Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तहसीलदार पाटील चौकशीच्या फेऱ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

रोहयो समितीच्या दौऱ्याचा फटका कळंब येथील तहसीलदार वैशाली पाटील यांना बसणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना व कळंब येथे तहसीलदार म्हणून काम करीत असताना केलेल्या कारभाराबद्दलचेी चौकशी करण्याचे आदेश रोहयो समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

तहसीलदार वैशाली पाटील यांच्या कारभाराबद्दल जिल्ह्यात नाराजी होती. याबद्दलचा जाबही समितीने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. याशिवाय पाटील यांची तातडीने चौकशी करून त्यांच्या कारभाराविषयीचा अहवाल रोहयो समितीला पाठवून देण्याचे आदेश समितीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिले आहेत. एकंदरीत रोहयो समितीचा दौरा पाटील यांच्या कारभारानेच गाजल्याचे स्पष्ट होत आहे.

विधिमंडळ रोहयो समितीची 'आषाढीवारी'

उस्मानाबाद जिल्ह्यात २०११ ते २०१५ दरम्यान रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी व पडताळणी करण्यासाठी आलेल्या २५ आमदारांची विधिमंडळ समिती उस्मानाबाद दौऱ्यावर आली होती. या समितीने पाहणी म्हणजे आषाढवारी होती की काय अशी चर्चा होत आहे. परंडा, कळंब, तुळजापूर आदी तालुक्यांत रोहयोअंतर्गत कामात भ्रष्टाचार झाला असून ही समिती कारवाई करेल असे जिल्ह्यातील भोळ्याबाबड्यांना वाटत होते. परंतु सरकारला अहवाल सादर करण्यापलिकडे ही समिती काहीच करू शकत नाही.

परंडा, कळंब तालुक्यातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश रोहयो समितीने दिले आहेत. या चौकशी दरमयान, तहसीलदार पाटील यांचा हस्तक्षेप होत असल्यास त्यांना चौकशीसाठी उस्मानाबाद येथे बोलावून घेण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच त्याबाबतचा अहवाल समितीला देण्यात येईल.

- प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोघांनी मिळून मोबाइल पळविला

0
0

वाळूजः वाळूज एमआयडीसीतील एसबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका कामगारास दोन भामट्यांने पैसे भरण्याची पावती भरून देण्याचा बहाणा करत २५ हजार किंमतीचा मोबाइल लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास घडली. प्रविण धोंडीबा जाधव (मुळगाव केवळतांडा ता. कंधार जि.नांदेड) हा गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी वाळूज परिसरातील एफ सेक्टरमधील एका कंपनीत काम करतो. तो पैसे भरण्यासाठी तो एसबीआय बँकेत गेला होता. यावेळी अनोळखी युवकाने पावती भरून देण्याचा बहाणा करत २५ हजार किंमतीचा मोबाइल लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदनीनगरातील घरफोडी उघड

0
0

औरंगाबादः गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले असून त्याकडून ३९ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. गणेश मिलिंद निकाळजे (वय २४, रा. सिंधीबन कॉलनी, चिकलठाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून अधिक तपासासाठी त्यास मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घरफोड्या गणेश निकाळजे हा चिकलठाणा विमानतळसमोर येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अय्यूब पठाण मिळाली. त्याआधारे त्यांनी पथकासह सापळा लावून गणेशला पकडले. चौकशीत

सहा महिन्यापूर्वी त्याने नंदनीनगर येथील रहिवासी सिमा टाक यांच्या घरात चोरी करुन ३९ ग्रॅम वजनाचे सोने, रोख रक्कम लंपास केल्याची कुबली दिली. त्याकडून ३९ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले असून अधिक तपासासाठी त्यास मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अय्युब, पोलिस कर्मचारी सुनिल पाटील, शिवाजी भोसले, आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मार्गासाठी दिल्लीत आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठणहून जाणाऱ्या जळगाव- सोलापूर लोहमार्गाविषयीची माहिती देण्यास रेल्वे बोर्ड टाळाटाळ करत असल्याचे आरोप करत, आता थेट दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय पैठण तालुका रेल्वे संघर्ष समितीने घेतला आहे. दिल्ली येथील रेल्वे बोर्डासमोर लवकरच धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

मराठवाडा रेल्वे संघर्ष विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी नियोजित सोलापूर-जळगाव लोहामार्गात औरंगाबाद, पैठण व वेरूळचा समावेश असलेल्या मार्गाचा सर्व्हे कशाप्रकारे झाला याविषयीची माहिती रेल्वे बोर्डाकडे माहितीच्या आधिकारात ९ जून २०१५ रोजी मागितली होती. रेल्वे बोर्डाने दोनच दिवसात म्हणजेच ११ जून रोजी त्यांना, पैठण, औरंगाबाद व वेरूळचा समावेश असेलेल्या लोहमार्गाची कोणतीही माहिती न देता, नियोजित सोलापूर-जळगाव-लोहमार्गात जालना, भोकरदन या गावांचा समावेश असलेल्या मार्गाचा सर्व्हे करण्यात आल्याची माहिती दिली.

