Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शैक्षणिक कर्ज मिळत नसल्याची भाजपची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

राष्ट्रीयकृत बँकांकडून विद्यार्थ्थाना शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने उपजिल्हाधिकारी चुन्नीलाल कोकणी यांच्याकडे केली आहे. हे निवेदन शहराध्यक्ष विष्णू काटकर यांनी दिले.

येथील भारतीय स्टेट बँक, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, बँक ऑफ इंडिया, अँक्स‌िस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण गोदावरी बँक या बँकातून विद्यार्थी व पालकांना नीट माहिती न देता परत पाठवले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. बँकेतून कर्ज न मिळाल्याने ग्रामीण भागातील होतकरू, हुशार, गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून बँकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष शामराव आळणे, निलेश खंडाळकर, शेख जाकेर, विनोद भोजवानी, रघुनाथ घरमोडे, उत्तम जाधव, अनुप पाटील, अतुल प्रशाद, वसीम बागवान या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद पथदिव्यामुळे असुरक्षितता

$
0
0

म.टा. प्रतिनिधी वाळूज

वाळूज औद्योगिक वसाहतीतील बहुतांश पथदिवे बंद पडले आहेत. त्याचा फायदा घेत काही गुंड लूटत असल्याने कामगार रात्रपाळी करण्यासाठी घाबरत आहेत. दुसरीकडे पथदिवे बंद असल्याने छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. या परिस्थितीत एमआयडीसी प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. वाळूज एमआयडीसीमधील अनेक कंपन्यात तीन शिफ्टमध्ये काम होते. या कामगारांचे पगार साधारणतः प्रत्येक महिन्याच्या एक ते १० तारखेदरम्यान होतात. कामगारांना त्यांच्या शिफ्टमध्ये पगार दिला जातो. बहुतेक कामगार रात्रपाळीत वेतन घेतात.

येथे रोजंदारी कामगारांची संख्या मोठी असून त्यांना काम संपल्यानंतर तत्काळ रोख वेतन दिले जाते. हे हेरून अंधारात कामगारांना गाठून लूटमार होत असल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले. यामुळे कामगार हैराण आहेत. पण दररोजचा प्रश्न असल्याने कामगार तक्रार देणे टाळत असल्याने हे प्रकार वाढत आहेत. एमआयडीसीतील एफ, एच, जी सेक्टरमध्ये पथदिवे बंद आहेत.

वाळूज एमआयडीसीत २२०० पथदिवे असून ते प्रत्येक सेक्टरमध्ये रस्त्याच्या मधोमध बसवले आहेत. त्यासाठी सुमारे दरमहा सहा लाख रुपये वीजबिल भरावे लागते. मात्र यापैकी बहुसंख्य पथदिवे बंद आहेत. एमआयडीसीने पथदिवे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले आहे. लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने लवकर काळोख पडेल. त्यामुळे पथदिवे दुरुस्त करून सुरू करावेत, अशी कामगार व नागरिकांची मागणी आहे.

एमआयडीसी पथदिव्यांबद्दल अत्यंत उदासिन आहे. पथदिवे बंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश डोळ्यावर पडल्यावर अपघात होतात. पथदिवे बंद असल्याने अनेक ठिकाणी लूटमार होत आहे.

- प्रकाश जाधव, कामगार नेते

पथदिवे रात्री कायमस्वरूपी सुरू ठेवणे ही एमआयडीसी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. एमआयडीसीने सौर ऊर्जेवरील पथदिवे बसविल्यास खर्च कमी होऊ शकतो.

- राहुल मोगले, उद्योजक

एकूण पथदिव्यांपैकी चार ते पाच टक्के पथदिवे बंद असण्याची शक्यता आहे. खासगी एजन्सीमार्फत वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. तक्रार असेल तर एजन्सीला सूचना दिल्या जातील.

- आर. व्ही. काळे, अभियंता, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगामाला मान्सूनची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केरळ किनारपट्टीवर चार जूनपर्यंत दाखल झालेला मान्सून मराठवाड्यात पुढील आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत असून जिल्ह्यात शेतीच्या पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. कापसाची उत्पादकता कायम ठेवून कपाशीचे क्षेत्र कमी करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. तर खरीप हंगामासाठी बाजारपेठेत खते आणि बियाणे उपलब्ध असूनही विक्री नसल्याचे दिसत आहे.

यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा निश्चित अंदाज आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण कमी-अधिक असले तरी निश्चित पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात धुळपेरणी सुरू असून पुढील दोन आठवड्यात कपाशी लागवड सुरू होणार आहे. मागील तीन वर्षे सातत्याने पाऊस नसल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कमी पाण्यातील पिके व आंतरपिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मराठवाड्यात आंतरपिके घेण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. कपाशी पिकात मूग, उडीद किंवा सोयाबीन पिके घेतल्यास एका पिकाचे नुकसान झाले, तरी किमान दुसरे पीक हाती येईल असा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात ५५ ते ६५ टक्के कपाशीचे पीक असते.

