Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​एकनाथ संस्थानच्या कारभाराबद्दल तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ महाराज संस्थानच्या व्यापारी संकुल बांधकाम व वाटपात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बंडेराव सालजोशी यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे. संस्थानतर्फे नाथ समाधी मंदिर परिसरात व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. या व्यापारी संकुलाचे बांधकाम व गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे केली नाही. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप धर्मदाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. संस्थानच्या विश्वस्त मंडळावर व विशेषतः कार्यकारी विश्वस्तांवर गंभीर आरोप असलेले पत्रक बंडेराव सालजोशी यांनी शहरात वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

विश्वस्त मंडळाने संत एकनाथ समाधी मंदिराला मिळणारे उत्पन्न व खर्च याचा लेखाजोखा जाहीर करण्याचेही आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. यासाठी शहरातील नागरिकांची कृती समिती स्थापन करून आंदोलन करणार असल्याचे सालजोशी यांनी सांगितले. दरम्यान, व्यापारी संकुलाचे बांधकाम व भाडेतत्त्वावर देताना गैरप्रकार झाला नाही. माझ्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याबद्दल शंका असल्यास धर्मदाय आयुताकडे तक्रार करावी, अशी बाजून नंदुसेठ लाहोटी यांनी मांडली आहे.

कशाचा आधारे नियुक्ती

संस्थानवर गैरकारभाराचे आरोप असताना एक दशकापासून नंदुसेठ लाहोटी यांचीच कार्यकारी अध्यक्षपदावर कोणत्या आधारावर नियुक्ती करण्यात येते, याची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीचा मांडकीत विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील मांडकी येथे घरात जाऊन एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (८ जून) रात्री घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी घरात एकटी असतांना गणेश मच्छिंद्र आव्हाड हा घरात गेला व तिच्याशी वाईट वर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत तिचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला असता गणेश, त्याचे चुलत भाऊ राहुल साईनाथ आव्हाड, सागर साईनाथ आव्हाड व आशाबाई साईनाथ आव्हाड या चौघांनी त्याला मारहाण व शिविगाळ केली, अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे. त्यानुसार गणेश आव्हाड, राहुल आव्हाड, सागर आव्हाड व आशाबाई आव्हाड यांच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव व हवालदार एस. के. दीक्षित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवऱ्याने गळा चिरला, पण ती पोलिसांमुळे बचावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

चाळीसगाव घाटात पत्नीचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. शुद्धीवर आल्यानंतर या महिलेने कन्नड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने तिचे प्राण वाचले.

'कन्नड पोलिस ठाण्यात मंगळवारी (९ जून) सकाळी एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत आली. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. तिचे नाव सोनाली नामदेव तुपे (वय २३) असून ती औरंगाबाद येथील गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. तिचा पती नामदेव साहेबराव तुपे याने सोमवारी (८ जून) चाळीसगाव घाटातील जंगलात दुचाकीवरून नेले. तेथे चाकूने मानेवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती या महिलेने दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर यांनी सांगितले,' अशी माहिती हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर यांनी दिली. परंतु, या महिलेची अवस्था पाहून स्वप्ना शहापूरकर, हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, पोलिस शिपाई टी. सी. मुंडे यांनी तिला स्वतः सोबत जाऊन औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने या महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यानंतर याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही घटना कन्नड पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर चाळीसगाव घाटात घडली आहे, पण गुन्हा नोंद करण्याआधी महिलेचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरच्या मोबाइल शॉपीचालकावर गुन्हा

0
0

औरंगाबाद : वैजापूर येथील एका महिलेच्या आधारकार्डच्या झेरॉक्स कॉपीचा गैरवापर करून मोबाइल शॉपीचालकाने दुसऱ्या व्यक्तीस सिमकार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात सिमकार्ड खरेदीदार व वर्धमान टेलिकॉम शॉपीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासणीत वैजापूर तालुक्यातील भायगाव बिलोणी येथील गोकुळ संजय कदम हा इतर व्यक्तीच्या नावे खरेदी केलेले सिमकार्ड वापरत असल्याची माहिती पथकप्रमुख संजीव भोसले यांना मिळाली. त्याआधारे भोसले, लक्ष्मीकांत सपकाळ, सुनील बोराडे, दिलीप चंदनसे, सुनील खरात या कर्मचाऱ्यांनी तपास केला. मूळ सिमकार्ड नावे असलेल्या महिलेकडे दुसऱ्यास सिमकार्ड वापरण्यास दिले आहे का, याची चौकशी करण्यात आली. तेव्हा या महिलेने हा मोबाइल क्रमांक खरेदी केले नाही, असे सांगितले. कागदपत्रांचा गैरवापर करून वैजापूर येथील वर्धमान टेलीकॉम शॉपी येथून सिमकार्डची विक्री झाल्याचे समोर आले. सिमकार्ड खरेदी करणारा गोकुळ कदम, शॉपीचालक संचेती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलकांमुळे नाशिक रोडवर धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अरूंद नाशिक रस्ता व रस्त्याकडेला लावलेले अनधिकृत फलक यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अनधिकृत फलक आणि रस्त्याला खेटून असलेल्या अतिक्रमाणांमुळे पुढून येणारे वाहन दिसत नसल्याची पडेगाव, मिटमिटा भागातील नागरिकांची तक्रार आहे.

