Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विरोधक बोलू लागले

$
0
0

मकरंद कुलकर्णी

गेल्या अडीच वर्षांपासून शांत असलेली जिल्हा परिषद बुधवारी अचानकपणे बोलू लागली. विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांच्या स्टाईलने सत्ताधारी आणि प्रशासनाची कोंडी करून सक्रीय झाल्याची वर्दी दिली आहे. दुसरीकडे महिला सदस्यांनी पक्षभेद विसरून विकासकामांसाठी एकत्र येण्याचा नवीन पायंडा पाडला. एकूणच पुढचे अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे कामकाज आता योग्य पद्धतीने चालेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

दहा वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद गमवावी लागली होती. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेना - भाजपने गेली अडीच वर्षे कुठल्याच पातळीवर संघर्ष केला नव्हता. अपवाद काही सदस्यांचा होता. बुधवारी मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले. शिवसेना गटनेते मनाजी मिसाळ, संतोष माने, सुरेखा जाधव, नंदा काळे या सदस्यांनी शिवसेनेचा पद्धतीने सभागृह दणाणून सोडले. या सदस्यांनी सिंचन विभागाच्या विषयावर धारेवर धरल्याने सत्ताधारी पदाधिकारी शांत बसून होते. प्रशासनाचे अधिकारीही काही बोलू शकले नाहीत. एरव्ही एखाद्या विषयात सीइओ, अतिरिक्त सीइओ मध्यस्थी करून प्रश्न सोडवित असतात, पण आज मात्र काही वेगळेच चित्र होते. अडीच वर्षांनंतर शिवसेना सदस्य आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांना पुढचा काळ कठीण जाणार आहे. मनसेचे डॉ. सुनील शिंदे, बबन कुंडारे, शैलेश क्षीरसागर यांनीही अतिशय आक्रमकपणे किल्ला लढविला. सिंचन विभागाच्या योजनांवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्यासाठी आलेल्या निधीचे विशिष्ट सदस्यांना परस्पर वाटप करण्यात आले होते. त्याची चौकशी अशीच गुंडाळण्यात आली. बंधारे वाटपाच्या विषयावरही अशीच चालढकल करण्यात आली होती. त्यामुळे हा विषयही एकाच सभेपुरता मर्यादित राहतो की काय अशी शंका होती, पण शिवसेना - भाजप आणि मनसे सदस्यांनी मागणी मान्य होईपर्यंत माघार घेतली नाही. तहकूब झालेली सभा जेव्हा सुरू होईल त्यात केवळ सिंचन विभागच टार्गेट राहील असे संकेतही यातून मिळाले. काँग्रेसचे प्रभाकर काळे, शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी विकासाच्या मुद्यावर प्र्रशासनावर कोरडे ओढले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सभागृहात ३३ महिला सदस्य आहेत. आजच्या सभेत महिला सदस्य गटतट विसरून एकत्र आल्या होत्या. सभेपूर्वी काय मुद्दे मांडायचे याची एकत्रित चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांना याची माहितीच नव्हती. त्यांनी वेगळी फिल्डिंग लावली होती, पण प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर वेगळेच चित्र दिसले आणि आजपुरते तरी सत्ताधारी मागे सरकले. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काही मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही. एकूणच पुढच्या काळात विरोधीपक्ष म्हणून सक्रीय राहण्याचे संकेत गुरूवारच्या सभेतून मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अधिकमासी व्हावी ज्ञान वृद्धी!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अधिक मास म्हणजे अधिक वाढ. ही वाढ असावी ती माणुसकीची, निपुणतेची, गुणग्राहकता व ज्ञानाची. ज्याची मला गरज नाही, पण तो मोठा असेल तर त्याचे मोठेपण समजून त्यास वंदन करण्याची,' असे प्रतिपादन अनुराधा जहागीरदार यांनी मंगळवारी केले. अधिक मासानिमित्त स्फूर्ती महिला मंडळातर्फे एन पाचच्या गीताभवन येथे अनुराधा जहागीरदार यांच्या व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर स्फूर्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष अलका अमृतकर होत्या. ‌अनुराधा यांनी अधिक मासाच्या म‌हतीला संस्कृतीसंवर्धन व ज्ञान वृद्धीच्या भूमिकेतून स्पष्ट केले. सचिव आरती कुलकर्णी यांनी सूचसंचालन केले. डॉ. सीमा दहाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. निशी अग्रवाल यांनी आभार मानले. यावेळी नेपाळ भूकंपग्रस्तांना मदतीचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. तसेच सदस्यांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता नीला रानडे, डॉ. सीमा दहाड, सुवर्णलता शर्मा, जयश्री जोशी, सुनंदा केळे, शोभा प्रभुणे, वैशाली ठाकूर आदींनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्याने डायरिया

$
0
0

दू षित पाणीपुरवठा, कमी दाबाने नळाला येणारे पाणी आणि वॉर्डात ठिकठिकाणी साचलेल्या कऱ्यामुळे चेलीपुऱ्यातले नागरिक त्रस्त झाले आहेत. शहाबाजार, गणेश कॉलनी, पूर्वीचा हर्षनगर वॉर्ड तसेच इतर भागांसह चेलीपुरा वॉर्डाची निर्मिती झाली. वॉर्डातील मुर्गीनाला परिसरात गेल्या महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांना डायरियाची लागण झाली आहे. याबाबत समांतर कंपनी आणि महापालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नाही. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली, तरीही कंपनीने हा प्रश्न सोडविला नाही. चेलीपुरा, काचीवाडा, शहागंज भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या भागातून दिल्लीगेटपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वॉर्डातील अनेक भागात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

चेलीपुरा वॉर्डात साचलेली घाणच इथल्या अस्वच्छतेबद्दल, नागरिकांच्या व्यथेबद्दल सारे काही सांगून जाते.

नगरसेविकेचा परिचय

चेलीपुरा येथील नगरसेवीका सायरा बानो या गेल्या ३० वर्षांपासून महापालिका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पहिल्याच प्रयत्नात त्या एमआयएमकडून निवडून आल्या. सध्या त्या खैरूल मोमीनीन शाळेच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

नगरसेविका काय म्हणतात?