कमी पाऊस व जागतिक बाजारपेठेत कमी मागणी असल्यामुळे कापसाचे भाव पडले आहेत. या पार्श्वभूमीवर कापसाचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर क्षेत्र कमी केले जाणार आहे. क्षेत्र कमी असले तरी उत्पादकता कायम राहील, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. पारंपरिक पिकांना शेतकऱ्यांनी फाटा दिला असून नगदी पिकांकडे कल वाढला आहे. या पिकांचा वारेमाप खर्च वाढत असून उत्पादकता घटत आहे. परिणामी, शेतकरी तोट्यात आहेत. या खरीप हंगामात नवीन पीक पद्धती राबवून जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे.

कर्जासाठी बॅँकेच्या खेटा

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांत खते व बियाणे उपलब्ध झाले आहे. मात्र, अजूनही बियाणे खरेदी वाढली नसल्याचे चित्र आहे. बहुतेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकांमध्ये प्रयत्न करीत आहेत. बँकांनी कर्ज वाटप केल्यानंतरच बाजारपेठेत गर्दी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

या आठवड्यात पाऊस पडला तरी तो मान्सूनपूर्व पाऊस असेल. मान्सून केरळात ४ जूनपर्यंत दाखल झाल्यास मराठवाड्यात १२ ते १४ जून दरम्यान पडू शकतो. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

पाऊस लवकरच दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या पूर्वमशागतीची कामे लवकर पूर्ण करावी. उताराला आडवी मशागत केल्यास फायदा होईल. फार हलक्या जमिनीत कपाशीची लागवड करू नये. तसेच आंतरपिके घेण्यावर भर दिला पाहिजे.- सतीश शिरडकर,

उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ तास उलटूनही मृत्यूप्रकरणी गुन्हा नाही

$
0
0

औरंगाबाद : हर्सूल परिसरातील हॉटेलच्या स्विमिंग टँकमध्ये बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेला चोवीस तास उलटले तरी अद्याप या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.

कटकटगेट येथील फारूक अन्सार (वय १९) हा तरूण रविवारी मित्रांसोबत हर्सूल परिसरातील हॉटेल श्रावणीमध्ये असलेल्या स्विमिंग टँकवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच्या मित्रांच्या दुर्लक्षामुळे तीन तासानंतर हा प्रकार उघडकीस आला. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी टँकच्या लाईफगार्डची तेथे उपस्थिती नव्हती. या घटनेला चोवीस तास उलटले आहेत. मात्र, हर्सूल पोलिस ठाण्यात फारूकच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अथवा कोणाची देखील चौकशी पोलिसांकडून करण्यात आली नाही. यासबंधी बोलताना हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एल. ए. शिनगारे यांनी तक्रारदार आला नसल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती दिली.

डॉक्टरला आठ जणांची मारहाण

औरंगाबाद : डॉक्टर व नर्स काम करीत नसल्याचा आरोप करीत दांपत्याला आठ जणांनी मारहाण केली. शनिवारी रात्री बेगमपुरा परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपींविरूद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप माने (वय २८ रा. विद्युत कॉलनी) हा तरूण घाटीत डॉक्टर आहे. शनिवारी रात्री पावणेदहा वाजता माने पत्नीसह नोकरीवरून घरी परतत होता. यावेळी मुसा नावाच्या तरूणासह सात आठ जणांनी त्यांना अडवले. नर्स व डॉक्टर काम करीत नाही असा आरोप करीत त्यांनी माने दांपत्याला शिवीगाळ केली तसेच प्रदीप माने यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपींविरूद्ध पोलिस ठाण्यात जमावबंदी, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष पथकांना पोलिस आयुक्तांचा चाप

