Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१६ हजार पळवणारा कुख्यात गुंड ५ तासात जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुलभ शौचालयाच्या मॅनेजरचे सोळा हजार रूपये पळवणाऱ्या कुख्यात गुंडाला पाच तासात मुकुंदवाडी पोलिसांनी जेरबंद केले. गजानन महाराज मंदीर चौकात गुरूवारी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपी पसार आहेत.

गजानन महाराज मंदीर चौकात असलेल्या सुलभ शौचालयात कृष्ण सिंग प्रसाद सिंग हे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. रात्री दहा वाजता ते काऊंटरवर बसले होते. यावेळी युसूफ शेख गुलाब (रा. हुसेनकॉलनी, न्यायनगर) हा दोन साथीदारासह तेथे आला. युसूफने कृष्णासिंगला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला असता युसूफ व साथीदारांनी त्यांना मारहाण करीत त्यांच्या जवळील सोळा हजार रूपये पळवले. कृष्णासिंग यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला हुसेन कॉलनी परिसरात सकाळी अटक केली. त्याच्या ताब्यातून सोळा हजार रूपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोसिल निरिक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख हारून, रावसाहेब कसबे, राजू बनकर, राहूल हिवराळे, परशुराम सोनूने, आनंद वाहूळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी चोरणारे २ अल्पवयीन गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन तरूणांना सिटीचौक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. किराडपुरा व टाइम्स कॉलनीमधील दोन सतरा वर्षांचे तरूण नेहमी वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याची माहिती खबऱ्याने सिटीचौक पोलिसांना दिली होती. या माहितीवरून दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरल्यानंतर त्याचे सुटे पार्ट करून त्याची विक्री करीत होते तसेच मिळेल त्या किमतीतही त्यांनी दुचाकी विकल्या होत्या. पोलिसांनी त्यांनी चोरलेल्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरिक्षक नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ कोडे, दिनेश बन, सुनील राऊत, संतोष केवारे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाणेकरांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतःवर गोळीबार करण्याच्या कटात हर्सूल जेलमध्ये असलेले वकील नीलेश घाणेकर यांच्या नियमित जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होईल. येथील नामांकित वकील नीलेश घाणेकर यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देणे व कट रचल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात घाणेकर यांना २४ मे रोजी अटक करण्यात आली. त्यांची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून घाणेकर यांनी केलेला अर्ज सेशन कोर्टाने २९ मे रोजी फेटाळून लावला होता. या निर्णयाला घाणेकर यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या जामीन अर्जावर शुक्रवारी सुटीतील न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर झाली. नियमित कोर्टापुढे या अर्जावर सुनावणी होईल, असे खंडपीठाने सांगितले. मोबाइल तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावा अशी विनंती घाणेकर यांनी दुसऱ्या याचिकेत केली होती. घाणेकर यांचा मोबाईल फाॅरेन्सिक लॅबकडे देण्यात आला आहे, असे निवेदन सरकारी वकील डी. आर. काळे यांनी केले. त्यामुळे घाणेकर यांची फौजदारी याचिका निकाली निघाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरला नोटीस द्या : घडमोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अनियमितपणे पाणीपुरवठा होत आहे. शहराची पाणीवितरण व्यवस्था महापालिकेने औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी (समांतर) ला दिली आहे. कंपनीकडून कोणत्याही अडचणीची गंभीर दखल घेतली जात नाही. पालिका प्रशासनाने कंपनीला जबाबदार धरून नोटीस बजावली पाहिजे, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, नगरसेवक भगवान घडमोडे यांनी केली आहे.

