Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्ता दुरुस्तीचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहरात प्रवेश करण्यासाठीचा प्रमुख रस्ता 'नाका टू नाका' रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाऊस पडल्यानंतर हा रस्ता वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड महिन्याचा उलटला असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही.

पैठण शहराला जोडणाऱ्या सर्व बाह्य रस्त्यांची अनेक महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. यामुळे पैठणमध्ये येताना वाहनधारकाला अक्षरशः कसरत करावी लागत आहे. शहरात प्रवेश करण्याचा प्रमुख रस्ता असलेला 'नाका टू नाका' रस्ता एक वर्षापासून पूर्ण उखडला आहे. या एक किलोमीटर रस्त्यावरील खडी बाहेर आली आहे. जागोजागी एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडले आहेत. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साठते. नगरपालिकेने यापूर्वी खड्डे मुरुमाने भरले आहेत, त्यामुळे पावसानंतर रस्त्यावर चिखल होत आहे. प्रामुख्याने दुचाकीधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. प्राधिकरण अंतर्गत नगरपालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्याचे आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते दीड महिन्यापूर्वी भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी सहा महिन्यात व उच्च दर्जाचा तयार करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


११ मोबाइलसह २ तरूण ताब्यात

$
0
0

वाळूज : औरंगाबाद शहरातील विविध भागातून तब्बल १७ मोबाइल चोरणाऱ्या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २२ हजार रुपयांचे अकरा मोबाइल हॅडसेट जप्त करण्यात आले. परमेश्वर नागोराव खंदारे (वय १९, रा. दत्त कॉलनी वाळूज) शेख समीर शेख सलीम (वय १९, रा. कमळापूर ता. गंगापूर) हे औरंगाबाद शहरात मोबाइल चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी १७ मोबाइल चोरल्याची कबुली दोघांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बहीरव, सहायक फौजदार साठे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास वैष्णव, परमेश्वर पायगव्हाणे, पोलिस नाईक विजय कुरकुरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब काकडे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातानुकूलित तत्काळ तिकिटासाठी प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वातानुकूलित तत्काळ तिकिटासाठी रेल्वे विभागाने सोमवारपासून (१५ जून) सकाळी दहा ते अकरा या वेळेत एक तास विशेष सेवा सुरू केली आहे. अकरानंतर गैरवातानुकूलित तिकीट आणि एजंटासाठी अर्ध्या तासाचा खंड देण्यात आला आहे. यामुळे वातानुकूलित तिकीट काढणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

देशातील सर्व रेल्वे स्थानकावर एक दिवस आधी तत्काळ तिकीट दिले जाते. सकाळी दहा वाजता सुरुवात झाल्यानंतर वातानुकूलित व स्लीवर कोचचे तिकीट घेणारे एकाच रांगेत उभे राहत असत. गर्दीमुळे रांगेतील प्रवाशाला वातानुकूलित तिकीट मिळत नाही, अशी तक्रार होती. ही तक्रार सोडवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. सकाळी १० ते अकरा वातानुकूलित तिकीट, अकरापासून स्लीपर कोचसाठी तत्काळ तिकीट दिले जाईल, असे नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले. रेल्वे एजंट, आरटीआरएसए, आईआरसीटीसी एजंटांना तत्काळ तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने १०.३० नंतर वातानुकूलित, ११.३० नंतर गैरवातानुकूलित तत्काळ तिकीट दिले जाईल. यामुळे आरक्षण खिडकीसमोर रांगेतील प्रवाशांना तिकिटे मिळतील, अशी रेल्वे विभागाची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षांपासून रस्ता रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज एमआयडीसीतील लघु उद्योजकांना पंधरा वर्षांपासून अवघ्या दोनशे मिटर रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. केवळ दफ्तर दिरंगाईमुळे हे काम सहा वर्षांपासून रखडले आहे.