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस उपायुक्तांनी स्थापन केलेली त्यांची स्वतंत्र विशेष प‌थके पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बरखास्त केली आहेत. गुन्हेशाखा तसेच पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथके तपासासाठी नेमण्यात आली असल्यामुळे ही पथके बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहर पोलिस दलात परिमंडळ एक व परिमंडळ दोन अशी दोन पोलिस उपायुक्तांची नेमणूक आहे. दोन्ही उपायुक्तांनी त्यांच्या अखत्यारित तपासासाठी स्वतंत्र पथके निर्माण केली होती. त्यांच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक तरबेज कर्मचारी या पथकासाठी निवडण्यात आला होता. पीएसआय दर्जाचा अधिकारी या पथकाचे नेतृत्व करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून ही पथके कार्यरत होती. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर ही पथके बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तालयात तपासासाठी गुन्हेशाखा कार्यरत आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये तपासासाठी गुन्हेप्रकटीकरण पथक (डि बी स्क्वॉड) ची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाची कामगिरी देखील म्हणावी तशी प्रभावी दिसून येत नव्हती. या कारणास्तव आयुक्त अमितेशकुमार यांनी ही पथके बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या सेवेला चार्ली जवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिस ठाणे अंतर्गत पेट्रोलिंग करणारे बीट मार्शल पथक बरखास्त केले आहे. बीटमार्शल ऐवजी आता चार्ली पथकाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये तरूण कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. रस्त्यावरील गुन्हे, मंगळसूत्र चोरी, तोतया पोलिस आदी गुन्ह्यावर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. १५२ जवानांचा यामध्ये समावेश असून २४ तास हे पथक कार्यरत राहणार आहे.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत बीट मार्शल नेमण्यात आले होते. या बीटमार्शलना त्यांच्या हद्दीत दुचाकीवर पेट्रोलिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, पेट्रोलिंग ऐवजी टपाल ड्यूटी, आरोपी पार्टी आदी कामांसाठी त्यांचा वापर करण्यात येत असल्याने त्यांचे पेट्रोलिंग प्रभावी होत नव्हते. ही बाब पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्दशनास आली. बीटमार्शल ही संकल्पना रद्द करण्यात आली असून चार्ली ही संकल्पना राबवण्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी जाहीर केले. गेल्या आठ दिवसात या संदर्भात तयारी करण्यात आली. एकूण १५२ कर्मचाऱ्यांची यामध्ये निवड करण्यात आली असून २०१० नंतर भर्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी या चार्ली पथकाचे ‌आयुक्त अमितेशकुमार यांनी हिरवा ध्वज दाखवून उद््घाटन केले. यानंतर शहरातील प्रमुख रोडवर दुचाकीवर असलेल्या या चार्ली पथकाचे पथसंचलन करण्यात आले.

गुन्हेशाखेकडे नियत्रंण

या चार्ली पथकासाठी एकूण ७५ दुचाकी देण्यात आल्या आहेत. दिवसा व रात्री अशा दोन शिफ्टमध्ये एका वेळी ३८ दुचाकीवर शहरातील विविध भागात चार्लीची गस्त राहणार आहे. यामध्ये दहा महिला चार्लीचा समावेश आहे. या संपूर्ण पथकावर गुन्हेशाखेचे नियत्रंण राहणार असून त्यासाठी स्वतंत्र वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत.

चार प्रमुख जबाबदाऱ्या

रस्त्यावरील गुन्हे, मंगळसूत्र चोरी, तोतया पोलिस, वृद्धांची फसवणूक, लुबाडणूक, जबरी चोरीवर अंकूश ठेवणे

कायदा व सुव्यवस्थेला बाधा आल्यास तात्काळ उपलब्ध होणे

गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे

अपघाताच्या वेळी तात्काळ मदत

प्रायोगिक तत्वावर चार्ली पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या चार्लींना इतर कोणतेही कामे न करता फक्त पेट्रोलिंग व गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. तीन महिन्यानंतर या चार्लींना वेगळा गणवेश देण्यात येणार आहे.

अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चे पेमेंट थांबवा; उपमहापौरांचे पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करारानुसार समांतर जलवाहिनीचे काम सुरू केल्यानंतर आणि पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत औरंगाबाद सिटी वॉटर युट‌िलिटी कंपनी (समांतर) ला देण्यात येणारे १५ कोटी ७५ लाख रुपये देऊ नयेत, असे पत्र उपमहापौर प्रमोद राठोड यांनी पालिका प्रशासनास दिले आहे. यावर पंधरा दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा महापालिकेने सप्टेंबर २०१४ पासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित केला आहे. कन्शेशनल अॅग्रीमेंटप्रमाणे समांतर जलवाहिनी प्रकल्पांतर्गत वॉटर पेमेंट खात्यातून दरमहा पाच कोटी १५ लाख रुपये देण्यात येतात. कन्शेशनल अॅग्रीमेंटप्रमाणे वाढीव रक्कम देण्यात येणार आहे. पण कंपनीने करारानुसार जलवाहिनीचे काम सुरू केलेले नाही. महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. नागरिकांनी संतापून कंपनीच्या विरोधात आंदोलने केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. कंपनीतर्फे फक्त वसुलीचे काम सुरू आहे. त्यामुळे कंपनी पालिकेचा पैसा लाटण्याच्या उद्देशाने धोरण राबवित असल्याची जनतेची भावना झाल्याचे या पत्रात म्हटले आहे. कंपनीकडून पाइपलाइनचे काम सुरू केल्याशिवाय आणि पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत कंपनीचे देयक देऊ नये, असे मुख्य लेखाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ची मराठी प्रत साडेतीन वर्षांनंतर प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करण्यासाठी नेमलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युट‌िलिटी कंपनीच्या (समांतर) कराराची मराठी प्रत महापालिकेने तब्बल साडेतीन वर्षांनंतर उपलब्ध करून दिली आहे. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी यासाठी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते.