घडमोडे यांच्या श्रीरामनगर वॉर्डात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याचा त्रास सुरू आहे. वॉटर युटीलिटी कंपनीचे अधिकारी दरवेळी आश्वासनांवर बोळवण करतात. काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी येते. नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र अडचण सुटत नाही, असे घडमोडे यांनी सांगितले. 'समांतरसोबत पालिका प्रशासनाने करार केला. करारातील अटींप्रमाणे कंपनी सेवा पुरवित नाही. हे सगळ्यांना दिसत आहे, पण सगळे शांत आहेत. कायदा हातात घेऊन चालणार नाही. ही समस्या नियमानेच सोडविली पाहिजे. नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारींची पालिका प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही आता नियमानेच तक्रारी करत आहोत. शुक्रवारी मी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना पत्र दिले. त्यात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीचे देयक अदा करू नये, असे पत्र दिले होते. भाजपचे नगरसेवकही आपापल्या वॉर्डातील समस्यांचे लेखी पत्र यापुढे पालिका प्रशासनाला देतील. नगरसेवकांच्या पत्राला उत्तर देणे प्रशासनाला बंधनकारक आहे. यामुळे कंपनीचा कारभार कसा भोंगळ आहे, हे उघड होईल.'

कंपनीकडून पाणीविक्री ?

एकीकडे शहरात तीव्र पाणीटंचाई सुरू असताना समांतरकडून पाणीविक्री सुरू असल्याचा संशय घडमोडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 'पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने मी दोन दिवसांपूर्वी सिडको एन - पाच जलकुंभावर गेलो. तिथून एक टँकर बाहेर पडत होता. ड्रायव्हरला विचारणा केली असता नगरसेवक स्वाती नागरे यांच्या वॉर्डात टँकर जात असल्याचे त्याने सांगितले. मी नागरे यांचे पती किशोर नागरे यांच्याकडून शहानिशा केली असता त्यांच्याकडे टँकरचे बुकिंग नसल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर या जलकुंभातून किती टँकर कुठे जातात याचा हिशेब नाही. कदाचित पाणीविक्री होत असावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून २६५ कोटींचा सेवाकर वसूल होणार

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

यंदा २०१५-१६ या आर्थिक वर्षात शहरातून २६५ कोटींचा सेवाकर वसूल होणार आहे, तर मराठवाड्यातून ४६५ कोटींची वसुली होईल. एक जूनपासून सेवाकरात २ टक्क्यांपर्यंत (१२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के) वाढ झाली. त्यामुळे ही वसुलीही वाढणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली या आठ जिल्ह्यांचा कारभार केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या अंतर्गत आहे.

या आठ जिल्ह्यांतून २०१४-२०१५ मध्ये ३८२ कोटींचा सेवाकर ‌वसूल झाला. ही आकडेवारी यंदा ४६५ कोटींवर जाणार आहे. दर वर्षी सुमारे ७ ते ८ टक्के व्यवसाय वाढतो, असा ठोकताळा आहे. त्या वर्षीच्या नफ्यावर, उलाढालीवर त्या-त्या सेवाकराची वसुली अवलंबून असते. वेगवेगळ्या पंचवीस सेवा प्रकारांपैकी सुमारे सहा प्रकारच्या सेवांमधून सर्वाधिक सेवाकर वसूल केला जाईल. या सेवांमध्ये कमर्शिअल कॉम्प्लेक्स व निवासी बांधकाम, मनुष्यबळ विकास सेवा पुरवणारे उद्योजक व संस्था, हॉटेल व बार, गुड्स ट्रान्सपोर्ट, अचलसंपत्ती यांचा समावेश आहे.

शहरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्स व निवासी बांधकाम, मनुष्यबळ विकास सेवा पुरवणारे उद्योजक व संस्था, हॉटेल व बार, गुड्स ट्रान्सपोर्ट यांचा आकडा ४०० हून अधिक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्या सेवांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे त्यात रेल्वे, विमान, बँक, विमा, जाहिरात, आर्टिटेक्ट, बांधकाम, फोन-मोबाइल, क्रेडिट कार्ड, इव्हेंट मॅनेजमेंट आणि टूर ऑपरेटर्सचा समावेश आहे.

