Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आरोपी पळाल्याने तीन पोलिस निलंबित

$
0
0

उस्मानाबादः शौचास जाण्याच्या बहाण्याने तुळजापूर पोलिस ठाण्यातून ‌२५ जून रोजी आरोपी पळून गेला होता. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी तीन पोलिसांना निलंबित केले. ए. एस. जोगदंड, हवालदार जीवन कवडे आणि पोलिस नाईक पी. आर. खटके या तिघांना निलंबीत करण्यात आले. तुळजापूर पोलिसांनी चोरीतील आरोपी राहूल सीताराम थोरात ( रा. वाघोली, पुणे) याला अट‌क केली होती. या प्रकरणात त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. नरेंद्र जाधव, कोकाटे, पवार यांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

डॉ. शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्काराचे नवरत्न जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. नरेंद्र जाधव, पोपटराव पवार, श्रीमंत कोकाटे या मान्यवरांचा समावेश आहे. १४ जुलै रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने भारताचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुरूरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. मानचिन्ह व मानपत्र देऊन नवरत्नांचा गौरव करण्यात येतो.

यावर्षी अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ, माजी कुलगुरू तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, पाण्याच्या नियोजनात क्रांती करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, इतिहासाला उजाळा देऊन खरा इतिहास समोर आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे श्रीमंत कोकाटे, मुस्लीम समाजाबद्दल सर्व जनतेला माहिती देणारे अब्दुल कादर मुकादम, वकिली व्यवसायातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे अॅड.असीम सरोदे, शैक्षणिक क्षेत्रात वेगळी प्रतिमा निर्माण करणारे शैलेश पगारीया, एड्‌स संक्रमीत अनाथ मुलांची अविरत सेवा करणारे प्रा. रवी बापटले, अकोला-जनता अर्बन बँकेच्या माध्यमातून जनसेवा करणारे सात सुवर्णपदकांचे मानकरी चेअरमन रमाकांत खेतान आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये रंजक व मार्मीक सुत्रसंचलनातून आपली ओळख निर्माण करणारे विलास आठवले आदी नवरत्नांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचरा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई’

$
0
0

जालनाः सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांच्या विरोधात कठोरपणे कायदेशीर कारवाई करण्याचा धोरणात्मक विचार राज्य सरकार करीत आहे. स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी जोडला गेल्याने सरकार याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जालना शहरात आयोजित महास्वच्छता अभियानाच्या उद‍्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी रंगा नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योती प्रिया सिंह, सीईओ दिपक चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, विलास नाईक उपस्थित होते. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या केवळ स्थानिक पातळीवर पालिकेच्या जवाबदाऱ्या नाहीत. नागरिकांनी या कामासाठी स्वतःला जवाबदारी घेऊन जोडून घेण्याची सर्वात जास्त गरज असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडक्या शाळेत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील जिल्हा परिषेदेची शाळा मोडकळीस आली आहे. शाळेच्या अकरा पैकी पाच खोल्यांत बसण्यासारखी परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.

निमगाव य़ेथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या वर्षीपासून आठवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. येथे २९९ विद्यार्थी संख्या आहे. जिल्हा परिषदेने वीस वर्षांपूर्वी शाळेसाठी चार खोल्या बांधल्या आहेत. त्यानंतर गेल्या दशकात एक आयताकृती खोली बांधली. या पाचही वर्ग खोल्या वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. या खोल्यांच्या भिंतीला तडे गेले असून फरशी फुटली आहे. आयताकृती खोलीची मागची भिंत कधीही कोसळू शकते. या परिस्थितीत सध्या कमी वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविली जात आहे.