महापालिकेने समांतर कंपनीचा करार सप्टेंबर २०११ मध्ये केला. ही सविस्तर प्रत इंग्रजीमध्ये होती. त्यामुळे नेमका करार कोणत्या स्वरुपाचा केला ? मुदत काय ? कंपनीकडून काय सुविधा पुरविल्या जाणार ? याविषयी सगळे नगरसेवक अनभिज्ञ होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीवरच समांतर कराराचा अभ्यास केला गेला. राठोड यांच्यासह अन्य नगरसेवकांनीही प्रशासनाकडे कराराची प्रत भाषांतरित करून द्यावी, अशी मागणी केली होती. पण प्रशासनाने वेळोवेळी टोलवाटोलवी केली. उपमहापौर झाल्यानंतर राठोड यांनी पुन्हा एक पत्र दिले. मागच्या टर्मला ते विरोधी पक्षाचे नगरसेवक होते. आता ते सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी धावपळ करून कराराची प्रत भाषांतरकाराकडून मराठीत तयार करून घेतली. ही प्रत राठोड यांना सोमवारी (१ जून) सोपविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोराचा कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबादः जिल्हा न्यायालयातून एका संशयित आरोपीने सोमवारी (१ जून) पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला कोर्टाच्या आवारताच पकडले. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दत्तू भाऊसाहेब भंडारे (रा. जोगेश्वरी) याला दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात कोर्टापुढे हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी संधी साधून या चोराने पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात असून रात्री उशिरापर्यंत क्रांतिचौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज MIDC तील रस्त्यांचे दशावतार संपेनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तब्बल अडीच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. वर्षभरापूर्वी निविदा मंजूर होऊन मुंबईच्या कंत्राटदाराला काम मिळाले. पण या कंत्राटदाराने मुदतीच्या आत काम पूर्ण केले नाही. त्याची दखल घेत एमआयडीसीने संबंधित कंत्राटदाराच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. याबाबत या आठवड्यात अंतिम निर्णय होऊन कामासाठी नवीन टेंडर काढण्यात येणार आहे.

वाळूज एमआयडीसीमधील ओअॅसिस चौक ते फ्रँकी कंपनी, असा बारा किलोमीटरचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून सर्वाधिक वाहतूक आहे. तिरंगा चौक, महावीर चौक, महाराणा प्रताप चौक, सिमेन्स चौक, मायलॅन, सिएट ते फ्रँकी कंपनी पर्यंतच्या रस्त्यासाठी अडीच वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आल्या. हे १३ कोटी रुपयांचे काम मुंबईच्या रवासा कन्स्ट्रक्शनला मिळाले. एमआयडीसीअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी महामंडळाकडूनच निधी उपलब्ध करून दिला जातो. अडीच वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला रस्ता पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत निश्चित केली होती. ही मुदत गेल्या महिन्यात संपली. मुदतीच्या आत केवळ सहा टक्केच काम पूर्ण झाले. परिणामी रस्त्याची डागडुजी, डांबरीकरण पुन्हा रखडले आहे. वाळूज औद्योगिक वसहतीतील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ)च्या पुढाकाराने एमआयडीसीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तत्कालीन प्रशासनाने यासंदर्भात मुंबई कार्यालयाशी बोलून तत्काळ निर्णय घेतला होता. उद्योजकांच्या उठावानंतरही रस्त्याच्या कामाला निधी मिळेल अशी शक्यता होती. पण कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे.

संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. त्याबद्दल मुंबईला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. एक दोन दिवसात निलंबनाची नोटीस काढण्यात येईल. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

- आर. एस. गावडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुकादेवीचे मंदिर काही दिवस बंद

$
0
0

लातूरः रेणापूर येथील पुरातन रेणुका देवीच्या मुखवट्याचा शेंदूर गळुन पडल्यामुळे आता नव्यानी शास्त्रोक्त पद्धतीने देवीच्या मुखवट्याला शेंदूर लेपन आणि धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. त्यामुळे भक्तासांठी पुढील काही दिवस दर्शनांसाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे.

या बाबत देवीचे परंपरागत पुजारी बापुदेव धर्माधिकारी यांचे चिरंजीव श्रीकांत धर्माधिकारी म्हणाले, 'सोमवारी सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर देवीला वस्त्र परिधान करीत असतानाच मुखवट्यावरील शेंदूर गळू लागला. तो मी ओंजळीत धरून ठेवला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांना बोलावून घेतले. त्यांच्या चर्चेनुसार मुखवट्याला शास्त्रोक्त पद्धतीने नव्याने शेंदूर लेपन करण्याचे ठरले. त्यामुळे पुढील काही दिवस देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.'झालेला प्रकार हा वाढत्या उष्णतेचा असू शकतो. त्यामुळे कोणीही या बाबत अंधश्रद्धेने अफवा पसरवू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने केला भाजपचा गेम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र, राज्य आणि महापालिकेत एकत्रित सत्तेत असलेल्या शिवसेना - भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी (समांतर) च्या जलवाहिनीच्या कामाची सुरुवात सोमवारी झाली. दोन ठिकाणी जंगी कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, उदघाटनासाठी केवळ शिवसेनेचेच नेते उपस्थित होते. भाजपच्या एकाही नेत्याला कार्यक्रम होईपर्यंत साधी माहितीही कळविली गेली नाही. याबाबत भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण पसरले आहे.