...ही वसुली मुंबई-दिल्लीहून

बँकिंग, टेलिकॉम, मोबाइल, विमा आणि दळणवळण (रेल्वे व विमान) या सेवांची नोंदणी दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात होते. यामुळे या सेवांसह मनोरंजन आणि मीडियासेवांच्या सेवाकराची वसुली मुंबई व दिल्ली कार्यालयाकडून होते. यामुळे या सेवांच्या वाढीसंबंधी असलेल्या सूचना त्या सेवा देत असलेले कार्यालय मोबाइल एसएमएसद्वारे थेट ग्राहकांना देते. त्यांच्याकडूनच ही वसुली करत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ अधिकाऱ्यांना महावितरणने फोडला घाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी जवळपास सहा तास वीज गुल होती. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना घाम फुटला. उकाडा असह्य झाल्याने टेबल-खुर्ची दरवाजात आणून अधिकाऱ्यांनी काम केले.

महावितरणने शुक्रवारी रेल्वे स्टेशन परिसरात पावसाळी कामे उरकण्याच्या नावाखाली सहा तास वीज बंद ठेवली. त्यामुळे वातानुकुलित खोलित बसून काम करणारे आरटीओतील अधिकारी घामाघूम झाले. सहायक परिवहन अधिकारी जी. एस. गवई यांनी उकाडा असह्य झाल्याने कार्यालय कक्षाच्या दरवाज्यासमोर टेबल-खुर्ची टाकली. सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना अंधाऱ्या खोलीत बसून सर्वसामान्यांची कामे करावी लागली. इतर कर्मचाऱ्यांनाही उकाड्यातच चीडचीड करत कामे संपवावी लागली. वीज नसल्यामुळे संगणकाचे काम बंद होते. अनेकांना वाहनांचे शुल्क भरण्यासाठी थांबून राहावे लागले. याशिवाय लायसन्स विभागाचेही काम काही प्रमाणात बंद होते.

जनरेटर बंद

आरटीओ कार्यालयात दहा वर्ष जुना जनरेटर आहे. मात्र, तो उपयोगात नाही. या जनरेटरच्या दुरुस्तीस जितकी रक्कम खर्च होणार आहे, त्या रकमेत नवीन जनरेटर खरेदी होणार आहे. त्यामुळे आरटीओतील जनरेटर दुरुस्त करण्यात आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडच्या तहसीलदार ज्योती पवार निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

कामामध्ये निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी बीडच्या तहसीलदार ज्योती पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही कारवाई केली आहे. तालुक्यात टंचाई परिस्थिती असताना गैरहजर राहणे, शासकीय कामात निष्काळजीपणा,कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना योग्य वागणूक न देणे, या आरोपांवरून त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल झाले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MHCET त अर्हिता मागासवर्गीयांत प्रथम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएचसीईटी) मराठवाडा विभागाचा निकाल २०.८० टक्के लागला आहे. एकूण ९४०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांत औरंगाबादची अर्हिता सावंत हिने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

ही परीक्षा ७ मे रोजी घेण्यात आली होती. राज्यात ५०७ केंद्रातून १ लाख ८९ हजार ५० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. मराठवाडा विभागातून ४१ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९४०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांतून औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या अर्हिता राजेंद्र सावंत हिने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. तिला २००पैकी १८९ गुण मिळाले आहेत. केईएम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी तिला आशा आहे. 'मटा'शी बोलताना तिने सांगितले की, जीवशास्त्राचा अभ्यास क्रमिक पुस्तकांतून केला. रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करताना सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर दिला. घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे तिचे काका आहेत. त्यांच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात शिकण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्याप्रमाणे चांगले डॉक्टर होण्याची इच्छा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचे ऑपरेशन फेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरातील विविध पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या भंगार दुकानावर छापे टाकले. दुचाकी वाहने चोरीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. १२३ दुकाने गॅरेजच्या तपासणीमध्ये किरकोळ मालाशिवाय पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांच्या कारवाईची बातमी लिक झाल्यामुळे हे ऑपरेशन फेल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहरात दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील काही भंगार विक्रेते दुचाकीचे सुटे भाग करून दुचाकीची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करीत आहेत, तसेच चोरीच्या गुन्ह्यातील माल विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पंधरा पोलिस ठाणे हद्दीतील भंगार विक्रेत्यांवर शुक्रवारी एकाच वेळी कोंबिग ऑपरेशन करीत छापा मारण्याचे नियोजन करण्यात आले. सबंधित पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत गुन्हेशाखेचे अधिकारी व कर्मचारी देण्यात आले होते. सकाळी सात ते दहा या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. पंधरा पोलिस ठाणे हद्दीतील ५५ दुकानावर ही कारवाई करण्यात आली. मात्र, पोलिसांना अपेक्षित दुचाकीचे पार्ट सापडले नाही. या कारवाईत अजामीनपात्र गुन्ह्यात हवा असलेला रामेश्वर गाडेकर याला सिटीचौक पोलिसांनी अटक केली. कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेत चोरीच्या गुन्ह्यातील संशयित माल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईची कुणकुण