महापालिका आणि कंपनीच्या करारात एखादया भागात दूषित पाणीपुरवठा असेल तर त्वरित पाइप लाइन बदलावी, असा नियम आहे. मात्र, मुर्गीनाल्यातील लाइन बदलली नाही. या भागात दूषित पाण्यामुळे एखादयाचा जीव गेल्यास याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील. वॉर्डातील पथदिवे दुरुस्त केले. भाजीमार्केटमध्ये मुरूम टाकला. आगामी काळात शाळा, वाचनालयाला सुविधा देऊ. - सायरा बानो, नगरसेविका, चेलीपुरा.

चेलीपुरा भागातील पाइप लाइन ४० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे त्यातून दूषित पाणीपुरवठा होतो. दररोज डायरियाचे दोन ते चार रूग्ण आढळतात.- डॉ. अफजल खान शहागंजच्या रस्त्यावरील पथदिवे बंद होते. रात्री या परिसरातून जातान नागरिकांना त्रास व्हायचा. आता पथदिवे सुरू करण्यात आले आहेत.- शारेख भाई काचीवाडा भागात पाण्याची तीव्र समस्या आहे. वारंवार तक्रार करूनही वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. - शेख करिम वॉर्डातील ड्रेनेज लाइन जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या बदलाव्यात. अनेक ठिकाणी वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्याकडे लक्ष द्यावे.- मोहम्मद आरेफ चेलीपुरा भागात पाण्याची समस्या आहे. तर शहागंज येथील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होऊन वाहते. योग्य नियोजन झाले पाहिजे. - शेख सईद मुर्गीनाला भागात दूषित पाणीपुरवठा होतो. याबाबत निवेदन दिले. मात्र, काहीच उपायोजना केली नाही. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत.- नाजीम शेख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सदस्यांची झेडपीत एकजूट

$
0
0

सर्वसाधारण सभेपूर्वी सर्वपक्षीय महिला सदस्य सभापती शीला चव्हाण यांच्या दालनात एकत्र आल्या होत्या.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किरकोळ त्रुटी काढून गेल्या अडीच वर्षांपासून समाजकल्याण विभागाच्या योजना ठप्प आहेत. समाजकल्याण अधिकारी कामे मार्गी लावण्याऐवजी सदस्यांनी दिलेल्या नावांचीच तपासणी करण्याबाबत आग्रही आहेत. यामुळे मागासवर्गीय लाभार्थी वंचित राहिले आहेत. याची जबाबदारी निश्चित करून समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बुधवारच्या सभेत घेण्यात आला. सभेपूर्वी सर्वपक्षीय महिला सदस्य एकत्रित आल्या. समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांच्या दालनात सुरेखा जाधव, मनिषा मगर, हिराबाई पवार, सरूबाई शिंदे, चंद्रकला वळवळे, योगिता बाहुले, अनिता राठोड, शारदा गीते, पुष्पा केदारे, द्वारकाताई पवार, सिंधू पिवळ, मंजुषा जैस्वाल, विमल बनसोडे, कल्पना लोखंडे, संगीता सुंब, संगीता चव्हाण, नंदाताई काळे, माधुरी गाडेकर, नंदाताई ठोंबरे, संगीता मोटे, भिकाबाई तडवी यांची बैठक झाली. समाजकल्याण विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून कामे अडविण्यात आली आहेत. विविध योजनांसाठीचे लाभार्थी ठरविण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत याद्या पाठविल्या, पण समाजकल्याण अधिकारी पातळीवर याद्या थांबविण्यात आल्या. दोन वर्षे झाली तरीही लाभ मिळत नसेल तर आम्ही दाद कुठे मागायची ? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा घेऊन सर्व महिला सदस्य एकत्र सभागृहात आल्या. सभा सुरू झाल्यानंतर अनुपालन अहवाल वाचन सुरू झाला. नंदा काळे, सुरेखा जाधव यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांना अडविले आणि आधी आमच्या विषयावर चर्चा करा, अशी मागणी केली. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी 'आधी विषयपत्रिका संपवू मग तुमच्या विषयावर चर्चा करू' असा मुद्दा मांडला. शिवसेना गटनेते मनाजी मिसाळ हे महिला सदस्यांच्या बाजूने उभे राहिले. महिलांना न्याय द्या. समाजकल्याण अधिकारी योजना राबवित नाहीत आणि तुम्ही लक्ष देत नाहीत. मागासवर्गीयांवर अन्याय करू नका. दोन वर्षे झाली तरी योजनांचा विषय पूर्ण होत नाही. पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर वचक उरलेला नाही, असा आरोप मिसाळ, नंदा काळे, पुष्पा जाधव यांनी केला. महिला सदस्य आक्रमक झाल्या आणि त्यांनी सभागृहाचा ताबा घेतला. सर्वपक्षीय पुरुष सदस्यांनीही महिला सदस्यांच्या मागणीस पाठिंबा दिला.

महिला सदस्य आक्रमक

महिला सदस्यांच्या आक्रमकतेमुळे अध्यक्ष महाजन यांनी समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, असे आदेश दिले. विविध योजनांच्या याद्या ज्या निश्चित झाल्या आहेत, त्या गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण कराव्यात, असा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद एक्स्प्रेस...

$
0
0

सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी एका समर कॅम्पमध्ये ती सहभागी झाली. धावण्याच्या शर्यतीत ती फार चांगली कामगिरी करू शकेल, असे कॅम्पमधील प्रशिक्षकांनी सांगितले आणि तिच्या करिअरचा ट्रॅक निश्चित झाला. त्यानंतर केलेल्या मेहनतीच्या बळावर तिची चीनमध्ये होणाऱ्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. ही भरारी आहे, राशी जाखेटेची...

