक असे एकूण १२ टोलनाके ३१ मेच्या मध्यरात्रीपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित पीडब्ल्यूडीचे २७ व एमएसआरडीसीचे २६ अशा ५३ टोलनाक्यावर कार, जीप व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. बंद करण्यात आलेल्या टोलनाक्यांमधून मराठवाड्यातील एकही नाही. मात्र, सूट मिळणाऱ्या पथकर नाक्यात सहा ठिकाणचा समावेश आहे. त्यात लासूर स्टेशन, सावंगी, चितेगाव, लाडगाव, नागेवाडी, पिंपरी फाटा (जि. जालना) आणि बरबडा (जि. नांदेड) आदी पथकर नाक्यांचा समावेश आहे.

पुणे प्रवास सुसह्य

औरंगाबादहून पुण्याला खासगी वाहनाने जाणे अधिक खर्चिक झाले होते. २५० किलोमीटरच्या प्रवासात सहा टोलनाके होते. येता-जाता ३०० रुपये द्यावे लागत होते. आता एक जूनपासून या टोलनाक्यांवरून खासगी वाहनांना पूर्णपणे सूट मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्यांचे जगणे आजपासून महागले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासीयांचे जगणे उद्यापासून महागणार आहे. सेवाकराचे दीड टक्क्यांनी वाढलेले दर, १ जूनपासून लागू होत आहेत. त्यामुळे १२.३६ टक्क्यांचा सेवाकर आता १४ टक्के द्यावा लागेल.या वाढीमुळे हॉटेलातील जेवण, चित्रपटाचे तिकीट, रेल्वे, विमान प्रवासासह सर्वच सेवा महागणार आहेत. औरंगाबादेत पूर्वी हे दर किती होते, आता किती याचा हा आढावा.

रेल्वेचे एसी भाडे

रेल्वेची एसी, प्रथम श्रेणीची तिकिटांवर सध्या ३.७० टक्के सेवाकर आहे. तो वाढून ४.२ टक्के होईल. म्हणजे १००० रुपयांच्या तिकिटावर १० रुपये वाढ होईल. औरंगाबादहून अजमेरला जाण्यासाठी एसीसाठी १,४९० रुपये व ५३ रुपये सेवाकर लावला जायचा. तो आता १,४९० व सेवाकर ६५ ते ७० रुपये होईल. औरंगाबादहून तिरुपतीला जाण्यासाठी एसीगाडीच्या तिकिटाला १,३३५ रूपये व ४८ रुपये सेवाकर असायचा. तो आता १,३३५ रुपये तिकिटदर व ६३ ते ६५ रुपये सेवाकर भरावा लागेल.

विमा हप्ता वाढला

विम्याच्या हफ्त्यासाठी ०.५० टक्के जास्तीची रक्कम मोजावी लागेल. एलआयसीच्या पहिल्या वर्षीच्या हफ्त्यावर ३ टक्के, दुसऱ्या वर्षीच्या हफ्त्यावर १.५ टक्के सेवाकर होता. आता पहिल्या वर्षीच्या हफ्त्यावर ३.५ टक्केआणि दुसऱ्या वर्षी १.७५ टक्के कर द्यावा लागेल. याचा अर्थ एक हजार रुपये विमा हफ्ता असल्यास, पूर्वी १ हजार ३० रुपये भरावे लागायचे. आता १ हजार ३५ रुपये दुसऱ्या वर्षी एक हजार १५ रुपये ते १ हजार १७ ते १८ रुपये भरावे लागतील.

हॉटेलमधील जेवण

हॉटेलमध्ये जेवणावर ९.८ टक्के सेवाकर लागेल. आधी जर व्हॅट आणि हॉटेलच्या सेवा अधिभारासह तुमचे एकूण बिल १,००० रुपये झाले तर १,०४९ रुपये मोजावे लागत होते. आता १,००० रुपयांच्या बिलावर १०९८ रुपये मोजावे लागतील.

मोबाइलवर बोलणे, इंटरनेट

फोन-मोबाइलच्या बिलांवर आधी १२.३६ टक्के सेवाकर होता. समजा एका माणसाचे बिल १,००० रुपये असेल तर १,१२४ रुपये द्यावे लागत होते. आता १४ टक्के करामुळे १,१४० रुपये द्यावे लागतील. हेच मोबाइल इंटरनेटचे बिल समजा १,००० रुपये येत असेल, तर १,१२४ रुपये द्यावे लागत होते. ते आता ११४० पर्यंत द्यावे लागेल.

करमणूक

तिकिटांचे भाव वाढणार असल्यामुळे चित्रपट पाहणे महाग होईल. सिनेमा पाहण्यासाठी समजा एका तिकिटासाठी सर्व करांसह २०० रुपये मोजावे लागत असतील, तर उद्यापासून २०४ रुपये होऊ शकतात. मात्र, अजून आमच्याकडे काही सूचना आल्या नाहीत, असे सत्यम थिएटरच्या मॅनेजरने स्पष्ट केले.

