Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंचायत समिती सदस्यावर गुन्हा

$
0
0

वैजापूरः सोसायटीच्या निवडणुकीत पॅनल उभे केल्यावरून मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्य रामहरी कारभारी जाधव यांच्यासह तालुक्यातील भटाणा येथील चार जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान शेषराव घोगरे यांनी पोलिसात तक्रार दिली. रामहरी जाधव, पंजाब भीमराव जाधव, भीमराव तात्याराव जाधव व विजय भीमराव जाधव या चौघांनी २५ जून रोजी रात्री सात वाजता मारहाण केली, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वेलर्सच्या दुकानात ३.५ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पोलिसांची गस्त असताना गुरुवारी रात्री शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडून तीन लाख ३७ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. इतर तीन दुकानांचेही शटर चोरांनी वाकवले आहेत. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य रस्त्यावरील गुरुकृपा ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून तीन लाख ३७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. भारतमाता जनरल व मोबाइल गिफ्ट शॉपी या दुकनाचे शटर वाकवून मोबाइल व्हॉउचर्ससह काही रोख रक्कम चोरण्यात आली. त्याच्या शेजारच्या चंद्रभागा कृषी सेवा केंद्राचे शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर याच रस्त्यावरील जय दुर्गा प्रोव्हीजन्सचे शटर तोडले. पण दुकानात शटर शेजारीच काउंटर असल्याने त्यांना प्रवेश करता आला नाही. चोरीची झाल्याने गुरख्याच्या लक्षात आले, त्याने दुकानमालकांना खबर दिली, पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुरुकृपा ज्वेलर्सचे मालक भगवान सीताराम बावीस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. डी. भारती यांनी श्वानपथकाच्या साह्याने माग काढण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा बस स्थानकातच घुटमळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझ्याविरोधातील ठराव नियमबाह्य’

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव घेतला. हा ठराव नियमबाह्य असून अन्य अधिकारी, कर्मचारी दोषी असताना केवळ माझ्यावर कारवाईचे षडयंत्र रचले गेले. माझ्यावर कार्यवाही करून अन्याय करू नये, अशी मागणी सोनकवडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. बुधवारी झालेल्या सभेत सदस्यांनी सोनकवडे यांना रजेवर पाठविण्याचा ठराव केला आहे. सोनकवडे यांनी बुधवारीच झेडपी सीइओंना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे, की ११ मे रोजी त्या झेडपीमध्ये रुजू झाल्या. त्यावेळी समाजकल्याण अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या समाधान इंगळे यांनी अनेक कामे प्रलंबित ठेवली होती. त्यांनी प्रस्ताव नसलेले लाभार्थी व त्रुटी असलेले लाभार्थी यांना पात्र म्हणून समाजकल्याण समितीसमोर ठेवून गैरव्यवहार केला. त्याला विरोध केल्याने गैरकृत्य समोर येवू नये, म्हणून ठराव केला आहे. त्रुटीपूर्ण प्रस्ताव पाठविणारे गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी, श्रीमती शिंदीकर, समाधान इंगळे यांना वाचविण्यासाठी देण्याच्या प्रयत्नात काहीजण असल्याचे दिसते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये ब्रॉडबँड बंद; कामांचा खोळंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

एक महिन्यापासून शहरातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी ब्रॉडबँड सुविधा बंद असल्याने कामे ठप्प झाली आहेत.

सध्या शालेय विद्यार्थ्याचे प्रवेश सुरू असून प्रवेशाशी संबंधित अनेक प्रक्रिया ऑनलाइन आहेत. त्यासाठी बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेचा प्रामुख्याने वापर केला जातो. सेतू सुविधा केंद्र, महाऑनलाइन केंद्र, तालुकाभरातील विविध बँकाच्या मिनी शाखा येथे बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा आहे. ही सेवा विस्कळीत झाल्याने सेवेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश, राहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ग्रामपंचायत निवडणुकासाठी जात प्रमाणपत्र, स्पर्धा परीक्षेसंबधी माहिती, शासकीय नोकरीसाठी भरती प्रक्रिया, शासकीय कार्यालयातील ऑनलाइन कामकाजावर परिणाम झाला आहे.

काही ठिकाणी नेटसेटरच्या (डोंगल) माध्यमातून खाजगी कंपनीची सेवा घेऊन काम करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. पंरतु, त्यास अपेक्षित वेग नसल्याने कामकाज सुरळीत होत नाही. दररोज पाचशे ते सातशे प्रमाणपत्रांच्या फाइल हाताळल्या जात असल्याने सेवा पुरवठादारांना ताण सहन करावा लागत आहे, असे सेतू सुविधा केंद्राचे संचालक अविनाश टाकळकर यांनी सांगितले. पावसामुळे तालुक्यातील काही ठिकाणचे एक्सचेंज पूर्णतः बंद आहेत, अशी माहिती समजली आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिकृतपणे उत्तर देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजाऱ्यांनी केला चिमुकलीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

जुन्या भांडणातून पती पत्नीने शेजाऱ्याच्या एका सहा वर्षाच्या मुलीचा रांजणगाव शेणपुंजी येथे खून केल्याचे उघड झाले आहे. प्रणाली कैलास बगाटे, असे या मुलीचे नाव असून ती बुधवारपासून बेपत्ता होती. तिचे प्रेत गुरुवारी मध्यरात्री एका नालीत सापडले.

रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णनगर परिसरातील प्रणाली बगाटे बुधवारी सायंकाळी चार वाजता बेपत्ता झाली. शोध घेऊनही सापडली नसल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही मुलगी राहत असलेल्या भागातच एका नाल्यात गुरुवारी रात्री उशिरा तिचे प्रेत सापडले. या प्रेताची कातडी अनेक ठिकाणी सोलल्यासारखी झाली होती. घराजवळील नालीत प्रेत सापडल्याने तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैलास बगाटे यांचे शेजारी संगिता नितीन पाटील (वय २५) व नितिन रामदास पाटील (वय ३०) यांनी प्रणालीचे अपहरण करून खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी या पती-पत्नीला तत्काळ अटक केली. तणाव निर्माण झाल्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह मोठा फौजफाटा रांजणगावमध्ये दाखल झाला होता. पोलिसांनी संशयित आरोपींना गंगापूर सत्र न्यायालयात हजर केले. त्यांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डब्यात कोंबून ठेवले प्रेत

संशयित आरोपी संगिता व नितीन पाटील यांच्या घरात पोलिसांना रक्त पडलेले आढळले. शोध घेतल्यानंतर तिचे कपडेही तेथेच सापडले. या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. शिवाय तिची कातडी काही ठिकाणी सोलल्यासारखी दिसल्याचे प्रेत पाहिलेल्या नागरिकांनी सांगितले. बुधवारी खून केल्यानंतर पाटील दांम्पत्यांने तिचे प्रेत एका डब्ब्यात ठेवले होते. वास येत असल्याने गुरुवारी घराजवळील नालीत प्रेत फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ, मुंडे ओबीसी म्हणून टार्गेट नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना केवळ ओबीसी म्हणून आकसबुद्धीने टार्गेट करू नका. अन्यथा कॉँग्रेसवाल्यांचे घोटाळे बाहेर काढू,' असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिला.

कार्यकर्त्यांच्या बैठकीनिमित्त आठवले शहरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, उपाध्यक्ष दौलत खरात, मिलिंद शेळके, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, किशोर थोरात आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, 'शासनाच्या नियमानुसार रितसर पद्धतीने वस्तू खरेदीचे कंत्राट दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण हा मुद्दा उपस्थित करू नये. सरकारला काम करू दिले पाहिजे. भुजबळ प्रकरणी शरद पवार वगळता अन्य नेतेमंडळी गप्प का? राष्ट्रवादीचा भुजबळांना पाठिंबा असल्याचे दिसत नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपच्या काही नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन केले असेल तर ते उघड करावे. मालवणी हातभट्टी दारूचे प्रकरण चिंताजनक आहे. प्रयत्न करूनही ही दारू बंद करता येत नसेल तर, त्यास अधिकृत मान्यता द्यावी. रिपब्लिकन ऐक्यासाठी स्वत: लक्ष घालणार असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी विरोध बाजूला ठेवून ऐक्यबाबत आपली भूमिका जाहीर करावी.'

सत्ते पाच टक्के वाटा

करारनाम्यानुसार भाजपने सत्तेत वाटा दिला पाहिजे. किमान चार महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद द्यावे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय समता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच राज्यातही विषमता निर्मूलन परिषद, जाती तोडो संमेलन यासारख्या कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.

- रामदास आठवले; रिपाइं नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणींना नोकरीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक तरुणी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या महिन्यात नोकरी मिळावी यासाठी ७१४ जणांनी नव्याने रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केली आहे. यापैकी १८५ जण या उच्चशिक्षित आहेत.

जागतिकीकरणाचा परिणाम विशेषतः छोट्या उद्योगधंद्यावर होत आहे. त्यात कंत्राटी पद्धतीमुळे कायमस्वरुपी रोजगारांच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. परिणामी सुशिक्षित बेरोजगार आज रोजगाराच्या संधीची वाट बघत आहेत. जागा कमी आणि उमेदवार जास्त, असे चित्र अनेक नोकरी भरतीवेळी समोर येत आहे. त्यामुळे तरुणांचा चांगलाच हिरमोड होत आहे. पर्यटननगरी असलेल्या औरंगाबादमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही.

शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज आदी औद्योगिक क्षेत्र असतानाही जिल्ह्यातील बहुतांशी भूमीपुत्रांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे. नोकरीची अपेक्षा ठेवत येथील रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात तब्बल सव्वा लाख बेरोजगारांनी नोंदणी केली असून, त्यात युवतींची संख्या लक्षणीय आहे. 'जिल्ह्यातील २७ हजार १८० युवतींनी नोकरी मिळावी यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे १४ हजार विद्यार्थिंनी ह्या ग्रामीण भागातील असून बहुतांशी मुलीं ह्या उच्चशिक्षित आहेत,' अशी माहिती जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक वि. रा. रिसे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

शासनाने स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना हाती घेतली आहे. त्याव्दारे कौशल्य विकसित मनुष्यबळ तयार करून रोजगार व स्वंयरोजगार संधी वृद्धींगत करण्यात येणार आहे.

