Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोकाट कर्मचाऱ्यांना दणका

$
0
0

औरंगाबादः मस्टरवर स्वाक्षरी करून कार्यालयाबाहेर फिरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी (६ जून) चांगला दणका दिला. या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा नोंदविण्यात आली.

सकाळी साडेदहाच्या सुमारास चौधरी जिल्हा परिषदेत आले. तेव्हा तीन जण बांधकाम विभागातून बाहेर जाताना दिसले. चौधरींनी कार्यालयात न जाता बांधकाम विभागाकडे कूच केले. कार्यकारी अभियंता भारतकुमार बावीस्कर आलेले नव्हते. कार्यालयात बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते. रजा आणि सुट्या किती जणांच्या आहेत याची चौकशी चौधरींनी केली. एका वरिष्ठ कर्मचाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्या हातात मस्टर देण्यात आले. कार्यालयात उपस्थित असणाऱ्या संख्येपेक्षा अधिक जणांनी स्वाक्षऱ्या केल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. हे कर्मचारी गेले कुठे याची चौकशी त्यांनी केली, पण समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दरम्यान आपल्या कार्यालयात सीइओ गेल्याची वार्ता कळताच बाहेर फिरणारे तीन कर्मचारी कार्यालयाकडे परतले. मात्र, सीइओ तिथेच असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण झाली. सीइओंनी तत्काळ कारवाईचे आदेश देत वरिष्ठ सहायक कैलास जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जाधव आणि कनिष्ठ सहायक भाले या तीन कर्मचाऱ्यांची संपूर्ण दिवसाची रजा नोंदविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉर्ड कार्यालयांची लागली वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या वॉर्ड कार्यालयात कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याचे खुद्द महापौर त्र्यंबक तुपे यांना शनिवारी निदर्शनास आले. कार्यालयीन वेळेनंतर बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे पाहून तुपे यांनी प्रशासनास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. उपायुक्त किशोर बोर्डे यांनी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला.

पालिकेला कर भरणा करण्यासाठी वॉर्ड कार्यालयांची स्थापना करण्यात आली. सकाळी नऊ वाजता कार्यालय सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र अकरा वाजले तरी कर्मचारी येत नाहीत, अशा तक्रारी महापौर तुपे यांच्याकडे काही दिवसांपासून आल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी तुपे यांनी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान वॉर्ड ब आणि ई कार्यालयांना भेट दिली. सिडकोतील वॉर्ड ब उघडलेले होते. कार्यालयीन हजेरी रजिस्टरप्रमाणे ५० पैकी केवळ सात कर्मचारी उपस्थित होते. वॉर्ड ईचे कार्यालय साडेनऊ वाजले तरी उघडलेले नव्हते. कार्यालयाच्या आवारात ४९ पैकी तीन कर्मचारी आलेले होते. वॉर्ड इंजिनीअरची कार्यालयेही ओस पडलेली होती. महापौर तुपे यांनी याची गंभीर दखल घेत आस्थापना अधिकारी पैठणे व एस. के. जोशी यांना बोलाविले. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करून यापुढे दक्ष राहण्याचा सूचना दिल्या. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. उपायुक्त किशोर बोर्डे यांनी आदेशाचे पालन करत उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड केला. नागरिकांची कामे कुठल्याही परिस्थितीत अडून राहू नयेत. यापुढे या चुका करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला.

यांत्रिकी विभागातही अनागोंदी

शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत महापौर तुपे यांनी यांत्रिकी विभागास भेट दिली. ड्रेनेजच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जेटिंग मशीन वेळेवर वॉर्डात जात नाही असे त्यांना दिसून आले. यांत्रिकी विभागातील रजिस्टरवर वाहने किती वाजता रवाना झाली याच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. विभागातील कारभार पाहून त्यांनी शिरसाट यांना सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शपथविधीला परवानगी नाकारली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

राजकीय दबाव आणि पोलिसांनी ऐनवेळेस परवानगी नाकारल्यामुळे स्वतंत्र मराठवाडयाच्या पहिल्या प्रतिकात्मक मुख्यमंत्र्याचा शपथविधी चमन गांधी चौकाऐवजी एका खासगी शाळेत घेण्यात आला. प्रतिकात्मक झालेल्या या शपथविधीमध्ये राज्यपाल झालेले मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तुकाराम राठोड यांना दिली.

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे संयोजक बाबा उगले यांना सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात बोलावून घेतले गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्यांना जमाव बंदी आदेश लागू असल्याने हा कार्यक्रम घेता येणार नाही असे सांगितले. दरम्यान, कदीम जालना पोलिस स्टेशनच्या वतीने उगले यांना सीआरपीसी १५९ अन्वये शांतता भंग होईल, असे वर्तन करण्याच्या शक्यतेवर प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे सकाळी अकरा वाजता ठरलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यात पांगापांग झाली. अखेर सरकारी दवाखान्याच्या बाजुला असलेल्या एका इंग्रजी शाळेच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. येत्या काही वर्षांत विदर्भ स्वतंत्र राज्य होणार आहे. त्यामुळे नागपूर करार आपोआपच संपुष्टात येईल आणि मराठवाडा विदर्भासोबत स्वतंत्र राज्य होईल असे प्रतिपादन अॅड. प्रदीप देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.