राज्यात शिवसेना-भाजची सत्ता स्थापन झाल्यानंतर सुवर्ण लघु उद्योग योजना सुरू करण्यात आली. या योजनेची १९९८-९९ मध्ये वाळूज येथे अंमलबजावणी करण्यात आली. त्यातून ३६ लघु उद्योजकांना २६२ चौरस मिटरचे भूखंड देण्यात आले. त्यात मोठ्या उद्योगांना लागणारे स्पेअरपार्ट बनविण्याचे उद्योग येथे सुरू करण्यात आले. त्यासाठी एमआयडीसीने लघु उद्योजकांना गाळे उभारून दिले आहेत. पंरतु, तेव्हापासून गाळ्यांच्या अंतर्गत रस्त्याचे काम रखडले आहे. हे २०० मिटर रस्त्याचे काम पूर्ण करावे, यासाठी लघु उद्योजक एमआयडीसी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हा विषय सर्वसाधारण सभेत ठेऊन तत्कालीन एमआयडीसी सीईओनी मंजूर घेतली आहे. परंतु, नंतरच्या सीईओंनी रस्ता बांधण्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या पाच वर्षानंतर शिवसेना-भाजपचा पराभव झाला व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. आघाडी सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा भाजप-शिवेसना युतीची सत्ता आली असून शिवसेनेकडे उद्योगमंत्रीपद आहे. त्यामुळे येथील रस्ता बांधकामाची समस्या सुटावी, अशी लघु उद्योजकांना अपेक्षा आहे.

युती सरकारने लघु उद्योजकांना भूखंड देऊन भूमिपुत्रांच्या विकासाला हातभार लावला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही दोनशे मिटरचा रस्ता बांधण्यासाठी एमआयडीसी अपयशी ठरली आहे. आता पुन्हा युतीचे सरकार आल्याने हा प्रश्न निकाली काढावा.

-राहुल मोगले, लघु उद्योजक

भूखंड दिल्यानंतर एमआयडीसीने सुविधा पुरवणे गरजेचे आहे. सुर्वण लघु उद्योग योजनेतील उद्योजकांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या २२ जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत रस्ता बांधकामाबद्दल तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- संजय शिरसाठ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना घरपोच जातवैधता प्रमाणपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विभागाने गेल्या वर्षभरात १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली. तसेच हे प्रमाणपत्र घरपोच पोहचविले. त्यामुळे कार्यालयात प्रमाणपत्रासाठी होणाऱ्या गर्दीला ब्रेक बसला आहे.

शैक्षणिक प्रवेशासह इतर कारणासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील १६ हजार ७६३ विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१५ अखेरपर्यंत अर्ज दाखल केले होते. यापैकी १६ हजार ४४२ प्रकरणे समितीने निकाली काढले, तर त्रटी असलेले ३२१ प्रकरणी कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर. यू. राठोड यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

२०१४ मध्ये खोकडपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सुमारे सोळा हजार जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. त्यासाठी प्रारंभी विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारे वैधता प्रमाणपत्र क्रमांक, लॉट क्रमांक कळविण्यात आला. यंदा विद्यार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्र पाठविण्यात येत आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे.

ऑनलाइन अर्ज

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज भरण्याची सुविधाच 'ऑनलाइन' करण्यात आली आहे. अर्जदारांना barti.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन हे अर्ज भरावे लागते. दाखल केलेल्या अर्जावर काय कार्यवाही सुरू आहे, ही अपडेट माहिती अर्जदारांना कळावी यासाठी तांत्रिक सुधारणाही करण्यात येत आहे.

अध्यक्षाकडे अतिरिक्त कार्यभार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अध्यक्ष हा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीचा असतो. डी. एम. मुगळीकर यांची आठ महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर तेव्हापासून याठिकाणी पूर्णवेळ अध्यक्ष मिळू शकला नाही. सध्या एस. जी. गौतम हे समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे नागपूर, अमरावती, नाशिक, अकोलासह औरंगाबाद विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणून पदभार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रेन डेथ कमिटी’ स्थापन; अवयवदानातून प्रत्यारोपण शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या अधिष्ठातांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आदेशानुसार घाटीमध्ये 'ब्रेन डेथ कमिटी' नुकतीच स्थापन झाली. त्यामुळे आता या चार जणांच्या समितीकडून 'ब्रेन डेड' रुग्णाची अधिकृत घोषणा होणार असून, संबंधित 'ब्रेन डेड' व्यक्तीच्या विविध अवयव दानातून गरजवंतांवर प्रत्यारोपण (कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट) करता येणार आहे. मात्र, अवयव दानासाठी आवश्यक 'झेडटीसीसी' समिती अद्याप स्थापन झाली नसल्याने 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट'च्या मार्गात अजूनही अडथळे कायम आहेत.

