Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बँड बाजा बारात’ २४ नोव्हेंबरपासून!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा लगीनसराई २४ नोव्हेंबरला सुरू होत आहे. बुधवारपासून (१७ जून) अधिक मास, तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास कार्तिक एकादशीला संपेल. त्यानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू होतील. १२ जून ही शेवटची लग्नतिथी होती. त्यामुळे शहरातील लग्नाची धामधूम शुक्रवारी संपली. चातुर्मासामुळे दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर लग्न कार्यास सुरुवात केली जाते. सिंहस्थ कुंभ काळात लग्न केले जात नाही, असा नागरिकांमध्ये समज आहे. मात्र, अनेक तज्ज्ञ व पुरोहितांच्या मते ही निव्वळ चर्चा आहे. १८ ऑगस्ट २०१५ ला सिंहस्थ महाकुंभमेळा सुरू होत असून ११ ऑगस्ट २०१६ ला या मेळ्याची सांगता होईल. चातुर्मास सोडला, तर नंतर लग्नाच्या तिथी आहेत. त्यामुळे या काळातही लग्नकार्य करता येणार आहे.

दाते पंचांगानुसार अनेक ठिकाणी तिथी पाहिली जाते. १२ जून ही लग्नाची शेवटची तारीख होतो. महाकुंभ मेळ्यातही लग्नाच्या तिथी आहेत. या काळात लग्नतिथी नाही, यास कोणताही शास्त्राधार नाही. आपापल्या तज्ज्ञांना व पुरोहितांच्या विचारून लग्नासाठी लाभणारे मुहूर्त पाहावेत.

- अनंत पांडव, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टेशनवरील ‘ला फूड’ला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनवरील सनशाइन केटरर्सच्या 'ला फूड रेस्टॉरंट'ला थकबाकीमुळे मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. देशभरातील मुख्य रेल्वे स्टेशनवर सनशाइन केटरर्सला रेस्टॉरंट उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या अंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. या रेस्टॉरंटचे मागील वर्षाचे १४ लाखांचे भाडे थकित आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील वाणिज्यिक विभागाचे अधिकारी के. बाबूराव यांनी रेस्टॉरंट बंद करण्याची कारवाई केली. या वेळी आरपीएफ अधिकारी आणि रेल्वे स्टेशन स्थानकाचे प्रमुख अशोक निकम उपस्थित होते.

बाक लावून कारवाई

कारवाईवेळी रेस्टॉरंटमध्ये अनेक प्रवासी जेवण करत होते. त्यांना घाईत जेवण संपवावे लागले. तर अनेक ग्राहकांना ऑर्डर देण्यापूर्वीच उभ्या-उभ्याने आल्या पावली वापस जावे लागले. रेस्टॉरंट बंद करताना सर्व कर्मचाऱ्यांना सामानासह बाहेर काढले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेस्टॉरंटचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा लागला नाही. त्यामुळे प्रवेशद्वारासमोर बाक लावून रेस्टॉरंट बंद करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘MSP’चा फेरफार अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन कार्यकारिणी निवडीची आमसभा अवैध असल्याचा निर्वाळा धर्मादाय उपायुक्त व्ही. आर. सोनुने यांनी मंगळवारी दिला. या निर्णयामुळे मंडळाचे सचिव सतीश चव्हाण यांचा फेरफार अर्ज फेटाळण्यात आला.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक १० जुलै २०१३ रोजी झालेल्या आमसभेत झाली होती. मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते. निवडणुकीनंतर अध्यक्ष म्हणून प्रकाश सोळंके तर, सचिव म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. निवडणुकीनंतर विश्वस्त म्हणून चव्हाण यांनी न्यासाचा फेरफार अर्ज केला. माजी सचिव मधुकरराव मुळे, किरण जाधव, चंद्रशेखर शेलार यांनी आक्षेप अर्ज केला. अर्जदार चव्हाण यांना वरिष्ठ कोर्टात जाण्यासाठी कोर्टाने त्यांच्या निर्णयास दोन आठवड्याची स्थगिती दिली.

युक्तीवाद...

न्यासाच्या नियमाचे उल्लंघन करून ही निवडणूक घेण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक कायद्याचा भंगही झाला. निवडणूक वेळापत्रक जाहीर केले नाही, निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती बेकायदा केली; तसेच १० जुलै २०१३ची सभा गैरकायदेशीपणे बोलाविण्यात आली, असा युक्तिवाद आक्षेपकर्त्याचे वकील एस. बी. कुलकर्णी, शशांक बीडकर यांनी केला.