गेल्या ६५ वर्षांत मराठवाडा सातत्याने राज्यकारभारात अन्याय सहन करत आहे. सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात मागासलेपण आहे. येत्या पाच वर्षांत मराठवाडा मुंबई, पुणे यांच्या बरोबरीने पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले नाहीत. नागपूर करार संपुष्टात आला आहे असे देशमुख म्हणाले. राज्य सरकारला आपण नोटीस देत असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या राज्याची संकल्पना प्रशासकीय नियोजन चांगले करण्यासाठी उपयुक्त ठरते, हा धोरणात्मक निर्णय घेऊन छोटी राज्ये निर्माण झाली आहेत. त्यानुसारच मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण होणे अगदी अपरिहार्य आहे असे देशमुख म्हणाले. प्रारंभी राम गायकवाड यांनी प्रस्ताविक केले.

चमन गांधी चौकात मराठवाडाच्या या पहिल्या प्रतिकात्मक मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तयारी करण्यात आली होती. ढोल, पिपाण्या, टोप्या घातलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांनी अटक करण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात परवानगी नाही असे सांगितले. मग आम्ही खासगी जागेत कार्यक्रम घेतला.

बाबा उगले, संयोजक, मराठवाडा मुक्ती मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेत ७०-३० ची वाटाघाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्य सरकारची महामंडळे, विविध समित्यांवर भाजप - मित्रपक्षाला ७०, तर शिवसेनेला ३० टक्के वाटा मिळेल. या नियुक्त्या लवकरच होतील,' अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली. ते चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

अनेक वर्ष विरोधी बाकावर राहिल्यानंतर भाजप-शिवसेना महायुती राज्यात सत्तेवर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून विविध समित्या, महामंडळांवर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यांसदर्भात तावडे यांना विचारला असता ते म्हणाले, 'विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता लवकरच होईल. कार्यकर्त्यांना क्षमतेनुसार सामावून घेतले जाईल. या नियुक्त्या करताना भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना ७० टक्के, तर शिवसेना ३० टक्का वाटा दिला जाणार आहे. नावे निश्चित केले असून लवकरच जाहीर करू,' असे तावडे म्हणाले.

प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आठवड्यात

'प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे प्रदेश सरचिटणीससह, भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा येत्या आठ दिवसांत करणार आहेत,' अशी माहिती तावडे यांनी दिली. 'पक्षात प्रवेश केलेले नेते, कार्यकर्ते यांनाही क्षमतेनुसार पक्षसंघटना तसेच महामंडळांवर सामावून घेतले जाईल,' असे ते म्हणाले.

औरंगाबादला मिळणार संधी

विविध समित्या, महामंडळांवर कोणाची वर्णी लागणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना निश्चित प्राधान्य मिळणार, असे संकेत तावडे यांनी दिलेत. मात्र, नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ITI’साठी ७०ः३०चा फॉर्म्युला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी यंदा ७०ः३०चा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. तालुक्यातील आयटीआय प्रवेशासाठी तालुक्यातीलच विद्यार्थी असावेत, अशी अट शिथिल करण्यात आली असून तालुकाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागांवर आता प्रवेश देता येणार आहे. आयटीआय प्रवेशही यंदा महागला आहे. १८० रूपयांच्या शुल्कावरून प्रवेशाचे शुल्क ३,७५० रूपये विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत.

आयटीआय अभ्यासक्रमासाठीच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठीची ऑनलाइन प्रवेश सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेत यंदा अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्व जागांवर त्या-त्या तालुक्यातीलच विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जात होते. संबंधित तालुक्यातूनच विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी अशा प्रकारची अट होती. यंदा ती बदलण्यात आली असून ७० टक्के जागा तालुका पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित ३० टक्के जागांवर तालुक्याबाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांना मुळ तालुक्यासह तीस टक्के जागांवर प्रवेशासाठी हक्क सांगता येणार आहे.

आयटीआयच्या तालुका स्तरावरील काही ट्रेडच्या जागा रिक्त राहत आहेत. तर, काही ठिकाणी प्रवेशासाठी अधिक अर्ज असतात. यामुळे अनेकांना प्रवेशाची संधी मिळत नाही. याबाबी लक्षात घेत हे बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवेश महागला

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या शुल्कामध्ये यंदा मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश हवा असेल तर, विद्यार्थ्यांना यंदा अधिकचे पैसे मोजावे लागतील. यात संस्था विकास शुल्क, सांस्कृतिक कार्य शुल्काचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. वसतिगृह शुल्क २४० वरून १२०० रुपयांवर नेण्यात आले आहे. मागील वर्षापर्यंत एका ट्रेडसाठी १८० रुपये वार्षिक शुल्क होते. नव्या बदलानुसार प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

असे असेल शुल्क..