गेल्या तीन आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच राज्यातील अधिष्ठातांची बैठक झाली. यामध्ये विविध सूचनांसह 'ब्रेन डेथ कमिटी' स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार घाटीमध्ये मागच्या आठवड्यात ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये घाटीतील औषधवैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभाकर जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. आर. हरबडे, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री तडवळकर व मानद मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांचा समावेश आहे. ही समिती स्थापन झाल्यामुळे कुठल्याही रुग्णालयातील 'ब्रेन डेड' रुग्णाची अधिकृत घोषणा समितीमार्फत होईल व त्यानंतरच 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट' करता येणार आहे.

मात्र, प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करण्याबरोबरच 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट'वर नियंत्रण ठेवणारी 'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी' (झेडटीसीसी) अद्याप शहरामध्ये स्थापन झालेली नाही.

सहा महिन्यांपासून घोषणाच

'झेडटीसीसी'ला सुमारे चार वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली आणि अध्यक्षपदी डॉ. काळे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, अध्यक्षांची नियुक्ती होऊनही इतर सदस्यांची निवड न झाल्यामुळे समिती स्थापन झालीच नाही. दरम्यान, मागच्या वर्षी अवयवदानानिमित्त 'मटा'च्या शहर कार्यालयात झालेल्या 'राउंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये वैद्यकतज्ज्ञांच्या उपस्थितीत ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे नाव घाटीचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी जाहीर केले आणि तसा प्रस्ताव 'डीएमइआर'ला पाठविला. मात्र, काहीही हालचाल झाली नाही. तसेच सहा महिन्यांपूर्वी 'डीएमइआर'चे प्रभारी सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनीही 'मटा'ला दिलेल्या सदिच्छा भेटीत डॉ. कुलकर्णी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दुर्दैवाने त्यानंतरही कुठलीच हालचाल झालेली नाही.

'झेडटीसीसी'चा आदेश तयार आहे. मात्र, डॉ. कुलकर्णी यांचे पोलिसांकड़ून येणे अपेक्षित असलेले चारित्र्य प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्याने हा आदेश काढता येत नाही. याबाबत संबंधित पोलिस यंत्रणेला कळविण्यात आले असून, लवकरच हे प्रमाणपत्र मिळेल, अशी आशा आहे. प्रमाणपत्र मिळताच आदेश काढता येऊ शकेल.

- डॉ. तात्यासाहेब लहाने, प्रभारी सहसंचालक, डीएमइआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांना रस्ता ‘बंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतापनगर परिसरातील नागरिक गेल्या आठवडाभरापासून रस्ता बंद झाल्यामुळे त्रस्त आहेत. शहानूरमियॉँ दर्गा ते पीरबाजार रस्त्यावर प्रतापनगरजवळ नाल्यावरील रस्ताचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी दोन्ही दक्षिणेकडील बाजूने येणाऱ्यांचा रस्ता बंद केल्याने हा त्रास सुरू झाला आहे. कंत्राटदाराने करून दिलेला तात्पुरता रस्ताही पावसात गायब झाला आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतापले आहेत.

पीरबाजार रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. गेल्यावर्षी एक बाजूचा रस्ता तयार करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला होता. उर्वरित रस्त्याचे काम करताना उन्हाळा गेल्यानंतर महापालिका प्रशासनास जाग आली. पावसाळा सुरू झाल्यावर काम सुरू केले आहे. ज्या भागाचे काम सुरू केले, त्याच्या दक्षिण बाजूने प्रतापनगर वसाहत आहे. पुलालगत असलेल्या वसाहतीचा संपूर्ण रस्ताच बंद झाला आहे. गुरुवारी दुपारी हा रस्ता बंद करण्यात आला. याची कल्पना नागरिकांना दिली गेली नाही. त्यात पावसाला सुरुवात झाली. या वसाहतीत मोठी लोकवस्ती आहे. अचानकपणे रस्ता बंद झाल्याने नागरिकांना लगतच्या मोकळ्या मैदानातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे चिखल झाल्याने अनेकांची वाहने फसली, अपघात झाले. एकनाथनगरकडून एक पर्यायी रस्ता या वसाहतीसाठी आहे, पण तब्बल किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना यावे लागते. शिवाय हा रस्ता अरूंद आहे.

नागरिकांची सोय म्हणून मोकळ्या मैदानात मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार करून दिला गेला, पण पावसात हा रस्ता वाहून गेला. या भागात पाण्याची अडचण आहे. त्यामुळे दिवसभर टँकरची वर्दळ असते. या टँकरमुळे पर्यायी रस्ता खराब झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. मुख्य रस्त्याचे सुरू असलेले काम दीड महिना चालणार आहोत. तोवर या नागरिकांनी कुठला रस्ता वापरायचा ? असा प्रश्न आहे.

