Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यात पावसाची रिप‌रिप

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात पावसाने मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज अंगावर पडल्याने माहिलेचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये पावसाची हजेरी

नांदेडः नांदेड शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात पावसाचा जोर कमी होता पण नांदेडच्या वजिराबाद भागात अर्धातास धो धो मृग बरसला. परभणी पूर्ण परिसरात तसेच नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात किनवट, हिमायत नगर भागात जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर व परिसरात शुक्रवारी सहा ते साडे सहाच्या विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. प्रथमच नाल्या भरून पाणी वाहताना दिसले. मनपाने अजून नालेसफाईची कामे न केल्याने काही भागात पाणीही तुंबले होते.

महिलेचा मृत्यू

उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. वीज अंगावर कोसळल्याने भूम तालूक्यातील पाथरूड येथील शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. नीलावती गोरख तिकटे असे मरण पावलेलया महिलेचे नाव आहे. त्यासोबतच तीन शेळ्या दगावल्या.

दरम्यान, या प्रकरणाचा पंचनामा भूम तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा केला. आतापर्यंत भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या भागातील शेतकरी लवकरच पेरणीच्या कामास सुरुवात करतील, असे चित्र सध्या दिसत आहेत. शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात

लातूरः मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारी चाकुर, लातूर तालुक्यात पाऊस झाला. लातूरात अवघा अर्धातास परंतु जोरदार पावसाने सर्वांची

त्रेधातिरीपट उडवली. लातूर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत पडलेला सरासरी पाऊस ३१ मिलि मीटर इतका आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मोजलेला पाऊस हा तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे हे आजपर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. लातूर ८ ( ४०.७५ मिमी), औसा- १ (३०.५६), रेणापूर- ०.७५ (३९), उदगीर-निरंक (४४.१३), अहमदपूर- ६.६७ (१८.५), चाकुर निरंक (३३.८), जळकोट निरंक (५४.५), निलंगा ०.७५ (११.६३), देवणी- ५ (२१.६७) शिरुरअनंतपाळ-निरंक (२०.६७ मिमी) इतका पाऊस घझाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागतीचे कामे पूर्ण केली आहेत. पेरणी योग्य पावसाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

परळीमध्ये दमदार पाऊस

बीडः बीड जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी रात्री परळी परिसरात ६० मिलि मीटर पाऊस झाला. त्यासोबतच बीडसह अंबाजोगाई, परळी,केज, धारूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. परळी तालुक्यात आतापर्यंत सरासरी २० मिलि मीटर पाऊस झाला. त्यासोबतच केज तालुक्यातील काही भागात शुक्रवारी ३० मिलि मीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे आता काही भागात पेरण्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बियाणे दुकानांची सिल्लोडला तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे यांनी कृषी अधिकाऱ्यांसह शहरातील कृषी साहित्य दुकानांत तपासणी केली. बियाणे व खतांची निर्धारित किंमतीत विक्री होत आहे का, याची माहिती घेऊन बिल बूक, साठा रजिस्टर तपासण्यात आले.

यावेळी कृषी अधिकारी संजीव मुसने, दादाराव वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी एस.एस.सरसमकर, दासपंत जोशी यांची उपस्थिती होती. मागणी केलेले वाण, दर याबद्दल शेतकऱ्यांना माहिती विचारण्यात आली. शासनाने बीटी कापूस बियाणांची किंमत शंभर रुपयांनी कमी केली आहे. या निर्णयाची अंमलबजवणी होत असल्याबद्दल बिल बूक तपासून खात्री करण्यात आली. यापद्धतीची तपासणी पहिल्यांदाच झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडचा पीकविमा गुलदस्त्यात

$
0
0

संजय काळे, कन्नड

निकषात बसूनही गेल्या वर्षी उतरविलेल्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मंजूर झालेली नाही. विशेष म्हणजे शेजारच्या वैजापूर, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे.

सतत तीन वर्षापासून दुष्काळ पडत असल्याने शासनाने गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विमा उतरविण्याची जोरदार मोहीम चालविली. त्यावेळी सोयाबीन, तूर, मूग कापूस व मका या पिकांचा समावेश करण्यात आला. तालुक्यातील या खरीप पिकांच्या विम्यापोटी बँकेत २६ लाख ८२ हजार २८७ रुपये भरणा केले.

महसूल विभागातर्फे २०१४-१५ या वर्षात नोव्हेंबरमध्ये पिकांची पाहणी करण्यात आली. त्यात पीक पैसेवारी ५० पेक्षा कमी जाहीर करण्यात आली. पर्जन्यमान ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. खरीप पिंकाची परिस्थिती, महसूल व कृषी आयुक्तालयाकडून सरासरी उंबरठा उत्पन्नाच्या अंदाजानुसार पीक कापणी प्रयोग करण्यात आले. या सर्व निकषात राष्ट्रीय कृषी पीक विमा मंजूर होण्यासाठी तालुक्यात अनुकूलता आहे. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला नाही. याकडे कृषी व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

कोणत्या कंपनीचा विमा उतरवण्यात आला, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. त्यांच्याकडे फक्त बँकेत भरणा केलेल्या रकमेची पावती आहे. त्याशिवाय कोणताही कागद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे विमा रकमेसाठी कोणाकडे जावे, हा संभ्रम आहे. महसूल विभागातूनही याबद्दल माहिती दिली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

शिवराई येथील आम्ही दोन ते तीन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानंतर गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कापूस पिकासाठी विमा उतरवला आहे. पण आता विमा रकमेबाबत कृषी व महसूल विभागाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. विमा कंपनीचे नावही सांगत नाहीत.