मोठ्या प्रमाणावर कारवाई करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. सबंधित पोलिस ठाण्याकडून त्यांनी भंगार विक्रेत्याची माहिती मागवली होती. प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने दाखवण्याबाबत टाळाटाळ केली. काही दुकांनाचे पत्ते तर काहींचे मोबाइल क्रमांक गुन्हेशाखेला चुकीचे देण्यात आले होते. भंगार विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिन्सी, सिडको एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी या परिसरातही अपयश झाले.

कारवाईवरच प्रश्नचिन्ह

औरंगाबाद शहरात भंगार विक्रेत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. जिन्सी भागात भंगार विक्रेत्यांचे मोठे गोडाऊन आहे. तसेच नारेगाव परिसरातही भंगारचे मोठे गोडाऊन संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला माहित आहे. असे असताना मोठ्या गोडाऊनवरील कारवाईत काहीही का आढळले नाही, असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेनोग्राफरला लाच घेताना अटक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शॉर्टहँडच्या परीक्षेत मदत करण्यासाठी परीक्षार्थीकडून पाच हजाराची लाच घेताना म‌हाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या स्टेनोग्राफरला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी तीन वाजता औरंगपुरा येथील आ. कृ. वाघमारे प्रशालेत ही कारवाई केली.

शुक्रवारी शहरातील आ.कृ. वाघमारे प्रशालेत इंग्रजी शॉर्टहँड - १२० या परीक्षेचा पेपर होता. शिवाजीनगर येथील स्वामी समर्थ टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टीट्यूट येथील एका तरुणाने या परीक्षेचा फॉर्म भरला होता. सोमवारी हा तरूण परीक्षेचे हॉलतिकीट आणण्यासाठी गेला. यावेळी त्याला स्टेनोग्राफर राजेंद्र बाबूराव वाघमारे (वय ४९, रा. शिवाजीनगर) यांनी परीक्षेचे डिटेक्टर म्हणून आपली नेमणूक असल्याचे सांगितले. परीक्षेमध्ये वेळ वाढवून देण्यासाठी, वेगळी व्यवस्था करण्यासाठी तसेच पास करण्यासाठी त्यांनी पाच हजार रूपयाची लाच मागितली. तरुणाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. शुक्रवारी दोन वाजता परीक्षेची वेळ असताना पावणे दोन वाजता त्याला लाचेची रक्कम घेऊन बोलावण्यात आले. ही रक्कम वाघमारे यांनी स्वीकारताच सापळा रचलेल्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्यावर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, प्रमोद पाटील यांच्यासह कर्मचारी विजय ब्राम्हंदे, अजय आवले, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, चालक मतीन आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांलगतच्या झाडांची होत असलेली तोड, वाहनांची वाढती संख्या आणि जुन्या वाहनांचा सर्रास वापर यांमुळे औरंगाबादेत प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत घातक वायूंचे प्रमाण दुप्पट ते तिप्पट वाढले आहे. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, असे सरस्वती भुवन संस्थेच्या पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

औरंगाबादची लोकसंख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार; १ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यात मोटारसायकल, स्कुटर, मोपेडची संख्या ७ लाख ७६ हजार होती. याशिवाय कार, जीप आणिअन्य चार चाकी वाहनांची संख्या ७५ हजारावर पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१३मध्ये मोटारसायकलची संख्या ५ लाख ४२ हजार होती. कारची संख्या ४० हजारपर्यंत होती. दोन वर्षांत कार आणि मोटारसायकलची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील एकुण वाहनांपैकी सुमारे ७५ टक्के वाहने शहरात वापरली जात आहेत. वाहनांचा वापर वाढल्यामुळे शहराच्या वायू प्रदूषणाचीही पातळी वाढत चालली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली किंवा मोकळ्या जागेचा वापरासाठी जुन्या झाडांची होणारी कत्तलीमुळे प्रदूषणामध्ये अधिकच भर पडला आहे.