ब्युटीपार्लर, सलून

ब्यूटी पार्लर-सलूनमध्ये मसाज, फेशियल, स्पा सर्वकाही महाग होईल. ही सेवा सुमारे १२ टक्क्यांनी महागणार आहे. समजा औरंगाबादमध्ये आधी ५०० रुपये मसाजसाठी लागत असतील, तर आता ५६० रुपये लागतील. इतर सुविधांवर जे चार्ज असतील, त्यात सुमारे १२ टक्के वाढ होईल.

समजा महिन्याभरात विविध सेवा घेताना आपण १० हजार रुपये खर्च करत असू, तर यापुढे त्याच सेवा सुमारे १० हजार २०० रुपये देऊन दर महिन्याला विकत घ्याव्या लागतील. यात बँकिंगसह विविध सेवा चार्जेस वेगवेगळे असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.- अजय शहा, अध्यक्ष, व्यापारी संघ.

सेवा कर वाढल्याने नक्कीच खिशाला चाट बसेल. शिवाय महिन्याचे बजेटही कोलमडणार. याचा परिणाम वार्षिक गुंतवणुकीवर आणि एकंदरीतच सेवेवर होणार कुठल्या सु‌विधा घ्यायच्या आणि कुठल्या नाहीत याचा आता काटेकोरपणे विचार करावा लागेल.

- विनायक कुलकर्णी, ग्राहक-सर्वसामान्य नागरिक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे विभाजन कुलगुरूंना अमान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अखंड रहायला हवे, उस्मानाबाद उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा देण्यास आपला विरोध असून विभाजन मान्य नागी, अशी स्पष्ट भूमिका कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कुलगुरूंच्या या भ‌ूमिकेवरून अधिकार मंडळे व प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद उपक्रेंद्राला विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा निर्णय दूर असला तरी प्रशासन आणि अधिकार मंडळात प्रस्तावावरूनच जुंपण्याची शक्यता आहे. उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा मिळावा याचा प्रस्ताव मॅनेजमेंट, अधिसभेने मान्य केला, यानंतर तसा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया होत असताना, कोणतीही प्रक्रिया करणार नसल्याचे कुलगुरूंनी रविवारी (३१ मे) स्पष्ट केले. विद्यापीठाला नामांतराच्या लढ्याचा मोठा इतिहास आहे. विद्यापीठ अखंड रहावे, विभाजनात विद्यापीठाची प्रगती नसून प्रस्तावाबाबत घाई करण्याचे कारण नाही. ही आपली ठाम भूमिका असून कुलगुरू म्हणून विभाजनाला प्राधान्य देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उस्मानाबाद उपकेंद्राला या आर्थिक वर्षात नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला आहे. यासह पुढेही रिक्त जागा, प्रशासनातील सुधारणा यावर भर असेल, असे ते म्हणाले.

प्रस्ताव तयार

राज्याला प्रस्ताव पाठविण्यासाठी विद्यापीठाने कमिटी स्थापन केलेली आहे. अधिसभेची याला मंजूरी मिळाली. कमिटीत डॉ. अशोक मोहेकर यांच्यासह नितीन बागल, डॉ. देवानंद शिंदे, संभाजी भोसले, अप्पा हुंबे, संजय निंबाळकर यांच्यासह निमंत्रीत म्हणून डॉ. राम माने यांचा समावेश आहे. कमिटीने प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या रेसिडेन्ट, परिचारकांचा संप मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) शनिवारी (३० मे) झालेल्या रुग्ण-निवासी डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर निवासी डॉक्टर एक दिवसाच्या संपावर गेले होते, तर त्याच दिवशी सायंकाळी घाटीतील एका परिचारकाला (ब्रदर) मारहाण व परिचारिकेला (सिस्टर) शिविगाळ झाल्यानंतर सगळे परिचारक व परिचारिकाही संपावर गेले होते. निवासी डॉक्टरांसह परिचारक-परिचारिकांनी संप मागे घेतला असून, रविवारपासून (३१ मे) सुरळीत रुग्णसेवा सुरू झाली आहे.

घाटीमध्ये शनिवारी हा प्रकार झाल्यानंतर सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या संदर्भात निवासी डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ. ऋषिकेश चेवले म्हणाले, आधी नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण झाली होती, त्यामुळेच हा प्रकार घडला. या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही एक दिवसाचा संप केला आणि रविवारी सकाळपासून सर्व निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले आहेत. अपघात विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, 'मेस्को'चे सुरक्षारक्षक बदलावेत, अपघात विभागामध्ये २४ तास चार सुरक्षारक्षक कायम असावेत, रुग्णासोबत एकच नातेवाईक असावा, अपघात विभागात केवळ एका नातेवाईकाला प्रवेश द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर सात दिवसांत निर्णय घेण्यात यावा अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

परिचारकावरील हल्ल्यांचा निषेध

घाटीमध्ये शनिवारी झालेल्या नातेवाईक-निवासी डॉक्टर हल्ला प्रकरणानंतर त्याच दिवशी सायंकाळी कामावरून घरी परतताना एका ब्रदरला एका टोळक्याने विनाकारण मारहाण केली, तर एका सिस्टरला शिविगाळ केल्याचा आरोप परिचारिकांच्या संघटनेने केला आहे. या प्रकाराचा निषेध करीत सर्व परिचारक व परिचारिकांनी मध्यरात्रीपर्यंत संप पुकारला होता. अशा प्रकारचे हल्ले अलीकडे वाढले असून, ब्रदरला मारहाण करणाऱ्या दोषींना मंगळवारपर्यंत अटक झाली नाही तर आम्ही संपावर जाणार आहोत, असा इशारा शासकीय परिचारिका संघटनेच्या वतीने शहर सचिव इंदूमती थोरात यांनी दिला आहे.