पडेगाव, मिटमिटा या भागातून नाशिक रस्ता जातो. हा रस्ता अरूंद असून त्यावर प्रामुख्याने जड वाहनांची वर्दळ आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहती वाढल्या आहेत. लोकसंख्या वाढल्याने दररोजची वर्दळ वाढली आहे. परंतु, कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकाला सायंकाळी सुरक्षित घरी जाऊ की नाही, याची भीती सतावत आहे. या परिस्थितीत रस्ता चौपदरीकरणाची मागणी करण्यात येत आहे. किमान दौलताबाद टी पॉइंटपर्यंत रस्ता चौपदरी करावा, त्यावर गतिरोधक टाकावेत, झेब्रा क्रॉसिंग व इतर वाहतूक सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी आहे. या भागातील देवगिरी व्हॅली, आर्नअंगण सोसायटी, तारांगण हाउसिंग सोसायची, राम-गोपालनगर, मीरानगर, सुंदरनगर, कासंबरी दर्गा परिसर, मिस्बाह कॉलनी, तोरणागड हाउसिंग सोसायटी येथील नागरिकांनी नगरसेवक रावसाहेब आमले व सुभाष शेजवळ यांची भेट घेऊन वाहतूक समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारे अतिक्रमण, अनधिकृत फलक काढावेत, अशी मागणी होत आहे.

नाशिक रस्त्यावर लोकसंख्या वाढली आहे. या भागातील नोकदार, कामगार यांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. पण रस्ता अरूंद असल्याने वाहने नीट चालवता येत नाहीत. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे.

- श्रीकांत क्षीरसागर

या रस्त्यावरील वाहतूक व अरूंद रस्त्यामुळे सतत अपघाताची भीती असते. कामावरून घरी सुरक्षित जाऊ की नाही याची खात्री नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे फ्लेक्स व हॉटेलांच्या अतिक्रमणामुळे पुढून येणारे वाहन दिसत नाही.

- गणेश राऊत

अनधिकृत फलक, दिशादर्शक फलक, गतीरोधक योग्य ठिकाणी नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लहान मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक व रेडिमय पट्ट्या लावण्याची गरज आहे.

- कृष्णा कदम

नाशिक रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे. पोलिस व नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठरवेल तर वाहतुकीला शिस्त लागेल. येथ‌ील रहिवाशांचे जगणे सुसह्य होईल.

- योगेश तुपे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निजामकाल‌ीन गझल गायकीचा अखेरचा दुवा बेपत्ता

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तेलंगणामधील निजामकालीन सुप्रसिद्ध गझलकार, सुफी गायक विठ्ठलराव आत्माराम शिवपूरकर बारा दिवसांपूर्वी शिर्डी येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांचे कुटुंबिय त्यांच्या शोधासाठी सर्वत्र फिरत आहेत, मात्र अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. शिर्डी, औरंगाबाद, नगर, नाशिक या शहरांमध्ये ते असावेत, असा अंदाज त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. एका पत्रकार परिषदेत नातलगांनी विठ्ठलरावांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.

विठ्ठलरावांची मुलगी संध्या राव, सीमा राव व भाचे, तहसिलदार रूपेश शिंगारे यांनी सांगितले, '२९ मे रोजी ८५ वर्षीय शिवपूरकर यांना घेऊन संध्या राव साई दर्शनासाठी मुख्य मंदिरात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यही सोबत होते. सर्वजण दर्शन घेत असतानाच विठ्ठलराव बेपत्ता झाले. त्या परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. स्मृतीभ्रंश झाल्याने त्यांना मोबाइल नंबर किंवा आपला पत्ताही सांगता येणार नाही.'