'शाळेची दुरवस्था झाल्याने अलिकडेच नवीन चार वर्गखोल्या बांधल्या आहेत,' अशी माहिती मुख्याध्यापक एन. एस. कायस्थ यांनी दिली. पण आठ वर्ग असून वाईट अवस्थेतील दोन खोल्यांचाही वापर करीत आहोत. या खोल्यांची अवस्था पाहता काही वर्ग इतरत्र भरवावे लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मोडकळीस आलेल्या शाळेबद्दल विचारणा केली असता सरपंच गोरखनाथ कवडे यांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शालेय समितीची बैठक बोलावून दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-फेरफार प्रणालीतील अडचणींबद्दल तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

ई-फेरफार ऑनलाइन संगणक प्रणाली मंद गतीने चालत असून विहिरीची नोंद न होणे यासह तांत्रिक अडचणी असल्याचे तलाठी संघटनेने तहसीलदार किशोर देशमुख यांच्या लक्षात आणून दिले आहे. संघटनेतर्फे नुकतेच तहसीलदारांना त्याबद्दलचे निवेदन देण्यात आले.

ई-फेरफार संगणक प्रणालीत मंडळ अधिकारी यांच्या लॉगइनला फेरफार मंजूर होण्यास अडचण येत आहे. फेर मंजूर होत नाही, ऑनलाइन संगणक प्रणालीत इतर हक्कांमध्ये विहिरीची नोंद होत नाही. सातबाराच्या इतर अधिकारात हस्तांतरणात बंदी, असा एरर येतो, संबंधित माहिती डिलिट होत नाही. ऑनलाइन संगणक प्रणालीचे सर्वर नेहमीच स्लो असते व संगणक हँग होतो. या समस्याचे निराकरण करण्यासाठी संबंधितांकडे विचारणा केली असता योग्य मार्गदर्शन मिळत नाही, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

या समस्यांचे निराकरण करून काम सुलभ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, माजी तालुकाध्यक्ष कैलास थोरात, आर. एस. खंडागळे, अलका पेटारे, एस. एस. मिसाळ, एन. ओ. खंदारे, व्ही. बी. जगताप, व्ही. पी. कुलकर्णी, एस.आय. केंद्रे, बी. जे. दुतोंडे, के. डी. साळवे, ए. के. पंडित, एम. एस. पांचाळ आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिकास मारहाण करून पळविला वाळूचा ट्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

महसूल विभागाच्या पथकाने जप्त केलेला वाळूचा एक ट्रक तिघांनी अव्वल कारकुनास मारहाण करून पळवून नेला आहे. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात ट्रकमालक अनीस खान याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयाच्या पथकाने पळसवाडी येथे वाळू माफियांवर शनिवारी कारवाई करून तीन ट्रक पकडले. त्यापैकी दोन ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. एक ट्रक (एम. एच. २०, पी. एफ. ३५३३) पळसवाडी गावाजवळ उभा केला होता. हा ओव्हरलोड ट्रक तहसील कार्यालयात आणत असताना खुलताबाद येथील शंजरी हॉटेलजवळ ट्रकमालक अनीस खान व इतर दोघे सकाळी सातच्या सुमारास (एम. एच. २०, बी. एन. ४२४७) या वाहनातून आले. त्यांनी अव्वल कारकून विलास सोनवणे यांना ट्रक पकडल्याबद्ल जाब विचारला व मारहाण करून ट्रक घेऊन पळून गेले.

अव्वल कारकून विलास सोनवणे हे महसूल कर्मचारी संघटनेचे खुलताबाद तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेचा निषेध नोंदविला आहे. मारहाण करणाऱ्या ट्रकमालक व इतर दोघांना अटक करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

खान्देशातील गिरणा नदीची वाळू ट्रक मधून औरंगाबाद जिल्ह्यात आणून विक्री केली जाते. त्यासाठी काही अधिकाऱ्यांची साथ असल्याचा आरोप दबक्या आवाजात केला जातो. वाळू माफिया आणि त्यांना चोरून साथ देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच वाळू माफियांची जप्त केलेला ट्रक पळवून नेण्याची हिंमत होते, अशी चर्चा महसूल कर्मचारी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस गावांतील पाणी पिण्यासाठी अयोग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायतींना दूषित पाणी नमुना चाचणीत पिवळे कार्ड देण्यात आले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांमध्ये साथरोगाची शक्यता आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांकडून या गावांना पाण्याची गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे ८३७ नमुने मे महिन्याच्या अखेरीस तपासण्यात आले. त्यापैकी औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६ गावे, चापानेर केंद्रातील २, वडनेर केंद्रातील ७, हतनूर केंद्रातील ५, चिकलठाण केंद्रातील ६, चिंचोली केंद्रातील २, नाचनवेल केंद्रातील ५ व नगद केंद्रातील ४, असे २० गावांतील नमुने दूषित आढळलेले आहेत. ११७ ग्राम पंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी ए.के.विडेकर यांनी दिली.