घाटीतील निवासी डॉक्टर व परिचारिकांनी संप मागे घेतला असून, रविवारी सकाळपासूनच रुग्णसेवा सुरळीत झाली आहे.

- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार केंद्रांचा अपंगांसाठी विचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'अपंगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणाचा वापर केला जात नाही, हे दु:खदायक आहे. या आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध योजनांवरील निधीच्या खर्चासाठी समिती स्थापन करणार आहे. तसेच, अपंग तरुणांना सहकार्य करण्यासाठी आधार केंद्र निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे,' असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या 'संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रा'च्या नव्या इमारतीचे भूमिपूजन बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य डॉ. अशोकराव कुकडे होते. या वेळी अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या संघ परिवारातील 'सक्षम' संघटनेचे सहसंघटनमंत्री डॉ. सुकुमारजी, जनकल्याण समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र सातोळकर, संघाचे सेवाकार्य विभागाचे अखिल भारतीय प्रमुख सुहासराव हिरेमठ, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर आदी उपस्थित होते.

बडोले म्हणाले, 'आमचे सरकार आले असले, तरी शासनामध्ये काही असंवेदनशील कर्मचारी आहेत. पण, आम्ही सामाजिक न्याय विभागाचा कायापालट करून दाखवू. सरकार अपंगांना फक्त १८ वर्षांपर्यंत मदत करते. त्यानंतर अपंगांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा आधार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा कार्य विभागाचे अखिल भारतीय प्रमुख सुहास हिरेमठ म्हणाले, 'संवेदना आणि कृतज्ञता हे दोन मोठे सद्गुण आहेत. अरुणा शानभाग यांची ४३ वर्षे सेवा करून परिचारीकांनी जगापुढे निस्वार्थसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. अपंग मुलांच्या विकासासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी प्रकल्पासाठी जागा दिल्याबद्दल त्यांचा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. या समारंभात 'संवेदना केंद्रा'तर्फे नॅशनल ट्रस्टच्या वतीने अपंगांना देण्यात येणारे 'निरामय कार्ड'चे वाटप अनाथ मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पांडुरंग मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४० शोध निबंधांवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्वायत्ततेच्या नावाखाली सुरू असलेली संशोधनाची प्रकिया अयोग्य असल्याचा ठपका ठेवत, थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत कॉलेजमधून संशोधन पूर्ण केलेल्या ४० संशोधकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संशोधनावरही टांगती तलवार आहे.

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला २००६ मध्ये स्वायत्ता मिळाली. त्यावेळी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासह संशोधनाची प्रक्रिया करण्याची मुभा देण्यात आली. यात संशोधनाची प्रक्रिया निकषात बसत नसल्याने ती रद्द करण्यात आली. दोन वेळा प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतरही प्रक्रिया थांबली नाही. शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या विद्या परिषदेत हा मुद्दा गाजला. अखेर कॉलेजमधील संशोधनाची प्रक्रिया थांबविण्यासह चौकशीसाठी कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निकषात बसत नसताना, कॉलेजने चाळीस संशोधकांना अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील संशोधनातील सर्वोच्च पदवी दिली. तसेच विविध मार्गदर्शकांकडे सध्या ९० संशोधक संशोधन करत आहेत. संशोधन पूर्ण झालेल्यांची पदवी मान्य करायची की नाही, नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न विद्यापीठासमोर उभा आहे.

विद्यापीठाकडून परवानगी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कॉलेजला स्वायत्ता देताना पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा घेण्यासह संशोधन प्रक्रियाही राबविण्याची मुभा दिली. विद्यापीठाने दिलेली ही परवानगी २०१७-१८ पर्यंत असल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. संशोधनाची प्रक्रिया राबविताना कॉलेजने आरआरसी, बीयूटीआरसारख्या उच्च कमिट्यांची स्थापना केली नाही. त्यामुळे संशोधनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

कॉलेजपातळीवर अशा प्रकारे संशोधनाची प्रक्रिया राबविता येत नाही. पूर्वी दिलेली मान्यता ही चुकीची आहे. त्यामुळे आम्ही कॉलेजमधील ही प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू.

आम्हाला विद्यापीठानेच मान्यता दिलेली असून युजीसीचीही मान्यता आहे. संशोधनाची प्रक्रिया राबविताना आम्ही गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत.