- रमेश शिनगारे, विमाधारक शेतकरी

तालुक्यातील खरीप पीक विम्याबाबत एकूण पीकनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाकडून उपलब्ध करत आहोत. एक ते दोन दिवसात सर्व माहिती उपलब्ध होईल.

- भगवान बोंदरवाड, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरणी यंत्राच्या किमतीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

कृषी विभागातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांना ६२ पेरणी यंत्राचे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. तालुका कृषी कार्यालयात यंत्रे उपलब्ध असून प्राधान्यक्रमानुसार शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतील. दुष्काळ असूनही शासनाने अनुदान कमी केल्याने यावर्षी यंत्राची किंमत वाढून १३,३४८ रुपये झाली आहे. या पेरणी यंत्राचे नाव ब्रॉड बेस फर्लह अर्थात बीबीएफ असे आहे. यंत्राची मूळ किंमत ४५ हजार रुपये असून ते शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाते. गेल्या वर्षी तालुक्यातील १०२ शेतकऱ्यांना ४५०० रुपयांस यंत्र देण्यात आले होते. यावर्षी दुष्काळ असताना शासनाने अनुदान कमी केल्याने यंत्राची किंमतीत वाढली आहे. यंत्र वाटपाची प्राधान्यक्रम यादी कृषी कार्यालयात लावण्यात आली आहे. यातील लाभार्थी शेतकऱ्याने रक्कम न भरल्यास यंत्र दुसऱ्या शेतकऱ्यास दिले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी मुनीर शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने खून

$
0
0

सिल्लोड : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तिचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार सिल्लोडमध्ये उघडकीस अाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तालुक्यातील उंडणगाव येथील नामदेव भीमराव भागवत (वय४५) यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी (१० जून) पाटबंधारे विभाग व न्यायालयाच्या भिंतीशेजारी सापडला.

मृत व्यक्तीचा मुलगा आकाश भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी देवचंद सावळाराम शिंदे (रा.सिल्लोड) यास अटक केली आहे. देवचंद याने नामदेव भागवत यांना सिल्लोड-अजिंठा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्याने देवचंदने नामदेव यांना पाटबंधारे विभागाच्या मैदानात बोलावले व डोक्यात दगड घालून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या खूनाच तपास पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन पूल गेला वाहून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी ते नायगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला पूल गुरुवारी रात्री (११ जून) झालेल्या पावसात वाहून गेला. त्यामुळे वाहनधारकांना पूल ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा पूल दोन महिन्यांपूर्वी बांधला आहे.

गणोरीहून नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गणोरी तलावाजवळ दलित वस्ती सुधार योजनेतून दोन महिन्यांपूर्वी बांधण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामावर पाच लाख रुपयांचा खर्च झाला असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले. गणोरी परिसरात गुरूवारी रात्री जोरदार पाऊस झाला. पाणी पुलावरून वाहून गेले. त्यात पुलाची एक बाजू वाहून गेली. पुलाच्या मागे व पुढे टाकलेला भराव वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे या रस्ताचा वापर करणाऱ्यांची अडचण झाली आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट झाले, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

वस्ती नसताना योजनेतून पूल

या भागात दलित वस्ती नसतांना दलित वस्ती योजनेतून पूल कसा बांधला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेले पुलाचे काम वाहून जाणे अत्यंत खेदजनक आहे. अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून त्वरीत दुरुस्ती करावी व वाहतुकीसाठी पूल सुरू करून द्यावा.

- कैलास पेहेरकर, सरपंच गणोरी

हे काम पूर्वीच्या उपअभियंता यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले आहे. निविदा प्रक्रिया करून काम करण्यात आले आहे. पुलाची पाहणी करून दुरूस्ती करण्यात येईल.