- वि. रा. रिसे, संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र.

मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्येही मुली तुलनेते पुढे असल्याचे दिसते. मात्र, त्या मानाने नोकरीच्या संधी फारशा उपलब्ध होत नाहीत.

- स्वाती शिर्के, विद्यार्थिनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनी मॅनेजरचे घर फोडून एक लाखाचा ऐवज लंपास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे येथील कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजरचे घर फोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय कुलकर्णी (रा. संत एकनाथ हौसिंग सोसायटी, आकाशवाणी) हे पुणे येथील कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी नांदेड येथे रेल्वे विभागात नोकरीला आहे. कुलकर्णी आठवड्यातून एकदा पुणे-औरंगाबाद येणेजाणे करतात. मात्र, गेल्या २७ दिवसांपासून त्यांचे औरंगाबाद येणे झाले नव्हते.

गुरूवारी सकाळी ते औरंगाबादला आले असता त्यांना घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी पाहणी केली असता घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र चैन, चांदीचे दागिने असा एक लाखांचा ऐवज चोरून नेला. जिन्सी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तसेच उपायुक्त राहुल श्रीरामे व पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्वंयापकघराचा दरवाजा टॉमीने तोडून चोरट्यांनी आ‌तमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवानांही नाही सोडले

चोरट्यांनी घरातील देवघरात असलेली गजानन महाराजांची चांदीची मूर्ती, बालाजी, घंटा, संध्यापात्र, चांदीचे तीन टाक आदी ऐवज चोरून नेला. मात्र लॅपटॉप, मोबाइल, कॅमेरा, अमेरिकन डॉलरला हातही लावला नाही.

अठरा हजारांचा ऑनलाईन गंडा

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एटीएमचे नूतनीकरण करायचे असल्याचे सांगत एटीएम कार्डधारकाला अठरा हजाराचा गंडा घालण्यात आला आहे. बुधवारी बीडबायपास भागात हा प्रकार घडला असून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हक्कानी मोहमद हुसेन (रा. बीड बायपास) यांच्याकडे एसबीएच बँकेचे अेटीएम कार्ड आहे. बुधवारी हक्कानी यांच्या मोबाइलवर ०८८७७५४६३८९ या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने एसबीएच बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमच्या एटीएमचे नूतनीकरण करायचे आहे अशी थाप मारली. तसेच त्यांच्याकडून एटीएमचा क्रमांक घेतला. यानंतर काही वेळातच हक्कानी यांच्या खात्यातून परस्पर अठरा हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. मेसेज आल्यानंतर हक्कानी यांना हा प्रकार समजला. त्यांनी याप्रकरणी सातारा पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपी विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बनावट देशी दारूचा साठा जप्त, एकास अटक

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहेगाव ता. गंगापूर येथे बनावट देशी दारूचा साठा बाळगणाऱ्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. गुरूवारी सकाळी त्याच्या घरावर छापा टाकून ८३ हजारांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे.

वाहेगाव येथील विजय भडके हा तरूण बनावट देशी दारूचा साठा बाळगून त्याची विक्री करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीवरून गुरूवारी पहाटे त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी ३८ बॉक्समध्ये एकूण १ हजार ८२४ ‌दारूच्या बाटल्या पथकाला सापडल्या. या मालाची एकूण किंमत ८३ हजार रूपये आहे. विजय भडके विरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधिक्षक सी. बी. राजपूत, निरीक्षक शिवाजी वानखेडे, सुशील चव्हाण, बी. आर. नवले, मोतीलाल बह‌ुरे, सुभाष गुंजाळ आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपोषणाकडे महापौरांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी उपोषण करणारे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन चित्ते यांच्या उपोषणाकडे महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाठ फिरवली. अखेर उपमहापौर प्रमोद राठोड यांनी चित्ते यांचे उपोषण सोडवले.
पवननगर वॉर्ड क्रमांक ३० सह संपूर्ण सिडको-हडको भागात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा केला जातो. काही घरांना पाणी मिळत नाही. शहराच्या अन्य भागात तिसऱ्या दिवशी आणि सिडको - हडकोत पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी येते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणी पाइपलाइन टाका, अशी मागणी चित्ते यांच्याकडून करण्यात आली. त्यांनी पालिका प्रशासन आणि कंपनीला पत्रही दिले. मात्र, त्यांच्या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चित्ते यांनी शुक्रवारी सकाळपासून महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर वॉर्डातील नागरिकांसह उपोषण सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी उपोषणस्थळी जाऊन चित्ते यांची भेट घेतली आणि त्यांचे म्हणने ऐकून घेतले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चित्ते यांचे उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रमोद राठोड यांच्यासह नगरसेवक गजानन बारवाल, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पनवनगर वॉर्डात आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम करून पाच - सहा दिवसात संपूर्ण वॉर्डाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने ५.५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील दोन बेरोजगारांना नोकरीला लावण्याचे अामिष दाखवून ५ लाख ३५ हजारांची फसवणूक करण्यात आली. चार वर्षांपूर्वी हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतल्यानंतर प्लॉटिंग व्यवसायिकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण कारभारी गुळवे (वय २५) व प्रविण शिवाजी गावंडे (वय २१ दोघेही रा. निमडोंगरी ता. कन्नड) यांची चार वर्षांपूर्वी महमद मोबीन सिद्दिकी कदीर सिद्दिकी (वय ३२ रा. सइदा कॉलनी, जटवाडा रोड) यांच्यासोबत ओळख झाली होती. मोबीन याने गुळवेला तीसगाव रोडवरील अपंग अस्थीव्यंग निवासी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे अामिष दाखविले. या कामासाठी त्याने ९ लाख रुपये घेतले; तसेच गावंडे याला आरोग्य खात्यात नोकरीला लावण्याचे अामिष दाखवून त्याच्याकडून ४ लाख रुपये घेतले होते. यानंतर १५ जून २०११ रोजी गुळवेला प्रियदर्शनी कॉलनी येथील ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षाच्या सहीचे नियुक्तीपत्र दिले होते. गुळवे नोकरीला रुजू होण्यासाठी गेले असता हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांनी पैशासाठी मोबीनकडे तगादा लावला. काही दिवसानंतर गुळवे यांचे ५ लाख ६५ हजार तर, गावंडे यांचे २ लाख मोबीन सिद्दिकीने परत केले. उर्वरित ५ लाख ३५ हजार रुपये देण्यासाठी तो टाळाटाळ करीत होता.