कुटुंबियांनी शिर्डीसह कोपरगाव, राहता येथेही शोध घेतला. काही दिवसांपूर्वी कोपरगाव येथे एका ढाबा चालकाने त्यांना पाहिल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही त्यांचा शोध लागू शकला नाही. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामधील त्यांचे अनुयायीही शोध घेत आहेत.

फाईंड विठ्ठलराव

विठ्ठलराव यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी फाईंड विठ्ठलराव नावाचे वेब पेज तयार केले आहे. या वेब पेजवर त्यांचे फोटो आणि त्यांच्याविषयी माहिती टाकण्यात आली असून ज्यांना त्यांची माहिती आहे, अशांनी या वेब पेजवर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांच्या शिष्या इंदिरा नाईक यांनी केली आहे.

तेलंगणा शासनाने घेतली दखल

विठ्ठलरावांच्या शोध मोहिमेची माहिती तेलंगणा सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर राज्य शासनाच्या वतीनेही निजाम राजवटीतील गझल गायकीच्या या अखेरच्या दुव्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरून प्रवासी वाहतूक

0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

स्कॉर्पियो कारवर महाराष्ट्र शासन लिहून त्यामधून प्रवासी वाहतूक करणारी दोन वाहने गुन्हेशाखेने जप्त केली. बाबा पेट्रोलपंप ते नगरनाका रोडवर मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अडवल्यानंतर पलायन करणाऱ्या या वाहनांना पाठलाग करून पकडण्यात आले.

गुन्हेशाखेचे पोलिस पथक बाबा पेट्रोलपंपाकडून नगरनाक्याकडे जात असताना त्यांना जालना पासिंगच्या दोन कार जाताना आढळल्या. या कारच्या पुढे व पाठीमागील काचेवर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते. तसेच त्यामध्ये महिला प्रवासी बसविण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा गुन्हेशाखेच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी ही वाहने थांबविण्याचा इशारा केला. यावेळी या वाहन चालकांनी पोलिसांना न जुमानता पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी कार (क्रमांक एमएच २१ अेएक्स २२८१) व (एमएच २१ अेएक्स २१८१) ताब्यात घेत कारचालक शेख जावेद शेख अन्वर (रा. अंबड रोड, जालना) व भाऊसाहेब भगवान शेरे (रा. खरपुरी, जालना) यांना अटक केली. ही वाहने कोणत्या सरकारी कार्यालयातील आहेत तसेच कोणत्या अधिकाऱ्याची आहेत याबाबत चौकशी त्यांच्याकडे करण्यात आली असता त्यांनी खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिल्याचे कबूल केले. तसेच शेख जावेदकडून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यासारखे ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले. आरोपींविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल सातोदकर, मछिंद्र ससाणे, भीमराव आरके, सतिश साळवे, रमेश भालेराव, प्रभाकर राऊत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा मंगळसूत्र पळवले

0
0

औरंगाबाद : मंगळसूत्र चोरट्यांनी पुन्हा सलामी देत मंगळवारी दुपारी सिडको एन-७ भागातून शिक्षिकेचे मंगळसूत्र पळविले. शहरात २४ तास चार्लीचा पहारा असताना चोरट्यांनी हा गुन्हा करून पोलिसांना आव्हान दिले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव रोडवरील मिनाक्षी रमेश गाडेकर (वय ३४) या सिडकोतील धर्मवीर संभाजी शाळेत शिक्षिका आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजता शाळेतून त्या घरी जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या. यावेळी एन-७ परिसरातील सिडको पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर पाठीमागून दोघेजण दुचाकीवर आले. मिनाक्षी गाडेकर यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटकेतील बुकीने टीपद्वारे दुसऱ्या बुकीला केले पसार

0
0

विजय देऊळगावकर, औरंगाबाद

आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या बुकींच्या टोळीला गुन्हेशाखेने अटक केली. या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी नरेश पोतलवाडने जप्त मोबाइमधून शहरातील एका बुकीला पसार होण्याचा मेसेज केल्याचे उघड झाले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

१५ मे रोजी गुन्हेशाखेने शहरातील विविध भागात छापे टाकून सहा बुकींना अटक केली. हा तपास सायबरसेलकडे सोपवण्यात आला. नरेश पोतलवाडलाही सायबरसेलच्या ताब्यात देण्यात आले होते. १९ मे रोजी पोतलवाडने जप्त केलेल्या मोबाइलवरून एका बुकीला मॅसेज केला. यामध्ये 'शहरसे भाग जा - क्राईम,' असा उल्लेख होता. सूत्रांकडून ही माहिती पोलिस आयुक्त ‌अमितेशकुमार यांना समजली. त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली असता हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. पोतलवाडने त्याच्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या नावांनी बुकींचे नाव व नंबर सेव्ह केले होते. त्याची माहिती विचारण्यासाठी चौकशीदरम्यान त्याच्या हातात मोबाइल देण्यात आला असता, त्याने अधिकाऱ्यांची नजर चुकवून हा मेसेज सेंड केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीने चौकात केक कापणारा गुंड जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढदिवसाचे औचित्य साधत भर चौकात तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड संदीप पहेलवानची मस्ती पोलिसांनी उतरवली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली.