श्रीपाद कुलकर्णी

लहानपणापासून अभ्यासात हुशार. शाळेतील विविध खेळातही ती अव्वल असे. पाचवीत असताना तिला पालकांनी संगमनेर येथील एका समर कॅम्पमध्ये पाठविले. १५ दिवसांच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षकांनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला धावण्याच्या शर्यतीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे पालकांना सुचविले. या समर कॅम्पनंतर राशी जाखेटे या अॅथलिटची जडणघडण सुरू झाली. गेल्या पाच-सहा वर्षांत मेहनतीच्या बळावर तिने राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. आता चीनमध्ये येत्या २६ जूनपासून होणाऱ्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. संगमनेर येथील प्रशिक्षकांनी सांगितलेले शब्द राशीचे वडील हरिष जाखेटे यांच्या मनावर कोरले गेले होते. औरंगाबादेत परतल्यावर त्यांनी तिला १५ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गात दाखल केले. त्यानंतरच्या प्रशिक्षणाचा प्रश्न कायम होता. तेव्हा औरंगाबादेत अॅथेलॅटिक्साठी प्रशिक्षण नव्हते. त्याचदरम्यान अॅथेलॅटिक्सचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी औरंगाबादेत आले. राशीच्या वडिलांनी त्यांची भेट घेतली. यासंदर्भात जाखेटे सांगतात, मी मोदीसरांना भेटण्यासाठी एकटाच गेलो होतो. तिला घेऊन या. खेळ पहातो, मग ठरवू, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर त्यांनी राशीचा खेळ पाहिला आणि प्रशिक्षण सुरू झाले. २०१२-१३पासून राशीने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजविण्यास सुरुवात केली. इटावा येथे झालेल्या स्पर्धेत तिने १०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्यानंतरच्या वर्षी ४ बाय १०० रिलेमध्ये रौप्य आणि त्यानंतर याच क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. 'राशी अभ्यासातही हुशार आहे. चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत तिने यश मिळविले होते. त्यामुळे खेळात करिअर करावे की डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावे, असे पर्याय तिच्यासमोर होते. आम्ही तिला विचारले. तिने खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तिला पाठबळ देण्याचे ठरविले. त्यामुळे आम्हाला अनेकांनी मुर्खात काढले,' असे हरिष जाखेटे सांगतात. राशी यावर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८७.४ टक्के गुण मिळाले आहेत. अॅथेलॅटिक्ससाठी नियमित सराव, कठोर मेहनत करावी लागते. त्याचबरोबर खेळाडू मानसिकदृष्ट्याही भक्कम असावा लागतो. त्यासाठी जेष्ठ क्रीडा मनोसोपचार तज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांनी दोन वर्षांपूर्वी राशीला मार्गदर्शन केले. मराठी खेळाडू मानसिकदृष्ट्या संवेदनशील असतात. त्यांचा परिणाम जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीवर होतो. त्यादृष्टिने त्यांनी राशीला मार्गदर्शन केले. त्यांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला. त्यानंतर पालकांशी संवाद साधला. 'पुढची पाच वर्षे तिला अभ्यास कर असे म्हणणार नसाल तरच, तिचे खेळात करिअर करता येईल. इंटरनॅशनल लेव्हलवर खेळण्याची तिच्यात कुवत आहे. तिच्यावर अभ्यासाचे प्रेशर टाकू नका,' असे डॉ. बाम यांनी जखोटे दांम्पत्याला सांगितले. त्यांनी ते तंतोतंत पाळले. राशी शारदा मंदिर शाळेची विद्यार्थिनी. तिला शाळेनेही खूप सहकार्य केले. रोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास राशी सराव करते. सकाळच्या सरावामुळे तिला शाळेत जाणे शक्य नव्हते. ती रोज मध्यांतरानंतर शाळेत जात असे. अॅथलिटला आहारातून रोज सुमारे साडेचार ते पाच हजार कॅलरी मिळणे आवश्यक असते. डॉ. मुकुंद सबनीस आणि अश्लेषा देशमुख राशीला आहाराबद्दल मार्गदर्शन करतात. खेळाडूंना कायम दुखापतींना सामोरे जावे लागते. डॉ. जनगन्नाथ कागीनाळकर यांनी राशीवर दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी उपचार केल्याचे हरिष जाखेटे यांनी सांगितले. कोच, पालक आणि अॅथलिट हे तीन स्तंभ मजबूत असतील तरच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात. आपल्या मुलीने अॅथेलॅटिक्समध्ये करिअर करावे, असे सांगणारे औरंगाबादमधील हे पहिले पालक आहेत. राशीही रोज कसून सराव करते, असे तिचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी सांगतात. प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट, मिल्खासिंग, पी. टी. उषा या राशीच्या आदर्श आहेत. आई-बाबांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाली, असे ती सांगते. आता अकरावीत ती कला शाखेत प्रवेश घेणार आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १२.७६ सेकंद ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. कठोर मेहनतीच्या बळावर या औरंगाबाद एक्स्प्रेसचा वेग भविष्यात नक्कीच वाढेल...



पासपोर्टसाठी सहकार्य



एवढ्या लहान वयात परदेशातील स्पर्धा खेळण्याची संधी मिळेल, असे राशीच्या वडिलांना वाटले नव्हते. त्यामुळे तिचा पासपोर्ट काढला नव्हता. चीनमधील स्पर्धेसाठी निवड झाली आणि पासपोर्ट काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडिअर दाशरथे आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खूप मदत केली. सहा दिवसांत पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या. मुंबईच्या पासपोर्ट कार्यालयातील डॉ. विद्या कुलकर्णी यांनी एका तासात पासपोर्ट दिला. त्याचबरोबर चांगली कामगिरी कर, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्याचा अनुभव हरिष जाखेटे यांनी सांगितले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरा राठोड यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ. वीरा राठोड यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. भटका, बंजारा संस्कृतीवर आधारित असलेल्या त्यांच्या 'सेन साई वेस' या कविता संग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील २४ भाषांतील पहिल्या कलाकृतीस हा पुरस्कार देण्यात येतो. पहिले पुस्तक आणि लेखकाचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे, अशा पुरस्कारासाठी अटी आहेत. तांडा संस्कृती, भटका-विमुक्त, बंजारा संस्कृतीचे चित्रण वीरा राठोड यांनी 'सेन साई वेस' या आपल्या पहिल्या कविता संग्रहात केले आहे. या संग्रहात ४२ कवितांचा समावेश आहे. डॉ. राठोड हे मुळचे जिंतूर तालुक्यातील सावळी तांडा येथील रहिवासी. त्यांचे शिक्षण औरंगाबादेतच झाले. २०००पासून त्यांनी कविता लेखन सुरू केले. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलताना डॉ. राठोड म्हणाले, 'हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निश्चितच आनंद आहे. लेखनाची कोणतीही परंपरा नसताना मी लेखन प्रवाहात आलो. बंजारा संस्कृतीचे चित्रण असलेल्या या कविता संग्रहाची दखल घेतली गेली, ही निश्चितच अभिमानस्पद बाब आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चे पाइप चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