सहायक धर्मादाय आयुक्तांनी (औरंगाबाद) दोन निरीक्षकांची नियुक्ती करून निवडणूक घेतली. मंडळाच्या घटनेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक प्रक्रियेत मंडळाच्या १७९पैकी १०२ सदस्यांनी सहभाग घेतला, असा युक्तिवाद दिलीप चौधरी, के. यू. निकम यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतात सोडली विषारी रसायने

$
0
0

विजय देऊळगावकर, औरंगाबाद

खाम नदीत विषारी रसायने सोडल्याची घटना ताजी असतानाच शेंद्रा शिवारात शेतकऱ्यांच्या सहा एकर ‌जमिनीमध्येही एका कंपनीने मोठ्या प्रमाणात घातक रसायने सोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेला महिना उलटून गेला असून, शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिकलठाणा पोलिस आदींकडे तक्रारी केल्या आहेत. धान्यापासून मद्यनिर्मिती करणाऱ्या बळीराजा कंपनीने हा प्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या विषारी रसायनामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे २५ झाडे जळाली आहेत.

मुकुंदवाडी येथील आत्माराम आसाराम ठुबे यांची शेंद्रा कमंगर ‌शिवारातील गट क्रमांक १२५मध्ये सहा एकर शेती आहे. ७ ते १५ मे दरम्यान त्यांच्या शेतामध्ये टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर विषारी रसायन सोडण्यात आले. त्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा थर दिसून आला. त्याचबरोबर लिंबाची पाच मोठी झाडे, आंबा, बोरी, बाभळी आदी झाडे जळाली होती. त्यांनी तात्काळ ११ मे रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांत तक्रार केली. यामध्ये शेंद्रा एमआयडीसीमधील बळीराजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे हे रसायन असून, कंत्राटदारामार्फत ते शेतात टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. शेतीपासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही कंपनी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केवळ पंचनामा केला. या घटनेला महिना उलटला तरी कंपनी किंवा रसायने सोडणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ठुबे यांनी अखेर १२ जून रोजी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून कंपनी व रसायने सोडणारे विष्णू भालेकर व कैलास भालेकर यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला, मात्र त्यानंतरही चिकलठाणा पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मुंडे यांच्या नातेवाईकांची भागीदारी

बळीराजा कंपनीमध्ये तीन जणांची भागीदारी आहे. बळीराजा कंपनी, रेडिको एनव्ही व रिद्धी सिद्धी एंटरप्रायजेस यांची आहे. यापैकी कंपनीचे एक तृतीयांश भागीदार भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नातेवाईक आहेत, अशी कंपनीचे अॅडमिन हेड श्रीपाद पाटील यांनी दिली.

कंपनीच्या कंत्राटदारांनी विषारी रसायन टाकल्यामुळे पूर्ण शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या तीन ते चार वर्षांत शेतीत पीक घेता येणार नाही. लिंबाची मोठी झाडे वाळून गेल्यामुळे रसायन किती विषारी आहे याची जाणीव होते. कंपनीवर व कंत्राटदारावर कारवाई होणे आवश्यक आहे.

- आत्माराम ठुबे, शेतकरी.

ठुबे यांच्या जमिनीमध्ये टाकलेले रसायन मुळात आमच्या कंपनीचे नाही. दुसरी बाब, रसायन टाकत असताना त्यांनी तेव्हाच अटकाव करायला हवा होता. आर्थिक फायदा घेण्यासाठी शेतमालकाने हा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- श्रीपाद पाटील, एचआर व अॅडमिन हेड, बळीराजा रेडिको डिस्टिलरीज कंपनी, शेंद्रा

आत्माराम ठुबे यांची शेतात विषारी रसायन टाकल्या प्रकरणी बळीराजा रेडिको कंपनीविरुद्ध तक्रार आलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बळीराजा रेडिको एनव्ही कंपनीला रसायनाबाबत खुलासा करावा, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे.

- डी. बी. पाटील, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृदसंधारणासाठी धडक कार्यक्रमाची गरज

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. मात्र, येत्या काळात प्रशासन, सामाजिक संस्था, आणि शेतकऱ्यांसमोर या पाण्याचा पुरेपर उपयोग करून घेणे आणि नदी, नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा पात्रात साठला जाणार नाही याची खबरदारी घेणे हे आव्हान असणार आहे. त्यासाठी येत्या काळात मृदसंधारण, वनीकरणासाठी धडक कार्यक्रम राबविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करणार आहेत. या वेळी ते पेठ, बुधडा, उबंडगा, औसा, अलमला, बेलकुंड कवळी आणि मातोळा या गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे ते मृदसंधारण, वनीकरणासाठी धडक कार्यक्रम राबवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यात शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात सर्वाधिक जलसंधारणाची कामे यंदाच्या उन्हाळ्यात झाली आहेत. यात नाला सरळीकरण, खोलीकरण, नदीचे पुनरुज्जीवन अशी कामे झाली आहेत. काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामाचे महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे आठ लाखांपासून ते पन्नास लाख रुपयांपर्यंत जनतेने या कामी योगदान दिले आहे. बिगरमोसमी पावसानेसुद्धा या परिसरातील नद्या-नाल्यात पाणी साठले आहे. मोसमी पाऊस चांगला झाला, तर लातूर जिल्हा पाणीदार जिल्हा झाल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.