बेगमपुरा भागातील संभाजी चौकात राहणाऱ्या संदीप माणिकराव खरात उर्फ संदीप पहेलवान. त्याने काही दिवसांपूर्वी स्वतःचा वाढदिवस आपल्या साथीदारासोबत भर रस्त्यात तलवारीने केक कापून साजरा केला. एका जागरुक नागरिकाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मोबाइलवर व्हॉट्स अॅपद्वारे हा फोटो पाठवला. आयुक्तांनी याची तत्काळ दखल घेत संदीपला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तसेच बेगमपुरा भागातील दुसरा कुख्यात गुन्हेगार विष्णू बलवंत गायकवाड उर्फ विष्णू पहेलवान (रा. थत्ते हौदाजवळ, बेगमपुरा) याला देखील ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आयुक्तांनी केलेल्या चौकशीत संदीपने तलवारीने केक कापल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून तीन फुटाची तलवार जप्त केली असून, बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच विष्णू पहेलवानविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेश थिटे, नसीमखान, द्वारकादास भांगे, विजयानंद गवळी, प्रदीप शिंदे, संदीप क्षीरसागर, अमर चौधरी आदींनी केली.

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार

संदीप पहेलवान या गुंडावर खून, खुनासहीत दरोडा, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे बेगमपुरा, वडोदबाजार तसेच सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर विष्णू पहेलवान विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, मारहाण आदी गुन्हे सिटीचौक, जिन्सी, बेगमपुरा, मुकुंदवाडी व चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

शहरातील टॉप टेन पोलिस ठाणी व टॉप ट्वेंटी गुंडावर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील कोणी गुन्हेगारी किंवा गुंड‌गिरी करणार असेल, तर त्याची खैर नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसार कंत्राटदारांच्या प्रॉपर्टीला टाळे ठोकणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीमध्ये घातक रसायने सोडणाऱ्या टोळीतील तीन मुख्य कंत्राटदार अद्याप पसार आहेत. हे आरोपी गुजरात, मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना फरार घोषित करण्यात येणार असून, त्यांची मालमत्ता सील करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

खाम नदीमध्ये घातक रसायने सोडणाऱ्या टोळीला २८ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये सुमित खांबेकर, आगाखान, तुषार पाखरे, अस्लम शेख यांच्यासह साथीदाराचा समावेश होता. स्टरलाइट कंपनीचे हे रसायन असल्याचे स्पष्ट झाले होते. कंपनीने ठाणे येथील आर. सी. मेहता याची जेटसन्स कंपनी, वापी (गुजरात) येथील प्रकाश चित्रोडा याची शिवम सोल्यूशन कंपनी आणि मध्य प्रदेशातील खारगौन येथील आशिष जैन व अनिलसिंह परिहार यांच्या बालाजी क‌ेमिकल इंडस्ट्रिजला कंत्राट दिले होते. आरोपीमध्ये या कंत्राटदारांचाही समावेश आहे. ठाणे येथील मेहता या कंत्राटदाराला अटकपूर्व जामीन मिळाला आहे, मात्र अन्या कंत्राटदार पसार आहेत. त्यांना फरार घोषित करून त्यांच्या मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीमंडई नसल्याने पायपीट

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज महानगर सिडकोच्या नगर १ मधील नागरिकांसाठी बांधण्यात आलेली भाजीमंडई बांधल्यापासून बंदच आहे. सिडकोने मंडई सुरू करण्यासाठी कोणतीच हालचाल केली नसल्याने नागरिकांना भाजी खरेदीसाठी पायपीट करावी लागत आहे.