- अशोक ससाणे, उपअभियंता, पीडब्ल्यूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरकरारात नमूद केलेल्या कंपनीच्या शिवणयंत्रांऐवजी दुसऱ्याच कंपनीचे मशीन पुरविल्याचे लक्षात आल्यावरही पुरवठादाराविरूद्ध कुठलीही कारवाई प्रस्तावित न करता पाठिशी घालण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रयत्न शुक्रवारी (१२ जून) महिला व बालकल्याण समितीने हाणून पाडला. नियमानुसार पुरवठा होईपर्यंत देयक अदा करू नये, असे आदेश समितीने दिले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक शुक्रवारी झाली. बैठकीला सभापती सरला मनगटे, सदस्य उज्ज्वला सोनवणे, शोभा नलावडे, संगीता सुंब, फरजाना पटेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम आदींची उपस्थिती होती. काही महिन्यांपूर्वी विशेष घटक योजनेतून ३० लाखांची शिवणयंत्रे खरेदी करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण केली. दरकरारानुसार नगरच्या श्रीकृष्ण एजन्सीजला ऑर्डर देण्यात आली. नियमानुसार लक्ष्मी ही शिवणयंत्रे पुरविणे अपेक्षित होते. पण कन्नड तालुक्यात नीरा या कंपनीच्या १९८ मशीन देण्यात आल्या. पुरवठादाराकडे प्रशासनाने संपर्क केल्यानंतर १२२ मशीन बदलून दिल्या. पण उर्वरित ७६ कधी बदलून मिळणार, असा प्रश्न कायम आहे. यासंदर्भात सभापती मनगटे यांनी प्रशासनास पत्र देऊन देयक देऊ नये, कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी केली. त्यावर प्रशासनाने निर्णय न घेतल्याने मशीन बदलून मिळेपर्यंत पुरवठादाराचा धनादेश थांबवा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अधिकारी स्वीकारणार थेट तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते की नाही ? यासंदर्भात थेट नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेने उपक्रम सुरू केला आहे. त्याची माहिती देणारे फलक जिल्ह्यातील ८५४ ग्रामपंचायत कार्यालयांसमोर लावण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतात. मध्येच काम सोडल्याने गरजुंपर्यंत लाभ पोहचत नाही. याबद्दल स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही अनेकवेळा काहीच दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद प्रशासनाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत दर्शनी भागावर एक फलक लावण्यात येणार आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात येणार आहेत. योजना तसेच विकासकामासंदर्भात काही तक्रार असेल, तर नागरिक थेट या अधिकाऱ्यांना संपर्क करू शकतील. त्यांच्या तक्रारींची शहानिशा करून गटविकास अधिकारी, ग्रामसेवक स्तरावर अडचण सोडविण्यासंदर्भात सूचना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिक आम्हाला या फलकाद्वारे थेट संपर्क साधू शकतील. या उपक्रमाद्वारे अधिकाधिक अडचणी सुलभपणे सोडविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरात वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे दहेगाव बंगला येथून सारंगपूर दरम्यानच्या लवकी ओढ्यात डस्टर कार गुरुवारी (११ जून) रात्री साडेबारा वाजता वाहून गेली. परंतु, मागून येणाऱ्या दुचाकीचालकांनी धावाधाव केल्याने ग्रामस्थांनी कारमधील तिघांचे प्राण वाचवले.

वाळूज परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. या पावसात रात्री साडेबाराच्या सुमारास दहेगाव बंगला येथून सारंगपूरकडे जाणाऱ्या डस्टर कारमधून (एम. एच. २०, डी जे १५३३) प्रवीण नितनवरे, कृष्णा शिंदे व तुपे असे तिघेजण जात होते. दहेगाव बंगला ते सारंगपूर दरम्यानच्या लवकी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी कार पुलावर टाकली. पण पाण्याचा लोंढा आल्याने कार थेट पुलाखाली फेकली जाऊन वाहून जाऊ लागली. या ओढ्यात एका शेतकऱ्याने बोअरवेल घेतली आहेत. त्या बोअरवेलच्या खांबला जाऊन ही कार अडकली. हा प्रकार मागून दुचाकीवर येणारे उद्धव शिंदे, गणेश राऊत, लक्ष्मण सुपेकर, एकनाथ पारधे यांनी पाहिला. त्यांनी तत्काळ धावाधाव करून नागरिकांना बोलवून आणले व तिघांची कारमधून सुटका केली. त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या कारला गंगापूर पोलिसांनी क्रेनच्या साह्याने बाहेर काढले. या घटनेची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, वाळूजपासून काही अंतरावरील मुक्तेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या खोल्यांवरील पत्रे वादाळात उडून गेले. कारखाना बंद असल्याने तेथे कोणी राहत नव्हते. या खोल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रीकराची वसुली यंदा ३ हजार कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा औरंगाबाद विभागातून ३०४१ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट विक्रीकर विभागाने ठेवले आहे.विभागात औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचा समावेश होतो. वसूल करण्यात येत असलेल्या करांमध्ये मूल्यवर्धित कर, केंद्रीय विक्रीकर, व्यवसाय कर यासह अनेक करांची वसुली करण्यात येते. आतापर्यंत सर्वाधिक महसूल जमा करण्यात विक्रीकर विभागाला यश आले आहे. विभागाने २०१४-१५ साठी २,७६७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी २,७११ कोटी ४४ लाख रुपयांचा कर गोळा करण्यात यश आले. यामध्ये सर्वाधिक महसूल औरंगाबाद जिल्ह्यातून जमा झाला. औरंगाबाद जिल्ह्यासाठी २,४३२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना २,३९० कोटी रुपये (९८.३० टक्के) जमा झाले. तर बीड जिल्ह्यात १२१.०३ कोटींचे उद्दिष्ट होते, तर १०९ कोटी ८३ लाख (९०.७४ टक्के) रुपये जमा झाले. जालना जिल्ह्यात २१४ कोटी ४० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना, २१० कोटी ६८ लाख (९८.२६ टक्के) रुपयांचा महसूल जमा झाला. त्यामुळे आगामी वर्षात जास्तीच्या ३३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विक्रमी वाढ