भाजपच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी 'डीआय'ऐवजी 'एचडीपीआय' पाइप वापराच्या ठरावाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला बुधवारी दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावरच त्यांनी 'चौकशी करा,' असा शेरा लिहून ते नगरविकास खात्याच्या सचिवांकडे सोपविले. समांतर जलवाहिनीसाठी डीआय (ड्युक्टाइल आयर्न) पाइपच वापरण्याचा ठराव जानेवारीत झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्याऐवजी एचडीपीआय (हाय डेन्सिटी पॉली इथेलिन) पाइप वापरल्यास पालिकेला १५३ कोटी रुपयांचा फायदा होईल, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सभेत सांगितले होते. तरीही सर्वसाधारण सभेने डीआय पाइपच वापरण्याचे आदेश दिले होते. कराराप्राणामे कंपनीने डीआय पाइपची वापरावेत, असे आदेश तत्कालीन महापौर कला ओझा यांनी दिले होते. ते मार्चमधील सभेत बदलण्यात आले. प्रशासनाने ऐनवेळचा ठराव ठेवून एचडीपीआय पाइप वापरण्याची मुभा दिली आणि सभेने हा ठराव मंजूर केला. त्याला भाजपसह काँग्रेस, एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला, पण त्याला न जुमानता महापौर त्र्यंबक तुपे यांनी एचडीपीआय पाइप वापरण्यासंबंधीच्या ठरावाचे इतिवृत्त मंजूर केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात प्रथम विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. 'समांतरच्या आड येणाऱ्यांना आडवे करू,' असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी थेट मुंबई गाठली. बुधवारी दुपारी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष भगवान घडमोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, प्रवक्ते शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, राजू शिंदे, कचरू घोडके, विकास कुलकर्णी, अनिल मकरिये उपस्थित होते. ठरावाची चौकशी करावी, हा ठराव विखंडित करावी, अशी मागणी या सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

'समांतर'चा पाढाच वाचला

मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 'समांतर'च्या कामाचा पाढाच वाचल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. हा प्रकल्प रखडला असून, काहीही काम करीत नसताना महापालिकेकडून कंपनीला नियमित पेमेंट केले जाते. कंपनीनी केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जात नाही, असे विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचे उपमहापौर राठोड यांनी सांगितले.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून तुटल्या ४० खुर्च्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रंगकर्मी आणि प्रेक्षकांनी प्रचंड ओरड केल्यानंतरही सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाची दूरवस्था कायम आहे. गेल्या आठवड्यात नृत्य स्पर्धेतील हुल्लडबाजीत जवळपास ४० खुर्च्या तुटल्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तुटलेल्या खुर्च्यांची संख्या अचानक वाढल्यामुळे संगीत मैफल आयोजित केलेल्या एका नाट्य संयोजकाने शनिवारी (२० जून) स्वखर्चाने खुर्च्यांची दुरुस्ती केली.

महापालिकेच्या ताब्यातील संत तुकाराम नाट्यगृहाची दिवसेंदिवस दूरवस्था वाढत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन सिडको प्रशासनाने संत तुकाराम नाट्यगृहाची उभारणी केली. मराठवाड्यातील या सर्वात आलिशान नाट्यगृहाची आसनव्यवस्था उत्तम होती. मात्र, नाट्यगृह महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर दैनंदिन स्वच्छता व जतनाकडे प्रचंड दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, नाट्यगृहाला अत्यंत बकाल स्वरूप आले. तुटलेल्या खुर्च्या, जळमटे लागलेल्या भिंती, सदोष ध्वनीव्यवस्था, धुळीने माखलेले रंगमंच आणि पाणी नसलेल्या स्वच्छतागृहाने प्रेक्षक जेरीस आले आहेत. तसेच ग्रीन रूम व विश्रामकक्षाचीही दूरवस्था झाली असून नामांकित कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील दोन्ही नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. तसेच नाट्यगृहांची पाहणी करून सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात वर्षभरानंतरही नाट्यगृहांची स्थिती 'जैसे थे' आहे.

तुटलेल्या खुर्च्यांमुळे नाट्य संयोजकांची सर्वाधिक अडचण होते. नाटकाचे तिकीट घेतलेले प्रेक्षक खुर्ची नसल्यामुळे संयोजकांना फैलावर घेतात. गेल्या आठवड्यात नृत्य स्पर्धेवेळी उपस्थित युवकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे किमान ४० खुर्च्या तुटल्याचे नाट्य समन्वयक पवन गायकवाड यांनी सांगितले. या प्रकारामुळे नादुरुस्त खुर्च्यांची संख्या वाढली आहे. मागील शनिवारी गायकवाड यांनी संगीत मैफल ठेवली होती. या मैफलीत प्रेक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने १३ खुर्च्या दुरुस्त केल्या. नाट्यगृहाचे व्यवस्थापक मनोज पाटील यांनी दुरुस्तीबाबत असमर्थता दाखविल्याने गायकवाड यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. नाट्यगृह जपण्यासाठी महापालिकेने तातडीने काम हाती घ्यावे अशी मागणी रंगकर्मी व नाट्य संयोजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेला पूल