पावडर नाही

देवळाणा, रुईखेडा, आलापूर, उंबरखेड, पळशी, निभोरा, जवखेडा (बुद्रुक), भारंबा तांडा, खातखेडा या ग्रामपंचायतीकडे पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठीची टीसीसी व तत्सम पावडर उपलब्ध नाही, अशी माहिती तालुका आरोग्य कार्यालयातून मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याच्या वाढदिवसासाठी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू

$
0
0

वैजापूरः नागपूर मुंबई महामार्गावर भग्गाव शिवारात ट्रकने धडक दिल्याने रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राहुल करमसिंग वैद (वय २३,रा. ठाणे), असे मृताचे नाव आहे. तो औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. वडिलांच्या वाढदिवसाला मुंबई येथे जाताना त्याला जीव गमावावा लागला.

वडिलाच्या वाढदिवसानिमित्त तो नागपूर-मुंबई मार्गावरून दुचाकीने (एम. एच, ०३, ए क्यु ११९६) मुंबई येथे जात होता. परंतु रस्ता चुकल्याने तो माघारी फिरला. त्यावेळी कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने (एम. एच. ३४, ए बी ६२३५) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तो मरण पावला. पोलिसांनी पाठलाग करुन ट्रकला पकडले. याप्रकरणी हवालदार नंदकुमार नरोटे यांनी फिर्याद दिल्यानंतर ट्रकचालक हरदीपसिंग चणनसिंग विंडर (वय४५, रा. बल्लारशहा, चंद्रपूर) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६७ हातभट्टी विक्रेत्यांवर महिन्याभरात कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत विशेष पथकाची निर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर या महिन्यात हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ६७ आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच अजिंठा पो‌लिस ठाणे हद्दीत जुगार खेळणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे व पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबरमध्ये अडकलेल्या उदमांजराची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाल्मी परिसरात चेंबरमध्ये अडकलेल्या उदमांजराची रविवारी (२८ जून) सुटका करण्यात आली. सर्पमित्र विजय उजीवाल यांनी उदमांजर वन विभागाच्या ताब्यात दिले. पंचनामा केल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी उदमांजर सातारा परिसरात सोडले.

दाट झुडूपात वास्तव्य आणि रात्री सक्रिय असलेला दुर्मिळ उदमांजर काल वाल्मी परिसरात आढळले. एका बंद चेंबरमध्ये उदमांजर अडकले होते. मांजरासारखा दिसणारा प्राणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गर्दीतील मुले व तरूण उदमांजराला खडे मारत होती. तसेच काहींनी झाडांच्या फांद्यांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. या प्राण्याला वाचवण्यासाठी जागरुक नागरिकांनी सर्पमित्र विजय उजीवाल यांनी माहिती कळवली. दोन तासांच्या परिश्रमानंतर उजीवाल यांनी उदमांजर ताब्यात घेतले. त्यानंतर उदमांजराला पोत्यात ठेवून वन विभागाच्या ताब्यात दिले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर यांनी उदमांजराची पाहणी केली. प्राणी सुस्थितीत असल्यामुळे त्याला सातारा डोंगर परिसरात सोडण्यात आले.