- डॉ. पी. एस. अडवानी, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑम्लेट विक्रेत्यांनी रस्ते बळकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावर ऑम्लेट विक्रेत्यांनी थाटलेल्या गाड्यांमुळे शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. गाड्यांवर येणारे ग्राहक रस्त्यावर गाड्या पार्क करतात. अनेक ठिकाणी मद्यपींची शिवीगाळ, थयथयाट सुरू असतो.

क्रांतिचौक, रेल्वेस्टेशन, सिडको बसस्टँड, आंबेडकर चौक भागात ही परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य शहरवासीय वेठीस धरला जात आहे. विशेषतः दारूंच्या दुकानांपुढील ऑम्लेटचे गाडे मद्यपींचा अड्डा झाले आहेत. या ठिकाणी सर्रास उघड्यावर दारू पिणे, खाणे सुरू असते. यामुळे शहरातील सामान्यजण त्रासला आहे. वाहतूक कोंडीसोबत महिला सुरक्षेचा प्रश्नही यामुळे गंभीर झाला आहे.

टवाळखोरांचे फावते

औरंगपुरा परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकात ऑम्लेट विक्रेत्यांच्या गाड्या नेहमी लावण्यात येतात. सिटी बसस्टॉपला खेटून या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांसमोरूनच प्रवाशी रिक्षांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे अनेकदा बस, रिक्षांची वाट पहात असलेल्या महिलांना टवाळखोरांच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते. नेमकी अशीच परिस्थिती रेल्वे स्टेशन परिसराबाहेरही दिसून येते. स्टेशनमध्ये प्रवेश करताना पहिल्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे ऑम्लेटच्या हातगाड्या थाटलेल्या आहेत. समोर असलेल्या वाइन शॉपमधून मद्यपी मद्य विकत घेऊन, या गाड्यांवर गर्दी करतात. हमरस्त्यावर हा गोंधळ सुरू असतो. बाहेरगावी जाणाऱ्या तसेच येणाऱ्या प्रवाशांना हे चित्र नेहमीचे झाले आहे.

आंबेडकर चौकात मद्यपींचा त्रास

टी.व्ही.सेंटर चौकाच्या पुढे असलेल्या आंबेडकर चौकात ऑम्लेट विक्रेत्यांनी हातगाड्यांसह ठाण मांडले आहे. येथे एक वाइन शॉप आहे. या दुकानाच्या बाजूस सर्व्हिस रोडवरच हातगाड्यांचे बस्तान आहे. येथे खाण्यासोबत पिण्याची सोय आहे. त्यामुळे मद्यपींची येथे नेहमी गर्दी असते. येथून जाणाऱ्या वाहनधारकांना या गर्दीचा त्रास होतो. अनेकदा महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही येथे घडतात.

अभय कोणाचे ?

क्रांतिचौक परिसरातील झाशीची राणी उद्यानाजवळील चायनीज सेंटर रात्रीसाठी प्रसिध्द आहे. रात्री उशिरापर्यंत हे सेंटर सुरू असते. ग्राहकांची येथे नेहमीच मोठी गर्दी होते. क्रांतिचौक, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे रात्रपाळीचे पथक देखील येथे हजेरी लावते. मात्र, या सेंटरवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. अंडा ऑम्लेट विक्रीच्या गाड्या रस्त्यावर लावलेल्या असतात. त्यांचा वाहतुकीला त्रास होतो. मात्र, त्यांना कोणी विरोध करत नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीवार्दाने हे फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत.

क्रांतिचौक गुदमरला

क्रांतिचौक ते नूतन कॉलनी रोडवर मुस्लिम धर्मियांचे कब्रस्तान व मशीद आहे. सायंकाळी सातनंतर कब्रस्तानच्या सरंक्षक भिंतीला लागून जवळपास दहा-बारा अंडा ऑम्लेटचे गाडे, बिर्याणीच्या हातगाड्या येथे लागतात. या फेरीवाल्यांकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या मोठी आहे. ही मंडळी त्यांची वाहने हातगाड्यासमोरच रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे नूतन कॉलनीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. हातगाड्यासमोरील पार्किंग केलेल्या वाहनांतून प्रवाशांना कसाबसा रस्ता शोधत प्रवास करावा लागतो. या भागात अनेकदा तीव्र वाहतूक कोंडी होते.

पालिका, वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक रस्ते ऑम्लेट विक्रेत्यांनी बळकावले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. महिलांची छेडछाड होण्याचे प्रकार होतात. मात्र, महापालिका प्रशासन किंवा वाहतूक शाखा यांच्याकडून हे अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही.

औरंगाबाद शहर वाहतूक कोंडीमुक्त असावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणचे अतिक्रमण आम्ही काढले आहेत. ट्रॅव्हल्स, अॅपेरिक्षा, जड वाहने यांना शिस्त लावली आहे. आगामी काळातही वाहतूक सुरळीत ठेवण्यावर जास्त भर असेल यात शंकाच नाही. रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यामुळे वाहतुकीत अडथळा होत असेल, तर त्यांना सूचना देण्यात येतील. त्यांच्यामुळे खरेच जनतेला त्रास होत असेल, वाहतुकीत कोंडी होत असेल तर त्यांना तशी समज देऊ. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन नाही केले तर त्यांच्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू. शहातील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर, वाहतूक कोंडी टाळण्यांवर आणि रस्त्यावरील असे अतिक्रमण काढण्यात आम्ही आवश्य लक्ष घालू. स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि वाहतूक कोंडीमुक्त शहर हाच आमचा संकल्प असेल.

- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज १५२, पात्र शिक्षक केवळ १५

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अक्षरशः बाजार मांडला गेला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची संख्या तब्बल १५२ असून यामध्ये पात्र प्राध्यापकांची संख्या केवळ १५ एवढी आहेत. विद्यार्थी अन् प्राध्यापकांचे समिकरण कोणत्याच नियमात बसत नसले, तरी अशा कॉलेजांना अभय मिळतो आहे.

उच्च शिक्षणाची गुणवत्ता अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कॉलेजांमध्ये पात्र शिक्षकांची वाणवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा संलग्नीकरण कॉलेजांमधील स्थिती तर अतिशय चिंताजनक आहे. विशेषतः पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे कॉलेज पात्र शिक्षकाविना सुरू आहेत. यात सायन्ससह व्यवसायिक अभ्यासक्रमांची संख्याही मोठी आहे. विद्यापीठातंर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कॉलेजांची संख्या तब्बल १५२ आहे. एमए, एमएस्सी, एमकॉमसह एमई, एमटेकच्या विविध विषयांचे येथे धडे दिले जातात. नियमानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विषयासाठी सहा पूर्णवेळ शिक्षकांची आवश्यकता असते. परंतु अशा कॉलेजामध्ये पूर्णवेळ पात्र शिक्षक केवळ १५ एवढे आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्नही उभा आहे.

चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम राबविणार

विद्यापीठ २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम राबविणार आहे. संलग्न पदव्युत्तर कॉलेजांमध्ये पूर्णवेळ पात्र शिक्षकच नसल्याने चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीमच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पदव्युत्तर कॉलेजात पात्र शिक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षक नसतील तर या कॉलेजमधील प्रवेश रोखले जातील.

- डॉ.के.व्ही. काळे, बीसीयूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या २५० जागा धोक्यात

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

राज्यातील दहा सरकारी मेडिकल कॉलेजांना दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ५०० वाढीव जागांना मंजुरी दिली. कुठल्याही मागणीविना दिलेल्या या जागा राखण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची प्राथमिक अट टाकण्यात आली. मात्र, दुर्दैवाने यासंदर्भात राज्य सरकारने कुठलीही हालचाल न केल्याने यंदा २५० जागा धोक्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने २०१३ मध्ये देशभरातील ४० सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वाढीव ५० म्हणजेच २,००० जागा प्रथम वर्ष एमबीबीएससाठी वाढविल्या. एरव्ही जागा वाढविण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे (एमसीआय) पथक संबंधित कॉलेजमध्ये तपासून जागा वाढविण्याचा अहवाल देते, पण त्याला अपवाद ठरवून जागा वाढविण्यात आल्या. ज्या मेडिकल कॉलेजात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी ५० किंवा १०० जागांची प्रवेशक्षमता आहे, अशाच कॉलेजांना निवडण्यात आले. महाराष्ट्रातून सोलापूर, नांदेड, लातूर, अकोला, मिरज, आयजीएमसी नागपूर, कोल्हापूर, यवतमाळ, धुळे आणि अंबाजोगाई येथील कॉलेजात ५०० जागा वाढल्या. यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देऊनही एकाही कॉलेजने प्रस्ताव तयार केला नव्हता. महाराष्ट्र टाइम्सने २०१३ मध्ये हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध करून बाबूगिरी आणि सरकारचा ढिसाळपणा उघड केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वृत्ताची दखल घेऊन यंत्रणा हलविली आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राला ५०० वाढीव जागा मिळाल्या होत्या. प्रवेशासाठी मंजुरी देताना 'एमसीआय'ने पायाभूत सुविधांची अट टाकली होती. वाढीव जागांनुसार कॉलेजमध्ये इमारत, प्रयोगशाळा तसेच अन्य सुविधा वर्षभरात निर्माण करणे बंधनकारक होते. या अटीची पूर्तता राज्यातील एकाही कॉलेजने केली नव्हती. परिणामी २०१४ च्या प्रवेशासाठी सर्व कॉलेजचे प्रस्ताव थांबविण्यात आले होते. त्यावेळीही अतिरिक्त मुख्य सचिव दिल्लीला पोहचले आणि एमसीआयसमोर वाढीव जागांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दुसऱ्या वर्षी ५०० जागांवर आलेले गंडांतर टळले. होते. गेल्यावर्षी वैद्यकीय शिक्षण खाते तसेच राज्य सरकारने या दहा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. परिणामी, ३ मे रोजी दिल्लीत एमसीआयच्या झालेल्या बैठकीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या वाढीव ५० जागा रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, असे मुंबईतील सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सुनावणीसाठी हजेरी गरजेची