रेल्वे बोर्ड सोलापूर-जळगाव लोहामार्गात पैठणचा समावेश असलेल्या मार्गाची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने, शनिवारी पैठण तालुका रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. जालन्याचे खासदार त्यांची राजकीय शक्ती वापरून पैठणचा हक्काचा लोहमार्ग हिरावून घेत असल्याचा आरोप करण्यात आला. यापुढे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांचीच मदत घेण्याचे ठरविण्यात आले.लवकरच थेट दिल्लीला जावून रेल्वे बोर्डासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेत ओमप्रकाश वर्मा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे. संतोष तांबे, संतोष गव्हाणे, दिनेश पारीख, फजल टेकडी, आठवले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेब पोर्टलची निर्मिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हवामान बदलात शेडनेट किंवा पॉलि हाउसमधील शेती हा उत्तम पर्याय आहे. जिरायत जमिनीत हाच प्रयोग राबविल्यास १० एकरातील उत्पन्न २० गुंठ्यात काढता येईल. भविष्यात सामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 'इन्स्टिट्यूशन ऑफ अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजिस्ट' पोर्टल फायदेशीर ठरेल,' असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल प्रबोधिनी सभागृहात शुक्रवारी विखे यांनी पोर्टलचे उदघाटन केले.

शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील अद्ययावत माहिती देण्यासाठी 'इन्स्टिट्यूशन ऑफ अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजिस्ट' या नावाचे वेब पोर्टल सुरू झाले आहे. या उपक्रमासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीस सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या पोर्टलचे शुक्रवारी प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या समितीचे उपाध्यक्ष माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट आहेत. कृषी क्षेत्रातील निवृत्त अधिकारी व शास्त्रज्ञ सदस्य आहेत. या पोर्टलचे उद‍््घाटन केल्यानंतर विखे यांनी उपस्थित सदस्यांशी चर्चा केली. बाजारपेठेत शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी पोर्टलचा उपयोग करावा. ऑनलाइन मार्केटिंगसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरू शकतो, असे विखे म्हणाले.

दरम्यान, मॉल्स आणि इतर संस्थांचे सहकार्य घेऊन संबंधित पोर्टल सर्वदूर पोहचवले जाणार आहे. सर्वसामान्य शेतकरी शेतीमालाची जाहिरात वेबसाइटवर करून ऑनलाइन विक्री करू शकतील. शेतकरी व ग्राहक यांच्यात समन्वय साधण्याचे काम पोर्टल करणार आहे; तसेच कृषी पदवीधरांना सदस्य करून अद्ययावत माहिती पोर्टलवर उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती कृषीतज्ज्ञ भगवान कापसे यांनी दिली.

आयुक्तालयाची आठवण

आपल्या कार्यकाळात राज्याचे कृषी आयुक्तालय पुणे शहरातून औरंगाबादला स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न विखे पाटील यांनी केला होता; मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. वाल्मी येथील इमारतीत बरीच जागा रिकामी आहे. आयुक्तालय इथे असते तर फायदा झाला असता, अशी आठवण विखे यांनी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालय विस्ताराला निधीचा अडसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराला निधीचा अडसर निर्माण झाला आहे. संसदीय कागदपत्रीय समिती सोमवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यात आहे. या पार्श्वभूमीवर समितीसमोर निधीचा प्रश्न मांडला जाण्याची शक्यता आहे.

सध्याचे प्राणिसंग्रहालय सुमारे १५ एकर जागेवर आहे. सेंट्रल झू ऑथॅरिटीने त्याचा विस्तार करण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्यामुळे विस्तारीकरणाचा आराखडा व सविस्तर अहवाल झू ऑथॅरिटीला पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरीही मिळाली आहे. विस्तारीकरणासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची गरज आहे.

विस्तारित प्राणिसंग्रहालय कसे असावे. प्राण्यांची निवास व्यवस्था कशी असावी याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च झू ऑथॅरिटी देणार आहे. झू ऑथॅरिटीच्या निधीतून विशिष्ट प्रकारचे बांधकाम करावे लागणार आहे. विस्तारीकरणाचा मास्टरप्लान मंजूर होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला, पण अद्याप निधीची तरतूद करण्यात आली नाही.

झू ऑथॅरिटीने निधीची तरतूद केल्यास विस्तारीकरणाला लगेच सुरू करणे शक्य आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे काम रखडल्याने अनेक महत्त्वाचे प्राणी प्राणिसंग्रहालयात आणणे शक्य झालेले नाही. प्राणिसंग्रहालयात सिंहाची जोडी आवश्यक आहे, पण पिंजऱ्याअभावी त्यांना येथे आणता येत नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना जोडीदार नाही. अशा प्राण्यांना जोडीदार आणण्याची प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाची तयारी आहे, पण त्यात जागेचा प्रश्न आणि झू ऑथॅरिटीची मान्यता यांचा अडसर आहे. झू ऑथॅरिटीकडून निधी मिळण्याबरोबर महापालिकेच्या अर्थसंकल्पातही या कामासाठी तरतूद करणे गरजेचे आहे.