सिडकोने वाळूज महानगर प्रकल्प सुरू केल्यानंतर येथे अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गट यांच्यासाठी गृहप्रकल्प उभारले आहेत. सर्वसामान्य कामगारांसाठी उभारलेल्या प्रकल्पात नागरिकांच्या सोईसाठी सिडकोने इतर सुविधांसोबत भाजीमंडई बांधली आहे. येथे राहणारे प्रामुख्याने कामगार असल्याने घराजवळ भाजीपाला उपल्ब्ध व्हावा यासाठी सिडकोने वडगाव कोल्हाटी रस्त्यावर ही मंडई बांधली आहे. त्याचा लाभ सिडको व वडगावातील नागरिकांना होईल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजीमंडई बांधून दहा वर्ष उलटले तरी ती अद्याप सुरू झालेली नाही. सिडकोने डागडुजीशिवाय मंडईबद्दल निर्णय घेतलेला नाही.

सिडकोकडून मंडई सुरू केली जात नसल्याने येथील नागरिकांना भाजी खरेदीसाठी पायपीट करत मोहटादेवी चौकात जावे लागते. सिडकोने सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली, पण मंडईबद्दल निर्णय घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंडईची ही जागा वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरही सिडकोने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सिडको केवळ डागडुजी करून पांढरा हत्ती पोसणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणचे रस्ते धोकादायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारी न केल्याने व भूमिगत गटाराच्या कामामुळे, पहिल्याच पावसानंतर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांते चिखल होऊन खचले आहेत. या निसरड्या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही कठीण होत आहे.

नगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई केली जाते. यावर्षी मोजकेच नाले स्वच्छ करण्यात आले. शिवाय एकवर्षापासून शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदाराने शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवले आहेत. सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान जवळपास एकतास जोरदार पाऊस पडला. पाऊसानंतर गागा भट्ट चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील परिसर, शिवाजी चौक, बसस्थानक चौकात गुडघ्याएवढे पाणी तुंबले होते. गागा भट्ट परिसरात नव्यानेच तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता खचला. येथे भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेल्या वीस फुट खोल खड्ड्यात पाणी साचले. भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून माती तेथेच टाकण्यात आली आहे. चिखलामुळे रस्ते निसरडे होऊन त्यावरून चालणे व वाहन चालविणे मुश्किल झाले. याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिकेने लक्ष घालून पावसाळ्यात सुरक्षित रस्ते द्यावेत, असे मत येथील नागरिक अमर खंडागळे यांनी व्यक्त केले. याबद्दल विचारणा करण्यासाठी संपर्क करूनही नगरपालिकेचे अधिकारी उपलब्ध झाले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंताचा अपघातात मृत्यू

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दौलताबाद रोडवर ‌काळीपिवळी, पिकअप व्हॅन व दुचाकीचा‌ विचित्र अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडली. या अपघातात दुचाकीवर ट्रिपल‌सीट जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मुत्तलिक याचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नुकत्याच निकाल लागलेल्या बारावी परीक्षेत मुत्तलिक ८२ टक्के गुणांसह पास झाला होता.

मुत्तलिक रज्जाक अब्दुल रज्जाक (वय १८, रा. लेबर कॉलनी) हा तरूण त्याचे मित्र शेख शकील (वय २०) व नबीलखान (वय २२) यांच्यासोबत दुचाकीवर दहा वाजता घराबाहेर पडला होता. पैठण रोडवरील गेवराई येथील कॉलेजमध्ये त्यांनी शेख शकीलचा टिसी घेतला. यानंतर नबीलखानचा दाखला घेण्यासाठी तिघे ट्रिपलसिट खुलताबादकडे निघाले होते. यावेळी दौलताबाद पोलिस ठाण्यासमोर दुचाकी चालवत असलेल्या मुत्तालिकने समोरून जाणाऱ्या काळीपिवळीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळीपिवळीने अचानक ब्रेक दाबल्याने मुत्तालिकची दुचाकी काळीपिवळीवर जाऊन आदळली. त्याचवेळी पाठीमागून आलेली पिकअप व्हॅन त्यांच्या दुचाकीवर आदळली. दोन्ही वाहनांच्यामध्ये दुचाकी आल्याने तिघे गंभीर जखमी झाले. यातील मुत्तालिकचा मृत्यू झाला. जखमी शकील व नबीलखानला उपचारासाठी घाटीमध्ये हलविण्यात आले. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. या अपघाताची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात घेण्यात आली.

मुत्तालिक बारावीतील गुणवंत विद्यार्थी

मुत्तालिकचा नुकताच बारावीचा निकाल लागला होता. यामध्ये त्याला ८२ टक्के गुण मिळाले होते. त्याला पुढे उच्चशिक्षण घ्यायचे होते. मित्रांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी जात असताना ही दुर्देवी घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांनी थक‌‌िवले एक कोटी

0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

शहरातील दहा हॉटेलांनी तब्बल एक कोटी रुपयांचा सेवाकर बुडविल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून या कराची वसुली करण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवाकर विभागाने नोटीस बजाविल्या असून, वसुलीची मोहीम सुरू केली आहे. हे हॉटेल व्यावसायिक बीड बायपास, शेंद्रा, मिटमिटा रोड आणि नाशिक रोड या भागातील आहेत.