समांतर जलवाहिनीसाठी वॉटर युटीलिटी कंपनीशी महापालिकेने करार केला. सुरुवातीपासूनच हा करार वादाचा राहिलेला नाही. कुठल्याही सुविधा न पुरविता कंपनीने पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा ताब्यात घेतली. नऊ महिने झाले तरी त्यांना शहरात सुरळीत पाणीपुरवठा करता आलेला नाही. जनता त्रस्त झालेली असताना सत्ताधारी मात्र शांत आहेत. दरम्यान नवी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पाणीप्रश्नाकडे पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत महापौरांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत समांतरच्या अधिकाऱ्यांना बोलावून जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. कंपनीने एक जूनची मुदत मागितली होती. नवीन जलवाहिनीसाठी पाइपची प्रतीक्षा होती. कारण पाइपची ऑर्डरच लवकर दिलेली नव्हती.

पालिका निवडणूक शिवसेना-भाजपने एकत्रित लढविली. पाचव्यांदा पालिकेवर युतीचा झेंडा फडकला. पाणीप्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली गेली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. दरम्यान कंपनीने सोमवारी शिवाजीनगर डी सेक्टर आणि चिकलठाणा येथे जलवाहिनीच्या कामाचे उदघाटन केले. कार्यक्रमासाठी केवळ शिवसेनेचे नेते उपस्थित होते. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, नगरसेवक नंदकुमार घोडेले शिवाजीनगरमधील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी भाजपचे काही कार्यकर्ते पोचले. तिथे भाजपचा एकही पदाधिकारी न दिसल्याने त्यांनी भाजप नेत्यांना संपर्क केला. चिकलठाण्यातूनही याबाबतची माहिती उपमहापौर राठोड यांना कळाली. त्यांनी खासदार खैरेंना संपर्क केला 'उदघाटनासाठी आम्हाला काहीच निरोप कसा नाही ?' अशी विचारणा केली. पण खैरेंकडून समाधानकारक उत्तर आले नाही. राठोड केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुंडलिकनगर येथे भाजपचा कार्यक्रम होता तिकडे रवाना झाले. चिकलठाण्यातील कार्यक्रमास मात्र, शिवसेनेचे निवडक नेतेच उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

समांतरबाबत आमची एकत्र बैठक झाली होती. त्यात ठरल्यानुसार एक जूनपासून काम सुरू होणार आहे. दुपारी मला शिवाजीनगर आणि चिकलठाण्यातून समांतर जलवाहिनीचे उदघाटन होत असल्याचा निरोप आला. कंपनी किंवा शिवसेनेकडून अधिकृतपणे काहीच माहिती मिळाली नाही.

- प्रमोद राठोड, उपमहापौर.

कंपनीचे पाइप आल्याची माहिती मिळाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे पाहणीसाठी शिवाजीनगरला आले. तिथे उदघाटन नव्हते. पाइपची पाहणी करताना परिसरातील नागरिकांनी पूजा करण्याची मागणी कली. त्यानुसार पूजन झाले. पालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमात शिवसेना- भाजप एकत्रच राहील. एवढेच नव्हे तर विरोधीपक्षांना विश्वासात घेऊनच उदघाटन होईल. यात कुठे राजकारण असणार नाही. - त्र्यंबक तुपे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध वारशाला पर्यटकांची पीडा

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले आणि इतर ऐतिहासिक वास्तू यांचे झपाट्याने विद्रुपीकरण सुरू आहे. उपद्रवी पर्यटकांनी चुना, कोळसा आणि पेनाने मजकूर लिहिल्यामुळे या प्राचीन वारसा स्थळांना अवकळा आली आहे. या गैरप्रकारांना पायबंद घालणे केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाला कठीण झाले आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची वाताहत झाली आहे.

हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरलेली प्राचीन वारसास्थळे मराठवाड्यात आहेत. वेरूळ-अजिंठा लेणी, देवगिरी किल्ला, औरंगाबाद लेणी, तीर्थस्तंभ (पैठण), उदगीर किल्ला, कंधार किल्ला आणि अंतूर किल्ला या ऐतिहासिक वास्तूंना उपद्रवी पर्यटकांनी विद्रुप केले आहे. या पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर ठिकठिकाणी चुना, कोळसा आणि पेनाने 'कोरीव' काम झाल्याचे दिसत आहे. लेणी आणि किल्ल्यांच्या भिंतीवर प्रेमसंदेश लिहिण्याचेही प्रकार होत आहेत. या प्रकारांमुळे ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे. महत्त्वाच्या पर्यटनस्थळी उपद्रवी पर्यटकांचा उच्छाद वाढला आहे. काही ठिकाणी पर्यटकांनी धारदार वस्तूने नाव कोरले आहे. औरंगाबाद लेणीच्या दर्शनी भागात इंग्रजी नाव दिसत आहे.