पिंजरा सापडेना

उदमांजराला सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागात लहान पिंजरा नव्हता. दोन पिंजरे वैजापूर व पैठण येथे आहेत. त्यामुळे लहान प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात एक मोर व हरणाची सुटका करण्यात आली. या प्राण्यांना ठेवण्यासाठीही पिंजरा नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ संदर्भासाठीच पुरंदरेंना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'केवळ इतिहासातील संदर्भ दिल्याने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांविषयी लिहलेले भविष्यात महाराष्ट्राच्या माथी मारून हा विकृत इतिहास मांडला जाईल. हा प्रकार थांबवण्यासाठी परिषदा उपयोगी नाहीत, तर राजकीय लढाई करून पेटून उठावे लागेल' असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीतर्फे रविवारी झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेत ते बोलत होते. 'पुरंदरे यांना घोषित झालेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार रद्द करण्यात यावा' या विषयावर ही परिषद झाली. परिषदेचे उदघाटन आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव होते. यावेळी श्रीमंत कोकाटे, प्रा. प्रतिमा परदेशी, अॅड. वैशाली डोळस, निलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा सेवा संघ, संभाजी ‌ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदींसह २८ संघटनांनी परिषदेचे आयोजन केले होते.

'व्यवस्थेच्या विरोधात जाणारा इतिहास घडवत असतो. शिवाजी महाराजांनीही तेच केले; मात्र महाराष्ट्राचा ‌इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला व तो पुरंदरे यांनी लिहिला. चूक इतिहास लिहलेल्या पुरंदरे यांना फडणवीस सरकारने पुरस्कार घोषित केला. या निमित्ताने विचारांची आग पेटवण्याची संधी सरकारने दिली आहे. ही आग येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोचवावी लागेल,' असे आव्हाड म्हणाले. परिवर्तन करणाऱ्यांवर नेहमीच हल्ले झाले आहेत. नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे यांची हत्या सनातनवाद्यांनी केली, असा आरोप त्यांनी केला. श्रीमंत कोकाटे यांनी, पुरंदरे हेच खरे जेम्स लेन असल्याचे सांगितले. पुरंदरे यांनी शिवाजी महाराज व बहुजनांचा विकृत इतिहास लिहिला असल्याची उदाहरणे त्यांनी दिली. पुरंदरे यांना कोणत्या निकषामुळे पुरस्कार घोषित केला, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आयोजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी पुरस्काराबद्दल निषेध करून मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यात १०० नव्या बसची बांधणी

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

नाशिक कुंभमेळ्याचे पहिले स्नान १६ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील भाविक हजेरी लावतील. या भाविकांच्या प्रवासाची सोय म्हणून परिवहन विभागाने २०० एसटी गाड्यांची नव्याने बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या औरंगाबादमधील चिकलठाणा कार्यशाळेत १००, नागपूर आणि दापोलीच्या कार्यशाळेत प्रत्येकी ५० बसची बांधणी जोरात सुरू आहे.

देशभरात बस बांधणी करताना प्रवासी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मानांकनाचा आधार घेतला जातो. त्यासाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार चिकलठाणा कार्यशाळेत दोन महिन्यापूर्वी बस बांधणी सुरू करण्यात आली. सुरुवातीला एक विशेष बस तयार करण्यात आली. या बसची दापोली येथील एआयआर संस्थेने पाहणी केली. या पाहणीनंतर बस बांधणी करण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानुसार चिकलठाणा कार्यशाळेत पुढील बस बांधणीचे काम सुरू करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर तयार केलेली बस सिडको बसस्थानकाला वापरासाठी देण्यात आली आहे.

लोखंडी रॉडचा वापर

नुकत्याच झालेल्या काही अपघातांच्या घटनांत जड वाहनांच्या धडकेने एसटी कापल्याची घटना घडली. या घटना थांबविण्यासाठी अल्युमिनिअमच्या पत्र्याला आधार म्हणून लोखंडी रॉड लावण्यात आले आहेत. यामुळे अपघाताच्या वेळी कोणालाही जास्त इजा पोहोचणार नाही.

औरंगाबाद येथील चिकलठाणा कार्यशाळेत सध्या मानव विकास निर्देशांकाच्या आधारे कुभंमेळयासाठी शंभर बसच्या बांधणीचे काम सुरू केले आहे. वेळेच्या आत हे काम पूर्ण होईल. नवीन नियम, प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन हे काम सुरू आहे.

- जे. पी. चव्हाण; व्यवस्थापक, चिकलठाणा कार्यशाळा

एसटीतील नवे बदल

छतावर आता कॅरिअर नाही.

छतावरील बस स्टेपनी आता चेसिसला जोडली.