सेवाकराच्या माध्यमातून जास्त महसूल देणाऱ्या व्यवसायात हॉटेलचा समावेश आहे. शहरातून गेल्या वर्षी १६५ कोटींचा सेवाकर वसूल करण्यात आला होता. त्यावेळी थकबाकीदार असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावून वसुली करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून सेवाकर वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सेवाकराची सुमारे सहा सेवा क्षेत्रातून सर्वाधिक वसुली करण्यात येते. त्यात कमर्शिअल कॉम्प्लेक्स व निवासी बांधकाम, मनुष्यबळ विकास सेवा पुरवणारे उद्योजक व संस्था, हॉटेल व बार, गुड्स ट्रान्सपोर्ट, अचल संपत्तीची निर्मिती करणारे उद्योग यांचा समावेश आहे. त्यांचा आकडा ४००हून अधिक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या सर्वांकडून २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात सुमारे २६५ कोटी रुपये सेवाकर वसूल केला जाणार आहे.

सेवाकर बुडविणारे हॉटेल्स

सूर्या लॉन्स, मधुबन, बार्बेक्यू, बलबीर, लुधियाना पंजाब, मिडोज हॉटेल आणि शेंद्रा रोडवरील ४ धाबे यांचा त्यात समावेश आहे. या सर्वांकडे सुमारे एक कोटीचा सेवाकर थकित आहे. त्यांना केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क आणि सेवाकर आयुक्तालयाच्या सेवाकर विभागाने नोटीस बजाविल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ आता सीपींच्या रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठ्यावरून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी 'समांतर'च्या कारभाराचा अहवाल मागविला आहे. दरम्यान, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती दिलीप थोरात यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास 'समांतर'चा बँड वाजवण्याचा इशारा पहिल्याच दिवशी दिला तर, एमआयएमच्या नगरसेवकांनी पाणीप्रश्नी बुधवारी 'समांतर'च्या कार्यालयालाच कुलूप ठोकले.

शहराचा पाणीपुरवठा एक महिन्यापासून विस्कळित आहे. असे असताना समांतर जलवाहिनी या योजनेचे कर्तेधर्ते मात्र नामानिराळे झाले आहेत. त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शहराच्या काही भागात चार तर, काही भागात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी 'समांतर'च्या विरोधात शड्डू ठोकले तर, रमजानच्या महिन्यात पाण्याची आबाळ होऊ नये म्हणून एमआयएमचे नगरसेवकही आक्रमक झाले.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा संपला होता. मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. यावर्षी जायकवाडीत जिवंत साठा आहे. तरीही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. नगरसेवकांनाही आंदोलनाचे हात्यार उपसावे लागले.

गेल्यावर्षी पाणीपुरवठा महापालिकेकडे होता. यावर्षी हे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविले आहे. कंपनी पाण्याची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. नक्षत्रवाडी, कोटला कॉलनी आणि सिडको एन ५ येथील जलकुंभावर खासगी टँकरचीच संख्या जास्त असते. त्याचा परिणाम म्हणून जलकुंभांवर व शहराच्या विविध भागांत कायदा सुव्यवस्थेची निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी 'समांतर'च्या कारभाराचा अहवाल पोलिस निरीक्षकांकडून मागविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळातील सणासुदीचे दिवस लक्षात घेता पाण्यावरून होणारी भांडणे परवडणारी नाहीत. बेशिस्त वाहतूक, गुन्हेगारी आणि अतिक्रमणांविरुद्ध कायद्याचा बडगा उचलल्यानंतर पोलिस आयुक्तांनी समांतरकडे लक्ष वळविले अाहे.

'...तर 'समांतर'चा बँड वाजवावा लागेल'

औरंगाबादः नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसेल तर 'समांतर'चा बँड वाजवावा लागेल, असा इशारा महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती दिलीप थोरात यांनी दिला. पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारण्यासाठी 'समांतर'च्या कंपनीला एक महिन्याचा अवधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर बुधवारी दिलीप थोरात पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीप्रश्न बिकट झाला आहे. यासंदर्भात थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, 'पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावायचा याबद्दल सर्वांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढला जाईल. पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेत सुधारणा झालीच नाही तर या कंपनीचा बँड वाजवावा लागेल. त्यासाठी गरज पडली तर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची देखील आमची तयारी आहे, योग्य भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू.'