गेल्या वर्षी २७११ कोटींपैकी सर्वाधिक २४७५ कोटी महसूल व्हॅटच्या माध्यमातून, केंद्रीय विक्री करातून १५३ कोटी ५८ लाख, तर व्यवसाय करांच्या माध्यमातून ६८.५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.

औरंगाबाद विक्रीकर विभागाने गेल्या वर्षीपेक्षा ३३० कोटींचे अधिकचे असे ३०४१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी उलाढाल कमी झाल्यामुळे परिणाम झाला होता. मात्र, या वर्षी ३००० कोटींपेक्षा अधिकचा महसूल गोळा करण्यात आम्हाला यश येईल.

- डी. एम. मुगळीकर; विक्रीकर सहआयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’मधून मलई वसुली; तोडलेले कनेक्शन जोडण्यासाठी पैशाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेच्या कामातून मलई वसुली करत तुंबड्या भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. ड्रेनेज लाइनचे तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी, ठेकेदाराकडून जबरदस्तीने पैशाची मागणी सुरू आहे. पैसे दिले नाही, तर कनेक्शन जोडणार नाही अशी धमकी दिली जात आहे. महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे.

पूर्वीची मुख्य ड्रेनेज लाइन काढून त्याच ठिकाणी मोठ्या व्यासाची नवीन ड्रेनेज लाइन टाकली जात आहे. काही कॉलनींमध्ये हे काम सुरू केले आहे. मोठ्या व्यासाची मुख्य ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी कॉलनींमधील रहिवाशांच्या घरांच्या ड्रेनेजचे कनेक्शन तोडले जात आहे. मुख्य ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर या ड्रेनेज लाइनला घरांचे ड्रेनेजचे कनेक्शन जोडण्यासाठी घरमालकांनाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

तुमच्या घराचे ड्रेनेज कनेक्शन जोडून द्यायचे असेल, तर हजार रुपये द्या, दीड हजार रुपये द्या अशी मागणी केली जात आहे. हे पैसे ठेकेदाराच्या माणसांना दिल्यावरही कनेक्शनसाठी लागणारे ड्रेनेजचे पाइप, सिमेंट घरमालकालाच आणून द्यावे लागत आहेत. मुख्य ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी ठेकेदाराने घरांचे ड्रेनेज कनेक्शन तोडल्यावर ते कनेक्शन पूर्ववत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराचीच असली पाहिजे. त्यासाठी नागरिकांवर आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ येऊ नये, अशी नागरिकांची भावना आहे. पालिकेचे अधिकारी मात्र या बद्दल आम्हाला काही माहिती नाही, असे म्हणत नामानिराळे होत आहेत.

वाटेकरी कोण?

कॉलनीतल्या एका गल्लीत पंचेवीस ते तीस घरे असतात. प्रत्येक घराकडून एक हजार रुपये जमा केले जातात, असे गृहित धरले तर एका गल्लीतून किमान तीस हजार रुपये जमा होतात. ही रक्कम कुठे जाते? या रक्कमेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य कोणी वाटेकरी आहेत का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ड्रेनेजचे कनेक्शन जोडून देण्यासाठी घरमालकांकडून ठेकेदारांची माणसे पैसे वसूल करतात, अशी तक्रार प्रथमच आली आहे. या तक्रारीची शहानिशा करतो. भूमिगत गटार योजनेसंदर्भातील टेंडरमध्ये नेमक्या काय अटी आहेत, ते तपासले जाईल. ठेकेदाराने कनेक्शन तोडले असेल, तर ठेकेदारानेच ते जोडून दिले पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे गैर नाही. मात्र, या प्रकरणात नेमके काय झाले आहे, ते संबंधीतांशी चर्चा करून सांगता येईल.

- अफसर सिद्दिकी, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्तांना अवमान याचिकेत नोटीस

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दीड वर्षात औरंगपुरा भाजी मंडई उभारण्याची हमी महापालिकेने ओटेधारकांना दिली होती. पण त्याची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद जिल्हा फळविक्रेता भाजीपाला युनियनने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका केली आहे. या याचिकेत मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. पी.आर.बोरा यांनी दिले आहेत.