बसमध्ये दोन ठिकाणी संकटकालीन मार्ग.

एसटीच्या उंचीत जमिनीपासून

५० एमएम वाढ.

अपघाताच्या वेळेस सिट निघू नये यासाठी दोन पाइपचा वापर.

लक्झरीप्रमाणे दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूस विशेष लगेज बॉक्स.

औरंगाबाद येथे १०० बसची बांधणी सुरू

नागपूर येथे ५० बसची बांधणी सुरू

पुण्याजवळ दापोली येथे ५० बसची बांधणी सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाबाजारमध्ये लोकसहभागातून कचरामुक्ती

$
0
0

पृथा वीर, औरंगाबाद

रस्त्यावर पसरलेला कचरा, कुंड्या शिगोशिग भरलेल्या आणि परिसरात दुर्गंधी. राजाबाजारचे शिसारी आणणारे हे चित्र घराघरातून कचरा उचलल्यामुळे पालटते आहे. नगरसेविका यशश्री बाखरिया यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक आणि व्यापाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. राजाबाजारची कचरामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

राजाबाजार शहराचा जुना भाग. येथे कचरा फेकण्याच्या जागा निश्चित झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. कचऱ्याची विल्हेवाट लागावी म्हणून नागरिकांनी लोकप्रतिनिधींना मदत मागितली. आपापल्या परीने प्रयत्न करून पाहले, पण कचरा मात्र रस्त्यावरच राहिला.

परिसरातली जैन मंदिरे, शनी मंदिर, गणपती मंदिर जवळही कचराकुंड्या भरून वाहू लागल्या. घाण व दुर्गंधीमुळे दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्या लागायच्या. यासाठी नगरसेविका यशश्री बाखरिया यांनी आपले काका मोहिंदर बाखरिया यांच्या मदतीने नागरिकांशी संवाद साधला. त्यांना विश्वासात घेऊन काम सुरू केले. पहिल्याच प्रयत्नात महिला नगरसेवकाच्या वॉर्डात होत असलेला बदल पाहून परिसरात स्वच्छता कायम राहावी म्हणून नागरिकही उत्तम प्रतिसाद देत आहेत.

घंटागाडी घरोघरी

राजाबाजार, धावणी मोहल्ला, कुवॉँरफल्ली, अंगुरीबाग या भागात ४० हून अधिक मोठ्या कचराकुंड्या होत्या. ही जागा म्हणजे कचरा फेकण्याचे नियोजित ठिकाणच झाले होते. कुंड्यातला कचरा रस्त्यावर पडायचा. यामुळे मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले होते. लहान मुले दिसली की कुत्रे मागे लागायचे. यशश्री बाखरिया व मोहिंदर बाखरिया यांनी सर्वप्रथम या कचराकुंड्या हटविल्या. आता या भागात महापालिकेचे नऊ कर्मचारी सकाळी येऊन घरोघरी जाऊन कचरा उचलतात. फक्त सुटीच्या दिवशी कचरा घरात ठेवावा लागतो. घंटागाडी थेट घरोघरी येत असल्यामुळे महिला व दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सामान्य नागरिकांसोबत दुकानदारांशी संवाद साधला. त्यामुळे शहागंजमध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी झाले. सर्वांनाच स्वच्छतेचे महत्त्व पटल्यामुळे कचरा घंटागाडीतच टाकला जातो.

- यशश्री बाखरिया, नगरसेविका

१९९१ पासून माझ्या घरासमोर कचरा टाकण्यास सुरुवात झाली. कचरा उडून समोरच्या शनी मंदिरात जायचा. अखेर या वर्षी घरासमोरचा परिसर स्वच्छ झाला.