$
0
0

शहाबाजार - दूषित पाणीपुरवठा, कॉलनीत साचलेले कचऱ्याचे ढीग, पुलाचे सात वर्षांपासून रखडलेले काम. या समस्येने शहाबाजार वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहाबाजारमध्ये नवे भाग जोडल्याने वॉर्डाचा विस्तार औरंगाबाद टाइम्स कॉलनी, अरिश मशिदीच्या कोपऱ्यापर्यंत झाला आहे. या नवीन भागाच्या समावेशामुळे वॉर्डातील समस्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहाबाजार भागातील चाऊस कॉलनी, भाईवडा, औरंगाबाद टाइम्सच्या पहिल्या दोन लाइनमधील घरांना दूषित पाणीपुरवठा होतो. याबाबत वारंवार औरंगाबाद सिटी युटिलिटी कंपनीला सांगण्यात आले. मात्र, या भागात दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. वॉर्डात पूर्वी कचऱ्या उचलण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून या भागात कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने, ऐन सणासुदीच्या काळात परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. चंपाचौक ते पीरगैबसहाब रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शिवाय शहाबाजार भागातील अंतर्गत रस्त्यांवरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. चंपाचौक ते शहाबाजार रस्त्याच्या कामासाठी एका भागातील रस्ता उखडून टाकण्यात आला आहे. पाच ते सहा महिन्यापूर्वी सुरू झालेले काम अदयापही पूर्ण झालेले नाही. रस्त्याचा एका भागावरून वाहनधारकांना वाहतूक करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. याच रस्त्यावर पीरगैब सहाब दर्गाहच्या बाजुने जुना पूल आहे. या पुलाच्या कामाचे सात वर्षापूर्वी उदघाटन करण्यात आले. मात्र, हे काम अजूनही संपलेले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वॉर्डात विकास योजना अंमलात आणण्याचे नियोजन सुरू आहे. अशोकनगर भागासह चाऊस कॉलनीत दूषित पाण्याचा पुरवठा होतो. याबाबत समांतरच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ही कामे केली जात नाहीत. सर्वसामान्यांना छळण्याचा प्रकार कंपनीने सुरू केला आहे. - नगरसेवक सरवत बेगम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरुळमध्ये मिडीबस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगभरातील पर्यटकांना खुणावणाऱ्या वेरूळ लेणी परिसरात आता खासगी वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सहा मिडीबस आगामी काळात सुरू करणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वेरूळ लेणी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी लेणी परिसरात पर्यटकांसाठी बससेवा सुरू केली जाणार आहे. वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक वेरूळ लेणी व्हिजिटिंग सेंटरवर येतील. या सेंटरवरून विशेष मिडी बसमधून लेणीपर्यंत पर्यटक प्रवाशांना नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अजिंठा लेणी परिसरातही मोठया प्रमाणात खासगी वाहनांची ये-जा होती. त्यामुळे लेणी परिसरात प्रदूषण वाढले. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाने अंजिठा लेणी ते फर्दापूर चौकापर्यंतचा मार्ग सार्वजनिक वाहतुकीला बंद केला. लेणी परिसरात जाण्यासाठी महामंडळाच्या बसचा वापर केला जात आहे. यामुळे येथील प्रदूषण कमी झाले आहे. त्याच धर्तीवर आता वेरूळ लेणी संवर्धानाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीवर सामूहिक बलात्कार

$
0
0


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्याच्या घरातून पळून आलेल्या अठरा वर्षांच्या युवतीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.‌ पिडित युवती बेपत्ता झाली असून तिच्या मैत्रिणीने पोलिसांना ही माहिती दिली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

दिशा (वय १७, नाव बदलले आहे) ही युवती सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घरातून पळून आली आहे. मंगळवारी दिशा झोपण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या वेटिंगरूम मध्ये गेली होती. या ठिकाणी तिची ओळख अर्चना (वय १८, नाव बदलले आहे) या पुण्याच्या युवतीशी झाली. अर्चनाने आईवडिलांच्या जाचाला कंटाळून पलायन केल्याचे सांगितले. मध्यरात्री दीड वाजेनंतर अर्चना स्वच्छतागृहाकडे गेली होती. बराच वेळ झाला ती परतली नसल्याने दिशाने तिचा शोध घेणे सुरू केले. सकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्चना रेल्वे स्टेशन परिसरातील एका गोडावूनमध्ये अर्धनग्न अवस्थेत सापडली. दिशाने चौकशी केली असता आपल्यावर तिघांनी बलात्कार केला असल्याची माहिती अर्चनाने तिला दिली. या प्रकारानंतर काही वेळातच अर्चना पुन्हा बेपत्ता झाली. या प्रकारामुळे घाबरलेल्या दिशाने तेथील काहीजणांना ही माहिती दिली. नागरिकांनी तीला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. बुधवारी सायंकाळी दिशाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत माहिती दिली. याप्रकरणी आयुक्तांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहमार्ग पोलिस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला लावली शिस्त

$
0
0


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या पोलिस आयुक्त पदाचा कारभार हाती घेऊन अमितेशकुमार यांना केवळ दोन महिने झाले आहेत. मात्र, या दोन महिन्यात त्यांनी शहराला शिस्त लावली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सुविधेसाठी त्यांनी महत्वाचे पंधरा निर्णय घेतले आहेत. आपल्या कार्यक्षमतेमुळे पोलिस कर्मचाऱ्यात देखील ते आवडते अधिकारी ठरत आहेत.

१९९१ साली पोलिस आयुक्तालयाची शहरात निर्मिती करण्यात आली. आतापर्यंत बारा पोलिस आयुक्त शहराला मिळाले. तेरावे पोलिस आयुक्त म्हणून अमितेशकुमार यांनी २७ एप्रिल रोजी सूत्रे स्विकारली. सुरुवातीलपासूनच त्यांनी धडाकेबाज कामगिरी सुरू केली. त्यामध्ये वर्षानुवर्षे चालणारी अवैध वाहतूक असेल, किंवा भाऊ दादांची गुंडगिरी असेल. या सर्वांचा त्यांनी दोन महिन्यातच बिमोड केला. कोणताही राजकीय दबाव न जुमानणारे एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून अल्पावधीतच त्यांची ओळख निर्माण झाली. नागरिकांच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास देखील सबंधित यंत्रणांना भाग पाडले. दररोज त्यांना भेटण्यासाठी सामान्यांची गर्दी वाढत आहे. विशेष बाब म्हणजे दिवसभर ते नागरिकांसाठी उपलब्ध असून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देताना दिसून येतात.