अचानकपणे रस्ता बंद झाल्यामुळे आमचे हाल होत आहेत. पावसामुळे मैदानात चिखल झाला आहे. कॉलनीतील अनेकांना याचा फटका बसला. पर्यायी रस्ता चांगला करून देईपर्यंत पुढचा रस्ता बंद करणे चुकीचे आहे. आता काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

- मृणालिनी फुलगीरकर, अलका पांडे, रहिवासी, प्रतापनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री पावणेबारा वाजता मध्यवर्ती बसस्थानकासमोर घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून आठजणांविरूद्ध क्रांतिचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख आमेर शेख रहीम रा. रहेमानिया कॉलनी याने दिलेल्या तक्रारीमध्ये शेख आमेर हा रविवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानकासमोर उभा होता. यावेळी त्याला आरोपी इजाज, अब्दुल गफार, मुश्ताक (सर्व रा. सिल्लेखाना) व अतीश (रा. भोईवाडा) यांनी अडवले. 'तुझा मालक कुठे आहे. रात्री अकरा वाजेनंतर ट्रॅव्हल्सचा धंदा करायचा असेल तर दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल', अशी धमकी दिली. तसेच लोखंडी रॉड व फायटरने त्याला व त्याचे काका नईमला मारहाण केली. या प्रकरणी चारही ‌आरोपीविरुद्ध दंगलीचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाच्या वतीने इजाज कुरेशी याने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये इजाज हा मॉर्डन ट्रॅव्हल्स येथे दोन प्रवाशांचे पैसे मागण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला पैसे देण्यास नकार देत नईम जहागीरदार याने चाकूसारख्या शस्त्राने मारहाण केली. तसेच आमेर, नईम यांनी हॉकी स्टीकने मारहाण केली.

तीन बुकींना अटक

औरंगाबाद ः आयपीएल सट्टा प्रकरणात आर्थिक गुन्हेशाखेने आणखी तीन बुकींना मंगळवारी अटक केली. सोमवारपर्यंत या बुकींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या टोळीला अटक केली होती. लाईन ऑपरेटर नरेश पोतलवाड याच्याकडे तब्बल १९० मोबाइल आढळून आले होते. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १५ बुकींना अटक केली आहे. या प्रकरणात राजेश नवलचंद संचेती (रा. चिकलठाणा), देविलाल लक्ष्मण मुंगसे (रा. गोलवाडी) व योगेश नारायण मुंडे (रा. भोईवाडा) यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेलकम’मध्ये तिरुपती तिकीटाची सुविधा

$
0
0

औरंगाबाद : तिरुपती दर्शनाच्या तिकिटाची व्यवस्था वेलकम ट्रॅव्हल्स, गोमटेश मार्केट यथे सुरू असून इच्छुकांनी आयडी प्रुफसह किमान ६ ते ८ दिवस आधी संपर्क साधणे आवश्यक आहे. वेलकम सर्व्हिस यांनी प्रिंट मीडियाबरोबरच वेलकम ट्रॅव्हल्स ही संस्था वर्षभरापूर्वी सुरू केली आहे. मेक माय ट्रीप या जगप्रसिद्ध कंपनीची फ्रन्चायजी असलेल्या वेलकम ट्रॅव्हल्समध्ये फ्लाईट, हॉलिडे, नॅशनल-इंटरनॅशनल बुकिंगची सोय आहे. त्याचबरोबर रेल्वे बुकिंग आयटीझेड, बस बुकिंग शिवनेरी (एमएसआरटीसी) मार्फत केली जाते. येणाऱ्या काळात तिरुपती येथे राहण्याची तसेच परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची सुविधा वेलकम ट्रॅव्हल्सच्या वतीने करण्यात येणार आहे. तिकिटासाठी आयडी कार्ड, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड बंधनकारक आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वेलकम ट्रॅव्हल्सतर्फे पूजा गुप्ता यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारखेडा घरफोडीप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रकरणी, औरंगाबाद