- सुभाष सुराणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा शिक्षकाच्या घरी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव परिसरात भर दिवसा एका शिक्षक दांपत्याचे घर फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगाव भागातील गारवा हॉटेलसमोरील ऑर्चीड होम येथे पुण्यशील नामदेव टेंभूरकर यांचा फ्लॅट आहे. पुण्यशील व त्यांची पत्नी प्रणिता टेंभूरकर हे दोघे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असल्याने शाळेमध्ये गेले होते. त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान अज्ञात चोरांनी कडीकोंडा घरात तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्याच्या बांगड्या, दोन अंगठ्या, पदक, चांदीचे दागिने व रोख सतरा हजार रूपये असा ऐवज चोरून नेला. काही वेळाने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या फ्लॅटधारकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याची माहिती टेंभूरकर कुटुंबाला दिली. छावणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभूरकर यांच्या मुलासाठी घरात एक मोबाइल ठेवण्यात आला आहे. हा मोबाइल देखील चोरांनी पळवून नेला. पण तो मिटमिटा परिसरात फेकून दिला. हा मोबाइल सापडल्यानंतर एका नागरिकाने टेंभूरकर यांच्याशी संपर्क करून माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकवलेले विषय परीक्षेत नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभ्यासक्रमात शिकवले वेगळेच विषय आणि परीक्षेतले विषय वेगळे. असे महानाट्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जीव रसायनशास्त्र विभागात घडले. विद्यार्थ्यांनी बीसीयूडीकडे धाव घेतल्यानंतर यावर तोडगा निघाला.

विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील गोंधळ थांबण्याचे नाव घेईना. विद्यापीठातील विभागांमधील विद्यार्थ्यांना वेळेत गुणप‌त्रिका मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. जीव रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना तर नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी मागील वर्षीच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. तसेच विभागात शिकवले वेगळे विषय अन् ‌परीक्षेसाठी दिलेले विषय वेगळे आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी बीसीयूडीकडे केली आहे. विनाअनुदानित तत्त्वारील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रश्न समोर आला. सोमवार (२९ जून) पासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. यानंतर बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांनी यावर तोडगा काढला. दरम्यान, विभागात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या सत्र परीक्षेतील गुणपत्रिका नवे शैक्षणिक वर्ष उजाडले तरी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. केवळ गुण सांगत विद्यार्थ्यांनी नव्या सत्रात प्रवेश घेतला. वर्ष होत आले तरी गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुणपत्रिका केव्हा मिळणार, असा सवाल विद्यार्थी करत आहेत.

विभागातील विद्यार्थ्यांचा हा छोटासा प्रश्न होता. चर्चेअंतर तो मार्गी लागला. विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. तसेच त्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. तो प्रश्नही येत्या आठ-दहा दिवसांत सोडविण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

- डॉ. के. व्ही. काळे, बीसीयूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सुखना’तील प्रदूषणाचा उद्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुखना नदीमध्ये अनेक कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. या असह्य जगण्याचा उद्रेक रविवारी (२८ जून) आंदोलनातून व्यक्त झाला. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी परिसरामध्ये सुमारे ५० ते ६० नागरिकांनी तीव्र घोषणाबाजी करीत नदीमध्ये रसायन सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

चिकलठाणा परिसरातील अनेक कंपन्यांमधून वर्षानुवर्षे सुखना नदीमध्ये सर्रास घातक रसायनयुक्त पाणी सोडले जाते. या परिसरातील नागरिकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या माहितीनुसार, नदीमध्ये रसायन सोडण्याचा उद्योग मागच्या सुमारे ३० वर्षांपासून सुरू असला तरी गत दहा वर्षांमध्ये रसायन सोडण्याचे प्रमाण खूप जास्त वाढल्याने त्याचे तीव्र दुष्परिणाम परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये आणि व्यक्तींवर दिसून येत आहेत. परिणामी, लहान मुले व वृद्धांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रकाराचा निषेध करीत ५० पेक्षा जास्त नागरिकांनी निषेध केला. कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये 'इको नीडस् फाऊंडेशन' ही संस्था सहभागी झाली होती. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रियानंद आगळे, रोहित थोरात, रमेश जावळे, निलेश जाधव, लक्ष्मण वाकळे आदी सहभागी झाले होते. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी 'मटा'कडे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

तीव्र दुर्गंधीचा सामना दिवस-रात्र करावा लागतो. बाहेरचे लोक ही दुर्गंधी अजिबात सहन करू शकत नाहीत. घरच्या व परिसरातील मंडळींचा दवाखाना सतत सुरू असतो. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. म्हणूनच आम्ही आज आंदोलन केले.