औरंगपुऱ्यातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केट येथे नव्याने मार्केट बांधण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. भाजी मंडईतील ओटेधाराकांना नोटीस बजावण्यात आली होती. मनपाच्या नोटीस विरोधात युनियनने हायकोर्टात धाव घेतली होती.मनपाने याप्रकरणी कोर्टाबाहेर तोडजोडीचे धोरण स्वीकारले. त्यासाठी ४ ऑक्टोबर २०१२ रोजी ओटेधारक आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक झाली. नवीन मार्केट १८ महिन्यात बांधण्यात येईल. तोपर्यंत ओटेधारकांना नवीन जागा देण्याचा निर्णय झाला. नवीन मार्केटमध्ये तळमजल्यावर ५ ते ६ चौ.मी. ओट्याची जागा देण्यात येईल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीतील हमीनंतर १९ नोव्हेंबर २०१२ रोजी हायकोर्टाने याचिका निकाली काढली होती.

तब्बल अडीच वर्षानंतर महापालिकेने कुठलीच कार्यवाही केली नाही. युनियनच्या वतीने महापालिकेकडे निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेतली नाही त्यामुळे युनियनने अवमान याचिका केली. याचिकाकर्त्याची बाजू विनोद पाटील, अभय टाकसाळ हे मांडत आहेत. याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्सिटोसिन’ची विक्री; तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनाप्रिस्क्रिप्शन ऑक्सिटोसिन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तिघांना शुक्रवारी (१२ जून) पकडण्यात आले. त्या तिघांच्या ताब्यातून तीन लाख रुपये किंमतीचा इंजेक्शनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा तसेच अन्न व औषध प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.

चेलीपूरा परिसरातील काचीवाडा मध्ये छापा मारून महमद फईम महमद खाजा याला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने हे इंजेक्शन मध्यप्रदेशातील कानपूर येथून आणले असल्याचे समोर आले. त्या ठिकाणाहून आणलेले इंजेक्शन प्लास्टिक बॉटलमध्ये भरून विक्री करण्यात येत असल्याचे फईमने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून कटकट गेट परिसरात महमद रिहान महमद जफर आणि संजयनगर भागातील सचिन संभाजी वायाळ यांच्या घरात साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पथकाने फईमला सोबत घेऊन छापे मारले. त्या तिघांच्या ताब्यातून तीन लाख रुपयांचे ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन जप्त करण्यात आले.

इंजेक्शन कशासाठी ?

दुभत्या गायी म्हशींना पान्हवणे व अधिक दूध देण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. शाससनाने या इंजेक्शनच्या वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर होत असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

$
0
0

औरंगाबादः बाहेर वाळत घातलेले कपडे पावसात भिजू नये म्हणून ते काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चार ते पाचच्या सुमारास नारळीबाग परिसरात ही घटना घडली. कमलाबाई शाहू मावस असे मृत महिलेचे नाव आहे.

शहरात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेश मंदिर चौकात असलेल्या खांबावरील तार तुटून मावस यांच्या घरासमोरील भिंतीवर पडली होती. पाऊस सुरू होताच कमलाबाई घरासमोरील भिंतीवर वाळत टाकलेले कपडे आणण्यासाठी बाहेर गेल्या. तेव्हा त्यांना विजेचा धक्का बसला. या धक्क्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मावस कुटुंबाचा कमलाबाई या एकमेव आधार होत्या. धुणीभांडी आणि इतर कामे करत होत्या. मावस कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी नारळीबागेतील नागरिकांनी केली आहे. पावन गणेश मंदिराच्या बाजूच्या गल्लीत विजेच्या तारा लोंबकळत होत्या. त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदन देऊन केली होती, मात्र महावितरणने या निवेदनाची दखल घेतली नाही.

शॉक लागून गाईचा मृत्यू

रोजाबागेत शुक्रवारी उघड्या डीपीतील वीज प्रवाहाचा शॉक लागून एका गाईचा मृत्यू झाला. डीपी बंदिस्त करावा, अशी मागणी या नागरिकांनी महावितरणकडे केली होती. मात्र, आतापर्यंत कारवाई केली नाही, असा आरोप नगरसेवक मोहन मेघावाले यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळ्याचा समृद्ध इतिहास एका छताखाली

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

गौताळा अभयारण्यातील उत्तम पर्यटनस्थळांना पुरेशा माहितीअभावी पर्यटक भेट देत नाही. या विस्तीर्ण अभयारण्याची माहिती देण्यासाठी वन्यजीव संरक्षक विभागाने पुरणवाडी (ता. कन्नड) येथे निसर्ग निर्वचन केंद्र सुरू केले आहे. निसर्गसंपदा, वन्यजीव आणि ऐतिहासिक वास्तूंची सचित्र माहिती एका छताखाली उपलब्ध झाल्याने पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.

औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात पसरलेले गौताळा अभयारण्य पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तब्बल २१८.३४ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या अभयारण्यात वैविध्यपूर्ण वनसंपदा आहे; तसेच महत्त्वाची वारसास्थळे आहेत. पुुरणवाडी किंवा पाटणादेवी परिसर पाहून पर्यटक परततात. अभयारण्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळांची हजारो पर्यटकांना माहिती नसते. वनौषधी, किटक आणि पक्ष्यांच्या अभ्यासासाठी देशभरातील अभ्यासक गौताळ्यात येत असतात. या अभ्यासकांच्या मार्गदर्शनासाठी यंत्रणा नसल्याने गैरसोय होते असे. या पार्श्वभूमीवर अभयारण्याची सविस्तर माहिती देणारे निसर्ग निर्वचन केंद्र पुरणवाडीत सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (१२ जून) वन्यजीव संरक्षक विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी केले. या कार्यक्रमाला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कुलदीप खवारे, सामाजिक वनीकरणचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव आणि वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा उपस्थित होते.