वारंवार पाठपुरावा करूनही मोबीन पैसे देत नसल्यामुळे दोघांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठून तक्रार केली. पीएसआय विश्वास पाटील यांनी चौकशी करून बेगमपुरा पोलिसांना याप्रकरणी मोबीन सिद्दिकी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मोबीन सिद्दिकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने दिल्या धमक्या

नोकरीसाठी दिलेले पैसे परत मिळावेत म्हणून गुळवे आणि गावंडे यांनी मोबीनकडे तगादा लावला होता. काही पैसे मोबीनने परत दिले. उर्वरित पैसे मागितल्यावर मोबीनने धमक्या दिल्या, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेताचा दीड महिन्याने पंचनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा ‌शिवारात शेतात रसायने सोडून दीड महिना उलटल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रसायन सोडणारी रॅडिको कंपनी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी तक्रारदार आत्माराम ठुबे यांच्या शेताचा पंचनामा केला. पोलिसांनी शेतात जाऊन रसायन व मातीचे नमुने घेतले आहेत.

आत्माराम ठुबे यांच्या शेंद्रा शिवारातील (गट क्रमांक १२५) सहा एकर शेतीमध्ये ७ मे ते १० मेदरम्यान रसायने सोडण्यात आली आहेत. हा प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघड केला. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही कारवाई झाली नसल्याने ठुबे यांनी १२ जून रोजी चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे १५ जून रोजी त्यांनी पुन्हा तक्रार दिली. त्याचीही पोलिसांनी दखल घेतली नसल्याने २० जून रोजी पोलिस अधीक्षक नविनचंद्र रेड्डीकडे दाद मागितली. पालकमंत्री रामदास कदम यांनीही याप्रकरणी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

रॅडिको कंपनी बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिले. यानंतर चिकलठाणा पोलिसांना जाग आली. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता दोन कर्मचाऱ्यांनी ठुबे यांचे शेंद्रा येथील शेत गाठून पंचनामा केला. त्यांनी रसायन आणि मातीचे नमुने घेतले, अशी माहिती ठुबे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस नसल्याने मुलींची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात विविध ठिकाणी हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींना सिटीबस उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रिक्षाचालकांचे गैरवर्तन, जास्तीचा भाडे आणि संध्याकाळी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावहून शहरात येणाऱ्या मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण व इंटर्नशीप करण्याकडे या मुलींचा कल असतो. त्यामुळे हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींनाही बाहेर पडावे लागते. मात्र, सिटी बसची संख्या कमी असल्याने मुलींची डोकेदुखी वाढली आहे. सीटर रिक्षाचालकांची मनमानी व बेशिस्त वर्तनामुळे रिक्षाप्रवास असुरक्षित बनला आहे. अनेक खासगी कंपन्या महिला कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था करतात. अगदी एक महिला कर्मचारी असली तरी, बसचे रूट अॅडजेस्ट होतात. मात्र, सिटीबसचे असे नियोजन पाहायला मिळत नाही. नुकत्याच काही मार्गांवर सिटीबस सुरू झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून बरेच भाग सिटीबसला जोडले गेले नाहीत. बेगमपुरा, विद्यापीठ परिसर, घाटी, मिलिंद कॉलेज अशा ठिकाणी ‌सिटी बस अपुऱ्या पडतात. या भागातली रिक्षाचालक दारू पिऊन असतात व भाषाही अश्लिल असते, अशा प्रतिक्रिया काही मुलींनी 'मटा'कडे दिल्या. गावाहून उशिरा परतताना आठ वाजले की, रिक्षाचालक दुप्पट भाडे मागतात. कधी कधी अर्ध्या मार्गातच उतरवून देतात. रविवारी सायंकाळी मेस बंद असल्याने जेवणासाठी मुलींना शहरात जावे लागते. जाताना रिक्षा मिळतो. मात्र, येताना पायपीट करावी लागते.किमान विद्यापीठ परिसराकरता रात्री नऊपर्यंत सिटीबस असावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