दहा वर्षांपूर्वी गारखेड्यामध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणामध्ये आरोपीस आठ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा तसेच एक हजार दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी नुकतीच ठोठावली.
गारखेडा परिसरातील रहिवासी रवींद्र पांडुरंग आचार्य हे १९ मार्च २००५ रोजी घराला कुलुप लावून पुण्याला गेले होते. २१ मार्च रोजी परत येत असताना त्यांना त्यांचे शेजारी मुळे यांनी फोनवरून घराचे कुलूप तोडल्याचे कळविले. घरी पोहोचताच त्यांना कपाटाचे दरवाजे वाकवून पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम सोन्याचे वाळे, सोन्याचे एक सेव्हनपीस, सुमारे चार ग्रॅम वजनाचे कानातील दोन रिंग्ज, प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन करंडे, दहा ग्रॅम वजनाची चांदीची अत्तरदाणी, एक चांदीची लक्ष्मीची मूर्ती आदी दागिने लांबवल्याचे निदर्शनास आले. आचार्य यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दादाराव भुजंगराव उमप (रा. कबीरनगर, गारखेडा) याला अटक केली. ज्या सुवर्णकाराला आरोपीने सोन्याचे दागिने विकले, त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील आशीष दळे यांनी आठ साक्षीदार तपासून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला. त्यांना कोर्ट ड्युटी कॉन्स्टेबल व्ही.य के. शिसोदे यांनी सहकार्य केले. दोन्हीकडील युक्तिवादानंतर न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) भारतीय दंड संहिता कलम ४५७ अन्वये आरोपीस ८ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) भारतीय दंड संहिता कलम ३८० अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दरोडेखोर गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांचनवाडी परिसरात दरोडयाच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. रविवारी रात्री अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली. चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे.

सुधाकरनगर ते कांचनवाडीकडे जाणाऱ्या चौकात एका पडक्या घरात काही तरूण शस्त्रासह बसले असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी लियाकत इस्माईल शेख, विजय शिवप्रसाद शुक्ला उर्फ बेलन, रामदास शामराव खोतकर व दीपक अंकुश धोत्रे (सर्व रा. वळगाव, पंढरपूर) पोलिसांच्या हाती लागले तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ लोखंडी कत्ता, नायलॉनची दोरी, फावड्याचे दांडे आदी साहित्य आढळून आले. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, शेख हबीब, विलास वाघ, अशोक नागरगोजे, देविदास इंदोरे, फेरोज पठाण, अप्पासाहेब खिल्लारी, प्रमोद देवकाते, प्रभाकर राऊत आदींनी केली.

प्लॅनिंग करतानाच अटक

ही टोळी दरोडा टाकण्याची प्लॅनिंग करीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वीच लिंक रोडवर उद्योगपतीच्या घरी दरोडा टाकण्यात आला आहे. शहरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या या दरोड्याचा सध्या तपास सुरू आहे. या दरोडेखोरांना अटक करण्यात आल्यामुळे उद्योगपतीच्या घरी पडलेल्या दरोड्याचाही तपास लवकर लागू शकेल, असा कयास बांधला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाणेकरांना कोर्टात सशर्त जामीन मंजूर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतःच्या कारवर गोळीबार करण्याच्या प्रकरणात हर्सूल जेलमध्ये असलेले नीलेश घाणेकर यांचा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही.एन. देशपांडे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. येथील प्रसिद्ध वकील नीलेश घाणेकर यांच्या कारवर गोळीबार झाला होता. घाणेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. पोलिस तपासात हा गोळीबार त्यांनीच घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी घाणेकर यांना अटक केली. २७ मेपासून ते हर्सूल जेलमध्ये आहेत. २९ मे रोजी सेशन कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयाला त्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