'समांतर'बद्दल नेमके काय सुरू आहे, वाद कशामुळे निर्माण होत आहेत याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. या समस्येचे निराकरण कसे करता येईल त्यासाठी प्रयत्न करू.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नांच्या मुळापर्यंत

0
0

>> रवींद्र टाकसाळ

एखाद्या यंत्रणेला कणखर नेतृत्व मिळाल्यास ती यंत्रणा कोणती करामत करू शकते, या प्रत्यय सध्या औरंगाबादकरांना मिळत आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी औरंगाबादकरांना शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आहे. घाटीमधील हाणामारी असो की, शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो, ज्या ज्या गोष्टींमुळे कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या सर्व प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे एकीकडे शहराला शिस्त लागत आहे तर दुसरीकडे गुंडांच्या उरात धडकीही भरली आहे.
..........

पोलिस आयुक्तांनी कारभार हाती घेताच सर्वप्रथम रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना चाप लावला. शहरात सुरू असलेल्या अवैध बारवर त्यांच्याच आदेशानुसार पोलिसांनी कारवाई केली. अनेक तळीरामांची उचलबांगडीही केली. यामुळे रात्री उशीरापर्यंत सुरू असणारे धंदे संबंधित भाऊ-दादांना गुंडाळावे लागले. त्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यामुळे अनेक वर्षांनंतर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. केवळ कारवाई करून सगळेच प्रश्न सुटणार नाहीत हे ज्ञात असल्यामुळेच तज्ज्ञांच्या मार्फत रिक्षाचालकांसाठी वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळाही घेण्यात येत आहे. कणखर नेतृत्व मिळाल्यामुळेच शहरातील पोलिसांना मोठे बळ मिळाले आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आयुक्तांचा धाक असा निर्माण झाला आहे की, राजकीय नेतेही आपल्या कार्यकर्ते, समर्थकांसाठी एखाद्या पोलिस स्टेशनला फोन करण्याच्या भानगडीत पडत नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

घाटी परिसरात असाच एक प्रकार समोर आला. येथील आपल्या दुकानदाराचे अतिक्रमण काढले जात असल्याचे त्या दुकानदाराने राजकीय नेत्याला फोन करून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले, परंतु हे अतिक्रमण पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीतच काढले जात असल्याची माहिती कळताच तो भाऊ (नेता) घाटीकडे फिरकलाच नाही.

आपले कोणीही काहीच करू शकत नाही अशो तोऱ्यात असलेल्या दादा, भाऊ यांनाच आयुक्तांनी सर्वप्रथम रडारवर घेतले आहे. या सर्वांना आयुक्तालयातच बोलावून यापुढे कायद्याने वागा, अशी तंबी देण्यात आली. आयुक्तांचा हा इशाराच या भाऊ-दादांना पुरेसा ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत भर चौकात तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड संदीप पहेलवानची मस्तीही पोलिसांनी उतरवली. केक कापतानाचा फोटो एका सजग नागरिकाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्वारे हा फोटो पाठवला होता. त्यावरून आयुक्तांनी तातडीने कारवाई केली. त्यामुळे सगळ्या दादांचे धाबे दणाणले आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त स्वतः दक्षता घेत आहेत व उपाययोजना करीत आहेत. घाटीमध्ये वारंवार होणाऱ्या मारामाऱ्या, अतिक्रमणांच्या प्रश्नांसाठी पोलिसांना वारंवार त्यात आपला वेळ घालवावा लागतो, हे लक्षात घेऊन आयुक्तांनी घाटी परिसराची पाहणी केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा करीत प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आयुक्त घाटीत जाताच या परिसरातील अतिक्रमणे गायब झाली. यासोबतच शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पाणी प्रश्नावरही त्यांनी लक्ष घातले आहे. त्यासाठी समांतरच्या कारभाराचा अहवालच त्यांनी मागविला. आगामी काळ हा सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे शहरात पाण्यावरून भांडणे होऊ नये हाच त्यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. एकूणच शिस्तीने आणि नियमानुसार न वागल्यास कारवाई होईल अशी भीती आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यात या निमित्ताने पोलिसांना यश आले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शहराची प्रतिमा सुधारण्यास मदतच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील अधिकाऱ्यांना भरली ‘सीपीं’ची धडकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर'चा प्रकल्प पोलीस आयुक्तांच्या रडारवर आल्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि या प्रकल्पांच्या कर्त्याधर्त्यांना धडकी भरली आहे. पोलिस आयुक्तांनी प्रकल्पाची बारिकसारिक चौकशी सुरू केल्यास अनेक गोष्टी उघड होऊ शकतील, असे मानले जात आहे. त्यामुळे आयुक्तांसमोर 'समांतर'बाबत जास्त काही उघड होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न केले जाण्याचीच शक्यता आहे.