या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा जसा फायदा होणारा आहे. त्यासोबतच खाली गेलेल्या पाण्याच्या पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रशासन, सामाजिक संस्था, आणि शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. या पाण्याचा पुरेपर उपयोग करून घेणे आणि नदी, नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा पात्रात साठला जाणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव म्हणाले, 'यंदाच्या उन्हाळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगने लोकसहभागातून जिल्ह्यातील २६ गावात जलसंधारणाची गरजेप्रमाणे कामे केली आहेत. आम्ही ज्या गावात कामे केली आहेत. त्या गावातील नदी, नाल्याच्या दुतर्फा बांबू, वनौषधीचे झाडे लावणार आहोत. झालेल्या कामाच्या ठिकाणी झाडे लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही झाडे मातीची धूप थांबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. झाडांची मुळे पाणी साठवून ठेवतात त्याचा उपयोग जमिनीतील

पाण्याची पातळी वाढण्यासाठी होतो. आम्ही शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गवताची लागवड करण्यासाठी मदत करणार आहोत. त्याचप्रमाणे वनौषधीची लागवड ही शेतकऱ्यांसाठीसुद्धा लाभदायक आहे. पर्यावरण आणि वनक्षेत्राच्या विकासासाठी सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि कृषी खात्यांनी एकत्र येऊन ठोस असा कृती आराखडा तयार करून काम केले, तर राज्य फक्त दुष्काळमुक्तच नाही, तर हिरवेगारही होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षणगृहातून पळाल्या सहा मुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

येथील श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुलीच्या निरिक्षणगृहातून मंगळवारी दुपारी सहा मुली पळून गेल्या. बुधवारी महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आशा भिसे यांच्या अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्था चालवित असलेल्या निरिक्षणगृहात असलेल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सुविधा नाही. या बाबत आणि तक्रारीच्या बाबत जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी संस्थेला ९ जून रोजीच नोटीस दिली आहे. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात हा प्रकार घडला आहे. घडलेला प्रकार हा चिंताजनक असून त्याचा सोक्षमोक्ष महिला आयोगाच्या सहा जुन रोजी होणाऱ्या बैठकीत लावणार असल्याचे आशा भिसे यांनी सांगितले. भिसे यांनी बुधवारी अचानक सकाळी साडे अकरा वाजता निरिक्षणगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सहा मुली पळून गेल्याचे आढळून आले. सकाळी या निरिक्षणगृहात फक्त दोन महिला कर्मचारी होत्या असे ही श्रीमती भिसे यांनी सांगितले. सदरील प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याला माहिती दिली असून पोलिसांनी दोन मुली ताब्यात घेतल्या असून दोन मुलीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आहे. त्यामुळे अद्याप त्याबाबतचा गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यास जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी बी. एस. निपाणीकर यांनी सांगितले. या घडलेल्या घटनेबाबतचा खुलासा संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे. या बाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती निपाणीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्रकुंड धबधबा वाहू लागला

$
0
0

नांदेडः नांदेड श‌हर व जिल्ह्यात मंगळवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील सखल भागातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात हाल झाले. या पावसामुळे विदर्भ-मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा वाहू लागला आहे. मंगळवारी सायंकाळी ढग दाटून आले अन पावसास सुरुवात झाली. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्याना पाणी आले आहे. या दमदार पावसाने कयाधू नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसामुळे आता ग्रामीण भागात पेरण्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बळीराजात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. बळीराजाची आता पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करणाऱ्यांना उद्यापर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

प्रेमी युगलावर हल्ला करून अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या पाच जणांना येथील जिल्हा न्यायाधीश जी. ओ. अग्रवाल यांनी १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

१२ जून रोजी दुपारी एकच्या दरम्यान रणवीर उर्फ मारोती उर्फ बबलू मोतीराम राऊत हा अल्पवयीन मैत्रिणीला सोबत घेऊन अर्धापूर येथील एका शेतात गप्पा मारत बसला होता. अचानक जवळपास १०-१२ जणांच्या टोळक्याने संस्कृती रक्षणाच्या नावाखाली अगोदर मारहाण केली. त्यानंतर या प्रकाराचे छायाचित्रीकरण केले. या मारहाणीत बबलू राऊतला मार लागला. त्यानंतर त्यांनी त्या दोघांचे मोबाइल हिसकावले आणि त्यांच्याकडील तीन हजार रुपये सुद्धा लुटले.