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या नोंदींनुसार; शहरात झाडे नसल्यामुळे धुळाचे प्रमाणही वाढत चालले आहे. शहरात सध्या धुळीचे प्रमाण १५० मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटरची नोंद करण्यात आली आहे. ते अपेक्षित प्रमाणाच्या तुलनेत ५० मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटरने जास्त आहे. याशिवाय ट्रक, ट्रक्टर, डिझेल वाहनांसह कचरा किंवा प्लास्टिक यांच्या ज्वलनामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. शहरात सल्फरडाय ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचे यांचेही प्रमाण वाढत आहे.

पाच सेंटर वाढविण्याचा प्रस्ताव

शहरातील‌ जिल्हाधिकारी कार्यालय, कडा ऑफिस आणि औरंगपुरा या भागातील हवेचे नमुने घेतले जातात. आगामी काळात शहराचा चिकलठाणा, शहागंज, वाळूज, वसंतराव नाईक चौक, बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी हवेचे नमुने घेण्यासाठी नवे आरडीएस मशीन लावण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई, पुण्यात सुधारणा

नॅशनल एअर क्वॉलिटी प्रकल्पांतर्गत सरस्वती भुवन महाविद्यालयाने शहरातील तीन ठिकाणी तपासणी केली. या तपासणीतील निष्कर्षांची तुलना अन्य शहरांशी केली जाते. मुंबई आणि पुण्यात सीएनजी इंधनाचा वापर होत आहे. त्याचबरोबर जुन्या वाहनांच्या वापरावर निर्बंध आणले आहे. त्यामुळे तेथे वायू प्रदूषण नियंत्रणात येत आहे. औरंगाबाद शहरात मात्र घातक वायुंचे प्रमाण वाढत आहे. औरंगाबाद शहरात प्रदुषणाचे प्रमाण नाशिक शहरापेक्षाही जास्त असल्याचे या प्रकल्पांतर्गत केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.

आधुनिक वाहनांमुळे प्रदूषणाला ब्रेक

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांमध्ये जुन्या वाहनांचा प्रदूषण अधिक होत होता, मात्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या नव्या वाहनांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रदुषणाला काही प्रमाणात का होईना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईत निर्बंध घातलेली वाहने लहान शहरांत वापरण्यात येतात. औरंगाबादेतही अशी वाहने आणण्यात आली आहेत. त्यामुळे प्रदुषणात वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नाही. प्रत्येकांने वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचा प्रयत्न करावा. आपल्या वाहनांमुळे वायू प्रदूषण होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. शहरातील प्रत्येकाने वातावरण शुद्ध राहावे म्हणून प्रयत्न केल्यास प्रदूषण कमी होईल.

- प्रा. रेखा तिवारी, प्रकल्प प्रमुख, नॅशनल एअर क्वॉलिटी प्रकल्प, सरस्वती भुवन शिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी ठरल्यास अजितदादांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

आघाडी सरकारच्या काळातील जलसंपादा खात्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत कोर्टाच्या निर्देशावरून अँप्टी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी म्हणणे सादर करण्याची संधी 'एसीबी्रने दिली. हा त्यांच्या तपास प्रक्रियेतील भाग आहे. भाजप सरकार या सिंचन घोटाळ्यातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना दिले.