ट्रेडचा गट शुल्क

अभियांत्रिकी (मशिन) ३७५०

अभियांत्रिकी (बिगर मशिन) ३५५०

बिगर अभियांत्रिकी ३३५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात नऊ वऱ्हाडी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

वऱ्हाडाच्या बसला वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिल्याने ९ जण मृत्युमुखी पडले तर, २२ जण जखमी झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला.

बारड येथील शहारे कुटुंबीयांच्या लग्न समारंभासाठी वऱ्हाडाच्या दोन मिनी बस शुक्रवारी मध्यरात्री गुलबर्ग्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड विद्यापीठासमोरच्या एका बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. बसमध्ये ३० प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की, त्यात मिनी बसचा चक्काचूर झाला. रात्री रहदारी नसल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब झाला. काही वेळानंतर ही दुर्घटना कळल्यानंतर नागरिक मदतीला धावून आले. अपघातातील २२ जखमींना नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

मृतांमध्ये मधुकर हरिभाऊ भोकरे (वय ६०), शिवाजी हरिभाऊ भोकरे (वय ४८, रा. नुपूर ता. कळमनुरी जि. हिंगोली), विजयमाला राजकुमार पोफळे (वय ४२, रा. ब्राह्मणगाव ता. उमरखेड), उत्तम वामनराव शहरे (वय ६५, रा. बारड ता. मुदखेड), योगेश्वरी संजय लोनमोडे (वय ५, रा. रिठद जि. वाशिम), मथुराबाई मनोहर खरटे (वय ५०, रा. पोतरा ता. कळमनुरी), चालक बलविंदरसिंग (वय ४०), प्रेमला मधुकर भोकरे (वय ४०, रा.मुदखेड), पार्वतीबाई बापूराव गादीलवाड (वय ४५, रा. पांढरवाडी) यांचा समावेश आहे. माला अरुण कावळे (वय ४५, रा. पुसद), जयश्री संजय लोनमोडे (वय ३०, रा. रिठद जि. वाशिम), उज्वला गजानन कानडे (वय १७, रा. हिंगोली) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

आमदारांची मदत

शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर कुटुंबीयांबरोबर कंधार ते नांदेड प्रवासात होते. त्यांना अपघातग्रस्त वऱ्हाडी दिसले. त्यांनी जखमी प्रवाशांना नायगावचे शिवसेना कार्यकर्ते आनंद पाटील यांच्या मदतीने बाहेर काढून स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये पाठविले. अन्य खासगी वाहनांतूनही जखमींना उपचारांसाठी नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ विद्यापीठाला तारीख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद येथील मंजूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाला कुलगुरू मिळत नसल्याने विद्यापीठाचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत, कुलगुरूंची निवड झाल्यानंतर विद्यापीठाचे वर्ग तत्काळ सुरू होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर'बाबत (एसपीए) केंद्राकडून सूचना येणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात विधी विद्यापीठाचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर अशा तीन ठिकाणी हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. त्याचे वर्ग केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप साशंकता आहे. शिक्षणमंत्री शनिवारी शहरात होते. त्यांनी विद्यापीठ लवकरच सुरू होईल असे पत्रकारांशी बोलताना सां‌गितले. विद्यापीठासाठी कुलगुरू कोणाला नेमायचे हे सुप्रीम कोर्टाने अद्याप स्पष्ट केलेले नाही, यामुळे शासन पुढे हालचाल करू शकत नाही. कुलगुरूपदाचे नाव निश्चित झाल्यानंतर विद्यापीठ सुरू करण्याची प्रक्रिया तत्काळ राबविली जाईल त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर'ही संस्था केंद्राच्या अखत्यारीत असून त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर या संस्थेलाही गती येईल असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला एमआयएम पक्षाने केलेला विरोध योग्य नसून यातून कोणत्या धर्माच्या भावना दुखावणार नाहीत. योग हा कोणत्या धार्मिक चौकटीत बसविण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. यासह शाळांना याबाबत सक्ती करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

'क्लॅट'साठी नोंदणी

लॉ युनिव्हर्सिटीसाठी औरंगाबादमध्ये करोडी येथे ५० एकरची जागा घेण्यात आलेली आहे. यासह नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसाठी देशपातळीवर होणाऱ्या 'कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट'साठी (क्लॅट) नोंदणी झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. इंडियन बार कौन्सिलतर्फे देशपातळीवरील चौदा विद्यापीठांसाठी ही परीक्षा घेतली जाते. औरंगाबादमध्ये उभारण्यात येणाऱ्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसाठी लागणारा २१० कोटी रूपयांच्या खर्चाचा आराखडाही शासनाकडे पूर्वीच सादर करण्यात आलेला आहे.