अमितेशकुमारांची उल्लेखनीय कामगिरी

पोलिस कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार बदल्या

चार्ली प‌थकाची निर्मिती

मोठ्या अवैध बारवर कारवाई

काळीपिवळी शहराबाहेर हद्दपार

ट्रॅव्हल्सला शहरात दिवसा बंदी

बेशिस्त अॅपेरिक्षाच्या वाहतुकीला लगाम

स्कूलरिक्षा मध्ये फक्त पाच विद्यार्थी

शहागंज, गजानन महाराज मंदिर चौक अतिक्रमण मुक्त

घाटी हॉस्पिटलच्या समस्यांवर उपाययोजना

समांतर पाणी प्रश्नाच्या समस्यांवर बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना

भाऊ दादांना बोलावून कडक समज

सेफ सिटी प्रोजेक्ट

दुकानाबाहेरच्या अतिक्रमणावर कारवाई

युवकांना विविध उपक्रमाद्वारे पोलिसांसोबत सामावून घेण्याचा प्रयत्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांना १५ जुलैची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या डिझेल अॅपे रिक्षांना एलपीजी गॅस किंवा पेट्रोल रिक्षांमध्ये बदलून घेण्यासाठी १५ जुलैची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही रस्त्यावर धावणाऱ्या डिझेल अॅपे रिक्षांचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रादेशिक प्राधिकरणाने घेतला आहे.

डिजेल अॅपे रिक्षांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या रिक्षांना २००९ मध्ये हद्दपार करावे असा निर्णय प्रादेशिक प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र झालेली नव्हती. डिजेल अॅपे रिक्षा हद्दपार करण्याचा प्रस्ताव २३ जून रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यावर लगेचच चर्चा करून डिजेल अॅपे रिक्षा हद्दपार करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राधिकरणाने डिजेल रिक्षा हद्दपार करण्यासाठी १५ जुलैची शेवटची मुदत दिली आहे. यापूर्वी शहरातील तसेच ग्रामीण भागातील डिजेल रिक्षा चालकांना आपल्या परवाने सादर करावे लागतील. त्यानंतर मात्र अशा रिक्षा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

मोर्चा

डिजेल अॅपे रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय झाल्यानंतर रिक्षा चालक संघर्ष कृती समितीने धूत हॉस्पिटल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डिझेल अॅपे रिक्षांचा मोर्चा काढून या निर्णयाचा विरोध केला. डिझेल अॅपे रिक्षा हद्दपार करण्यापूर्वी शहरात सीएनजी इंधन देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात ७० अॅपे रिक्षांचा धूत हॉस्पिटलहून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन डिजेल अॅपे रिक्षांना हद्दपार करण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, असा प्रश्न केला. डिझेल रिक्षा बंद करण्यापूर्वी सीएनजी इंधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निसार अहेमद यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळांचे एकत्रीकरण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही शाळांचे एकत्रीकरण करावे लागणार असल्याची माहिती महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुरुवारी (२५ जून) पत्रकारांना दिली. काही शाळांना भेटी दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

तुपे यांनी पहिली ते चौथीचे वर्ग भरणाऱ्या हनुमाननगरच्या शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत तिसरीच्या वर्गात एक आणि चौथीच्या वर्गात एकच विद्यार्थी आढळला. या शाळेत एक मुख्याध्यापक, एक शिक्षक व एका बालवाडी शिक्षिकेची नियुक्ती आहे. शाळेची पटसंख्या ४५ असून दररोजची उपस्थिती वीस ते पंचेवीस असते.

जयभवानीनगरातील शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. या चार वर्गात मिळून आज तीन विद्यार्थी उपस्थित होते. रोज सात ते आठ विद्यार्थी उपस्थित असतात. सध्या शाळेत एक मुख्याध्यापक, एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडको एन ६ येथील शाळा सातवीपर्यंत आहे. या शाळेच्या पटावर ३१ वि्दयार्थी आहेत, पण आज फक्त आठच विद्यार्थी हजर होते. कैसर कॉलनीच्या शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. पटावरची संख्या ३७ आहे. प्रत्यक्षात सहा ते सातच विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेत दोन शिक्षिका कार्यरत आहेत.

जवाहरकॉलनी, उस्मानपुरा, किराडपुरा, जिन्सी या शाळांची पाहणीही महापौरांनी केली. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आढळली. मात्र, दहा ते पंधरा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आढळली. त्यामुळे काही शाळांचे एकत्रीकरण करावे, असा विचार तुपे यांनी मांडला. 'या संदर्भात पदाधिकारी आणि त्या त्या वॉर्डाचे नगरसेवक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा धुडगूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा पुरवा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी प्रकल्प विभागात धुडगूस घालत तोडफोड केली. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी ९० विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चाल‌विले जातात. शहरातील ‌जुबलीपार्क परिसरात मुलींसाठीचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सुविधा पुरविण्यात याव्यात, तेथील गृहपाल मानसिक छळ करतात, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करत विद्यार्थिनींनी विभागाकडे निवेदन सादर केले होते. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. गुरुवारी या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली, यानंतर सिडकोतील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. येथे चर्चेनंतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यात वाद झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमकता दाखवित कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत गाडीच्या काचा फोडल्या. कार्यालयातील फलकाची तोडफोड केली.

यामुळे साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांचा हा गोंधळ सुरू असल्याने काही कर्मचारी, अधिकारी यांनी काढता पाय घेतला. विभागीय प्रकल्प ‌अधिकारी जी. एस. साने यांना धक्काबुक्की झाल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांशी अरेरावी केल्याचे विद्यार्थ्यांनी आरोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४० हजार शेतक-यांचा विमा

$
0
0


म.अ टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जिल्ह्यातील चाळीस हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे,' अशी माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (२५ जून) दिली.