या प्रेमी युगलाला मारहाण करतांना या टोळक्याने त्या मारहाणीचे छाया चित्रीकरण केले. नुसते छाया चित्रीकरण करून हे टोळके थांबले नाही तर सोशल मीडियावर टाकले. ही चूक कुटुंबियांना कळू नये म्हणून प्रेमी युगल गप्प बसले होते. सोशल मीडियावर टाकलेले त्यांच्या मारहाणीचे छायाचित्रीकरण सर्वांच्या निर्दशनास आले. त्यानंतर या प्रकरणी १५ जून रोजी बबलूने तक्रार दिली. अर्धापूर पोलिसांनी दहा जणांच्या टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

अर्धापूरचे पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड आणि त्यांच्या पथकांनी या प्रकरणी प्रेमी युगलाला मारहाण करणारे शेख कलीम शेख सलीम, मोईज खान आगा खान, शेख समीर शेख नजीर, जबीर नजीर अहेमद आणि अब्दुल गफार शेख हमजा या पाच जणांना पकडले. या प्रकरणातील शेख हनिफ हफीज अण्णा, आवेश आरिफ आणि शेख इस्माईल शेख बाबा हे तिघे अजून फरार आहेत. १६ जून रोजी अटक केलेल्या या पाच जणांना न्यायालयात हजर करून पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड आणि सहाय्यक सरकारी वकील अॅड. विनायक भोसले यांनी या आरोपींना गंभीर गुन्ह्यातील प्रकरणासाठी तपास योग्य व्हावा म्हणून पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींच्यावतीने अॅड. सय्यद अरीबोद्दीन यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी झालेला उशीर आणि प्रकरणातील तांत्रिक बाबी पाहता पोलिस कोठडी देण्यासारखे प्रकरण नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिराढोणमधील जलसंकट टळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण (ता. कळंब) येथील ढोरी नदीच्या अंतर्गत नाल्यात यंदा पावसाचे पाणी वाहू लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पात्र लुप्त अवस्थेत होते. टंचाईवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलशिवार योजनेअंतर्गतच्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात या नदीचे काम हाती घेण्यात आले होते.

लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामामुळेच या नाल्याचे पुनरुज्जीवन झाले. त्यामुळे यंदा आतापर्यंत झालेल्या पावसातच नदीच्या झालेल्या खोलीकरणाच्या भागात पाणी चांगल्या प्रकारे खळखळू लागले आहे. नदी खोलीकरणामुळे शिवाय नाल्याचे पात्र स्वच्छ व रुंद केल्यामुळे आता शिराढोण परिसरातील जलसंकट हटले असून, या परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यात २१७ गावांमध्ये विविध शासकीय यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ३ हजार ३७८ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामावर आतापर्यंत सुमारे २९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गाळ काढण्याच्या कामात लोकांचा सहभाग हा वाखाणण्या जोगा आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळाच्या खाईत लोटला गेला होता. या जिल्ह्याला सुजलाम-सुफलाम करण्याबरोबरच हा जिल्हा टंचाईमुक्त व टँकरमुक्त करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलशिवार अभियानाची कामे ही लोकसहभागातून होत असल्यामुळे येथील कामे ही राज्यातील अन्य जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व अनुकरणीय अशी ठरू लागली आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ही कामे पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कृषी राज्यमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा विशेष दौरा केला व जलशिवाराच्या कामाची जातीने पाहणी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयस्तरावरील १६ पत्रकारांची टीम १८ व १९ जून रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहे.

६५.८ मिली मीटर पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत ८८.२ मिली मीटर इतका पाऊस अपेक्षित होता. परंतु, अपेक्षित पावसाच्या तुलनेत ७४.७ मिली मीटर इतकाच पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ७६७.५ मिली मीटर इतकी आहे. मागील वर्षी १५ जूनपर्यंत २६.६ मिली मीटर इतका पाऊस झाला होता. यंदा १७ जूनपर्यंत ६५.८ मिली मीटर इतकाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस परंडा तालुक्यात ११३.६ मिली मीटर इतका तर सर्वांत कमी पाऊस कळंब तालुक्यात ३४.३ मिली मीटर इतका झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात ४० मिली मीटर, तुळजापूर ५६ मिली मीटर, उमरगा ७३.३ मिली मीटर तर वाशी तालुक्यात ४७ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यात केवळ मिली मीटर इतका कमी पाऊस झाला असताना सुद्धा खोलीकरण केलेल्या ढोरी नदीत चांगल्या प्रकारे पाणी साठले असून ते वाहू लागले आहे.

विधिमंडळ समिती उस्मानाबाद दौऱ्यावर

जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी विधिमंडळ समिती उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहे. राज्यातील २५ आमदारांना या समितीमध्ये समावेश आहे. प्रशांत बंब (गंगापूर), संगीता ठोंबरे (केज), संदिपान भुंमरे (पैठण) व संतोष दानवे (भोकरदन) हे मराठवाड्यातील चार आमदार या समितीमध्ये आहेत. ही समिती देखील जलयुक्त शिवार अभियानाची कामे प्रामुख्याने पाहणार आहे.