प्रथम संबंधितांना लेखी प्रश्नावली पाठवून त्यांचे लेखी उत्तर मागविली जातात. त्यानंतर गजरेनुसार चौकशीसाठी पाचारण केले जाते, अशी एसीबीच्या कामाची पद्धत आहे. या प्रक्रियेत भाजपाकडून अजित पवार यांना संरक्षण देण्यात असलेला आरोप तथ्यहीन आहे, असे त्यांनी सांगितले.

हवामानाच्या अचूक माहितीसाठी महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या यंत्रणेबरोबरच राज्य शासनाची स्वतंत्र यंत्रणाही सक्रिय करण्यात आली असून, याद्वारे शेतकऱ्यांना विभागवार अचूक माहिती मिळेल, असे ते म्हणाले.

भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचेच

भूसंपादन कायद्याबाबत गैरसमज पसरविण्याचा कार्यक्रम विरोधी पक्षाकडून चालू आहे. केंद्र व राज्य शासनाला गरज भासल्यास विकासासाठी म्हणूनच शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल. या जमिनीला बाजारभावापेक्षा सव्वाचार पट ‌अधिकचा दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुठेही आ‌र्थिक नुकसान होणार नाही. सरकार गरजेपेक्षा अधिकच जमीन खरेदी करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात विदेशवारी कशी करणार?

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

नियोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यास ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नकार दिला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना विदेशवारी करून हार-तुरे घेणे संवेदनशील मनाला पटत नाही. साहित्य संमेलन कुठेही झाले तरी अध्यक्ष होणार नसल्याचे महानोर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांना पत्राद्वारे कळविले आहे. महानोर यांच्या नकारामुळे संमेलन आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जुलै महिन्यात बैठक होणार आहे. मात्र, या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी कळविले आहे. टोरांटो शहरात ३ ते ५ ऑगस्ट २०१२ मध्ये चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. यावर्षी संमेलन जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. तसेच इतर देशांचाही पर्याय खुला आहे. जुलै महिन्यात महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य संमेलनाबाबत बैठक घेणार आहेत. या बैठकीपूर्वीच कवी महानोर यांनी डॉ. वैद्य यांना आपली भूमिका मांडणारे सविस्तर पत्र लिहिले आहे. 'दोन महिन्यांपूर्वीच वैद्य यांना पत्र पाठवले. या पत्राबाबत त्यांनी अजून जाहीर भूमिका मांडलेली नाही. 'संमेलन जोहान्सबर्ग काय, कुठेही झाले तरी अध्यक्ष होणार नाही' असे महानोर यांनी 'मटा'ला सांगितले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे महानोर औरंगाबाद येथे विश्रांती घेत आहेत. दरम्यान, महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. वैद्य सध्या अमेरिकेत असून ३० जूनला परतल्यानंतर संमेलनाबाबत ठोस भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

माझ्या कवितेवर आणि माझ्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केले. जाहीर सत्कार आणि मानाच्या पुरस्कारांनी साहित्याचा गौरव झाला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे योग्य नाही.

- ना. धों. महानोर, ज्येष्ठ कवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये बसला अपघात; ९ ठार

$
0
0


मटा ऑनलाइन वृत्त । नांदेड

नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला झालेल्या भीषण अपघातात ९ जण जागीच ठार झाले आहेत; तर काहीजण जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने समोरून धडक दिल्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातग्रस्त प्रवासी नांदेड येथील बरड गावचे रहिवाशी होते. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे होणाऱ्या लग्न समारंभासाठी वऱ्हाडाच्या दोन मिनी बस शुक्रवारी मध्यरात्री गुलबर्ग्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड विद्यापीठासमोरच्या रस्त्यावर बस पोहोचल्या असताना त्यातील एक बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात मिनी बसचा चक्काचूर झाला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास उशीर झाला. काही वेळानंतर ही घटना कळल्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाचंच स्मारक नको!- MIM

$
0
0

कुणाचंच स्मारक नको!- MIM

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद / मुंबई

अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासह शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांना एमआयएमनं विरोध केल्यानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जनतेच्या पैशातून स्मारकं उभारण्यापेक्षा त्या जागांवर हॉस्पिटल, शाळा उभारा अशी सूचना आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. परंतु, एमआयएमचा स्मारकांना असलेला विरोध राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही केला आहे.