देवगिरी महानंद या ब्रॅंडने आपली उत्पादने बाजारात आणणाऱ्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला राज्य शासनाने नुकतेच सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यानिमित्त बागडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील उपस्थित होते.

बागडे म्हणाले, 'दूध संघाला नियमित दूध पुरवठा करणाऱ्या ५५० दूध उत्पादक संस्था आहेत. या संस्थांचे सुमारे ४० हजार दूध उत्पादक शेतकरी सभासद असून त्यांचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजनाअंतर्गत विमा काढण्यात येईल. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. त्याचा सर्व खर्च आणि पुढील हप्ते संघ भरणार आहे. त्यासाठी वार्षिक सुमारे सहा लाख रुपये खर्च येईल. दूध संघ दररोज सरासरी ७५ ते ८० हजार लिटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी ६० ते ७० हजार लिटरची विक्री केली जाते. तूप, श्रीखंड, लस्सी, ताक आदी पदार्थांची निर्मितीही संघ करत असून मराठवाड्यात हक्काचे मार्केट तयार केले आहे. ज्या गावात दूध उत्पादक सहकारी संस्था नाहीत, अशा ठिकाणी नवीन संस्था स्थापन करत त्यांना बळकटी देण्यासाठ नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या मदतीने यशस्वी प्रयत्नही सुरू आहेत,' असे बागडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यापासून खत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडकोने वाळूज महानगरात 'डोअर टू डोअर' संकलित केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दरमहा पंधरा टन सेंद्रीय खत तयार होणार आहे.

वाळूज महानगरामधील घनकचऱ्याचा प्रश्न तीव्र झाला होता. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांची नाराजी होती. मुख्य प्रशासकपदाची सूत्रे घेतल्यापासून सुनील केंद्रेकर यांनी वाळूज महानगरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी घनकचरा टाकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिसगाव येथील जागेची मागणी केली होती. परंतु, तिसगावच्या गावकऱ्यांनी कचरा डेपोला विरोध केला. त्यामुळे दररोज साचणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता.

यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करून खत प्रकल्प सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. सिडकोने घनकचरा निर्मुलनात काम करणाऱ्या सीआरटी संस्थेच्या संचालिका नताशा जरीन यांच्याकडून ओल्या कचर्यापासून खत निर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. हा प्रकल्प साकरणे शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळूज कार्यालय व परिसरात वेगवेळ्या ठिकाणी नागरिकांची मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. त्यातून नागरिकांना जाणीव करून देऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवण्याचे आवाहन करण्यात आले.

कचरा उचलण्यासाठी सिडकोने पंधरा दिवसांपासून आठ लोडिंग रिक्षा व एक ट्रॅक्टरची सोय केली आहे. या यंत्रणेव्दारे 'डोअर टू डोअर' कचरा संकलन केले जात आहे. घंटागाड्यांना वेळापत्रक ठरवून दिले असून त्यानुसार कचरा संकलन केले जाते. यापूर्वी कचरा कुंड्यात टाकण्यात येणारा कचरा आता थेट घंटागाडीतून जात असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठण्याची समस्या निकाली निघाली आहे. घंटागाडीतून संकलन केलेला कचरा सिडकोच्या सध्या ग्रीनबेल्टच्या जागेवर साठवून औषधी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे दुर्गंधी कमी होते. त्यातील ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून त्यातून खत निर्मिती करण्यात येते. सुका कचरा पुनर्वापरासाठी भंगार व्यावसायिकांना दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कंपनीची स्थापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीच्या माध्यमातून उद्योजकतेचा मार्ग सापडला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात १४ कंपन्या स्थापन झाल्या असून चार कंपन्या कार्यरत आहेत. बिजोत्पादन व शेतीमालाच्या ग्रेडींग व पॅकिंगचे काम कंपन्या करणार आहेत. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळाल्यानंतर भिवधानोरा येथील शेतकरी कंपनी यशस्वी वाटचाल करीत आहे.

हवामान बदल आणि बाजारपेठेची अनिश्चितता या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकरी कंपनी स्थापन करण्याची व्यापक योजना हाती घेतली आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत 'आत्मा' ही योजना राबवित आहे. कृषीपूरक उद्योगातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. जागतिक बँक या योजनेला अर्थसहाय्य करीत असून औरंगाबाद जिल्ह्यात १४ कंपन्यांची नोंदणी झाली आहे. दोन ते तीन गावांची सामूहिक कंपनी स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. किमान १५ ते २० गटाची ही कंपनी असावी असा नियम आहे. त्यामुळे तब्बल २५० ते ३०० शेतकरी एकत्र येऊन नवा प्रयोग राबवत आहेत. शेतकरी भागधारक असल्यामुळे प्रत्येक नफ्यात हिस्सा निश्चित असतो. सध्या भिवधानोरा (ता. गंगापूर) येथील शेतकरी कंपनी यशस्वी ठरली आहे. या गावात धान्य ग्रेडिंग व पॅकिंगचे काम सुरू आहे. शहरातील ग्राहकांना निवडलेले स्वच्छ हवे असते. परिसरातील शेकडो क्विंटल धान्य एकत्रित करुन भिवधानोरा येथील कंपनीने शहरात स्वच्छ धान्याची विक्री केली. तसेच गावातच 'फार्मर कॉमन सर्व्हिस सेंटर' सुरू केले. कंपनीला आवश्यक सोयीसुविधांसाठी सर्व शेतकऱ्यांनी अडीच लाख रुपये उभे केले. तर साडेसात लाख रूपये जागतिक बँक देणार आहे. शेतीमालावर प्रक्रिया करुन हा माल शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्री करावा असा योजनेचा मूळ उद्देश आहे. सध्या भराडी (ता. सिल्लोड) येथील शेतकरी कंपनी कांदा बिजोत्पादन करीत आहे. काही कंपन्या हळद, मसाले व इतर उत्पादनांची निर्मिती करणार आहे. या माध्यमातून हजारो शेतकरी एकत्र आणून जिल्ह्यात नवा प्रयोग राबवला जात आहे.