३५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ढोरी नदीच्या पुनर्जिवनाचे काम जलशिवार योजनेअंतर्गत घेण्यात आले असून आतापर्यंत या नदीतील खोलीकरणाचे काम २८०० मीटर इतके झाले आहे. अद्याप ३२०० मिटरचे काम चालू आहे. या नदीची एकूण लांबी ६००० मिटर इतकी आहे. या नदीवर चार केटीवेअर आहेत. या नदीच्या पात्रातून आतापर्यंत ४० हजार ४०० घ. मी. इतका गाळ लोकसहभागातून केवळ २ लाखाची मदत झाली आहे. या नदीचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ३५ लाखांचा निधी अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामे पूर्ण होऊनही निधीसाठी डोळेझाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिंचन विभागाच्या पुढाकाराने २०१३-१४ मध्ये फुलंब्री तालुक्यात २० सिमेंट बंधारे उभारण्यात आले. काम पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यांमध्ये पाणीही साठले आहे. दोन वर्षे उलटून गेले तरीही सरकारने या कामाचे तब्बल एक कोटी ९५ लाख रुपये थकविले आहेत. हे पैसे कधी मिळणार आणि कोण देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांची सिमेंट बंधाऱ्यांची कामे हाती घेण्याबाबत मागणी होती. लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागा विभागाने यंत्रणेमार्फत कामे पूर्ण केली. योजना पूर्ण जाल्यामुळे २३३ हेक्टर सिंचनक्षमा निर्माण झाली. ही कामे फुलंब्री तालुक्यातील शेती व जनावरांसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. २० बंधारे पूर्ण झाले. त्यासाठी एक कोटी ९५ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यातून आजवर एक रुपयाही शासनाकडून मिळालेला नाही. हा निधी कधी मिळणार ? कोणाकडून मिळणार ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. जिल्हा परिषद नंदा ठोंबरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून निधीची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना ३४१ कोटींची प्रतीक्षा

$
0
0

रामचंद्र वायभट, औरंगाबाद

दुष्काळामुळे वाया गेलेले पीक, अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेल्या खरीप अनुदानाची प्रतीक्षा आहे. शासनाकडे असलेले ३४१ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले, तर सध्या तोंडावर असलेल्या खरीपाच्या पेरण्यांसाठी उपयोग होईल.

शासनाने घोषित केलेल्या २०३२.६६ कोटी रुपयांच्या खरीप अनुदानापैकी विभागामधील २३ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना प्रशासनाकडून १६९१.५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. शिल्लक अनुदानासाठी विभागीय प्रशासनातर्फे शासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. दुसरी पेरणी सुरू झाली तरी मराठवाड्यातील सुमारे दहा लाख शेतकऱ्यांना ३४१.४४ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्यामध्ये मान्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे बळीराजा तुलनेत लवकर पेरणीच्या तयारीला लागला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पेरणीला सुरूवातही झाली असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अनुदान मिळाले, तर या पैशांचा उपयोग खत, बियाणे तसेच शेतीच्या इतर कामांसाठी होईल. विभागामध्ये शासनाने दोन टप्प्यांत खरीप अनुदानाच्या रकमेचे वाटप केले आहे.

प्रारंभी शेतकऱ्यांना बँक खात्यांच्या अडचणीमुळे अनुदान उश‌िराने प्राप्त झाले होते, बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेचे खाते तसेच संमत्तीपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा केले. पहिल्या टप्प्यामध्ये ८४५.५५ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ८४५.९५ कोटी रुपयांची अनुदान रक्कम दिली होती. त्यानुसार ६ हजार ७२० बाधित गावांमधील सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

दुष्काळी मराठवाड्यामध्ये हातची पिके गेल्यामुळे हैराण असलेला शेतकरी सरकारने दिलेल्या अनुदानाकडे डोळे लाऊन बसला असतानाच अवकाळीचा फटका बसला. गहू, आंबा, हरभरा या पिकांचे अवकाळीच्या फटक्यामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आणखीच हवालदिल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीस जाळले; पतीस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून जिवंत पेटवून देणाऱ्या पतीला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राहुल लिंबाजी थोरात (वय २३, रा. देगाव तेल्याचे ता. पूर्णा जि. परभणी), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

राहुल याचे सन २०१२ मध्ये वंदना हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नोकरीसाठी पत्नीसह बजाजनगर (वाळूज) येथे राहत होता. चारित्र्यावर संशय घेवून वारंवार मारहाण होत असल्याने वंदना माहेरी गेली होती. परंतु, राहुलने तिला परत आणून रांजणगाव शेणपुंजी परिसरात घर भाड्याने घेतले. काही दिवसानंतर त्याने पुन्हा पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. कामाला सुटी असल्याने १ फेब्रुवारी २०१३ रोजी राहुल सकाळी १० वाजेला घरातून बाहेर पडला व सायंकाळी सहा वाजता परत आला. परत आल्यानंतर त्याने हिटरचा रॉड सरळ करून वंदनास जबर मारहाण केली. त्यानंतर तिला स्वःतच्या अंगावर रॉकेल ओतून घेण्यास भाग पाडले व राहुलने पेटवून दिले. वंदनाला शेजाऱ्यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा राहुलाही सोबत होता. राहुलविरुद्ध ४ फेब्रुवारी २०१३ रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल व वंदनाचा ५ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. नायब तहसीलदार अब्दुल सिद्दिकी यांच्यासमक्ष मृत्युपूर्व जबाबात वंदनाने राहुल याने पेटवून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजयमाला रिठ्ठे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे गाह्य धरून कलम ३०२ अन्वये आरोपी राहुल थोरात याला जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा, कलम ५०६ अन्वये एक वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायाच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले.