मेडिकलच्या मुलींना त्रास

मेडिकलच्या विद्यार्थिनींना बऱ्याचदा जवळच्या खेड्यांमध्ये कँपकरता जावे लागते. लवकर पोहचायचे असल्याने त्यांना काळी-पिवळीतून प्रवास करावा लागतो. काळी-पिवळीतली गर्दी, अल्पवयीन ड्रायव्हर व संपूर्ण प्रवासात होणारी अडचण यामुळे या विद्यार्थिनींची फरभट होते. या विद्यार्थिनींकरता मिनीबस चालू शकते. मात्र, यासाठी पालिका आणि एसटी महामंडळाने एकत्र निर्णय घेण्याची गरज आहे.

दोन वर्षांपासून मी खासगी हॉस्टेलवर राहते. सुरुवातीला नागसेनवर परिसरात राहायची. रोज रिक्षाने जाणे म्हणजे टेन्शन होते. त्यामुळे शहरातला खासगी हॉस्टेलचा खर्च परवडत नसला तरी इथे किमान बस मिळतात.

- दीपश्री देवडे

माझ्या सर्व मैत्रिणी विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहतात. एकदा रात्रीच्या वेळी मी एका मैत्रिणीला ज्युबली पार्कपर्यत सोडले. एका तासाने तिचा फोन आला, तेव्हा ती फार घाबरली होती. एक रिक्षावाला तिच्या मागे लागला होता. ती विद्यापीठाच्या हॉस्टेलपर्यंत धावतच गेली.

- अनामिका त्रिपाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच महिलेचे २ ब्लड ग्रुप !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच महिलेचे दोन वेगवेगळे रक्तगट असल्याचा रिपोर्ट दिला आहे घाटीच्या पॅथॉलॉजी विभागाने. या महिलेच्या पहिल्या गर्भारपण-बाळंतपणामध्ये 'ए' पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला, तर दुसऱ्या गर्भारपणामध्ये 'ए' निगेटिव्हचा रिपोर्ट देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला ही घाटीच्याच कर्मचाऱ्याची पत्नी आहे.

पूजा वैजनाथ जाधव यांनी आपल्या पहिल्या प्रेगन्सीमध्ये रक्तगट तपासला असता, त्यांचा रक्तगट 'ए' पॉझिटिव्ह असल्याचा प्रिंटेड रिपोर्ट १४ ऑक्टोबर २०१० रोजी देण्यात आला. मात्र, दुसऱ्या प्रेगन्सीवेळी काही कारणास्तव रक्तगट तपासण्यात आला असता त्यांचा रक्तगट हा 'ए' निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. चक्क दोन वेगवेगळ्या रिपोर्टविषयी अधिक चौकशी केल्यानंतर पूजा जाधव यांचा रक्तगट पुन्हा तपासून 'ए' निगेटिव्ह असल्याचा लेखी रिपोर्ट घाटीच्या पॅथॉलॉजी विभागाकडून १८ मे २०१५ रोजी देण्यात आला. या धक्कादायक प्रकाराविषयी पूजा जाधव यांनी अधिष्ठातांकडे ७ एप्रिल २०१५ रोजी लेखी तक्रार दिली असली तरी या प्रकाराबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा त्याविषयी संबंधित तक्रारकर्त्यांनाही कळविण्यात आलेले नाही.

चूक ठरू शकते जीवघेणी

गर्भारपण-बाळंतपणामध्ये महिलांना रक्त किंवा रक्त घटक देण्याची वेळ येऊ शकते आणि अशावेळी चुकीच्या रक्तगटाचे रक्त किंवा रक्तघटक देण्यात आले तर तीव्र रिअॅक्शन येऊ शकते, गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा जिवालाही धोका होऊ शकतो, अशी माहिती शहरातील पॅथॉलॉजिस्टनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे 'मेडिकल नेग्लिजन्स'खाली न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे पती वैजनाथ जाधव यांनी 'मटा'ला सांगितले.

अशा प्रकारची चूक ही 'सँपल एरर' या प्रकारामुळे होऊ शकते आणि ९० टक्के हेच कारण असते. एखाद्या पेशंटच्या रक्त नमुन्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदविले जाते आणि त्यामुळे रक्तगट चुकीचा ठरू शकतो. मात्र, २०१० चे सँपल आता उपलब्ध होणे शक्य नसल्याने नेमकी कोणाची चूक होती हे कळणे शक्य नाही आणि त्यामुळे कुणावर कारवाई करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.