देवगिरी किल्ल्याच्या देखभालीसाठी अवघे १३ कर्मचारी आहेत. त्यामुळे रंगमहाल आणि मुख्य भिंतीवर विद्रुपीकरण वाढले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत पर्यटक हा प्रकार करीत असल्यामुळे कारवाई करणे कठीण झाले आहे. 'प्रत्येक पर्यटनस्थळी सुरक्षा कर्मचारी नेमणे राज्य पुरातत्व विभागाला शक्य नाही. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनीच ऐतिहासिक वारसा जपणे गरजेचे आहे,' असे राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांनी सांगितले. पर्यटनस्थळांचे विद्रुपीकरण आणि नासधूस करण्याची पर्यटकांची मानसिकता असते. ही मानसिकता बदलण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि राज्य पुरातत्व विभाग प्रयत्नशील आहे. याबाबत औरंगाबाद शहरातील 'शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान'ने उल्लेखनीय काम केले आहे. किल्ल्यांची निगा राखत जनजागृतीचे काम केले जात आहे. दारुच्या बाटल्या, सिगारेट, तंबाखू, चुना घेऊन जाण्यास कार्यकर्ते प्रतिबंध करीत आहेत. या माध्यमातून पर्यटनस्थळांचे जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दंडाची तरतूद कागदावरच

ऐतिहासिक वास्तूंची नासधूस केल्यास पाच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा आहे; मात्र हा प्रकार कर्मचारी नसताना घडतो. त्यामुळे अटक कुणाला करणार असा प्रश्न आहे. कंधार येथील किल्ल्यावरील नासधूस आणि मजकूर लिहिल्याचे फोटो नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले होते; मात्र काही नावे आणि पत्ते चुकीचे निघाल्यामुळे कारवाई करण्यात अडचणी आल्या, असे संशोधन सहाय्यक एन. एन. मार्कंडेय यांनी सांगितले. सर्वसामान्यांनी पर्यटनस्थळांबाबत आस्था ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाव कोरणारे महाभाग कोण?

लेणी आणि किल्ल्यांवर चुन्याने नाव लिहिणारे आणि धारदार शस्त्राने नाव कोरणारे महाभाग वाढले आहेत. या लोकांनी ऐतिहासिक वास्तूंची दुर्दशा करण्याचा विडा उचलला आहे. संबंधित ऐतिहासिक वास्तू बांधलेल्या राजांनी आणि कारागिरांनीही आपले नाव लिहिले नाही. त्यामुळे पर्यटकांना नाव कोरण्याचा अधिकार काय असा सवाल इतिहाप्रेमी पर्यटकांनी केला आहे.

अंतूर (ता. कन्नड) किल्ल्याच्या संवर्धनासाठी 'शिवदुर्ग संवर्धन'ने प्रयत्न केले. काही ठिकाणी किल्ल्यांच्या देखरेखीची जबाबदारी त्यांनी काही जणांवर सोपरविली आहे.. आगंतुक पर्यटकांना समज देत जनजागृती करण्यात येते. औरंगाबाद परिसरात पर्यटनस्थळांबाबत अद्याप नागरिकांमध्ये आपुलकी नाही. पर्यटनस्थळांची स्वच्छता करू नका; पण किमान त्यांना विद्रूप करू नका, असे सांगावेसे वाटते.

- प्रमोद डवले, अध्यक्ष, शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान

एखाद्या पर्यटनस्थळी आपण येऊन गेल्याची खूण म्हणून नाव लिहितात किंवा कोरतात. ही मानसिकता मागील काही वर्षांपासून पर्यटनस्थळांसाठी तापदायक ठरली आहे. साध्या चुन्याने लिहिलेला मजकूर काढण्यासाठी हजारो रुपये खर्च होतो. पर्यटनस्थळांची हानी टाळण्यासाठी रासायनिक प्रक्रियेनेच मजकूर मिटविला जातो. ही प्रक्रिया खर्चिक आहे. त्यामुळे देशाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- विलास वहाणे, सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्व विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुकीला पाच दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयपीएल बेटींग प्रकरणात आर्थिक गुन्हेशाखेने भवानीनगर येथून अटक केलेल्या बुकीला सोमवारी कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धीरज वर्मा असे या तरुणाचे नाव आहे. वर्मा सध्या एमबीएचे शिक्षण घेत असून, तो पुण्याला असतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान सामन्यावर बेटींग लावणाऱ्या टोळीला गुन्हेशाखेच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी अटक केली होती. यावेळी लाइन ऑपरेटर नरेश पोतलवाड याच्या मोबाइल लाइन बॉक्समध्ये एकूण २८ लाइन सुरू होत्या. यापैकी एक बुकी असलेल्या धीरज वर्मा याला रविवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, अधिक तपासासाठी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक कर्ज : १८ % पर्यंत वाढले