कार्यालयाचे उद‍‍्घाटन

औरंगाबादः भारतीय जनता पक्ष शेतकरी आघाडीचे प्रदेश सचिव पंजाबराव वडजे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, मनपा स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, नगरसेवक विजय औताडे, राखी देसरडा, कचरू घोडके, प्रशांत देसरडा, बसवराज मंगरुळे, उद्धव करडखेले, लता वडजे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने एक जागीच ठार

$
0
0

वाळूज : वाळूज एमआयडीसीतील एनआरबी कंपनी चौकात एका आयशर ट्रकने मोटरसायकलला ठोस दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेकरा वाजता घडला.

रांजगणाव फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या एनआरबी कंपनीकडे जाणार्या चौकातून विजयसिंग दादासिंग खोकड (वय ४७, रा. साईनगर सिडको) हे मोटरसायकलवरून (एम. एच. २०, झेड ९४८५) जात होते. त्यांना मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (एम.एच.०४, बी जी ७६३६) ठोस दिली. या अपघातात खोकड जागीच ठार झाले. जयसिंग प्रकाशसिंग खोकड यांच्या तक्रारीवरून आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक- दुचाकी धडकेत दूध विक्रेत्याचा मृत्यू

$
0
0

फुलंब्रीः औरंगाबाद रस्त्यावरील चौका घाटाखालील वृंदावन ढाब्यासमोर ट्रक व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. रावसाहेब त्र्यंबक घुगे (वय ५०, रा. कनकाेरा, ता. अाैरंगाबाद), असे मृताचे नाव आहे. दूध विक्री करून औरंगाबादहून परताना दुचाकी ( एम. एच. २०, सी डी ३८०५) व ट्रक (एम.ए.२०, बी ई २१४०) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रावसाहेब घुगे ट्रकखाली फसले होते. त्यांच्या दुचाकीचा चुरा झाला असून नंबर ओळखणेही अशक्य होते. ट्रकखालून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दुचाकीवरील दुधाच्या कॅन व लाेखंडी सळ्यांनी बनविलेला साचे निखळून रस्त्यावर पडलेले हाेते. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाेलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवरील खड्यांमुळे धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. अपघातानंतर कामावर जाता येत नसल्याने कामगारांवर उपासमारीची पाळी येत आहे. एमआयडीसीने तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी मागणी कामगार करीत आहेत.

वाळूज एमआयडीसीतील तिरंगा चौक-टीटीके-जोगेश्वरी या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. उद्योजकांच्या आंदोलनानंतर रस्ता बांधकामासाठी निविदा काढून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, संबंधित ठेकेदार हे काम मुदतीत पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे एमआयडीसीने रस्त्याचे काम बंद केले आहे. सध्या खड्ड्यात पाणी साचल्याने रस्ता निसरडा झाला असून ते चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी आपटून अपघात होतो, असे कामगारांनी सांगितले.

दरवर्षी शासनाला उद्योजकांकडून कोट्यवधींचा निधी कराद्वारे मिळतो. त्यामुळे उद्योजक व कामगारांवर खड्डे बुजवा, असे म्हणण्याची वेळ येऊ नये. पक्का व दर्जेदार रस्ता करून देण्याची त्यांची जबाबदारी आहे. पॅचवर्क तात्पुरते आहे. पुन्हा टेंडर निघून अर्थार्जन होते. खराब रस्त्यांमुळे नवीन उद्योग येत नाहीत.

- सुनील किर्दक, माजी सचिव मासिआ

एमआयडीसी तील रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे. उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागला. रस्त्याचे काम न झाल्याने खड्डयांमुळे अपघात वाढत आहे. कामगारांना अपंगत्व आल्याशिवाय राहणार नाही.

- गणेश वाघ, रांजगाव

फॅब्रीकेशनचे काम असल्याने अनेकवेळा दुचाकीवर टुल, कटर आदी साहित्य घेऊन जावे लागते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्यास साहित्याचे नुकसान होऊ शकते. सिमेंटचे टिकाऊ रस्ते बांधण्याची गरज आहे.

- महेशकुमार पाटील, कामगार

खराब रस्त्यांमुळे काही दिवसांपासून किरकोळ अपघात वाढले आहेत. खड्यात साचलेल्या पाण्यामुळे अचनाक गाडी थांबवणेही शक्य नाही. दुचाकी थांबवल्यास घसरण्याचा धोका आहे. बंद पथदिवेही सुरू करण्याची गरज आहे.