पोलिसांनी घाणेकर यांना त्यांनीच दाखल केलेल्या तक्रारीत अटक केली आहे. गोळीबार प्रकरण बनावट होते तर तपास अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल कोर्टात का दाखल केला नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील शिरीष गुप्ते यांनी केला. घाणेकर हे निष्णात वकील आहेत. त्यामुळे त्यांना जामीनावर सोडले तर तपासादरम्यान दबाव निर्माण करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकील डी.आर. काळे यांनी केला. कोर्टाने घाणेकरांचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला. त्यांना गुन्हे शाखेत दर रविवारी हजेरी लावण्याची, तपासकामात अडथळा निर्माण करू नये, अशी अट घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एल अँड टी’ कंपनी जलवाहिनी टाकणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पांतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम एल अँड टी कंपनी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. समांतर जलवाहिनीच्या संदर्भात महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून नियुक्त केले आहे. या कंपनीने समांतर जलवाहिनीचे संपूर्ण काम आउट सोर्सिंगच्या माध्यमातून करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्याशिवाय शहरांतर्गत १५०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. ३५ जलकुंभ आणि २०० एमएलडी क्षमतेचा शुध्दीकरण प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. ही सगळी कामे वेगवेगळ्या ठेकेदारांना दिली जाणार आहेत. सुमारे पन्नास ठेकेदार ही सगळी कामे करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मुंबईस्थित एल अँड टी कंपनीला दिले आहे. त्याची घोषणा कंपनीने अधिकृतपणे केली नाही. मात्र, तसे संकेत मात्र दिले आहेत. १८ महिन्यात हे काम पूर्ण करावे, असा करारही केला जाणार आहे. विशेष म्हणजे एल अँड टी कंपनीने समांतर जलवाहिनीचे व भूमिगत गटार योजनेचे मूळ टेंडर भरले होते, पण महापालिकेने त्यांचे टेंडर स्वीकारले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाइप’चा प्रस्ताव बदलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीसाठी 'डीआय' पाइप वापरण्यात येतील, असे करारात म्हटले होते. मात्र, पालिका प्रशासनाच्या करामतीमुळे सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात 'एचडीपीआय' पाइप वापरण्याचा प्रस्ताव घुसविण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद युटिलिटी कंपनीवरील १५३ कोटी रुपयांचे 'ओझे' या ऐनवेळच्या प्रस्तावामुळे कमी होणार आहे. विशेष म्हणजे, करारानुसारच पाइपचा वापर करण्याची आग्रही मागणी नगरसेवकांनी केली होती.

समांतर जलवाहिनीबाबत चर्चेसाठी महापालिकेत १४ जानेवारी २०१५ रोजी विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेमध्ये मुख्य जलवाहिनी आणि अंतर्गत जलवाहिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाइपबाबत नगरसेवकांनी चर्चा केली होती. या चर्चेचे इतिवृत्त आता महापालिकेच्या नगर सचिव विभागाने २० जून २०१५ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेसोबत जोडले आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी मूळ करारानुसारच जलवाहिनी टाकण्याचे काम झाले पाहिजे, असे प्रशासनाला ठणकावून सांगितले. करारानुसार 'डीआय पाइप' (ड्युकिटेल आयर्न) वापरले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली होती. चर्चेत समीर राजूरकर, राजू वैद्य, प्रशांत देसरडा, प्रमोद राठोड, काशीनाथ कोकाटे, प्रफुल्ल मालाणी, त्र्यंबक तुपे या नगरसेवकांनी भाग घेतला होता.

त्याच वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी एचडीपीआय (हाय डेन्सिटी पॉली इथिलिन) पाइप वापरले जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे १५३ कोटी रुपयांची बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. कंपनीचे पैसे वाचणार आहेत. त्यामुळे महापालिकेने कंपनीची काळजी करण्याचे कारण नाही. करारानुसार डीआय पाइपच वापरा, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. ती मान्यही करण्यात आली, परंतु २ मार्च २०१५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळचा विषय समाविष्ट करून प्रशासनाने 'डीआय'ऐवजी 'एचडीपीआय पाइप' वापरण्यास मंजुरी घेतली.

उपमहापौरांनी घेतला आक्षेप

या प्रकाराला उपमहापौर प्रमोद राठोड यांनी मंगळवारी आक्षेप घेतला. अशा प्रकारचा कोणताही ऐनवेळचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला नव्हता, असे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण सभा झाल्यावर काही जणांनी हा प्रस्ताव घुसविला असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंडाबळी प्रकरणात जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबादः पाच लाखांच्या हुंड्यासाठी पती व सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पती व 'वाल्मी'चा कर्मचारी दिगंबर शेषराव मोरे तसेच सासू व सासऱ्याचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी मंगळवारी (१६ मे) फेटाळला.

संध्या यांचा विवाह दिगंबर मोरे याच्याशी १९ मे २०१४ रोजी झाला होता. तेव्हापासून पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी पतीसह सासरच्या मंडळीकडून सातत्याने मानसिक-शारीरिक छळ होत असल्याने संध्या यांनी एक जून २०१५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संध्या यांचे वडील मनोहर गणपत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यामध्ये पती दिगंबर याच्यासह सासरा शेषराव मोरे, सासू रुक्मणबाई मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उस्मानाबाद उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा द्या’

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा द्या, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राध्यापकांनी पालकमंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.