थेट जागा रद्द करण्याऐवजी सरकारला मुदत देण्याच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली. पुढील दोन आठवड्यात राज्य सरकारने एमसीआय, केंद्रासमोर हमीपत्र तसेच सुनावणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. असे न झाल्यास पाच मेडिकल कॉलेजमधील २५० जागा रद्द होऊ शकतात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेडिकलची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

या कॉलेजमधील जागा धोक्यात

एमसीआयच्या बैठकीत धुळे, लातूर, सोलापूर, अकोला आणि कोल्हापूर या पाच महाविद्यालयातील वाढीव ५० जागा यंदाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. धुळे येथील इमारत बांधून तयार आहे, पण ती केवळ लालफितीच्या कारभारात हस्तांतरणासाठी अडकल्याने ही नामुष्की ओढावली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इसापूर धरणातील पाणी पैनगंगेत सोडा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील नदी काठावरील शेकडो गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात आल्याने तातडीने इसापूर धरणातील पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेऊन केली आहे.

सन २०१४-१५ च्या गतवर्षीच्या खरीप हंगामात अल्प पर्जन्यमानांमुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे जलस्त्रोत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कमी झाले होते. परिणामी पाणी टंचाईच्या झळा हदगाव तालुक्यातील १४५ गावाबरोबर पैनगंगा नदीकाठावरील हदगाव तालुक्यात येणारे शिऊर, इसापूर, वकी, मनुला (बु.), पांगरी, साप्ती, तळणी, महाताळा, पेवा, करोडी, काळेश्वर वाकोडा, कोथळा, गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, हरडफ, धोतरा, वाटेगाव, बेलमंडळ, गोजेगाव तसेच हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी, सिरंजणी, सिरपल्ली, पळसपूर, डोल्हारी, सिल्लोडा, घारापूर, कामारी, दिघी, धानोरा, मंगरूळ, बोरगडी, बोरगडी तांडा, एकम्बा, कोठा वाडी, विरसनी, पिंपरी, धोत्रा, वाघी, टेंभूर्णी या गावातील पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाण्याअभावी गुरे-ढोरे दगावत आहेत. हा प्रकार रोखून पाणीटंचाई सोडविण्यासाठी तातडीने इसापूर धरणातील पाणी पैनगंगा नदीत सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्याच बरोबर हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आहे.

आगामी महिन्याभरात लोकअदालत घेतली जाणार आहे. यामध्ये तालुक्यातील महसूल, आरोग्य, सिंचन आदीसह शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मुलभुत गरजा यावर चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व विभागातील खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित राहतील. या बैठकीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी आमदार आष्टीकर व त्याच्या शिष्ट मंडळास चर्चेतून सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कदम, विवेक देशमुख, शिवाजी देशमुख, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील-आष्टीकर, अजय सूर्यवंशी आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखांचा ऐवज पळविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

लोहा तालुक्यातील मुरबी येथील एका मेंढपाळ व्यावसायीकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख १ लाख ५ हजार रुपये, सोन्याच्या ४ अंगठ्या असा एकूण १ लाख ४९ हजाराचा ऐवज चोरून नेला. रविवारी ही घटना घडली. राजु अमृता याचने यांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. मेंढरे चारण्यासाठी ते परगावी गेले हेाते. तर त्यांची पत्नी आई आणि बहिण विवाह समारंभासाठी घराला कडीकोंडा लावून हाडोळीला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, किनवट येथील भगतसिंग नगरात संजु धोतरे व इतर दोघांनी महमद लायक यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रोख १५ हजार रुपये, मोबाइल, २ तोळे सोन्याचे गंठन असा ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद राष्ट्रवादीमध्ये नाराजी

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, उस्मानाबाद

आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील पक्षसंघटना बांधणीची मोहीम गांभीर्याने राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या स्वागताचा उत्साह व जोर जिल्ह्यात फारसा दिसून आला नाही. या नियुक्तीने पक्षांतर्गत धुसफूस चालू असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये 'थोडी खुशी.. थोडा गम' असेच वातावरण आहे. प्रदेशाध्यक्षाने जिल्हाध्यक्षपदी आमदार पाटील यांची केलेली नियुक्ती डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नातलगासह कुटुंबाबाहेरील मंडळींना फारशी आवडली नसल्याचीच चर्चा आहे.

या पूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे मेहुणे तथा एसटी महामंडळाचे चेअरमन जीवन गोरे, भाच्चे अमोल पाटील-पाटोदेकर, नातलग सुरेश बिराजदार तसेच निकटवर्तीय विश्वासु सहकारी सुरेश देशमुख यांनी जबाबादारी स्वीकारली. मात्र, यंदा राष्ट्रवादीने अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी एकत्रीकरणावर अधिक भर देत जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपूत्र असलेल्या आमदार राणा पाटील यांच्याकडे सोपविली.