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शहर आणि देशाबाहेर जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. शहरातील सुमारे १४ राष्ट्रीय कृत बँकांच्या १५० हून अधिक शाखांत सध्या कोट्यवधींचे कर्जवाटप सुरू आहे. यंदा ही टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

स्टडी अॅब्रॉडचा व विशेषत: अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स‌िंगापूर येथे शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी पन्नासने वाढत आहे. त्यामुळे विविध बँकांनी मार्केटिंगच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जासाठी कॉलेजपर्यंत पायघड्या पसरल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना कर्ज घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. कर्जदारांची संख्याही वाढली आहे. १५ ते २० लाखांपर्यंतच कर्ज आजकाल सहज मिळते. सध्या ८० लाख ते सव्वा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, १० ते १३ टक्के व्याजदराने घेऊन शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो आहे. महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अनंत घाटे म्हणाले, '२०१०-२०११ यावर्षी बँकांमधील एकूण कर्जाच्या १२ ते १३ टक्के कर्ज शिक्षणासाठी असायचे. ही टक्केवारी २०११-१२ या वर्षासाठी १४ टक्के, १२-१३ वर्षासाठी १५ टक्के तर आता २०१५ या वर्षासाठी सुमारे १८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कर्ज घेताना मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे अर्ज अधिक असतात,' असे घाटे म्हणाले.

साधारण ५० विद्यार्थ्यांना सुमारे २० कोटींपर्यंत खर्च सहज येतो, पण ते विद्यार्थी पदवी शिक्षण घेणार आहेत की पदव्युत्तर शिक्षण यावर तो खर्च अपेक्षित असतो. शहरांतर्गत संस्थांतील शिक्षणासाठीही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात. मात्र, परदेशी शिक्षण घेताना खासगी बँकांपेक्षा राष्ट्रीयकृत बँकांनाच प्राधान्याने निवडले जाते.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज देताना आम्ही त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तपासतो. तो ज्या देशात, ज्या कॉलेजमध्ये, ज्या कोर्सला जातो त्यावरही कर्जाची रक्कम ठरते. कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड, कोर्सला असलेली मागणी आदी बाबीही आम्ही विचारात घेतो.

- अनंत घाटे; व्यवस्थापक, महाराष्ट्र बॅँक.

विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही मॅनेजमेंट आणि इंजिनीअरिंग या वलयांकित शाखांच्या अभ्यासक्रमांकडेच आहे. मात्र, काही वर्षांपूर्वीपर्यंत विद्यार्थी केवळ मास्टर्ससाठी परदेशी जायचे. आता पदवी शिक्षणासाठी परदेशात जाऊन कोर्स करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

- अनिरुद्ध हातवळणे, विश्वश्री कन्सल्टन्सी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ जमिनींसाठी ‘टास्क फोर्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वक्फ बोर्डाच्या जमिनीवर राज्यभर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फोर्समध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

राज्यातील १,०८८ मालमत्तांवरील अतिक्रमणे कलम ५४ प्रमाणे हटवा, असे आदेश सरकारने दिले आहेत. यातली काही प्रकरणे कोर्टात आहेत. वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला राज्याच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी यांनी लेखी उत्तर दिले. वक्फ बोर्डाच्या अतिक्रमण झालेल्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी न्या.ए.टी.ए.के. शेख यांच्या समितीने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे टास्क फोर्स वक्फ बोर्डाच्या अधिनियम १९९५ अंतर्गत जमिनीवरील अतिक्रमण हटविणार आहे आणि त्या जमिनी वक्फ बोर्डाकडे सोपविणार आहे. या कृती दलाची लवकरच स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती प्रधान सचिवांनी दिली.

शासकीय ताबेदारांवरही कारवाई

राज्यातील अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या ताब्यातही वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. या जमिनीही हे टास्क फोर्स वक्फ बोर्डाकडे सुपूर्द करणार आहे. अथवा या जमिनींना बाजार भावाप्रमाणे कर आकारणी करण्यात येणार आहे.

शासनाने न्या.ए.टी.ए.के. शेख यांच्या अहवालावर वक्फच्या जमिनींसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निश्चितच वक्फ बोर्डाची संपत्ती परत मिळविण्यास मदत होईल.

