Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छावा-शिवसंग्राममध्ये हाणामारी

$
0
0
आमदार विनायक मेटेंवर आरोप करत अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण जागर मेळाव्यात अचानक हजेरी लावली आणि परिषद उधळून लावली. त्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

महिलांनी प्रवाशाला लुबाडले

$
0
0
दोन महिलांनी बाहेरगावच्या प्रवाशाला मारहाण करीत लुबाडल्याची घटना बुधवारी अंजली टॉकीजसमोर घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटीत पुन्हा स्वतंत्र स्वाइन फ्लू वॉर्ड

$
0
0
औरंगाबादकरांना काळजीत टाकणा-या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने घाटी प्रशासनाने वर्षभरापूर्वी बंद केलेला स्वाइन फ्लू वॉर्ड पुन्हा एकदा कार्यान्वित केला आहे.

विस्तार अधिका-यास लाच घेताना अटक

$
0
0
तुळजापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी वाय. के. चव्हाण यांना दहा हजार रुपयांची लाच घेत असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.

दोन कुबेरांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला २४ तास उरले असून या लढतीतून दोन कुबेरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विद्यापीठात भरणार ‘शाळा’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘केंद्रीय विद्यालय’ सुरू करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ व मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

रजिस्ट्रीसाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर

$
0
0
मालमत्ता खरेदी-विक्री, करारनामे व अन्य दस्त नोंदणीच्या (रजिस्ट्री) कामकाजात नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे रविवारी (१७ ऑगस्ट) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

आमदार सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0
अंभई (ता. सिल्लोड) येथील सामाजिक सभागृहाच्या कामाची सुरू असलेली चौकशी दाबण्यासाठी खोटे दानपत्र तयार केल्याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह इतर अकरा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश सिल्लोड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी अजिंठा पोलिसांना दिले आहेत.

नदीपात्रातील ओघ आटला

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमधून नदीच्या पात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे प्रमाण लगेचच कमी करण्यात आले, मात्र तीन प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांच्या आठ कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे.

आरक्षणाचा लढा तीव्र करणार

$
0
0
‘मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले पाहिजे, यासाठी अनेकांचा विरोध पत्करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संपूर्ण सरकार पणाला लावले होते. त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकार पणाला का लावत नाही?’

जामगाव शिवारात बिबट्या पकडला

$
0
0
गंगापूर परिसरातील जामगाव शिवारातील गणपती बारो या परिसरात बिबट्या पकडण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. सकाळी पकडलेल्या या बिबट्याला संध्याकाळपर्यंत गौताळा अभयारण्यात सोडण्यात आले.

'शिवसंग्राम'च्या कार्यक्रमात धुडगूस

$
0
0
शिवसंग्राम संघटनेच्या मराठा आरक्षण जागर परिषदेत शनिवारी, छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडघूस घातला. परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या छावाच्या कार्यकर्त्यांना, शिवसंग्रामच्या संतप्त कार्यकर्त्यांनी स्टेजवरच बेदम मारहाण केली. यात एका प्रेस फोटोग्राफरसह काही कार्यकर्ते जखमी झाले.

व्यवस्थापनाच्या प्रेरणा पुराणकथांमधून शक्य

$
0
0
‘भारतीय अध्यात्म व पुराणातील कथा फक्त हात जोडण्यासाठी नसून त्यातून अनेक बाबी शिकता येतात. त्यांचे नीट आकलन केल्यास त्यात व्यवस्थापनाचे आधुनिक शास्त्र असल्याचे लक्षात येईल.

भिंत पडल्याने ३ जण जखमी

$
0
0
वसमतजवळील वाघी शिणंगी गावात भिंत अंगावर कोसळल्याने तिघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

माकडाला प्रसाद देणे पडले महागात

$
0
0
नारळाचा प्रसाद माकडाला देणे भक्तांना महागात पडल्याची घटना वेरूळ घाटात घडली.

‘रोहयो’ मजुरांना पेमेंट स्लिप

$
0
0
प्रत्येक मजूराला वर्षभर पुरेसा रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला भ्रष्टाचार कीड आणि अनियमितता रोखण्यासाठी आता कामात पारदर्शकता येत आहे.

‘गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध’

$
0
0
मराठवाडयाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध् असून त्यासाठी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी कष्ट आणि मेहनत करावी असे आवाहन अध्यक्ष व माजीमंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.

ई शिष्यवृत्तीचे ५० लाख रुपये परत

$
0
0
गतवर्षी काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संदर्भातील फॉर्ममध्ये चुकीचे अकाउंट नंबर लिहिल्यामुळे ई शिष्यवृत्तीचे सुमारे ५० लाख रुपये विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्यात जमा झाले नाहीत.

हज यात्रेला होणार २२ सप्टेंबरला प्रारंभ

$
0
0
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही औरंगाबादहून थेट जेदाहला जाण्यासाठी विमानसेवा देण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून हज यात्रेला प्रारंभ होणार आहे.

तरुणांनी सज्ज राहण्याची गरज

$
0
0
सध्या देशा समोर दहशतवादाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचा मुकाबला देशातील तरुणपिढी करू शकेल. मात्र यासाठी तरुणांनी सज्ज राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images