..........

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी कृषीपूरक उद्योग हा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्योजक करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. कठीण परिस्थितीत फक्त शेतकरी कंपनी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्यामुळे राज्यात ४०० कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. शेतकरी एकत्र आल्यामुळे सामूहिकरित्या शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे शक्य झाले आहे. तसेच शेतीमालाच्या एकत्रित विक्रीतून नफा वाढला आहे.

शेतकरी गट शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते आणि इतर साहित्य एकत्र खरेदी करीत असल्यामुळे खर्च कमी झाला आहे. कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी कंपनीची स्थापना करून शेतीपूरक उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. - सतीश शिरडकर, उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक रॅडिको डिस्टिलरीज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतात घातक रसायन सोडल्याने परिसरातील जलस्रोत दूषित झाल्याप्रकरणी शेंद्रा एमआयडीसी परिसरातील 'रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज'ने स्वतःहून आपली कंपनी बंद करावी, असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कंपनीला दिले. कंपनी बंद न केल्यास कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे. मंडळाच्या मुख्यालयातून आदेश मिळाल्याशिवाय पुन्हा कंपनी सुरू करता येणार नसल्याचेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.

शेंद्रा परिसरातील सहा एकर शेतामध्ये 'रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनी'कडून घातक रसायन सोडल्याची तक्रार आत्मराम ठुबे यांनी ११ मे २०१५ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली. त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचा धक्कादायक प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने १७ जून रोजी सर्वप्रथम उघडकीस आणला. या घटनास्थळाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी १० जून रोजी तर, प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी स्वतः ११ जून रोजी पाहणी केली. त्याचा पंचनामा करून दोन आठवडे झाले तरीही कारवाई होत नसल्याने ७० ते ८० शेतकऱ्यांनी २४ जून रोजी मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. 'प्रदूषण होत असल्यामुळे 'रॅडिको' कंपनी बंद करावी,' अशी मागणी केली. 'मटा'ने प्रदीर्घ पाठपुरावा केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांनी मुंबईमध्ये बुधवारी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

रॅडिको कंपनीमध्ये गुरुवारपासून (२५ जून) नव्या कच्च्या मालापासून उत्पादन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. आधीच्या मालापासून उत्पादन घेण्यास कंपनीला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस उत्पादन सुरू राहील. त्यानंतर कंपनी बंद करावी लागेल. रॅडिको कंपनीने परिसरातील शेतामध्ये सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी व जलस्रोत दूषित झाले. परिसरामध्ये दूषित पाणी झिरपल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केले आहे. त्यामुळे परिसरामध्ये प्रदूषण झाल्याचे मंडळाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कंपनीवर वॉटर अॅक्ट १९७४ नुसार कारवाई करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्र मंडळाचे सचिव डॉ. पी. अनबालगान यांनी म्हटले आहे.

बेरोजगारीचे संकट

शेतात रसायन सोडल्यामुळे रॅडिको डिस्टिलरीज कंपनीला उत्पादन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश दिल्यामुळे सुमारे ५० कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपनी मोलॅसिसद्वारे मद्यनिर्मिती थांबविणार असून, धान्यापासून मद्य निर्मितीसाठी हे आदेश लागू नाहीत. त्यामुळे कंपनीत असलेला धान्यापासून मद्यनिर्मितीचा प्रकल्प बंद करण्यात येणार नाही.

मोलॅसिसपासून मद्यनिर्मिती करताना तयार होणाऱ्या रसायनांची विल्हेवाट लावाली लागते. कंपनीत मोलॅसिसवर आधारित प्रकल्पात सुमारे ५० कामगार कार्यरत आहेत. धान्यापासून (ग्रेन) मद्यनिर्मिती करताना रसायनयुक्त पाण्याची निर्मिती होत नाही, अशी माहिती कंपनीचे एचआर व अॅडमिन हेड श्रीपाद पाटील यांनी दिली.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात खाम नदीत घातक रसायने सोडण्याचे प्रकरण समोर आले होते. हे रसायन वाळूज एमआयडीसीतील स्टरलाइट कंपनीतील होते. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एका माजी नगरसेवकासह कंपनीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्टरलाइट कंपनीलाही मंडळाने नोटीस दिली होती. विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीतून टँकर नियमित जातात. त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपनीने टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे.

शेतात रसायन सोडल्याचा घटनाक्रम...

मे २०१५ ः शेंद्रा शिवारातील आपल्या शेतात रॅडिको कंपनीने रसायने सोडल्याचा आरोप शेतकरी आत्माराम ठुबे यांच्या केला. त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाला मे महिन्यात तक्रार केली. त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही.

१७ जून ः शेतात रसायन सोडण्यात आल्याचा प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघड केला.

१८ जून ः रसायन सोडलेल्या शेतात नांगर फिरवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

१९ जून ः घातक रसायनप्रकरणी कारवाईला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून टाळाटाळ

२० जून ः शेतातील रसायनांच्या रिपोर्टची प्रतीक्षा, शेतकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे धाव

२२ जून ः या प्रकरणाचा दोन दिवसांत अहवाल देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

२४ जून ः कारवाईत दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर निदर्शने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीसह अनेक गुन्हे उघड

$
0
0

जालनाः जालना पोलिसांनी जिल्ह्यात एक विशेष महातपास मोहीम राबवून घरफोडी, खून आणि लुटमारसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी आठ अट्टल आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ५० तोळे सोन्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्यासोबतच काही दिवसांपूर्वी शहरातील अमरधाम स्मशानभूमित एका महिलेच्या जळत्या चितेवर एका अनोळखी इसमाचा प्रेत आढळून आला होता. दरम्यान या महातपास मोहिमेत अटक करण्यात आलेल्या चार घरफोड्यांनीच निर्मल नावाच्या व्यक्तीचे खून करून प्रेत चितेवर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. सदर इसम हा एका खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार असल्याने त्याचा खून केल्याचे आरोपींनी कबूली जवाबात सांगितले. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर,सहायक अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक विक्रांत देशमुख,पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images