औरंगाबादेत दूध डेअरीच्या दोन एकर जागेवर दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीही महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध होताच, औरंगाबादमधील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंडेंच्या स्मारकावर निशाणा साधत 'स्मारक संस्कृती'लाच विरोध केला आहे.

जनतेचे पैसे वापरून सरकारी जमिनीवर कुठल्याही नेत्याचं स्मारक उभारण्यास एमआयएमचा विरोध आहे. भाजप नेत्यांनी, विधानसभाध्यक्षांनी एकदा घाटी हॉस्पिटल किंवा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं. तिथे एमआरआय करण्यासाठी दीड-दोन महिने लागतात. हे चित्र दुर्दैवी आहे. त्यामुळे स्मारकासाठी जागा आणि पैसे खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल, शाळा उभारून त्याला नेत्यांची नावं द्यावीत, असं मत त्यांनी मांडलं. १९०० कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही आपला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला ही सूचना मान्य नसेल, तर जनतेच्या हितासाठी आम्ही कोर्टात दाद मागू, असा पवित्राही त्यांनी जाहीर केला. त्यावरून राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादेत दूध डेअरीच्या नियोजित जागेवरच होईल, हॉस्पिटलसाठी सरकार पर्यायी जागा देईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जलील यांना 'सेना स्टाइल'नं चपराक लगावली आहे. महापुरुषांची स्मारकं उभारायची नाहीत, तर मग अफझलखानाचं थडगं उभारायचं का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. एमआयएम वाद वाढवून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतंय, सामाजिक भान वगैरे जपण्याचा हा प्रयत्न नसून निव्वळ राजकारण आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही एमआयएमच्या सूचनेला विरोध केला आहे. महापुरुषांची स्मारकं पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असतात. देश आणि राज्य घडवण्यात ज्यांनी योगदान दिलं त्यांची स्मारकं सरकारी जमिनीवर का उभारू नयेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी जलील यांना केला आहे. सगळ्याच नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता हा वाद येत्या काळाच चिघळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीईटी परीक्षेत लातूरचा दबदबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

वैद्यकीय पूर्वप्रवेश परीक्षेत लातूरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी यश संपादन करीत दबदबा कायम ठेवला आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयातील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी १८० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. याच महाविद्यालयाचे विद्यार्थिनी निशा विठ्ठल पवार, विनय ओमप्रकाश भांगडीया, मयुर माणिकराव डख यांनी २०० पैकी १९४ गुण मिळविले आहेत. एकूण १२ जणांनी १९० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. १०१ विद्यार्थ्यानी १८० पेक्षा अधिक, १७० ते १५० गुण घेणारे एक हजार ३८८ विद्यार्थी आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, सचिव अॅड. नारायणराव पाटील, सहसचिव अनिरुद्ध जाधव, प्राचार्य एस. बी. जाधव, उपप्रचार्य श्रीमती एस. एम. दुरुगकर, सीईटी सेलचे समन्वयक प्रा. डी. के. देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी १८० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. २८ विद्यार्थ्यानी १७० गुण तर ३४६ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. ऋषीकेश हिरोळीकर यांनी २२० पैकी १८९ गुण मिळवुन महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सुरेश जैन, सीईटी सेलचे प्रमुख डॉ. चेतन सारडा, प्राचार्य जयप्रकाश दरगड यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येप्रकरणी नातेवाइकांचा ठिय्या

$
0
0

उस्मानाबाद : दारफळ (ता. उस्मानाबाद) येथील विवाहितेचा मृतदेह दत्तनगर येथील राहत्या घरात गुरुवारी (४ जून) दुपारनंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शुक्रवारी विवाहितेच्या नातलगांनी या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. या प्रकरणी पोलिस निरिक्षक डी. एस. शेख यांनी विवाहितेच्या नातलगांची समजून काढून तसेच या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला.