- सय्यद एजाज हुसैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ल्यात महिला जखमी

$
0
0

मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेवर दोघांनी चाकूहल्ला केला. कांचनवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचनवाडी परिसरातील सोमनाथ सोलनकर या तरुणाला त्याच परिसरातील रंगनाथ तरंगे व सारंग तरंगे यांनी घरातून बोलावून नेत मारहाण केली. किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला. हे भांडण सोडवण्यासाठी सोमनाथची आई कलाबाई सोलनकर (वय ६५) या पुढे आल्या. यावेळी दोन्ही आरोपींनी कलाबाईला मारहाण करीत ‌चाकूने वार केला. त्यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर गंभीर जखम झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांसाठी फ्री हेल्पलाईन

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी महिला तरुणी मोठ्या संख्येने येतात. या महिलांना छेडछाड, विनयभंगसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. अशा महिला तरुणींसाठी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाचा फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. ग्रामीण नियत्रंण कक्ष येथे ०२४०-२३९२१०० हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

महिलेला मारहाण

बहिणीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुनीता जाधव (वय ३०, रा. बजाजनगर) या महिलेला दोनजणांनी मारहाण केली. शनिवारी दुपारी नवजीवन कॉलनी, एन ११ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी सविता खराटे व रघुनाथ खराटे यांच्याविरूद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल चोरास अटक

जयभीमनगर, टाऊन हॉल परिसरातून शेख कलीम यांचा मोबाइल चोरण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. शेख कलीम व नागरिकांनी सतर्कतेने आरोपी अजिंक्य जाधव (वय २३, रा. सिल्कमिल्क ‌कॉलनी) याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड लाखाचे साहित्य लंपास

चेलीपुरा येथील प्रवीण कटारिया यांच्या घराचे एन-४ प‌रिसरात बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी त्यांनी वायर फिटिंगसाठी एक लाख ४६ हजाराचे साहित्य आणून ठेवले होते. रविवारी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे फिटिंगचे सामान खिडकीचे ग्रिल कापून पळविले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीलेश घाणेकर यांचे हायकोर्टात अपील

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

स्वतःवर गोळीबार करण्याच्या कटात हर्सूल जेलमध्ये असलेले वकील नीलेश घाणेकर यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात राज्य शासनाने उत्तर दाखल करण्याचे आदेश सुटीतील न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.

२९ मे च्या आदेशाविरुद्ध घाणेकर यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील केले. बनावट हल्ला प्रकरणी नीलेश घाणेकरांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश (२६ मे) कोर्टाने दिले होते. यानंतर जामिनासाठी दाखल केलेला अर्ज सेशन कोर्टाने फेटाळून लावला. बीड बायपास परिसरात घाणेकर यांच्यावर ६ मे रोजी गोळीबार झाला. उपरोक्त गोळीबार घाणेकरांनीच घडवून आणला, असे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी २४ मे रोजी घाणेकरांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २६ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर घाणेकरांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या घाणेकर हर्सूल जेलमध्येच आहेत.

औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी न्या.पी.आर.बोरा यांच्यासमोर सुनावणी झाली. कोर्टाने प्रतिवादी राज्य शासन व सातारा पोलिस ठाण्याचे निरिक्षक यांना नोटीस बजावून राज्य शासनाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेची सुनावणी ५ जून रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याची बाजू माधवेस्वरी म्हसे-ठुबे हे तर राज्य शासनातर्फे डी. आर. काळे हे मांडत आहेत. घाणेकर यांनी त्यांचा जप्त केलेला मोबाइल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवावा, अशी विनंती करणारी दुसरी फौजदारी याचिका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर पठाणला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅड. घाणेकर बनावट गोळीबार प्रकरणातील आरोपी समीर पठाण याला मंगळवारी कोर्टाने सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ५ मे रोजी बीड बायपास भागात अॅड. नीलेश घाणेकर याच्यावर गोळीबार झाल्याचा बनाव करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हेशाखेने आतापर्यंत अॅड. घाणेकर, सोनू उर्फ मुज्जफर जहागिरदार व सय्यद मुजीब याला अटक केली आहे. सोमवारी समीर पठाणला अटक करण्यात आली.

या गुन्ह्यातील एक पिस्तूल अजून जप्त करणे बाकी आहे तसेच प्रमुख सूत्रधार राजू जहागिरदार याचा शोध घेऊन अटक करणे बाकी असल्यामुळे पठाणला पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. ही मागणी मान्य करीत ८ जूनपर्यंत पठाणला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदोन्नतीवरून विद्यापीठात वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदोन्नती करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिल्याची चर्चा विद्यापीठात दिवसभर गाजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाने कुलगुरूंची भेट घेत निवेदन सादर केले.

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारी कर्मचारी संतापले. त्यांनी विविध मागण्याकरत कुलगुरूंची भेट घेतली. कालबद्ध पद्धतीची प्रकरणे मार्गी लावावेत, महागाई भत्ता तातडीने द्या, फरकाचे थकित वेतन द्या अशा मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, अर्जुन खांडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदोन्नती मुद्द्यावरून कुलसचिवांनी राजीनामा दिला. मात्र, कुलगुरूंनी तो स्वीकारला नसल्याची चर्चा विद्यापीठात दिवसभर होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images