प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी निधी मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. त्याचबरोबर सफारी पार्कसाठी मिटमिटा येथील शंभर एकर जागा महापालिकेच्या ताब्यात लवकर यावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे त्याचा योग्य प्रकारे विस्तार झाला पाहिजे.

- खासदार चंद्रकांत खैरे, अध्यक्ष संसदीय कागदपत्रीय समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहातील खुर्च्यांची दुरुस्ती सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रसिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने संत तुकाराम नाट्यगृहातील आसनव्यवस्थेची दुरुस्ती हाती घेतली आहे. तुटलेल्या खुर्च्यांना व्यवस्थित बसवण्याचे काम शनिवारी (२७ जून) सुरू करण्यात आले. 'हुल्लडबाजीत ४० खुर्च्या तुटल्या' हे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. या बातमीनंतर प्रशासनाने तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे.

शहरातील सर्वात आलिशान संत तुकाराम नाट्यगृहाची अवस्था वाईट झाली आहे. अस्वच्छता आणि इतर गैरसोयीमुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यातील नृत्य स्पर्धेत हुल्लडबाजी झाल्यामुळे नाट्यगृहातील खुर्च्या तुटल्या आहेत. या खुर्च्यांच्या दुरुस्तीबाबत नाट्यगृह व्यवस्थापक मनोज पाटील यांनी महापालिकेतील तांत्रिक विभागाशी पत्रव्यवहार केला होता; मात्र, संबंधित विभागाने प्रतिसाद दिला नसल्याने खुर्च्यांची दुरुस्ती रखडली होती. तुटक्या खुर्च्यांमुळे प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून नाट्य संयोजक पवन गायकवाड यांनी स्वखर्चाने १३ खुर्च्या दुरुस्त केल्या होत्या. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'हुल्लडबाजीत ४० खुर्च्या तुटल्या' (२६ जून) हे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन नाट्यगृह व्यवस्थापनाने दुरुस्ती सुरू केली आहे. 'कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम तांत्रिक विभागाच्या अखत्यारित आहे. या विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळत नाही,' असे व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले. नाट्यगृहाचे बुकिंग व देखभालीची जबाबदारी आपली आहे तर, दुरूस्तीची जबाबदारी तांत्रिक विभागाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे. रंगकर्मी, नाट्य संयोजक व प्रेक्षकांचे शिष्टमंडळ सोमवारी महापालिकेचे आयुक्त व महापौर यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

पाया निखळला?

दुरुस्ती कामात अडचणी आहेत. खुर्ची भक्कम करण्यासाठी खिळे ठोकले जात आहेत; मात्र पाया मजबूत नसल्याने खिळे निखळत आहेत. वाळू व खडीत खिळे घट्ट बसण्यास अडचणी येतात, अशी माहिती व्यवस्थापक पाटील यांनी दिली.

तुटलेल्या खुर्च्यांची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे. नाट्यगृहात आसनव्यवस्थेच्या कामात काही तांत्रिक चुका असल्यामुळे खुर्च्या तुटतात. कायमस्वरुपी कामाची गरज आहे.

- मनोज पाटील, व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता अभियानाच्या माहितीत लपवाछपवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जानेवारी महिन्यात शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या माहितीची महापालिकेकडून लपवाछपवी केली जात आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

जानेवारी महिन्यात महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या संदर्भात डॉ. म. वि. देशपांडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. या अभियानाची पूर्ण जबाबदारी कुणावर होती, अभियानासाठी खरेदी केलेले साहित्य कोणते होते, त्याची किंमत काय, अभियानात कुठे आणि काय काम झाले, याचा अहवाल देण्याची विनंती देशपांडे यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी व घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांना पत्र दिले. डॉ. कुलकर्णी यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे व्यवस्थापक दिलीप सूर्यवंशी यांच्याकडे माहितीचा चेंडू टोलविला. सूर्यवंशी यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असे म्हणत देशपांडे यांचा अर्ज निकाली काढला. आयुक्तांकडेही यासंदर्भात तक्रार केली, पण त्यांनीही ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असे देशपांडे यांनी म्हटले आहे. स्वच्छता अभियानातील कामांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाची दरवाढ होणार ५ पासून ५० रुपयांपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षा मीटर दरवाढीच्या निर्णयामुळे नागरिकांना ५ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंतच्या भाडेवाढीला समोरे जावे लागणार आहे. पूर्वी मध्यवर्ती बस स्थानकापासून चिकलठाण्यापर्यंत मीटर रिक्षाने ९० रुपये द्यावे लागत होते. आता नव्या दरांनुसार ११२ रुपये मोजावे लागणार आहेत.