- डॉ. राजन बिंदू, पॅथॉलॉजी विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रोड मोकळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी महानुभाव चौक ते वाळूज लिंक रोड हा दोन किलोमीटरचा टप्पा मोकळा झाला. दिवसभर ट्रॅफिक जॅमने त्रस्त असलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. पाच मीटरने रुंद केल्याने आता रस्ता तीन लेनचा झाला आहे. औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक कायम त्रस्त होते. गेल्या काही वर्षांत दक्षिणेकडील भागात शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. रेल्वेस्टेशन उड्डाणपूल उतरल्यानंतर बीड बाह्यवळण रस्ता, महानुभाव चौकपासून पुढे अरूंद रस्ता झाल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत असे. या भागात नागरी वसाहतीही मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या.

पैठणकडून येणाऱ्या वाळूच्या ट्रक, वाळूजमार्गे येणारी जडवाहतूक तसेच काळी पिवळी जीप, खासगी वाहने यांच्या गर्दीतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची दमछाक होत होती. औरंगाबाद - पैठण रस्त्यात महानुभाव चौकातून ८०० मीटरचा रस्ता महापालिकेच्या अखत्यारित तर उर्वरित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. त्यामुळे दुरुस्ती, देखभाल नेमकी करायची कुणी ? असा प्रश्न कायम येत असते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ए. एस. क्लब ते पैठण रोड असा लिंक रोड गेल्या वर्षी वाहतुकीला खुला करून दिला. त्यानंतर या रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. कायमच्या ट्रॅफिक जॅमला मार्ग मिळत नव्हता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पुढाकार घेऊन दहा दिवसांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कामासाठी प्रथमच शहरात मेगा ब्लॉक करण्यात आला.

दोन कोटी ३६ लाख रुपये खर्चून हे रूंदीकरण पूर्ण केल्याची माहिती किडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. मूळ रस्ता ७ मीटरचा होता. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी अडीच मीटर म्हणजे पाच मीटरचे रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे आता हा रस्ता १५ मीटरचा झाल्याचे किडे यांनी सांगितले. पुढचे दोन वर्षे रस्त्याची दुरुस्ती करावयाची असेल तर, संबंधित कंत्राटदारावर जबाबदारी असणार आहे. दोन किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणानंतर ट्रॅफिक जॅमची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

सिग्नल आवश्यक

शुक्रवारी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित संख्या असल्याने महानुभाव चौकात ट्रॅफिक जॅम झाले होते. हा चौक आणि वाळूज लिंक रोड जवळ सिग्नलची आवश्यकता असून ते लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास पुढचा त्रास कमी होणार आहे.

पंचवटी चौक ते बाबा आजपासून मेगाब्लॉक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाबा पेट्रोलपंप चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामानिमीत्त शनिवारी व रविवारी या पंचवटी चौक ते बाबा पेट्रोलपंप चौक या रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही दिवस सकाळी सात ते दुपारी दोन या काळात ही वाहतूक बंद राहणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग

रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्टेशन, पंचवटी चौक, लोखंडी पूल व महावीर चौकामार्गे वाहने येतील.

मध्यवर्ती बसस्थानकाकडून नगरकडेकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी महावीर चौक, लोखंडी पूल व पुढे नगरनाका हा मार्ग चालू राहील.

मध्यवर्ती बसस्थानकाकडून पैठणकडे जाणारी वाहने महावीर चौक, क्रांतिचौक, कोकणवाडी ते रेल्वे स्टेशनमार्गे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैमनस्यातून दुकानदाराचा खून

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक व्यव्हारातून तसेच राजकीय वैमनस्यातून किराणा दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गारखेड्यातील भारतनगरात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आठ जणांविरूद्ध मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकम उर्फ भालचंद्र काशीनाथ मुळे (वय ४५) यांचे भारतनगरात किराणा दुकान आहे. मुळे यांच्या घरासमोर आबासाहेब तांबे हा ट्रॅव्हल्स व्यवसायिक राहतो. मुळे यांनी त्याला ३५ हजार रूपये उधार दिलेले आहेत. बुधवारी मुळे तांबे यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले होते. आबासाहेब यावेळी पुण्याला होता. त्याला मुळे घरी पैसे मागण्यासाठी गेल्याचे समजल्यामुळे राग आला. त्याने त्याच भागात राहणारे त्याचे मित्र विठ्ठल पारटकर व विशाल गायकवाडला ही माहिती देत मुळेचा बंदोबस्त करण्यास सांगितले. सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मुळे यांना विठ्ठल, विशाल व इतर काही जणांनी घराबाहेर बोलावले. भारतनगर चौकात नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत मुळे घरी परतले. त्यांना घेऊन संतप्त नातेवाईकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी त्यांना मुळे यांच्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. एमजीएम हॉस्पिटलमध्ये मुळे यांच्यावर उपचार करण्यात आले. मध्यरात्री मुळे डिस्चार्ज घेऊन घरी परतले. पहाटे त्यांना पुन्हा त्रास सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा सात वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबियाच्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल पारटकर, विशाल गायकवाड व इतर सहाजणांविरुद्ध मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी विठ्ठलला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, पोलिस निरीक्षक ना‌थ जाधव यांनी भेट दिली.