प्राध्यापकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 'विद्यापीठातंर्गत कॉलेजांची संख्या चारशेच्यावर पोहचली आहे. वाढती कॉलेजांची संख्या, त्यामुळे प्रशासनावर अधिकचा भार पडतो आहे. त्यामुळे कार्यप्रणालीमध्ये बऱ्याचदा विसंगती आढळून येते. यासह भौगोलिकदृष्ट्या विचार केला, तर उस्मनाबाद जिल्हा व उमरगा तालुका हे औरंगाबादपासून दूर आहेत. आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात येणे-जाणे अशक्य होते.' निवेदनावर डॉ. संजय बिरादार, डॉ. विलास इंगळे, डॉ. विनोद देवरक, डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. स‌ुनील बिराजदार, प्रा. सूर्यकांत रेवते, प्रा. भरत शेळके, प्रा. वसंत गायकवाड, डॉ. विष्णू शिंदे, प्रा. धनाजी थोरे, प्रा. संतोष गावित, प्रा. समाधान पसरकल्ले, प्रा. विजय पवार यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन पुन्हा कोंडीने जेरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीसमोरील वाहतूक कोंडी हटविण्यासाटी पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेतला. काही दिवस येथे कडक कारवाई करण्यात आली. मात्र, येथील कारवाई थांबवताच, पुन्हा या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई आता तरी दिखाव्यापुरतीच उरली आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणी प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षांची संख्या वाढली आहे. रेल्वे स्टेशनवरील वाहतुकीत प्रचंड बेशिस्त होती. स्टेशनमध्ये येण्याच्या आणि जाण्याच्या गेटचा वापर अयोग्य पद्धतीने सुरू होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी येथील वाहतुकीला शिस्त लावण्याचे आदेश दिले.

यानंतर पोलिस कारवाईला वेग आला. स्टेशनसमोरील चौकात रिक्षा आणि अन्य वाहनांची संख्या कमी झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून रेल्वेच्या वेळेवर शेअरिंग रिक्षाची लांब राग लागलेली असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे या चौकात पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. स्टेशनवरील पार्किंग, सिटीबस थांब्यांवर पुन्हा खासगी वाहन उभे राहत आहेत. त्यामुळे पोलिसांनी काही दिवस केलेली कारवाई फक्त दिखाव्यापुरती उरली आहे.

कामापुरता मामा

रेल्वे स्टेशनच्या इन आणि आउट गेटचा वापर योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पोलिसांनी आउट गेटने स्टेशनमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली होती. आता ही कारवाई फक्त रेल्वे येण्याच्या काळात केली जाते. इतर वेळेत नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकांना रिक्षाचालकांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील रस्त्यांवर ठाण मांडून बसलेली अतिक्रमणे हटविण्याचा धडाका सुरू केला. त्याचबरोबर जड वाहनांना दिवसा शहरात बंदी घालण्यात आली, तरीही शहरातील विविध चौकांना अद्याप रिक्षाचालकांचा विळखा कायम आहे. त्यामुळे चौकाचौकांत वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून जावे लागत आहे.

वाहतूक शाखेच्या वतीने सध्या शहरात वाहनधारकांना शिस्त लावण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला रिक्षाचालक खो घालण्याचे काम करीत आहेत. शहरातील प्रमुख चौक काही दिवसांपूर्वी अतिक्रमणमुक्त झाले होते. त्याचबरोबर चौकांच्या कोपऱ्यांवर थांबणाऱ्या रिक्षांनाही हटविण्यात आले होते. पोलिसांची पाठ फिरताच चौकांचा रिक्षांनी पुन्हा ताबा घेतला आहे.

रिक्षावाल्यांनी थांबे घुडकावले

वाहतूक शाखेने शहरातील रिक्षाचालकांसाठी थांबे निश्चित केले आहेत, मात्र ते नावाला असल्याचे चित्र प्रमुख चौकात दिसून येते. रिक्षाचालकांनी मनमानी कारभार करीत चौकात रिक्षा उभ्या करून स्वतःच थांबे ठरविल्याचे चित्र आहे. शहरातील बाबा पेट्रोल पंप, पंचवटी चौक, रेल्वे स्टेशन, क्रांतिचौक, आकाशवाणी, रामगिरी हॉटेल, अण्णाभाऊ साठे चौक, टाउन हॉल, टीव्ही सेंटर, जळगाव टी पॉइंट, एपीआय कॉर्नर, हडको कॉर्नर, हर्सूल टी पॉइंट या सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती आहे.