औरंगाबाद शहरात मीटर दरवाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. प्रादेशिक परिवहन प्र‌ाधिकरणाने पहिल्या किलोमीटरसाठी १४ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमिीटरसाठी १४ रुपये दर निश्चित केला आहे. नव्या दरांनुसार मीटरचे कॅलिबरेशन करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ४५ दिवस लागतील. त्यानंतर नव्या दरानुसार रिक्षाभाडे आकारणे अपेक्षित आहे. आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पहिल्या किलोमीटरसाठी एक रुपया आणि दुसऱ्या किलोमीटरसाठी तीन रुपये दरवाढ करून देण्यात आली आहे. दरवाढीनुसार ४ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडे यांच्या चौकशीसाठी निदर्शने

0
0

औरंगाबाद : महिला व बालविकास विभागाने २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी क्रांतिचौकात निदर्शने केली. पंकज मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी ही मागणी मराठवाडा सचिव मनिषा चौधरी यांनी केली. जिल्हा शहर संयोजक सुरेश पवार, दत्तू पवार, जिल्हा सचिव अस्मा काझी, बशीर महोमद, सय्यद अमझद, वैजनाथ राठोड, गौरव भार्गव, सुग्रीव मुंडे, नसीर खातीब, प्रसन्ना नाईक, रेखा महाजन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललित मोदींना भेटलो; हा गुन्हा ठरतो काय ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ललित मोदी प्रकरणावरून देशभर वादळ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'मी लंडनमध्ये ललित मोदींना भेटलो होतो. कुणी कुणाला भेटणे हा काय गुन्हा ठरतो काय?' असा सवाल उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.

पवार शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना मोदी प्रकरणावर भूमिका मांडताना ते म्हणाले की, 'आयसीसी'चा अध्यक्ष असताना लंडनमध्ये ललित मोदींना भेटलो होते. ते आयपीएलचे चेअरमन होते. कामाच्या बाबतीत कुणी कुणाला भेटू शकते. त्याचे भांडवल करण्याची गरज नाही. कुणी कुणाला भेटणे हा काय गुन्हा आहे काय ? उद्या प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची भेट होऊ शकते. त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. कुणाच्या भेटण्याबद्दल विनाकारण चर्चा होऊ नयेत. मोदींच्या विरोधात क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केस केली आहे. मोदी लंडनमध्ये आहेत. त्यांना भारतात येऊन भूमिका स्पष्ट करावी, असे आपण सांगितले आहे.

मोघम वक्तव्ये नकोत

कथित चिक्की घोटाळ्यानंतर आणखी तीन मंत्र्यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले की, विखेंनी माहिती येणार आहे, असे म्हटले आहे. हातात काही असल्याशिवाय मोघम वक्तव्य करू नये. अशा गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमित्र पॅटर्न राज्यात राबविणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

युनिसेफ आणि स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हंगामी रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बालमित्र योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. बालहक्क संरक्षण प्रकल्पातंर्गत या नाविन्यपूर्ण पथपदर्शी प्रकल्पामुळे लाभार्थींच्या शैक्षणिक व दैनंदिन जीवनात अनेक चांगले बदल झाले आहेत. जालन्याचा हा बालमित्र पॅटर्न लवकरच राज्यभरात राबविण्यात यावा यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही युनिसेफचे राज्य समन्वयक विकास सावंत यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

परतूर तालुक्यातील हदगाव येथील केंद्रीय शाळेत सुरू असलेल्या प्रकल्पाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळासह नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. राज्यासह देशभरात स्थलांतरणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. कापूसवेचणी आणि उसतोडणी सारख्या हंगामी रोजगारासाठी होणाऱ्या तात्पुरत्या स्थलांतराचे प्रमाण ही प्रचंड वाढत आहे. अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्थलांतरामुळे सदर कुटूंबातील शालेय विद्यार्थ्यांची मोठी दैना होत असते. पालकांसोबत स्थलांतरीत झाल्यास त्यांच्या शिक्षणाची पार ताटातूट होत असते. पालकांना सोडून गावात राहिल्यास त्याच्याकडे नातेवाईक किंवा गावकऱ्यांकडून दुर्लक्ष होण्याची भीती असते. दोन्ही परिस्थितीत मुलांच्या बालहक्कांवर गदा येऊन निर्माण होणाऱ्या प्रश्नासंदर्भात जालन्यातील स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने परतूर तालुक्यातून उसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटूंबियांचा सर्व्हे करण्यात आला. परतूर तालुक्यातील १५ गावातील एकूण सात हजार १२० घरांच्या सर्व्हेक्षणातून स्थलांतरित कुटूंबियांची आणि बालकांची धक्कादायक माहिती पुढे आली.

या गावातील १६ टक्के अर्थात एकूण एक हजार १०८ कुटूंब दरवर्षी हंगामी रोजगारासाठी गावातून राज्यासह परराज्यात स्थलांतरित होतात. यापैकी ९२६ कुटूंब आपल्या मुलांसह तर १८२ कुटूंब मुलांशिवाय स्थलांतर करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. यापैकी सर्वाधिक संख्या ६ ते १४ वयोगटातील मुलांची होती. उसतोडीसाठी तब्बल सहा ते सात महिने कुटूंबासह स्थलांतरित झाल्याने त्यांचा शैक्षणिक वर्षांचा नुकसान होतो. यासमस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि बाल हक्क संरक्षणासाठी स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालमित्र योजना आखण्यात आली.