गोवर्धन कदम

घातक रसायनांमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. पत्र्याला भोके पडतात, सडून जातात. चांदीची भांडीदेखील निव्वळ काळी पडत आहेत. घातक पाण्यामुळे परिसरातील रहिवासी अल्पायुषी झाले आहेत.

एकनाथ गाडेकर

माझ्यासह इतरांच्या विहिरीचे पाणी खराब झाले आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी अजिबात वापरता येत नाही. या दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध माणसे सातत्याने आजारी पडत आहेत. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

भारज गाजेकर

तब्बल ३० पेक्षा जास्त वर्षांपासून नदीमध्ये रसायन सोडण्याचा प्रकार सुरू आहे. रसायन सोडण्यामध्ये अनेक कंपन्या असून, कारवाई मात्र अजिबात होत नाही. यामुळेच परिसरातील शेती नापीक झाली. परिसरामध्ये सतत लाल-पिवळे पाणी झिरपत असून, खाज येणे, आदी आरोग्य समस्यांमुळे हैराण झालो आहोत.

साईनाथ रिठे

नदीतील दूषित लाल पाणी बोअरमध्ये झिरपत आहे. जनावरांना नदीचे पाणी देता येतच नाही; शिवाय बोअरचे पाणीही देता येत नाही. हवेतूनही प्रदूषण होत असल्याने घरांवरील पत्रे सडूत आहेत. घरातील तांबे-पितळ्याची भांडी लोखंडाप्रमाणे काळी पडत आहे. केस झडणे, टायफॉईड, काविळी आदी आजाराने मुले-नागरिक त्रस्त आहेत. बोअरच्या पाण्याचा चहा करता येत नाही, दूध फाटते.

- गणेश पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी चार आरोपी गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतनगर येथील निकम मुळे खून प्रकरणातील चार पसार आरोपींना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ रविवारी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीमध्ये विशाल गायकवाड या मंगळसूत्र चोराचाही समावेश आहे. बुधवारी हा खुनाचा प्रकार घडला होता.

भारतनगर येथील किराणा दुकानदार भालचंद्र उर्फ निकम मुळे याचा आबासाहेब तांबे याच्यासोबत आर्थिक व्यवहार होता. या व्यवहाराचे पैसे तांबेच्या घरी जाऊन मागितल्यामुळे बाहेरगावी असलेल्या तांबेला राग आला होता. त्याच्या सांगण्यावरून नारायण पारटकर, विशाल गायकवाड व इतर सात जणांनी भर चौकात ‌मुळेला मारहाण केली होती. उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी मुळेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी नारायण पारटकर व कोरडे नावाच्या आरोपीला अटक केली होती. गुन्ह्यातील इतर साथीदार पसार झाले होते. रविवारी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ चार संशयित आरोपी आले असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली. आरोपीमध्ये दिगंबर सहदेव वैराळ (वय २२), विजय उर्फ छोटू शिवाजी वैद्य (वय १९), विशाल ज्ञानोबा गायकवाड (वय १९) व वैभव ज्ञानोबा गायकवाड (वय २२ सर्व रा. भारतनगर) यांचा समावेश आहे. त्यांना मुकूंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस ‌निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, भंडारी, अशोक नागरगोजे, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, आनंद वाहूळ, नंदलाल चव्हाण व प्रभाकर राऊत यांनी केली.

मस्तवालपणा कायम

पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भितीचे भाव नव्हते. किरकोळ गुन्हा केल्यासारखी त्यांची वर्तवणूक होती. यापैकी एक आरोपी विशाल गायकवाड हा मंगळसूत्र चोर असल्याची माहिती मुकूंदवाडी पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडेल स्कूल बंदच्या निर्णयास आव्हान

$
0
0

औरंगाबाद : आघाडी सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य विद्यार्थांसाठी सुरू करण्यात आलेले मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय युतीच्या सरकारने घेतला. या निर्णयास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असता न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.