शाळा बंद करणार नाही

ज्या शाळांमधील पटसंख्या कमी आहे, अशा शाळा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा योग्य नाही. तशा प्रकारचा कोणताही शासनाचा विचार नसल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले. तशा प्रकारची केवळ सूचना करण्यात आली होती. ती सरकारने स्वीकारलेली नाही, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात विदेशवारी कशी करणार?

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

नियोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यास ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी नकार दिला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना विदेशवारी करून हार-तुरे घेणे संवेदनशील मनाला पटत नाही. साहित्य संमेलन कुठेही झाले तरी अध्यक्ष होणार नसल्याचे महानोर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांना पत्राद्वारे कळविले आहे. महानोर यांच्या नकारामुळे संमेलन आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रयत्न सुरू असून, याबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जुलै महिन्यात बैठक होणार आहे. मात्र, या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे नियोजित अध्यक्ष ना. धों. महानोर यांनी कळविले आहे.

वेगवेगळ्या कारणांनी संमेलन सतत तीन वर्षे रद्द झाले. या वर्षी संमेलन जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. जुलै महिन्यात महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य संमेलनाबाबत बैठक घेणार आहेत. पण, महानोर यांनी दोन महिन्यांपूर्वीच वैद्य यांना आपली भूमिका सविस्तर पत्राद्वारे सांगितली आहे. या पत्राबाबत त्यांनी अजून जाहीर भूमिका मांडलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहभागातून नदी पुनरुज्जीवनाचा ‘रेणापूर पॅटर्न’

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

लोकवर्गणीतून शाळा बांधणे, रस्ते तयार करणे, पाणी पुरवठा करणे याची महाराष्ट्राला एक परंपरा आहे. परंतु, निसर्गाने निर्माण केलेल्या पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी गाव एकत्र येऊन नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा लोकवाटा जमा करण्याचा अनोखा प्रयोग लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे यशस्वी होत आहे.

लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, नाला सरळीकरण, नदी खोलीकरणाचे जलसंधारणाचे विविध कामे सुरु आहेत. अशास्वरुपाची कामे रेणापूर तालुक्यात ही सुरू आहेत. रेणापूर तालुक्यातून वाहत जाऊन लातूर तालुक्यातील मांजरा नदीला मिळणाऱ्या रेणा नदीचे पात्र अंकुचन पावत गेले आहे. त्यामुळे कालांतराने नदीला पाणी आले तर नदी काठच्या शेत जमिनीतील पिकाचे नुकसान होऊ लागले. गाळामुळे नदीचे पात्र ही भरून गेले त्यामुळे नदीची अवस्था बिकट झाली. त्यामुळे या नदीचे खोलीकरण करणे, रुंदीकरण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर नदीच्या खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

रेणा नदीच्या पात्राची लांबी ही साडेचार किलोमीटर आहे. ही नदी पुढे मांजरा नदीला जाऊन मिळते. रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी नदीच्या दोन्ही बाजुनी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या खोलीकरणातून निघालेला गाळ शेतकरी स्वता:च्या शेतावर टाकून जमीन सुपीक करून घेत आहेत. सध्या तीन किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे.

हे काम करीत असताना शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली येत आहे. परंतु, येथे कोणतही अधिग्रहण नाही किंवा पूनवर्सनाची समस्या निर्माण होत नाही. शेतकरी स्वखुषीने रुंदीकरणासाठी जमिनी देत आहेत.

रेणा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्याच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यासोबत तीन बैठका झाल्या. त्यामध्ये रमाकांत वाघमारे, अच्युत कातळे, बालाजी इस्ताळकर आणि दगडु भिकाणे यांनी लोकवाटा जमा करण्याची जबाबदारी घेतली.

व्यापारी संघटनेचे रमाकांत वाघमारे म्हणाले, 'पहिल्यांदा आम्ही एकरी तीन हजार रुपये वर्गणी ठरवली. त्याला शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. वैशिष्टे म्हणजे ज्यांना या पाण्याचा थेट लाभ होणार नाही अशा शेतकऱ्यांनीही गावचे भले होणार म्हणून वर्गणी दिली आहे.'

आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे प्रकल्प प्रमुख महादेव गोमारे म्हणाले, 'रेणा नदीच्या खोलीकरणाच्या कामातून ४० एकर पडीक जमिन पेरणी योग्य बनवली आहे. तर ६० एकर जमिन सुपीक केली आहे. एकूण नऊ लाख ४५ हजार घनमिटर इतक्या गाळाचा उपसा करण्यात आला आहे. खोलीकरणामुळे १०८ कोटी लिटर पाणी क्षमता निर्माण होणार आहे.

जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या कामाला तीन वेळा भेट देऊन पाहणी केली आहे. विशेष बाब म्हणून तीन किलोमिटर रुंदीकरण केलेल्या नदीच्या पात्रात दोन गॅबीयन बंधारे बांधण्याची मंजुरी दिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी त्याच भुमिपूजनही करण्यात आले आहे. गॅबीयन बंधारे हे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यानी दिल्या आहेत. पहिल्या पावसाचाही फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि शेतकरी घेत असल्याचे हे आगळे-वेगळे उदाहरण आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानाप्राप्त हॉटेल्सवरच थांबणार बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

फुकटचा नाश्ता व जेवण शिवाय कमिशनची रसद मिळणाऱ्या अनधिकृत हॉटेल्स व धाब्यावर एसटी थांबावून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या चालक आणि वाहकांना एसटी महामंळाने आता चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी महामंडळाचा अधिकृत परवाना असलेल्या हॉटेल्स किंवा धाब्यावरच गाडी थांबविण्याचे आदेश महामंडळाने सर्व संबंधित विभाग नियंत्रकांना दिले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्याबरोबरच हॉटेल चालकांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट ही थांबणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे चालक आणि वाहक त्यांच्या वैयक्तिक लाभापोटी मनमानी करीत आहेत. महामंडळाने सुचीत केलेल्या ठिकाणी गाडी न थांबविता फुकट जेवण किंवा नाश्ता शिवाय वरून दलाली मिळणाऱ्या हॉटेलवर किंवा धाब्यावर ते गाडी थांबवून प्रवाशांना वेठीस धरतात. या ठिकाणी हॉटेल चालक प्रवाशांना दर्जेदार पदार्थ देत नाहीत. शिवाय पदार्थाचे दरही भरमसाठ लावून लुटतात. शिवाय अशा हॉटेल्समधून प्रवाशांसाठी प्रसाधन गृह देखील उपलब्ध नसतात. त्यामुळे विशेषकरून महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. त्यासोबतच प्रवाशांचा वेळही वाया जातो. ही बाब प्रवाशांनी एसटी महामंडळासहीत परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता एसटी महामंडळाने या मनमानी कारभाराला चाप लावण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

महामंडळाने करार केल्या हॉटेलवरच आता बस थांबावी अशा सक्त सूचना विभाग नियंत्रकांना देणयात आल्या आहेत. याशिवाय या हॉटेल मालकांकडून व्हॉल्वो बसच्या प्रत्येक फेरीला १६०रुपये, निमआराम बसससाठी ११० रुपये आणि साध्या बसच्या थांब्यासाठी ८५ रुपये आकार वसूल करावयाचा आहे. वाहकाला हे कर वसूल केल्याची पावती हॉटेल मालकाला द्यावी लागेल. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढण्याबरोबरच कारभारात सुसुत्रता येणार आहे. याशिवाय प्रवाशाला सुद्धा अशा ठिकाणी सर्व सोयी व सुविधा उपलब्ध होवून त्यांचा प्रवास सुखकर व आरामदायक होण्यास मदत होईल. ज्या मार्गावर प्रवास आठ तासांपेक्षा अधिक असता अशा मार्गावर बस चालक आणि वाहक यांच्यासाठी महामंडळाकडून बस स्थानकात जेवण्याची व्यवस्था केलेली असते. तरी सुद्धा त्यांचा ओढा हा बाहेर मिळणाऱ्या फुकटच्या जेवणाडेच अधिक असतो.

उस्मानाबाद-बीड हे अंतर १२० किला मीटर आहे. या प्रवासातही सरमकुंजडी येथे चालक व वाहक वाहन थांबवून येथील फुकटच्या अल्पोपहाराचा किंवा भोजनाचा आस्वाद घेण्यात वेळ घालवितात. यासाठी ते प्रवाशांच्या वेळेची कसलीही चिंता नसते. त्यामुळे प्रवाशांना उस्मानाबाद बीड चा सुमारे दोन सव्वा दोन तासाच्या प्रवासासाठी सुमारे साडेतीन तास बसमध्ये रखडून राहावे लागते. काही बसेसतर उस्मानाबादहून अठरा किमी अंतरावर येडशी धाब्यावर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी थांबवित असल्याने प्रवशांची गैरसोय होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIM विरोधात शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणारे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे लातूरात दहन करण्यात आले. आमदार जलील यांच्या निषेधाच्या घोषणा देत अचानकपणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जलील यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे सकाळी शिवाजी चौकातील वाहतूक ‌काही काळ विस्कळीत झाली होती. या आंदोलनात सेनेचे जिल्हा प्रमुख, संतोष सोमवंशी, बालाजी भोसले, माजी जिल्हा प्रमुख अॅड. बळवंत जाधव, पप्पु कुलकर्णी, सुभाष काटे, नगरसेवक रवी सुडे, विष्णु साठे, सुनिता चाळक, त्र्यंबक स्वामी, नागेश माने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात रोहिण्या बरसल्या

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यात सर्वत्र रविवारी दुपारी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. बीड, लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. या दमदार पावासामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधना नदीला पूर, आला आहे. वीज पडल्याने वाल्हा (ता. भूम) परिसरातील एका बैलाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा लाभला आहे. पेरणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

बीडमध्ये पावसाची हजेरी

बीडः बीड जिल्ह्यात रविवारी दुपारी रोहिण्या बरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्ष केली जात आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी उन्हाळयात उन्हाचा पारा वाढला होता. रविवारी सकाळपासून उकाडा वाढलेला असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागात रोहिण्या बरसल्या. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असून शेतातील मशागतीची कामे उरकून रोहिण्या बरसल्याने मृगात पेरणीयोग्य पाऊस पडेल अशी आशा या पावसाने निर्माण झाली आहे. बीड तालुक्यातील नेकनूर, मांजरसुंबा परिसरात तासभर पाऊस पडला. त्यामुळे हलक्या रानात पाणी साठले होते. केज, अंबाजोगाई, परळी, गेवराई परिसरात हा पाऊस पडला आहे.