या योजनेतंर्गत प्रत्येक गावात विनामानधन तत्वावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. गावातील स्थलांतर करणाऱ्या कुटूंबियांचा सर्व्हे करून त्यांना मुलांना सोबत घेऊन जाण्यापासून परावृत्त करणे, गावात राहणाऱ्या मुलांचे पालक बनून त्यांचे संगोपन करणे आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे. संरक्षण समितीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, आहार आणि पालक संपर्क हा पंचसुत्री कार्यक्रम राबविण्याची जवाबदारी बालमित्रांवर सोपविण्यात आली. संप्टेबर ते एप्रिल या कालावधी दरम्यान, यामुळे स्थलांतराचे प्रमाणे निम्म्याने कमी झाले तर गावात राहिलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व जीवनमान उंचावल्याचे दिसून येत आहे.

हसत-खेळत शिक्षण होत असल्याने बालमित्र आणि मुलांमधील मैत्रीचे नाते अधिक घट्ट होत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यासर्वांचा सहकार्य मिळत असल्याने हा प्रकल्प यशस्वी होत आहे. राज्यभरात हा प्रकल्प राबविल्यास मोठया प्रमाणात स्थलांतरित कुटूंबीयांतील बालहक्कांचे संरक्षण होईल.- भाऊसाहेब गुंजाळ, कार्यकारी संचालक,

स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान

हसत-खेळत शिकविण्याच्या पद्धतीमुळे मुलांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकल्प राबविताना अनेक अडचणी आल्या. मात्र, गावकरी, सरपंच व शाळेतील शिक्षकांच्या सहाकार्यामुळे त्यावर कायमचा तोडगा निघाला. आठवड्यातील तीन दिवस मनोरंजनासाठी तर चार दिवस अभ्यास घेतला जातो.

- शिवाजी शेळके, बालमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय रिक्षांचे दर तिप्पट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षातून एकावेळी केवळ ५ शालेय विद्यार्थ्यांना नेता येईल, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. त्यामुळे शालेय रिक्षांच्या भाड्यात रिक्षाचालकांनी तिप्पट वाढ केली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना रिक्षात कोंबणे बंद झाले असले तरी, पालकांना या मोठ्या भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी एका रिक्षात सुमारे १५ विद्यार्थी नेले जात होते. एका विद्यार्थ्याकडून दरमहा ५०० रुपये घेण्यात येत होते. आता एका विद्यार्थ्याकडून दीड ते २ हजार रुपये घेण्यात येत आहेत.

शहरात सुमारे चार हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये तीन चाकी व चार चाकी रिक्षांमधून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणातने-आण केली जाते. सुमारे अडीच हजार तीन चाकी रिक्षांमधून विद्यार्थी जातात. त्याचबोरबर १ एक हजार ४०० चार चाकी (मॅक्स टाइप) वाहनांचाही त्यासाठी वापर करण्यातय येतो. पोलिसांच्या आदेशानंतर तीन चाकी रिक्षांत आता ५-६ विद्यार्थी बसविले जात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ हजार ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. शाळेपासून घराचे अंतर किती आहे, यावर रिक्षाभाडे अवलंबून आहे. चार चाकी गाड्यांमध्ये सुमारे ८ मुलांना बसविले जाते. या गाड्यांमध्ये प्रति विद्यार्थी २ हजार रुपये भाडे घेतले जात आहेत. रिक्षामधून कमी विद्यार्थी नेणे परवडत नसल्याची रिक्षाचालकांची तक्रार आहे. वाढीव दर महागाईमुळे परवडत नसल्याचे पालक सांगतात. काही पालकांनी स्वत:च दुचाकीवरून मुलांना शाळेत सोडणे सुरू केले आहे.

केवळ रिक्षांची दरवाढ नाही

पाच विद्यार्थ्यांचे बंधन आल्याने आम्ही दर वाढवत आहोत, पण मॅक्समध्ये आठ विद्यार्थी बसविले जातात. त्यांचेही दर वाढविले आहेत. यामुळे आम्हीच फक्त दर वाढवतोय, असा समज करून घेऊ नये, असे एका रिक्षाचालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

६० टक्के विद्यार्थी रिक्षांमधूनच शाळेत येतात. पूर्वी रिक्षांमध्ये १४-१५ विद्यार्थ्यांना बसविले जात होते. आता एका रिक्षात ५ विद्यार्थी बसविले जातात. यामुळे रिक्षाभाडे वाढले आहेत, पण पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय एसटी महामंडळ किंवा महापालिकेने केल्यास हा प्रश्न सुटेल.- श्रीमती यू. के. नाईक, मुख्याध्यापक, शिशु विहार शाळा

आम्ही मुकुंदवाडीत राहतो. औरंगपुऱ्यातील शारदा मंदिर शाळेपर्यंत जाण्यासाठी पूर्वी रिक्षावाले ५०० रुपये घेत होते. आता १ हजार रुपये मागत आहेत. रिक्षाला दर महिन्याला हजार रूपये खर्च करणे शक्य नाही. यामुळे आता मुलीला शाळेत स्वत:च दुचाकीने सोडावे, असा आम्ही विचार करीत आहोत.