पक्ष बळकटीकरणाच्या मुद्दयावर प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदारीची पदे सोपविली आहेत. यापूर्वी जिल्हाध्यक्षपद हे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाकडे नव्हते तर ते त्यांच्या निकटवर्तीय नातलगाकडे होते. त्यावेळी ही जिल्हाध्यक्ष पदावरील मंडळी ही नामधारी अशीच होती, सत्तेच्या सर्व चाव्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतर सत्तेची सूत्रे राणा पाटील यांचेकडेच होती. आता जिल्ह्यातील पक्ष कारभाराच्या चाव्या व सुत्रे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाकडे सोपविल्यामुळे जिल्ह्यातील या पक्षावर केवळ डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबियांचे एकतर्फी वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जिल्ह्यात हुकुमशाहीचा धोका वाढण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशा भावनेने पदाधिकारी व कार्यकर्ते मौन बाळगून आहेत.

आता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतेमंडळींचा डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नातलगावर किंवा कुटुंबा बाहेरील मंडळींवर विश्वासच राहीला नसल्याची चर्चा जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रेमी मंडळीकडून केली जात आहे. पक्षातील फेररचनेमुळे आता राजकीय व आर्थिक सत्ता एकत्रितपणे एकवटल्याचे स्पष्टपणे चर्चिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. ह्यापैकी एक डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपूत्र राजा जगजितसिंह पाटील हे आहेत. तर आमदार राहुल मोटे हे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे भाच्चे आहेत.

आगामी काळात पक्ष पातळीवरील जिल्हा पातळीवरील मानाची पदे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबियांना दिल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. पक्षाला बळकटी आणण्यासाठी एकहाती सत्ता असावी यावरच काँग्रेस विचारसरणीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय खेळीवरून स्पष्टपणे दिसते.

विश्वासच राहिला नाही

आता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतेमंडळींचा डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नातलगावर किंवा कुटुंबा बाहेरील मंडळींवर विश्वासच राहिला नसल्याची चर्चा जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रेमी मंडळीकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दांडी बहाद्दर अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे नागरिक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

हिमायतनगर​ तहसील ​ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत दांडी मारत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हिमायतनगरच्या तहसिल कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी कामावर न येण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विविध कामासाठी तहसील कार्यालयात तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी वेळेवर भेटतच नाहीत. त्यामुळे संबंधीत लाभार्थ्यांनात्यांची वाट पहात बसावे लागत आहे. सोमवारी ( १ जून ) सकाळी ११.३० वाजले तरी दोन नायब तहसीलदार व २ कारकून वगळता अनेक जन कार्यालयात अनुपस्थित होते. या अनुपस्थित असलेल्यांची तक्रार तालुक्याचे आ.नागेश पाटील-आष्टीकर यांच्याकडे उपस्थित नागरिकांनी केली. त्यावरून नायब तहसीलदार देवराय यांनी दांडी बहाद्दर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पंचनामा करून वरिष्ठाकडे अहवाल पाठविला आहे. अधिकारी - कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित होऊन ते जनतेसाठी कार्यालयात हजर रहावेत यासाठी बायोमॅट्रीक यंत्रणा बसविण्यात आली आहे. परंतु, ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.

दांडी बहाद्दर कर्मचाऱ्याबाबतची माहिती काही नागरिकांनी दिली. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यास पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तातडीने जे अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांना केली आहे.

- नागेश पाटील-आष्टेकर आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारशी संघर्षाचा पवार यांचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यातील पाच जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यासोबतच शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. त्यासोबतच आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी चर्चा करणार आहे. त्यानंतर ही प्रश्न सुटला नाही तर सर्वांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला.

शरद पवार यांनी उस्मानाबादवरुन लातूर विमानतळावर जाण्याच्या मार्गावरील औसा तालुक्यातील उजनी गावी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याची सांगता केली. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा जगजितसिंह, आमदार विक्रम काळे, माजी खासदार डॉ. जर्नादन वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर यांची उपस्थिती होती.

यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शरद पवार यांनी पीक पाणी, बि-बियाणे, जनावारांचा चारा, या विषयावर १० ते १२ मिनिट चर्चा केली. सरकराने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे असे मत व्यक्त करुन ते म्हणाले, 'यंदा फळबागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी शासनाने मोठी मदत करण्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाच जिल्हे प्रामुख्याने दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा शिवाय पाणीटंचाईचा चक्रव्युहात सापडले आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सद्यस्थितीत दुष्काळाचा मुकाबला करणे आवाक्याबाहेरचे असून शेतकऱ्यांसाठी जण आभाळच फाटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मदतीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याकामी सकारात्मक भूमिका घ्यावी. विनाविलंब मदतीचा हात द्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ पाहाणी दौऱ्याप्रसंगी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. उस्मानाबादसह मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना व औरंगाबाद या पाच जिल्हयात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यातील पन्नास पैशांपेक्षा पैसेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली. दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २ जून रोजी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीसह भेटून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघातील काही भागांना भेटी देवून दुष्काळाची पाहणी केली. कन्हेरवाडी (ता. कळंब) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. इंदापूर (ता. वाशी) येथील पारडे कुटुंबाची व्यथा ऐकून त्यांनी त्यांच्या दोन मुलांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या शिक्षणाची सर्वसोय बारामती येथे विनामूल्य केली जाईल.