- दादासाहेब जगदाळे , कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याध्यापकाला भोसकणाऱ्या आरोपीस जन्मठेप, सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील संग्रामनगरच्या रस्त्यावर अडवून २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला नकार देणाऱ्या मुख्याध्यापकास चाकूने भोसकल्याने मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला जन्मठेपेसह दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीस एस. एस. गोसावी यांनी नुकतीच ठोठावली.

चार फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी सात वाजता संग्रामनगरच्या रस्त्यावरून डोणगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कचरू कांबळे हे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी आरोपी दिनेश अर्जुनसिंग ठाकूर याने त्यांना अडवून २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यास नकार देताच आरोपीने तीक्ष्ण चाकूने कांबळे यांना भोसकले. घाटीमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा ११ फेब्रुवारी २०१२ रोजी मृत्यू झाला. सहाय्यक फौजदार रावसाहेब नाना मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीपान गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश गोसावी यांनी आरोपीला ३०२ कलमाखाली दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली. तसेच ३००० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, ३८५ कलमाखाली दोन वर्षे सक्तमजुरी, २००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षाही ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाला घातला गंडा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाची जीप तसेच त्यामध्ये असलेले दोन लाख रुपये एका भामट्याने पळवित गंडा घातला. मंगळवारी दुपारी करोडी ता. औरंगाबाद येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष सोनवणे (वय ३० रा. करोडी) यांचे सोनालीका ट्रॅक्टर हे शोरूम आहे. त्यांच्या शोरूम मधून हरिचंद्र डोंगरे (रा. आनंदवाडी, ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर) याने ट्रॅक्टर विकत घेतले होते. यामुळे दोघांचा चांगला परिचय होता. मंगळवारी दुपारी डोंगरे सोनवणे यांच्या शोरूममध्ये आला. तेथील एक बोलेरो जिप विकत घ्यायची, असे म्हणत त्याची ट्रायल घेतली. यानंतर सोनवणे यांच्या टेबलवरील जिपची चावी घेऊन जिप घेऊन तो निघून गेला. सोनवणे यांच्या जिपमध्ये दोन लाख रुपयांची रक्कम देखील होती. डोंगरे निघून गेल्यानंतर सोनवणे यांचा सेल्समन डब्बे याने डोंगरेला मोबाइलवर फोन लावला. यावेळी त्याने बाबा पेट्रोल पंपावर जाऊन येतो अशी थाप मारली. अडीच तास उलटल्यानंतर देखील डोंगरे जीप घेऊन न परतल्याने त्याला पुन्हा कॉल करण्यात आला. यावेळी गाडी ठिकाणाला लावली असे म्हणत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सोनवणे यांनी सातारा पोलिस ठाण्यात डोंगरेविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीएसआय शेख तपास करीत आहेत.

मोबाइल पळविला

अभिनव बनसोडे (वय २२ रा. छावणी) या तरुणाचा मोबाइल एमआयटी कॉलेजच्या लायब्ररीतून पळविल्याची घटना सोमवारी घडली. अभिनव हा परीक्षा देण्यासाठी लायब्ररीमध्ये बॅगमध्ये मोबाइल ठेवून गेला होता. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजारातून मोबाइल लंपास

जवाहर कॉलनी येथील संतोष कसाने हा तरुण रविवारी जाफरगेट भागात आठवडी बाजारात खरेदीसाठी गेला होता. यावेळी त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणावर चाकूहल्ला

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करीत मोबाइल व सातशे रुपये पळविण्यात आले. रेल्वे स्टेशन चौकात मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

सय्यद इसा अकबर (वय २० रा. ज्युबली पार्क) हा तरुण मध्यरात्री एक वाजता रेल्वे स्टेशन चौकातून जात होता. यावेळी त्याला वसीम नावाच्या आरोपीने अडवत पैशांची मागणी केली. सय्यदने नकार दिल्यानंतर वसीमने त्याच्यावर चाकूने वार केला; तसेच त्याच्याकडील ७०० रुपये व मोबाइल असा दीड हजाराचा ऐवज हिसकावून पसार झाला. या प्रकरणी आरोपी वसीमविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दोन घरफोड्या उघडकीस