- महेश पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गैरहजर दाखवून केले नापास’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एमए (एमसीजे) अभ्यासक्रमांच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये हजर असताना गैरजहर दाखून नापास केले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या पदव्युत्तर अभ्यासक्रमच्या (एमएएसीजे) निकालात अनेक चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना निवेदनही सादर केले आहे. दुसऱ्या सत्राच्या व चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण दाखविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुणपत्रिकेत तोंडी परीक्षांचे गुण लघु शोध प्रबंधाच्या तर, लघु शोध प्रबंधाचे गुण तोंडी परीक्षांच्या रकान्यात दर्शविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण म्हणून आला. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे असा प्रकार घडल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.



गुणपत्रिकेत सततच्या चुका

गुणपत्रिकेतील चुका दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे मारावे लागतात. दुसऱ्या आणि चौथ्य सत्रातील या विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात परीक्षा विभागाकडून अशा प्रकारची तिसऱ्यांदा चूक झाल्याचे सांगितले आहे. परीक्षा विभागातील सूत्रांनी, छपाईतील चुकीमुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगितले.

यासंदर्भातील तक्रार अद्याप तरी माझ्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याची दक्षता प्रशासन घेईल.

- डॉ. प्रल्हाद लुलेकर, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारचे शेतीकडे दुर्लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरीप हंगामाच्या महिनाभर आधी केंद्राकडून पीककर्जाचे नियोजन होणे अपेक्षित असते. यंदा देशभरात ११ हजार कोटींचे पीककर्ज वाटप अपेक्षित आहे. आजवर केवळ पाच हजार कोटींचेच कर्जवितरण झाले आहे. ५५ टक्के शेतकरी अद्याप वंचित आहेत. शेतीकडे हे सरकार गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पवार म्हणाले,'मी केंद्रीय कृषिमंत्री असताना पेरणीच्या आधी एक महिना पीककर्जाचा आढावा घेऊन नियोजन करीत असे. नाबार्ड आणि केंद्र सरकारची यात महत्त्वाची भूमिका असते. आता पावसाळा सुरू झाला आहे. ११ हजार कोटींच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. माहिती घेतल्यानंतर असे कळाले की, आजवर केवळ पाच हजार कोटींचेच वितरण झाले आहे. याचा अर्थ अजून ५५ टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ पोचलेला नाही. शेतीत चांगले उत्पादन येण्यासाठी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवे होते. दुर्दैवाने केंद्र सरकार शेतीकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीची अर्थव्यवस्था मजबूत झाली तरच देशाच्या विकासाची वाटचाल योग्य पद्धतीने सुरू राहील.'

केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, बनावट पदव्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले,'वर्षभराच्या कालावधीत मोदींच्या सहकाऱ्यांची देशभर एवढी चर्चा होईल, असे वाटत नव्हते. हे गंभीर आहे. चार भगिनींच्या बाबतीत हे चित्र आहे. ते निश्चितपणे काळजी करण्यासारखे आहे. त्याची नोंद सर्वसामान्य जनता निश्चितपणे घेईल. माझ्यावर या सरकारमधील नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, पण त्यात काही तथ्य आढळले नसल्याचे त्यांनीच नंतर जाहीर केले. वर्षभराच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांवर होणारे आरोप पाहिल्यानंतर एवढ्या लवकर असे घडेल, अशी अपेक्षा नव्हती. विरोधकांना खाद्य पुरविण्याची तत्परता या सरकारने दाखविली आहे.'

मराठवाड्यात महत्त्वाच्या संस्था याव्यात, यासाठी मी आग्रही असेन. केंद्राकडे आग्रह धरला तर निश्चितपणे आपल्या पदरात काहीतरी पडेल. स्मार्ट सिटी प्रकल्पातून काय मिळते, हे पाहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच विधीमंडळात विरोधी पक्षाची भूमिका बजावते. चांगल्या व महत्त्वाच्या प्रश्नांवर मी केंद्र आणि राज्य सरकारला वेळोवेळी सल्ला देत होते. आता राज्यात फडणवीस सरकार आहे. फडणवीसांना कोण सल्ला देणार, असा टोला पवारांनी लगाविला.

कांद्याचे जाणीवपूर्वक वांदे

केंद्र सरकार कांद्याबाबत जाणीवपूर्वक चुकीचे धोरण स्वीकारत आहे. कांदा निर्यातीच्या धोरणात बदल करून ते थांबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कांद्याचे दर कमी होतील. शेतकऱ्यांना मालाला भाव मिळावे यासाठी काहीच उपाय नाहीत. उसाचे दर कमी केले. सोयाबीन, कापसाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. आता कांद्याबत धोरण घेऊन शेतीची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. हे चित्र चांगले नाही. सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे, असा सल्ला पवारांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकर-रिक्षा टक्कर, ७ ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील तुरोरीनजीक टँकर व अॅपेरिक्षाची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आठ जण जखमी झाले. ही घटना शनिवार दुपारी चारच्या सुमारास घडली. अपघातातील मयत हे तुरोरी येथील रहिवासी आहेत. मयतामध्ये तीन महिला व एक बालकाचा समावेश आहे.