अपुऱ्या माहितीमुळे ऐतिहासिक स्थळे पाहण्यास पर्यटक मुकतात. 'पर्यटकांना निसर्ग निर्वचन केंद्राचा निश्चित फायदा होईल,' असे भगत म्हणाले. या केंद्रात सचित्र माहितीफलक आहेत. गौताळ्यातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वास्तुशिल्पे, प्राण्यांची शिल्पे आणि प्राण्याची सचित्र माहिती या चार प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. या केंद्राला नैसर्गिक रूप दिले आहे. प्राणीसंपदा, वनौषधी, किटक, फुलपाखरे, पक्षी व ऐतिहासिक वारसास्थळांची माहिती घेऊन पर्यटकांना पुढील स्पॉटवर जाणे सहजसोपे होणार आहे.

गौताळ्यातील पर्यटनस्थळे

गौताळा अभयारण्यात लक्षवेधी पर्यटनस्थळे आहेत. यात सीता खोरी, सीता न्हाणी, गौताळा तलाव, हिवरखेडा परिसर, निसर्ग माहिती केंद्र, सायगव्हाण प्रवेशद्वार, पाटणादेवी मंदिर, हेमांडपंती मंदिर, केदारकुंड, पितळखोरा लेणी, गोमुख, पाटणादेवी प्रवेशद्वार, जुनोना तलाव, पुरणवाडी प्रवेशद्वार या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांसाठी निसर्ग निर्वचन केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. बिनचूक माहिती घेऊन अभ्यासक व पर्यटक ठिकाण निवडतील. थ्री डी कटआउट्स, म्युरल्स, माहितीफलक अभ्यासपूर्ण ठरेल.

- सु. रा. ओहोळ, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बियाणे विक्रीत अध्यादेश वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे विक्रेत्यांनी भावफलक आणि तक्रारीसाठीचा क्रमांक फलक दुकानात लावणे बंधनकारक आहे; मात्र औरंगाबाद शहरात बियाणे विक्रेत्यांनी शासनाचा अध्यादेश झुगारला आहे. मोंढ्यातील अनेक दुकानात फलक नाही. तसेच कृषी विभागाचा हेल्पलाइन क्रमांक बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.

खरीप हंगामात बियाणे, औषधी आणि खत विक्रीत सुलभता ठेवण्यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. बियाणे विक्रेत्यांनी दुकानात माहितीफलक लावणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत काही तक्रार असल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. या क्रमांकाचा फलक लावणेही बंधनकारक आहे. याबाबत शासनाचा अध्यादेश निघाला आहे; मात्र बियाणे विक्रेत्यांनी शासनाचा अध्यादेश झुगारल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. औरंगाबाद, गंगापूर, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर मनमानी करुन फलक लावणे टाळले आहे. शहरातील मोजक्याच दुकानंत भावफलक दुकानात दिसत आहे.

बियाण्यांची छापील किंमत आणि विक्रेत्यांनी सांगितलेल्या किंमतीत तफावत आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरात बियाणे विक्री करणे बंधनकारक आहे. तसेच बियाण्याची छापील किंमत, वाण आणि वापरण्याचा कालावधी याबाबत तक्रार करणे शेतकऱ्यांना कठीण आहे. कारण कृषी विभागाची हेल्पलाइन सेवा कोलमडली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कापूस, सोयाबीन, मका बियाणे मुबलक उपलब्ध आहे. जिल्ह्यात बियाण्यांची मागणी १९.२५ लाख पाकिटांची असून सध्या १८.३० लाख पाकिटे बाजारात आली आहेत. त्यामुळे बियाणे चढ्या किमतीत विकण्याचे गैरप्रकार रोखले गेले आहेत. पैठण, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यात बियाणे चढ्या भावाने विकण्याचे प्रकार उघडकीस आले. यातील काही विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. दरम्यान, बियाणे विक्रीबाबतचे नियम औरंगाबाद शहरात डावलले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक चिंताजनक परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शासनाने ८ जून रोजी बीटी कॉटन, बोलगार्ड १ (प्रति पाकिट ७३० रुपये), बीटी कॉटन, बोलगार्ड २ (प्रती पाकिट ८३० रुपये) आणि संकरित कापूस (प्रती पाकिट ५०० रुपये) यांचा दर निश्चित केला. प्रत्येक पाकिटामागे शंभर रुपये कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या नवीन दरानेच बियाणे विक्री सुरू आहे.