उस्मानाबादमध्ये आगमन

उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र रविवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. या दमदार पावासामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधना नदीला पूर, आला आहे. वीज पडल्याने वाल्हा (ता. भूम) परिसरातील एका बैलाचा मृत्यू झाला. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याची चिंता कमी झाली आहे.

वीज पडल्याने वाल्हा येथील शेतकरी नारायण शेळवणे यांचा बैल मृत्यूमुखी पडला. यावर्षी‌ही पावसाचे आगमन उशीरा होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण होते. रविवारी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा आता पेरणीच्या कामाला लागला आहे.

लातूर जिल्ह्यात पाऊस

लातूरः मृग नक्षत्राच्यापूर्व संध्येला रविवारी दुपारी लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसापुर्वी ढगाचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरू होता. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, चाकुर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. निलंगा आणि उदगीरला ढग दाटून आले होते. रेणापूरात दुपारी तीन वाजल्यानंतर पाऊस सुरू झाला. एक तास दमदार पाऊस झाला. काही वेळ अत्यंत लहान आकाराच्या गाराही पडल्याचे ग्रामस्थानी सांगितले. लातूरात अर्धातास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर काहीकाळ रिमझीम पाऊस सुरू होता.

जालन्यात रिमझिम पाऊस

जालनाः जालना जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली. पेरणीसाठी अजून दमदार पावसाची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनाचा साठा जप्त; तस्कर मात्र पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण वाहतूक पोलिसांनी चंदन चोरांचा पाठलाग करुन एका दुचाकीसह ६१ हजार रुपयांचा माल जप्त केला. मात्र चोर त्यांच्या हाती लागले नाहीत. ही कारवाई शनिवारी फुलंब्री-राजूर रस्त्यावर कारवाई करण्यात आली.

ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी हुकूमसिंग डांगर व त्यांचे पथका शनिवारी ( ६जून) सकाळी दहाच्या सुमारास फुलंब्री भागात बेशिस्त वाहनाधारकांविरोधात कारवाई करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघेजण जात होते. ट्रीपल सिट असल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र ते राजूरच्या दिशेने वेगात निघाले. यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच दुचाकीवरील तिघांनी पिंपळगाव गांगदेवच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा पाठलाग सुरूच असल्याने दुचाकी आणि पांढऱ्या रंगाची गोणी टाकून ते शेतातून पळून गेले. गोणीमध्ये चंदनाचे लाकडे असल्याचे आढळले. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ गॅस सिलिंडर भंगार दुकानातून जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंगारची १९ दुकाने असून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर फक्त चार दुकानांचीच तपासणी करण्यात आली. या कारवाईत भंगार दुकानदाराकडे पाच गॅस सिलिंडर सापडले आहे.

शहरातील चोऱ्यांमधील माल भंगारच्या दुकानात विकला जातो. ही दुकाने चोरीचा माल लपवण्यासाठीची ठिकाणे आहेत, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे चोरांवर जरब बसविण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी भंगार दुकानांची तपासणी मोहीम राबविली. वाळूजमध्ये राबविलेल्या कारवाईत काही संशयित साहित्यासह पाच गॅस सिलिंडर सापडले आहेत. पोलिसांनी चार भंगार दुकानदारांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. या परिसरातील कारखान्यांमध्ये सतत चोऱ्या होतात. विशेषतः बंद कारखान्याच्या परिसरातील यंत्रांवर चोरांचा डोळा असतो. या परिस्थितीत पोलिसांनी तपासणी करताना हा मुद्दा लक्षात घेतला नसल्याची चर्चा आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशप्रमाणे हद्दीतील भंगार दुकानाची तपासणी करण्यात आली. त्यात संशयित वस्तू, गॅस सिलिंडर सापडले आहेत. यापुढेही काही संशय आल्यास पुन्हा कारवाई करण्यात येईल.

रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज परिसरातील चोऱ्यांमुळे घबराट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात दोन मोटारसायकलींची चोरी, काही दुकानांत चोरीचा प्रयत्न व एका अॅपेरिक्षाचालकाकडून प्रवाशाचा मोबाइल हिसकवून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांत भीती व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात वडगाव कोल्हाटी येथून घरासमोर उभी केलेली एक मोटारसायकलची चोरी झाली. त्यानंतर या परिसरात भीमाशंकर भगवान चौधरी यांची दुचाकी (एम.एच.२०, डी.एच.४३३२) 27 मे रोजी चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तिरंगा चौकाकडून रांजणगाव शेणपुंजी येथे जाताना एका अॅपेरिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने विष्णू मुक्ताराम शिंदे (रा. रांजणगाव शेणपुंजी) यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून घेतला. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन कृष्णा दिनकर गरड (वय १८, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर), सय्यद वसीम सय्यद अजीज (रा. इंदिरानगर, पंढरपूर) या दोघांना शुक्रवारी (५ जून) अटक केली.

वाळूज महानगरमध्ये शिवसेनेतर्फे वृक्षारोपण

शिवसेना शाखेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार चंद्रकांत खैरे हस्ते सिडको वाळूज महानगरच्या साऊथ सिटी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी साऊथसिटी परिसरात दोन हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प शिवसनेने केला आहे. यावेळी तालुकाप्रमुख बाप्पा दळवी, विष्णू जाधव, नागेश कुठारे, संभाजी धोंडरे, रामनाथ गडगुळ, रमेश कोकीळ, मनोहर बंडकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्र्यांच्या आदेशाला ‘खो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कमी दराने बियाणे देण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरली आहे. कापूस बियाण्याचे पाकिट शंभर रुपये कमी दराने विक्री करण्याची सूचना कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी कंपन्यांना केली होती; मात्र खरीप हंगाम सुरू झाला तरी कृषीमंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी झाली नाही. राज्य सरकार फक्त दिशाभूल करीत असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन बियाणे कमी दरात उपलब्ध करण्याबाबत कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सूचना केली होती. मुंबईत झालेल्या बैठकीत खडसे यांनी शेतकऱ्यांना किमान १०० रुपये कमी दराने बियाणे उपलब्ध करण्याच येईल. याबाबत बियाणे कंपन्यांना सूचना केली आहे. बियाणे कंपन्यांनी कमी दरात विक्री केली नाही तर, राज्य शासन अधिसूचना काढून दर कमी करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले होते. तसेच २५ हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये निम्म्या दरात कापूस व मका बियाणे देण्याचा प्रस्ताव होता. प्रत्यक्षात खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना सवलतीत बियाणे मिळाले नाही.

साडेचारशे ग्रॅमचे कापूस बियाणे पाकीट ९३० रुपयांना उपलब्ध आहे. राज्य सरकारने किमतीबाबत योग्य भूमिका घेतली असती तर पाकीट ८३० रुपयांना मिळाले असते; मात्र ही चर्चा एका बैठकीतच संपुष्टात आली. बियाणे कंपन्यांनी कृषीमंत्र्यांची सूचना मान्य केली नाही. तसेच निर्धारीत किमतीत बियाणे विक्री केली. सध्या खरीप हंगामासाठी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी केली आहे. बिटी कॉटन वाणाला सर्वाधिक मागणी असून जिल्ह्यातील बाजारपेठांत बियाणे संपले आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय निव्वळ दिशाभूल करणारा ठरला आहे. टंचाईग्रस्त तालुक्यातही स्वस्त बियाणे मिळाले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी लागवडीची तयारी केली आहे. सरकारी निर्णय लांबणीवर पडणार असल्यामुळे बियाणे विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, किमतीबाबत कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही तर, सरकार अधिसूचना काढून दर कमी करील असे खडसे यांनी सुनावले होते. कृषीमंत्र्यांच्या सूचनेची कंपन्यांनी दखल घेतली नसल्याने नेहमीच्या दराने बियाणे विक्री सुरू आहे.

बियाण्यांचे अर्थकारण

राज्यात बिटी कॉटन, मका आणि सोयाबीन बियाणे विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्यात अधिकृत १०४ बियाणे कंपन्या आहेत. फक्त कापूस बियाणे विक्रीतून पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. राज्य सरकार शेतकरी हितासाठी बियाणे स्वस्त करण्याचा निर्णय घेणार असले तरी बियाणे कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, बियाण्यांची पाकिटे वर्षभरापूर्वीच तयार होतात. त्यामुळे ऐनवेळी किंमत कमी करणे शक्य नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.

बियाणे स्वस्त करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. स्वस्त बियाण्यांबाबत उद्या (८ जून) निर्णय होण्याची शक्यता आहे.

- विकास देशमुख, कृषी आयुक्त

बियाणे कमी किमतीत मिळण्याची अपेक्षा होती. सरकारने लवकर निर्णय घेतला नसल्यामुळे नाईलाजाने चढ्या किमतीत बियाणे खरेदी केले. या आठवड्यात लागवड करणार आहे.

पुंजाराम पवार, शेतकरी, मुर्शिदाबादवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा खासगी आयटीआयमधील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. मराठवाड्यात शासकीय ८२ व खासगी ३५ आयटीआयमध्ये १९,५६५ प्रवेश क्षमता आहे.