प्रकाश पाडूरंग मंडवे (वय २३, रा. तुरोरी), विष्णु नंदकुमार भोसले (वय २०, रा. तुरोरी), खाजाबाई र‌हेमान (वय ५२, रा. तरमोड),रामाबाई ‌‌हाक्के (वय ४५, रा. बंडगरवाडी), सुकुमारबाई बंडगर (वय २३, रा. बंडगरवाडी), सोनाबाई नरसप्पा सास्तुरे (वय ४५, रा. बंडगरवाडी), नंदिनी निवृत्ती बोधे (वय ४ महिने, रा. बंडगरवाडी) असे मरण पावलेल्यांची नावे आहेत. उमरगा तालुक्यातील तुरोरीजवळ प्र्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षाला समोरुन येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. यामध्ये अॅपेरिक्षातील सात जण जागीच मरण पावले. यामध्ये आठ जण गंभिररित्या जखमी झाले.

३ भाविक ठार

राधानगरी - देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या टाटा सुमो गाडीची ट्रकशी टक्कर होऊन तीन भाविक जागीच ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे मोहोळजवळ (जि. सोलापूर) घडला. सुनीता तानाजी डवर (वय ४१), छाया लहूराज पाटील (४०), लक्ष्मण सुरेश पाटील (२५) अशी मृतांची नावे असून, ते सर्वजण कंथेवाडी (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कंथेवाडीहून तेरा भाविक शुक्रवारी (२६ जून) सकाळी टाटा सुमोतून (एमएच-१४ ६४९१) विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. रात्री दर्शन घेतल्यावर सर्वजण मध्यरात्रीच स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे निघाले होते. पहाटे पाच वाजता मोहोळ येथे आले असता अक्क्लकोटहून येणाऱ्या मालवाहू ट्रक ट्रकशी (एमएच १३ आर ४५६६) सुमोशी टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये सुनीता डवर जागीच ठार झाल्या, तर उपचारासाठी नेत असताना छाया पाटील व लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवीपासून योगशिक्षणाचे धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकार आता योगाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची तयारी करीत आहे. इयत्ता पाचवीपासून अभ्यासक्रमात योगाचा समावेश असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याची आखणी करत आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात 'योगा वेलफेअर सेंटर' उभारले जाईल, असे आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे सांगितले.

'सीएसएमएसएस' संस्थेतील कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. योग दिन हा जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला. १७७ देशांनी यात सहभाग घेतला. भारतासाठी ही गौरवाची बाब आहे. आरोग्य चांगले रहावे, यासाठी आवश्यक अशा योगाचा अभ्यासक्रमात सहभाग करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांच्या विभागातर्फे याची आखणी सुरू आहे. इयत्ता पाचवीपासून हा अभ्यासक्रम राबविला जाईल. त्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत हा विषय अभ्यासक्रमात असेल. अभ्यासक्रमाची रचना कशी असेल, परीक्षा पद्धती कशी, असेल याबाबत यातील तज्ज्ञांचा अभ्यासगट नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. अभ्यासक्रम राबविण्यासाठी बीएड, डीटीएडसारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मदत घेतली जाईल.'

'योगा वेलफेअर सेंटर'

योगाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासह योगाचा प्रचार आणि प्रसारासाठी गावागावात 'योगा वेलफेअर सेंटर' सुरू करण्याचाही केंद्र सरकार विचार करत आहे. यामध्ये योगाबाबत मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले जतील. त्यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संकेत केंद्रीयमंत्र्यांनी दिले.

कलुषित प्रवृत्ती सर्वच पक्षांत

भाजपच्या काही केंद्रीय, राज्यातील मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपाबाबत नाईक म्हणाले की,'कलुषित प्रवृत्ती सर्वच पक्षात असतात, परंतु या प्रकरणाची आपल्याला फारशी माहिती नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील प्रवास ‘रामभरोसे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील तुरोरी गावाजवळ २७ जून रोजी ऑ‌टोरिक्षा व टँकर यांची धडक झाल्याने नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दूर्घटनेच्या चौकशीचे आदेश निघतील. परंतु, ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे अद्याप गुढच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावर अपघाताच्या घटना घडणारी ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी योग्य सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, आणि अन्य प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताची मालिका सुरूच आहे.

मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या वाहनांना आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू राज्यासाठी सर्वात जवळचा हाच मार्ग असल्यामुळे सध्या जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या संख्येने वाढली आहे. कंटेनर शिवाय टँकरसारखी मोठी वाहने सध्या या मार्गावरून सतत धावतात. बहुतांश वाहनेही वातानुकुलित आणि एअर ब्रेकची असल्यामुळे ही वाहने वेगाने बेफामपणे धावत असतात.

बीड ते उस्मानाबाद शिवाय सोलापूर-हैद्राबाद या मार्गावर नळदूर्ग ते तलमोड (महाराष्ट्र हद्द) दरम्यान सततची नागमोडी वळणे असल्यामुळे एकमेकांना येणारे समोरचे वाहन दिसत नाहीत. यामुळेच असे छोटे-मोठे अपघात या मार्गावर अधून-मधून होताना दिसतात. मात्र, याची कधीच गांभीर्याने दखल घेतली नाही.