अट्टल घरफोड्या हेल्मेटला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिली असून ३० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. मुकुंदवाडी हद्दीत घडलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की उर्फ हेल्मेट गौतम कांबळे याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन त्याचा शोध घेऊन त्याला मंगळवारी गारखेडा भागात अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर विक्कीने दोन गुन्ह्याची कबुली देत चोरीचे ३० हजार रुपयांचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, अशोक नरवडे, योगेश गुप्ता, आनंद वाहूळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला पुन्हा कडाडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात शहर आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरात भाजीपाला महागला आहे. दोडका, श्रावण घेवडा या भाज्यांची आवक बंद झाली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी भाजीपाला उत्पादनाखालील क्षेत्राची पूर्ण काढणी केल्यामुळे भाजीपाल्याची आवक गेल्या चार दिवसांपासून निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे. यात सर्वात जास्त वाढ पालेभाज्या व ठराविक फळभाज्यांमध्ये झाली आहे. मृग नक्षत्राची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. भुईमूग, सोयाबीन पिकांची पेरणी करण्यासाठी शेत मोकळे करून मशागत योग्य करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्यात मोठी घट झाल्याने औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती (जाधववाडी)सह किरकोळ बाजारातही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे फळभाज्यांसह भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे नेहमी कवडीमोल दराने विकला जाणारा फ्लॉवर व कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. तर दोडका, श्रावण घेवडा भाजीची आवकच ठप्प झाली आहे. दहा ते पंधरा रुपये किलो असणाऱ्या काकडीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे.

नर्सरीचा परिणाम

१५ जून ते १५ ऑगस्ट या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाला नर्सरीत लावला जातो. शेतकरी मुख्य पिकांकडे वळलेला असतो. नर्सरीत भाजीपाल्याची दोन महिन्यांची लागवड झाल्यावर त्या भाजीपाल्याच्या पिकांना मुख्यशेतात काही कालावधीनंतर लावले जाते. यामुळेही काही काळ भाजीपाला महागलेला असतो असे कृषी अधिकारी यासंबंधी आवर्जून नोंदवतात.

भाजीपाला महागल्याने उठावच नाही. शेतकरी मृगाच्या पावसानंतर पेरणीकरडे वळला अाहे. ना‌शिकहून येत असलेला भाजीपाला अाता पनवेल, नवी मुंबईत जावू लागला अाहे. याचाही प‌‌रिणाम असू शकतो.

-नारायण जाधव, ‌विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडचे माजी आमदार किसनराव काळे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

माजी आमदार किसनराव लक्ष्मण काळे यांचे (वय ६०) ह्रदयविकाराच्या झटक्याने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर तालुक्यातील शिवना येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

रांगडे व्यक्तीमत्व व सर्वसमान्यांच्या दुःखात धावून जाणे म्हणून किसनराव काळे प्रसिद्ध होते. सिल्लोड पंचायत समितीमध्ये १९९०च्या सुमारास ते भाजपचे एकमेव सदस्य होते. त्यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष भूषवले व पक्षबांधणी करून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री कै. माणिकराव पालोदकर यांचा सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून पराभव केला. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले.

भाजपने २००४मध्ये उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली, पण पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, काही वर्षांपूर्वी मनसेत प्रवेश केला होता. जिल्हा परिषद सदस्य दीपाली काळे यांचे ते सासरे होत. त्यांच्यामागे दोन मुले,एक मुलगी,सुना नातवडे, असा परीवार आहे. त्याच्या अंत्यसंस्कारास उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, उपविभागीय पोलिस अधिकारी माने, तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’ची फळे चाखणार कशी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या 'अमृत' (अटल मिशन फॉर रिव्हिन्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या एका डोळ्यास हसू असले, तरी दुसऱ्या डोळ्यात मात्र चिंतेचे आसू आहेत. या योजनेसाठी पैसा कसा उभा करायचा, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

केंद्र सरकारने जेएनएनयुआरएम योजना बंद केली आणि त्याच्या जागी 'अमृत' योजना सुरू केली. या योजनेत महाराष्ट्रातील आठ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात औरंगाबादचा समावेश आहे. या समावेशाचे पत्र नुकतेच महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानुसार आयुक्त प्रकाश महाजन यांनी 'अमृत'साठी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. 'अमृत' योजनेअंतर्गत शहरातील रस्ते, पथदिवे, घनकचरा, आरोग्य विषयक सुविधा, शहर बससेवा, उड्डाणपुल, सबवे यासह अन्य पायाभूत सुविधांसाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून पैसे मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा लागणार आहे. डीपीआरसाठी महापालिका प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) नियुक्त करणार आहे. पीएमसीलाच डीपीआर तयार करण्याचे व शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणण्याचे काम दिले जाणार आहे. पालिकेतर्फे तयार केला जाणारा डीपीआर पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्तच असणार आहे.

डीपीआरला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यावर प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या काही टक्के रक्कम महापालिकेला आपला हिस्सा म्हणून द्यावी लागेल. दहा टक्के रक्कम पालिकेला स्वतःचा हिस्सा म्हणून देण्याची वेळ आल्यास किमान पन्नास कोटी रुपये पालिकेला उभे करावे लागतील. पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता; एवढी रक्कम उभी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अमृत योजनेत शहराचा समावेश झाला तरी, अमृताची फळे चाखण्यासाठी पालिकेला आर्थिक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. ही शर्यत पार कशी करायची, अशी चिंता पालिकेच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images