'हेल्पलाइन' अडकली

खते, बियाणे व औषधीचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने ११ भरारी पथके नेमली आहेत. तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० देण्यात आला आहे. प्रत्यक्षात या क्रमांकावर संपर्क होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत माहिती घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

संपूर्ण जिल्ह्यातील विक्रेत्यांना माहितीफलक व भावफलक लावण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाने फलक दिले आहेत. काहीजण विसरले असतील; मात्र अनेकांनी फलक लावले आहेत.

- राकेश सोनी, अध्यक्ष, बियाणे विक्रेते असोसिएशन

शेतकरी हिताचा निर्णय यंत्रणा कधीच पूर्णत्वास येऊ देत नाही. ऐन खरीपात शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी वणवण करावी लागत आहे. कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे.

- विश्वंभर हाके, पदाधिकारी, शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत काढा अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

जागतिक बँक प्रकल्प विभागाने औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. वाळूज येथील अतिक्रमणांचे मार्किंग शुक्रवारी (१२ जून) पूर्ण करण्यात आले. मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कारवाईत ६०पेक्षा जास्त मालमत्ता बाधित होणार आहेत. दरम्यान, काही मालमत्ताधारकांनी अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक बँक प्रकल्पांतर्गत असलेल्या औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. पंढरपूर परिसरात भाजीमंडईसह अनेक गाळेधारकांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गेल्या महिन्यात राबविण्यात आली. या माहिमेमुळे पंढरपूर मध्ये वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. प्रशासनाने आता वाळूज येथील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

वाळूज येथे रस्त्यालगत दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय रस्त्याकडेच्या दुकानांमुळे वाहनधारक वाहने रस्त्यावरच उभे करतात. त्यामुळे रस्त्यावरील मुख्य वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी गुरुवारपासून (११ जून) मार्किंग करण्यास सुरुवात करून हे काम शुक्रवारी (१२ केली पूर्ण केले. पंढरपूर येथील अतिक्रमण काढताना मालमत्ताधारकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मालमत्ताधारकांना वाढीव बांधकाम काढून घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, असे जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ तोळे सोने, १४ लाखांची चोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-९मध्ये पेट्रोल पंप मॅनेजरचे घर फोडून चोरट्यांनी १४ लाखांची रोकड आणि २१ तोळे सोने चोरी केले. शुक्रवारी पहाटे ही घटना उघड झाली. साजापूर येथील अंजनी पेट्रोल पंपाचे मॅनेजर संजयकुमार वेणूनाथ धनाड हे म्हाडा कॉलनीतील रायगडनगर येथे राहतात. त्यांच्या भाच्याची पुणे येथे शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते सहकुटुंब मंगळवारी (९ जून) सकाळी नऊच्या सुमारास पुण्याला गेले. घरात कुणीच नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. गुरुवारी मध्यरात्री धनाड यांच्या घराच्या लोखंडी ग्रील, दरवाजाचे तीन कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बैठक खोलीतील दोन, बेडरुममधील एक कपाट फोडले. या कपाटातील १२ लाखांची रोकड आणि २१ तोळे सोने, काही साड्या, चादरी चोरून नेल्या. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले होते. धान्याने भरलेल्या स्टिलच्या टाक्यातही ऐवज असेल, अशी शक्यता गृहित धरून त्या टाक्याही रिकाम्या केल्या.

बैठक खोलीतील एलसीडी चोरण्या प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. धनाड शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घरी परतले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते.

पोलिस आयुक्तांची भेट

पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, सायबर क्राइमचे अशोक कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

शेती विकलेली रक्कम

धनाड यांच्या सासू शिंदे यांनी त्यांची बदनापूर येथील शेती विकली होती. मिळालेल्या ८० लाखांतून त्यांनी एक नवीन फ्लॅट खरेदी केला. उर्वरित रकमेतून पतीच्या आजारपणाची उसनवारी फेडली. काही रकमेतून मुलींना दागिने केले. उरलेली २६ लाखांची रोकड त्यांनी धनाड यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती.

केटलीतील १२ लाख वाचले

धनाड यांनी रोख रक्कम घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली होती. त्यापैकी एका तेलाच्या केटलीमध्ये तब्बल १२ लाख रुपयांची रोकड होती. मात्र, या रकमेकडे चोरट्यांचे लक्ष न गेले नाही. सिडकोतल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घरफोडीचा छडा लवकर लावा, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रेकॉडवरील आरोपींना ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून २४ तासांत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात सर्वदूर मृगाचा दमदार पाऊस सुरू आहे. सध्या मान्सून कोकणात पोहचला असून, येत्या २४ ते ३६ तासांत मराठवाड्यात मान्सून कोसळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत अतिवृष्टी होणार असल्यामुळे सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्रभर पावसाची संततधार सुरू होती.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पावसाची मोठी प्रतीक्षा होती. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बहुतांश भागात खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. काही तालुक्यांत कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक सुरू असून आता मान्सूनचे वेध लागले आहेत. सध्या मान्सून कोकणात दाखल झाला आहे. मान्सूनने पश्चिम घाट आणि दक्षिण कर्नाटकचा भाग व्यापला आहे. त्यामुळे आज (१३ जून) सायंकाळपर्यंत मान्सून मराठवाड्यात दाखल होणे अपेक्षित आहे. हवामान विभागानेही मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या पाच टक्के पाऊस झाला आहे. मागील चार वर्षानंतर प्रथमच सतत सात दिवस पाऊस पडला आहे. १२ जूनपर्यंत मराठवाड्यात ५८.३४ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ३९.३७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यापूर्वी २०१३मध्ये ५७.३९ मिली मीटर पाऊस झाला होता. त्याखालोखाल यावर्षी पाऊस पडल्याची नोंद आहे.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. शहरात रात्री साडेआठपर्यंत पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