दारफळ येथील सुप्रिया भुलेकर हिचा सिनेगाव येथील रहिवाशी व सध्या दत्तनगर, उस्मानाबाद येथे राहणाऱ्या अॅड. प्रेमनाथ रणखांब यांच्याशी विवाह झाला. परंतु, पती प्रेमनाथ, सासरा सज्जनराव, सासू कृष्णाबाई, नणंद शैला यांच्याकडून बिअरबार सुरू करण्यासाठी तसेच घर बांधकामासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रूपये घेऊन ये म्हणून जाच केला जात होता. या जाचाला कंटाळून सुप्रियाने आत्महत्या केली अशी माहिती सुप्रियाचे वडिल पोपट भुत्तेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकर कारखान्याच्या साखरेचे पावसाने नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, बेंबळी परिसरात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यास‌ह पावसाने हजेरी लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याच्या गोदामवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात साखरेचे नुकसान झाले आहे. साखरेचा साठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन तात्पुरत्या गोदामावरील पत्रे उडून गेल्याने पावसामुळे मोठ्या प्रमाणात साखरेचे पोते भिजले आहेत. त्यासोबतच वादळी वाऱ्यामुळे सौर उर्जा प्रकल्प परिसरातील स्ट्रीट लाइटचे पोल उखडून पडले आहेत. त्याशिवाय काही इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरचे कंत्राट रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला अपयश आले आहे. कंपनीच्या कारभारामुळे शहरातील जनता कंटाळली आहे. मागील दहा महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. १५ जूनपर्यंत कंपनीने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर कंत्राट रद्द करावे, अशी मागणी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केली आहे.

राठोड यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिले आहे. 'महापालिकेने शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी वॉटर युटीलिटी कंपनीस खासगी तत्वावर काम देण्यात आले आहे. या कंपनीकडून गेल्या दहा महिन्यांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. कमी दाबाने, विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. नगरसेवक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांचे वाद होतात. तात्पुरती आश्वासने दिली जातात, पण कामे मात्र होत नाही. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे अजिबात ऐकत नाहीत. पालिकेचे अधिकारीही आम्हाला दाद देत नाहीत. कंपनीच्या कारभाराविषयी वर्तमानपत्रांमध्ये रकानेच रकाने भरून येतात, पण पालिका प्रशासन काहीच कारवाई करण्यास तयार नाही. ठिकठिकाणी होत असलेल्या भांडणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात गंभीर होऊ शकतो. २०१२ मध्ये जायकवाडीत कमी पाणी असतानाही शहरात पाण्याची अडचण झाली नव्हती. मात्र, आता कृत्रिम टंचाई भासवून शहरवासीयांना वेठीस धरले जात आहे. पालिकेचे अधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या. त्यात तोडगा काढण्यात आला, पण अंमलबजावणी मात्र शून्य आहे. १५ जूनपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावेत, जर त्याची अंमलबजावणी कंपनीने केली नाही. तर महापालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत स्वतःच्या ताब्यात घ्यावा. कंपनीचे कंत्राट रद्द करावे,' अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर पठाणकडून पिस्टल, काडतुसे जप्त

$
0
0

औरंगाबाद : अॅड. नीलेश घाणेकर बनावट गोळीबार प्रकरणी शनिवारी (६ जून) समीर पठाणच्या घरातून पोलिसांनी पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली. अॅड. घाणेकर यांच्या सांगण्यावरून राजू जहागिरदारचे हस्तक समीर पठाण व सय्यद मुजीबने हा गोळीबार केला होता. या प्रकरणातील सूत्रधार जहागिरदार अजून फरार आहे, तर अॅड घाणेकर कोठडीत आहेत. सय्यद मुजीबच्या जबाबानंतर गुन्हे शाखेने समीर पठाणला अटक केली होती. पठाणने गोळीबार करण्यासाठी वापरलेली पिस्टल गंगापूर येथील घरात कपड्याच्या पेटीत ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शनिवारी दुपारी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, सहायक फौजदार शेख आरेफ, जमादार अशोक नरवडे, शेख नवाब यांनी दोन पंचांसमक्ष पिस्टल आणि काडतुसे जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images