शहरातील पाणीपुरवठा एक महिन्यांपासून विस्कळित झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि नगरसेवक कमालीचे त्रस्त आहेत. पाणीप्रश्नावरूनच वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. पाण्यावरून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्त आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्व पोलिस निरीक्षकांकडून त्यांनी 'समांतर'बाबत अहवाल मागिवला आहे.

पोलिस आयुक्तांच्या कामाचा धडाका लक्षात घेता 'समांतर'शी संबंधित गुंतलेल्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी कंपनीबरोबर केलेला करार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात असल्याची भावना निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना शहराच्या पाणीपुरवठ्यात नेमकी अडचण काय, करारानुसार काम केले जात आहे का, करारातील कोणत्या अटी सर्वसामान्यांसाठी जाचक ठरणाऱ्या आहेत, त्या अटींमागे महापलिकेचे अधिकाऱ्यांचा आणि कंपनी यांचा काय उद्देश होता आदींची सखोल चौकशी पोलिस आयुक्तांकडून होऊ शकते, असे लक्षात आल्यामुळे या योजनेशी संबंधित असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेत आज गुरूवारी 'समांतरही आता पोलीस आयुक्तांच्या रडारवर' याचीच चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ दिवसांत ३ हजार स्मार्टफोनची बक्षिसी

0
0

पालकांनी गुणवंतांचा हट्ट पुरविला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी-बारावीच्या निकालानंतर चार दिवसांत ३ हजार स्मार्टफोन, १ हजार साधे मोबाइल आणि जवळपास २०० टॅब्लेटची विक्री झाली आहे. निकालानंतर आपल्या मुलासाठी बक्षीस म्हणून हे फोन खरेदी करण्याकडे जास्तीत जास्त पालकांचा कल होता, असे शहरातील मोबाइल विक्रेत्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

अगदी १० वर्षांपूर्वी मोबाइल घेणे ही मोठी बाब असायची. काळ आणि गरजा झपाट्याने बदलल्या. बक्षीस म्हणून पूर्वी पेन, पुस्तक, आवडीचा ड्रेस मिळायचा. आता त्याची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. सध्या ४ हजारांपासून २० हजारांपर्यंत स्मार्टफोन मिळतात. अपडेट व्हर्जनचे स्मार्टफोन, अँड्राइड फोन बक्षीस म्हणून मुलांना घेऊन देणे आई-बाबांना अभिमानाचे वाटत आहे. शिवाय स्मार्टफोनच्या उतरलेल्या किंमती, सुलभ हप्त्यांवर मिळणारे नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोनने दहावी-बारावीच्या निकालाचा आनंद द्विगुणित केला आहे. बारावीपेक्षा दहावीच्या निकालानंतर स्मार्टफोन विक्रीत वाढ झाली आहे.
---

- शहरात स्मार्टफोनची ५० दुकाने.
- ४ दिवसांत २०० टॅब्लेटची विक्री.
- ४ दिवसांत ३,००० स्मार्टफोनची विक्री.
- ४ दिवसांत १,००० बेसिक फोनची विक्री.
- मे, जूनमध्ये स्मार्ट फोन विक्रीत ३० ट्क्के वाढ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉलिटेक्निक डिप्लोमामध्ये नापास झाल्याने विद्यार्थिनीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजीनगर भागात गुरूवारी सकाळी हा प्रकार उघड झाला असून नीलम शब्बीर नदाफ (वय १९) असे या तरुणीचे नाव आहे.

नीलम ही एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. नुकत्याच लागलेल्या निकालात ती नापास झाली होती. तसेच तिचे प्रथम वर्षाचे देखील काही विषय बाकी होते. या गोष्टीमुळे नीलमला नैराश्य आले. गुरूवारी रात्री तिने घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्टडीरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. वडिलांनी नीलमला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नीलमचा मृतदेह अंत्यविधीसाठी सांगली येथील मूळगावी नेण्यात आला.
.....

उच्चशिक्षित कुटुंब
नीलमचे वडील बजाज कंपनीमध्ये इंजीनियर आहेत. तसेच नीलमचा भाऊदेखील इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तिच्या आत्महत्येमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images