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया ५ जूनपासून सुरू आहे. सोमवारपासून प्रवेशाला गती येईल, असे संस्थांचे प्रतिनिधी सांगत आहेत. मागील वर्षीपर्यंत शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. यंदा खासगी आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खासगी संस्थामधील ८० टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून, तर २० टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जाणार आहेत. शासकीय, खासगी आयटीआयची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार रोखले जातील, विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत सोमवारपासून (८ जून) प्रवेश अर्ज निश्चिती केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चित करावयाचा आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण आल्यास त्याबाबत माहितीसाठी प्रत्येक आयटीआयमध्ये मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. दररोज सकाळी १० ते ११ या दरम्यान हे मार्गदर्शन सत्र असेल.

४९ पैकी १० ट्रेडला मागणी

मराठवाड्यात शासकीय व खासगी आयटीआयची संख्या ११७ एवढी आहे. यामध्ये विविध ४९ ट्रेड शिकविले जातात. यात इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फॅशन टेक्नॉलॉजी, ड्रेस डिझाइन, आयटी, कम्प्यूटर ऑपरेटर, टर्नर, फिटर, वेल्डर, टॅक्टर मेकॅनिक, वायरमन अशा ट्रेडचा समावेश आहे. सर्वाधिक जागा वेल्डर, इलेक्ट्रिशियन, ड्रेस मेकिंग, फिटर, कम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट यांची आहे. या ट्रेडची प्रवेश क्षमता एक हजारपेक्षा अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिटमिटा येथील मिडोस हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. छावणी पोलिसांच्या दिरंगाईमुळे मृतदेह रस्त्यावरच भर पावसात अर्धा तास पडून होता. शेख जुबेर शेख हमीद (वय १९ रा. मिटमिटा) हा तरूण मिडोस हॉटेल समोरून रस्ता ओलांडत होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात जुबेरचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी छावणी पोलिसांना तात्काळ ही माहिती दिली. मात्र, अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जुबेरचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. शेख जुबेर मजुरी काम करीत होता. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा कोंडतोय श्वास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंज, औरंगपुरा प‌रिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण पोलिसांनी हटवले होते. मात्र, पोलिसांचे या भागात दुर्लक्ष होताच पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

पोलिस आयुक्त ‌अमितेशकुमार यांनी शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी शहागंज येथील फेरीवाले तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभे राहणारे टेंपोचे अतिक्रमण हटविले होते. औरंगपुरा परिसरातील भाजीमंडई येथील अतिक्रमण देखील काढण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईने काही दिवस हा परिसर मोकळा झाला होता. मात्र, पोलिसांचे या भागाकडे दुर्लक्ष होताच फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडण्यास सुरूवात केली आहे.

रस्त्याच्या कडेला तसेच चौकात फेरीवाल्यांची गर्दी दिसून येत आहे. यामध्ये फळ विक्रेते तसेच भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे.‌ जिल्हा प‌रिषदेच्या बाहेर असलेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण देखील हटवण्यात आले होते. या ठिकाणी देखील बूट विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरूवात केली आहे. वाहतूक शाखेने औरंगपुरा व शहागंज परिसरात अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सातत्याने करणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला महागला, आंबे झाले स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळा सुरू होत असल्याने आंबे स्वस्त झाले आहेत. त्यामुळे सध्या भाजी महाग व आंबे स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत अनेकजण रोज आमरस पोळीवर ताव मारत आहेत. सध्या भाजीपाला ९० ते १२० रुपये किलो, तर आंबे १० ते ४० रुपये किलोने विकले जात आहेत. भाजीपाला महागला तरी आमरसाने जेवणाची गोडी वाढवली आहे.

पंधरा दिवसांपासून आंब्याची विक्री वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून रोज सुमारे १५० क्विंटल आंबे येत आहेत. पावसाने वर्दी दिल्याने आंब्याची रविवारी नेहमीपेक्षा दुप्पट विक्री झाली, असे जर्नादन जाधव या विक्रेत्याने सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगपुरा, उस्मानपुरा, पीरबाजार, टीव्ही सेंटर परिसर, पुंडलिकनगर येथे आंब्यांला उठाव होता. केसर १० ते ३० रुपये, बदाम २० ते ३०, लंगडा ३० ते ४० आणि गावरान आंबे १० ते २० रुपये किलो या दराने विकले गेले. 'गुजरातहून आंब्याची आवक वाढली आहे. हापूस, लंगडा, केसरी, पायरी, बदामी आणि गावरान आंब्याची विक्री वाढली आहे,' असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असून ती महिनाअखेरपर्यंत कमी कमी होत जाईल.

गेल्या वर्षी आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त होते. यावर्षी आवक वाढल्याने दर उतरले आहेत. भाज्या महाग झाल्याने आंब्यांवर ताव मारला जात आहे. भाज्या महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे, परंतु त्यांना आंब्याच्या गोडव्याने दिलासा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images