महामार्गालगतची साईड पट्टी नीटपणे न भरणे, त्यावर रोलर फिरवून त्याची लेवल न तपासणे या बी अॅण्ड सी बाबतच्या नेहमीच्याच तक्रारी आहेत. तसा औरंगाबाद ते उस्मानाबाद पर्यंत हा सुमारे २६० किलो मीटर महामार्ग नागमोडी वळणाचा व अरूंद असाच आहे. अपघात प्रवणक्षेत्र दर्शविणारे फलक या महामार्गावर अभावानेच आढळतात. आणि आढळले तरी त्यावरील अक्षरे पुसटशी असतात. महामार्गालगतच्या झाडाच्या रंगरंगोटीकडेही या विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. या सर्व बाबीमुळे आता इंदौर-बैंगलोर आणि मुंबई-हैदराबाद हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, उमरगा तालुक्यातून जाणारे हे काम भूसंपादनाच्या कारवाईमुळे मंदावलेले आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर झाल्यास या मार्गावरील अपघातावर निश्चितपणे मर्यादा येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमरगा येथील डान्सबारवर छापा

0
0

उस्मानाबादः उमरगा चौरस्त्यावरील सौदागर ऑर्केस्ट्रा डान्सबारवर शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात तरुणींसह दहाजणांना ताब्यात घेतले. अवैधरित्या चालू असलेल्या या डान्सबारवर ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली घाडगे यांनी केली. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

उस्मानाबादच्या अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली घाडगे यांनी कसल्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई केली. पोलिसांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास छापा टाकला. या वेळी सात-आठ तरुणी या ठिकाणी अश्लील हावभाव करीत नृत्य करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या नृत्य करणाऱ्या मुलींसोबत या वेळी उपस्थित असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुली अल्पवयीन असण्याची शक्यता असून त्यांच्या वयाबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. बार मालकांसह व्यवस्थापक व येथील कामगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बार मालकाला सोडविण्यासाठी राजकीय नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या साहित्याची अफरातफर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तब्बल पाच लाख रुपयांच्या साहित्याची (स्पेअरपार्ट) काही जणांनी परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी या विभागात काम केलेल्या ५८ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

पदभार हस्तांतरणाच्या वेळी जे साहित्य कमी आले त्यास एका अधिकाऱ्याला जबाबदार धरणे संयुक्तीक नसून ही जबाबदारी सामुहिक असल्याने कमी आलेल्या साहित्याची रक्कम अग्नीशमन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याच्या शिफारसीस तत्कालीन आयुक्तांनी मान्यता दिली होती. मात्र, या प्रकरणी पुन्हा जोगदंड, पाशा यांची उपायुक्त प्रशासन यांच्यापुढे सुनावणी घेऊन सदर रक्कमेची कर्मचाऱ्यांकडून समान भागात वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार अग्नीशमन विभागात २००७ ते एप्रिल २०१३ या दरम्यान काम केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ५८ कर्मचाऱ्यांना या साहित्याची रक्कम आपल्या वेतनातून कपात का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसीचा खुलासा सात दिवसात सादर करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त प्रशासन प्रकाश येवले यांनी दिला आहे. वाहनांमध्ये वारंवार बिघाड होऊ नये, तत्पर सेवा बजावता यावी यासाठी वाहनांसह अन्य कामासाठी दर्जेदार साहित्य (स्पेअरपार्ट) वापरले जाते. मात्र, अशा तब्बल ५ लाख १८ हजार रुपयांच्या साहित्याची काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघड झाला आहे.

३० एप्रिल २०१३ रोजी वयोमानानुसार जोगदंड सेवानिवृत्त झाले. त्यानंतर अग्नीशमन अधिकारी पदाचा पदभार सबफायरमन शेख रईस पाशा यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु, या हस्तांतरामध्ये अग्नीशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागातील साहित्य कमी असल्याचे दिसून आले. या प्रकरणी प्रभारी अग्नीशमन अधिकारी यांनी कमी असलेल्या साहित्याची सादर केलेल्या यादीनुसार तत्कालीन आयुक्त, उपायुक्तांच्या सूचनेनुसार प्रभारी उपअभियंता राजकुमार वानखेडे यांत्रिकीविभाग, आपत्ती व्यवस्थान अधिकारी मिर्झा बेग यांनी चौकशी करुन कमी असलेल्या साहित्याची किमत पाच लाख १८ हजार १३१ रुपये एवढी निश्चीत केली. त्याचा घसारा किंमत २ लाख ७५ हजार ७२९ रुपये एवढी काढून तो अहवाल यांत्रिकी विभागास सादर केला.

उत्तरानंतर खरा प्रकार समोर येईल

काही दिवसांपूवीच जोगदंड यांच्यासह त्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांची प्रशासनापुढे सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी या नोटीसीचे उत्तर दिल्यानंतरच खरा प्रकार काय आहे, कोण दोषी आहे हे निष्पन्न होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images