'गोजवाडा' येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विलास तोडकर व अनंत थोरबोले यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. शिवाय त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वाशी येथील महादेव देवडीकर यांच्या आंब्याच्या बागेलाही त्यांनी भेट दिली. या बागेत जोपासलेल्या विविध जातीच्या आंब्याची त्यांनी पाहणी केली. व देवडीकरांचे कौतुकही केले. यावेळी गोविंद पवार यांचा मिरचीचा प्लॉट ही त्यांनी पाहिला.

मराठवाड्यात १ हजार ५०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असताना याबाबत केंद्राकडे केवळ तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद असावी हे दुर्भाग्य आहे. आवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना देखील कर्जमाफीची गरज आहे.

आपल्या दोऱ्यात शरद पवार यांनी गोजवाडा, ईट, दसमेगाव, इंदापूर, गिरवली या गावातील भेटी देत तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. डबघाईस आलेल्या उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेची कहाणीही त्यांनी यावेळी जाणून घेतली. या बँकेतील हक्काच्या ठेवीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. खंडीत वीज पुरवठ्यामुळे पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक जोपासने अवघड झाले आहे. अशा विविध तक्रारीचा पाढा यावेळी शेतकऱ्यांनी मांडला.

मुख्यमंत्र्याची आज भेट

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २ जून रोजी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीसह भेट घेण्यात येणार आहे. यावेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समिती अध्यक्षानेच उचलले १९ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

निरगुडी खुर्द-बहुलीतांडा, निरगुडी बुद्रुक-ठाकूरवाडी या गावांत राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या निधीतून पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्षाने स्वतःच्या नावावर तब्बल १९ लाख रुपये उचलल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम वसूल करण्याबद्दल पंचायत समिती व पाणीपुरवठा विभाग परस्पराकडे बोट दाखवित आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत तालुक्यातील निरगुडी खुर्द, बहुलीतांडा, निरगुडी बुद्रुक-ठाकूरवाडी या गावांसाठी अनुक्रमे ३० लाख, ४५ लाख, ७५ लाख असा निधी मंजूर झाला होता. निरगुडी- ठाकूरवाडी योजना कार्यान्वित झाली असून काही किरकोळ कामे अपूर्ण आहेत. पाइपलाइन टाकणे, जमिनीवर टाकी बसविणे ही कामे बाकी आहेत. या कामाचे कंत्राट कन्नड तालुक्यातील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. निरगुडी खुर्द- बहुलीतांडा आणि निरगुडी बुद्रुक- ठाकूरवाडी या दोन्ही गावांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचा अध्यक्ष सुनील जयलाल पवार हे आहेत.

पवार यांनी नेमून दिलेल्या कंत्राटदाराच्या नावे रक्कम न काढता स्वतःच्या नावावर निरगुडी बुद्रुक येथून ११ लाख ५० हजार रुपये व निरगुडी खुर्द येथून ७ लाख ५० हजार रुपये, असे एकूण १९ लाख रुपये काढले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून ती वसूल करणे व गैरकृत्याबद्दल गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु, पंचायत समितीने त्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

योजना कार्यान्वित होईपर्यंत सर्व जबाबदारी व नियंत्रण जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कारवाई केली पाहिजे. याविषयी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे मार्गदर्शन मागविले आहे.

- डॉ. आर. एस. लाहोटी, गटविकास अधिकारी

रक्कम वसूल करण्याचा अधिकार गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना आहे. शासन निर्णयानुसार संबंधितांकडून वसुली संदर्भात कारवाई पंचायत समितीकडून होणे अपेक्षित आहे.

- ओ. के. हेडाऊ, उपअभियंता, पाणीपुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मठाची जागा परत देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नाथ मंदिर परिसरातील संत सेवालाल मठाची जागा पुन्हा मठाच्या ताब्यात द्यावी, असे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी संत सेवालाल मंदिर पाडून टाकले आहे.

संत एकनाथ समाधी मंदिराच्या परिसरातील रामलाल बाबा मठाच्या शेजारी गोदावरी नदी काठावर संत सेवालाल यांचा मठ आहे. या मठाचा सर्वे नंबर २३३ व नप घर नंबर १८९५/१ आहे. या भागात पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत गोदावरी नदीवर घाट बांधण्याचे काम सुरू आहे. घाटाच्या बांधकामात मठाचा अडथळा होत असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी संत सेवालाल मंदिर पाडून टाकले. तसेच, घाटाचे काम करणाऱ्या कंत्राटदारानेही मठाची जागा ताब्यात घेवून या परिसरातून मुरूम उपसा सुरू केला होता.

संत सेवालाल मठाचे पुजारी भीमराव सक्रू राठोड व इतरांनी महसूल राज्यमंत्र्यांची भेट घेऊन मठाच्या मालकीची कागदपत्रे दाखवली. नगरपालिकेने बेकायदेशीररित्या मंदिर तोडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संत सेवालाल मठाची संत एकनाथ समाधी मंदिर परिसरातील जागा पुन्हा मिळवून देण्यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images