शिक्षण विभागाने देशातील ६८० आर्थिक व शैक्षणीक मागास परिसरात दर्जेदार हिंदी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागात मॉडेल स्कूल सुरू करण्याचा निर्णय मे २०११ मध्ये घेतला. या निर्णयाचा लाभ ग्रामीण भागातील मुला-मुलींना होणार होता. एप्रिल २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणूकीनंतर सत्तांतर झाले. राज्याच्या प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालकांनी २० मे २०१५ च्या पत्रान्वये पालघर, नाशिक, नंदुरबार, जालना, हिंगोली, कोल्हापूर, गडचिरोली, परभणी, नांदेड, बीड या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मॉडेल स्कूल मध्ये चालु शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याबाबत सूचित करण्यात आले.

भोकरदन तालुक्यातील उत्तम राऊत, विष्णू जंजाळ व शशिभूषण चौधरी या मुलांच्या पालकांनी ही याचिका केली. इमारतीचा प्रस्तावित खर्च ४ कोटी रुपये आहे. त्या इमारतीचे ४० टक्के बांधकाम झाले. मात्र, योजना पूर्ण करण्याऐवजी राज्य शासनाने योजना बंद करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय केला. निर्णय रद्द करण्यात यावा, राज्यातील मॉडेल स्कूल सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण सचिवांना देण्यात यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली. सुनावणीवेळी शिक्षण विभागाच्या शिक्षण सचिवास नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. याचिका कर्त्यांच्यावतीने डी. बी. पवार, केंद्रातर्फे संजीव देशपांडे तर जालना जिल्हा परिषदेच्यावतीने संभाजी टोपे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत शिक्षकास सर्वेक्षणाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

भोंगळ कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना नगर पालिकेचा एक अजब कारभार समोर आला आहे. पालिकेने चक्क एका मयत शिक्षकालाच शाळाबाह्य विद्यार्थांच्या सर्वेक्षण करण्याच्या कामाचे आदेश दिले. जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाय योजना आखण्याचे आदेश जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. या आदेशानुसार ग्रामीण भागात जिल्हा परिषद तर शहरी भागात नगरपालिकेकडे याची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.

या उपक्रमातंर्गत शहरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी नगरपालिकेने शालेय शिक्षकांना पत्र पाठवून आदेश दिले. एकूण सहाशे शिक्षकांना अशा प्रकारचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. दरम्यान, जालना नगरपालिकेने चक्क एका मयत शिक्षकालाच हे आदेश पत्र पाठविल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या शिक्षाकाचे सुमारे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यांच्या नावाने पालिकेची ऑर्डर आल्याने कुटुंबियांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वेक्षण आणि प्रशिक्षण कामात गैरहजर राहिल्यास 'राईट टू एज्युकेशन एक्ट' अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा इशारा ही या नोटिसमध्ये देण्यात आला आहे. याप्रकारामुळे कुटुंबियांमधून पालिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये टँकर सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात भर पावसाळ्यातही गावे व वाड्यांना १५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ७८१ विहीर व कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीसंकटात वाढ होत आहे. जिल्ह्यात रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात किरकोळ व तुरळक पाऊस वगळता अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या अद्यापही संपलेली नाही. भर पावसाळ्यात जिल्ह्यातील विविध गावे व वाड्यांना १५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ७८१ विहिर व कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे रोहिणी नक्षत्रातील पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. त्याशिवाय गेल्या तीन चार दिवसांपासून सुसाट वारे सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णतः धास्तावला आहे. हताश बळीराजा पेरणी अर्ध्यावर सोडून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नेमका जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरीही ७६७ मिली मीटर इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस परंडा तालुक्यात ११७ मिली मीटर इतका तर सर्वात कमी पाऊस उस्मानाबाद तालुक्यात ५२ मिली मीटर व कळंब तालुक्यात ५४ मिली मीटर इतका झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाचा पेरा १४ टक्के इतका झाला असून पावसाअभावी पेरा केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती. पेरणीपूर्वीची मशागत, तसेच बि-बियाणे व खते यांची खरेदी करून खिसे रिकामे झालेला शेतकरी सध्या निरभ्र आकाशाकडे पाहून हवालदिल झाला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पेरणी केलेल्या बळीराजासमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images