संशयित आरोपी विठ्ठल पारटकरचा भाऊ एप्रिल महिन्यात झालेल्या मनपा निवडणुकीत उभा होता. मृत निकम मुळे यांनी त्यांच्याविरुद्ध उमेदवाराचा प्रचार केला होता. या गोष्टीचा विठ्ठलला राग होता. त्याचा सूड देखील त्याने या भांडणातून काढला असल्याचे दिसून आले.

या आरोपींमध्ये विशाल गायकवाडवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांनी मुळे याला बेदम मारहाण केली. मारहाण करण्यापूर्वी त्याला दारू पाजण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठुबे जिंकले, कंपनी हरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतात रसायने सोडल्यानंतर इतर शेतकरी गप्प असताना आत्माराम ठुबे या एकट्या शेतकऱ्याने रॅडिको डिस्टिलरीज विरोधात लढा उभारला. प्रलोभने, दबाव आदी प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागले. 'महाराष्ट्र टाइम्स' त्यांच्या मदतीला धावल्यानंतर या लढ्याला यश मिळाले.

ठुबे यांच्या गट क्रमांक १२५ मधील सहा ऐकर शेतीमध्ये ७ मे ते १० मे या कालावधीत रसायन सोडले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी तक्रारी केल्या. त्याकडे सबंधित विभागांनी दुर्लक्ष केले. एक महिना वाट पाहून त्यांनी पुन्हा या विभागाकडे स्मरणपत्र दिले. अखेर त्यांनी 'मटा'कडे धाव घेतली. १७ जून रोजी 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर संबंधित यंत्रणा जाग्या झाल्या.

दरम्यान, १२ जून रोजी ठुबे यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यातही तक्रार दिली. मात्र, त्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे २० जून रोजी त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी मातीचे नमुने घेतले नसल्याने ठुबे यांनी स्वतः नमुने राहुरी येथील प्रयोगशाळेत पाठविले. कृषी विभागाकडेही तक्रार केली. यादरम्यान त्यांना कंपनी आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या समर्थकांनी प्रलोभने दाखविली. धमक्या दिल्या. ठुबे मात्र ठाम राहिले. त्यांचा हा लढा पाहून इतर शेतकरी पुढे आले. त्यामुळे त्याला व्यापक स्वरुप प्राप्त झाले. पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन दाद मागितली. शेतकऱ्यांनी निदर्शने केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी कंपनी बंद करण्याचे आदेश दिले.

एवढ्यावरच हा लढा थांबणार नाही. कंपनी संचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच नुकसानभरपाई मिळण्यासाठी लढा सुरू ठेवेन.

- आत्माराम ठुबे, पीडित शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर-रिक्षाच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील तुरोरीनजीक टँकर व अॅपेरिक्षाची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आठ जण जखमी झाले. ही घटना शनिवार दुपारी चारच्या सुमारास घडली. अपघातातील मयत हे तुरोरी येथील रहिवासी आहेत. मयतामध्ये तीन महिला व एक बालकाचा समावेश आहे.

प्रकाश पाडूरंग मंडवे (वय २३, रा. तुरोरी), विष्‍णु नंदकुमार भोसले (वय २०, रा. तुरोरी), खाजाबाई र‌हेमान (वय ५२, रा. तरमोड),रामाबाई ‌‌हाक्के (वय ४५, रा. बंडगरवाडी), सुकुमारबाई बंडगर (वय २३, रा. बंडगरवाडी), सोनाबाई नरसप्पा सास्तुरे (वय ४५, रा. बंडगरवाडी), नंदिनी निवृत्ती बोधे (वय ४ महिने, रा. बंडगरवाडी) असे मरण पावलेल्यांची नावे आहेत.

उमरगा तालुक्यातील तुरोरीजवळ प्र्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षाला समोरुन येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. यामध्ये अॅपेरिक्षातील सात जण जागीच मरण पावले. यामध्ये आठ जण गंभिररित्या जखमी झाले. त्यांना तुरोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात अॅपेरिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मरण पावलेले सर्वजण अॅपेरिक्षातून प्रवास करीत होते. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ‌काही काळ विस्कळीत झाली होती.

सुरेखा निवृत्ती बोधे (वय ११), जयश्री व्यंकट निगवणे (वय २१), मारूती अरूण बब्रुवान (वय ३१), संगीता सरचिटले (वय ३०), प्रकाश सरचिटले ( वय ५१) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यामधील तीन जखमींची ओळख पटलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकीचोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

दोन दुचाकी चोरास अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक केली . त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. एक जण चोरी करत तर दुसरा संशयित आरोपी त्यांची विक्री करत असल्याचे तपास समोर आले आहे.