वाहून जाणाऱ्या कारमधून तिघांना वाचविले

वाळूज परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे दहेगाव बंगला येथून सारंगपूर दरम्यानच्या लवकी ओढ्यात डस्टर कार गुरुवारी (११ जून) रात्री साडेबारा वाजता वाहून गेली. ग्रामस्थांनी धावाधाव करत कारमधील तिघांचे प्राण वाचवले. नंतर कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढली.

मान्सून मुंबई, पुण्यात

कोकणात मुक्कामाला असलेला नैर्ऋत्य मान्सून शुक्रवारी मुंबईपर्यंत पुढे सरकला. पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्येही मान्सून दाखल झाला आहे. पुण्यात दिवसभर आकाश ढगाळ होते. शहराच्या काही भागांत तुरळक पाऊस झाला; मात्र शहरभर मान्सूनधारा बरसल्या नाहीत. येत्या ४८ तासांत पुण्यातील हवामान ढगाळ राहणार असून, हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे.

मराठवाड्यात उद्या (१३ जून) संध्याकाळी किंवा रविवारी (१४ जून) मान्सून निश्चित दाखल होणार आहे. सध्या पश्चिम घाटापर्यंत मान्सून पोहचला असून, पुढील काळात समाधानकारक पाऊस असेल. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे.

- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीएने आवळला कारवाईचा फास

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

अन्न व औषधी प्रशासनाने गेल्या वर्षभरात कारवाईचा फास आवळ्यास सुरुवात केली आहे. वर्षभरात २३० जणांवर एफआयआर दाखल केला आहे. ४०हून अधिक व्यापाऱ्यांवर खटले चालवून दंड वसूल करण्यात आला. दूध, तेल, भाजीपाला, गुटखा, पाणी विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सुमारे ३ कोटी २० लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे. बाटलीबंद पाणी विक्रेत्यांसह, खाद्यतेल, गुटखा व्यापारी यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या मालाची तपासणी करून अप्रमाणित व बीआयएसच्या (भारतीय मानक ब्युरो) निकषांनुसार माल न विकणाऱ्ता व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

कृ‌त्र‌िमरित्या फळे पिकविणाऱ्यांवर खटले

आंबे, चिकू, पपई, टरबूज व अन्य फळांची तपासणी करण्यात आली. कृत्रिमरित्या फळे पिकविणाऱ्या विक्रेत्यांवर खटले भरण्यात आले. पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध पाले भाज्यांचे ८६ नमुने तपासण्यात आले.

चायनिज पदार्थ्यांच्या गाड्या रडारवर

औरंगाबाद शहरात नोंदणीकृत चायनिज खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलची संख्या ३५० आहे. ते स्टॉलधारक कोणत्या नूडल्सचा वापर करतात, याची तपासणीदेखील केली जात आहे. त्यात घातक घटक आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. मॅगीवरील कारवाईनंतर शहरातील चायनिज खाद्यपदार्थ्यांचे स्टॉलही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आहेत. याशिवाय काही स्थानिक उद्योगही नूडल्सचे उत्पादन करतात. त्यांच्याही उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत, असे अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी सांगितले.

मॅगीचे ५० लाखांचे ८ हजार खोके परत

आरोग्यास घातक पदार्थ आढळून आल्यानंतर मॅगीचे ८ हजार बॉक्स शहरातील बाजारपेठेतून परत पाठविण्यात आले आहेत. मॅगीवरून राज्यभरात वादळ उठल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातून १० नमुने तपासणीसाठी आरोग्य खात्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्याचा अहवाल अद्यापही मिळालेला नाहीत; परंतु राज्य सरकारने मॅगीच्या विक्रीवर बंदी घातल्याने बाजारातील सर्व स्टॉक परत मागविला जात आहे. टू मिनीट मसाला नूडल्स, व्हेज आटा नूडल्स, ओट नूडल्स, चिकन नूडल्स, मसाला चिकन आदी विविध प्रकारातील मॅगीचे ८ हजार बॉक्स आतापर्यंत परत पाठविण्यात आले आहेत. त्याची किंमत सुमारे ५० लाखांहून अधिक आहे, असे मुख्य विक्रेते, गौरी एजन्सीजचे संचालक अमित मुंदडा यांनी सांगितले.

केलेल्या फळांच्या तपासण्या १८६

घेतलेले नमुने १७

जप्त साठा १,६५४ कि.

जप्त साठ्याची किंमत ५०,६४० रू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images