अरेरावी, भांडणे नेहमीचीच

अतिक्रमण करणाऱ्या रिक्षाचालकाला एखाद्या वाहनधारकाने रिक्षा हटविण्यास सांगितल्यास तेथे वाद हमखास ठरलेलाच. त्यातून वाहनधारकाला मारहाण करण्याचे प्रकार घडतात. प्रवासी बसविण्यावरून तर रिक्षाचालकांच्या आपसात अनेकवेळा हाणामाऱ्याही होतात.

वाहतुकीचा खेळखंडोबा

शहरातील रहदारीचे प्रमुख मार्ग या चौकातून जातात. मध्यभागी उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होते. तेथून जाणारी वाहने व उभ्या असलेल्या रिक्षामुळे चौकात कोंडी निर्माण होते. चौकात वाहतूक पोलिस असल्यास कोंडी तात्काळ सुटते अन्यथा वाहनधारकाला बराच काळ अडकून पडावे लागते.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यानी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रमुख चौकात अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चौका‌तून गायब झाल्या होत्या, परंतु आता पुन्हा या रिक्षांनी चौक बळकाविण्यास सुरुवात केली आहे.

वाहतूक शाखाने चौकात उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाइमुळे शहरात बेकायदा वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षा ग्रामीण भागात गेल्या आहेत.

- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शिंदे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ. देवानंद शिंदे यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. सी. विद्यासागर यांनी नियुक्ती केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंगोली येथील ते मूळ रहिवाशी असलेले डॉ. शिंदे हे २५ वर्षांपासून अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. विद्यापीठातील विविध अधिकार मंडळावरही ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली असून, ९ विद्यार्थी संशोधन करीत आहेत. दुपारी त्यांच्या निवडीचा संदेश आल्यानंतर विद्यापीठात पेढे वाटून व फटाके वाजवून त्यांचे स्वागत झाले. विद्यापीठ प्रशासनासह प्राध्यापक, ‌कर्मचारी, विद्यार्थ्यांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संघाचे वेबसाइटद्वारे ५ लाख स्वयंसेवक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संघाच्या स्वयंसेवकांत दरमहा ८ हजार जणांची वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या ५ लाखाने वाढली आहे,' अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी मंगळवारी 'मटा'ला दिली.

नंदकुमार औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, '२०१०पासून www.rss.org या वेबसाइटद्वारे जॉईन आरएसएस या सेगमेंटमध्ये दर वर्षी वाढ होत आहे. २०११ या वर्षी दरमहा केवळ ९० ते १०० सदस्य होत होते. वेबसाइटच्या लाइक्सही फार नसायच्या. आता २०१५ मध्ये अशी परिस्थिती आहे की दरमहा ८ हजार सदस्य होत आहेत. विशेष म्हणजे हे सगळे २० ते ४० वयोगटातील तरुण आहेत. २०१२ मध्ये ही संख्या २००, २०१३ मध्ये ही संख्या १००० आणि २०१४ मध्ये दरमहा ४ हजार जण सदस्य होत होते. गेल्या ५ वर्षांत ५ लाखाहून अधिक जणांनी 'जॉइन आरएसएस'चा फायदा घेत संघाशी आपली नाळ जुळवून घेतली आहे. तरुणांना आजकाल सोशल मीडिया फार आवडतो. संघाच्या बदलत्या स्वरुपाचे हे द्योतक आहे.'

बिहार निवडणुकीत सक्रिय

बिहार निवडणुकीत संघ सक्रिय होणार आहे. शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन करत आम्ही संपर्क आणि निरोप पोहचवून लोकांपर्यंत पोहचणार आहोत, अशी माहिती नंदकुमार यांनी दिली.

काश्मीर हा राष्ट्राचा मान आहे. देशाचा 'तिलक' आहे. त्या भागात भाजपने केलेली युती 'वन प्लस वन' म्हणजे 'इलेव्हन' होतात हे सांगणारी आहे. केरळमध्ये सध्या 'घरवापसी' सुरू आहे. या भागात संघाच्या प्रवाहात ख्र‌िश्चन नागरिक येत आहेत.

- जे. नंदकुमार, अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख, संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images