२४ जून रोजी सिद्धार्थ गार्डनसमोरुन वाहनचोरीच्या संशयावरुन अकील पापाभाई शेख (वय ३२, रा. मनीषानगर, वाळूज) यास पोलिसांनी पकडले होते. त्याच्या राहत्या घराची झडतीत विविध कंपन्याचे पाच दुचाकी लपवून ठेवल्याचे आढळून आले. या पाच दुचाकीसह तसेच त्याने विक्री केलेल्या अन्य दोन अशा एकूण सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. चौकशीत त्याने चोरी केलेल्या वाहने विक्रीसाठी बीड जिल्ह्यातील पाटेवाडी येथील दादाराव भास्कर शेंबडे (वय २४) याकडे देतो, अशी माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत शेंबडे यास पकडले. त्याने शेतातील घरामागे विविध कंपन्याच्या आठ दुचाकी दडवून ठेवल्या होत्या. अशा एकूण १५ दुचाकी जप्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखान्यावर धाड; दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठणरोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या एक कुंटणखाना उघडकीस आणण्यात शहर पोलिसांच्या विशेष पथकाला यश मिळाले. शुक्रवारी (२६ जून) रात्री उशीरा पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली तर दोन मुलींची सुटका केली. परंतु, सुगावा लागल्याने कुंटणखाना चालक पसार झाला आहे. घटनास्थळावरुन ५२ हजार रुपये, सहा मोबाइल, एक दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पैठणरोडवरील सुशांत रो हाऊस परिसरात कुंटणखाना सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मिळाली. त्यांनी विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक बी.डी. काकडे यांच्याकडे कारवाईची जबाबदारी सोपवली होती. काकडे यांच्यासह पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास सुरू असलेल्या कुंटणखाना परिसरात सापळा रचला. एकाला पाठवून अड्डा सुरु असल्याची खात्री पटताच पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

परंतु, सुगाव लागल्याने कुंटणखाना चालक तुषार राजन राजपूत (वय ३४, रा. गवळीपुरा, छावणी) याने तेथून पळ काढला. तर पराग नावंदर ( वय ३२ रा. औरंगपुरा) आणि आशिष बियाणी (वय ३४ रा.छावणी) या दोघांना पकडण्यात आले. त्यासोबतच २० ते २२ वर्षीय दोन मुलींची (रा. मुंबई) सुटका करण्यात आली. त्यांची रवानगी शासनाच्या महिला आधार संस्थेत करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक काकडे यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, राजेंद्र क्षीरसागर, वंदना रहाणे आदींनी ही कारवाई केली असून याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, भाजपमध्ये चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड येथील सिद्धेश्वर वस्त्रोउद्योग सहकारी संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक रविवारी (२८ जून) रोजी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते प्रभाकर पालोदकर व आमदार अब्दुल सत्तार यांची कित्येक वर्षांपासून असलेली सत्ता ताब्यात ठेवणार की विरोधकांचे भाजपचे पॅनल सत्तेला सुरूंग लावणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून वस्त्रोउद्योग संस्थेवर प्रभाकर पालोदकर व आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे. सहकाराच्या निवडणुकीत साडेतीन वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधून कृषी उत्पन्न बाजार समिती व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना या दोन महत्त्वाच्या संस्थावर आपली सत्ता आणली. पालोदकरांच्या ताब्यातून या दोन्ही संस्था हस्तगत केल्या. मात्र, त्यानंतरच्या सहकाराच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार व प्रभाकर पालोदकर यांनी राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर झालेल्या सिद्धेश्वर सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तालुका सहकारी जनिंग प्रेसींग आदी निवडणुकीत एकहाती सत्ता हस्तगत केली. त्यामुळे विरोधक भाजपच्या मंडळीनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाही सहकाराच्या निवडणुकीत पालोदकर व सत्तार यांनी पुन्हा वर्चस्व राखले आहे.

भाजपने या निवडणुकीत काँग्रेसपुढे पॅनल उभे करून मोठे आव्हान निर्माण केले आहे.भाजपच्यावतीने ज्येष्ठ नेते पांडुरंग बनकर, माजी आमदार सांडु पाटील-लोखंडे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मकरंद कोर्डे, तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, कारखान्याचे चेअरमन श्रीरंग साळवे यांनी गावागावात प्रचार सभा घेतल्या. तर काँग्रेस पक्षातर्फे आमदार अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सभा घेतल्या.

रविवारी १२ संचालकाच्या जागेसाठी मतदान होणार आहे. संस्थेसाठी एकुण १३ संचालकाची निवड होणार आहे. मात्र, उमेदवारी दाखल करतांना सोसायटी मतदारसंघातून एकच उमेदवारी अर्ज आल्याने एक संचालकाची जागा बिनविरोध निवडली गेली. या निवडणुकीसाठी सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील १० हजार ५८० मतदार मतदान करणार आहेत. सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहर, शिवणा, उंडणगाव, भराडी, घाटनांद्रा, भवन, अंधारी, पालोद, अजिंठा तर फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार व बाब्रा या अकरा केंद्रावर मतदान होणार आहे.

एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर महत्त्वाच्या असलेल्या या संस्थेची निवडणूक होत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करून सहकाराची निवडणुकीचा प्रचार भाजप व काँग्रेसच्या पॅनलने केला आहे. या निमित्ताने दोन्ही पॅनलकडून आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. पंधरा दिवस प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images